विकिवरील वैश्विक भाषा सुविधा, महत्व आणि मराठीचे आणि भारतीय भाषा टायपिंग

गुजराथी समाज सुद्धा सगळ्या जगाशी व्यापार करतो पण आपल्या भाषेचा आब ठेऊन व्यवहार करतो म्हणूनच इकॉनॉमीक टाइम्स सारख वृत्तपत्र गुजराथीतून छापल आणि वाचलही जात. जागतिक व्यापार व्यवहारावर इंग्रजीचा प्रभाव असला तरी तो केवळ इंग्रजीतून न होता अनेक भाषातून होतो. वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनच्या पुढाकाराने आंतरराष्ट्रीय व्यापार मुक्त होण्याची प्रक्रीया गतीमान होताना अगदी ग्रामिण भागातील शेतकरीही आंतरराष्ट्रीय व्यापार व्यवहारांनी प्रभावित होऊ लागला आहे. आंतरराष्ट्रीय व्यवहार, माहिती, संवाद, शिक्षण या आपापल्या भाषेतून समान संधी भांडवल प्रभावी जगात प्रत्येक गोष्टीत शिक्षण शेती सर्व काही कर्जाधारीत होताना, इतर भाषातून संवाद साधणही ठिक पण आपली बुद्धी इतर भाषातून आलेल्या प्रभावांनी गहाण ठेवणे नव्या विषमतांना जन्म देणारे ठरू शकते.

एकीकडे लोकभाषांच्या वापरावर संकट वाढताना फेसबुक, गूगल सारख्या संवाद माध्यमांनी त्यांच्या आर्थीक गरजे पोटी तर विकिपीडिया सारख्या माध्यमाने ज्ञान विषयक संवाद वाढवण्याच्या हेतूने लोकभाषांच्या वापरा साठी अधिक चांगल्या संधी उपलब्ध करून दिल्याचे दिसून येते.

मला जपानी भाषा येत नसली तरीही जपानी विक्शनरी शब्दकोशाचा मेनू मराठीतून करून मी जपानी शब्दकोशात एक एक मराठी शब्द भरू शकेन अशी सुविधा आज प्राप्त होत आहे. अशा आंतरभाषिक सहकार्याने भविष्यात ज्ञान विषयक देवाण घेवाण वाढवता येऊ शकते. मला एखादी नवीन भाषा विकिप्रकल्पांच्या साहाय्याने शिकावयाची असल्यास ते अधिकाधीक सोपे होऊ लागले आहे. वेगवेगळ्या भाषातून परस्पर अनुवाद करणेही अधिक सोपे होऊ लागले आहे.

अर्थात कोणतीही संधी त्याकडे पाठ न फिरवता सहभागी झाल्यासच साधता येते. या लेखात आपण विकिप्रकल्पांवर उपलब्ध युनिव्हर्सल लँग्वेज सलेक्टरचा परिचय करून घेणार आहोत.

पहिली गोष्ट सर्व विकि प्रकल्पांमध्ये आपल्याला आपली मराठी लिहिण्यासाठी निवडता येऊ शकते मुख्यत्वे विकिबुक्स, विक्शनरी, विकिमीडिया कॉमन्स इत्यादी अनेक भाषी प्रकल्पातून वापरण्यासाठी अशी सुविधा वैश्विक पणे वापरणे सोईचे जाऊ शकते. गणपती विषयावर जर्मन विकिपीडियावरील लेखात गणपती हा शब्द देवनागरीत कसा लिहिला जातो हे दाखवायचे असल्यास तो दुसरीकडून कॉपी पेस्ट करण्याची आवश्यकता नाही. जर्मन विकिपीडियात देवनागरी:गणपती असे तिथल्या तिथे मराठी निवडून आपण करू शकु. आम्हाला मराठी विकिपीडियावरच मराठी कसे लिहावयाचे माहित नाही इतर प्रकल्प दूर राहीले, असाही विचार मनात येणे शक्य आहे तेव्हा अर्थातच हि सुविधा मराठी विकिपीडिया, मराठी विक्शनरी शब्दकोश, विकिबुक्स, विकिस्रोत इत्यादी मराठी प्रकल्पातूनही मराठीच्या टायपींगच्या साठी वापरता येईलच.
...
...

दुसर्‍या बाजूला संगणक आणि इंटरनेटवर मराठी टायपिंग येणाराही वर्ग आहे, मराठी टायपींग येते म्हणून न येणार्‍यांच्या समस्या कुणाला क्षुल्लक अथवा दुर्लक्षणीय वाटत असतील, किंवा आजच्या काळात ही समस्या शील्लकच नाही आणि हा लेख प्रपंच कशासाठी असेही वाटण्याची संभावना आहे. या संदर्भाने काही तथ्यांचा उल्लेख करणे श्रेयस्कर ठरेल. उदाहरणार्थ हा लेख लिहिताना मराठी विकिपीडियावर नवीनतम ५०० नवीन सदस्यांची नोंदणी तपासली ८ जुलै ते हा लेख लिहिताना २७ जुलै या कालावधीत झालेल्या या ५०० नोंदणीत केवळ १० म्हणजे २% लोकांनी त्यांचे सदस्य खाते मराठी टायपिंग वापरून उघडले आहे. म्हणजे ९८ टक्क्यांपर्यंत आम्ही मराठी टायपिंग पोहोचवणे शिल्लक रहात आहे असा याचा अर्थ होतो. अशीच अजूनही आकडेवारी देता येईल पण येथे मुख्य अधोरेखीत करावयाचा मुख्य मुद्दा ज्यांना संगणकावर मराठी टायपींग येते ते त्यांनी न येणार्‍यांपर्यंत पोहोचवण्याचे मोठे दायीत्व अद्यापही बाकी आहे. असो.


...

...

...

...
...
ज्यांना इनस्क्रिप्ट पद्धतीच टायपिंग येत असत पण संगणकावर कस चालू कराव माहित नसेल अथवा ऑफीसच्या/बाहेरच्या संगणकावर चालू करण काही कारणानी शक्य नसल तरीही विकिवरील टंकलेखनासाठी वरील पद्धतीने अक्षरांतरण एवजी 'मराठी लिपी' पर्याय निवडल्यास संगणकात काही बदल न करताही तुम्हाला इनस्क्रिप्ट टायपिंग वापरता येते.

अर्थात इनस्क्रिप्ट प्रमाणे कळफलक लक्षात ठेवण्याची आवश्यकता नसल्यामुळे अक्षरांतरण पद्धती अधीक लोकप्रीय आहे. अक्षरांतरण मध्ये टाईप करा/Type (मिळेल/get): marathi (मरथि), marAthee/maraaThee (मराठी),mahaaraaShTra (महाराष्ट्र), Jnaaneshvara (ज्ञानेश्वर), teMDUlkara (तेंडूलकर) KShaNaardha (क्षणार्ध) pravaasa (प्रवास) pRthvee (पृथ्वी) • rrya ऱ्य, rrha ऱ्ह, E अ‍ॅ, O ऑ."

द्रुपल आधारीत मिपा ऐसी अक्षरे इत्यादी मराठी संकेतस्थळांप्रमाणे मराठी विकिपीडियाचा अक्षरांतरण कळफलकह गमभन कळफलकाशी काही तुरळक फरक सोडले तर जवळपास मिळता जुळताच आहे. ज्ञ,ऱ्य,र्‍ह अक्षरांचे लेखन जरासे वेगळे केले जाते. ऱ्य Ry विकिपिडिया=rrya र्‍ह Rh विकिपिडिया=rrha. विकिंवर वेगळ्या प्रकारे होणार लेखन सुद्धा बर्‍याचदा करून दाखवाव लागू शकत मुख्यत्वे त्यामुळे काही फरक पडत असावा काही फरका साठी प्रमाणीकरणाची गरज अजून शिल्लक असल्यामुळेही असतील. या कळफलक प्रमाणी करणाच्या प्रमाणीकरणास गती आणि प्रात्यक्षीकावर आधारीत पाठबळ मिळण्यासाठी अधीक परिणामकारक कोणते हे शोधण्या साठी टायपींग स्पर्धा घेणे आणि अभ्यासपूर्ण व्यापक सहमती साधणे गरजेचे आहे.

इतर भाषी विकिंसोबत हिंदी अथवा संस्कृत विकिपीडियातही तुम्ही मराठी मेनू वापरत वावरू शकता. एवढच नाही अहिराणी बोलीभाषिक मंडळींना इतर विकिपीडियांसोबतच मराठी विकिपीडियावरही अहिराणी बोलीतील मेनू वापरता येऊ शकेल. पण त्यापुर्वी येथे जाऊन मेनू संदेशांची अहिराणीत अनुवाद करावे लागतील. हे अनुवाद करताना संदर्भासाठी त्यांना मराठी गुजराथी हिंदी संस्कृत सर्व अनुवादांचे संदर्भ सहज पाहता येतील पण सरते शेवटी संधी सहभागी होणार्‍यांनाच उपलब्ध होतात; कुणी अहिराणी बोली भाषक वाचतोय का हे ?
...
...
...

मराठी टायपींगचे सर्व पर्याय पहाण्यासाठी खालील ऑनलाईन सादरीकरण सुद्धा उपलब्ध आहे.

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

माहितीपूर्ण लेख.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.