छायाचित्रण आव्हान पर्व दुसरे - भाग ७ : धर्म

धर्म

भारतातला आणि समस्त अंतर्जालावारचा सर्वात संवेदनशिल विषय
पब्लिक लय तुटून पडतंय राव.
पण फोटोग्राफी किंवा कुठलीही कला हि कुठल्याच धर्माची नसते, त्यामुळे तिच्या नजरेतून हे विविध धर्म बघण्यातली मजा वेगळीच असेल
सो लेट्स स्टार्ट (स्माईल)

नियमः
१. केवळ स्वतः काढलेली जास्तीत जास्त ४ छायाचित्रे स्पर्धेसाठी प्रकाशित करावीत. मात्र विषयाशी संबंधित इतरांची, इतरत्र पाहिलेली चित्रे योग्य परवानगी घेऊन इथे टाकल्यास हरकत नाही. स्पर्धाकाळात टाकलेले इतरांचे चित्र स्पर्धेसाठी ग्राह्य धरले जाणार नाही.
२. स्पर्धाबाह्य अशी कितीही चित्रे देण्यास हरकत नसेलच, मात्र त्यासाठी किमान एक चित्र स्पर्धेसाठी द्यावे लागेल. अन्यथा दिलेल्या चित्रांपैकी कोणतेही एक चित्र परिक्षक स्पर्धेसाठी म्हणून गृहित धरतील
३. आव्हानाच्या विजेत्यास पुढील पाक्षिकात आव्हानदाता आणि परीक्षक व्हायची संधी मिळेल. अर्थात आधीच्या आव्हानाचा विजेता पुढील पाक्षिकाचा विषय ठरवेल आणि विजेता घोषित करेल. (मग तो विजेता त्यापुढील पाक्षिकाचा आव्हानदाता व परीक्षक असे चालू राहील.)
४. आज सुरू होणार्‍या स्पर्धेचा शेवट २१ जानेवारी २०१५ रोजी भा.प्र.वे.नुसार रात्री १२:०० वाजता होईल. त्यानंतर लवकरच निकाल घोषित होईल व विजेती व्यक्ती पुढील विषय देईल.
५. या आव्हानाच्या धाग्यावर प्रकाशित झालेल्या चित्रांच्या तंत्रावर शंका विचारण्यावर, निकोप टिप्पण्या करण्यावर बंदी नाही. मात्र हे आव्हान आहे हे लक्षात घेऊन जिंकण्यासाठी/हरवण्यासाठी उगाच एखाद्याला टीकेचे लक्ष्य करू नये अशी विनंती. अर्थात तुम्हाला हव्या त्या चित्रांबद्दल मुक्त, निकोप चर्चा करण्यास प्रोत्साहन देण्याचेच धोरण आहे.
६. आव्हानाचा विजेता घोषित करण्याचे पूर्ण अधिकार आव्हानदात्यांचे असतील. त्यासाठी त्याने ठरावीकच निकष लावावेत असे, बंधन नाही. त्याने आव्हान द्यावे व त्याचे आव्हान कोणी सर्वात उत्तम पेलले आहे ते ठरवावे, इतके ते सोपे आहे. शक्यतो ३ क्रमांक जाहीर केले जातील.(मात्र पुढील पाक्षिकात फक्त प्रथम क्रमांकाची व्यक्ती आव्हान देईल). आव्हानदात्याकडून काय आवडले हे सांगण्याचे बंधन नसले, तरी अपेक्षा जरूर आहे.
७. आव्हानदात्याला प्रथम क्रमांकाचा शक्यतो एकच विजेता/विजेती घोषित करणे अपेक्षित आहे.
८. आव्हानात स्पर्धेसाठी प्रकाशित चित्रे प्रताधिकाराच्या दृष्टीने निकोप असावीत अशी अपेक्षा आहे.
९. आव्हानदाता स्वतःची चित्रे प्रकाशित करू शकतो मात्र ती स्पर्धेत धरली जाणार नाहीत.
१०. कॅमेरा व भिंगांची माहिती देणे बंधनकारक. शक्य असल्यास इतर तांत्रिक तपशील द्यावेत.

व्यवस्थापकः सदर धाग्यावर छायाचित्राव्यतिरिक्त इतर विषयांवर फारशी चर्चा करू नये. समांतर चर्चेसाठी वेगळा धागा काढावा वा मनातले प्रश्न/विचार यातील ताज्या धाग्यावरही विचार मांडता येतील.

0
Your rating: None

Comment viewing options

Select your preferred way to display the comments and click "Save settings" to activate your changes.

आकाशाकडे किंवा दगडाकडे पाहून

आकाशाकडे किंवा दगडाकडे पाहून पुटपुटणार्‍या किंवा हातवारे करणार्‍या एखाद्या वेड्याचा फोटो कोणीतरी टाकेल असे वाटले होते.

Hope is NOT a plan!

नोत्र दाम, मॉन्ट्रियल/(मोंरेआल)

नोत्र दाम बॅसिलिका
Montreal Cathedral
(त्या वेळी येथे एक संगीताचा कार्यक्रम चालू होता.)
एचटीसी मोबाईल फोन कॅमेरा
आयएसओ ४१९
छिद्र आणि उघड-वेळ माहीत नाही.

निर्णय

विषय थोडासा कठीण होता कि काय त्यामुळे जास्त प्रवेशिका आल्या नाहीत (स्माईल)

धर्म म्हटल्यावर एकदम फिलिंग येईल अशी प्रवेशिका वाटली ती

मुळापासून यांची.

एकदम गोल्डन सकाळ, मशीद दिसतेय, धुके दाटलेले आहे, कधीही बांग ऐकू येईल, इतका लाइव फोटो आलाय

सो माझ्यामते विनर इस

धन्यवाद! या छायाचित्राचं

धन्यवाद! या छायाचित्राचं वर्णन तुमच्या शब्दांत वाचून छान वाटलं.

मलाच मुळापासून यांचे विनर

मलाच मुळापासून यांचे विनर चित्र दिसत नाही की सर्वांना हीच समस्या येतेय?

मशीदीचं दिसतंय

मशीदीचं चित्र दिसतंय. मुळापासून यांचं चित्रं कुठंय?

आता या कॉम्प्युटरवर दिसतय

आता या कॉम्प्युटरवर दिसतय चित्र. छान आहे.

धर्म

कॅनन टी३, १८-५५ मिमी, १/२५० सेकंद, f/४.५, आयएसो ४००, जिंप वापरून कॉण्ट्रास्ट वाढवला आहे.

(हा फोटो रमताराम, अंतराआनंद आणि आडकित्ता यांना अर्पण.)

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अगदी विरक्त संन्याशाला तरी

अगदी विरक्त संन्याशाला तरी कुठे चुकलाय 'पोटाचा' धर्म ?

Photo information

Camera: Canon
Model: Canon PowerShot A550
ISO: 400
Exposure: 1/1000 sec
Aperture: 5.5
Focal Length: 23.2mm
Flash Used: No

आई ग बिचारा

आई ग बिचारा Sad

आजचा मेन्यू - अमन

आजचा मेन्यू - अमन

कॅनन टी३, १८-५५ मिमी, १/१२५० सेकंद, एफ/५.६, आयएसो १००. चित्र फक्त कातरलं आहे.

(फोटोस्पर्धेच्या धाग्यावर भलत्या चर्चा वाचून अंमळ कंटाळा आला. जरा फोटो टाका रे मुलांनो.)

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

मस्त अदिति

मस्त अदिति

धर्म ३

Camera: NIKON COOLPIX L120
ISO: 800
Exposure: 1/20 sec
Aperture: 3.3
Focal Length: 6.2mm
Flash Used: No

मिटलेल्या डोळ्यांमुळे फोटो

मिटलेल्या डोळ्यांमुळे फोटो फारच आवडला.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

धर्म २

Camera: NIKON COOLPIX L120
ISO: 80
Exposure: 1/320 sec
Aperture: 4.2
Focal Length: 15.1mm
Flash Used: No

आवडले. झाड वठलं तरी त्याच्या

आवडले. झाड वठलं तरी त्याच्या धर्माला जागून परत लवलव कोंब फुटतोच असे काहीसे वाटले.

धर्म १

Camera: Canon PowerShot S2 IS
Exposure: 1/60 sec
Aperture: 3.5
Focal Length: 15.6mm
Flash Used: Yes

अरेच्या बरेच फटु आले असतील

अरेच्या बरेच फटु आले असतील म्हणून मोठ्या अपेक्षेने धागा उघडला होता.
असो, मिसळ मलाही खूप आवडते (स्माईल)

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

(अवांतर) त्यात काय, पाजी का असेना हा घ्या धर्म !

स्पर्धेसाठी नाही.

धर्मराज मुटके

धर्मराज मुटके यांनी सेल्फी टाकावा.

मला पहिले पारितोषिक देणार असेल तरच

मला पहिले पारितोषिक देणार असेल तरच टाकीन ! नकोच पण च्यायला. पारितोषिक मिळालं तरी पाचजणांत वाटून घ्यावं लागेल. मागच्यावेळी आईने आमचा जो पोपट केला ती गोष्ट गुर्जींना माहित असेल तर गेलोच बाराच्या भावात.

धर्म आणि मिसळ

प्लान करून, लवकर उठून एका सकाळी मुंब्रादेवी ला गेलो तेव्हा काढलेले हे काही फोटो… "धर्म" या विषयावर कुठला फोटो द्यावा हा विचार करत असताना ही सकाळ आठवली आणि गरजेपेक्षा थोडे जास्तच फोटो शेअर करण्याचा मोह आवरला नाही. ती सकाळ "रम्य" वगैरे होती असे नाही, पण हवेत मुंबईच्या मानाने थोडा अधिक गारवा होता आणि, सूर्यकिरणे अगदीच सोनेरी नसली तरी असह्य पण नव्हती. मुंब्रा गावाला लागूनच देवीचा डोंगर आहे, आणि व्यवस्थित पायऱ्या आहेत. त्या पायऱ्या चढताना आम्ही मागे वळून पाहिलं तर सूर्य आरामात वर येत होता, कसलीही घाई न करता… घरांमधून ऑफिस ला जाणाऱ्यांची लगबग चालू असणार असं वाटत होतं… मुंब्रा स्टेशन स्वच्छता कर्मचार्यांच्या खराट्यांनी स्वतःचं अंग नेटकं करून घेत होतं आणि "स्टेशन" च्या धर्माला जागून, लोकांच्या लाथाबुक्क्या खायला सज्ज होत होतं. गावातल्या मशिदीतून एक धर्म लाउड स्पीकर वरून आमच्यापर्यंत पोचत होता आणि एक धर्म डोंगरावर आम्ही पायऱ्या चढून येण्याची वाट बघत होता. या सहलीची सांगता आम्ही ठाण्याला जाऊन "मामलेदारांची मिसळ" खाऊन केली. नव्या गावात गेलो की तिथल्या मिसळी खाणे हा आमचा धर्म आहे. ठाण्याला "मामलेदारांची", डोंबिवली मध्ये "मुनमुनची", पुण्यात "काटाकिर्र" (बेडेकरांची आवडली नाही… गोड मिसळ म्हणजे ब्लास्फेमी!), धुळ्याला कुठेतरी मिसळीच्या नावाखाली पाव बुडवून खाल्लेले लाल रंगाचे तिखट तेल, औरंगाबाद ला N२ मध्ये "शिवा" मध्ये खाल्लेली भजे आणि पोहे बुडवलेली गरमागरम मिसळ (आणि तितकाच उत्तम चहा), आणि कोल्हापूरच्या फडतरे यांची "शास्त्रशुद्ध" मिसळ… अहाहा… अहाहा… श्या… मिसळीची आठवण म्हणजे अमेरिकेतला स्वतःचा (खूप दिवसांनी मिळालेला, ऑफिस चे काम न करण्याचा) वीकेंड खराब करून घेणे… असो…

१. खांद्याला डबा अडकवून हात वर करून लोकलचा धर्म पाळणारे लोक, आणि विजेच्या तारांमधून डोंगरावर दिसणारे मुंब्रादेवीचे मंदिर (स्पर्धेसाठी नाही)

२. स्वच्छ होऊन गलिच्छ होण्यासाठी सज्ज झालेले मुंब्रा स्टेशन (स्पर्धेसाठी नाही)

३. मुंबईचं धुकं, सोनेरी किरणं, आवाजी मशीद आणि रया गेलेल्या छतांच्या खाली चाललेली अदृश्य लगबग (स्पर्धेसाठी आहे)

४. "लोकांना ऑफिस मध्ये वेळेवर पोचवणे" हा धर्म पाळण्यासाठी उलट्या दिशेने रिकाम्या पोटी धावणारी लोकल (स्पर्धेसाठी नाही)

५. मामलेदारांची मिसळ (स्पर्धेसाठी नाही)

काटाकिर मिसळ का आवडते लोकांना

काटाकिर मिसळ का आवडते लोकांना हे अजून नाही समजलं मला... लय बोर... आणि आर्धा पाऊण तास थांबून खाण्याजोगी तर मुळीच नाय वाटत.

Freedom of expression is not under threat. Monopoly of expression is under threat.

मला तसंच पुण्याची प्रसिध्द

मला तसंच पुण्याची प्रसिध्द बेडेकरांच्या मिसळी बाबतित वाटतं, काय 'वरण-भात' टाईप मिसळ हो ती. मिसळ म्हणजे कसं तर्री आणि झणझणीत असायला हवी, पहिल्याच घासात एक सणसणीत जर्क बसायला हवा (फक्त तिखटपणाचा जर्क नाही पण त्या एकंदरीत मसालेदार चवीचा).

पुणेकर असूनही मी या मतास

पुणेकर असूनही मी या मतास दुजोरा देते.

स्पर्धेसाठीचा फोटो आवडला

स्पर्धेसाठीचा फोटो आवडला (स्माईल)

बाकी फोटो पण सुरेख आलेत, रोज मुंब्रा स्टेशन वरची भयंकर गर्दी आठवली

उरे घोटभर गोड हिवाळा

हिवाळी मुंबैचे फोटो आवडले. 'छतांच्या खाली चाललेली अदृश्य लगबग' वाचून 'या सृष्टीच्या निवांत पोटी परंतु लपली सैरावैरा' ही ओळ आठवली.

ऐला, मामलेदारकडे आता

ऐला, मामलेदारकडे आता प्लॅष्टिकच्या बाउलात मिसळ मिळते? आणि ष्टीलचे ग्लास? बर्‍याच वर्षात गेलो नाही. Sad

--------------------------------------------
गमभन मॉड्युल आता (माझ्या घरी) चालत आहे. पण ऑफीसमधून चालत नाही.

प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एम सी पी

आधी

आधी ष्टीलचे बाऊल आणि प्लॅष्टिकचे ग्लास होते काय?

वर दिलेले सर्व फोटो २ वर्षं

वर दिलेले सर्व फोटो २ वर्षं जुने आहेत. तेव्हा तरी मला प्लास्टिक च्या बौलात मिसळ मिळाली होती. आता अच्छे दिन आल्यावर मिसळीला "knighthood" देऊन तिची "सर मिसळ" झाली नसावी एवढीच अपेक्षा!

अपमान मिसळ

'अच्छे दिन' आले हो 'मामि'स (डोळा मारत)
बाकी 'मुनमुन मिसळ' ही 'अपमान मिसळ' म्हणूनही प्रसिद्ध आहे.

मला ती आज्जी त्या मिसळीइतकीच

मला ती आज्जी त्या मिसळीइतकीच आवडते. (स्माईल)

विषय पाहिल्यावर 'खाणेपिणे हाच

विषय पाहिल्यावर 'खाणेपिणे हाच धर्म' असे काहीतरी मनात आलेले.
मिसळीचा फोटो आवडला. पण मिसळ हा प्रकार एवढा काय आवडतो लोकांना कळत नाही Stare

Amazing Amy

न आवडण्यासारखे काय आहे

मिसळीत न आवडण्यासारखे काय आहे? मस्त मोड आलेल्या ताज्या मटकीची छान होते.

मिसळीत 'एवढं' आवडण्यासारखे

मिसळीत 'एवढं' आवडण्यासारखे काय आहे म्हंतेय.
म्हंजे क्षची मिसळ खाल्ली, यकडे मिसळ खायला जाऊ, इकडे परदेशात अबकडंची मिसळ फारफार मिस करतो भारतवारीत नक्की खाणार, वगैरे सांगण्यासारखं 'इतकं काही' मलातरी वाटत नाही मिसळीत.
"खा खा! मटारची उसळ खा!! केळीचं शिकरण खा!!!" टैप वाटतं (डोळा मारत)

Amazing Amy

जे जिथे मिळत नाही तेच मिस

जे जिथे मिळत नाही तेच मिस करणार ना? आता आहे परदेशात, आणि आवडते मिसळ, तर मिस करू नये का? आणि क्ष ची मिसळ खाणे किंवा, य चा वडापाव खाणे, किंवा ख ची साबुदाणा उसळ खाणे… हा सगळा खाद्यसंस्कृतीचा भाग आहे… तुम्ही फिरायला जाता तेव्हा, "अबकड किल्ल्यात काय आहे बघण्यासारखं? एकावर एक ठेवलेले दगड तर कुठेही दिसतात" असं म्हणता का? किंवा… "ताजमहालात काय ठेवलंय एवढं? संगमरवरी फरशा तर आमच्या घरात पण आहेत" असं म्हणता का? (म्हणतही असाल… मी काही तुम्हाला प्रत्यक्ष ओळखत नाही… )

ज्याप्रमाणे नव्या गावी गेल्यावर तिथली प्रेक्षणीय स्थळं बघावीशी वाटतात त्याप्रमाणे नव्या गावी तिथे कुठे खायला चांगलं मिळतं हे बघितलं (आणि त्याबद्दल लिहिलं) तर त्यात वावगं काय आहे? आणि मिसळप्रेमी लोक शोधत असतील मिसळीसाठी प्रसिद्ध ठिकाणं… यात एवढा "snobbish" किंवा "elitist" प्रश्न पडण्यासारखं काय आहे? तुम्ही जे वाचलं त्यात तुम्हाला काहीतरी झोंबलं, म्हणून असे प्रश्न पडतायत का? परदेशाचा उल्लेख केला म्हणजे मी लोकांना, "बघा हो मी किनई परदेशात आहे" असं म्हणून हिणवतोय असं तुम्हाला वाटलं का? आहे मी परदेशात, आणि आली मला आठवण… जे मनापासून वाटलं ते लिहिलं… लिहिताना हातचं काही राखून नाही ठेवलं… ज्यांना फोटो मध्ये इंटरेस्ट आहे त्यांनी त्यावर चर्चा करावी, ज्यांना मिसळीत इंटरेस्ट आहे त्यांनी त्यावर करावी (धाग्यास जे अनुकूल असेल ते!). पण असले snobbish प्रश्न तुम्ही धाग्यावर पाडता… असो… मला कल्पना आहे की माझी पोस्त थोडीफार विषयाला धरून असली तरी विषयांतर जास्त होतंय… यापुढे मिसळीसंबंधी एकही प्रतिसादावर मी तरी काही बोलणार नाही… तुमचे चालू द्या…

अरे बापरे

गदाधारी भीम, शांत हो जाओ!

what crap! एवढं चिडण्यासारखं

what crap! एवढं चिडण्यासारखं आणि पर्सनली घेण्यासारखं काय आहे त्यात? मिसळीच कौतूक फक्त तुम्हालाच आहे का? की परदेशात फक्त तुम्हीच आहात? एक साधा सरळ प्रश्न कुतुहलाने इन जनरल सर्वांना विचारला तर येडपटपणाच चालू झाला काहीतरी.

Amazing Amy

नाही!

मिसळीच कौतूक फक्त तुम्हालाच आहे का? की परदेशात फक्त तुम्हीच आहात?

नाही.

तुम्ही ज्याला 'परदेशात' म्हणता, तिथे मीही आहे. आणि मिसळीचे कौतुक मलाही आहे.

तर मग तुमचा मुद्दा नेमका काय होता म्हणालात?
..........

माझ्या पर्स्पेक्टिवानुसार मी स्वदेशस्थितच आहे, पण ते एक असो बापडे.

छोडो ना यार

(मुंबईच्या लोकलप्रवासाला स्मरून)
जान् दो यार. होता है ऐसा कभी कभी. खालीपिली कायको गुस्सा करताय यार
चल आजा, एक मिसळ मारते है (स्माईल)

तुमचा इन जनरल विचारलेला

तुमचा इन जनरल विचारलेला "rhetorical" प्रश्न अर्थहीन होता म्हणून एवढं बोलावं लागलं मला… (तुम्ही वापरलेला शब्द मला वापरायचा नाही)… बाकी एका धर्माचे लोक दुसर्या धर्माच्या लोकांना कसं हिणवतात याचं मिसळ न खाणारे लोक मिसळ खाणार्यांना कसे हिणवतात, किंवा परदेशात नसलेले लोक परदेशात असलेल्यांना कसे हिणवतात याचं प्रात्यक्षिक च झालं की इथे… चला… म्हणजे विषयांतराचं पाप तरी कुणाच्या माथी येणार नाही.

इथूनपुढे अर्थहीन वाटणार्या

इथूनपुढे अर्थहीन वाटणार्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करत जा. म्हणजे एवढा त्रास होणार नाही आणि श्रेणीवाटपही सत्कारणी लागेल.

Amazing Amy

हे वाचून "खाणेपिणे हाच धर्म"

हे वाचून "खाणेपिणे हाच धर्म" असा तुमचा समज होत असेल तर त्यात काही फार चुकले नाही. "मिसळ हा प्रकार लोकांना का आवडतो" याला मात्र माझ्याकडे उत्तर नाही. पण "मिसळ खाणारे लोक" या जमातीबद्दल तुम्हाला काही सुप्त राग वगैरे आहे की काय असे वाटले.

लॉल मिसळप्रेमींबद्दल सुप्त

लॉल मिसळप्रेमींबद्दल सुप्त राग कशाला असेल मला (दात काढत). असलंच तर थोडंफार कुतुहल. खरंतर तेपण नाहीच. विषय निघाला तर सहजच मनात येणार प्रश्न! बास एवढेच.

Amazing Amy

देव

धर्म या शब्दाची व्याप्ती मोठी आहे. पण मी आपला आहे तो फोटो डकवत आहे.

शक्यतो घरगुती गणेशोत्सवाचे

शक्यतो घरगुती गणेशोत्सवाचे फोटो नकोत, किंवा उत्सवांचे (म्हणजे हटके असतील तर देता येतील, पण बरेच सोपे काम आहे ते) (स्माईल)