भाज्यांचे लोणचे

दिल्लीत फेब्रुवारी महिना सुरु होताच वादळ आणि धुक्याचे राज्य संपते. सूर्याचे तेज जाणवू लागते. या मौसमात बाजारात भाज्याही भरपूर असतात. भाज्यांचे लोणचे घालण्यासाठी हा मौसम आदर्शाच. दरवर्षी सौ. या मौसमात भाज्याचे लोणचे एक- दोनदा तरी घालतेच. गेल्या रविवारी भाज्यांचे लोणचे घातले होते. त्याचीच कृती.

साहित्य:

भाज्या: फुलगोबी १किलो ,गाजर१/२किलो ,शलजम १/२किलो, अदरक १०० ग्रम, लहसून १०० ग्रम

मसाले : सौंप (बडीशेप) ( २ चमचे) , मेथी दाणे (१ चमचा), हिंग १/४ चमचे, मोहरीची डाळ १ वाटी, तिखट १/२ वाटी, हळद १/४ वाटी, काळी मिरी ५-६ दाणे, तेल १ वाटी, सिरका १ वाटी, गुड १/2 वाटी. मीठ आवश्यकतेनुसार.

कृती:

प्रथम गोबी,गाजर आणि शलजम या तिन्ही भाज्यांचे एकसारखे तुकडे करून घ्या.एका भांड्यात पाणी गरम करायला ठेवा. एक उकळी आल्यावर पाण्यात १ चमचा हळद टाकून त्यात चिरलेल्या भाज्या टाकाव्यात. तीन ते चार मिनिटांनी गॅस बंद करून सर्व भाज्या एका मलमलच्या कपड्यावर किंवा साडीवर पसरून वाळायला घाला. तीन चार तासात भाज्या वाळतील (अर्थात ओलसरपणा निघून जाईल). अदरक किसून घ्या आणि लहसून बारीक वाटून घ्या.


आता कढई गॅस वर ठेवा. 1 चमचा तेलात सौंप आणि मेथी दाने परतून घ्या. मग पुन्हा २ चमचे तेल टाकून अदरक आणि लहसून परतून घ्या. त्या नंतर वाचलेले तेल कढईत टाकून तेल गरम झाल्यावर काळी मिरी टाका (तेल गरम झाले कि नाही कळण्यासाठी). नंतर गॅस बंद करा. एका भांड्यात सिरका व गुड घालून उकळायला ठेवा. गुड विरघळल्या वर गॅसबंद करा.

एका परातीत किंवा भांड्यात सर्व मसाला अर्थात - परतलेले अदरक, लहसून, सौंप (बडीशेप), मेथी दाणे व तिखट, हळद, मेथी दाणे, मीठ व्यवस्थित मिसळून घ्या. नंतर गरम तेल मसाल्यावर टाका. मिश्रण थंड झाल्यावर त्यात गुड आणि सिरक्याचे मिश्रण मिसला. मसाला थंड झाल्यावर सर्व वाळलेल्या भाज्या मिसळा.


हे लोणचे १०-१२ दिवस आरामात टिकते.

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (2 votes)

प्रतिक्रिया

हे वाचल्यासारखं वाटतय का? Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

मी तरी पहिल्यांदाच ही कृती टाकली आहे, ते ही बहुमुश्किलेने सौ. ने फोटू काढू दिले. अन्यथा संभव झाले नसते. तिला तिच्या कामात ढवळा-ढवळ पसंद नाही. शलजमला मराठीत काय म्हणतात ते मला ही माहित नाही. गुगलवर बघितले 'सलगम नावाच कंद' हे नाव सापडले. शलजमचा थोडी लालिमा घेतलेला पांढरा रंगाचे असतात, स्वाद थोडा तुरट आणि गोड असतो. हिवाळ्यात सलाड मध्ये वापरतात आणि मिश्रित भाज्यांच्या लोणच्यात हे अप्रतिम लागते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हां सॉरी सॉरी http://aisiakshare.com/node/2902
हा धागा आठवला Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

च्यायला मिरचीचे लोणचे होते, हे भाज्यांचे लोणचे आहे. फक्त पदार्थ ज्यात ठेवले आहे त्या वाट्या एकच आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शलजम म्हणजे काय ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नवलकोल (?), टर्निप

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भाज्या पाण्यात उकडून घातलेले हे लोणचे फस्त केले नाही तर किती टिकू शकते?

सुधारणा: स्वारी, शेवटची १०-१२ दिवसांची ओळ नजरेतून सुटली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आभार! आम्ही त्यात कधी कधी कारल्याचे कापही टाकतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

दिल्लीतल्या पंजाबणींनी केलेले हे चविष्ट लोणचे अनेकदा खाल्ले होते. आठवणीनुसार हे दहाबारा दिवसच काय चांगले ४-५ महिने टिकते. (बहुधा लोणच्याला चांगले ऊन्ह दाखविल्यामुळे.)

थोड्या लेखनविषयक सूचना - लसूण (लहसून), आले (अद्रक), गूळ (गुड), दाणे (दाने), कोबी (गोबी). शलजम की शलगम?

'सिरका' (Vinegar) मराठी स्वयंपाकाला संपूर्ण अज्ञात आहे असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile
____
पाकृ आवडली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

'सिरका' (Vinegar) मराठी स्वयंपाकाला संपूर्ण अज्ञात आहे असे वाटते.

मद्यार्कास अतिकाळ हवा लागल्यास ऑक्सिडीकरणाने त्याचा शिरका होतो म्हणे.

महाराष्ट्रदेशी बहुधा इतक्या दिरंगाईची प्रथा नसावी (अथवा धीर कमी पडत असावा) असा अंदाज वर्तवतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तीन पिढ्यांपासून दिल्लीत असल्यामुळे व लग्न ही दिल्लीकर मराठी मुलीशी झाले. (सर्व भाऊ आणि बहिणीचे ही) जी काही मराठी शिकली ती अंतरजाल वरच. त्या मुळे हे शब्द रोजच वापरल्या जातात. मराठी शब्द आठवत नाही. मुलाच्या संगणकावर (मराठी शब्द) काम करतो. असो. पुढे लक्षात ठेवेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खूप छान लिहीता तुम्ही पटाईतजी. मराठी लेखनाचे प्रयत्न असेच चालू ठेवावेत. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

प्लीज़. अंमळ वेगळ्या ढंगातली मराठी आली म्हणून काही बिघडत नाही.

(भाषिक अराजकाबद्दलच्या एखाद्या प्रवचनाच्या प्रतीक्षेत.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

(भाषिक अराजकाबद्दलच्या एखाद्या प्रवचनाच्या प्रतीक्षेत.)

हाहाहा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उमगले स्वप्नांचे मर्म मला, ना हा परका ना अपुला
कोणी मृत्युलोकीचा योगी, अशीच लहर म्हणून आला
असाच पळभरासाठी टेकला, शेकत गर्भाची धुनी...

>> 'सिरका' (Vinegar) मराठी स्वयंपाकाला संपूर्ण अज्ञात आहे असे वाटते. <<

पोर्तुगीजांच्या सहवासामुळे की काय, पण सारस्वतांच्या घरात लोणच्यात व्हिनेगर घातलेलं पाहिलं आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- चिंतातुर जंतू Worried
"ही जीवांची इतकी गरदी जगात आहे का रास्त |
भरती मूर्खांचीच होत ना?" "एक तूच होसी ज्यास्त" ||

वॉव! छान दिसतय.
पटाईत काकांनी त्यांच्याच स्टाईलने लेखन करावं. मला आवडते त्यांची मराठी भाषा. आम्हीपण अद्रकच म्हणतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0