उद्धटपणावर इलाज

व्यवस्थापकः सदर धागा दोनदा प्रकाशित झाल्याने हा धागा वाचनमात्र करत आहोत. याच धाग्याची प्रतिसादयोग्य प्रत इथे वाचता येईल

अनेक कुटुंबात घरातील लहान मुले, टीनेजर्स, तरूण मुलेमुली ही काहीवेळा विचित्र वागतात...आईवडीलांचे ऐकत नाहीत, व्यसनाधिनतेकडे वाटचाल सुरु होते किंवा घरातलं वागणं विचित्र बनतं, उध्दटपणे उत्तरे देतात तेव्हा पालकांनी भगवतगीतेतील पुढील मंत्राचा उपयोग करुन पहावा...काही काळातच फरक नक्की दिसुन येईल ( उत्तम संस्कार,सुसंवाद आणि शिस्त यांच्या जोडीने हा प्रयोगही अवश्य करुन पहा)

१) दिलेल्या मंत्राचा जप संबंधित मुलामुलींनी स्वत: रोज किमान ११ वेळा जप करणे योग्य असेल. रोज सकाळी आंघोळीनंतर मंत्राचा जप पूर्वाभिमुख बसुन श्रध्देसहित ११ वेळा करावा आणि भगवान श्रीकृष्णांचे स्मरण करावे
२) मुलगा किंवा मुलगी हा मंत्रजप करायला तयार नसतील तर आईवडील किंवा पालकांनी मुलांच्या नावे संकल्प करुन "माझा मुलगा/मुलगी चि.XXX याला उत्तम बुध्दीप्राप्ती होऊन, त्याची/तिची सन्मार्गाकडे वाटचाल सुरु व्हावी, त्याला/तिला सदबुध्दी प्राप्त होऊन, वाईट/अशुभ/असंस्कृतिक/अनैतिक गोष्टींपासुन त्याचे संरक्षण व्हावे" असा संकल्प करुन रोज सकाळी आंघोळीनंतर ११ पेक्षा अधिक म्हणजे ३३ किंवा १०८ वेळा या मंत्राचा जप मनापासुन करावा व भगवान श्रीकृष्णांचे स्मरण प्रार्थना करावी.

३) या मंत्र सुवाच्च अक्षरात नीट लिहुन मुलांच्या अभ्यासिकेत किंवा जिथे त्यांची नजर जाईल अशा कुठल्याही ठिकाणी/भिंतीवर लॅमिनेशन करुन/फोटोफ्रेम करुन लावावा. जेणेकरुन त्या मंत्रावर लक्ष जाऊन आपोआप वाचन होऊ शकेल

मंत्र:- ॥ नष्टो मोह: स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान्मयाच्युत ।
स्थितोsस्मि गतसन्देह: करिष्ये वचनं तव ॥ (अध्याय १८, श्लोक ७३)

( अर्थ:- हे अच्युत (भगवान श्रीकृष्ण) तुमच्या कृपेने माझा मोह नष्ट झालेला असुन मला उत्तम, सत्य अशी स्मृती प्राप्त झालेली आहे. मी संदेहरहित होऊन तुमच्या आज्ञेचे पालन करेन )

** . या मंत्राने विवेकजागृती होऊन, मुले सन्मार्गाकडे वळतात. बुध्दी-ज्ञान-स्मरणशक्तीतही वाढ होते. स्वभाव बदलतो, स्वभावातील अहंकार,माज,मुढता,अविवेक, उध्दटपणा हळुहळु नष्ट होऊ लागतो. मंत्रशक्तिवर ज्यांची पुर्ण निष्ठा आहे, त्यांनी संपुर्ण श्रध्देसहित भगवान श्रीकृष्णांना शरण जाऊन या मंत्राची उपासना करावी आणि फरक पड्ताळुन पहावा ही विनंती**

(((जपसंख्येच्या पेक्षा जास्त कितीही जप केला तरी चालेल. अधिकस्य अधिकं फलं या उक्तिनुसार जप जास्त करायला हरकत नाही)))

**लोककल्याणार्थ ही पोस्ट माझ्या नावासहित शेअर करावी ही नम्र विनंती***

-सचिन मधुकर परांजपे (पालघर)
ज्योतिष-भाग्यरत्न मार्गदर्शक

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet