फटाक्याचा आनंद (लघु कथा)

रस्त्याच्या एका बाजूला मोठे-मोठे बंगले आणि दुसर्या बाजूला झोपडपट्टी, महानगरातले सामान्य दृश्य. दहा वर्षाचा चिन्या अशाच एका झोपडीत राहत होता. एका लहान मुलाप्रमाणे त्याच्या मनात ही राकेट, अनार, चरखी इत्यादी उडविण्याची इच्छा होती. पण त्याच्या बाबांनी एक छोटे से पिस्तुल दिवाळी निमित्त त्याला आणून दिले होते. दिवस भर टिकली सारख्या गोळ्या उडवून तो बोर झाला. संध्याकाळी आकाशात उडणारे राकेट इत्यादी पाहून आपले बाबा आपल्यासाठी अनार इत्यादी आणू शकत नाही, आपण गरीब आहोत, ही जाणीव त्याला बोचू लागली. तो उदास झाला.

चिन्या आत कशाला बसला आहे, बाहेर ये, समोरचा कोठीवला मोठा अनार उडविणार आहे, बाबांची आवाज ऐकून चिन्या बाहेर आहे. कोठी समोर रस्त्यावर एका माणसाने अनार उडविला एक उंच मोठा रंग-बिरंगी रंगांचा कारंजा आकाशात चमकला. काय मजा आली ना! बाबांनी विचारले. चिन्या म्हणाला, कसली मजा, मी थोडी ना अनार उडविला आहे. चिन्या, बघ समोरच्या पोरांनी कश्या टाळ्या पिटल्या आणि उड्या मारल्या त्यांनी ही अनार उडविला नव्हता, बाबा समजावणीच्या सुरात म्हणाले. त्यांनी नाही पण त्यांच्या नौकरानी उडविला नं, चिन्या उतरला. बाबा: तसं असेल तर मग केवळ नौकराला आनंद मिळाला पाहिजे, त्या मुलांना नाही. ठीक म्हणतो आहे, न मी. चिन्या काहीच बोलला नाही. बाबा पुढे म्हणाले, हे बघ चिन्या, मोठे लोक राजा-महाराजे, शेट स्वत: काहीच करत नाही. त्यांचे नौकर त्यांच्या साठी काम करतात. समज हा नौकर आपल्या साठी अनार उडवितो आहे, तर काय मजा येईल. चिन्याला हंसू आलं, तो म्हणाला बाबा म्हणजे तो आपला नौकर आहे, असं समजायचं नं. अचानक चिन्याचे लक्ष समोर गेले, बाबा, तो नौकर पुन्हा अनार उडविणार आहे, नौकर कडे पाहत, चिन्या जवळपास ओरडलाच , ए नौकर हमारे लिये अनार उडाव. लाल, निळ्या, पांढऱ्या रंगांच्या रंग-बिरंगी छटा पसरवित अनार उडाला, चिन्या आनंदाने जोरात हसला. चिन्याच्या चेहऱ्यावर हास्य पाहून, त्याच्या बाबांच्या डोळ्यांत पाणी तरळले.

field_vote: 
0
No votes yet