नको ..

मागे नको वळू कारण पुढे ठेच लागेल
मग निघेल जिभाळी अन जिव्हारी लागेल..

मागे नको वळू कारण मन वेडझवं
मागे वळून म्हणेल त्याला पुन्हा सगळं हवं..

मागे नको वळू कारण खोळंबत राहशील
सुकलेल्या पळांशी उगा झळंबत राहशील..

मागे नको वळू कारण मागे रस्ते नसतील
मागे नको वळू तुला माझे डोळे दिसतील..

field_vote: 
3.666665
Your rating: None Average: 3.7 (3 votes)

प्रतिक्रिया

कविता आवडली. "झळंबणे" हे क्रियापद मला नवे आहे. बहुदा "झगडणे" "झोंबाझोंबी करणे" अशा अर्थी असावं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नो आयडियाज् बट इन थिंग्ज.

+१

झळंबणे , भंजाळणे, झेजरणे , गुळटमणे , टरमळणे या क्रियापदांचे अर्थ काय आणि नक्की कुठल्या संदर्भात ते वापरायचे. कुणीही प्रकाश पाडल्यास आभारी राहीन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शेवटचं कडवं फार फार आवडलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मागे नको वळू कारण पुढे ठेच लागेल

मागे वळू लागला तर पुढे पळता भुई थोडी होईल, नि मग त्या घाईत पाय हमखास कशालातरी ठेचकाळेल. सबब, मागे वळू असणे इष्ट नाही ("मागे नको वळू").

साध्या सोप्या शब्दांत किती गहन अर्थ व्यक्त केलेला आहे! मान गये.

.....................................................,...

अनक्याष्ट्रेटेड मेल बोव्हाइन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"डाकुमेंट्री आलेय डाकुमेंट्री!!!"

"भडजी पांऽऽऽच!"

"चटणी वाढ!"

"आधी तो मधल्या व्हिरीतला गाळ काढा."

इ.इ. तुफान विनोदी प्रकार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

कविता वाचून एक अर्थ मनाशी लावत होतो. तेवढ्यांत मागून हा 'वळु' आला.

मागे नको वळू तुला माझे डोळे दिसतील..

वळु शी नजरानजर झाली तर तो आणखीनच पिसाळतो म्हणे!
आता संपूर्ण कविताच एका वळु ने म्हटली आहे असा भास होत आहे.

.... जाऊं द्या हो गवि, तुमची कविता छान आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आवडली.

मुक्तसुनीत यांच्यासारखाच "झंबाळणे" माझ्याकरिता नवीन होता. त्यांनी सांगितलेला अर्थ ("झोंबाझोंबी") ठीक वाटतो, पण कवीकडून अनुमोदन मिळाल्यास उत्तम!

(माझ्या वैयक्तिक/कौटुंबिक वापरात "जिभाळी" आणि "जिव्हारी" दोन्हींच्या ठिकाणी "जिव्हारी" असाच शब्द आहे. हे दोन वेगळे शब्द आहेत, आणि त्यांचे निर्देश वेगवेगळे आहेत ("नखाखालचा नाजुक भाग", "दुखरे मर्म"), हे शब्दकोशात बघावे लागले. नवीन शब्द शिकल्याचा आनंद मिळाला.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मागे नको वळू तुला सहन नाही होणार
नव्या ऐटमशी मी सेटींग करत असणार

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सहन नाही झालं तर ती नव्या आयटमच्या झिंज्या ओढून तमाशा करेल. कल्जी नको Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मेरी मत करो कोई भी नक्कल
वरना मैं करूंगा उसका टक्कल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

च्यामारी.. तुला आमच्या कवितेवर हेच बरे "आठवले"?

(प्राचीला गुच्ची देणारा) SYG

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अरे काय करणार...
आदतसे मजबूर असणार...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मागे नको वळू कारण मागे रस्ते नसतील
मागे नको वळू तुला माझे डोळे दिसतील..

घाबरवलं ना... Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

actions not reactions..!...!