आठवणी : गुळमट तिखट कडू

आताच लोकसत्ता वाचत होतो. खूप मज्जा येते ते तसले भारी शब्द वाचायला.
व्यामिश्र, जनरेटा, उद्बोधक....
एकदम जुन्या गोष्टी आठवायला लागल्या.
शाळेत असताना असे शब्द वाचले , की मी कुठेही ते शब्द ठोकून देत असे.

उदा:-
"मी आज व्यामिश्र खेळलो."
"मला आज खूपच उद्बोधक वाटतय."
किंवा "भाजीची चव उद्बोधक आहे."
आज "शाळेत जनरेटा पोचला."
.
.
"शी "ला विष्ठा म्हणतात समजेपर्यंत दुसरी तिसरीत कानावर पडलेला " शिष्टाचार " हा शब्द "विष्ठाचार ", "व्यभिचार " असा कसाही वापरायचो.
पेप्रात "विष्ठावंत नाराज " असं छापून यायचं असं मला वाटे.
दप्तर टाकायचो आणि गिळायला मिळेपर्यंत घरभर उंडारत असलं काहीतरी बडबडत सुटायचो.
तोंडात गूळ - शेंगदाणे, चिवडा असा कशाचातरी बकाणा भरलेला असायचा.
कितीही दंगा करुन शाळेतून आलो तरी थकलेलो नसायचो.
तेच शब्द आज पुन्हा लोकसत्तेत सापडले. -- व्यामिश्र, जनरेटा, उद्बोधक. मजा वाटली!
.
.
.

माझी आजी भांड्याला "पातेलं " किंवा "भुगणं/भुगुणं" म्हणे. ते पहिल्यांदा ऐकल्यावर मी स्टीलच्या गंजात तोंड घालून
"भुंग भुंग भुंग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग्ग" असं करत बसलो होतो बराचवेळ.
.
.
.
.

एकदा कधी नव्हे ते आम्ही सहकुटुंब थेट्रात गेलो होतो. मिस्टर इंडिया किंवा तेजाब चित्रपट असावा.
तेव्हा चार पाच वर्षाचा असलेला मी बसल्याजागेवरच उगीच चुळबुळ करत बाइक सुरु करताना आवाज काढतात तसा काढत होतो.
"बुंग बुंग बुंग्ग्ग्ग्ग्ग
स्वींइंइंइंइंइंइंइंइंइंइंइंइंइंइंइंइंइं"
थोडयवेळानं आवाज बराच व्हायला लागल्यावर आईने मला चूप बसायची खूण करत
"शूssss चुप बस बरं बेटा" असं दरडावलं.
मग मी मोठमोठ्यानं ठणाणा करत "चुप बस ब्येट्टा
चुप बस ब्येट्टा . चुप बस ब्येट्टा "
म्हणत नाचायला लागलो.
.
.
.

पत्नी दिवसरात्र घाबरवते मला.
" तुझा मुलगा साक्षात तुझाच अवतार निघाला तर काय करशील ?"
माझी दातखीळ बसते. निदान वयाची पहिली पाच-सात वर्षे तरी त्याने मी होतो तसा असू नये असे वाटते.
आई-बाबांचा लैच वाईट छळ केला राव मी.
.
.
.

प्राथमिक शाळा. कागदाचे अगदि लहान लहान -- फारफारतर नखभर किम्वा त्याच्याही अर्ध्याच आकाराचे कपटे/तुकडे बेंचवर टाकायचो.
प्लास्टिकची पट्टी डोक्यावर केसाला घासून त्याच्यापासून एखाद दोन इंच जवळ आणली की कसे कुणास ठाउक कागद त्या पट्टीकडे आकर्षित व्हायचे.
लोखंड चुंबकाकडे होतं तसं. एकदा घटकचाचणीत पेपर लवकर लिहून झाल्यानं पहिल्या पानाचा -- विद्यार्थ्याचं नाव वगैरे असतं तो काही भाग हा
उपद्व्याप करण्यासाठी फाडून ठेवला होता!
.
.
.

दहावी बारावीपर्यंत "स्मॉल वंडर " ह्या स्टार प्लस वर लागणार्‍या लहान मुलांसाठीच्या सिरियलचा पंखा होतो. कुणीही भेटलं की त्याला उत्साहानं त्या हॅरिएट सारखा "हाईईईई" करायचो. अरे हां. हॅरिएट कोण? सिरियलमधल्या "जेमी -द बिग जे" आणि विकी ह्या शाळकरी भावाबहिणींची ती क्लासमेट.
जेमीची स्पर्धक व जेमीवर क्रश असणारीसुद्धा. विचित्र्,मूर्ख हावरट आणि ओव्हरएक्स्प्रेसिव्ह व्रात्य मुलगी.
तर असो. ती "हाईईईई" करी. डेंतिस्टला दात दाखवताना जसे "ईईईई" करत सगळे दात दाखवतो तसे.
सिरियल पाहून झाली की आम्ही तिघे -- मी, केश्या आणि विन्या ; आम्ही केश्याच्या असणार्‍या चारमजली बिल्डिंगच्या गच्चीवर क्रिकेट खेळायचो.
फॉरेस्ट डिपार्टमेंटची दाट झाडी शेजारीच होती. रिमझिम भुरभुर पाऊस सुरु होता. आम्ही खेळायला सुरुवात करणार इतक्यात गच्चीवर आलेली वानरांची
टोळी दिसली. वानर....
काळ्या तोंडांची काळ्याकरड्याच रंगाचीच आणि जवळजवळ आमच्याइतकीच उंची असणारी ती वानरं.
ती गच्चीच्या दुसर्‍या टोकाला.आम्ही इकडं. मी लाडानं त्यांना "हाईईईई" असं म्हणालो अन् एकदम एक वान्नर पेटलन् राव!
तावातावानं, आवेशात ते पुढं येउ लागलं.संतापलं असावं. आपण दातओठ खाताना असतो त्याचे उग्र भाव.
ते एकटेच. आम्ही तिघे! तरी ते थांबेना. आम्ही होतो तिथूनच त्याला "ए हाट"..."ए जा"..."फिर्र फिर्र..." केलं.
पण ते कशालाच ऐकेना. तावाताव्नं पुढच येउ लागलं.
आम्हाला काहीही कळेना.केश्या आणि विन्या झटकन दाराजवळ असल्याने सटकले.
मागोमाग मीही निघालो अन् दाराजवळच सटकन् आपटलो. कुठूनशी ऑइलची बाटली गच्चीवर आली होती. त्यावर घसरून पडलो.
मागोमाग वान्नर.
पण तेवढ्यात धप्पकन आवाज. बहुदा तेही माझ्या मागेच कुठेतरी घसरून पडले असावे.
मी कसाबसा बाहेर सरपटत बाहेर. थेट दार लावून घेतले घट्ट.
हुश्श.
वान्नर भडकण्याचं कारण मागाहून समजलं ते असं :-
तो हुप्प्या वान्नर - टोळीचा प्रमुख नर असावा. आधीच्या नराला च्यालेंज करुन, हाणामारी-लढाया करुन हाकलून लावतो नवा नर त्यांच्यात.
नवा नर -- च्यालेंजर आधीच्या टोळीप्रमुखाला च्यालेंज कसं करतो? "ईईईई" करत त्याला दात दाखवत, दात ओठ खात तो त्याच्यावर हल्ला करतो.
त्यादिवशी मी "त्या"ला "हाईईईईई" म्हटलेलं होतं !!!
.
.
.
एकदा कोल्हापूर-पुणे अशा प्रवासासाठी आम्ही पणजी-कोल्हापूर-पुणे अशी बस निवडली होती. ती रात्री ९ला निघणार म्हणून रंकाळ्याहून निघून लवकर ष्ट्यांडवर पोचलो
दोनेक तास आधीच.पण ती पणजीहून ९ वाजता निघणार आहे, असं मागाहून समजलं! म्हणजे ती पणजीहून कोल्हापूरला येइपर्यंत आम्ही पुढचे सहा सात तास ष्ट्यांडवरच.
.
.
.

नव्यानेच कोवळी कोवळी बोकड दाढी यायला लागली होती. त्यावेळेला गांधी-विनोबांमुळे "स्वावलंबन" डोक्यात भरलेले/भारलेले.
ट्रिमरने दाढीसोबतच कटिंगही करण्याचा प्रयत्न. डोके अर्धवट भादरले गेले असताना ट्रिमरनं मान टाकली. मग तसच कटिंग सलूनकडे प्रस्थान.
.
.
.

लहानपणी खडीसाखर म्हणून तोंडात तुरटी तोंडात टाकली.
.
.
.

पाच सात वर्षांचा असेन.लहानपणी इतर अनेकांप्रमाणे मीही लाडू चोरुन खात असे. आमच्याकडे एक मोठा स्टूल होता.
त्याच्यावर चढायला शिडीसारख्या पायर्‍या होत्या.(बांधकामवाले "घोडा" म्हणतात अशा स्टूलला.) आई बाबा बाहेर गेलेले.
त्यावर चढून लाडू घ्यायचा प्रयत्न. ते पडलं धपकन् खाली. माझा तोल सावरायला म्हणून कपाटाला/अल्मारीला लटकायचा प्रयत्न .
ठाण्णकन् आवाज. आख्खी अल्मारी घेउन अस्मादिक खाली.
.
.
.

दिवाळीची पहाट. अर्धवट झोपेत असताना अलार्म बंद करायला उठलो. लाइट नसल्याने मेणबत्ती पेटवली. त्या प्रकाशात दिसलं :-
मेणबत्तीऐवजी बुलेट बॉम्ब पेटवलाय मस्त!
ROFL ROFL

--मनोबा

field_vote: 
4.6
Your rating: None Average: 4.6 (5 votes)

प्रतिक्रिया

ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हॅहॅहॅ... मजा आली वाचून.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

मस्त ROFL

मनोबा काडीकारखान्याचा मालक होतासे दिसते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

वान्नर भडकण्याचं कारण मागाहून समजलं ते असं :-
तो हुप्प्या वान्नर - टोळीचा प्रमुख नर असावा. आधीच्या नराला च्यालेंज करुन, हाणामारी-लढाया करुन हाकलून लावतो नवा नर त्यांच्यात.
नवा नर -- च्यालेंजर आधीच्या टोळीप्रमुखाला च्यालेंज कसं करतो? "ईईईई" करत त्याला दात दाखवत, दात ओठ खात तो त्याच्यावर हल्ला करतो.
त्यादिवशी मी "त्या"ला "हाईईईईई" म्हटलेलं होतं !!!

द च्यालेंज वुड ह्याव बीन वर्थ इट ना राव!

हात् साला! पळपुटे मनोबा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ROFL
!!!!!!!!

आमची अशी रिअ‍ॅक्शन ठिके
आईवडिलांची रिअ‍ॅक्शन मात्र नेहमी !@$$!@#$!@#$!@#$@#$%#$@!!@$!#@ अशी होत असणार Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

वानर पेटलन ROFL शूट!!!! पेटला या शब्दावरच हसतेय ROFL
__________________
शी! मी नेहमीच शहाणी, समजूतदार मुलगी होते. Sad कधीच त्रास दिला नाही ना आईवडीलांच्या नाकी नऊ आणले.
कोणीतरी तो उट्टंवाला दुवा दिलायन .... एखादं चांगलं कृत्य केलं की थोड्या वेळानी प्रचंड दुष्कृत्य करुन उट्टं निघतं तसं अतिसमजूतदारपणाचं आता उट्टं काढतेय Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वा! जमलाय लेख, विस्कळीत आठवणींचा गोफ आहे.
बाकी वाट्टेल ते शब्द बोलण्याबद्दल अगदी समजू शकतो! उ.दा ३-४थीत असताना साबण हा शब्द मला अतिप्रिय होता. मग महिनाभर कुठल्याही वाक्यात तो शब्द यायचाच! अगदी रँडम- ज्याला काहीही अर्थ नाही असलंसुद्धा खूप बोलायचो/करायचो आम्ही. उ.दा- "ढंपूकडक-चिप्पूकडक" असं म्हणत घराभोवती फेर्या मारणे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ढंपूकडक-चिप्पूकडक

मनातल्या मनात म्हणून पाहिल्यावर ढोलसदृश तालातच ऐकू येऊ लागलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हाहाहा रँडम अतिरेकी शब्द तर तालात मी आताही म्हणते. मला वाटतं शब्द्प्रेम हे कारण आहे. मुलीशी बोलताना , लाडात बोलायचं तर असंबद्ध, अतिरेकी शब्दयोजनाच असते. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

'ढंपूकडक-चिप्पूकडक '!
व्वा. ह्या अ‍ॅबनॉर्मल दुनियेत माझ्यासारखाच कुणी अजून एक नॉर्मल आहे हे पाहून आनंद झाला.
i too had a huge dictionary of words ; which actually meant nothing..
काहीही अर्थ नसलेल्या शब्दाम्चा प्रचंड संग्रह माझाही होता. तो मी बोंबलत फिरत असे.
http://www.youtube.com/watch?v=NzEtP8yZ1t0 ह्या गाण्यात अमिताभच्या तोंडी चाळीस ते अठ्ठ्चाळिसाव्या सेकंदपर्यंत असे काहिसे बोल आहेत :-
ढिमपटापट ढिमरिपटट....पकाको पोक्क पक्क....
हे असले शब्द कुठूनसे सापडले/सुचले की डोक्यात त्याची टेप एकसारखी वाजायची. माझं नरडं ती टेप ब्रॉडकास्ट करी.
.
.
.
कैकदा अगदि हिंदी-मराठी गाण्यांचे शब्दही नेमके समजत नसत.मग मी वाट्टेल ते शब्द घुसवून गाणे म्हणे.
"कल हो ना हो " मध्ये "देखो देखो ना pretty woman " असं गाणंय.
मी त्याला "गुडी गुमान्... बस गुमान " म्हणत फिरे.

.
.
.
दुसरी तिसरीत असताना :- लोक रबरी चेंडू फुटला की फेकून का देत की कळत नसे. चेंडूचा अधिक उपयोग तो फुटल्यावरच मी करी.
फुटलेला तो चेंडू दाबून त्यावर माती ठेवायची. आणि पंधरा वीस सेकंदात तो रबरी चेंडू झटक्यात पूर्ववत होत माती स्फोट झाल्यासारखी उधळून लावी.
हे करताना एकदम मजा यायची. चेंडू फुटायच्या आत त्यापासून दूर होत मजा घेणं हे कौशल्य होतं.
माझे उद्योग बघून एकदा माझा जिग्गी -- पक्या हेच करायला गेला. त्यानं मैदानातल्या मातीऐवजी शेजारच्या गोठ्यातलं गायीचं शेणं भरुन ठेवलं एका फरशीच्या तुकड्याच्या सहाय्यानं. पण काय झालं ठौक नै. शेण त्याच्यावर सरकवल्यावर तो चेंडू उसळलाच नै. बराच वेळ गेला. काय झालं ते बघायला पक्या गेल्यावर
नेमका चेंडू उसळून फाटकन पक्याच्या ढापण, चेहरा आणि शर्टावर सगळं शेण.
आरारा.
असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

व्वा. ह्या अ‍ॅबनॉर्मल दुनियेत माझ्यासारखाच कुणी अजून एक नॉर्मल आहे हे पाहून आनंद झाला.

नाय हो. लहाणपणी लै माणसं नॉर्मल असतात... पण मोठी झाल्यावर भित्री होतात आणि कबूल करायला घाबरतात ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

व्वा. ह्या अ‍ॅबनॉर्मल दुनियेत माझ्यासारखाच कुणी अजून एक नॉर्मल आहे हे पाहून आनंद झाला.

नाय हो. लहाणपणी लै माणसं नॉर्मल असतात... पण मोठी झाल्यावर भित्री होतात आणि कबूल करायला घाबरतात ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ढंपूकडक-चिप्पूकडक
हे असले उद्योग आम्ही थोडे मोठे झाल्यावरच केले.
उदा. हे गाणे :
देखा हैं पहली बार, साजन की आखाँ में दुख्त-तंग्ड-दुख्त-तंग्ड
अब जाके आया मेरे, बेचैन दिल को क-दत्तापाटील-दत्तापाटील

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आमचा एक भाऊ या बाबतीत ए-वन. वाट्टेल ते शब्द घुसडून गाणं म्हणे.
उदा. "ए गुलबदन.. " ह्या गाण्यातला "मुझे आज किसि से मुहोबत ना हो जाये" ऐवजी "मुझे आग बदडती ना होजाये मेरा झाड" हे अचाट शब्द तो लीलया बसवी.
माचिस मधलं "चप्पाचप्पा चरखा चले" हे न उमगल्याने "रपडप डर टकले" असे गूढ शब्द तो चालीवर म्हणे.
पडोसनमधलं "एक चतुरनार" हे त्याचं पेटंट गाणं- कारण मूळ गाण्यातच भन्नाट शब्द आहेत!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

दत्तापाटील नाय पण ते "दुख्त तंगड्" मात्र अगदी स्वयंस्पष्ट आहे ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

....गरीबाची 'व्हेरिएशन ऑन ए थीम' हो दुसरं काय ! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

की 'रेक्विएम ऑफ ए थीम' Wink

- बॅटग्यांग बॅटादेऊस बॅटझार्ट.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

ROFL अशक्य भारी !! मजा आली वाचुन !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सिद्धि

ROFL ROFL ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

लै भारी. मनोबा ज्याम मज्या आली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

தநுஷ்

ROFL ROFL ROFL

" तुझा मुलगा साक्षात तुझाच अवतार निघाला तर काय करशील ?"

सगळी पापं याच जन्मात इकडे मृत्युलोकातच फेडुन जावं लागतं बर्का मनोबा Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

छान... "स्मॉल वंडर " सिरियलची आठवण झाली Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काळ्या तोंडांची काळ्याकरड्याच रंगाचीच आणि जवळजवळ आमच्याइतकीच उंची असणारी ती वानरं.

मराठवाड्यात त्याला म्हाळ्या म्हणतात.

" तुझा मुलगा साक्षात तुझाच अवतार निघाला तर काय करशील ?"
माझी दातखीळ बसते. निदान वयाची पहिली पाच-सात वर्षे तरी त्याने मी होतो तसा असू नये असे वाटते.

त्यालाही लहानपण एंजॉय करु द्या राव.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मराठवाड्यात त्याला म्हाळ्या म्हणतात.

विदर्भात(अमरावतीत) त्याला भड्या(भाड्या नव्हे) म्हणतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कुठलंही काम झटपट करून घ्यायचे असेल तर माझा मामा म्हणायचा "झप्पडनप्पड चप्पडनपड' कर . उगीच हळुवार कामे आटोपणार्या मामे बहिणीला हमखास अशी ,झssम्म नssम्म झपssक्क ' काय करतेस ग असे ऐकवायचा . या शब्दसमुहाला इतका सुंदर नाद आहे कि चाळा म्हणून आम्ही ते कुठेही वापरत असू .
माझा मुलगा लहान असताना तो मोटरसायकलला किक मारतानाचा आवाज 'क्डून दुग्दुगदुग्दुग 'असा करून बंद गाडीला किक मारायचा खेळ खेळायचा त्याची आठवण मनोबांचा लेख वाचताना आली . मनोबांच्या आठवणी मजेशीर आहेत .

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आठवणी मस्तच आहेत. मजा आली वाचताना.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझी लेक गाडीवर बसली की "आदतमSSSS...दधतमSSSS..." असे स्वनिर्मित गाणे जोरजोरात सारखे म्हणत असते अगदी शेजारच्या गाडीवरचे लोक आमच्याकडे वळून पाहीपर्यंत!

आणि जशी ती बोलायला लागली आहे तसे हेच गाणे पेटंट आहे.

"आज आपण गाडीवरून भुर्र जायचे का? मग मी ’अदतम’ म्हणेन" - हा आमच्याकडे होणारा नियमित संवाद आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

सर्व वाचक-प्रतिसादकांचे मनःपूर्वक आभार!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

मला ऐसीकरांसारख्या हुच्चभ्रुंची भाषा फार म्हणजे फारच आवडते.
अभाव , कृतक , शष्प हे शब्द हे कित्ती कित्ती भारियेत!
एकतर तुम्ही दोस्तांशी गप्पा मारायला लागल्यावर तसेही अर्ध्याहून अधिक लोकांना ते माहितच नसतात , त्यांनी ते ऐकलेलेच नसतात.
किंवा एकले असलेच तर नेमका अर्थ आठवत नसतो, ठाउक नसतो. किंवा बोलण्याच्या टोन मुळे अर्थ झटकन लागत नाही.
(एक प्रयोग करुन पहा. पत्नीला एकदम जोरात खेकसायचं "ए....ह्य्ह्ये....." अगदि जोर्रात. आणि लागलिच वसकून, ओरडत "काय झकास दिसतेस तू" असं म्हणा.

प्रतिक्षिप्त क्रिया(रिफ्लेक्स अ‍ॅक्शन ) म्हणून समोरची व्यक्ती एक तर बावचळेल किंवा भडकेल. म्हणजेच तुम्ही जे म्हणालात; त्या शब्दांना काहिच अर्थ उरला नाही;निदान त्या क्षणी तरी.
सगळा अर्थ त्या 'टोन' ने हिरावून नेला! )
.
.
म्हणजे शब्द आणि टोन ह्यांना शेप्रेट शेप्रेट , सुटं सुटं करता आलं तर आपल्याला हवं ते वाक्य बनवूनही समोरच्याला पेटवायचं; की आपलं म्हण्णं समजून घ्यायला लावायचं हे ठरवता येतं!
.
.
म्हणजे तुमच्या एखाद्या सहकार्‍याला "तुझ्यात अमुक अमुक स्किलचा अभाव असणं अगदिच आश्चर्यकारक नाही." असं स्थिर, शांत तोनमध्ये म्हणालात ना, तर तोही विचारात पडेल.
पण "बेअक्कल्, माथ्या" असं सरळ म्हणालात तर धावून येइल अंगावर.
.
.
'कृतक' शब्दाचीही तीच गत. हा शब्द वापरला की आपण कैतरी भारी आहोत हे तुम्हाला सिद्ध करता येइल.
एखाद्यानं एखादं नाटकं कीम्वा सिनेमा वगैरे बसवलं, आणि तुम्हाला अभिप्राय विचारल्यावर "भिकार, खोटंखोटं, कैच्याकै" असं म्हणालात तर तुम्हीच ब्यवकूफ असल्याचं सिद्ध होउ शकतं; \
किंवा हाणामारीचा प्रसंग येउ शकतो; ती व्यक्ती नाटकात फारच गुंतलेली असेल तर.
ह्याऐवजी शांतपणे (पण समोरच्याची कीव करत आहोत असा भाव मनात ठेवून)
" नाट्य पुरेसं कसदार नाही. संवाद कृतक वाटले" असं म्हणा. ह्याचा अर्थही बराचसा वरच्यासारखाच आहे.
पण हे ऐकल्यावर समोरचा नवशिक्या असेल तर बिचकून उलट तुम्हाला मार्गदर्शन वगैरे मागायला येइल.
त्याला ते झोंबणार नाहिच; पण उलट तुमची विद्वत्ता आणि ढुढ्ढाचारीपणा सिद्ध होइल!
.
.
शष्प शब्दही काही फार वेगळा नाहिच.
.
.
ते नानावटी नै का ऐसीवर इतकं भारी भारी लिहितात; पण साला त्यांना ऑड्यन्सच नाय.
मिळालाच तर "वा वा. छान लिहिलत हो." "योग्य बोलताय हो" छापाचे प्रतिसाद देणारा.किम्वा "विचारी" मोड मध्ये गेलेला.
रणधुमाळी, शिमगा, बोंबाबोंब अशी ती नाहिच धाग्यावर. प्रतिसादसंख्या वाढणार कशी ?
त्यांनी जिथं जिथं "श्रद्धेस शरण जाणार्‍यात तार्किकतेचा अभाव असतो" सारखी वाक्य दिसतील ती ती काढून
"अक्कल गहाण ठेवणार्‍या भुक्कड भेकड श्रद्धावंताकडून दगड मारत फिरणार्‍या वेड्यासारखीच कामं होणार!" असं म्हणून पहावं.
म्हंजे पहा कस्ली कुस्ती सुरु होइल ते.
बॉलीवूड सिनेमे पहा जरा. एखाद्या गर्दी असणार्‍या क्याफेत किंवा क्यांटिनमध्ये गेल्यावर कसं आधीच बराच गोंगाट वगैरे असतो.
तुम्ही फक्त कुठूनतरी एक अंडं किंवा केक जोर्रात फेकून मारायचा अवकाश;
तेजायला कुणाला काही कळायच्या आत सामूहिक हाणामारी , अनागोंदी सुरु होते.
कुण्णीही कुण्णाच्याही टाळक्यात सापडेल ती वस्तू हाणतं.
तुमचं काम फक्त पहिलं अंडं मारुन सुरक्षित दडून राहण्याचं!
.
.
किम्वा कुठेही क्रुतक-शष्प हे शब्द ठोकून द्यावेसे वाटतात.
कृतक त्या "मृत" सारखा वाटतो.
म्हणजे "मृतशरीराचे शवविच्छेदन " ऐवजी "कृतक शरीराचे शवविच्छेदन" म्हटलं तरी चालून जावं. जडबोजड शब्द. कुण्णाला तसाही समजणार नै.
.
.
तापवल्यानंतर "पाण्याचे (बाष्प नव्हे!)शष्प होते" हे ही वाक्य चालून जावं. लोकं माना डोलावतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हाहाहा. Smile
काय बोललात यापेक्षा कसं बोललात हे महत्त्वाचं आहे मनोबा.
मस्त आहे मुक्तक Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खिक्! सहिये!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

फारच आवडलं.काही उचापत्या मात्र त्रासदायक होतात.एक आठवतीये.आठवीत असताना तोंडात बोट घालून कडकडीत शिट्टी मारायच्या खटपटीत एकदाचं जमलं .शिट्टयावर शिट्ट्या मारल्या दहाएक मिनिटे दुपारी।जरावेळाने वरच्या मजल्यावरचा अय्यर माणूस फारच केविलवाणा चेहरा करून विनवणी करून म्हणाला "काइकू सीट्टी मारताय----- सोया था।" मुलाने नंतर सांगितलं बाप तीन दीनसे सोया नइ आज दुपेरको सोया ता। तो असीडटी होऊ नये म्हणून खूप सोडा प्यायचा. तो शेवटी निद्रानाशानेच गेला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आम्ही दहावीत असताना जीवशास्त्रात "बायोनॉमियल नॉमेन्क्लेचर" असा काहीसा प्रकार होता ज्यात वनस्पती किंवा प्राण्यांची ल्याटीन किंवा रश्यन नावं असायची उदा. अमरवेल= कस्कटा
चंदन= स्यांटामम अल्बम .... वगैरे

त्याचं खूळ डोक्यात घेऊन आम्ही कोणत्याही वस्तूला कोणतंही नाव देत असू

त्यात किरण्यानं "पुरूषोत्तम" ला "पिंग्नॉमियाँ-पोंग्नॉटा" म्हणून कळस केला होता....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0