जुगलबंदी

भारतीय संगीत/नृत्यामधे जुगलबंदी एक अत्यंत लोकप्रिय प्रकार आहे. जुगलबंदी ही दोन वेगळ्या संगीत/नृत्यप्रकारांत किंवा एकाच प्रकारच्या संगीत/नृत्यप्रकारात होऊ शकते. अनेकदा वाद्यांची जुगलबंदी किंवा वाद्य आणि नृत्य यांची जुगलबंदीही आपण पाहिली आहे. हिंदी चित्रपटांमधे अशा अनेक प्रकारच्या जुगलबंद्या आपण पाहिलेल्या आहेत. चित्रपटांमधे कव्वाली किंवा उत्तर/दक्षिण शास्त्रीय भारतीय नृत्यप्रकारांची जुगलबंदी जास्त प्रमाणात दिसते. कमी प्रचलित असलेली एक जुगलबंदी म्हणजे, शास्त्रीय नृत्य आणि लोकनृत्य यांची. त्याचाच एक नमुना खाली देत आहे.

कथ्थक हे उत्तर भारतीय शास्त्रीय नृत्य आणि लावणी हे खास मराठी लोकनृत्य यांची ही मजेदार जुगलबंदी. यात वापरल्या जाणार्‍या वाद्यांचीही(अनुक्रमे तबला/पखवाज आणि ढोलकी) जुगलबंदी आलीच. दोन्ही नर्तकींनी आपापल्या नृत्याप्रकाराचा बाज संभाळून नृत्य 'अदा' केले आहे. लावणीचा मराठी ठसका आणि कथ्थकमधली सूचकता यांतला फरक दोघींच्या सात्त्विक(चेहेर्‍यावरचे हावभाव) आणि आंगिक अभिनयातून पुढे येतो.

हिंदी चित्रपटातील एक प्रसिद्ध जुगलबंदी :
http://www.youtube.com/watch?v=c_RC-snF2yo

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

हिंदी चित्रपटांमधे ज्या प्रमाणे कव्वालीची जुगलबंदी प्रसिद्ध आहे, त्याचप्रमाणे मराठी चित्रपटांमधे लावणीच्या सवाल-जवाबांची जुगलबंदी प्रसिद्ध आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेख अजून थोडा सविस्तरपणे लिहिता आला असता असे वाटते. जुगलबंदी आवडली.

पण जुगलबंदी म्हणले की मला सगळ्यात आधी डोळ्यापुढे येते ती 'इश्क इश्क' ही कव्वालीची जुगलबंदी.

आणि ही अजून एक ...

है अगर दुश्मन...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बिपिन कार्यकर्ते

वेगळी जुगलबंदी दिसतेय. छान. थोडं जास्त सविस्तर लिहिलंत तर आवडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एक वेगळी जुगलबंदी नित्र-मैत्रिणींसमोर मांडावी, याच हेतूने हा धागा लिहीला होता, प्रतिकीयांबद्द्ल धन्यवाद.
सविस्तर पुन्हा केव्हातरी....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दिपाली.. ही जुगलबंदी आवडली.. धन्यवाद.. थोडीशी भर घालते माहितीत..

जुगलबंदी ह्या शब्दाची व्युत्पत्ती अशी समजून घेता येईल .. जुगल अर्थात युगल, आणि बंदी म्हणजे बांधणे... दोन व्यक्तींनी एकत्रितपणे एखाद्या विषयाची मांडणी करणे.. प्रायोगिक कलानमध्ये जुगलबंदीची परंपरा दिसते.. मुळात दोन कलाकार मिळून एकमेकांच्या अविष्कारात भर घालून सादरीकरण करतात.. त्यात मूळ हेतू एकमेकांवर कुरघोडी करायचा नसून एकमेकानची उणीव भरून काढत प्रयोग अधिक रंगतदार करणे हा असतो.. अर्थातच नंतरच्या काळात स्पर्धा ह्या स्वरूपात जुगलबंदी खेळली जाऊ लागली आणि आता तर त्यातील साद प्रतिसाद देखील नाहीसे होत चाललेले दिसतात आणि फक्त एक कलावंत आपल्या माध्यमातून जे सादर करेल त्याचीच दुसरा कलाकार पुनरावृत्ती करताना दिसतो.. हे बरे किंवा वाईट आहे ह्या पेक्षा मुद्दा असा मांडावासा वाटतो कि काळा बरोबर कलेतील संकल्पना आणि सादरीकरण बदलत जाते... दिपाली ने येथे दिलेली जुगलबंदी विशेष आवडायचे कारण कि - प्रस्तुत जुगलबंदी मध्ये चित्रपटाची गरज म्हणून दोन प्रतिभान मधली स्पर्धा दाखवली गेली असली तरी अतिशय संयंत आणि संवेदनशीलपणे नृत्य आणि संगीत रचना केली गेलेली दिसते ज्यात दोनही कलावंतीचा वेगळेपणा राखून कलाकृती अधिक उत्तम कशी होईल हाच निकष अंतिम मानला आहे..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- दिलतितली
ज़िंदगी छोटी सी है, और 'मैं' बहुत बड़ी!

ही जुगलबंदी अजिबातच माहित नव्हती त्यामुळे मुळात व्हीडीओ दाखवण्याबद्दल आभार. उच्चभ्रूंचे कथ्थक आणि सामान्यांची लावणी असे मिश्रण बघायला मजा आली.

दिलतितली यांचा प्रतिसादही माहितीपूर्ण आहे; अर्थातच आवडला. सध्याच्या काळात एक वादक/गायक आणि एक नर्तक अशा काही जुगलबंदी (अनेकवचन जुगलबंदीच ना?) होतात का? संगीताच्या क्षेत्रात कोणत्या गोष्टींचा प्रभाव पडून सादरीकरणाची पद्धत बदलली, बदलते आहे?

संगीताची आवड असलेल्या, पण फारशी समज नसणार्‍या माझ्यासारख्यांना अशा प्रकारच्या लिखाणाचा फायदा होईल असं वाटतं. या विषयावर अधिकाधिक लिखाण व्हावं अशी इच्छा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

https://www.youtube.com/watch?v=wJ2MLxFackE

ही एक कव्वाली फार आवडते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जुन्या हिंदी चित्रपटातल्या शास्त्रीय संगीतावर आधारित जुगलबंद्या मजेशीर असायच्या. व्हायचं काय, की हिरोसाठी रफी वा मन्ना डे यांचा आवाज घेतला जायचा. हरणार्‍या प्रतिस्पर्ध्यासाठी चक्क भीमसेन, अमीरखाँ साहेब वगैरे दादा मंडळी घेतली जायची. हिरो तर जिंकलाच पाहिजे. पण रफी वा मन्ना या उस्ताद मंडळींना कसे तोंड देणार? मग संगीतकार त्यांची नेहमीची युक्ती वापरायचे. जो जास्त तारस्वरातला आवाज लावेल तो जिंकला! बिचारी बुजुर्ग मंडळी ते मान्य करत. अशा तर्‍हेने फिक्सिंग करुन ही मॅच जिंकली जायची.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जो जास्त तारस्वरातला आवाज लावेल तो जिंकला!

ROFL मस्त. माहीतीपूर्ण श्रेणी देऊ की विनोदी या द्वंद्वात, "विनोदी" पणाचे पारडे जड झाले आणि ...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

फक्त,

जो जास्त तारस्वरातला आवाज लावेल

याऐवजी,
"जो जास्त केकाटेल"
असा शब्दप्रयोग सुचवून मी आपली रजा घेतो, धन्यवाद!
Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Their concert will explore the unique form of the Jasrangi Jugalbandi created by Pt. Jasraj, where a male and a female vocalist sing two different raags at the same time in two different scales, based on the Moorchhana principle of Indian classical music. The two singers will give prominence to the Shadja-Madhyam and Shadja-Pancham Bhav, with the ‘ma’ note of the female voice becoming the ‘sa’ of the male voice, and the male ‘pa’ becoming the female ‘sa’. In the Jasrangi Jugalbandi, neither singer loses his or her own tonal quality as they sing in their own pitch. The combined effect makes us feel as if Shiva and Shakti are singing together.

http://www.thehindu.com/features/november-fest/sanjeev-abhyankar-ashwini-bhide-deshpande-at-friday-review-november-fest-2014/article6522606.ece

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हे प्रकरण मी ऐकलं आहे. जाम गोंधळ झाला होता डोक्यात. (हे शिव-शक्ती प्रकरण इज नॉट माय लोटा ऑफ भांग, त्यामुळे माझा पास.)

तुमचं, घाटावरचे भट आणि इतर जाणकारांचं मत जाणून घ्यायला आवडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

टिव्ही साउंड रेकॅार्डींग.



Page Title


राहुल आणि शंकर महादेवन जुगलबंदी ; MP3 ;Size 20MB

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0