सध्या काय वाचताय? - भाग १४

बऱ्याचदा एखादे पुस्तक आवडते, वाचता वाचता त्याबद्दल थोडेफार सांगावेसे वाटते, पण सविस्तर समीक्षक लेख लिहायचा उत्साह किंवा वेळ नसतो. तरीही, अशा चर्चेने नवीन पुस्तकांची ओळख होते, दुसऱ्यांना ती शोधून काढावीशी वाटतात, आणि कोणी वाचून त्याबद्दल सविस्तर मत मांडल्यास नवीन चर्चेचा धागाही निघू शकतो. धागा जिवंत राहिला की प्रत्येक दोन-तीन दिवसांनी डोकावून नवीन प्रतिसाद वाचायला मजा येते. स्थळाच्या नियमांप्रमाणे चर्चेत भाग घेणाऱ्यांनी फक्त शीर्षक एवढेच न देता, पुस्तक-लेखाबद्दल एक-दोन का होईना ओळी लिहाव्यात अशी अपेक्षा आहे.
=========

ग्रॅन्टा ह्या सुप्रसिद्ध नियतकालिकाचा ताजा अंक भारताविषयी आहे. त्यातलं काही लिखाण ऑनलाइन उपलब्ध आहे. त्यापैकी 'फिक्सर' हा स्निग्धा पूनमलिखित लेख / वृत्तांत वाचला. निवडणुकांमधला राहुल गांधींचा निष्फळपणा, सरकारी योजनांचे फायदे मिळवण्यासाठी छोट्या गावातल्या लोकांना काय करावं लागतं इथपासून ते इंग्रजीवर प्रभुत्व, बकरीचोरी आणि गोऱ्या कातडीविषयीच्या आवडीपर्यंतचे त्यातले अनेक छोटेमोठे मुद्दे रोचक आहेत. आजच्या ग्रामीण भारताचं एक चित्र त्यातून उभं राहतं आणि 'अच्छे दिन' आणण्यासाठी नक्की काय काय करायला लागेल, असा प्रश्नही मनात उभं करतं.

0
Your rating: None

Comment viewing options

Select your preferred way to display the comments and click "Save settings" to activate your changes.

तुम्बाडचे खोत

ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.

Mandar Katre

ब्लाईंडनेस

ही प्रतिक्रिया इथे हलवली आहे.

मराठी आंतरजालाविषयी

ऐसीच्या प्रशासक/संपादक/संस्थापक अदिती यांचाहा लेख रविवारच्या लोकमत'मंथन' पुरवणीत प्रसिद्ध झाला आहे.
लेख आवडला.

छान लेख. मराठी आंजाबद्द्ल

छान लेख. मराठी आंजाबद्द्ल थोडक्यात छान मांडलय.

मजा नाय आली. मराठी

मजा नाय आली. मराठी आंजाबद्दलचा लेख पण इंटर+इंट्रा संस्थळीय लाथाळ्यांचा साधा उल्लेखसुद्धा नसावा हे योग्य णाही.

*********
(सहीपुरतेच) ..आबा कावत्यात! (एरवी हानगं कुत्रं विचारत नै...)

काय बोलणार? शब्द संपले.

काय बोलणार? शब्द संपले.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

+१

हे म्हणजे हुजुरातीत असलेल्यांनी पानपताचा अनुल्लेख करावा त्यातली गत झाली.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

त्यासाठी पुस्तक काढावं लागेल

त्यासाठी पुस्तक काढावं लागेल नै का!

National Geographic चं -

National Geographic चं - "BRAIN - The Complete Mind - How it develops, how it works & how to keep it sharp" पुस्तक वाचते आहे. त्यातील काही tidbits-
(१) बाह्य उत्तेजना अर्थात "external stimulie" मुळे, मेंदूच्या प्रत्यक्ष कार्यामध्ये बदल घडून येतो. उदा - ताणामुळे स्मृती साठवण (encoding of memory) बदलते.
.
(२) मेंदू हा अविकारी व स्थिर अर्थात बदल न होऊ शकणारा नसतो. उलट त्याची कार्यप्रणाली सुधारण्याच्यी अनेक संधी आपल्याला उपलब्ध असतात. स्नायू जसे व्यायामाने अधित सुदृढ होतात, तसेच मेंदूचे व्यायाम केले, मेंदूस खाद्य पुरविले तर मेंदू अधिक कार्यक्षम बनतो.निर्मीतीक्षमता, कल्पनाविलास आदि मेंदूचे अनेक पैलू सुधारु शकतात. आयुष्याला खुल्या मनाने (open mind) सामोरे जाण्याचे अनेक प्रकार असू शकतात जसे - वाचा व त्यावर विचार करा, एखाद्या चित्रप्रदर्शनाला भेट देऊन कलाकृतींचा मनमुराद आनंद लूटा, क्लिष्ट संगीत ऐका व त्यातील ताल (pattern) शोधा, ठेका शोधा, संगीत ऐकल्याने मेंदूतील एकापेक्षा अधिक भाग उत्तेजित होतात व नवीन नवीन सर्किटस बनतात. Gordon L Shaw नावाच्या संशोधकाने असे मांडले की - स्वतःला आवडते संगीत ऐकल्यावरती थोडा काळ तरी spatial problems सोडविण्याच्या क्षमतेत सकारात्मक बदल घडून येतो. दुसरा एक न्युरॉलॉजिस्ट Richard Restak याने , या मतास दुजोरा तर दिलाच वरती त्याने हे मांडले की रोज थोडा वेळ जरी mozart संगीत ऐकले तरी मेंदूच्या आकलनक्षमतेत (cognition) व विचार करण्याच्या क्षमतेत (deep thoughts) सकारात्मक बदल घडतो.
.
(३) तुम्ही सकाळी अधिक प्रसन्न असता की सायंकाळी (Morning person VS Evening person). मेंदू या दोहोंपैकी एकास प्राधान्य देतो.
.
(४) मानवी मेंदूत १०० बिलीअन न्युरॉन्स असतात.
.
(५) Neuron circuitry बाह्य उत्तेजनेमुळे wire/re-wire होत असते. हाय-टेक गॅजेटस व इन्टरनेट च्या जमान्यात वाढलेली तरुण मुले-मुली हे जुन्या पीढीपेक्षा वेगळे आहेत का? तर कदाचित हो. UCLA च्या एका संशोधकाने, Gary Small ने असे संशोधनात्मक मत मांडले की - टेक सॅव्ही मुले-मुली इलेक्ट्रॉनीक संवाद व कनेक्शन्स पटकन आत्मसात करतात पण reading body language & face to face cues मध्ये मार खातात. याउलट जुनी पीढी इलेक्ट्रॉनीक मिडीआ चटकन आत्मसात करु शकत नाही.
.
(६) मेंदूतील Neuron circuitry ही खूप मोठ्या प्रमाणात हात-ओठ व जीभेशी संबंधित असते.
.
(७) जिथे सरासरी मेंदूचे वजन ४८ औंस असते तिथे बायरन कविच्या मेंदूचे वजन ७९ औंस होते.
.
(८) १९९९ मध्ये शास्त्रज्ञांना हा शोध लागला की - आईनस्टाइनचा मेंदूचा भाग जो गणित व spatial reasoning चा नियामक आहे तो १५% अधिक रुंद होता.
.
(९) न्युरॉलॉजिस्ट Robert Friedland याने संशोधन केले की आल्झाइमर रोखण्याकरता जीवनशैलीत काही बदल करणे अत्यावश्यक आहे जसे - नवी भाषा शिकणे, क्लासिकल संगीत ऐकणे, कोडी सोडविणे, चौरस आहार, नियमित व्यायाम, वजन आटोक्यात ठेवणे.
.
(१०) मेंदूच्या सर्व पेशींना स्वतःचा एक जेनेटीक (अनुवंशिक) कोड असतो. जो कोड फक्त ४ nucleotide bases चा बनलेला असतो. G-C-T-A (Guanine, Cytosine, Thymine, Adenine) या चार अक्षरांतून जी कॉम्बिनेशन्स तयार होतात त्यांनी तुमचे एकमेव स्व बनते.
.
(११) ताणास overreact केल्याने हानी होते. कारण त्यामुळे मेंदूमध्ये cortisol नावाचे संप्रेरक स्त्रवते. ज्यामुळे hippocampus नावाच्या भागावर वाईट परीणाम होऊन, स्मृती आठवैण्याच्या क्षमतेवर वाईट प्रभाव पडतो. ताण निर्मूलनाकरता काही उपाय - प्रार्थना/ध्यान आदिंच्या सहायाने विचार मंद करणे, कुटुंब व मित्रपरीवाराबरोबर स्नेहपूर्ण संबंध ठेवणे, भरपूर हसणे व आनंदी रहाणे कारण त्यामुळे अधिक ऑक्सिजन घेतला जाऊन Feel good endorphin तयार होतात..आवश्यक विश्रांती घेणे ज्यायोगे ताण संप्रेरकांची नीर्मीती मंदावते, व्यायाम
.
(१२) १००,००० गुणसूत्रांपासून मनुष्य बनतो त्यातील ३०,००० मेंदूशी निगडीत असतात.

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

हेच पुस्तक परत वाचते आहे. जे

हेच पुस्तक परत वाचते आहे. जे रोचक मुद्दे सापडतील त्यांची याच प्रतिसादात भर घालेन.
_________
विजडम सर्कल - ना नफा ना तोटा संस्था आहे याबद्दल माहीत नव्हते. या साइटवर कोणतही सल्ला हवा असल्यास विचारता येतो. - https://en.wikipedia.org/wiki/Elder_Wisdom_Circle
______
पंचेद्रियांपासून मिळणारे ज्ञान उदा - चव, स्पर्श, गंध, दृष्य, ध्वनी यांपैकी, गंधाचे ज्ञान थेट स्वरुपात होते. याउलट म्हणजे गंध वगळता, अन्य इंद्रियगम्य ज्ञान वळणावळणाच्या मार्गाने होते. म्हणजे गंध हा थेट फ्रंट लोबच्या अ‍ॅमिग्डेला वर परीणाम करतो. याउलट चव, दृष्य, स्पर्श यांचे विद्युत-रासायनिक संदेश हे पहील्यांदा ब्रेन-स्टेम नंतर थॅलॅमस, मग सेरेब्रल कॉर्टेक्स ला रिले होतात. अजुन एक म्हणजे - गंध हा मेंदूच्या भावनिक केंद्राशी घट्ट निगडीत असतो. म्हणजे गंधवाही संदेश कोणतेही आडवळण न घेता, थेट मेंदूच्या फ्रंटल लोब ला जाऊन पोचतात.
या "हॉट लाइन" मागचे कारण उत्क्रांती मध्ये सापडते. - गंधज्ञानामुळे प्राण्यांना काय खाण्यास योग्य नाही किंवा विषारी वायूंचे ज्ञान पटकन होत असे. प्राण्यांच्या ज्या जातींना गंधज्ञान कमी होते ते जातीतील बरेचसे पुढची पीढी जन्माला घालण्याआधीच,मरत.
________
हिवाळ्याच्या मध्यात म्हणजे हॉलिडे सीझन संपल्यावरती जे औदासिन्य (डिप्रेशन) जाणवते - झोप जास्त येणे, भूक मंदावणे त्याचे कारणही उत्क्रांतीमध्ये असावे असा शास्त्रज्ञांचा कयास आहे.कारण हिवाळ्यात प्राणी जे हिबरनेट करतात त्यामुळेअन्नाची समृद्धी कमी होते आणि मानवास अन्न शोधण्याचे अधिक प्रयास करावे लागतात.

http://www.thenewsminute.com/

http://www.thenewsminute.com/lives/912#at_pco=cfd-1.0&at_ab=per-12&at_po...

साइना नेहवाल बद्दल हा लेख वाचला. आवडला.

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

इसाबेल हॉफमायर या दक्षिण

इसाबेल हॉफमायर या दक्षिण आफ्रिकी इतिहासकाराचे "गांधीज प्रिंटिंग प्रेस: एक्सपेरिमेंट्स इन स्लो रीडिंग" पुस्तक वाचले. गांधींनी दक्षिण आफ्रिकेत असताना "इंडियन ओपिनियन" साप्ताहिक काढले होते. त्या साप्ताहिकाच्या इतिहासाचे निमित्त करून हॉफमायर बाई ब्रिटिश साम्राज्यातल्या भारतीय स्थलांतरितांचा, छापखान्याच्या व्यवसायाचा, गांधींवर घडलेल्या जॉन रस्किन यांच्या विचारांच्या संस्कारांचा सुरेख आढावा घेतात. पुस्तक अत्यंत वाचनीय आहे. लवचिक, हलक्या भाषेत बरेच काही सांगून जाते. "इंडियन ओपिनियन" हे बहुभाषिक साप्ताहिक होते (हिंदी, तमिळ, गुजराती आणि इंग्रजी), नंतर फक्त गुजराती आणि इंग्रजी राहिले. त्यातील लेखांतून गांधींनी आफ्रिकेत तसेच भारतात मिळून एक ठराविक वाचक वर्ग कसा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. वाचकवर्गच नव्हे तर एक ठराविक वाचनसंस्कृती: तत्काली वर्तमानपत्रांतील छोट्या छोट्या बातम्या, धावते आढावे, बटबटीत आणि सनसनी शीर्षक आणि तात्कालिक, वरवरच्या प्रतिक्रियांनी भरलेल्या प्रवाहाविरुद्ध, संथ, विचारपूर्वक, पुनर्वाचनावर बेतलेली. त्या सोबत वाचनाच्या प्रतिक्रियेला देखील तसेच प्रगल्भ आणि संथ करू पाहणारी. गांधींनी वाचकांशी साप्ताहिकातूनच साधलेला प्रश्नोत्तरस्वरूप संवाद, आणि त्यासाठी वेगवेगळ्या पुस्तकांचे केलेले अनुवाद व संपादन या तर्काचे मुख्य स्रोत आहे. त्यातून भाषिक संबंध, भाषांतर वगैरेंवरचे त्यांचे विचार ही उलगडत जातात. या पूर्वतयारीतून गांधींच्या "हिंद स्वराज" पुस्तकाला कसा आकार आला, हे देखील स्पष्ट दिसते.

हो, गांधींनी आजचे सोशल मीडिया पाहिले असते तर काय केले असते कोण जाणे! पुस्तक वाचताना हा प्रश्न हमखास सुचतोच. कारण सिम्पटम्स सगळी तीच वाटतात: वरवरचे वाचन, माहितीच्या लाटांवर लाटा, २४ तास बातम्या आणि कनेक्टिविटी, एकाही विषयावर मन न टिकणे, इ. २०व्या शतकाच्या उदयास या वेगवान वाचनपद्धतींच्या दुष्परिणामांबद्दल असेच प्रश्न गांधींसहित अनेकांना पडले होते; शंभर वर्षांनंतर प्रश्न तेच, पण वाचनाचा, आणि माहितीप्रसाराचा वेग अफाट वाढलाय एवढेच. हॉफमायर बाईंना हे ठाऊक असावे - "स्लो रीडिंग" हे उपशीर्षक आजकालच्या "स्लो फूड" आणि "स्लो लाइफ" वगैरेंची मुद्दाम आठवण करून देते.

स्कोर काय झाला

पुढील कविता वाचनात आली:

स्कोर काय झाला सांगा
स्कोर काय झाला...।।
काम नाय हाताला
भाकर नाय पोटाला
तोंड वर करुन काय
इचारतो मला.....???
स्कोर काय झाला सांगा
स्कोर काय झाला.....।।

युवराजच्या फटक्याला
वाजवतो टाळ्या
अन सचिन च्या शतकाला
फटाक्यांच्या माळा...
प्यान्ट फाटली ढुंगनावर
ठिगाळ नाय त्याला
अन तोंड वर करुन काय
इचारतो मला...??
स्कोर काय झाला सांगा
स्कोर काय झाला...।।

एका एका जाहिरातीचे
करोडो घेती
तोंड रंगवुन येती
कधी तोंड रंगवुन जाती..
टीवी च्या चैनल वर
सचिन पुन्हा येतो
चुना लावून येतो कधी
चुना लावून जातो..
बूस्ट घ्या बिअर घ्या
दूध मागु नका
पेप्सी घ्या कोला घ्या
पाणी मागु नका...
पिज्जा घ्या बर्गर घ्या
भाकर मागु नका...
थोबाड त्यांच बघुन
फायदा काय तुला
अन तोंड वर करुन काय
इचारतो मला..??
स्कोर काय झाला सांगा
स्कोर काय झाला...।।

आय पी एल नावाच
आणले नव सॉन्ग
खेळाडूंची झाली विक्री
लाउनि रांग...
काळा पैसा पांढरा करतो
आय पी एल वाला
न अर्थकरण कळणार कधी
आपल्या देशाला...

खेळ कुठे राहिला सारा
बाजार झाला
नी क्रिकेट नावाचा
आजार झाला
या आजारान घेरलया
उभ्या देशाला
अन तोंड वर करुन काय
इचरतो मला...??
स्कोर काय झाला सांगा
स्कोर काय झाला...।।

मीच आता काही
विचारतो तुला
खरे खरे सांगायचे
स्कोर काय झाला...

बलात्कार झाले कितीे
स्कोर काय झाला...
दंगली मधे मेले कितीे
स्कोर काय झाला...

कामगारांना पिळले कितीे
स्कोर काय झाला...
दलिताना छळले कितीे
स्कोर काय झाला...

बेकारांची गर्दी कितीे
स्कोर काय झाला...
शेतकरी मेली कितीे
स्कोर काय झाला...

स्विस बैंकेत पैसा का
स्कोर काय झाला...
गरिबाना मारले का
स्कोर काय झाला...

बालगुन्हे वाढले कितीे
स्कोर काय झाला...
जंगल जमीन हडपलीे
स्कोर काय झाला...

उभा देश जळतोया
जाण नाही तुला
न तोंड वर करुन काय
इचारतो मला...??
स्कोर काय झाला...
सांगा स्कोर काय झाला
स्कोर काय झाला सांगा
स्कोर काय झाला...

शीतल साठे यांच्या आवाजातले हे गाणे

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

असली गाणी ऐकणारी डोकी कुठे राहतात ?

असली गाणी ऐकणारी डोकी कुठे राहतात ? मुंबईतून गिरणी कामगार हद्दपार झाल्यानंतर अशी एल्गारवाली गाणी बंदच झालीयत जवळजवळ. ही गाणी ऐकणारा वर्ग कुठे आहे भारतात ? नाही म्हणायला दलित वस्तीत आंबेडकर जयंती / पुण्यतिथी, बुद्ध पौर्णिमा अशा ठराविक दिवशी एल्गारवाली गाणी वाजतात पण ती तितकीच.
अवांतर : 'कोर्ट' कधी रिलीज होतोय ?

कविता आवडली. आयपीएल प्रकरण

कविता आवडली. आयपीएल प्रकरण सुरू झाल्यानंतरचा विचार करता अधिकच पटली, आवडली.

आज सकाळी एक बातमी पाहिली. न्यू यॉर्क शहरात कुठेतरी आग लागली होती. काही लोकांनी त्या आगीच्या पार्श्वभूमीवर सेल्फी काढले, हसऱ्या चेहेऱ्यांनी, त्याबद्दल दुसऱ्या दिवशी काही लोकांनी माफीही मागितली. त्यावर ही कविता आणि असंवेदनशीलता आणखी टोचली.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अदिती त्या सेल्फी बद्दल मलाही

अदिती त्या सेल्फी बद्दल मलाही राग आलेला.That was outrageous.
_________

पण या कवितेबद्दल, - क्रिकेट अन करमणूकीलाही जीवानात काही स्थान आहे की नाही? की आपलं तेच रडगाणं आळवत बसायचं?

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

क्रिकेट अन करमणूकीलाही

क्रिकेट अन करमणूकीलाही जीवानात काही स्थान आहे की नाही? की आपलं तेच रडगाणं आळवत बसायचं?

अर्थात आहे.
हि कविता क्रिकेटवर नसून त्याच्या (व एकुणातच खेळ करमणूकीच्या) बदललेल्या स्वरूपावर नी अर्थकारणावर आहे असे मला वाटले.

==
कविता रोचक वाटली

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

>>क्रिकेट अन करमणूकीलाही

>>क्रिकेट अन करमणूकीलाही जीवानात काही स्थान आहे की नाही?

कुणाच्या जीवनात?

अगदी अगदी! उगाच पॉप्युलर

अगदी अगदी! उगाच पॉप्युलर गोष्टींना झोडपायची हौस.

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

अहो असं काही लिहिलं म्हणजे

अहो असं काही लिहिलं म्हणजे सर्वसाधारण मध्यमवर्गीय माणसांत लगेच अपराधीपणाची भावना निर्माण होते. जे निगरगट्ट आहेत ते निगरगट्टच राहातात, अजून नव्या नव्या टूर्नामेंट्स आयोजित करतात आणि खोर्‍याने पैसा ओढत राहातात. पण यांना मात्र मध्यमवर्गाच्या खरं तर कष्टाने मिळवलेल्या पण वर वर सुखासुखी मिळतायत अशा वाटणार्‍या गोष्टींबद्दल पोटदुखी.

हम्म्म.. सुखासुखी नक्की

हम्म्म.. सुखासुखी नक्की कोणाला मिळतात मग या गोष्टी?

Hope is NOT a plan!

कबीर कला मंचाच्या शीतल

कबीर कला मंचाच्या शीतल साठेंची आहे असेही वाचले.

Hope is NOT a plan!

३-४ "Glamour" magazines

३-४ "Glamour" magazines वाचतेय. काही चटपटीत सल्ले उत्तम असतात. अन अशी glossy & glamorous, sassy मासिके वाचायला अजिबात लाज वाटत नाही.

Every time, every time it rains, it's gonna rain pennies from heaven
Don't you know every cloud contains lots of pennies from heaven
You'll find your fortune's fallin', baby, all over the town
Be sure, be sure that your umbrella is upside down

लोकांना पुस्तकं वाचायला

लोकांना पुस्तकं वाचायला दिवसातला किती वेळ देता येतो? आणि कायम कुठल तरी पुस्तक वाचनात असतच का? चेन रिडिंग टाइप्स?

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

मला दिवसाकाठी तीन ते पाच तास

मला दिवसाकाठी तीन ते पाच तास वेळ देता येतो.

*********
(सहीपुरतेच) ..आबा कावत्यात! (एरवी हानगं कुत्रं विचारत नै...)

फ्लिपकार्ट सेल

फ्लिपकार्ट वर ३० आणि ३१ मार्च रोजी पुस्तकांचा सेल लागलाय. मराठी पुस्तके तुलनेने फारच कमी आहेत.

पाहिला सेल. स्टॉक क्लियरन्स

पाहिला सेल. स्टॉक क्लियरन्स सेलसारखं रुप आहे. काहीही पुस्तकं आहेत.

*********
(सहीपुरतेच) ..आबा कावत्यात! (एरवी हानगं कुत्रं विचारत नै...)

इन जण्रलच भारतीय प्रादेशिक

इन जण्रलच भारतीय प्रादेशिक भाषांमधील पुस्तके तिकडे कमीच असतात. त्यासाठी अंमळ सर्चिंग केले पाहिजे, उदा. कन्नड पुस्तकांसाठी www.totalkannada.com ही एक अप्रतिम वेबसाईट आहे. बेंगळूरूमध्ये जयनगर भागात त्यांचे दुकानही एकदम मस्त आहे. पुण्यातल्या रसिक साहित्य / साधना च्या तोडीचं आहे. खूप मस्त व्हरायटी आहे.

सेम अप्लाईज़ फॉर अदर लँग्वेज बुक्स.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

चोर घासकडवी

घासकडवी ह्यांनी अजून एकदा राजीव साने ह्यांचा आय डी चोरला/हॅक केला असावा.
खालील लेख वाचण्यात आला :-
http://www.loksatta.com/lokprabha/global-warming-1085591/
.
.
मागील वेळी 'सम्यक निसर्ग एक शुद्ध भंकस' हा लेख लिहितानाही त्यांनी आय डी हॅक केला होता.

शिवाय असे लेख लिहायला त्यांनी

(लोळून हसत) (लोळून हसत)

शिवाय असे लेख लिहायला त्यांनी सानेंचा आयडी चोरला कारण त्याचे स्पेलिंग Sane असे होते.
एकूणच हे लेख आणि त्यावर असा आयडी ही घासकडवींची आजवरची सर्वोत्तम विनोदनिर्मिती आहे. (डोळा मारत)

Hope is NOT a plan!

उत्पलचा त्याच्या ब्लॉगवरचा

उत्पलचा त्याच्या ब्लॉगवरचा लेख हम लोग वाचला. (लगेच इथे शेअर करावा का असा प्रश्न लगेच पडला ... तरीही शेअर केलाच.)

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मस्त लेख

लेख खूपच आवडला. इथे दुवा दिल्याबद्दल धन्यवाद.

मिलिंद बोकिलांचं झेन गार्डन

मिलिंद बोकिलांचं झेन गार्डन बर्‍याच काळाने पुन्हा उघडलं आणि पायर्‍या ही गोष्ट वाचली. सिंगापूरमधे कष्टाने सेटल झालेला बिझनेसमन श्रीपाद बर्‍याच वर्षांनी भारतात आपल्या एका मैत्रिणीला, जयाला आणि तिच्या फॅमिलीला फाईव्ह स्टार हॉटेलात भेटतो. जयाचा नवरा अशोकसुद्धा पूर्वी चळवळीतच असतो. तेव्हाचे त्यांचे संदर्भ, तरुण वयात चळवळीत असणारे हे तिघे आणि त्यांच्या इतर मित्रांचे संदर्भ.. आणि आताची वागणूक. तत्वांचा फोलपणा, परदेशातून आलेल्या मित्राकडून गिफ्ट्स, फाईव्ह स्टार खाना जमेल तितका वसूल करण्याची वृत्ती, अगदी आपण एरवी जिकडे जातही नाही अशा महागड्या ठिकाणी जाऊन त्याच्या खर्चाने हौस भागवून घेणं, आणि बरंच कायकाय. आणि वरुन जयाचं फाईव्ह स्टार अन्नाचा बकाणा तोंडात असतानाच श्रीपादला "पैशाच्या मागे गेलेला, प्रतिपक्षाला जाऊन मिळालेला भांडवलवादी" वगैरे म्हणणं..लहान मुलानेसुद्धा गिफ्ट मागून वसूल करणं..

अर्थात श्रीपादचीही एक अनावश्यक वा आवश्यक असो पण "गिफ्ट देण्याची" मानसिकता आहेच..ती खूप सटल आहे. ही दोन्ही बाजूंची मानसिकता कथेत मस्त आणि सहज दिसते.

एरिक न्युबी- अ शॉर्ट वॉक इन द हिंदू कुश

एरिक न्युबी- अ शॉर्ट वॉक इन द हिंदू कुश
एरिक न्युबी आणि त्याचा मित्र अशा दोघांनी १९५६ सालात केलेल्या नुरिस्तान या अफगाणिस्तानातील आड-प्रदेशात केलेल्या प्रवासाची कहाणी. खडतर प्रवासाचे थोड्या विनोदी शैलीत वर्णन केले आहे. गाजलेले पुस्तक असल्याने विकी पेजवर सविस्तर माहिती उपलब्ध आहे. नक्कीच वाचा असे सुचवते.

The male brain


आवडतय. पुरषांचं breast-fixation, आक्रमकपणा, flirting strategies, choice of mate (बायकोच नव्हे), पौगंडावस्थेतील मुलांची बंडखोरी, most primitive & primal cues. मस्त वाटतय पुस्तक.
हे पुस्तक जर आवडलं तर, "The female Brain" पुस्तकही घ्यायचा विचार आहे. ते सापडलं नाही म्हणून घेतले गेले नाही.

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

"The Male Brain" अत्यंत रोचक

"The Male Brain" अत्यंत रोचक पुस्तक आहे. अतिशय सोप्प्या भाषेत क्लिष्ट वर्णन केले आहे. पुस्तक प्रचंड एन्जॉय करते आहे. काही फेमिनिस्ट स्त्रियांनी आक्षेप घेतला आहे. पण लेखिकेच्या मते - मेंदू हा unisex नसतोच. तो स्त्रीचा अन पुरषांचा वेगळाच असतो कारण संप्रेरके वेगळी असतात, अन वेगळ्या वेळी वेगळ्या उर्मी जागवतात.
_________
टीनेज पुरषांचा (मुलांचा) मेंदू हा भाग संपला. आता पुरषांच्या mating strategies अन vulnerabilities, प्रतिक्षिप्त क्रिया अन Calculated moves, covert moves, prize winning mentality अन monogamy/polygamy बद्दल वाचते आहे.
पुरषांना सरासरी १४ भिन्न स्त्रिया आयुष्यात आल्या तरी हरकत नाही अशी त्यांची जडण-घडण असते याउलट स्त्रिया १ किंवा २ पुरुष आयुष्यात पसंत करतात. Amazing difference. Isn't it?
पुरुष visual तर असतातच पण त्यामुळे निदान वयाच्या ४० वर्षापर्यंत फक्त दृष्याने Turn ON ही होतात. याउलट ४० शी नंतर, अधिक stimulation लागते. एकदा पुरषांना एखादी स्त्री sexually हवी असेल तर , १ आठवडा थांबणेही त्यांना काही महीन्यांसारखे वाटते याउलट स्त्रिया तिप्पट वेळ घेतात. kissing मधून अन एकमेकांच्या शरीर गंधातून compatibility चे संदेश जातात.
स्त्रीला पाहील्यानंतर १/५ सेकंदात पुरुषांचा मेंदू gauge करतो की ही स्त्री compatible आहे की नाही. अने हे consciously घडत नाही तर तत्काळ मेंदूत घडते अन मग conscious पातळीवरती.
जेव्हा एखादी आकर्षक स्त्री समोरुन जाते तेव्हा पुरषांची ogling ची चक्क प्रतिक्षिप्त क्रिया घडते. मेंदूत sex शी संबंधीत काही केंद्रे चक्क involuntarily, lit up होतात, पण क्षणभरात त्याचा विसरही पडतो. अन ही केंद्रे lit up होण्यावर त्यांचा control नसतो.
अनेक रोचक गोष्टी लक्षात तर येतायतच पण एक समजूतदार दृष्टीकोन येतोय हे पुस्तक वाचताना. अगदी मेंदूपर्यंतच्या घडामोडी कळल्याने, पुरुष अमक्या गोष्टी superficially करतात हा भ्रम जातो.
उपप्रतिसाद न दिल्यास हा प्रतिसाद संपादीत करत राहीन. अन्यथा नवा प्रतिसाद देइन.

ह्म्म "Daddy Brain" प्रकरणं

ह्म्म "Daddy Brain" प्रकरणं वाचून झाली. त्यात विस्तृतपणे हे सांगीतले आहे की जेव्हा पुरषाला त्याच्या जोडीदाराकडून हे कळते की तिला मूल होणार आहे तेव्हा प्रत्येक पुरषाची अचूक रिअ‍ॅक्शन "भीतीची/काळजीची/चिंतेची" असते. पुढे जवळ जवळ ३ महीने हे असेच काळजीत जातात, मग पुरुष ते दाखवोत की न दाखवोत. नंतर पुढे पुढे गर्भार स्त्रीच्या फेर्मॉन्स मुळे पुरषांचा मेंदू अ‍ॅडजस्ट होऊ लागतो व होतो.
मूल झाल्यावरती त्याच्याशी खेळून, त्याला स्पर्शाची ऊब देऊन मग बाळाचे व पित्याचे बॉन्डींग सुरु होते. अशावेळी जर त्यांना बाळाबरोबर एकत्र वेळ मिळाला तर दोघांचा फायदा होतो परंतु कायम आई ही या एकत्र वेळाकरता "गेटकीपर" बनते. तेव्हा आईने जर पित्याला भरपूर वेळ दिला तरच पिता बाळाशी खेळू शकतो.
अत्यंत रोचक मुद्दा हा सापडला - की आई एकदम melloW अन बाळाशी emotionally tuned असल्याने ती नेहमीच गोड बोलून, लहान वाक्यांनी , मन वळवून काम करवून घेते. याउलट पुरुष हे rough अन boisterous असतात्/खेळतात. थेट आज्ञा देतात/bullying च म्हणा ना.
म्हणजे "आभाळ वाजलं धडाडधूम" ही कविता आई तीच अन तशीच म्हणेल याऊलट पिता तीच कविता चाल किंवा अंत बदलून, शब्द बदलून म्हणतो अन हे मुलास नवीन असते. पण गंमत म्हणजे या लहान क्रियेमुळे पुढे आयुष्यात मूल, लोकांचे deceit,tricks आधीच ओळखायला शिकते. अन यातूनच मूल व्यवस्थित tough बनतं.Do you think this is far-fetched? मला तरी नाही वाटत.
जे खेळ आईला repulsive वाटतात तेच पित्यास सहज वाटू शकतात. उदा.- Calling own butt a poo-poo-head. वगैरे
यानंतर, पुरषांचे भावविश्व नावाची प्रकरणे सुरु होतायत. I can't wait to sink my teeth in.
____________
ह्म्म पुस्तक वाचून झालं. पुरषांची भावनिकता या सदरात सुरवातच प्रसिद्ध पेचाने केलेली आहे की स्त्रियांना आपल्या समस्येबद्दल अफाट बोलायला आवडते Vs पुरुष ताबडतोब समस्येचे निराकरण करण्याच्या मागे लागतात. जेव्हा समस्या निर्माण होते, तेव्हा mirror neuron system (MNS) अन temporo-parietal junction (TPJ) या २ भावना सिस्टीम काम करतात. पैकी स्त्रिया MNS ही सिस्टीम जास्त वापरतात तर पुरुष सुरुवात MNS पासून करुन ताबडतोब TPJ कडे स्विच होतात. जेव्हा पुरषांची MNS पहील्यांदा काम करते तेव्हा स्त्री ला वाटणारी वेदना त्यांना अनुभवास येते पण तत्काळ TPJ कडे स्विच झाल्याने, ते उपाय शोधू लागतात. TPJ ही सिस्टीम अन्य व्यक्तीच्या व स्वतःच्या भावनांमध्ये काटेकोर मर्यादा आखते. बायका अति भावनाशील अन पुरुष रुक्ष असल्याच्या मागचे कारण या २ सिस्टीम्स.नंतर
पुरषांचा अहंकार व संताप (anger) याविषयी देखील काही एक संप्रेरकांवर आधारीत स्पष्टीकरण लेखिकेने दिलेले आहे.
पुढे ५० शी नंतर किंवा त्या सुमारास "grumpy old man" सिंड्रोम का निर्माण होतो त्याचे एक कारण लेखिका म्हणते की एकाकीपण असते. मनुष्य सामाजिकच प्राणी आहे अन जर व्यक्ती लोकांत मिसळली नाही तर मेंदूची "Rewards Center" पुरेशी कार्यरत होत नाहीत व व्यक्ती अधिकाधिक grumpy होऊ लागते त्यात जर जोडीदार गेलेला असेल तर विचारायलाच नको. माणसाला एकटे पडणे का आवडत नाही कारण त्याला त्रास होतो. निसर्गानेच तसा त्रास व्हावा अशी व्यवस्था केलेली आहे की ज्यामुळे व्यक्ती एकाकीपणा टाळेल. वैवाहीक पुरुष एकट्या पुरषांपेक्षा अधिक जगतात. जरी पुरुष लग्नाचा मुख्य फायदा sex समजत असले तरी, ऊब, स्पर्श, हवेनको विचारणे या सर्व बाबींमुळे आयुर्मान वाढतेच.

एसटी जेएम - ह्याची फोड

एसटी जेएम (स्माईल) - ह्याची फोड काय?

तुम्ही दिलेली माहीती खुपच माहीतीपूर्ण.

अशा प्रकारची सेल्फ हेल्प

अशा प्रकारची सेल्फ हेल्प पुस्तके हा माझा प्रांत नव्हे. काही वेळात त्या प्रवचनाने झोप येऊ लागते.
पण

पुरषांची भावनिकता या सदरात सुरवातच प्रसिद्ध पेचाने केलेली आहे की स्त्रियांना आपल्या समस्येबद्दल अफाट बोलायला आवडते Vs पुरुष ताबडतोब समस्येचे निराकरण करण्याच्या मागे लागतात.

या मार्मिक की मर्मभेदी? वाक्यामुळे हे पुस्तक दिसले तर नक्की चाळेन! (स्माईल)

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सेल्फ हेल्प पेक्षा मेंदू व

सेल्फ हेल्प पेक्षा मेंदू व संप्रेरक अन वागणूक यांचे गूढ उकलणारे पुस्तक आहे.

सरसकटीकरण

आपण उद्धृत केलेले वाक्य व तत्सम इतर वाक्ये ही सरसकटीकरण का व कसे नाहित ?
ती सरसकटीकरण असल्यास तुम्हाला अशा वाक्यांना इथे जाहिर मर्मभेदी वगैरे म्हणायची हिम्मत होतेच कशी ?

सरकटीकरण अर्थातच आहे. बाकी

सरकटीकरण अर्थातच आहे.
बाकी हिंमतीचे बोलाल तर प्रत्येकजण प्रतिमाभंजनाला/आपल्यावरील टिकेला नेमके तुमच्याइतकेच कसे घाबरेल?

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

जेव्हा एखादी आकर्षक स्त्री

जेव्हा एखादी आकर्षक स्त्री समोरुन जाते तेव्हा पुरषांची ogling ची चक्क प्रतिक्षिप्त क्रिया घडते. मेंदूत sex शी संबंधीत काही केंद्रे चक्क involuntarily, lit up होतात, पण क्षणभरात त्याचा विसरही पडतो. अन ही केंद्रे lit up होण्यावर त्यांचा control नसतो.

इंडीड!

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

+१

स्त्रीला पाहील्यानंतर १/५ सेकंदात पुरुषांचा मेंदू gauge करतो की ही स्त्री compatible आहे की नाही. अने हे consciously घडत नाही तर तत्काळ मेंदूत घडते अन मग conscious पातळीवरती.

आता या अभिव्यक्तीवर क्रिटीजम आले नाही म्हणजे मिळवले...

तसेच बॅटमॅनच्या मताशी पुर्ण सहमत. नेचर क्रिएटेड अस डिफरंटली बिको़ज विनर्स डु नॉट डु एनी डिफरंट थिन्ग्स दे जस डु थिन्ग्स डिफरंटली हे आपण समजुन घेतलेच पाहिजे.

actions not reactions..!...!

+१

या अभिव्यक्तीचे समर्थन म्हणजे रेपिस्ट मनोवृत्तीचे समर्थन, "लडके हैं, गलती हो जाती है" चे समर्थन, इ.इ. प्रवचनांची वाट पहात आहे.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

Rendezvous with rama

"Rendezvous with rama" - Arthur C. Clarke
थोडक्यात ओळखः "साल २१३०. ग्रीक आणि रोमन नावं देऊन संपल्यामुळे शास्त्रज्ञ सध्या हिंदू नावं वापरत आहेत. सूर्यमालेत आलेल्या एका नव्या कोर्‍या Objectला त्यांनी 'रामा' हे नाव दिलंय, आणि हा एखादा उपग्रह नसून एक कृत्रीम वस्तू आहे हे समजलंय. मानवजातीतर्फे त्याला भेटायला म्हणून एक यान "सीता" पाठवतात आणि मग पुढे काय होतं?"

हे परत वाचतोय. कॉलेजात असताना जेवढं भावलेलं त्यापेक्षा थोडं कमी आवडतंय.(Blame it on Asimov!) पण निव्वळ कल्पनाशक्तीचा विचार केला, तर जबरदस्त तपशीलवार काम आहे.
ह्यावर एखादा चित्रपट अजूनही कोणी का बनवला नाही ते कळत नाही. विशेषतः आजकालच्या अल्ट्राभारी ग्राफिक्स युगात Rama खूपच जब्राट बनला असता.
एक फॅनमेड ट्रेलर यूट्यूबवर आहे तेवढाच.

इंटरस्टेलारमधे शेवटी दाखवलेली अंतराळस्थित लॅब ही "रामा"च्या संकल्पनेवरच रचलेली आहे.

'रिंगण' अभिवाचन

'आसक्त' ह्या संस्थेतर्फे पुण्यात जुलै २०१४पासून 'रिंगण' हा अभिवाचनाचा उपक्रम चालवण्यात येत आहे. वेळोवेळी त्यातल्या कार्यक्रमांची माहिती ऐसीवर देण्यात येत होती. हा उपक्रम सुरू ठेवण्यासाठी त्यांना मदत हवी आहे. त्याविषयीचं हे आवाहन -

- चिंतातुर जंतू (चिंतातुर)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

चांगला उपक्रम पण..

उपक्रम चांगला आहे आणि त्याच्याशी परिचित आहे, तो चालू रहावा अशी सदिच्छा पण हा कार्यक्रम मराठीत आहे ना? मग त्याचे आवाहन इंग्रजीत का दिलेय कोण जाणे!

सैल हात?

>> पण हा कार्यक्रम मराठीत आहे ना? मग त्याचे आवाहन इंग्रजीत का दिलेय कोण जाणे! <<

पैशाच्या बाबतीत अमराठी माणूस हात अधिक सैल सोडेल अशा अपेक्षेनं?

- चिंतातुर जंतू (चिंतातुर)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

बाल्यावस्थेतल्या देशासाठी बडबडगीते

बाल्यावस्थेतल्या देशासाठी बडबडगीते -
Nursery Rhymes For India, Part 1: The Alphabet

- चिंतातुर जंतू (चिंतातुर)
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

विनोद मेहता यांना आदरांजली वाहणारा लोकसत्तेतील लेख

विनोद मेहता यांना आदरांजली वाहणारा लोकसत्तेतील लेख

परखड, प्रामाणिक व्यक्तीच्या अंगी एक प्रकारचा चक्रमपणा असतो. तो मेहता यांच्याकडे होता. त्यांनी त्यांच्या पाळलेल्या श्वानाचे नाव एडिटर असे ठेवले होते. या संपादकाशी त्यांचा अनेकदा संवाद चाले आणि तो वाचणे अत्यंत आनंददायी असे. अशा तऱ्हेने मेहता हे संपादकास पाळणारे संपादक होते. आपल्या टीकेने शत्रुत्व, कटुता आली तरी हरकत नाही. पण समाजाच्या व्यापक हितासाठी, लोकशाही मूल्यांच्या रक्षणासाठी टीका आवश्यक असेल तर ती करायलाच हवी. प्रसंगी त्याची किंमत मोजावी लागली तरी बेहत्तर पण लेखणीचे इमान राखावे असे मानणारे संपादक आज मुळातच कमी.

बाकी आठवत नाही, पण १६ मे च्या

बाकी आठवत नाही, पण १६ मे च्या आधी फिअरमाँगरींग लोक एन डी ए ला २४०-२५० जागा मिळतील का, कोणतं काँबो साकार होईल का, मोदी ऐवजी कोणी नेता बनवावा लागेल, यावर टाईम्स नाउ वर चर्चा करत असताना विनोद मेहता एकटेच he is there, he is there म्हणत होते.

प्रत्येक सत्यास एक संदर्भ असतो, मात्र हे विधान स्वतः नि:संदर्भ सत्य आहे.

भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार

भारताचे मुख्य आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांच्या बरोबरचा 'आयडिया एक्सचेंज'

http://indianexpress.com/article/india/india-others/expectations-of-big-bang-reforms-were-unrealistic-such-reforms-come-in-crises/99/

The Coming Chinese Crackup :

The Coming Chinese Crackup : The endgame of communist rule in China has begun, and Xi Jinping’s ruthless measures are only bringing the country closer to a breaking point

Predicting the demise of authoritarian regimes is a risky business. Few Western experts forecast the collapse of the Soviet Union before it occurred in 1991; the CIA missed it entirely. The downfall of Eastern Europe’s communist states two years earlier was similarly scorned as the wishful thinking of anticommunists—until it happened. The post-Soviet “color revolutions” in Georgia, Ukraine and Kyrgyzstan from 2003 to 2005, as well as the 2011 Arab Spring uprisings, all burst forth unanticipated.

लोल

का बे सोविएत युनियनच्या पतनात सी आय ए किम्वा इअतर पाश्चात्त्य इंटलिजन्स एजन्सींची भूमिका वगैरे कध्धीच ऐकलं नाहिस का भो ?
खुद्द येल्तसिन नि गोर्बाचेव्ह ह्यांच्यावर यू एस एजंट असण्याचे आरोप झालेत.
(गुप्तहेरी नि इतर बाबी इतक्या अद्रुश्य असतात की समोर घडल्या तरी दिसत्/समजत नाहित.
त्या तुमच्याच आसपास घडत असल्या तरी तुम्हाला त्याचा गंधही कैकदा लागत नाही.
त्या अगदि स्वच्छ पुसलेल्या काचेसारख्या पारदर्शक असतात.
काच गढुळल्याशिवाय मधे काच आहे; हेच कधीकधी लक्षात येत नाही.)
.
.
अरब स्प्रिंगबद्दलही अमेरिकन नि पाश्चात्त्य हात असण्याबद्दल लै आरडा ओरडा झाल्ता.

का बे सोविएत युनियनच्या पतनात

का बे सोविएत युनियनच्या पतनात सी आय ए किम्वा इअतर पाश्चात्त्य इंटलिजन्स एजन्सींची भूमिका वगैरे कध्धीच ऐकलं नाहिस का भो ?

१) सी आय ए ने कोव्हर्ट ऑप्स करणे व सोव्हियत युनियन ला डिस्टॅबिलाईझ करायचा यत्न करणे
२) सी आय ए ने सोव्हियत युनियन चे इंप्लोजन प्रेडिक्ट करू शकणे

या दोन वाक्यांत फरक आहे की नाही ?

----

सी आय ए ने अनेक राडे केलेले आहेत व त्याबद्दल अनेक पुस्तके आहेत. इतकेच काय मोस्साद ने केलेल्या राड्यांबद्दल सुद्धा "बाय वे ऑफ डिसेप्शन" हे माजी मोसाद एजंट व्हिक्टर ऑस्ट्रॉवस्की चे पुस्तक आहे. पण अ‍ॅबिलिटी टू प्रेडिक्ट हा एक भाग आहे की जिथे भलेभले त्रिफळाचीत होतात असे मला वाटते.

या लेखाचा लेखक नेमके विरुद्ध मत मांडतोय.

माबोवर 'संशोधन क्षेत्र आणि

माबोवर 'संशोधन क्षेत्र आणि स्त्रिया' याविषयावर चर्चा चालू आहे www.maayboli.com/node/52910.

तिथल्याच एका प्रतिसादातून http://philip.greenspun.com/careers/women-in-science हा लेख वाचायला मिळाला. संपूर्ण लेखच रोचक आहे. त्यातले खालील वाक्य इथे चॉप्यपस्ते करावेसे वाटले:
"For a woman with a functioning reproductive system, the decision to attend college and work is seldom an economically rational one in the United States," summarized a divorce litigator.

Amazing Amy

मला लागलेला अर्थ बरोबर आहे का

मला लागलेला अर्थ बरोबर आहे का - प्रजननक्षम स्त्रियांकरता कॉलेजच्या शिक्षणाचा अन कामधंद्याचा, नोकरी वगैरेचा निर्णय हा अमेरीकेत तरी आर्थिकदृष्ट्या योग्य निर्णय नसतो.

अन ही मुक्ताफळं एका डिव्होर्स अ‍ॅटर्नीची? मग डिव्होर्स नंतर बाईनी खायचं काय, रहायचं कुठे, उदरनिर्वाह कसा करायचा?
की या महाभागाचा जावईशोध हा आहे की कमावल्याने, घटस्फोटाचे प्रमाण वाढतय?
____
थोडा वाचला त्याचं म्हणणं आहे - As Judge Monks noted, there is no limit to the revenue that can be obtained via child support. However, there are limits to the potential earnings of an academic scientist.

पण स्वावलंबन हे चाइल्ड सपोर्ट पेक्षा उत्तम नाही का? अन तो बाप मध्येच गचकला तर चाइल्ड सपोर्ट गेला १२ च्या भावात.

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

The Costs of Grexit ग्रीस चे

The Costs of Grexit

ग्रीस चे युरोपियन युनियन मधून फुटुन निघणे संभव की असंभव - याबद्द्ल अनेक भाकितं वर्तवली गेलेली असतील. पण त्यामागचे जे ड्रायव्हर्स आहेत त्याबद्दल.

http://www.thehindu.com/opini

http://www.thehindu.com/opinion/lead/nehruvian-budget-in-the-corporate-a...
हा लेख वाचला. सरकारची नक्की कामं काय आणि इतर प्रगत देशांच्या प्रगतीमध्ये सरकारी 'वाटपी' धोरणांचा भाग किती हा प्रश्न विचार करण्याजोगा आहे.

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

प्रदक्षिणा

Further, since the private sector was not equal to the task, the state had to take the lead. So, India’s first Five Year plans were largely about state investment in infrastructure. Human capital, as economists call it today, was badly neglected.

प्रदक्षिणा.

अजेय झणकर लिखीत ' द्रोहपर्व

अजेय झणकर लिखीत ' द्रोहपर्व '..एक पेशवाईकालावर आधारीत कादंबरी
कादंबरी सुरु होते नारायणराव पेशवे यांच्या खुना पासुन आणी संपते मराठा-इंग्रज यांच्यातील पहिल्या लढाईतची सांगता झाल्यावर..
कादंबरी पहिल्या पानापासुनच मनाची पकड घेते..नारायरावांचा खुन,रघुनाथ पेशवे यांची महत्वकांक्षा,बारभाईच कारस्थान्,मराठी सरदारांचे हेवेदावे,इंग्रजाचीं सत्ता मिळवण्यासाठी चालणारी धडपड..
या सगळ्यात लक्षात राहते "इष्टुर फाकडा" ची संमातर कथा,त्या सोबत "तुळजा" नावाचे पात्र

अवांतर : इष्टुर फाकडा ची

अवांतर : इष्टुर फाकडा ची नेमकी काय ष्टोरी आहे ? (त.तु.म्हा.अ. मधे दीनानाथ दामोदर थत्तेंच्या तोंडी जो डायलॉग आहे त्यात हे आहे.)

कॅप्टन जेम्स स्टुअर्टला

कॅप्टन जेम्स स्टुअर्टला इष्टूर फाकडा म्हणत असत. तळेगावच्या लढाईत पेशव्यांचे तोफखान्याचे सरदार भिवराव पानसे यांच्या तोफेचा गोळा लागून इष्टुर फाकडा कामी आला.

*********
(सहीपुरतेच) ..आबा कावत्यात! (एरवी हानगं कुत्रं विचारत नै...)

जेपी या कादंबरीवर सिनेमाही

जेपी या कादंबरीवर सिनेमाही येणार होता ना? तुळजाच्या भूमिकेत बहुतेक बिपाशा बसू असणार होती. आला का?

*********
(सहीपुरतेच) ..आबा कावत्यात! (एरवी हानगं कुत्रं विचारत नै...)

भारताचा महागाई दर कमी राहणार?

https://www.valueresearchonline.com/story/h2_storyview.asp?str=27288

तेलाच्या किंमतीसंदर्भात हा एक लेख वाचनात आला. जागतिक अर्थव्यवस्था, उर्जास्रोत, विकासाचा दर, भारतातील महागाई वगैरे अनुषंगाने इतका सकारात्मक दृष्टिकोण असणारा लेख यापूर्वी कदाचित फक्त घासकडवींचाच वाचला असावा. (डोळा मारत)

छान आहे हा लेख.

छान आहे हा लेख.

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

हा प्रश्नच का पडावा हे कळले

हा प्रश्नच का पडावा हे कळले नाही. जीन्स च त्या त्या व्यक्तीचा स्वभाव, प्रवृत्ती ठरवतात ना.

मला तरी हा mundane लेख जाम आवडला

A recent study from the University of Manchester found that the average toothbrush contained about 10 million germs, including E. coli. Rinse it well after each use and occasionally soak it in a cup of vinegar for about 30 minutes to take care of any leftover bacteria. Replace your toothbrush every three months—but save the old one; you can use it to clean

http://www.rd.com/slideshows/cleaning-bathroom-wrong/#slideshow=slide1

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

सुझी ऑर्मन चे लेख बरेचदा

सुझी ऑर्मन चे लेख बरेचदा वाचते. काल डॉक्टरांकडे ऑपराह मॅगेझिन मध्ये पुढील माहीती मिळाली. नंतर जालावर धुंडाळा घेता दुवाही मिळाला-

Delay Social Security You can apply for Social Security as early as age 62, but the benefit you'll receive will be 25 to 30 percent less than the amount you'll take home if you wait until you reach full retirement age (between 66 and 67 if you were born between 1943 and 1959; 67 if you were born in 1960 or later). Hold out until age 70, and your check could be 76 percent larger than if you apply at age 62. That's a significant reward. If you're married and simply can't afford to delay benefits for both of you, at least have the higher earner wait to collect payment.

http://www.oprah.com/home/Suze-Orman-Smartest-Money-Advice

Wow! सत्तरी पर्यंत नोकरी करत रहाता येईल का? शारीरीक दृष्ट्याही अन दुसरे म्हणजे माझ्या इटसी बिटसी कौशल्याकरता कोणी तितके वर्षं नोकरीत ठेवेल का? Questions worth pondering.

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

Strange lights on dwarf planet Ceres have scientists perplexed

Strange lights on dwarf planet Ceres have scientists perplexed

A dwarf planet is shining two bright lights at a NASA spacecraft right now, and our smartest scientists are unsure what they are.

As bizarre as that sentence sounds, that's the situation with Ceres — the largest object in the asteroid belt between Mars and Jupiter, officially designated as a dwarf planet (the same category as Pluto).

NASA's Dawn spacecraft is approaching Ceres ahead of a March 6 rendezvous. The picture above was taken February 19, from a distance of just under 29,000 miles, and shows two very shiny areas on the same basin on Ceres' surface.

(मी हे वाचलेले नाहीये. कारण मला यातलं काही समजत नाही. पण तुम्हा लोकांना आवडेल कदाचित.)

द इडियट

वाचायला सुरू केल ते मधेच थांबल, त्यामुळ ते पहिल्यापासून वाचतोय. शिवाय The Penguin History of the World आहे अजून एक दोन पुस्तक आहेत, पण नावच विसरलो. शिवाय भा रा भागवतांच काही साहित्य मिळायची शक्यता आहे, त्याची वाट बघतोय.

=======================================================================
छिन्नी हातोड्याचा घाव, करी दगडाचा देव, सोशी दैवाचे तडाखे त्यास मानूस ह्ये नाव.....

एका रेघेवरची ताजी नोंद.

एका रेघेवरची ताजी नोंद. माध्यमांबद्दल बोलणारी. या नोंदीची अडचण अशी / यूएसपी असा की मराठी संस्थळांवर नेहमी जी मारामारी होते, त्या मारामारीत दोन्ही बाजूंनी वापरता येतील असे मुद्दे तिच्यात आहेत.

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

नर्गिस एरतुर्क चे

नर्गिस एरतुर्क चे "ग्रामटॉलॉजी अँड लिटररी मोडर्निटी इन टर्की" पुस्तक वाचतेय. १९२८ साली तुर्की भाषेच्या लेखनासाठी अरबी-फार्सी मिश्रित लिपी च्या जागी रोमन/लॅटिन लिपी च्या प्रस्थापनेवर, आणि त्याच्या भाषावापर, तुर्की साहित्य, तुर्की इतिहासलेखन, आणि तुर्की अस्मितेवर झालेल्या विविध परिणामावर अत्यंत रोचक, भन्नाट पुस्तक. या बदलाला जागतिक लिपी सुधारणा मोहिमांमधे अगदी टोकाचे उदाहरण समजले जाते. त्याच्या पार्श्वभूमीचे, आणि परिणामाचे एरतुर्कांनी सुरेख विश्लेषण केले आहे. इच्छुकांना पुस्तकाबद्दल छोटीशी मुलाखत इथे वाचता येईल.

One of my motives was to try to deepen our understanding of the phoneticizing Turkish alphabet reform of 1928, which replaced a Perso-Arabic script with a Latin alphabet, as well the language reforms of the 1930s, which replaced many Arabic and Persian loanwords with Turkish neologisms. Of the effects of these reforms, the Romance philologist Erich Auerbach observed in a letter to Walter Benjamin dated 3 January 1937 that “no one under twenty-five can any longer understand any sort of religious, literary, or philosophical text more than ten years old.” While it would be inaccurate to describe these reforms as a complete success, they did ensure that the next generation of Turkish-speaking citizens of Turkey would, for example, be unable to read even the inscriptions on buildings and monuments that they pass every day, let alone written and printed materials. And of course citizens of Turkey today are even further alienated from that written past. So the book was, you might say, an attempt to “make sense of” that profound linguistic rupture, if such a thing is possible, and to witness that rupture in the work of Turkish writers, who mourned what it destroyed even as they sometimes welcomed it for other reasons

द ऑर्डर ऑफ थिंग्ज्

पुस्तकपरिचयाबद्दल अनेक आभार. आवडीचा विषय असल्याने मिळवून वाचायच्या यादीत याची भर घातली आहे.

मुलाखत वाचून 'माय नेम इज रेड' हे पुस्तक आठवलं. रेखाटनाच्या शैलीवर पडत जाणारा युरोपियन प्रभाव आणि पारंपरिक शैली यांच्यातला संघर्षाचं चित्रण करणारं. तुर्की भाषेच्या बाबतीत तर अरेबिक आणि फारसीच्या प्रभावामुळे प्रकरण अधिकच क्लिष्ट झालं असावं. (अतातुर्कपूर्व तुर्कस्थानात अभिजनांना ह्या तिन्ही भाषांतील शब्दसंपदा उपलब्ध असल्याने, तत्कालीन उमरावी तुर्कीने इंग्लिशशी शब्दसंख्येत जवळजवळ बरोबरी साधली असती, असं म्हणतात). एकंदरीत, तुर्कस्थानचा गेल्या काही वर्षांतला राजकीय कल पाहता - या पुस्तकातली भाष्यं आणि त्यांचे उमटणारे प्रतिसाद, हेही पाहणं महत्त्वाचं ठरेल.

अगदी बरोबर. पुस्तकाची सुरुवात

अगदी बरोबर. पुस्तकाची सुरुवात पामुकचेच नाव घेऊन होते. त्याच्या स्वत:च्या संघर्षाने उद्भवणारे प्रश्न तर लेखिकेसमोर आहेच. त्यासोबत "ओरिएंट-ऑक्सिडेंट", "क्लॅश ऑफ सिविलाइझेशन्स" च्या सरसकट चौकटीवर आधारित जागतिक साहित्यिक चर्चाविश्व, आणि त्यात तुर्की आधुनिकतेवर, आणि खासकरून नोबेल पारितोषकामुळे खुद्द पामुकवर लादले गेलेले ऐतिहासिक महत्त्व आणि जबाबदारी या सगळ्यांबद्दल अस्वस्थता देखील आहे. या चौकटीबाहेर ऐतिहासिक भूमिकेतून भाषिक आधुनिकतेचा, आणि तुर्की साहित्याचा गुंतागुंतीचा इतिहास ती उभा करू पाहतेय.
त्यातील एका लेखकाने (बाल्तासिओग्लू) अरबी लिपीच्या अक्षरांचे मानवी शरीराच्या हालचालींच्या स्वरूपात रेखाटणी केल्याची चर्चा आहे. त्यातून त्याने आधुनिकपूर्व लिपी-भाषा- लेखन प्रक्रिया, कारकून आणि लेखक यांच्यातील असलेल्या अनेकविध संबंधांचा शोध घेतला. आधुनिक छापखान्यांच्या युगात, रोमन लिपीद्वारे या शारीर, भौतिक संबंधांत घडलेल्या खोल परिवर्तनाची चिकित्सा केली - त्याची खूपच रोचक चर्चा आहे.

लेखनशैली थोडी क्लिष्ट, देरिदाटाइप आहे, पण भाष्य विचारप्रवर्तक. अवश्य वाच, आणि इथे प्रतिक्रिया लिही!

हे पुस्तक नेटवर उपलब्ध आहे

हे पुस्तक नेटवर उपलब्ध आहे कुठे?

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

मी कागदी प्रत वाचतेय.

मी कागदी प्रत वाचतेय. ई-प्रतीचा शोध घेतला नाही, लिब्जेन वगैरेवर शोधता येईल.

ठीक

.

राईटिस्ट हिंदुत्ववादी एमसीपी.

'फेलूदा'च्या दोन गोष्टी

'फेलूदा'च्या दोन गोष्टी वाचल्या. बर्‍या आहेत. गोष्टीतली रहस्य सोसो... पण गोष्टींमधले अनेक्डोट्स मस्त आहेत. लखनौच्या गोष्टीतले. फास्टर फेणेच्या गोष्टी याहून उजव्या आहेत असं अजून तरी वाटतय.

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

कुठल्या भाषेत वाचल्या? मराठी

कुठल्या भाषेत वाचल्या? मराठी अनुवाद मला अजिबात आवडला नाही. गोपा मजुमदारांचा इंग्रजी अनुवाद चांगला आहे, बंगाली वोरिजिनलच्या जवळ जाणारा. गोष्टी शाळकरी मुलांसाठीच आहेत हे खरंय.

विंग्रजी मधल्या. तुम्ही

विंग्रजी मधल्या. तुम्ही म्हणताय त्याच. गोपा मुजुमदार यांनी अनुवादित केलेल्या...

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

इंग्रजी म्हणजे पेंग्विनने

इंग्रजी म्हणजे पेंग्विनने प्रकाशित केलेले दोन खंड का?

त्यातला दुसरा खंड अजून मिळतो का? (माझी प्रत एका मित्राने ओलीस ठेवल्यामुळे दुसर्‍या प्रतीच्या शोधात आहे.)

प्रस्तावनेत असा उल्लेख आहे की फेलूदा कथांचा जन्म लहान मुलांसाठी म्हणून झाला, पण नंतर सत्यजित राय यांच्या लक्षात आलं की त्या पोट्ट्यांचे आईबापही आवडीने वाचताहेत. म्हणून नंतरनंतरच्या कथा प्रौढांच्यासाठी लिहिल्या गेल्या. त्यामुळे दोन कथांत मत न बनवणे.

*********
(सहीपुरतेच) ..आबा कावत्यात! (एरवी हानगं कुत्रं विचारत नै...)

होय, पेंग्विनने प्रकाशित

होय, पेंग्विनने प्रकाशित केलेलेच.

http://www.amazon.in/gp/product/0143420356?psc=1&redirect=true&ref_=oh_a...

माहिती होतं की लहान मुलांसाठी लिहिल्या होत्या पण त्या मोठ्यांनादेखील आवडल्या. म्हणूनच फा.फे शी तुलना केली. पुढल्या गोष्टी वाचीनच...

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

हे नाही. काळपट कव्हर

हे नाही. काळपट कव्हर आहे.

पहिल्या खंडाचा फोटो काढून डकवतो घरी जाऊन.

*********
(सहीपुरतेच) ..आबा कावत्यात! (एरवी हानगं कुत्रं विचारत नै...)

माझ्याकडेपण काळपट कव्हरवाली

माझ्याकडेपण काळपट कव्हरवाली आवृत्ती आहे, पण या नवीन आवृत्तीत गोष्टी त्याच असाव्यात.
अनूप, काही वर्षांपूर्वी फेलूदा वर लिहीलेल्या ले़खाचा दुवा देतेय, गोष्टी वाचल्यावर कदाचित तुम्हाला विंटरेश्टिंग वाटेल...

वाह.. आवडला लेख.

वाह.. आवडला लेख. धन्यवाद!
फेलूदा आणि ख्रिस्ती यांची तुलना अजून एका मित्राकडून ऐकली होती. मध्यंतरी ब्योमकेश बक्षी आणि फेलूदा यांच्यातली तुलना करणारा लेख वाचला होता. ते वाचून या गोष्टी वाचाव्याशा वाटल्या.

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

मनोहर माळगावकरांचे पु.लं.नी

मनोहर माळगावकरांचे पु.लं.नी भाषांतरित केलेले कान्होजी आंग्र्यांवरचे पुस्तक वाचले. इंट्रिष्टिंग आहे. भाषा काही ठिकाणी कीर्तनी होते. विशेषत: आंग्र्यांबद्दल लिहिताना. पण एकूण तत्कालीन सागरी डावपेच, तेव्हाच्या महत्त्वाच्या भिडूंचे स्वभाव आणि बलस्थाने (डच, पोर्तुगीज, इंग्रज, सिद्दी आणि मराठे), भूगोलाची वर्णने... इत्यादी गोष्टी वाचायला मजा आली. काही वेगळे शब्दही मिळाले. (उदा. गुराब - लहान लढाऊ गलबत). राजारामानंतर आणि पेशव्यांच्या उदयापूर्वीच्या कालखंडातली किनारपट्टी निरखणारे काही वाचले नव्हते. ते एकदा वाचण्यासारखे आहे.

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन