Skip to main content

मुंबई - चाकोरीबाह्य लैंगिकतेसाठी गौरवफेरी (उर्फ मुंबई एलजीबीटीक्यू प्राईड मार्च)

*’चौकटीबाहेरच्या’ या शब्दामधून नकारात्मक छटा सुचवली जात असल्याचे अमुक यांनी लक्षात आणून दिल्यावर त्याऐवजी ’चाकोरीबाह्य’ हा शब्द वापरला आहे.

मुंबईतल्या 'एलजीबीटीक्यू प्राइड मार्च'मध्ये सहभागी झाल्याबद्दल काहीतरी लिहिलं पाहिजे, हे एकदा मान्य केल्यावर पहिली अडचण आली ती नावाची. जी संकल्पना आपल्या समाजात सहजी स्वीकारली जावी असं वाटतं, तिच्याकरता एखादाही साधासरळ अर्थवाही शब्द नसावा? छ्या. 'शब्द घडवण्यात वेळ घालवण्याहून आहे तो शब्द स्वीकारा नि मोकळे व्हा' ही भूमिका भाषेच्या सामर्थ्याला कमी लेखत असल्यामुळे तिच्या आसर्‍याला शक्यतोवर जायचं नव्हतं. त्यामुळे नमनालाच जाम डोकेफोड झाली. संस्कृतप्रचुर शब्दांचे बाण सुटले. नाकं मुरडली गेली. वाद झडले. शेवटी एकदाचं 'चाकोरीबाह्य लैंगिकतेसाठी गौरवफेरी' यावर एकमत झालं. (हे नाव गैरसोईचं आहे, मान्य. पण शेवटी प्रश्न तत्त्वाचा होता.)

तर - या फेरीत मी सामील होणार असल्याची जाहिरात मी आठवड्याभरापासून करत होते. त्यावर मिळालेल्या या काही प्रतिक्रिया:

- "एलजीबीटी- क्या? क्या होता है ये?" आयटीमध्ये नोकरी करणारी सुशिक्षित तरुणी.
- "म्हणजे कसली परेड? तू परेडला जाणारेस?" माझ्या आळशी स्वभावाशी जवळून परिचित असणारे कुटुंबीय.
- "ते बीभत्स चाळे करतात ते लोक? पण इल्लीगल आहे ना ते आता?" म.म.व. सुशिक्षित शेजारी.

एक वेगळी प्रतिक्रिया म्हणजे - "अच्छा..." पाठोपाठ सूचक आणि अवघडलेलं मौन. "तू येणार का?" अशी विचारणा धडकून केल्यावर चेहर्‍यावर भीतियुक्त धक्का. तरीही चिकाटीनं विचारल्यावरचं उत्तर, "नाही, तशी हरकत नाही. तत्त्वतः मान्य आहे मला. पण मला 'तसं' समजलं कुणी तर? मला लग्न करायचंय यार..." यावर वाद घालता आला असता, पण प्रामाणिकपणाला दाद देऊन मी गप्प बसले. किमान "म्हणजे काय?" इथपासून तरी सुरुवात नव्हती. शिवाय प्रामाणिक भीती होती, ते ठीकच. बाकी 'वेळ नाही', 'आवडलं असतं', 'दुसरं काम आहे' अशा प्रतिक्रियाही मिळाल्या.

वरच्या सगळ्या प्रतिक्रियांनी मला दिलेली लोकशिक्षणाची नामी संधी मी तत्काळ साधली हे सांगायला नकोच. २००८ पासून मुंबईत ही फेरी होते. त्याआधी महिनाभर चित्रपट, नाटकं, पथनाट्य, मेळे यांसारख्या माध्यमातून या विषयावर जनजागृती करणारी कार्यक्रम होतात आणि अखेरीस ऑगस्ट क्रांती मैदानापासून निघणार्‍या या फेरीच्या शेवटी रंगीत फुगे आकाशात सोडून त्याची सांगता होते.


(मॅचिंग ट्याटूसह आदित्य)

आदित्यला भेटून मी आणि मस्त कलंदर त्याच्याबरोबर फेरीत सामील होणार होतो.


(आदित्य आणि मकी)

माहौल उत्सवी होता. गालांवर रंगीबेरंगी ट्याटू काढून देणारे लोक, कलम ३७७चा निषेध करणारी अनेक कल्पक पोस्टर्स, चित्रविचित्र वेशभूषेनं लक्ष वेधून घेणारे लोक, लोकांमध्ये सहज मिसळणार्‍या सेलिब्रिटीज, "हॅपी प्राइड" असं म्हणत प्रेमभरानं एकमेकांना मारल्या जाणार्‍या मिठ्या, गालाच्या आसपास केले जाणारे चुंबनसूचक आवाज (श्रेयाव्हेरः गौरी देशपांडे), मोकळेपणानं केले जाणारे जोक्स. चाकोरीबाह्य लैंगिकतेचं प्रतीक असणारे सप्तरंगी झेंडे. आजूबाजूला तुंबलेली रहदारी. अचंबित + कुतूहलमिश्रित नजरांनी या मेळाव्याकडे बघणारे बघ्ये. (हे बघ्ये पुढे फेरी पूर्ण होईस्तोवर अनेकवार भेटले.)

आम्हीही उत्साहानं चेहरे रंगवून घेतले. ३७७ चा निषेध करणारे बिल्ले लावून घेतले. फोटो काढले.

मकीच्या गालांवर फुलपाखरू रंगवून झाल्यावर चित्रकार मुलीनं माझ्या गालावर "तुझ्या गालावर फूल काढते!" म्हटलं, तेव्हा मला थोडा अंदाज आला. रंगवून झाल्यावर शेजारी उभ्या असलेल्या मुलानं हौसेनं "आता तुम्हा दोघींचा फोटो मी काढतो..." अशी कौतुकयुक्त ऑफर दिली, तेव्हा त्यावर शिक्कामोर्तब झालं. आम्ही मिश्कील हसत फोटो मात्र काढून घेतलेच!


(तर हे आमचं नवं झ्येंगाट!)

व्यासपीठावरून आपल्या हक्कांसाठी जागृत होण्याचं आवाहन चालू होतं. घागरा घातलेला, नखशिखान्त नटलेला एक माणूस उत्साहानं लोकांना व्यासपीठावर येऊन बोलण्याची संधी देत होता. लोक येतही होते.


(नटमोगरा माणूस)


(मोना आंबेगावकर)

जेमतेम १८ वर्षांचे असतीलसे वाटणारे दोन युवक लग्नाच्या पोशाखात आले होते. त्यांचं एकमेकांवरचं प्रेम स्वीकारल्याची खुली पावती देणारी (आणि हातात करा धरलेली) एक प्रौढाही सोबत होती. मिरवणूकभर ते त्याच पोशाखात होते. त्यांच्यासोबत ढोलताशेही होते. अगदी लग्नाची वरात असल्यासारखं नाचणारी मंडळीही होती. सप्तरंगी झेंड्यांना तोटा नव्हताच. मोरासारखे पंख, उंच टाचांचे बूट, "प्यार किया तो डरना क्या" असं विचारणार्‍या मधुबालाचं पोस्टर, पुरुषी आणि स्त्रैण वेशभूषांची (आता या विशेषणांबद्दल सजग असल्यामुळे त्यातली साचेबद्ध कुंपणं खटकताहेत. पण शब्द संदर्भानं समजून घ्यायचे असतात. त्यामुळे मी याहून 'पॉलिटिकली करेक्ट' संज्ञा शोधणार नाहीय.) अनोखी आणि कल्पक मिश्रणं. काही सोज्ज्वळ नऊवारी साड्या. तुर्रेबाज फेटे. काही लक्षवेधी काऊबॉईज. बरीच झेंड्या-बिल्ल्यासह पाठिंबा देणारी पण अगदी साध्या पोशाखातली मंडळी.


(फिक्र आणि फक्र)


(मोर झालेला माणूस)


(फ्री बर्ड!)

मिरवणूक सुरू झाल्यावर आमचं लक्ष आजूबाजूच्या बघ्या मंडळींनी वेधून घेतलं.


(बघ्ये!)

रस्त्याच्या दुतर्फा तर ते थांबलेले होतेच. पण इमारतींच्या बाल्कन्यांतून आणि खिडक्यांतूनही फेरीकडे बघत होते. मुद्दाम शोधकपणे निरखून बघूनसुद्धा कुणाच्याही चेहर्‍यावर तिरस्कार वा घृणा मात्र दिसली नाही. हे फेरी सवयीची झाल्याचं द्योतक की केवळ मुंबईकरांची सहनशीलता? कुणास ठाऊक.

"यू आर गे -" कुणीतरी आरोळी दिली. "इट्स ओके!" उत्साही पुकारा.
"यू आर लेस्बियन - इट्स ओके!"
"यू आर हिजडा - इट्स ओके!"
"यू आर स्ट्रेट - इट्स ओके!" वर मात्र मनापासून हसू आलं!


(जल्लोष...)

"तारो मारो सेम छे, प्रेम छे प्रेम छे" ऐकली, आणि पाडगांवकरांची आठवण झाली. पाठोपाठ "प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं" आलीच. आपली कविता इथवर पोचल्याचं कळल्यानंतर पाडगावकरांची भूमिका काय असेल, असं एक खवचट कुतूहलही वाटून गेलं.

एकूण गर्दीच्या मानानं मुली मात्र कमी होत्या. अगदी नव्हत्याच, असं नव्हे. पण कमी होत्या.


(’उमंग’चा सणसणीत अपवाद)

त्याबद्दल विचारणा केल्यावर कळलं, की एकूणच लोकांना रस्त्यावर उतरणं फार अवघड वाटतं. बरेच लोक काही ना काही कारणानं आपली लैंगिकता अशी जाहीर करायला बिचकतात. मुलींच्या बाबतीत तर ते अजूनच अवघड. आम्ही ज्या गटासोबत जात होतो, त्यात आमच्याखेरीज दुसरी कुणीही मुलगी नव्हती. पुढे बघ्यांमध्येही काही चाकोरीबाह्य लैंगिकतेचे क्लोजेटेड नसलेले लोक असल्याचं कळलं. त्यांनी खिडकीआड दडून नुसतं चोरटं अभिवादन केल्याबद्दल थोडी नाराजी + खिन्नता व्यक्त केली गेली, तितकीच.

फोटो काढणं हा जणू या उत्सवाचा भाग असल्यासारखंच होतं. अनेक प्रेस फोटोग्राफर्स होते. शिवाय मोबाईल क्रांती. सुरुवातीला मी भीत भीत 'फोटो काढू का?' अशी विचारणा केली. पण कुणाची काही हरकत नव्हतीच. लोक उत्साहानं पोज देत होते, फोटो काढण्याची ऑफर देत होते, लोकांच्या फोटोंच्या चौकटीतून समजूतदारपणे बाहेर पडत होते. शिवाय जाहीर मिरवणुकीत आलेले लोक - त्यांना आता नव्यानं काय विचारायचं, असं म्हणत नंतर नंतर मी परवानगी विचारण्याचा उपचार थांबवून टाकला. "तुमचा कुणी फोटो काढला नि उद्या तो पेपरात छापून आला तर?" हा एकानं मकीला विचारलेला प्रश्न. त्यात थोडी काळजी होती, पण थोडी तिच्या उत्तराबद्दलची उत्सुकताही. मी ऐकत होते. मगाचचा फूल-फुलपाखरू अनुभव आठवून मला येणारं हसू मी दाबलं. "काढला तर काढला. घरी थोडी चर्चा होईल, अजून काय?" या उत्तरानं प्रश्नकर्त्याचं समाधान झालं असावं.

अशा प्रकारच्या मिरवणुकींमध्ये आढळते, तशी बीभत्सता जवळ जवळ नव्हतीच. मिरवणुकीच्या दो बाजूंनी दोरी धरून मिरवणुकीला दिशा देणारे स्वयंसेवक होते, तसे कुणी कचरा टाकलाच, तर तो उचलून गोळा करणारेही काही स्वयंसेवक होते.


(कचरा गोळा करणारे स्वयंसेवक)

सोबतच्या पोलिसांनाही फारसं काम नव्हतं. (मधे तर एक पोलीसकाका मिरवणुकीत नाचायलाही उतरलेले आम्ही पाहिले!) पांढरीशुभ्र कंचुकीसदृश वस्त्रं नेसलेले आणि तंग सुरवारी घालून मुरकत चालणारे दोन तरुण बघून आम्हांला जरा कसंसंच झालं. पण कुठल्याही प्रकारच्या दाबल्या गेलेल्या गोष्टी बाहेर पडताना असा किंचित चढा, आक्रमक, आक्रस्ताळा सूर घेऊनच बाहेर पडणार, यावरही आमचं एकमत होतंच.


(शेवटी फुगे सोडून मिरवणुकीचं विसर्जन झालं.)

ज्यांची लैंगिकता कधीही दडपली गेलेली नाही अशा आमच्यासारख्या बिनधास्त मुलींना अशा प्रकारे रस्त्यावर उतरणं सोपं होतं-आहे. पण ज्यांना कुटुंबीयांचं, आप्तांचं, समाजाचं दडपण असेल - त्यांच्यासाठी हे किती अवघड असेल? आजूबाजूच्या बघ्या चेहर्‍यांमधे किती जण असतील या बाजूला येऊ इच्छिणारे? निदान या गटाबद्दल मोकळे - स्वीकारशील असणारे? पुन्हा एकदा - कुणास ठाऊक.

मिरवणूक संपल्यावरचे दोन किस्से मात्र अनपेक्षितरीत्या आश्वासक होते.

परेड संपता संपता एका छोटेखानी रेस्तराँमध्ये पाण्याची बाटली खरेदी करायला गेलो. आम्हांला अगदी थंड किंवा अगदीच साधं असे दोन्ही पर्याय नको होते. "बीच का कुछ नहीं है क्या?" असं विचारून गेल्यावर आपण त्यांच्या हाती फुलटॉस दिलाय हे लक्षात आलं नि जीभ चावली. वाटलं, आता ऐकवतायत काका समोरच्या गर्दीबद्दल काहीतरी अनुदार. पण काकांची कमाल. त्यांनी त्या वाक्यातल्या द्वर्थाकडे दुर्लक्ष करून "आहे हे असं आहे, घ्यायचं तर घ्या..." असं म्हणून आम्हांला फुटवलं.

मग बससाठी समोरच थांबलो होतो. लोकांचा जल्लोष ओसरला होता, पण अजून पुरा थांबला नव्हता. गटागटांनी रेंगाळत गप्पा मारणं सुरूच होतं. तेवढ्यात बसस्टॉपवरच्या एका काकूंनी "हे काय चाललंय?" असं मकीला विचारलं. काय सांगावं हे तिला पटकन कळेना. त्यांचं वय-वर्ग पाहता त्यांना या गोष्टींबद्दल माहीत असण्याची सुतराम शक्यता वाटत नव्हती. मकीनं कशीबशी सुरुवात केली. "हा गे लोकांचा मोर्चा आहे. त्यांचं अस्तित्व मान्य करावं, त्यांना सगळ्यांनी समजून घ्यावं म्हणून..."

त्यावर फाटकन "हां, म्हणजे हे सगळे गे आहेत!" असं काकूंचं उत्तर. प्रश्नार्थक कमी आणि विधानाकडे झुकणारं जास्त. त्यांच्या चेहर्‍यावरचे भावही पालटले नाहीत. निर्विकारपणे समोरच्या बसमध्ये बसून काकू चालत्या झाल्या. आम्ही चकित!

रेड बुल Mon, 02/02/2015 - 18:51

In reply to by मेघना भुस्कुटे

ते द्या मग प्रतिप्रश्न कराना ताइ... त्यांना माहीत असतं तर प्रश्न विचारला असता का एवडा विचार तरी आधी कराना ?

बाकी होल्डीग हेंड्स हे हम साथ साथ है चे गेस्चर असावे. इन्सिक्योरीटीचा संबंध नसावा.

गवि Mon, 02/02/2015 - 18:15

In reply to by अजो१२३

आणि या चारींपैकी काहीही नसलेले लोकही यात सामील झालेले होतेच (पाठिंबा इत्यादिसाठी) त्यामुळे यात सामील होऊनही आपण यातले नेमके काय आहोत हे लपवणं किंवा काहीही नाही आहोत असं म्हणणं यापैकी सर्व ऑप्शन्स सर्वांसाठी खुले असल्याचं / राहिल्याचं / ठेवल्याचं दिसलं. त्यामुळे कमिंग आउट किंवा बाहेर पडून "उघड" होणं हा भाग थोड्या लोकांनीच केलेला दिसतो (कपलप्रमाणे वागणारे किंवा ओरिएन्टेशन स्पष्ट दाखवणारे)

खेरीज जे या चारींपैकी काहीही नसतील आणि तरीही या परेडमधे सहभागी झाले असतील त्यातल्या जवळजवळ प्रत्येकाने आपण तसे नाही हे आडूनआडून किंवा जाताजाता शक्य तिथे सूचित केलं असेल का ? मला हो असं वाटतं.. पण ती गैरसमजूतही असेल माझी.

पण ठीक आहे. उघड चर्चा तर होतेय. कोणतीही गोष्ट अ‍ॅक्सेप्ट व्हायला ही स्टेपही आवश्यकच आहे.

2-माधवबाग Mon, 02/02/2015 - 21:24

In reply to by अजो१२३

देशात २५ लाख (हो!) गे व बाय्सेक्ष्सुअल पुरुश आहेत. फक्त पुरुशच. सगळे हातात हात घेउन चालत असते, तर नक्कीच दिसले असते. त्यामुळे तुमचि कम्मेन्ट खूपच जास्त "जनरलाइझ" करत आहे. तुमची कमेण्ट चुकीची आहे.

१) चौपाटीवर जा. अनेक बिहारी किंवा तत्सम लोक हातात हात घालुन असतात. गे नसले तरीही.
२) हातात हात धरुन चालण्यात फार काही गैर नसावे. दोन पुरुश, दोन स्त्रिया, एक पुरुश-एक स्त्री किम्वा कोणीही हातात हात चालण्याअवरुन आक्शेप घेणे "टू मच" आहे.
३) आपण लहान मुलान्चा, व्रुद्ध लोकान्चा हात धरतो.

आदित्य जोशी

'न'वी बाजू Wed, 04/02/2015 - 17:31

In reply to by 2-माधवबाग

मूळ प्रश्न:

एल जी बी टी क्यू हे सगळे नहेमी हातात हात धरून का असतात? एल जी आणि बाकीच्यांचे विश्व खूप वेगळे असावे.

प्रश्नातील प्रथम वाक्य निदान मी तरी 'हातात हात धरणे' हे 'एलजी आणि बीटी या दोन क्याटेगरीज़ एकत्र क्लब का केल्या जातात / एलजी क्याटेगरी मंडळी आपल्या क्याटेगरीज़ना बीटी क्याटेगरीबरोबर क्लब का करतात?' अशा अर्थी वाचले. 'एल जी आणि बाकीच्यांचे विश्व खूप वेगळे असावे.' या दुसर्‍या वाक्यातून, मला वाटते, हे पुरेसे स्पष्ट व्हावे.

सबब, असंबद्ध, नीजर्क तात्कालिक प्रतिक्रियेच्या घाईची आवश्यकता (निदान मला तरी) वाटत नाही. (चूभूद्याघ्या.)

(पण भल्याभल्यांकडून हे होऊ शकते. मागे एकदा कोणाच्यातरी '(ब्लडी) होमो इकॉनॉमिकस' या संज्ञेच्या वापरावरून आलेल्या अशाच एका तात्कालिक प्रतिक्रियेची मौज वाटली होती. असो.)

(बाय द वे, वी आर ऑल होमोज़. होमो सेपियन्स.)

(अतिअवांतर: 'आमच्या' लहानपणीपर्यंत बहुतकरून 'आनंदी' अशा अर्थाने समजला जाणारा 'गे' हा शब्द आज सर्वस्वी 'समलैंगिक' अशा अर्थी हायज्याक झालेला आहे. त्याचे दु:ख नाही, परंतु अशा नीजर्क आक्रस्ताळेपणाच्या प्रकाशात जॉर्ज मिकॅश या लेखकाचे (होमोसेक्षुअल लोक बाकी काहीही असतील...) '...बट गे दे आर नॉट!' अशा अर्थाचे विधान, त्यातील वाइड सरसकटीकरणाचा दोष पत्करूनसुद्धा, दुर्दैवाने विचारार्ह वाटू लागते.

बाकी, लैंगिक मायनॉरिटीज़च्या न्याय्य हक्कांविरुद्ध (इन्क्लूडिंग बट नॉट लिमिटेड टू मॅरेज ईक्वालिटी) किंवा त्याकरिताच्या लढ्याविरुद्ध काहीच म्हणणे नाही.)

बाकी चालू द्या.

गवि Wed, 04/02/2015 - 17:45

In reply to by 'न'वी बाजू

(बाय द वे, वी आर ऑल होमोज़. होमो सेपियन्स.)

पूर्वी एका स्टेपला होमो इरेक्टस होतो म्हणे आपण..आता बरे आहे तुलनेत ;)

गवि Wed, 04/02/2015 - 17:56

In reply to by बॅटमॅन

अरे म्हणजे कायम होमो इरेक्टस असण्यापेक्षा होमोच पण सेपियन्स ऊर्फ शहाणे मनुष्य असणे सोयीचे नाही का दैनंदिन व्यवहारात.

धनंजय Wed, 04/02/2015 - 18:08

In reply to by 'न'वी बाजू

मी तर पहिल्या "भले" उपाधीशीच प्राप्तप्राप्तव्य, धन्य, कृतकृत्य वगैरे झालो!

"भलेभले" मधील दुसरी "भले" उपाधी मिळवून धन्यतेला आणखी सुजायला जागाच उरली नाही.

परंतु त्या निमित्ताने "श्री" आणि "श्री श्री" उपाध्यांमधील फरक लक्षात आला.

'न'वी बाजू Wed, 04/02/2015 - 18:31

In reply to by धनंजय

'बुत्रोस' म्हणजे 'पीटर' हे एक वेळ समजावून सांगितल्यावर पटू शकते, परंतु 'बुत्रोस बुत्रोस' म्हटल्यावर त्यापुढील 'घली' म्हणजे बहुधा 'पम्प्किन ईटर' असावे, अशी शंका उगाचच येऊ लागते, तशातलीच गत म्हणायची.

घनु Mon, 02/02/2015 - 18:10

सुंदर वृत्तांत मेघना. मुंबई मधे असतो तर नक्कीच हजेरी लावली असती :)

लेखातली ही वाक्यं विशेष आवडली - खूप काही सांगून गेली :)

(हे बघ्ये पुढे फेरी पूर्ण होईस्तोवर अनेकवार भेटले.)

त्यावर फाटकन "हां, म्हणजे हे सगळे गे आहेत!" असं काकूंचं उत्तर. प्रश्नार्थक कमी आणि विधानाकडे झुकणारं जास्त. त्यांच्या चेहर्‍यावरचे भावही पालटले नाहीत. निर्विकारपणे समोरच्या बसमध्ये बसून काकू चालत्या झाल्या. आम्ही चकित!

अनु राव Mon, 02/02/2015 - 18:31

आपल्याला एखादी गोष्ट पटली आहे ती दुसर्‍याला पण आपल्यासारखीच पटली पाहीजे हा अभिनिवेश समजण्या पलीकडचा आहे.

- "एलजीबीटी- क्या? क्या होता है ये?" आयटीमध्ये नोकरी करणारी सुशिक्षित तरुणी.
- "म्हणजे कसली परेड? तू परेडला जाणारेस?" माझ्या आळशी स्वभावाशी जवळून परिचित असणारे कुटुंबीय.
- "ते बीभत्स चाळे करतात ते लोक? पण इल्लीगल आहे ना ते आता?" म.म.व. सुशिक्षित शेजारी.

ह्यात सरळसरळ आढ्यता आणि दुसरे कसे मागासलेले आहेत हे दाखवण्याचा अट्टाहास दिसतो आहे.

त्यांचं अस्तित्व मान्य करावं, त्यांना सगळ्यांनी समजून घ्यावं म्हणून..."

पुन्हा दुसर्‍यांनी अस्तिव मान्य केलेच पाहीजे हा अट्टाहास. का समजुन घ्यायचे आणि का अस्तित्व मान्य करायचे? बळजबरी का दुसर्‍यांवर?

अजो१२३ Mon, 02/02/2015 - 18:36

In reply to by अनु राव

याच लोकांनी गविंनी बीफ खाण्याबद्दल लोकांच्या श्रद्धांचे काय करायचे असे विचारले होते तेव्हा "घाला चुलीत" असा सूर दिसलेला. म्हणजे आमच्या त्या श्रद्धा आणि तुमच्या त्या अंधश्रद्धा. शिवाय त्या गाजवायचा नैतिक अधिकार आम्हाला असला पाहिजे.

अस्वल Tue, 03/02/2015 - 00:12

In reply to by अजो१२३

अतिशय संयत शब्दांत मांडलेलं पण ठाम मत. योग्य तितकाच अभिनिवेश -जास्त किंवा कमीही नाही.
घाला चुलीत साठी केलेला "" चा उपयोगही लक्षणीय. शिवाय याच लोकांनी अशी सूचक मांडणी करून हे लोक कोण ती उत्कंठाही वाचकाच्या मनात निर्माण केली आहे.
मी वाचलेला बहुधा सर्वोत्कृष्ट लघुप्रतिसाद.

अजो१२३ Tue, 03/02/2015 - 13:47

In reply to by अस्वल

असे प्रतिसाद मी गाढवाच्या गांडीत घालत असतो. तिथे अशा प्रतिसादांना खूप जागा आहे.
=============
अस्वल या आयडीच्या डोक्यात घुसेल अशीच प्रतिसादाची मांडणी केली पाहिजे हा नविन पुरोगामी विचार दिसतो आहे.

मेघना भुस्कुटे Tue, 03/02/2015 - 13:53

In reply to by अजो१२३

वा! भाषेचं दौर्बल्य सिद्ध होऊनदेखील काय भाषेवर पक्की मांड आहे! शिव्यांचा चपखल नि पुरोगामी वापर करावा तर असा. सुंदर!

अजो१२३ Tue, 03/02/2015 - 15:33

In reply to by मेघना भुस्कुटे

बाय द वे, या वाक्याची प्रेरणा संस्कृती गेली "गाढवाच्या गावात" हे आपलं वाक्य आहे. तुम्हाला गाढवाच्या कशात म्हणायचं होतं ते खूप स्पष्ट दिसतं. अभिव्यक्तिस्वातंत्र्याचे धडे घेतल्यावर मी माझी वाक्यरचना सुधारली आहे.
================
अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या धाग्यावर संवेदना या अभिव्यक्तिस्वातंत्र्यापेक्षा जास्त महत्त्वाच्या आहेत हे मी "लिहून" समजावत होतो तेव्हा पटले नव्हते हे रोचक आहे.

ऋषिकेश Tue, 03/02/2015 - 14:23

In reply to by अजो१२३

थेट व विनाकारण (किंवा समोरच्याला भडकावणे/उचकावणे हेच कारण) गांडीवर (घ)सरलेल्या अजोंनी ट्रोलिंग (अर्थात समोरच्याला उचकावणे) थांबवावे अशी विनयपूर्वक विनंती!

अवांतरः तेही बिचार्‍या गाढवाला का त्रास!? आपल्या आनंदासाठी दुसर्‍याची अशी वापरायची? हर हर!

बॅटमॅन Tue, 03/02/2015 - 14:32

In reply to by ऋषिकेश

याला माझा आक्षेप आहे.

एक तर प्रतिसाद गाढवाच्या गांडीत घातला आहे. गाढविणीस या सन्मानापासून वंचित ठेवले आहे. स्त्रीद्वेष नाही- चेक.

दुसरे म्हणजे प्रतिसाद गाढवाच्या गांडीत घातला आहे. या संकेतस्थळावर गाढवांबद्दल आदराने काही बोलले पाहिजे असा नियम नाही. - नियमभंग नाही-चेक.

तिसरे म्हणजे प्रतिसाद गाढवाच्या गांडीत घातला आहे. माणसाच्या नाही. सबब जोपर्यंत ही क्रिया ऐसीवरील कुणा आयडीशी केली अगर केली पाहिजे अगर केल्यास उत्तम अगर तीनही अगर यांपैकी कुठलेही एक अगर तत्सदृश विधान अजो करीत नाहीत तोवर समोरच्या माणसाचा अपमान होत नाही.

चौथे म्हणजे प्रतिसाद गाढवाच्या गांडीत घातला आहे. कुठली ठोस वस्तू नाही. सबब गाढवाला काही त्रास होईल अशी हिंसाही यातून ध्वनित होत नाही. भूतदया-चेक.

इतके सगळे टाईट चेक्स पास करणारा प्रतिसाद ऐसीवर आल्यास अडचण नक्की काय ते समजले नाही. याला ट्रोलिंग म्हणणे हा मुळात ट्रोलिंग या संकल्पनेचा अपमान आहे.

पन नॉट इंटेंडेड.

गवि Tue, 03/02/2015 - 14:43

In reply to by बॅटमॅन

ऐसीस्पेशल संतुलित विचारसरणीचा एक प्रतिनिधी या नात्याने मी सदरहू चर्चेतील प्रतिसादाचे गन्तव्यस्थान बदलून ते "बारा गडगड्यांची विहीर" करावे असे सुचवतो. त्यामुळे एकूण पंचही टिकेल आणि गन्तव्यस्थानाविषयीचे बरेच बदबूदार वाद-प्रतिवाद टळतील (पण मग चालेल का ते? )

१. अंपायर नव्हे.. ठोसा.

बॅटमॅन Tue, 03/02/2015 - 14:46

In reply to by गवि

यालाही माझा आक्षेप आहे.

प्रतिसाद विहिरीत घातला तर पंचचा जोर डिफ्यूज़ होईल. शिवाय विहीर बदबूदार नसेल किंवा त्याअगोदरचे स्थान खुशबूदार नसेल हे कशावरून?

आणि गन्तव्य स्थान कुठलेही असले तरी तेवढ्यामुळे वादप्रतिवाद टळतील याची ग्यारंटी काय?

ज्याने त्याने अवलोकावे, पावावी शीघ्रचि प्रचिती त्याने.

शहराजाद Tue, 03/02/2015 - 14:45

In reply to by बॅटमॅन

इतके सगळे टाईट चेक्स पास करणारा१ प्रतिसाद ऐसीवर आल्यास अडचण नक्की काय ते समजले नाही.


अहो ते संस्कृतात म्हटलेले नाही! ( अजो, शेवटचा चेक पास करण्यासाठी ब्याम्याची शिकवणी लावा बघू. ;) )

अजो१२३ Tue, 03/02/2015 - 14:55

In reply to by ऋषिकेश

ऐसीवर शिव्या भाषेची शोभा आहे अशी चर्चा झालेली.
=============
ऐसीवर अभिव्यक्तिस्वातंत्र्यावर चर्चा झालेली. मी फक्त माझे अभिव्यक्तिस्वातंत्र्य वापरत आहे. फक्त एम एफ हुसेननी वापरले तेव्हा अभिव्यक्तिस्वातंत्र्य असा युक्तिवाद योग्य नसावा.
==================
व्यक्तिगत टिका करणे सुद्धा अभिव्यक्तिस्वातंत्र्यात मोडायला पाहिजे. अस्वलाने म्हणणे मांडले असताना मी "तत्सम मृत विचारांवर" टिका का करू? अस्वलावर का नाही? व्यक्तिगत टिका, व्यक्तिगत टिका म्हणून लोकांनी फार संभ्रमित केले आहे. व्यक्तिगत टिका करणे देखिल योग्य आहे आणि शिव्या देणे देखिल योग्य आहे. हे मी इथे आजवर शिकलेल्या तत्त्वज्ञानाला अनुसरून आहे.

बॅटमॅन Tue, 03/02/2015 - 14:58

In reply to by अजो१२३

अगदी अगदी.

एमेफ हुसेनचे वायझेड फराटे चालतात आणि एक प्रतिसाद गाढवाच्या गांडीत काय घालू गेले तर सगळे अश्लीलतामार्तंड झाले.

अजो१२३ Tue, 03/02/2015 - 15:07

In reply to by ऋषिकेश

ऋषिकेश, कृपया मला ट्रोल म्हणणे थांबवा. मागे देखिल तुम्ही हे केलेले आहे. समोरच्याला उचकावणे हा माझा हेतू नसतो. मी जे लिहितो ते खूप थंडपणे लिहितो. समोरचा सेल्फ्-फॅशन्ड पुरोगामी असतो म्हणून उचकतो. मी असाच आहे. त्याला इलाज नाही. तुम्हा लोकांच्या संगतीने मी तुमच्यासारखा पुरोगामी बनू शकतो. I am open for that. But you need to make watertight arguments on subjective matters.

सबब प्लीझ पुन्हा ट्रोल, इ इ लिहू नका. I just don't like to read that.
============
गवि किंवा थत्ते किंवा अतिशहाणा (अजूनही बरेच जण), माझ्या मतांच्या एकदम विपरित मते मांडतात. तरीही मी त्यांचेशी सभ्यतेने वागत असतो. किमान माझी तशी मनिषा असते. का? कारण ते फक्त मुद्द्याचं बोलतात. अवांतर करत नाहीत. स्वतः वैयक्तिक गोष्टींवर घसरत नाहीत.

ऋषिकेश Tue, 03/02/2015 - 15:15

In reply to by अजो१२३

माझ्या मते जे ट्रोलिंग करतात त्यांना मी त्या प्रतिसादापुरते तरी मी ट्रोल म्हणणारच! तुम्ही त्याला नकार देऊ शकता. मी म्हटल्याने लगेच कोणी ट्रोल होत नाहीये! किंव मी न म्हटल्याने तुम्ही लगेच अ-ट्रोल होणार नाहीत. तुम्ही तुमचे मत तुम्हाला योग्य वाटेल त्या शब्दांत मांडतात तसेच माझे मत मी त्याहून कितीतरी संयत शब्दांत मांडतोय.

समोरच्याला उचकावणे हा माझा हेतू नसतो.

याबद्दल मला शंका आहेत!

बॅटमॅन Tue, 03/02/2015 - 18:29

In reply to by अजो१२३

टु बी फेअर, तुम्हांला ट्रोल म्हणल्याने तुम्ही ट्रोल होता का? सूडोपुरोगाम्यांच्याच गटात जाऊ लागलाय राव तुम्ही तर.

अजो१२३ Tue, 03/02/2015 - 18:57

In reply to by ऋषिकेश

तेही बिचार्‍या गाढवाला का त्रास!?

मी अस्वलाला त्रास दिला असता तर वादळ पेटलं असतं म्हणून!!! ;) ;)

बॅटमॅन Tue, 03/02/2015 - 19:03

In reply to by अजो१२३

स्वतःच्या खाण्यासाठी प्राणी मारलेले चालतात आणि एक प्रतिसाद काय घालू गेले तर सगळे पेटावादी झाले. ;)

गवि Mon, 02/02/2015 - 18:39

In reply to by अनु राव

पुन्हा दुसर्‍यांनी अस्तिव मान्य केलेच पाहीजे हा अट्टाहास. का समजुन घ्यायचे आणि का अस्तित्व मान्य करायचे? बळजबरी का दुसर्‍यांवर?

अनुजी..मला तर हे मान्य करायचे, समजून घ्यायचे म्हणजे नेमके काय करायचे हे कळलेलेच नाही या बाबतीत. मान्यच आहे.. सर्वजण हे घराच्या आतच करतात.. एकदा ही खाजगी गोष्ट आहे म्हटल्यावर मान्यतेचा प्रश्न येतोच कुठे ? मिया बिवी राजी की मिया मिया राजी हे घरात जाऊन बघणार आहे कोण मुळात ?? आणि रस्त्यावर तर कोणीच हे करत नाही. हात हातात घेऊन बसणे अथवा जे समाजमान्य गेश्चर्स स्त्री पुरुष रस्त्यावर करु शकतात तितकी दोन पुरुषही आत्ता करु शकतातच..त्याउप्पर पब्लिकली काही करायचे तर भिन्नलिंगीयांनाही अवघड आहेच.

अनु राव Mon, 02/02/2015 - 19:23

In reply to by गवि

मला तर हे मान्य करायचे, समजून घ्यायचे म्हणजे नेमके काय करायचे हे कळलेलेच नाही या बाबतीत. मान्यच आहे.. सर्वजण हे घराच्या आतच करतात.. एकदा ही खाजगी गोष्ट आहे म्हटल्यावर मान्यतेचा प्रश्न येतोच कुठे ?

अगदी सहमत. उगाचच नॉन्-इश्यु चा काहीतरी मोठ्ठा इश्यु करायचा.

मेघना भुस्कुटे Mon, 02/02/2015 - 20:26

In reply to by गवि

गवि, याच न्यायानं पाहायचं झालं तर म. गांधींनाही काही अडचण नव्हती. त्यांचं आयुष्य सुखानं जगण्याइतकं शिक्षण - काम - समाजातलं स्थान त्यांच्याकडे होतं. त्यांचे वैयक्तिक विचार काहीही असले, तरी त्याबद्दल त्यांना अडवायला कोण येणार होतं? त्यांनी बाहेर पडून हक्कांसाठी जी कृती केली तिच्याबद्दलपण तुम्हांला हाच प्रश्न आहे का?

गवि Mon, 02/02/2015 - 21:21

In reply to by मेघना भुस्कुटे

..
पारतंत्ऱ्य सार्वजनिक होतं. खाजगी अथवा बेडरुममधला दोन व्यक्तीतला व्यवहार नव्हता. त्याबद्दल अवेअरनेस करणे याची तुलना इथे कशी होईल?

स्त्रीपुरुष अशा स्ट्रेट संबंधातही ठराविक प्रकारे केल्यास बेकायदेशीर आहे भारतात. हे कोणी तक्रार केल्यास दखल घेण्याचे मुद्दे आहेत. घरात काही कपल्स हे मार्ग वापरत असतील तर कायदा अथवा समाज अंमलबजावणीसाठी बेडरुमेत जातो का?

मग या कपल्सनी आम्ही अमुकमैथुन तमुक प्रकारे करतो ते समाजाने स्वीकारावे आणि आम्ही ते उजळ माथ्याने करतो असे बाहेर येऊन सांगायचे?

मेघना भुस्कुटे Mon, 02/02/2015 - 21:27

In reply to by गवि

का नाही?

बेडरुममध्ये नवर्‍याने बायकोवर बलात्कार केल्यास तिला तक्रार करण्याची मुभा नाही, हे चुकीचंच आहे. त्यालाही माझा विरोधच आहे. 'बेडरुममध्ये आहे ना? मग त्याबद्दल बोलायचं कसं बॉ?' असं म्हणालात तुम्ही, तरीही मी हेच विचारीन. का नाही?

दोन सज्ञान व्यक्ती परस्परसंमतीनं जे काही करतात, त्याला कायद्यानं बंदी घालणं मुळातच चूक आहे आणि त्याला विरोध करण्याची प्रेरणा कोणत्याही स्वाभिमानी, स्वातंत्र्यप्रेमी व्यक्तीपाशी असायचीच.

गवि Mon, 02/02/2015 - 22:41

In reply to by मेघना भुस्कुटे

.सगळं मी म्हणतोय तेच पण मागणी अगदी विपरीत असं काहीतरी होतंय.

..लीगल मान्यता हवी हे योग्य. स्वीकार अन सामाजिक मान्यता वगैरे बद्दल म्हणतोय.

.नंतर लिहितो.
..आत्ता एकच म्हणतो की उलट आज स्त्रीवर नवर्‍याकडून बलात्काराची न्यायिक दाद मागता येत नसेल तर समलिंगी विवाहात असे झाल्यास त्यानाही दाद मागता येणार नाही..उलट आजरोजी
सज्जड शिक्षा मागता येईल.

..तरी सन्मानासाठी कायदेशीर मान्यता हवी इतकेच मान्य.

गवि Mon, 02/02/2015 - 23:03

In reply to by गवि

हे एक विवाहांतर्गत पती पत्नीवर बलात्कार करु शकतो आणि पत्नीला दाद मागता येत नाही असं सार्वजनिक ट्विस्टेड विधान कुठून उद्भवलं आहे ?

विवाहात लैंगिक संबंध हा हक्क मानला गेल्याने जोडीदार नकार देऊ शकत नाही. याचा अर्थ पत्नी ( अथवा पतीही) नाही म्हणत असेल तर विवाहविच्छेदासाठी तेवढ्यावरुन दाद मागता येते.

याचा अर्थ असा होतो का -की बलप्रयोगाने पत्नीशी संबंध ठेवले तरी पतीला कायदा प्रोटेक्शन देतो?

..नोप.

माझ्यामते पत्नी बलप्रयोग झाल्यास निश्चित केस करु शकते.

ॲमी Tue, 03/02/2015 - 08:29

In reply to by गवि

माझ्यामते पत्नी बलप्रयोग झाल्यास निश्चित केस करु शकते. >> नोप्स. व्हायोलंस (शारिरीक जखमा) असेल तर त्या जखमांसाठी डोमेस्टीक व्हायोलंस अॅक्टखाली केस करू शकते. बलप्रयोगाने शरीरसंबंध फोर्स केला म्हणून केस करता येत नाही. आणि शारिरीक दुखापत न करतादेखील शरीरसंबंध फोर्स करता येतात.

विवाहांतर्गत बलात्कार (लिंगनिरपेक्ष) गुन्हा असावा असे मलादेखील वाटते. पण जोपर्यंत एक जोडीदार दुसर्यावर फायनान्शीअली अवलंबून आहे तोपर्यंत ते नाते सर्विस प्रोवायडर आणि सर्विस हायररचेच राहणार. कोणत्या सर्विसेस ते ती दोघं + कायदे बनवणारे सरकार ठरवणार.

प्लिज नोट: हे फक्त पेनोव्हजायनल सेक्ससाठी आहे. 'अनैसर्गिक' ओरल, अॅनल सेक्स हा लग्नांर्तगतदेखील गुन्हा आहे, सेक्शन ३७७ नुसार.

गवि Tue, 03/02/2015 - 09:24

In reply to by ॲमी

तसं असेल तर मग माझा विवाहांतर्गत बलप्रयोगाने केलेल्या संबंधाबाबत असलेल्या कायद्याविषयीचा गैरसमज दूर झाला असं म्हणता येईल. धन्यवाद.

अर्थात तो "बाय द वे" मुद्दा होता.

समलैंगिकांनी सामाजिक स्वीकारासाठी बाहेर पडण्याची अनावश्यकता हा मुद्दा मी अजूनही ओपनच ठेवतो आहे. कोणतीही व्यक्ती सामाजिक पातळीवर मैत्री अथवा सामाजिक देवाणघेवाण करण्यासाठी जितकी माहिती आवश्यक मानते त्यामधे बेडरुममधे कोणत्या प्रकारची लैंगिकता पाळतोस असा कॉलम नक्कीच भरुन मागितला जात नाही. कारण तो सांगितल्याशिवाय कळणे शक्य नाही. तेव्हा ही लैंगिकता रस्त्यावर येऊन उघड करणे आणि आपल्या व्यक्तिमत्वाला असलेल्या इतर पैलूंकडे पहा असे सांगण्याची आवश्यकताच वाटत नाहीये. कारण बाकीचे पैलू मैत्रीसाठी अथवा समाज जितपत इंटरअ‍ॅक्ट करतो तितपत देवाणघेवाणीसाठी पुरे आहेत. समाजातले इतर स्ट्रेट लोकही आपली लैंगिकता एकमेकांशी उघड चर्चिणे ही पूर्वअट ठेवून एकमेकांचा सामाजिक स्वीकार करत नाहीत. तेव्हा कायद्याने गुन्हा ठरवणे हे अत्यंत अयोग्य आहे आणि जो काय संघर्ष करायचा तो फक्त कायद्याने गुन्हा न ठरणे यासाठी आणि यासाठीच करावा असं मत आहे. समाजात जागृती किंवा त्यांची स्वीकृती असे करण्याची या पर्टिक्युलर बाबतीत गरज नाही असं मत आहे.

ऋषिकेश Tue, 03/02/2015 - 09:31

In reply to by गवि

जो काय संघर्ष करायचा तो फक्त कायद्याने गुन्हा न ठरणे यासाठी आणि यासाठीच करावा असं मत आहे. समाजात जागृती किंवा त्यांची स्वीकृती असे करण्याची या पर्टिक्युलर बाबतीत गरज नाही असं मत आहे.

ज्या गोष्टीला स्वीकारलेलेच नाही त्यावर आधारीत कायदा कसा बनवावा?
उद्या मी म्हटले शेवईपंथावरील अन्याय दूर होणारे कायदे हवेत. तर पहिला प्रश्न येणार की शेवईपंथ असा काही पंथ आहे? त्या पंथाच्या अस्तित्त्वाचा नी त्याच्या नैसर्गिकतेचा स्वीकार केल्याशिवाय कायदा बनवता/बदलता कसा यावा? तेव्हा कायद्यात बदल होण्यासाठी पहिली पायरी म्हणून स्वीकृतीची लढाई आहे, नी त्यासाठी जागृती आवश्यक आहे.

जागृती व स्वीकृतीशिवाय अन्यायाचे अस्तित्त्वच समाजमान्य होणार नाही --> त्याशिवाय जनमत तयार होणार नाही --> त्याशिवाय कायदेबदल होणे कठीण.

तेव्हा जागृती व स्वीकृतीसाठी प्रयत्न करण्याची गरज आहेच आहे.

गवि Tue, 03/02/2015 - 09:35

In reply to by ऋषिकेश

उद्या मी म्हटले शेवईपंथावरील अन्याय दूर होणारे कायदे हवेत. तर पहिला प्रश्न येणार की शेवईपंथ असा काही पंथ आहे? त्या पंथाच्या अस्तित्त्वाचा नी त्याच्या नैसर्गिकतेचा स्वीकार केल्याशिवाय कायदा बनवता/बदलता कसा यावा?

बस का ऋसाहेब.. समलैंगिक पंथ असे काही अस्तित्वात असण्याबाबतच मुळात शंका आहेत आणि म्हणून कायदा बनू शकत नाहीये असं म्हणायचंय का तुम्हाला? आणि समाज नावाच्या गर्दीने उदा. वीस हजार सह्या करुन "आम्हाला समलैंगिक ही संकल्पना माहीत झाली असून ती मान्य आहे आणि आम्ही स्वीकार केला आहे" असं लिहून दिल्याशिवाय समलैंगिकतेला कायदेशीर ठरवणारा कायदा येऊच शकत नाही?

कायद्याचा मुद्दा फार पुढे गेलेला आहे असं वाटतं.. आता न्यायालयीन लढाई समाजाच्या जागृती अन स्वीकृतीशिवायही देता येईल अशी स्थिती नक्की आहे असं वाटतं. मुळात "स्वीकार करा" या मागणीला समाज नावाच्या कळपापुढे घेऊन जाण्यात काही अर्थ नाहीये या बाबतीत असं म्हणणं आहे.

ऋषिकेश Tue, 03/02/2015 - 09:40

In reply to by गवि

आता न्यायालयीन लढाई समाजाच्या जागृती अन स्वीकृतीशिवायही देता येईल अशी स्थिती नक्की आहे असं वाटतं. मुळात "स्वीकार करा" या मागणीला समाज नावाच्या कळपापुढे घेऊन जाण्यात काही अर्थ नाहीये या बाबतीत असं म्हणणं आहे.

इथे सर्वोच्च न्यायालयाने हात झटकलेले आहेत. त्यांनी बॉल संसदेकडे टोलावला आहे.
अशा वेळी स्वीकारकरा ही मागणी समाज नावाच्या कळपापुढे नेण्या व्यतिरिक्त दुसरा वैध मार्ग उरलेला नाही. मार्ग दूरचा, खडतर व काहिसा अशाश्वत आहे हे खरे, मात्र त्याला नाईलाज दिसतो.

मेघना भुस्कुटे Tue, 03/02/2015 - 10:23

In reply to by ऋषिकेश

इथे हे अवांतर होतं आहे. पण महत्त्वाचं आहे.

पुरोगामी / प्रवाहबाह्य लोकांना समाजाची पडलेली नसते / नसावी, असं का बरं वाटावं? माणूस हा समाजशील प्राणी आहे. समाजाच्या भवितव्याशी व्यक्तीचं भवितव्यही बांधलं गेलेलं असतंच. त्यामुळे समाजाकडून स्वीकृती ही व्यक्तीची सामाजिक-मानसिक गरज असते. (एरवी वाळीत टाकणं हा गुन्हा का मानला गेला असेल?) त्यासाठी प्रयत्न करणं हे लांगूलचालन आहे, असं मला वाटत नाही. हे प्रयत्न कसे होतात, त्यानं फार मोठा फरक पडतो. परिणामकारकेच्या तीव्रतेत आणि अंतिम परिणतीतही.

अजो१२३ Tue, 03/02/2015 - 14:02

In reply to by ऋषिकेश

इथे सर्वोच्च न्यायालयाने हात झटकलेले आहेत.

इतकेच नव्हे तर हायकोर्टाचा निर्णय खारीज करून संबंधित कलम रिस्टोअर केले आहे. सुप्रीम कोर्टाने केले आहे तेव्हा नक्कीच योग्य असावे.

ॲमी Tue, 03/02/2015 - 10:23

In reply to by गवि

मला खात्री नाही त्यामुळे खालील प्रतिसाद चुकीचा असू शकतो.

सध्या जो ३७७ कायदा आहे त्यात मोठा प्रॉब्लेम हा आहे की दोन कंसेंटींग प्रौढांनी (मग ते होमो असो की हेटरो) अनैसर्गिक संभोग केला आणि ते त्रयस्थाला कळाले तर तोदेखील याबद्दल पोलीस तक्रार करू शकतो. मॉरल पोलिसींग थोडक्यात. त्यामुळे समाजजागृती गरजेची आहेच.

ऋषिकेश Tue, 03/02/2015 - 10:31

In reply to by गवि

आमच्या लहानपणी - शाळेत - मुला-मुलींच्यात जाहिर जोड्या जुळवल्या की काही वेळाने त्यांना खर्र्च तसं वाटु लागतं आणि मग त्यांचं जुळतं अशी श्रद्धा होती ;)
अजोंनी गविंना पुरोगामी लोकांच्या यादीत टाकल्यानंतर हा प्रतिसाद वाचला नी लगेच ते आठवलं =))

ह घ्यालच!

अनु राव Tue, 03/02/2015 - 10:30

In reply to by ॲमी

अश्या कीती पोलिस तक्रारी आत्तापर्यंत दाखल झाल्या आहेत? जर झाल्या असतील तर त्या न्यायालयात केस म्हणुन उभ्या राहील्या आहेत?

३७७ कायदा तर काढुन टाकलाच पाहीजे असे माझे मत आहे, पण त्याचा जितका बागुलबुवा तयार केला जातोय तशी ही काही गरज नाहीये.

अजो१२३ Tue, 03/02/2015 - 14:06

In reply to by ॲमी

सध्या जो ३७७ कायदा आहे त्यात मोठा प्रॉब्लेम हा आहे की दोन कंसेंटींग प्रौढांनी (मग ते होमो असो की हेटरो) अनैसर्गिक संभोग केला आणि ते त्रयस्थाला कळाले तर तोदेखील याबद्दल पोलीस तक्रार करू शकतो. मॉरल पोलिसींग थोडक्यात. त्यामुळे समाजजागृती गरजेची आहेच.

हेटरो लोकांनी देखिल अनैसर्गिक संबंध ठेवावेत याला काय अर्थ आहे?

सलील Wed, 04/02/2015 - 02:32

In reply to by ॲमी

आमच्या हाफिसात एका व्यक्तीने आपले लिंग बदल केले आणि आता तो बाई म्हणून वावरतो. हि बातमी त्याने सांगायच्या आधी बर्याच लोकांना शंका आली होती आणि ते आपापसात हिणकस शेरे मारत असत. तेंव्हा मला प्रचंड आश्चर्य वाटले. ज्या गोर्यांच्या देशात ह्या संबंधांना कायदेशीर मान्यता आहे तिथे पण अजूनही भरपूर लोक आहेत कि जे ह्याला मान्यता देत नाहीत. त्या व्यक्तीला त्याच्या घरातून पण प्रचंड विरोध झालाय आणि जे आपल्याकडे होते त्याच सर्व अडचणीतून तो गेलाय. हे सगळे पाहून वाटले कि इथे पण एक क्लास डिफरन्स आहे. जीथे जरा भरपूर पैसे बैअ\से आहेत, जरा उच्च आर्थिक किंवा सामाजिक पातळीवरच्या लोकांना जास्त त्रास होत नाही. हेच जर का सर्वसामान्य असेल तर त्याचे प्रश्न आणि आपल्याकडच्या मधमवर्गातल्याचे प्रश सारखेच आहेत. त्याच्या घरातून त्याच्यावर भरपूर प्रेशर आले कि तुला रोग वगैरे झाला आहे बाकी काही नाही. इथे दुसरा मुद्दा पण आहे. त्याच्या कलीग्सना जे रोज त्याच्याबरोबर काम करतात त्यांना एक प्रकारची भीती (कन्सर्नला हा बरोबर प्रतिशब्द आहे कि नाही माहिती नाही) वाटली होती कि हा आपल्यालापण ह्याचं सारखाच करेल. असो. आज ३ वर्ष झाली आहेत कायद्यामुळे जास्त कोणी त्याला त्रास देत नाही कारण कायद्याची अंमलबजावणी गोरे जरा जास्त करतात. पण अजूनही एक प्रकारचा सूक्ष्म अवघडलेपणा आहे जो सरळ सरळ दाखवता येणार नाही. मागाहून शेरे मारणे खूप कमी झाले आहे पण पूर्ण बंद झालेले नाहीये. ह्यावरून आपल्याकडे कायदा झाला तरी ह्या लोकांना कितीपण समाज मान्यता देईल अशी शंका आहे.

अजो१२३ Tue, 03/02/2015 - 13:57

In reply to by ऋषिकेश

तर पहिला प्रश्न येणार की शेवईपंथ असा काही पंथ आहे?

बहुतेक सामान्य माणसाच्या आयुष्यात तेवढं एकच काम उरलं आहे. अगोदर शेवईपंथाबद्दल ऐका, मग मलाईपंथ, मग रसमलाईपंथ, मग ... .
जागृती करून घेणे हे एकच काम समाजाकडे उरले आहे.

ऋषिकेश Tue, 03/02/2015 - 08:44

In reply to by गवि

माझ्यामते पत्नी बलप्रयोग झाल्यास निश्चित केस करु शकते.

याबद्दल अधिक माहिती करून घ्यायला आवडेल. बलप्रयोगाने पतीने शरीरसंबंध ठेवल्यास कुठल्या कायद्या अंतर्गत केस होऊ शकते?
यास बलात्कार असे नक्की म्हणता येत नाही. तेव्हा इतर कोणते गुन्हे पत्नीला लादता यावेत? (त्या गुन्ह्याची शिक्षा बलात्कारा पेक्षा सौम्यच असणार हे आहेच, पण ते तुर्तास बाजूला ठेऊ)

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 02/02/2015 - 18:49

In reply to by अनु राव

का अस्तित्व मान्य करायचे? बळजबरी का दुसर्‍यांवर?

तुम्ही अस्तित्त्व मान्य न केल्यामुळे त्यांचं अस्तित्त्व नष्ट होणार नाही. उलट त्यांच्याकडून अधिक तीव्र प्रतिक्रिया येणार. समाजात असंतोष राहणार आणि त्यातून कोणीही सुटणार नाही.
त्यातून क्विअर लोक आपली लैंगिकता ते कोणावरही लादत नाहीत; आम्ही असे आहोत, हे फक्त मान्य करा एवढी सामान्य मागणी आहे. त्याला बळजबरी म्हणणं या चोराच्या उलट्या बोंबा आहेत.

बाकी आढ्यता वगैरे म्हणजे अगदी वाईड बॉल आहेत. ते सोडून दिलेलेच बरे.

अनु राव Mon, 02/02/2015 - 19:34

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

बाकी आढ्यता वगैरे म्हणजे अगदी वाईड बॉल आहेत

वाईड बॉल नाहीयेत, ही बघा उदाहरणे

- "एलजीबीटी- क्या? क्या होता है ये?" आयटीमध्ये नोकरी करणारी सुशिक्षित तरुणी. >>>>> ह्यात तुम्हाला तिरकस पणा दिसत नाही? नसेल माहीती त्या मुलीला हे गे लोकांबद्दल काही. ह्या वाक्यातुन लेखिकेला हे म्हणायचे आहे असा फील येतोय - "एव्हडी सुशिक्षीत आणि नोकरी करणारी( ती सुद्धा आयटी मधे ) मुलगी, पण तिला एव्हडे साधेसुधे माहीत नाही. तिला काही सामाजिक जाण वगैरेच दिसत नाही. कसल किड्यामुंग्यांचे आयुष्य जगते आहे, शी....."

दुसरे उदाहरण आढ्यतेचे

- "ते बीभत्स चाळे करतात ते लोक? पण इल्लीगल आहे ना ते आता?" म.म.व. सुशिक्षित शेजारी.>>>>>>>
लेखिकेने न लिहीलेले मनातले "इतके शिकले पण त्यांना कोर्टाचा निर्णयपण माहीती नाही? टीव्हीवर सासुसुनेच्या सिरीयल्स सोडुन दुसरे काहीतरी बघा" "ह्यांना दुसर्‍यांच्या भावनांची कदरच नाही, बिभत्स वगैरे काय आहे त्याच्यात? अगदीच मागासलेले आहेत हे, जग कुठे चाललय आणि हे कुठे राहीलेत मागे"

अतिशहाणा Mon, 02/02/2015 - 19:45

In reply to by अनु राव

अगदीच मागासलेले आहेत हे, जग कुठे चाललय आणि हे कुठे राहीलेत मागे"

या निष्कर्षात नक्की काय चुकलंय ते कळलं नाही. फारतर "एलजीबीटी- क्या? क्या होता है ये?" या आयटीतील तरुणीला पढतमूर्ख म्हणता येईल. सुशिक्षित नक्कीच नाही. निदान विरोध किंवा समर्थन करण्याइतकी माफक माहिती कुठेही मिळते. मात्र बिग बॉस आणि शाहरुख खान इतपतच बातम्यांसाठी संबंध असलेल्यांना काय म्हणणार?

"ते बीभत्स चाळे करतात ते लोक? पण इल्लीगल आहे ना ते आता?" म.म.व. सुशिक्षित शेजारी.

अगदी लोकसत्ताच्या चतुरंगच्याही विशेष पुरवण्या निघाल्या होत्या या विषयावर. मग सुशिक्षित कुणाला म्हणायचं हाच प्रश्न निर्माण होतो ना. निव्वळ डिग्री घेतली म्हणून शहाणपणा येत नाही. 'सरकारी जावई' असलेली दलित-मागासवर्गीय मंडळी सरकारी नोकऱ्या सोडून आयटी कंपन्यांमध्ये काय करतात असा प्रश्न विचारणारे महाभागही आहेतच की.

अनु राव Mon, 02/02/2015 - 19:51

In reply to by अतिशहाणा

निदान विरोध किंवा समर्थन करण्याइतकी माफक माहिती कुठेही मिळते.

माहीती कुठेही मिळते, पण म्हणुन ही माहीती सर्वांनाच असावी हा अट्टाहास का?

मात्र बिग बॉस आणि शाहरुख खान इतपतच बातम्यांसाठी संबंध असलेल्यांना काय म्हणणार?

ह्यात पुन्हा तुम्ही आढ्यता दाखवली आहे. एकादी व्यक्ती स्वताचे साधे सुधे ( तुमच्या दृष्टीने अगदी प्रायमल ) जीवन जगत असेल तर काय चुक आहे?

अगदी लोकसत्ताच्या चतुरंगच्याही विशेष पुरवण्या निघाल्या होत्या या विषयावर. मग सुशिक्षित कुणाला म्हणायचं हाच प्रश्न निर्माण होतो ना. निव्वळ डिग्री घेतली म्हणून शहाणपणा येत नाही.

लोकसत्ता कशावरही पुरवण्या काढेल, म्हणुन काय प्रत्येकानी त्या वाचायला पाहीजेत का? कदाचित त्या लेखांची टायटल बघुनच बाजुला ठेवल्या असतील.

तुम्हाला धृपद्-धमार बद्दल कीती माहीती आहे ( हे उदाहरणा दाखल ), क्ष रागातिल रे ची श्रुती वाय रागापेक्षा कशी वेगळी आहे ( हे ही उदाहरणादाखलच ) हे तुम्हाला माहीती आहे का? बिग बॉस चे विजेते वर्षानुसार सांगु शकाल का?

अतिशहाणा Mon, 02/02/2015 - 19:53

In reply to by अनु राव

ह्यात पुन्हा तुम्ही आढ्यता दाखवली आहे. एकादी व्यक्ती स्वताचे साधे सुधे ( तुमच्या दृष्टीने अगदी प्रायमल ) जीवन जगत असेल तर काय चुक आहे?

एलजीबीटींची हीच मागणी आहे. तुमच्या सुशिक्षित तरुणीला साधेसुधे प्रायमल जीवन जगण्याचा हक्क असावा, मात्र या समूहाला तो नसावा यामागचे तर्कशास्त्र समजावून सांगितले तर बरे होईल.

अनु राव Mon, 02/02/2015 - 19:57

In reply to by अतिशहाणा

पूर्ण हक्क असावा ना. मी कुठे नको म्हणतीय.

पण त्याच बरोबर, कोणाला गे शरीरसंबंध बिभत्स वाटत असतील तर तो पण त्याला हक्क ठेवा वाटण्याचा.

तसेही इतकी शतके कोण अडवत होते ह्या संबंधांना, चालुच होते ना. कोणाला काय पडलय हो कोण खाजगी आयुष्यात काय करतय त्याबद्दल.

पण त्याच बरोबर, मला कोणी लेस्बियन माझी मैत्रीण हवी का नको ते ठरवण्याचा माझा हक्क चुकीचा नका ठरवू.

अतिशहाणा Mon, 02/02/2015 - 20:04

In reply to by अनु राव

कोणाला गे शरीरसंबंध बिभत्स वाटत असतील तर तो पण त्याला हक्क ठेवा वाटण्याचा.

हक्क नाही ते कोण म्हणतंय. जे काही म्हणायचंय ते म्हणू शकता. म्हणतातच की. वर म्हटलंय ना त्यांनी. एखाद्याला गटारात लोळायचं असेल तर तसा लोळायचाही हक्क आहेच. पण अशा व्यक्तींना सुशिक्षित म्हणणे विसंगत वाटतं एवढंच म्हणायचंय. त्यांच्या प्रतिक्रिया फारशा गांभीर्यानं घ्यायची आवश्यकता नसते.

2-माधवबाग Mon, 02/02/2015 - 22:07

In reply to by अनु राव

तुम्ही स्ट्रेट शरीरसम्बन्ध किती वेळा ठेवला आहे?

...
...
...
आणि "प्रेम" सम्बन्ध??

गे ह्या शब्दाचा अर्थ सम-लिन्गाच्या व्यक्तीशी "प्रेम" सम्बन्ध प्रस्थापित करणार्या व्यक्ति.

- आदित्य जोशी

नगरीनिरंजन Tue, 03/02/2015 - 04:12

In reply to by अनु राव

माहीती कुठेही मिळते, पण म्हणुन ही माहीती सर्वांनाच असावी हा अट्टाहास का?

माहिती सर्वांनाच हवी असा अट्टाहास मला तरी दिसला नाही बुवा. माहिती असलेल्यांनी माहिती नसलेल्यांना आढ्यता दाखवली तर गैर काय? आढ्यता दाखवू नये असा नियम आहे काय?
पैसे असलेले लोक पैसे नसलेल्या लोकांना आढ्यता दाखवतात तसंच हे.

अनु राव Tue, 03/02/2015 - 09:35

In reply to by नगरीनिरंजन

माहिती असलेल्यांनी माहिती नसलेल्यांना आढ्यता दाखवली तर गैर काय? आढ्यता दाखवू नये असा नियम आहे काय?

आढ्यता दाखवावी की पण मान्य ही करावे की मला दंभ आहे मला काहीतरी माहीती आहे त्या बद्दल. आणि ज्या गोष्टी माहीती नाहीत त्या बद्दल न्युनगंड पण बाळगावा.

अजो१२३ Tue, 03/02/2015 - 14:14

In reply to by अतिशहाणा

'सरकारी जावई' असलेली दलित-मागासवर्गीय मंडळी सरकारी नोकऱ्या सोडून आयटी कंपन्यांमध्ये काय करतात असा प्रश्न विचारणारे महाभागही आहेतच की.

हा प्रश्न विचारण्यात चूक काय आहे? मी देखिल विचारेन हा प्रश्न.
==============
आजकाल पुरोगाम्यांना "असा प्रश्न विचारणारा महाभाग, तसे म्हणणे मांडणारा महाभाग" इ इ खूप भेटतात वाटतं.

अजो१२३ Tue, 03/02/2015 - 14:15

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

त्यातून क्विअर लोक आपली लैंगिकता ते कोणावरही लादत नाहीत

बोलाचाच भात अन बोलाचीच कढी.

अतिशहाणा Mon, 02/02/2015 - 19:51

In reply to by अनु राव

पुन्हा दुसर्‍यांनी अस्तिव मान्य केलेच पाहीजे हा अट्टाहास. का समजुन घ्यायचे आणि का अस्तित्व मान्य करायचे? बळजबरी का दुसर्‍यांवर?

Because it's there.

अतिशहाणा Mon, 02/02/2015 - 20:10

In reply to by अनु राव

जबरदस्ती नाही. रस्त्यावरुन वाहनं जात आहेत. त्यांचं प्रवाही अस्तित्व समोर दिसतंय. मात्र ती अस्तित्वात नाही असं समजून एखाद्याला रस्ता ओलांडायचा हक्क बजावायचा असेल तर त्याने तो जरूर बजावावा. त्याने वाहनांच्या अस्तित्वाला फरक पडणार नाही.

2-माधवबाग Mon, 02/02/2015 - 21:28

In reply to by अनु राव

कारण ज्या क्षणी तुम्ही ही कमेन्ट लिहित होतात, त्या क्षणी तुमच्या नातलग अथवा मित्र-परिवारामधील कोनितरि गे व्यक्ति आपले रहस्य जवळ्च्यांपासून लपवत होती.

"सगळ्या"च्या आस-पास एक (कमीत कमी) गे व्यक्ति असतेच. (हो.) जर तुमच्या त्या प्रेमाच्या माणसाचे अस्तित्व तुम्ही नाकारू इच्छीत असाल, तर माणूस म्हणून तुम्ही कसे आहात ह्याचा प्रत्यय येतो.

-आदित्य जोशी (फोटोमधला तो गे. एक पी एच डी स्टुडन्ट. युनिवर्सिति रैन्कर. गायक. पाणीपुरी लवर. माझ्या व्यक्तिमत्वाला इतर पैलुहि आहेत, हे साण्गण्यासाठीच... बाय द वे, माझा टेटू आवड्ला का? )

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 02/02/2015 - 21:34

In reply to by 2-माधवबाग

अगदी शेवटच्या शब्दापर्यंत सगळा प्रतिसाद आवडला.

अस्वल Mon, 02/02/2015 - 23:57

In reply to by 2-माधवबाग

टॅटू आवडला :)
-----------------------

(सॅनफ्रॅन्सिस्कोला एकदा मित्राबरोबर गेलो होतो. त्या दिवशी तिथे परेड होती. आम्ही म्हटलं बघूया तरी काय आहे ते. पाहिलं. बरंचसं टी.पी वाटलं. काही काही असभ्य (PDA type). पण मामला उत्साहाचा होता. उत्साह संसर्गजन्य होता! तर मी मित्रासोबत होतो आणि आम्ही वात्रट विनोद करून खिदळताना एका भारतीय काकूंनी बघितलं. "गे" दिसताहेत. छ्या! काय दिवस आलेत टाईप भाव त्यांच्या चेहेर्‍यावर उमटले.
मला तर वाटतं त्या क्षणी मी त्यांची छेड काढली असती तर छेड काढली ह्या त्रासापेक्षा हा पोरगा "गे" नाही ह्याचा त्यांना कदाचित आनंद झाला असता. :ड इथल्या चर्चोत्सुकांसाठी ह. घ्या वगैरे डिस्क्लेमर
)

अजो१२३ Tue, 03/02/2015 - 14:23

In reply to by 2-माधवबाग

"सगळ्या"च्या आस-पास एक (कमीत कमी) गे व्यक्ति असतेच.

उगाच कैतरी.

जर तुमच्या त्या प्रेमाच्या माणसाचे अस्तित्व तुम्ही नाकारू इच्छीत असाल, तर माणूस म्हणून तुम्ही कसे आहात ह्याचा प्रत्यय येतो.

हा शोध ऑफ द सेंच्यूरी असावा.

उपाशी बोका Wed, 11/02/2015 - 00:03

In reply to by 2-माधवबाग

-आदित्य जोशी (फोटोमधला तो गे. एक पी एच डी स्टुडन्ट. युनिवर्सिति रैन्कर. गायक. पाणीपुरी लवर. माझ्या व्यक्तिमत्वाला इतर पैलुहि आहेत, हे साण्गण्यासाठीच... बाय द वे, माझा टेटू आवड्ला का? )

तुमची diversified personality बघता तुम्ही समलैंगिकता या विषयाबरोबरच इतर काही विषयांबद्दलही लिहिले तर ते आवडेल. (असेच मी एका लेखिकेबद्दल सुचवले तर मोठा गदारोळ झाला होता मागे.)

रेड बुल Mon, 02/02/2015 - 18:44

माणूसकी म्हणूनच मी यांनी खाजगी जिवनात कसे वागावे याची मोकळीक २००% मान्य करतो.

गे लैंगीकता मला पटत नाही याचे एकमेव कारण मी त्यात कंफर्टेबल नाही हेच आहे. लैंगीकता हा शारीरीक व मानसीक व्यक्तीमत्वाचा अविभाज्य भाग असल्याने मला अनकंफर्टेबल वाटेल अशी लैंगीकता मला व्यक्ती म्हणून ऑकवर्ड फिल्करु शकते याची जाणीव मला आहे पण अशा लैंगीकता या जगात आहेत हे मी मान्य करतो पण माणुसकी म्हणून मी त्याचा विरोध कधीच करत नाही. स्ट्रेट नसणारे स्ट्रेट असणार्‍यांबाबत असे अनकंफर्टेबल फिल करतात काय हो ?

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 02/02/2015 - 18:51

In reply to by रेड बुल

स्ट्रेट नसणारे स्ट्रेट असणार्‍यांबाबत असे अनकंफर्टेबल फिल करतात काय हो ?

कल्पना नाही. पण गळेपडू स्ट्रेट व्यक्तिंमुळे अनकंफर्टेबल होणाऱ्या अनेक स्ट्रेट व्यक्ती माझ्या परिचयाच्या आहेत.

रेड बुल Mon, 02/02/2015 - 18:56

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

सॉलीड मजा वाटणार्‍या त्यापेक्षा जास्त स्ट्रेट व्यक्ती माझ्या परिचयाच्या आहेत पण आपण ही चर्चा अशा व्यक्तीवर केंद्रीत करुन का भरकटवावी ?

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 02/02/2015 - 18:58

In reply to by रेड बुल

दुसऱ्या व्यक्तीच्या लैंगिकतेमुळे अस्वस्थ होण्यासाठी क्विअर-स्ट्रेट असे संबंध असण्याची गरज नाही. दोन भिन्नलिंगी लोकांमध्ये, स्त्री-पुरुषांमध्ये, ज्यांना 'नॉर्मल' समजलं जातं, अशा प्रकारची देवाणघेवाण असू शकते. तेव्हा उगाच क्विअर लोकांना वेगळं काढण्यात हशील नाही.

रेड बुल Mon, 02/02/2015 - 19:37

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

मला नरमांस खाणे पसंत नाही. पण एखाद्या देशात, प्रांतात कोणी ते खात असेल तर माझ्यासमोर ते करणारा येउन तसे वागु लागला तर मला अनकंफर्टेबल फिल होणार नाही काय पण मी माणूसकीवादी व्यक्ती आहे.
जसे मांसाहारी लोक शाकाहारींबद्दल "हास्यास्पद" व शाकाहारीलोक मासांहारी बद्दल "अमानुष" हे बिरुद लावतात. तसे स्ट्रेट नसणारे स्ट्रेट असणार्‍यांबद्दल काय भावना राखतात याची वास्तवादी माहीती (विदा शब्द कसा वाटतो) हवीय इथे तार्कीक चर्चा टाळूया का ?

पुन्हा स्पश्ट करतो माणुसकी म्हणूनच जेंव्हा मी याला माझा २००% पांठींबा आहे म्हटले आहे ते बरेच काही सांगुन जाते.

ताक.- मला स्वत:ला लेस्बीअन अ‍ॅक्शन बघायला आवडतिल कारण माज्यासाठी ते भिन्नलिंगी प्रदर्शन ठरते तसे स्ट्रेट स्त्रियांना गे अ‍ॅक्शन बघायला आवडतिल काय हा सुध्दा एक प्रश्न विचारी आहे. हा धागा हक्का विषयी आहे तर हे हक्क कसे प्रस्थापीत होतात यावर मंथन असायुक्तीक नक्किच नसावे.

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 02/02/2015 - 20:27

In reply to by रेड बुल

आपल्यासारख्याच दुसऱ्या व्यक्तीचं मांस खाणं आणि दोन सज्ञान व्यक्तींनी एकमेकांशी, परस्परसंमतीने शरीरसंबंध ठेवणं यांच्यात तुलना करण्यामागचं प्रयोजन काय?

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 02/02/2015 - 20:59

In reply to by रेड बुल

प्रौढांच्या, परस्परसंमत शरीरसंबंधांची तुलना मनुष्याच्या मृत्युशी आणि मृतदेहाच्या शिष्टअसंमत वासलात लावण्याशी करण्यामागचं प्रयोजन खोडसाळ असावं, आणि विचारूनही स्पष्टीकरण न दिल्यामुळे हे मत अधिकच पक्कं होतं. त्यामुळे तुमच्या प्रश्नांच्या प्रामाणिकपणाबद्दलच मला शंका आहे. अशा परिस्थितीत प्रामाणिक उत्तरांची अपेक्षा अनाठायी आहे.

रेड बुल Mon, 02/02/2015 - 21:04

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

आणी शंकासमाधान करावे असे स्पष्ट लिहुनही असा प्रतिसाद ? आता नॉटी कोण लिहतयं ?

अजो१२३ Tue, 03/02/2015 - 14:26

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

पण गळेपडू स्ट्रेट व्यक्तिंमुळे अनकंफर्टेबल होणाऱ्या अनेक स्ट्रेट व्यक्ती माझ्या परिचयाच्या आहेत.

व्यक्तिचे विधान - विष खाल्याने संपदरावाचा मृत्यू झाला.
अदितीचा प्रतिवाद - आयुष्य रोज तीन वेळा अन्न खाऊन सुखाने आयुष्य जगत असलेले बरेच लोक मी शेजारी पाहिले आहेत.
==============
प्रणिपात घ्यावा.

स्ट्रेट नसणारे स्ट्रेट असणार्‍यांबाबत असे अनकंफर्टेबल फिल करतात काय हो ?

मला वाटतं, अनकम्फर्टेबल वाटणं यात वेगळेपणाच्या जाणिवेपेक्षाही 'कंडिशनिंग'चा भाव अधिक असावा. त्यामुळे स्ट्रेट व्यक्ती निव्वळ माझ्यापेक्षा निराळी आहे, म्हणून स्ट्रेट नसणार्‍यांना अनकम्फर्टेबल वाटेल - असं वाटत नाही. (उलट सोशल कंडिशनिंगमुळे आपले समलैंगिकत्वच अनकम्फर्टेबल वाटण्याची शक्यता - निदान सुरुवातीच्या स्टेजमध्ये - अधिक.)

रेड बुल Tue, 03/02/2015 - 17:53

In reply to by नंदन

मला वाटते काही लोकात उपजतच समलैंगीकता असु शकते व ती नैसर्गीकच गणली पाहिजे. तर काहि लोक विकृतीचे बळी म्हणूनही समलैन्गीकतेला बळी पडत असावेत, अशावेळी समजा काही बावळट लोक होमोफोबिया म्हणून एखादी कृती क्याटेगोराइज करतात ते सुधा किती नॉनसेन्स असु शकते याचा अंदाज येतो. म्हणून सर्वप्रथम समलैन्गीकानी याबाबत व्यापक जनजागृती सुरु केली पाहिजे ज्यामुळे समाजमन याबाबत मंथनाला सुरुवात करेल. एकदा वि़कृती कोणती अन स्विकृती कोणती याबाबत समाजाची प्रकृती स्थिर झाली तर किमान अनावश्यक गोष्टींना नकिच फाटा देता येइल. कोणताही हक्क मागताना तो नैसर्गीक का आहे याचे तगडं अधिष्ठान दिले नसेल तर गोष्टी नॉन्सेन्स भासायला लागतात. :(

उपाशी बोका Wed, 11/02/2015 - 00:12

In reply to by रेड बुल

गे लैंगीकता मला पटत नाही याचे एकमेव कारण मी त्यात कंफर्टेबल नाही हेच आहे.

You're either with us, or against us असे का असावे? मला यात फारसे कळत नाही/माहित नाही/इंटरेस्ट नाही, यामुळे मला या बाबतीत काही मत नाही, असे का म्हणत नाही कोणी?

रेड बुल Mon, 02/02/2015 - 19:27

In reply to by वृन्दा

परस्पर संमतीने होणारा व्यवहार हा जर कोणास अहितकारक नाही तर त्यावर भारतात कायद्याने बंदी का आहे हे मलाही न उमजलेले कोडे आहे.

रेड बुल Tue, 03/02/2015 - 01:34

In reply to by मेघना भुस्कुटे

आपण फक्त आपला अनुभव अभ्यास विवेचन जे काही साठले आहे ते प्रकट करा, त्यातुन जे अभ्यासायचे ते आमचे आम्ही अभ्यासुन घेउ. व्हाय सो टेप्टीण्ग टु रिप्लाय b4 यु क्नो व्हाट टु रिप्लाय र्हिसपेक्तेड मदाम ?

विवेक पटाईत Mon, 02/02/2015 - 19:52

क्षमा मागतो मेघना ताई, पण ..
कुणी मानसिक रुग्ण असतो, आपण त्याचा रोग दूर करण्याचा प्रयत्न करतो. कुणी ही रोगाचे समर्थन करत नाही. त्याची विकृती वाढवत नाही. विकृतीला प्रतिष्ठा देण्याच्या प्रयत्नाला काय म्हणावे. पुरोगामित्व तर कदापि म्हणता येणार नाही. कारण पुरोगामी समाजाला पुढे नेतो (असे माझे मत- सहमत होणे आवश्यक नाही), विकृतीला प्रोत्साहन देत नाही.

रेड बुल Tue, 03/02/2015 - 01:27

In reply to by 2-माधवबाग

कृपया लिण्क बघावी. सामान्य माणूस हा संस्थळावरील स्वयंघोषीत अभ्यासुण्पेक्षा अधीकृत पात्रता असलेल्या व्यक्तीच्यामतांनी चटकन प्रभावीत होतात. या लिण्कवर असलेल्या मजकुराबाबत आपला काय अभिप्राय आहे ?

अजो१२३ Tue, 03/02/2015 - 14:45

In reply to by विवेक पटाईत

शरीराचा जो भाग reproductive system चा भाग नाही त्याला लैंगिक मानणे ही विकृतीच!
================
मागे अदितीने सजीवांची लक्षणे शाळेत शिकलो आहोत असे म्हटले होते. तिने बहुधा digestive system आणि reproductive system देखिल शिकल्या असाव्यात अशी आशा.

अजो१२३ Wed, 04/02/2015 - 10:48

In reply to by टिन

http://www.innerbody.com/image/repfov.html
Kindly have a look at what all constitutes female reproductive system. शिवाय यात मन, मेंदू, इ इ चा प्रत्यक्ष , अप्रत्यक्ष सहभाग असतो.
==============
मानवी देहाच्या कोणत्याही भागाचे कार्य काहीही आहे असे समजणे विकृती आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 04/02/2015 - 14:26

In reply to by अजो१२३

पुढच्या वेळेस पुस्तकांच्या दुकानात गेले की तुमच्यासाठी या पुस्तकाची एक प्रत नक्की घेऊन येईन आणि शक्य तितक्या लवकर ती प्रत तुमच्याकडे पोहोचवण्याची सोयही करेन. हे सांगण्यामागचा मुख्य मुद्दा असा की शरीरावर, त्वचेवर जिथे कुठे चेतापेशी (nerve endings) असतात तिथे केलेल्या स्पर्शामुळे लैंगिक सुखप्राप्ती होऊ शकते.

---

कोणत्याही विषयाचा अभ्यास न करता त्याबद्दल बोलणं निरर्थक, हास्यास्पद किंवा महाबोअर आहे.

बॅटमॅन Wed, 04/02/2015 - 14:28

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

पुस्तकं वाचून जगाला ज्ञान शिकवणार्‍या पुरोगाम्यांचा धिक्कार असो. उदगीरमध्ये असं नसतं, एर्गो कुठंच असं नसतं हे लॉजिक ओळखायला तुम्ही लोक शिकणार कधी?

अजो१२३ Wed, 04/02/2015 - 14:55

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

शरीरावर, त्वचेवर जिथे कुठे चेतापेशी (nerve endings) असतात तिथे केलेल्या स्पर्शामुळे लैंगिक सुखप्राप्ती होऊ शकते.

किंबहुना नख व केस सोडून संबंध मानवी देह एक लैंगिक अवयव आहे. असो.

अर्धवट Wed, 04/02/2015 - 15:29

In reply to by अजो१२३

ओके ओके मग ठीक आहे,
अन्यथा हे वाक्य वाचून माझा असा समज झाला की आपल्याला अचानक उत्क्रांती आणि उत्क्रांतीची तत्वे कळली वगैरे की काय.
पण आपण अजाणतेपणी एक मोठे वाक्य लिहून गेलात. असो.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 04/02/2015 - 15:42

In reply to by अर्धवट

"एक मोठे वाक्य लिहून गेलात." याबद्दल विशेष आभार. या प्रतिसादामुळे माझं उत्क्रांतीबद्दल असणारं आकलन वाढलं.

अजो१२३ Wed, 04/02/2015 - 15:46

In reply to by अर्धवट

पण आपण अजाणतेपणी एक मोठे वाक्य लिहून गेलात.

आणि मी वैयक्तिक लिहितो? हा खवचटपणा आणि हलकटपणा पाहून अर्धवट यांना देखिल दोन शब्द सुनावायचा प्रामाणिकपणा?

अर्धवट Wed, 04/02/2015 - 16:13

In reply to by अजो१२३

यात काय खवचटपणा केला मी?
तुम्हाला आधी विचारून घेतलं की तुम्ही वक्रोक्तीनं लिहिलंय की खरंच त्या वाक्याचा उत्क्रांतीच्या संदर्भातला अर्थ लक्षात घेऊन लिहिलंय?
तुम्ही उत्तर दिल्यावर मी टिप्पणी केली, ती वैयक्तिक नव्हती ब्वॉ.

अर्थात मी खवचटपणा, हलकटपणा करणार नाही अथवा करत नाही असा काही दावा नाही, फक्त याठिकाणी केला नाही ही हमी देतो.
अर्थात तुमच्या दोन शब्दांचा प्रसाद मिळाला तरी त्याला माझी ना नाही, त्यातील हवं ते उचलून पुढे चालता येईलच.

'न'वी बाजू Wed, 04/02/2015 - 16:54

In reply to by अजो१२३

किंबहुना नख व केस सोडून संबंध मानवी देह एक लैंगिक अवयव आहे. असो.

'लिंगदेह' या संज्ञेचा एक नवा आयाम दर्शवून दिल्याबद्दल धन्यवाद.

..........

एकेए 'सूक्ष्मदेह'. बोले तो, भारतवर्षात विज्ञानाचा सुळसुळाट होण्यापूर्वीच्या जुन्या सोनेरी काळात ते ऋषी, साधू वगैरे लोक जो धारण करून नाही नाही त्या भोकांत जाऊन कडमडत, तो. म्हणूनच त्यास 'लिंगदेह' म्हणूनसुद्धा संबोधत असावेत बहुधा. ('सूक्ष्मदेह' का म्हणत असावेत, ते विदित करणे आवश्यक आहेच काय?)

अरविंद कोल्हटकर Thu, 05/02/2015 - 03:57

In reply to by अजो१२३

'वेश्‍यास्‍त्‍वत्‍तो नखपदसुखान्‍प्राप्‍य वर्षाग्रबिन्दून्
आमोक्ष्‍यन्‍ते त्‍वयि मधुकरश्रेणिदीर्घान्‍कटाक्षान्|| (मेघदूत)

(हे मेघा) नखक्षतांना सुखविणारे तुझे वर्षाबिन्दु अनुभवून गणिका तुजकडे भुंग्यांच्या ओळीसारखे कटाक्ष टाकतील.

मन Wed, 04/02/2015 - 15:04

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

विपश्यना ह्या योगतंत्राबद्दल एक पुस्तक वाचलं होतं. त्यात त्यांनी mind वगैरे शब्द वापरताना हे पुन्हा पुन्हा सांगितलं होतं की रुढार्थानं
तुम्ही समजता तसं मेंदू-मन ह्याइतकीच संज्ञा मला अपेक्षित नाहिये. जिथे जिथे तुम्हाला "जाणीव" असते, feeling असते, तिथे तिथे
तुमचे मन कार्यरत असते.(किंबहुना जे काही कार्यरत असते; त्याला योगसाधनेच्या संज्ञेत mind हा शब्द वापरत आहे. वैद्यक शास्त्राच्या
दृश्टीने जे काही असेल ते असो, माझे बोलणे ऐकताना - वाचताना हाच अर्थ कृपया गृहित धरावा.)
.
.
विक्षिप्त बैंच्या प्रतिसादाचा सूर व योगशास्त्रातली मांडणी ह्यात जरासं साम्य भासलं खरं.

अजो१२३ Wed, 04/02/2015 - 15:06

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

हे सांगण्यामागचा मुख्य मुद्दा असा की शरीरावर, त्वचेवर जिथे कुठे चेतापेशी (nerve endings) असतात तिथे केलेल्या स्पर्शामुळे लैंगिक सुखप्राप्ती होऊ शकते.

On a serious note, it is different to say that all human cells are integrated in a particular fashion and it is entirely out of context to state that any organ can be used for any purpose.

नगरीनिरंजन Thu, 05/02/2015 - 08:20

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

प्रतिसादाशी सहमत; पण

लैंगिक सुखप्राप्ती होऊ शकते

याऐवजी इंद्रियसुखप्राप्ती होऊ शकते असा बदल सुचवतो. पंचेंद्रियांमध्ये लिंग हे वेगळे इंद्रिय न ठरवता एकूण त्वचाच एक इंद्रिय ठरवण्याएवढे आपले पूर्वज समजदार होते. आता आपले पूर्वज मूर्ख पुरोगामी होते असे अजोंना म्हणायचे असेल तर गोष्ट वेगळी. ;-)

गवि Wed, 04/02/2015 - 16:23

In reply to by अजो१२३

मानवी देहाच्या कोणत्याही भागाचे कार्य काहीही आहे असे समजणे विकृती आहे

थेट नसेल पण स्पर्शातून मूळ संवेदनेला आणखी तीव्रता मिळत असेल तर कोणताही अवयव सुख मिळवण्याच्या कार्यात वापरला जाऊ शकतो ना?

यावरुन एक जोक आठवला. एका व्यक्तीला शिंक आली की ऑरगॅझम होण्याचा "विकार" असतो. समोरची व्यक्ती त्याला सहानुभूतीने विचारते की "काही घेता की नाही यासाठी?" तेव्हा तो म्हणतो "हो.. तपकीर"

तस्मात एखाद्याला कशाने काय संवेदना होतील आणि स्वतःचा कोणता अवयव लैंगिक सुखाच्या कामी येईल (!) हे त्याच्यावरच सोडणे उत्तम नाही का?

प्रश्न राहतो सामाजिक मान्यतेचा. त्यावर बोलता येईल.

अजो१२३ Fri, 06/02/2015 - 12:33

In reply to by गवि

तस्मात एखाद्याला कशाने काय संवेदना होतील आणि स्वतःचा कोणता अवयव लैंगिक सुखाच्या कामी येईल (!) हे त्याच्यावरच सोडणे उत्तम नाही का?

गवि, एका फ्लॅटचे उदाहरण ध्या. किचन मधे स्वयंपाक बनवावा आणि संडासात संडास करावी असा प्रघात आहे. कोणी किचन मधे संडास करू लागला आणि संडासात अन्न शिजवू, खाऊ लागला तर? ते त्याच्यावरच सोडायचे? त्याचा आनंद त्याजठायी? फ्लॅटचे सगळे भाग एका प्रकारे इंटिग्रेटेड आहेत पण प्रत्येक भागाची सुस्पष्ट कार्यमर्यादा आहे. अशा माणसास शेजार्‍यांना, बिल्डरला, सिविल इंजिनिअरला, आर्किटेक्टला विचार नि मग फ्लॅट योग्य रितीने वापर असे सुचवणे चूक नसावे.

संडासात जेवण करायच्या प्रवृत्तीला कोणी स्वतः कारणीभूत असेल, नसेल; ही वृती जैविक वा सामाजिक कारणांनी आलेली असू शकेल, तिच्यावर उपाय असेल वा नसेल. ही कायदाबाह्य असावी कि नसावी हे देखिल बाजूला ठेऊ. पण अगदी गौरवफेरी काढायसारखं काय आहे त्यात?

प्रश्न राहतो सामाजिक मान्यतेचा. त्यावर बोलता येईल.

एखादी गोष्ट तत्त्वतः योग्य असेल तर तिला लवकरच कायदेशीर मान्यता मिळेल आणि सामाजिक देखिल. मुद्दा तो नाही. गोष्टच जर अयोग्य असेल आणि कायदेशीर, सामाजिक मान्यता मिळाली तर -
१. समलैंगिकतेस कारणीभूत असलेले जेनेटिक दोष दूर करण्याचे संशोधन मागे पडतील.
१. समलैंगिकतेस कारणीभूत असलेले जन्मप्रक्रियेतील दोष दूर करण्याचे संशोधन मागे पडतील.
१. समलैंगिकतेस कारणीभूत असलेल्या सामाजिक स्थिती कशा येणार नाहीत याबद्दलचे प्रयत्न मागे पडतील.
याचे मुख्य कारण समलैंगिकता सामान्य अवस्था म्हणून मान्य केली जाणे. जिच्यात दुरुस्तीची गरज नाही.
-----------------------------------
समलैंगिकांच्या लैंगिक संबंधांची काँप्लेक्ष्सिटी खूप. I take the point that just because it complex it cannot be disallowed.
Look how the society would look like -
1. Straight man
2. Straight woman
--------------
1. Gay -masculine
2. Gay - feminine
3. Gay - Both
-------------
1. Lesbian - masculine (with external aid)
2. Lesbian - feminine
3. Lesbian - both

I think around 20-25 (including gender structured forms) types of marriages/affairs/ proposals are possible. There would be a lot of confusion to narrate the "precise" sexual orientation. For example- what if a masculine gay marries a straight woman?

Who will supply kids to them?
What is the "orientation" is changed for a moment and a rape is alleged?
What about laws of inheritance? divorces? custody of kids?
------------------------------------------------------------------------------------------------
भारतात प्राइड फेरी काढायची गरज आपण ज्यांना हिजडे म्हणतो त्यांचीच आहे. इतरांची नाही. आणि त्यांनी देखिल ओंगळ कपडे घालून, ढोलतमाशे लावून फेरी काढू नये. भारतात अनेक व्यक्ति आहे ज्यांना नैसर्गिक लैंगिक व्यंग असूनही, म्हणजे हिजडे असूनही, त्यांनी मोठं कर्तृत्व केलं आहे. समाजसेवी संघटनं उघडली आहेत, मोठ्या पदावर गेले आहेत, खेळाडू बनले आहेत, राजकारण केले आहे, व्यवसाय केला आहे, इ इ. कर्तृत्व असतानाही आणि दोष नसतानाही हिजडे लोकांना भारतात, विशेषतः शहरी भागात, खूप हिनतेने वागवले जाते. And that calls for a pride parade.

बॅटमॅन Fri, 06/02/2015 - 13:21

In reply to by अजो१२३

मिपावरच्या जुगलबंद्यांसारखीच इथेही एक छान जुगलबंदी आहे.

मिपावरची माई-श्रीगुरुजी जुगलबंदी तशी इथे अजो-मेघना जुगलबंदी. =))

गवि Fri, 06/02/2015 - 13:27

In reply to by अजो१२३

एका फ्लॅटचे उदाहरण ध्या. किचन मधे स्वयंपाक बनवावा आणि संडासात संडास करावी असा प्रघात आहे. कोणी किचन मधे संडास करू लागला आणि संडासात अन्न शिजवू, खाऊ लागला तर? ते त्याच्यावरच सोडायचे? त्याचा आनंद त्याजठायी?

माझं म्हणणं इतकंच आहे की उदा. हेच उदाहरण घ्यायचं तर संडासात जेवण आणि स्वयंपाकघरात संडास असं करण्याचा भाग नसून,
पूर्वेकडेच प्रवेशद्वार, वायव्येकडेच संडास, आणि प्रत्येक घराचा दिवाणखाना आणि ज्यात केवळ पोळीभातभाजीआमटी शिजवतात अशा स्वयंपाकघराचा एकमेकांशी काटकोन अशी "सूत्रमूर्तीपद्धतीने वास्तूकंप्लायंट" रचना असलेल्या शंभर बंगल्यांच्या एका स्कीममधे पाचजणांनी पश्चिमेकडे प्रवेशद्वार गच्चीत संडास आणि वायव्येकडे स्वयंपाकघर बांधलं किंवा बांधून मागितलं आणि त्यात एमू शिजवले तर त्यांच्यावर उपचार करण्याची गरज नसावी.

वैद्यकीय उपचारांकडे जाण्यासाठी अपाय हा मुद्दा आवश्यक आहे असं मला वाटतं. जो संडासात जेवण आणि संडास असं दोन्ही करण्याची सवय असलेल्या मनुष्याच्या बाबतीत होऊ शकतो.

समलिंगी संबंधांत अपाय नसल्यास (प्रिझ्युमेबली) डॉक्टरकडे जाऊन काय दाखवणार? असं मी आधी म्हटलं होतं. जर या संबंधांत विशिष्ट प्रकारच्या शरीरसंबंधांनी शरीरातल्या काही अवयवांना इजा पोहोचत असेल आणि तो या संबंधांतला अनअव्हॉयडेबल, सहन केला जाणारा भाग असेल तर मात्र अपाय होतो असं मान्य करुन तुमचं म्हणणंही मान्य करावं लागेल.

बॅटमॅन Fri, 06/02/2015 - 13:29

In reply to by गवि

अहो कशाचा प्रतिवाद करताहात फुकट? होमो = विकृत असे अगोदरच समीकरण बांधून बसलेल्यांना काही सांगितले तरी शष्प (याबदली मराठी शब्द घातला की ग्राम्य होतो म्हणे) फरक पडणार नाही.

अजो१२३ Fri, 06/02/2015 - 14:08

In reply to by बॅटमॅन

मिपावर कोणीतरी मी होमो आहे असा धागा काढला होतो. मागच्या एका चर्चेत कोणीतरी ती लिंक दिलेली. त्या माणसाचा (व्यक्तित्व आणि लेखन या बाबतींत) मी फॅन होतो आणि पुढेही राहिलो.
एकदा होमो म्हटले कि त्याचा ३६० द्वेष करायचा? असे लोक खूप असतात. आहेत. मी त्यांतला असतो तर इथे इतकी डोकेफोड केली नसती. I have reservations on the mannerism of the parade, but again I am with them when they insist their side be heard. इथे जो आदित्य जोशी म्हणून आहे त्याच्यावर इतरांच जास्त प्रेम आहे नि माझं कमी आहे असं नाही. (असं सांगायची गरज नसते असे मी मानून चालतो.)
----------------
Having said that, homosexuality is a topic of research in scientific circles. It is certainly a state "away from" the state of straight or normal sexuality. I am of the opinion that intensive research should take place to cure the genetic and birth-related factor. Equal kind of research is necessary on social conditioning.
If such search yields medicines, good. If not, elaborate mechanism for how this new subset of society handles all the "sex association" related issues that straight people face needs to be elucidated.

बॅटमॅन Fri, 06/02/2015 - 14:42

In reply to by अजो१२३

एकदा होमो म्हटले कि त्याचा ३६० द्वेष करायचा? असे लोक खूप असतात. आहेत. मी त्यांतला असतो तर इथे इतकी डोकेफोड केली नसती.

छान! पण होमो लोकांना जाळून मारायला पाहिजे असं म्हटलं नाही म्हणून तुम्ही होमोंना नॉर्मल समजता असं थोडंच होतंय? या ना त्या प्रकारे हास्यास्पद उपमा वापरून होमो कसे गंडलेले आहेत हेच सिद्ध करायचा अट्टाहास जाणवतो.

मेघना भुस्कुटे Mon, 02/02/2015 - 20:30

घनु, आदूबाळ, अतिशहाणा, इलेक्ट्रॉन, टिंकू, धनंजय, अदिती - आभार!

बाकीच्यांना शुभेच्छा. मोठे व्हा. :ड