चर्चा : एक करणे

मध्यंतरी आम्ही जरा लेखनापासून दूरच होतो. कारण काय आहे असं विचारलं नाहीत तरी मी सांगतो, नाहीतर मग या लेखात लिहिणार काय? तर कारण म्हणजे इथल्या चर्चा.मागे ऐसीवरच्या वैचारिक चर्चांची खिल्ली उडवण्याचा एक क्षीण प्रयत्न आम्ही इथे केला होता.
पण पाण्यात पडल्याशिवाय पोहण्याबद्दल लेक्चर देऊ नये असं म्हणतात. तेव्हा आम्हीसुद्धा ह्या फेनोमेनॉनचा प्रत्यक्ष अनुभव घ्यायचं ठरवलं.

आमच्या जालीय आयुष्यात आम्ही बरेच फोरम्स पाहिले. नाही नाही त्या चर्चा वाचल्या. "माधुरी दिक्षित बरी की जुही चावला" अशा गंभीर प्रश्नांपासून "कम्यूनिझम बरा की आणखी कुठला इझम" अशा हलक्याफुलक्या प्रश्नांपर्यंतची रेंज कवर केली. कृष्णविवरांपासून शुक्र तार्‍यापर्यंत आणि उन्हाळी पिकांपासून ते गार वार्‍यापर्यंत वाट्टेल तिथे पडीक राहिलो. पण ते सगळं हिंग्लाळ भाषेत. बरेचदा इंग्रजीतच. त्यामुळे मराठीतून भांडणं चर्चा करण्याची आमच्या आयुष्यातली ही पहिलीच वेळ. त्यामुळे स्वभाषेतून चर्चा करण्याचा आनंद असतो तरी कसा, तो उपभोगू असा विचार करून आम्ही ऐसीवरच्या चर्चांमध्ये शिरकाव करण्याचा निश्चय वगैरे केला.
एखादा चांगलासा धागा बघून तिथून सुरूवात करावी म्हणून गळ टाकून बसण्यात काही मौलिक काळ गेला. पुरोगामी-प्रतिगामी वाद उफाळेल किंवा महाराष्ट्रातील भिकार लेखक कोण असा गहन प्रश्न चर्चेला येईल असा हिशोब मांडून वाट बघण्यात आमचा बराच वेळ गेला. च्यायला, पण आलेले धागे अगदीच मिळमिळीत. "हेल्मेट घालावं का" किंवा "ऐसीकरांचं बागकाम" असल्या फालतू विषयांवर इथले लोक चर्चा करून राहिले. शेवटी तर इतके वाईट दिवस आले की "सध्या काय ऐकताय" "अलिकडे काय पाहिलंत" वगैरे वाचू लागलो. परमेश्वरा, तिथं काय मौक्तिकं उधळणार आम्ही?

पण "अच्छे दिन आले आहेत" हे लोकं का म्हणतात ते लवकरच कळलं. प्रभू येशूची कृपा झाली, आणि विज्ञानशिबिरात काही सत्ताधारीलगतसंघटनासदस्यांनी चर्चेला असं काही खाद्य पुरवलं - एकदम चर्चेची त्सुनामीच आली! विमानं काय, ऐतिहासिक काळातली प्रगती काय.. विचारू नका. मग एके दिवशी भडक माथ्याच्या काही मंडळींच्या भावना दुखावल्या गेल्या आणि त्यांनी म्हणे एकदम खूनच केले. मग काय? चर्चेत अजूनच भर पडली. अभिव्यक्ती स्वातंत्र्य काय, धर्म अधर्म काय, नास्तिक आस्तिक डोमेस्टीक.. सगळे वाद एकदम उफाळून वर आले.
आम्ही ज्या क्षणाची वाट पहात होतो, तो क्षण आला एकदाचा. कुठे प्रतिसाद देऊ आणि कुठे नको असं झालं आम्हाला. प्रत्येक धागा उघडल्यावर प्रतिसाद द्यायला बोटं शिवशिवत होती. शेवटी नवज्योत सिद्धूचं* नाव घेऊन प्रतिसाद टंकला.
तमाम नव-चर्चोत्सुक मंडळींना काय होत असेल ते कळलं मला. लहान मुलं कशी, झाडाला पाणी घातल्यावर पाच पाच मिंटांनी ते किती वाढलंय हे चेक करतात- तसं मी दर दहा मिनिटांनी कुणी माझ्या प्रतिसादाला उत्तर देतंय का ते बघू लागलो. पुन्हा नुसत्या प्रत्युत्तराने भागलं असतं तरी ठीक. श्रेणीदान हा हुच्च प्रकारचा रोग इथे फोफावलेला, त्याचीही लागण झालीच. दर प्रत्युत्तरानंतर मी " मिळालेल्या श्रेणी" बघायला लागलो.
श्रेणीरोग साधा नव्हे. "कोणी श्रेणी देता का हो श्रेणी" असा सवाल माझ्या मनात सदैव घोळू लागला. इतरांना सहज मिळत असलेल्या "रोचक" आणि "मार्मिक"ने माझ्या पोटात दुखू लागलं. "माहितीपूर्ण" वगैरे तर माझ्यासारख्या बॅकबेंचरच्या अवाक्यात नव्हतीच म्हणा, पण गेला बाजार एक "रोचक" तरी? इतरांच्या एकोळी दोनोळी प्रतिसादांना ५ मार्मिक श्रेण्या आणि माझ्या बोटं तुटेपर्यंत श्रमून टंकलेल्या निबंधाला १ "साधारण"? जग सालं असलंच आहे. तेव्हा कळलं नाही पण आता मला स्पष्ट दिसतंय की हा प्रकार मी बराच सिरिअसली घ्यायला लागलो होतो.

ह्या चर्चेचे परिणाम घरीही व्हायला लागले. विषेशतः श्रेण्या आणि प्रतिक्रिया. नमुन्यदाखल पुढचे काही संवाद बघा.
<आज तिच्या हापिसात काय झालं, ह्या विषयावरच्या निरूपणाला साधारण २-३ मिनिटं झाली असतील, त्यानंतर>
"..अरे मी म्हटलं तिला, काहीही काय?असं कसं म्हणू शकतेस तू?.."
"बरोबर आहे ग तिचं.मार्मिक दे तिला एक."
"?"
"मुद्दा बरोबर आहे ग तिचा. म्हणजे बघ -"
"तुझं लक्षच नसतं मी काय बोलते आहे त्याच्याकडे."
ठप्प्प. असा आवाज होऊन आत एक भांडं वाजलं.

-*-
पुढला किस्सा अस्वलीणबाईंच्या मते १००% खरा आहे आणि माझ्यामते हे कुभांड आहे.
अस्मादिक म्हणे पांघरूणात लपून लॅपटॉप ऑन करत होते.
"काय करतोयेस? रात्रीचे १.३० वाजलेत."
"नाही जरा.. उगाच-"
"पॉर्न बघायचं असेल.बघू जरा-"
असं म्हणून तिने नजर टाकली. "अस्वल कोण आहे? आणि हे 'मिळालेल्या श्रेण्या' म्हणजे? काय प्रकार आहे हा? "
"त्याचं काय आहे, मी आज एक चर्चेत एक मुद्दा मांडलाय, त्याला कोणीतरी ३ निरर्थक दिल्यात ग."
"कुठे नसत्या उचापती करत असतोस. झोप आता. उद्या मला लवकर उठायचंय(!)"

-*-
माझी शब्दसंपदा एरवी तशी बरी आहे. पण अचानक काही ठराविक शब्द बोलण्यात वारंवार येऊ लागले. एकात एक मिसळ होऊन माझ्या विचारांचा फ्यूज पार उडला होता
उ.दा ही वाक्य बघा-
"बरोबर बोलताय तुम्ही. ही घ्या एक मार्मिक. शक्य असतं तर दोन दिल्या असत्या"
"खोडसाळ वाटते आहे मला ही जाहिरात. टिपिकल पुरोगामी लोकांनी असंच दाखवलं असतं."
"हॅ, तो स्यूडोसेक्युलर आहे. धड भात लावता येत नाही त्याला कुकरमधे..."
"अगं, जरा दार उघड. पोस्टमन आहे. माझी श्रेणी आलिये बहुतेक नवी."
"कुत्र्याला खायला पॅटिस? सॉरी, चुकून निरर्थक दिली हो तुम्हाला."

-*-
असो. तर चर्चांचा परिणाम घरगुती आयुष्यावर दिसायला लागला. ठरलेल्या गणिताच्या पेपरच्या दुस्वप्नाऐवजी आता माझ्या प्रतिक्रियेला लोकांनी ऐसीवर दुर्ल़़क्षित केलंय वगैरे स्वप्न पडायला लागली. आठ आठ दिवस झोप येईना. "डॉक्टरकडे जावं का?" असा धागा टाकावा अससा विचार माझ्या मनात आला तेव्हा मात्र मी थांबलो. मी डॉक्टरांकडे जायचं ठरवलं.

"या. बसा. अलिकडे आला नाहीत बरेच दिवस.काय नवीन?"
च्यायला. हा डॉक्टर उगाच सलगीत येतो. एकदा फटकावला पाहिजे.
"झोप येत नाही हो. विचित्र स्वप्न पडतात आजकाल."
"ह्म्म.. सविस्तर सांगा."
मग मी डॉक्टरांना ऐसी, चर्चा, मुद्दे, श्रेण्या, अस्वल वगैरे सगळं समजावून सांगितलं. डॉक्टर गंभीर चेहेर्‍याने ऐकत होते.
"अच्छा, असं आहे होय. भलतंच रोचक आहे हो सगळं."
मी दचकलो. त्यांनी इंटरेस्टिंग, विचित्र, गंभीर असा काहीही शब्द उच्चारला असता तरी मला काही वाटलं नसतं. पण "रोचक"?
"डॉक्टर तुम्ही-"
"२ वर्षांपासून सदस्य आहे. पण वाचनमात्र असतो. तुमचे मुद्दे बाकी चांगले असतात हो. पण काय आहे, आमचं पुण्य पडलं १. तेव्हा तुमच्या मुद्द्यांना दुजोरा देता येत नाही. अस्वल म्हणजे तुम्ही काय, ह्म्म. हँ हँ हँ.. वाटलं नव्हतं अशी भेट होईल म्हणून! चहा घेणार का?"
"...."

-------------------------------
तेव्हा वाचक मात्र मंडळी- तुम्ही इथे आहात पण सदैव "हितंच हाये पण दिसत नाही" मोड मधे असल्यामुळे तुम्हाला पेशल निवेदन. कृपया चर्चेत भाग घ्या! तुमच्यामुळे एखाद्याचा जीव वाचू शकतो हे लक्षात असू द्या.
आणि डॉ़क्टर, तुम्हीसुद्धा.
=================================
तळटीपा
*नवज्योत सिद्धू हा आमचा चर्चागुरू आहे. समोरच्याला प्रतिवादाची संधीच मिळू नये अशा भोवंड आणणार्‍या वेगाने मुद्दे मांडायचे-त्यात एक विनोद टाकायचा, म्हंजे पार्टी हसण्यात वेळ घालवते आणि आपले बाकीचे मुद्दे सर होतात.

संपादक मंडळी- हा धागा "चर्चा" मध्ये हलवता येईल काय? पोएटिक जस्टीस वगैरे.

field_vote: 
4.5
Your rating: None Average: 4.5 (6 votes)

प्रतिक्रिया

या ब्बात! झक्कास लिवलंय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

पटतंय आणि गुदगुल्या करता करता चक्क ओरबाडताही येतंय तुम्हाला. कारण अस्वलाला त्याची नखे मांजराप्रमाणे आत घेता येत नाहीत अगदी खऱ्या प्रेमाने पंजे फिरवले तरी ओचकारले जातेय. काळजी नको चाइनिज बुलेटप्रुफ जाकिटं मिळायला लागली आहेत आता रस्त्यावर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ROFL खल्लास लिहतो हा अस्वल!
आता 'ललित: एक होणे' यावरपण एक धागा येऊदे Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अगदी अगदी! ललित होऊन जाऊ द्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

...अस्वलमहोदयांच्या प्रत्येक प्रतिसादास माझ्याकडून एकएक 'भडकाऊ' लागू.

(धाग्यास देता येत नाही म्हणून. अन्यथा...)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

न.बा - बस्क्या, घेऊन घेऊन तुम्हीच मनावर घेतलंत! तेही तळटीपांशिवाय प्रतिसाद देऊन. थ्यँक्स.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ROFL सही लिहीलय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लय ब्याक्कार हासतोय. लय भारी. लय भारी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ROFL ROFL हहपुवा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे चित्र आठवले

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हाहाहा!!! ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0