<वन मिस्टर मटक्या शोधी>

('टू मिसेस वाल्या कोळी' या कवितेपासून प्रेरणा घेऊन लिहायची तर शीर्षकांसाठी अनेक पर्याय होते. कारण चार शब्दांना प्रत्येकी किमान दोन अर्थ - म्हणजे विरुद्धार्थी करायचं झालं तरी दोनाचा चौथा घात इतके पर्याय! संबंधित शब्द वापरले तर अंतच रहात नाही. उदाहरणार्थ 'वन फाइंड्स उडद्या फुलपाखरू' किंवा 'फ्रॉम मिस्टर राम्या फिटर' वगैरे वगैरे... पण कोण बरं तो? काय नाव त्याचं लक्षात नाही... असो. त्याने म्हटलेलंच आहे की नावात काय आहे? प्रत्येक दिवस बाई आणि नेम धरला आज सुईत... शेवटी कोणीतरी नावाचा अर्थ काय, संबंध काय असं विचारेल, त्यासाठी काहीतरी खणखणीत उत्तर तयार असलं की झालं!)

सगळ्यांच्या पोटी
भुकेलं असायची भीती.
हॉटेलं शोधून ठेवणं.
माणसं-बिणसं जमवणं-बिमवणं.
सगळ्या(च) लोकांना रुचेल तिथे(च) भेटणं.
जीभ चाळवणार असं काही दिसलं,
तरी इतरांच्या धाकानं काणाडोळा करणं.
चर्चेत रुतून बसणं.
तरी काहीच ठरत नाही म्हटल्यावर,
कट्टा करेल त्याचं समर्थन करणं.

नाहीतर काय करणार?
पोट भरायला दात कोरणार.
भूक मारण्यापासून सुटका नाही.
वदनीकवळ घेताना
शाकाहार काय, मांसाहार काय,
कोणालातरी यातना देण्याशिवाय पर्याय नाही.
जोरदार आणि समजूतदार समर्थन.
'सारे काही सजीव' असल्याचं स्पष्टीकरण.
सगळंच सगळ्यांना कुठे रुचतं?
स्वत:ला आवडतं ते सार्‍यांना
जेवणबिवण कुठे पचतं?

आयतं खायला मिळत नाही खरं.
'खायला आहे का?' विरून जातं.
'खायला काळ'ची आळवणी,
मागून 'भुईला भार' येतं.
डोसा संपला.
सांबार संपलं.
इडली संपली.
चटणी संपली.
सारं कसा खडखडाट.
टोटल बोअरिंग.
एकदम ओकंबोकं.
कुणी अचानक जेवायला बोलावलं
तर थोडी सनसनाटी.
एरवी चघळण्यासाठी
सुपारी छोटी.
सगळ्यांच्याच हाती.
उपाशी रहायची भीती,
सगळ्यांच्याच पोटी.

यावर उपाय काय करावा?
स्वयंपाकाचा वास मनी धरावा.
खुशाल उठावे, खुशाल चालावे
भरजेवणावेळी खुश्शाल लोकांकडे जावे.
काही ओरपून-बिरपून खावे,
काही सोबत बांधून घ्यावे.
काही फ्रिजमध्ये ठेवून द्यावे.
बरेच काही पोटी घालावे.
माणसे येतील, माणसे जातील,
आपण सुखें भरपेट रहावे.
तुटतील थोडे सखे-सोयरे.
भांड्या-ताटांना जपणारे
फुकटचे पोसायला,
नाकारणारे.

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (3 votes)

प्रतिक्रिया

ROFL "थॅंक्यू! तुमच्याकडून विडंबन, हाच माझ्या कवितेचा बहुमान!" वगैरे...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

लॉल Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

भट्टी मस्त जमली आहे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

हाण तेजायला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

खणखणीत कवितेचं सणसणीत विडंबन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0