Skip to main content

मदतीसाठी संपर्कक्रमांक

अधूनमधून वेगवेगळ्या कारणांसाठी पोलिस, सामाजिक संस्था यांची तातडीची मदत घेण्याची आवश्यकता असते. अशावेळी नेमक्या कोणाशी संपर्क साधावा ते लक्षात येत नाही. त्यामुळे या अशा संपर्कक्रमांकांची यादी एके ठिकाणी तयार करता आली तर पहावी म्हणून हा धागा सुरू करते आहे.

माझ्याकडचे प्रश्न :

१. एखाद्या ठिकाणी (सार्वजनिक परिसरात किंवा शेजार्‍यांच्या घरात वगैरे) जोरजोरात भांडणं चालली असतील आणि हिंसक वळण लागण्याची चिह्ने दिसत असतील तर केवळ तेवढ्याच आधारावर आणि आपला भांडणाशी काहीही संबंध नसतानाही भांडणं थांबवायला पोलिसांना बोलवता येते का? येत असल्यास कोणत्या क्रमांकावर?

२. लग्न ठरवताना उपवधू मुलगा व त्याचे घरचे उपवर मुलीची फसवणूक करत असतील आणि हे आपल्याला कळले असेल तर एखाद्या सामाजिक संस्थेकरवी तिच्याशी संपर्क साधून तिला त्याची जाणीव करून देता येते का? अशा संस्थांचे संपर्कक्रमांक मिळतील का?

धन्यवाद.

अनु राव Mon, 02/02/2015 - 19:45

ग्न ठरवताना उपवधू मुलगा व त्याचे घरचे उपवर मुलीची फसवणूक करत असतील आणि हे आपल्याला कळले असेल तर एखाद्या सामाजिक संस्थेकरवी तिच्याशी संपर्क साधून तिला त्याची जाणीव करून देता येते का? अशा संस्थांचे संपर्कक्रमांक मिळतील का?

दुसर्‍यांच्या वैयक्तीक गोष्टीत नाक खुपसु नये. त्या मुलीचा आणि तुमचा संबंध असेल तर वस्तुस्थिती सांगावी आणि फक्त "सल्ला" द्यावा आणि बाजुला व्हावे.. नसती उठाठेव करु नये. मुलीशी ओळख नसेल तर काहीच करु नये.

१. एखाद्या ठिकाणी (सार्वजनिक परिसरात किंवा शेजार्‍यांच्या घरात वगैरे) जोरजोरात भांडणं चालली असतील आणि हिंसक वळण लागण्याची चिह्ने दिसत असतील तर केवळ तेवढ्याच आधारावर आणि आपला भांडणाशी काहीही संबंध नसतानाही भांडणं थांबवायला पोलिसांना बोलवता येते का? येत असल्यास कोणत्या क्रमांकावर?

भारतात १०० नंबर ला फोन लावावा. जवळच्या चौकीला फोन लावावा. काही हरकत नाही. पण नंतर तुम्हाला पण पोलिस चौकी खेटे घालावे लागतील त्याची तयारी ठेवावी.

अतिशहाणा Mon, 02/02/2015 - 19:48

१. एखाद्या ठिकाणी (सार्वजनिक परिसरात किंवा शेजार्‍यांच्या घरात वगैरे) जोरजोरात भांडणं चालली असतील आणि हिंसक वळण लागण्याची चिह्ने दिसत असतील तर केवळ तेवढ्याच आधारावर आणि आपला भांडणाशी काहीही संबंध नसतानाही भांडणं थांबवायला पोलिसांना बोलवता येते का? येत असल्यास कोणत्या क्रमांकावर?

जवळच्या पोलीसस्थानकाचा नंबर डिरेक्टरीत पाहावा.

२. लग्न ठरवताना उपवधू मुलगा व त्याचे घरचे उपवर मुलीची फसवणूक करत असतील आणि हे आपल्याला कळले असेल तर एखाद्या सामाजिक संस्थेकरवी तिच्याशी संपर्क साधून तिला त्याची जाणीव करून देता येते का? अशा संस्थांचे संपर्कक्रमांक मिळतील का?

त्या कुटुंबाच्या ओळखीच्या अशा प्रतिष्ठित व्यक्तीकडून संपर्क करवून घेता येईल. सामाजिक संस्था वगैरेंबाबत कल्पना नाही बॉ.

ॲमी Thu, 05/02/2015 - 09:47

२. ओळखीतला एक किस्सा:
साखरपुडा झाल्यावर वधूच्या भावाला निनावी इमेल आलेला की 'भावी वराने, कॉलेजात असताना तात्कालीन प्रेयसीशी विवाह केलेला. नंतर त्या मुलीचं दुसर्याशी लग्न करून देण्यात आल्याने हा आता परत लग्न करतोय. विदौट घटस्फोट.' चौकशी केल्यावर ती माहिती खरी निघाली.
स्वतः बोलण्यापेक्षा किंवा समाजसेवी संस्थेद्वारे अप्रोच करण्याऐवजी अनामिक इमेल हा एक पर्याय असू शकतो. आपापल्या जबाबदारीवर करावा.

मन Fri, 06/02/2015 - 09:29

http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune/stone/articlesh…
मूत्राशयातून काढले ५१ खडे

ससूनच्या डॉक्टरांनी हिमोफिलियाच्या पेशंटवर केले ऑपरेशन

म. टा. प्रतिनिधी, पुणे

हिमोफिलियाच्या पेशंटमध्ये अतिरिक्त रक्तस्त्राव होण्याची भीती असल्याने खासगी हॉस्पिटलच्या डॉक्टरांकडून टाळली जाणाऱ्या मूत्राशयाचे गुंतागुंतीचे ऑपरेशन यशस्वी करण्याची किमया ससून हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी करून दाखविली. २१ वर्षांच्या तरुणाच्या मूत्रशयातून ५१ खडे काढण्यात आल्याने त्याला जीवदान मिळाले.

धनकवडी येथील राहणारा संतोष हिरवे हा तरुण आई आणि भावासह राहतो. संतोषची आई भाजी विक्रीचा व्यवसाय करते. कुटुंबाची आर्थिक स्थिती चांगली नसल्याने खासगी डॉक्टरांकडून उपचार घेणे परवडत नव्हते. त्यामुळे अखेर ससून हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्याचा त्यांनी निर्णय घेतला. ससून हॉस्पिटलच्या सर्जरी विभागातील डॉ. सुधीर डुबे, सहायक प्राध्यापक डॉ. अविष्कार बारसे, डॉ. वैभव शाह, भूलतज्ज्ञ डॉ. ए. पांडे यांनी ऑपरेशन यशस्वी करून दाखविले. त्याशिवाय हिमोफिलिया सोसायटीचे डॉ. सुनील लोहाडे, राजीव गांधी योजनेच्या प्रमुख डॉ. भारती दासवानी, विजय पाटील यांनी महत्त्वाची कामगिरी बजावली.

'पोटात सारखे दुखायचे आणि चक्कर यायची. काही खासगी डॉक्टरांना दाखवले. त्यांनी आजाराचे निदान केले पण शस्त्रक्रिया करू शकत नसल्याचे सांगण्यात येत होते. ससूनच्या डॉक्टरांनी यशस्वी ऑपरेशन करून मला जीवदान दिले', अशी प्रतिक्रिया संतोष हिरवे याने दिली. हिमोफिलिया सोसायटीकडे सातशे पेशंटची नोंद आहे.

पुरुषांमध्ये आढळणारा हा आजार आहे. इजा झाल्यास त्यामुळे रक्तस्राव लवकर थांबत नाही. अतिरिक्तस्राव झाल्यामुळे पेशंटच्या जीवाला धोका होण्याची शक्यता असते.

हिमोफिलिया पेशंटना ऑपरेशनद्वारे उपचार मिळण्यात अडचणी येतात. त्यामुळे ससूनमध्ये राजीव गांधी योजनेतून अशा रुग्णांना आर्थिक मदत करण्यात आली. सर्जरी करण्यासाठी सर्जरी विभागाशी ०२०- २६१२८००० या क्रमाकांवर संपर्क साधावा.

-डॉ. सुधीर डुबे, सर्जरी विभाग तज्ज्ञ

मन Fri, 06/02/2015 - 09:34

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/16933909.cms
.
.
राज्य सरकारचे हायकोर्टासमोर आश्वासन

म . टा . खास प्रतिनिधी , मुंबई

हिमोफिलियाच्या पेशंटना राज्यात मोफत औषधोपचार देण्यात येणार असल्याची माहिती राज्य सरकारच्या वतीने सोमवारी मुंबई हायकोर्टात देण्यात आली . मुंबई महापालिकेच्या केईएम हॉस्पिटलमध्ये या योजनेची सुरुवात होणार आहे . या नवीन योजनेमुळे हिमोफिलियाग्रतांना मोठा दिलासा मिळणार आहे .

हिमोफिलिया हा अत्यंत दुर्मिळ आजार सुमारे ० . ०१ टक्के लोकांमध्ये आढळून येतो . अशा पेशंटच्या बाबतीत शरीरातील रक्ताच्या गुठळ्या होत नसल्याने एकदा जखमेतून रक्तस्राव सुरू झाला की , तो थांबत नाही . या आजारावर उत्तर प्रदेश , मध्य प्रदेश व कर्नाटकमध्ये मोफत औषधोपचार होतात . या पार्श्वभूमीवर मुंबई हायकोर्टात जनहित याचिका दाखल झाली आहे . या आजाराचे निदान व उपचार यासाठी महाराष्ट्रात कोणतेही सर्वसमावेशक धोरण नसल्याच्या मुद्द्याडे लक्ष वेधत पेशंटना मोफत औषधोपचार देण्याची मागणी हिमोफिलिया सोसायटी व अन्य चार पेशंटनी दाखल केलेल्या याचिकेत केली आहे . या आजारावरील उपचारांसाठी एक ते सात लाख रु . खर्च येतो , याकडे त्यांनी कोर्टाचे लक्ष वेधले .

मुख्य न्या . मोहीत शहा व न्या . नितीन जामदार यांच्या खंडपीठापुढे ही याचिका सुनावणीसाठी आली होती . त्यावेळी राज्य सरकारच्या वतीने सरकारी वकील जी . डब्ल्यू . मॅटोस यांनी हिमोफिलियाच्या पेशंटना राज्यात मोफत औषधोपचार देण्यात येणार असल्याची माहिती दिली . राजीव गांधी जीवनदायी योजनेअंतर्गत संपूर्ण राज्यात या आजारावर मोफत उपचार दिले जाणार असल्याचे अॅड . मॅटोस म्हणाले .

मुंबईत केईएम हॉस्पिटलमधून मोफत औषध उपचार देण्यास सुरुवात होईल . संपूर्ण राज्यात या आजारावर मोफत उपचार केले जाणार असल्याचे आश्वासन राज्य सरकारने दिल्याल्यानंतर खंडपीठाने याचिका निकाली काढली .

उपयोगी माहिती.

अवांतर - हिमोफिलियाने एकेकाळी युरोपीय राजवंशात धुमाकूळ घातला होता. त्यामुळे याला 'राजेशाही' रोग, अशीही उपाधी मिळाली होती.

मन Fri, 06/02/2015 - 09:48

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/20667633.cms
.
.
दीडशे वर्षांची वाटचाल अन् एक 'जेनेरिक' पुढाकार

यंदाचे महापालिकेचे बजेट '‌ इनोव्हेटिव्ह ' होते . महापालिकेच्या सर्व बारा हॉस्पिटलमध्ये जेनेरिक औषधांची दुकाने आणि उपराजधानीत चित्रनगरी हे यंदाच्या बजेटचे दोन मुख्य आकर्षण होते . एक सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचे आणि दुसरे शहराला नवी ओळख देणारे . येथे ' स्वप्ननगरी ' कधी उभी राहील , हे काळच सांगेल . जेनेरिक औषधालये मात्र महिनाभरात सुरू होण्याची चिन्हे आहेत . यंदा नागपूर नगर प्रशासनाच्या स्थापनेचा शतकोत्तर सुवर्णमहोत्सव आहे . त्याला कृतीची जोड दिल्यास उत्सवी आनंद द्विगुणित होईल .

नागपूर नगर प्रशासन यंदा स्थापनेची दीडशे वर्षे साजरी करीत आहे . या आठवणी कायमस्वरूपी लक्षात राहाव्या यासाठी विविध उपक्रम राबविले जात आहेत . शहरात सुप्रभात आणि शुभरात्री असे संदेश ऐकू येऊ लागले आहेत . दर तासाने नागपूरकरांचे शतकोत्तर सुवर्णमहोत्सवानिमित्त अभिनंदन केले जात आहे . एकूणच नागपूर नगरीत उत्सवी वातावरण आहे . दरम्यान , याच आठवड्यात झालेल्या बैठकीत जेनेरिक औषधालयाचा मार्ग प्रशस्त झाला आहे . महापालिकेच्या हॉस्पिटलमध्ये महिनाभरात जेनेरिक औषधांची दुकाने थाटली जाणार आहेत . नगर प्रशासनाचे यंदाचे शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्ष आणि जेनेरिक पुढाकार हा ऐतिहासिक योगायोग साधला गेला आहे . आरोग्य सेवा हा संवेदनशील मुद्दा आहे . नागपूर हे मध्य भारताचे ' हेल्थ हब ' असल्यावर शासकीय आरोग्य यंत्रणेची जबाबदारी अधिकच वाढते . सामाजिक संस्थेच्या मदतीने सुरू होणाऱ्या जेनेरिक औषधालयांनी महापालिकेची आरोग्य विषयक जबाबदारीही वाढविली आहे .

यंदाचे महापालिकेचे बजेट '‌ इनोव्हेटिव्ह ' होते . महापालिकेच्या सर्व बारा हॉस्पिटलमध्ये जेनेरिक औषधांचे दुकान आणि उपराजधानीत चित्रनगरी हे यंदाच्या बजेटचे दोन मुख्य आकर्षण होते . एक सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचे आणि दुसरे शहराला नवी ओळख देणारे . गेल्या वर्षभरात उपराजधानीत ; विदर्भात खास इकडचे अनेक चित्रपट तयार झाले . येथे शूटिंग होऊ लागले . तिकडचे अभिनेते इकडे येऊ लागले . अघोर , तानी यासारखे चित्रपट गाजले . आताही अनेक प्रयत्न सुरू आहेत . पण तंत्रज्ञानाची अद्ययावत सोय येथे अजूनही नाही . लोकेशन्स म्हणावे तसे डेव्हलप झालेले नाहीत . पोस्ट प्रॉडक्शनसाठी मुंबईला पर्याय नाही . येथेच का होऊ नये असा विचार महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये आला . विशेषत : रंगभूमीशी सं ‌ बंधित असलेल्या स्थायी समितीचे सभापती अविनाश ठाकरे यांच्या मनात तो डोकावला . बजेटमध्ये नागपुरात ' फिल्मसिटी ' विकसित करण्याचे सूतोवाच करण्यात आले . हे सोपे नाही . थोडक्यात आणि कमी वेळेत होणारे हे काम नाही . त्यामुळे येथे ' स्वप्ननगरी ' कधी उभी राहील , हे काळच सांगेल . जेनेरिक औषधालये मात्र महिनाभरात सुरू होण्याची चिन्हे आहेत . या मुद्यावर जनमंच - जेनेरिक आणि महापालिका पदाधिकारी - प्रशासनाची या आठवड्यात बैठक झाली . जनमंचला १ रुपया लीजवर औषधालयासाठी जागा देण्याचा निर्णय झाला . जागा महापालिकेची आणि औषधालये जनमंचची , असा हा करार आहे . देशात कदाचित हे पहिल्यांदाच होत आहे .

नागरिकांच्या विविध समस्या मांडण्याचे आणि केवळ आवाज उठवून थांबायचे नाही तर त्याला कृतीची जोड द्यायची हे ध्येय बाळगून ' जनमंच ' ही सामाजिक संस्था शहरात सक्रिय आहे . वाहतूक पोलिसाने गाडी अडविली तर काय करायचे याची फलकांद्वारे माहिती देण्यापासून ते शहरातील पहिली दोन जेनेरिक औषधांची दुकाने सुरू करण्यापर्यंतचे उपक्रम या संस्थेने राबविले आहेत . डॉक्टरकी ही सेवा नव्हे तर व्यवसायच आहे , असे डॉक्टरांना जाणवू लागल्यापासून आणि औषध निर्मात्या कंपन्यांना भारत ही हुकमी बाजारपेठ दिसू लागल्यापासून आरोग्य सेवाक्षेत्राचा पार चेहरा बदलून गेला . पैसेवाल्यांना उपचार आणि गरिबांना व्यवस्थेचा मार सुरू झाला . टीकाही होऊ लागली . दरम्यान आमीर खान याने देशाला जेनेरिक औषधांचे महत्त्व सांगितले . जनमंचने हे महत्त्व ओळखले आणि औषधालये सुरू केली . नागपूर महापालिकेला ते पटले . तसा निर्णयच बजेटमधून जाहीर केला होता . आरोग्य व्यवस्थेचे महत्त्व लक्षात घेत काही वर्षांपूर्वी नागपूर जिल्हा परिषदेने रामटेक तालुक्यातील मनसर येथे लोकांचा लोकांसाठीचा दवाखाना ही संकल्पना सुरू केली होती . सीईओ बदलले . योजना मागे पडली . पदाधिकाऱ्यांना ती योजनाच पटली नव्हती . येथे महापालिकेच्या पदाधिकाऱ्यांना ही योजना पटली आहे . कृतीतून आदर्श निर्माण करणाऱ्या सामाजिक संस्थेचा यात प्रत्यक्ष सहभाग आहे . शून्य मैलाच्या या शहरात हा पुढाकार मैलाचा नवा दगड रोवणारा आहे . या शहराची वाटचालही मोठी रंजक राहिली आहे .

भोसल्यांच्या हातून नागपूरची सत्ता गेली आणि ब्रिटिशांचा अंमल सुरू झाला . १८६४ मध्ये नागपुरात नगरपालिकेची ब्रिटिशांनी स्थापना केली . टप्पाटप्प्याने विकास सुरू झाला . २ मार्च १९५१ रोजी नगरपालिकेचे महापालिकेत रूपांतर झाले . पहिली सभा २ जुलै १९५२ रोजी झाली ... आठवणींचा ' फ्लॅश बॅक ' आणि विकासाचा ' फ्युचर प्लान ' सांगणारे सादरीकरण महापालिका प्रशासनाने या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवानिमित्त केले . या सादरीकरणाचा फोकस शहरात झालेले बदल आणि विकास हा होता . महापालिका या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रम घेणार आहे . सोबतच थंडबस्त्यात असलेल्या प्रकल्पांना यानिमित्त संजीवनी दिली जाऊ शकते . शहरातील अनेक प्रकल्प रखडलेले आहेत . सुरेश भट यांच्या नावाने उभारण्यात येणाऱ्या सभागृहाचे काम अद्याप झालेले नाही . नागपूर दर्शन बससेवा जाहीर केली होती . ती बस बेपत्ता आहे . अंबाझरी तलावाच्या सौंदर्यीकरणाचा पत्ता नाही . ऑरेंज स्ट्रीट कागदावरच आहे . शहरातील सिव्हेज लाइन कुठून कुठे जाते हे अधिकाऱ्यांना ठाऊक नाही . यानिमित्त त्याचा आराखडा तयार केला जाऊ शकतो . ही व्यवस्था अधिक प्रभावी केली जाऊ शकते . कुण्या निमित्ताने साजरा होणारा उत्सव साऱ्यांच्या लक्षात राहात नाही . असा उत्सवी आनंदही तेवढ्यापुरता . काहींनाच आनंद देणारा . अर्थात उत्सव साजरा केला पाहिजे . त्यास विरोध नाही . पण या ' साजरे ' पणाला विधायक आणि शाश्वत कृतीची जोड मिळाल्यास ती जास्त लक्षात राहते . नवे उपक्रम नसतीलही पण रखडलेल्या उपक्रमांना बळ देण्याचा पुढाकार यानिमित्त निश्चित घेतला जाऊ शकतो . शतकोत्तर सुवर्णमहोत्सवाने उत्सवाला कृतीची जोड देण्याची सुवर्णसंधी योगायोगाने का होईना नागपूर महापालिकेला दिली आहे . या संधीचे सोने करायला काय हरकत आहे ? एक पुढाकार ' जेनेरिक ' साठी घेतला असाच विकासासाठी एकीचा पुढाकार घ्यायला काय हरकत आहे ?

मन Fri, 06/02/2015 - 09:50

मनपा रुग्णालयात जेनेरिक औषधे
http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/20620470.cms
.
.
बजेटमध्ये प्रस्तावित केल्याप्रमाणे मनपा रुग्णालयात महिनाभरात जेनेरिक औषधे मिळतील. जनमंच-जेनेरिकसोबत याबाबतचा करार करण्यात आला. यानुसार मनपा त्यांना १ रुपया लीजवर रुग्णालयात औषधालयासाठी जागा उपलब्ध करून देईल. यातून रुग्णालयात येणारे रुग्ण व परिसरातील नागरिकांना आवश्यक ती सर्व प्रकारची औषधे माफक दरात उपलब्ध होतील. अशाप्रकारची औषधे रुग्णांसाठी उपलब्ध करून देणारी नागपूर मनपा बहुधा देशात पहिलीच मनपा असेल.

सध्या गरीब असो वा श्रीमंत रुग्णांना डॉक्टराकडून लूटमार सुरू आहे. स्वस्त व माफक दरातील औषध उपलब्ध असतानाही अनेक डॉक्टर्स महागडी औषधे लिहून देतात. यामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक लूट होत आहे. न्यायालयानेही एका प्रकरणी साधारणत: १ लाख ३६ हजारांचे औषध ९ हजारांत मिळत असल्याचा दाखला दिला आहे. ब्रॅण्डेड औषधांच्या नावाने मोठी लूट सुरू असल्याने जेनेरिक औषधे बाजारात विक्री करणे वा जनहितार्थ त्या सरकारी रुग्णालयातून विक्री व्हावी , अशी मागणी पुढे आली होती. नागपुरात अशी औषधांची दोन दुकाने जनमंच-जेनेरिकने थाटली आहेत. यात धरमपेठ येथील झेंडा चौक व राणी दुर्गावतीनगर येथे अशी औषधांची दुकाने सुरू आहेत. मनपाने त्यांच्या रुग्णालयात येणाऱ्या व परिसरातील नागरिकांसाठी कमी दरात ब्रॅण्डेड औषध विक्री करता येईल का , याबाबत शक्यता पडताळून बघितली होती. ते शक्य असल्यानेच बजेटमध्ये यासाठी तरतूद केली. जनमंच-जेनेरिकला याबाबत विचारणा करण्यात आली. शनिवारी यासंदर्भात एक बैठक झाली. मनपाच्या १२ रुग्णालयांत ही औषधालये थाटली जातील , यास मंजुरी देण्यात आली. यानुसार मनपा जनमंचला रुग्णालयात १ रुपया लीजवर जागा उपलब्ध करून देईल. ती किती कालावधीसाठी द्यायची याचा निर्णय येत्या महासभेत होईल. फर्निचर व इतर दुकान जनमंचतर्फे थाटण्यात येईल. पहिले औषधालय थाटण्यासाठी साधारणत: महिनाभराचा कालावधी लागेल.

यासंदर्भात झालेल्या बैठकीला महापौर प्रा. अनिल सोले , स्थायी समिती सभापती अविनाश ठाकरे , आयुक्त श्याम वर्धने , सत्तापक्ष नेते प्रवीण दटके , जनमंचचे मुख्य समन्वयक प्रभाकर खोंडे , अध्यक्ष अॅड. अनिल किलोर , नगरसेवक जगदीश ग्वालबंशी यांच्यासह मनपाचे इतरही अधिकारी उपस्थित होते.
जेनेरिक औषधे म्हणजे सर्वसाधारण औषधेच आहेत. बाजारात जास्त दरात ती विकली जातात. रुग्णांच्या हितार्थ ती स्वस्त व माफक दरात उपलब्ध करून दिली जातील. न्यायालयानेच याबाबत एक आदेश दिला आहे. जनतेच्या दानातून ही औषधे खरेदी करावी लागत असल्याने , मनपा रुग्णालयात औषधालय सुरू करण्यासाठी महिनाभर लागेल.

- अॅड. अनिल किलोर , अध्यक्ष , जनमंच-जेनेरिक

रुग्णांच्या हितासाठी याप्रकारचा प्रयोग करण्याचे ठरविले होते. रुग्णांची होणारी लूट लक्षात घेता न्यायालयानेच एकाप्रकरणी ब्रॅण्डेड औषधाच्या किमतीबद्दल नाराजी व्यक्त केली होती. त्यानुसार मनपाने हा धाडसी प्रयत्न केला आहे. बजेटमध्ये तशी तरतूद करण्यात आली. आता ही घोषणा प्रत्यक्षात आणण्यासाठी निर्णय घेण्यात आला आहे.

- अविनाश ठाकरे , सभापती , स्थायी समिती , मनपा

सुनील Fri, 06/02/2015 - 10:05

विविध ठिकाणाच्या सर्पमित्रांचे संपर्क क्रमांक एके ठिकाणी जतन करता आले तर ते उपयोगी ठरावे.

मन Fri, 06/02/2015 - 10:17

In reply to by सुनील

घरात साप आलाय? घाबरू नका!

http://maharashtratimes.indiatimes.com/rssarticleshow/38754893.cms?prtp…
म. टा. प्रतिनिधी, पुणे

घरात साप आलाय, आता काय करू? तो विषारी तर नसेल ना? सर्पमित्राचा नंबर आहे का? आम्ही एक पक्षी वाचवलाय, पण तो कोणाला द्यायचा? लहानसे घर असो किंवा एखादी मोठी सोसायटी, सातत्याने घडणाऱ्या या घटना आणि नागरिकांच्या मनातील अनेक प्रश्नांना उत्तरे देण्यासाठी भारतीय सर्पविज्ञान संस्थेने 'प्राणिमित्र' हे नवीन अॅप विकसित केले आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडमधील तब्बल दोनशे सर्पमित्रांची संपर्क क्रमांक आणि वन्य प्राण्यांच्या छायाचित्रांसह महत्त्वाची माहिती या अॅप्लिकेशनमध्ये देण्यात आली आहे.

सापांना न मारता सर्पमित्रांना बोलवण्याबाबत गेल्या काही वर्षांमध्ये जनजागृती झाली आहे. मात्र, सर्पमित्र कोठे असतात, त्याबद्दल नागरिक अनभिज्ञ असतात. अशा या उत्साही आणि वन्यप्राण्यांप्रति संवेदनशील असलेल्या नागरिकांसाठी भारतीय सर्पविज्ञान संस्थेने 'प्राणिमित्र' हे अॅप्लिकेशन पंधरा दिवसांपूर्वीच लाँच केले आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत सहाशे नागरिकांनी हे अॅप्लिकेशन डाउनलोड केले आहे, अशी माहिती अॅप्लिकेशनचे समन्वयक आणि सर्पोद्यानाचे अभिरक्षक दीपक सावंत यांनी दिली.

'प्राणिमित्र हे नऊ एमबीचे अॅप्लिकेशन असून, ते मोफत आहे. यामध्ये दोनशे सर्पमित्रांचे संपर्क क्रमांक, पुणे परिसरात मुख्यतः आढळणारे साप, पक्षी आणि इतर प्राण्यांची छायाचित्रे, त्यांना ओळखायचे कसे, याविषयी सोप्या शब्दांत माहिती आहे. काही दिवसांत हेच अॅप्लिकेशन अपडेट करून राज्यातील सर्पमित्र आणि पक्षिमित्रांची माहिती यात अपलोड करणार आहोत,' असे सावंत म्हणाले.

मन Fri, 06/02/2015 - 10:05

http://www.globalmarathi.com/OpenPage.aspx?URL=http://www.esakal.com/es…
.
.
सदर बातमी जुनी आहे.

तरीही भविष्यात सत्य साई ट्रस्ट वगैरेला एखादा गरजू ह्याच्या आधारे संपर्क करु शकेल असा माझा अंदाज आहे.
सत्य साई ट्रस्ट बद्दल इतरही काही गोष्टी वाचलयत. त्यामुळे पिंच ऑफ सॉल्टसह घेतलेले बरे.

राज्यातील 250 हृदयरुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया
राज्यातील 250 हृदयरुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया
- सकाळ वृत्तसेवा
Saturday, September 22, 2012 AT 12:00 AM (IST)
Tags: eye, yavatmal, vidarbha
यवतमाळ - श्री सत्यसाई सेवा संघटना महाराष्ट्र व गोवा, श्री सत्यसाई हार्ट हॉस्पिटलतर्फे गरीब व गरजू हृदयरोगाने ग्रस्त रुग्णांकरिता मोफत शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या मोफत शस्त्रक्रियेचा लाभ हृदयरुग्णांनी घ्यावा, असे आवाहन डॉ. प्रकाश नंदुरकर यांनी केले आहे.

ज्या रुग्णांना जन्मतःच हृदयाच्या व्याधी आहेत. हृदयाला छिद्र, हृदयाच्या झडप्याचे आजार, रक्तनलिकांत अवरोध निर्माण झाल्यामुळे बायपास शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला आहे, अशा महाराष्ट्रातील 250 हृदयरुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत. याकरिता रुग्णांचे मासिक उत्पन्न दहा हजारांच्या आत व वयोमर्यादा 60 वर्षांच्या आत असणे अनिवार्य आहे. ही शस्त्रक्रिया राजकोट येथील श्री सत्यसाई हॉस्पिटल येथे करण्यात येणार आहे. या रुग्णालयामार्फत मागील चार वर्षांत सहा हजारांपेक्षा जास्त रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. अधिक माहितीकरिता नागपूर येथे श्री. वाडेगावकर (9890451952), अकोला येथे श्री. सातपुते (9850146846), यवतमाळ : श्री. जाधव (9423133718), मुंबई : श्री. कामदार (9820031899), श्री. सक्‍सेना (9820047774), श्री. गोकलानी (9867369243), श्री. परब (9820251432), इचलकरंजी : श्री. जाजू (9423041440), नाशिक : श्री. कुळकर्णी (9422257509), परभणी : डॉ. शेळके (9422176303), गोवा : श्री. धारवडकर (09822195722) यांच्याशी किंवा सत्यसाई सेवा संघटनांच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा. मोफत शस्त्रक्रिया शिबिराचा लाभ जास्तीत जास्त रुग्णांनी घ्यावा, असे आवाहन श्री सत्यसाई सेवा संघटनेचे अध्यक्ष रमेश सावंत यांनी केले आहे.

मन Fri, 06/02/2015 - 10:08

http://www.globalmarathi.com/OpenPage.aspx?URL=http://www.esakal.com/es…
.
.
रोज एका गरजूवर करणार मोफत बायपास शस्त्रक्रिया

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, September 21, 2010 AT 12:00 AM (IST)
Tags: mumbai, bypass surgery
मुंबई - हार्ट एड सोसायटी ऑफ इंडिया आणि सुराणा समूहाचे रुग्णालय संयुक्तरीत्या दर दिवशी एका गरजू व गरीब रुग्णावर मोफत बायपास शस्त्रक्रिया करणार आहे. तसेच सर्व प्रकारच्या गरजू आणि गरीब रुग्णांना दरमहिन्याला एक लाख रुपयांपर्यंतची औषधे मोफत देणार आहे.

या दोन संस्थांनी आपापसांत केलेल्या करारानुसार बायपास शस्त्रक्रिया करण्यासाठी किंवा ऍन्जिओप्लास्टीसाठी येणारा खर्च "हार्ट एड सोसायटी ऑफ इंडिया' देणगी म्हणून हॉस्पिटलला थेट देणार आहे. या रुग्णांच्या सुरवातीच्या सर्व चाचण्या करून आजाराचे निदान झाल्यानंतर त्यांना सोसायटीच्या विश्‍वस्तांकडे मुलाखतीसाठी पाठविण्यात येणार आहे. त्यानंतर त्या रुग्णाची बायपास शस्त्रक्रिया किंवा ऍन्जिओप्लास्टीची तारीख ठरविण्यात येणार आहे. सुराणा समूहाची मालाड आणि चेंबूर येथे रुग्णालये आहेत. गरिबांना ही सेवा देता यावी म्हणून सोसायटीने त्यांच्या देणगीदारांना विशेष आवाहन केले आहे. त्यासाठी दर वर्षी एक हजार रुपये देणगी देऊन कायमचे देणगीदार व्हावे. देणगीदार कोणत्याही टप्प्यावर देणगी देण्याचे थांबवू शकतात. यासाठी दर वर्षी 10 हजार देणगीदार पुढे यावेत हे उद्दिष्ट निश्‍चित करण्यात आले आहे. ट्रस्ट तीन वर्षांसाठी तीन हजार कायमचे देणगीदार उभारणार आहे. त्यामुळे 2014 पर्यंत सुराणा रुग्णालयाला रोज एक मोफत बायपास शस्त्रक्रिया करणे शक्‍य होणार आहे. याशिवाय ही सोसायटी गरिबांना कोणत्याही आजारासाठी दर महिन्याला एक लाख रुपयांची मोफत औषधे देणार आहे. या संदर्भातील अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक आहे - 9820048050.

मन Fri, 06/02/2015 - 11:20

मला इन्कम ट्याक्स - प्राप्ती कर, पासपोर्ट किंवा इतर अनेक बाबींत सरकारी काम खोळंबलेले असेल तर RTIचा प्रभावी वापर कराता येणे शक्य आहे.
अशाच एका कामात मला त्या वेळी ओळख पाळख नसलेल्या विवेक वेलणकर ह्यांची मोठीच मदत झाली.
ते "सजग नागरिक मंच" ह्या संस्थेसाठी काम करतात.
pranku@pn3.vsnl.net.in हा त्यांचा इ मेल आय डी.
(त्यांचा संपर्क क्रमांक देणे इथे उचित होणार नाही. तो त्यांनाच इ मेल करुन विचारावा.)

मन Thu, 19/02/2015 - 10:07

http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/mumbai/web-portal-to…
.
.
पोर्टलवरील तक्रारींची झटपट दखल

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई

नो पार्किंगमध्ये उभी केलेली कार वाहतूक पोलिसांनी उचलून घेताना गाडीची काच फुटली. यासंदर्भात तक्रार करूनही दाद न मिळाल्याने कार मालकाने 'आपले सरकार' या राज्य सरकारच्या वेबपोर्टलवर तक्रार करताच सूत्रे हलली आणि वाहतूक पोलिसांनी कारमालकाची माफी मागितली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुरू केलेल्या या पोर्टलवर तक्रारींचा वर्षाव सुरू असून ताबडतोब न्याय देण्याचा प्रयत्न त्यातून होत असल्याने सर्वसामान्यांकडून या पोर्टलचे कौतुक सुरू आहे.

'सरकार आपल्या दारी', 'सरकार आपल्या घरोघरी', अशा योजना याआधी आघाडी सरकारने राबविल्या असल्या तरी कम्प्युटरवर आधारित 'आपले सरकार' ही नव्या सरकारची संकल्पना सामान्य जनतेच्या पसंतीस उतरत आहे. सर्वसामान्यांना त्यांच्या तक्रारी मांडण्यासाठी हक्काचे दालन मिळावे, यासाठी सुरू करण्यात आलेल्या 'आपले सरकार' या पोर्टलवर सरकार दरबारी प्रलंबित प्रकरणांची गाऱ्हाणी तसेच इतर तक्रारी मांडण्यासाठी लोकांचा ओढा वाढल्याचे दिसून येत आहे. २६ जानेवारीला सुरू झालेल्या या पोर्टलवर आतापर्यंत २३७९ तक्रारी दाखल झाल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक तक्रारी महसूल व वने (१९२) या विभागाच्या प्राप्त झाल्या आहेत. तर त्याखालोखाल नगरविकास (१५९), शालेय शिक्षण (१४७), ग्रामविकास (१३९), उच्च व तंत्रशिक्षण (१३२) या विभागांच्या तक्रारींचा समावेश आहे.

या पोर्टलवर तक्रार आल्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयातील अधिकारी संबधित तक्रारीचे वर्गीकरण करून मंत्रालयातील संबंधित विभागाकडे पाठवतात. त्यानतंर या तक्रारीसंदर्भात जे अधिकारी निर्णय घेऊ शकतात, त्यांच्याकडे या तक्रारी ई-मेलने पाठविल्या जातात. संध्याकाळपर्यंत या तक्रारीवरील कार्यवाहीचा आढावा घेऊन हा अहवाल मुख्यमंत्र्यांसमोर मांडला जातो.

दिवसभरात मिळालेल्या तक्रारींची गंभीर दखल घेऊन प्रत्यक्षात कारवाईलाही सुरुवात होत असल्याने सर्वसामान्यांना विनाविलंब दिलासा मिळत असल्याचा दावा मुख्यमंत्र्याचे विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे यांनी केला आहे. सध्या प्रत्येक दिवशी १०० ते ११५ तक्रारी पोर्टलवरून मिळत आहेत. राज्यभरातून आलेल्या तक्रारींचा आढावा २८ फेब्रुवारीला स्वत: मुख्य सचिव घेणार आहेत. तर, सध्या केवळ मंत्रालयात सुरू असलेल्या या पोर्टलची सेवा प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात एप्रिल अखेरपर्यंत सुरू होणार आहे.

मन Fri, 20/02/2015 - 10:15

In reply to by आडकित्ता

काय की बाबा.
तुमच्याइतकीच माहिती (बातमीवरून मिळालेली) माझ्याकडे आहे.
"असं काही पोर्टल उपलब्ध आहे; तुमचं गार्‍हाणं मांडायला; मदत मागायला " इतकच सांगू इच्छितो.

ऋषिकेश Fri, 20/02/2015 - 11:35

In reply to by मन

लोकांशी थेट संवाद प्रत्यक्ष उरतोय हे स्वागतार्ह आहे

---
आता हे किती दिवस टिकतं पहायचं (हे म्हणजे हे संवाद-प्रकरण, हे सरकार नव्हे! ;) )