आंतरजालावरील मराठी माणसांची शैक्षणिक पार्श्वभूमी आणि सहभागाचे स्वरूप कसे आहे ?
आंतरजालावरील मराठी माणसांची शैक्षणिक पार्श्वभूमी आणि आंतरजालावरील एकुण आणि विशेषतः मराठी आंतरजालावरील सहभाग हे समजून घेण्याचा प्रयत्न करण हा या चर्चा प्रस्तावाचा मुख्य उद्देश्य आहे. हे का समजून घेऊ इच्छितो आहे या मागे काही कारणे आहेत पहिल, मराठी संकेतस्थळांच्या माध्यमातून जे काही शैक्षणिक,सामाजिक आणि सांस्कृतिक योगदान होतय त्या मागे सहभागी लोकांच्या कोणत्या शैक्षणिक पार्श्वभूमींनी अधिक प्रभावी राहील्या आहेत, जर विशीष्ट शैक्षणिक पार्श्वभूमी अधिक प्रभावी असतील तर ते प्रभाव नेमके कोणते.
दोन, जे मराठी लोक आंतरजालावर आहेत पण मराठी संकेतस्थळांवर अनुपस्थीत आहेत त्यात शैक्षणिक पार्श्वभूमीनुसार फरक पडतो का पडत असेल तर नेमका का आणि कशा स्वरूपाचा. मराठी संकेतस्थळांवर जे शैक्षणिक पार्श्वभूमीचे गट मागे आहेत त्यांचा अधिक सहभाग मिळवता येऊ शकतो का आणी कशा पद्धतीने.
१९९८ च्या आसपास माझा आंतरजालाशी परिचय नीट व्हावयास लागला असावा, २००१ पासून वावर वाढला यात मी काही इमेल लीस्ट (ग्रूप) चालवले आणि तेव्हाच्या शैक्षणिक कॉम्पोझीशन मध्ये अभियांत्रिकी, तंत्रज्ञान, विज्ञान या शाखातून येणार्या तरूणांची भरमाढ होती तर कला शाखेची पार्श्वभूमीची मंडळी सर्वात कमी असावीत. आज मला वाटत ही परिस्थिती खूप बदललेली आहे सर्वच शैक्षणिक पार्श्वभूमीचे मराठी लोक आंतरजालाशी जोडले गेले आहेत. सर्वच शैक्षणिक पार्श्वभूमीचे लोक आज ज्या प्रमाणावर (प्रोपोर्शन) मराठी संकेत स्थळ बाह्य आंतरजालावर आहेत त्याच प्रमाणात मराठी संकेत स्थळावर आहेत अस म्हणता येऊ शकत का ? माझा उद्देश कमी शिकलेले आणि जास्त शिकलेले असा फरक करण्याचा नाहीए. उदाहरणार्थ मराठी पत्रकार आहेत, त्यांना मराठी टायपींग येत, मराठी संकेतस्थळांच्या अस्तीत्वाची जाणीव असते (बरेच जण बाहेरून प्रोत्साहनाची/पाठींब्याची बाहेर उभे टाकून भूमीका बाळगून असतात), पण ज्या प्रमाणात ते त्यांच्या ब्लॉग्स मध्ये आणि फेसबूकवर सापडतात त्या प्रमाणात मराठी संकेतस्थळांवर आढळत नसावेत असा कयास आहे. अस का ? हा एक प्रश्न नेहमी पडतो. विवीध बॅकग्राऊंडची प्राध्यापक मंडळी हल्ली मराठी ब्लॉग्स आणि फेसबूकवर आढळून येतात त्याच्या कमी अधिक प्रोपोर्शन मध्येही मराठी संकेतस्थळांवर आढळतात किंवा कसे या बद्दल मी साशंक आहे या अनुपस्थिती मागची कारण काय असावीत असे आपल्याला वाटते.
अभियांत्रिकी नंतर बाकी विज्ञानशांखांची मंडळी ग्रूप्स आर्कूट या प्रकारातून आढळतात त्या प्रमाणात मराठी संकेत स्थळांवर आहेत का ? मी येथे मराठी संकेतस्थळे म्हणताना मुख्यत्वे माबो,मनोगत,मिपा,उपक्रम,ऐसी अक्षरे या गटातील संवाद सुविधा देणार्या मराठी संकेतस्थळांचा विचार करतो आहे. विज्ञान शाखेतील अजून एक महत्वपूर्ण शाखा अॅग्रीकल्चर आणि अॅनिमल हस्बंडरी या शाखेतील विद्यार्थ्यांची संख्या मोठी असते यातील मोठा वर्ग कारकिर्दीच्या सुरवातीस सरकारी स्पर्धा परिक्षांमध्ये व्यस्त असावा हे ही समजता येऊ शकत पण हे आणि इतर शासकीय सेवांमध्ये जाणारा नवतरूण वर्ग आंतरजालाशी व्यवस्थीत परिचीत आहे. किमान शासकीय सेवेत रुजू झाल्या नंतर त्यांच्या कडे आंतरजालावर सहभागी होण्यासाठी वेळ बर्या पैकी उपलब्ध होत असावा पण अजूनही आंतरजालावर त्यांची उपस्थिती कितपत भरीव आहे आणि मराठी संकेतस्थळांवर किती आहे या बाबत साशंकता वाटते या मागची कारण जाणून घ्यायला आवडेल. मग वकील वगैरे आणि इतरही तंत्र आणि विज्ञान सोडून च्या शांखा आणि व्यवसायातील लोकांचा मराठी संकेतस्थळावरील सहभाग प्रमाण आणि तो कमी असेल तर का आणि तो कसा वाढवता येईल. इत्यादी
तीन, अभियांत्रिकी, तंत्र, वैद्यक, विज्ञान इत्यादी क्षेत्रातून शिक्षण झालेल्या मंडळींच शालेय शीक्षनात सर्वच विषयांच थोड शिक्षण झाल असल तरी महाविद्यालयीन जीवनातील काळ(वेळ) स्वतःच्या अभ्यासांच्या मुख्य विषयात गुंतला जात असणार साधारणतः पोस्ट ग्रॅजूएशन अथवा नौकरीत जरास स्थैर्य मिळाल की व्यवस्थापन वाणीज्य समाजशास्त्रे कला या विषयांना अधिक वेळ देता येत असेल या दृष्टीने त्यांच्या इतर क्षेत्रातील एक्सपोजरच स्वरूपाचा त्यांच्या (मराठी) आंतरजालीय (वैचारीक) सहभागातून काही प्रभाव विशीष्ट पद्धतीने पडतात असे वाटते का ? अभियांत्रिकी, तंत्र, वैद्यक, विज्ञान ता क्षेत्रातून येणारी आणि या क्षेत्रां शिवाय इतर क्षेत्रातून येणारी मंडळी एकमेकांच्या भूमीकात काही साम्य आणि फरक पाहतात का ? पाहत असतील तर आपल्या मते ते साम्य आणि भेद कोणते ?
चार, महाराष्ट्रीय शैक्षणिक जीवनात विद्यार्थ्यांमध्ये वैचारीक प्रगल्भता विकसीत व्हावी इत्यादी उद्देह्शांनी स्कॉलरशीप, बुद्धीमत्ता चाचण्यांचे प्रकार,विज्ञान, अल्जेब्रा आणि भूमिती, सामान्य ज्ञान, तर्कशास्त्र असे प्रकारही मोठ्या प्रमाणावर जोडले जातात बर्याच लोकांना यातील काही गोष्टी सोप्या काही कठीण अथवा सहभागच न घेतल्याने दूर राहीले असणार हे स्वाभाविक आहे. पण या शैक्षणिक एक्सपोजर असण्याचा आणि नसण्याचा दैंनंदीन व्यवहारात तसेच मुख्य म्हणजे आंतरजालीय संवादात भूमीका मांडताना काही प्रभाव जाणवतात का ?
मी विशीष्ट प्रश्न दिले असले तरी चर्चा तेवढ्या पुरती मर्यादीत नव्हे तर वर व्यापक होण्यासाठी वरील प्रश्नांची चौकट तोडून झाली तरीही स्वागतच आहे.
माझे उपरोक्त बरेच प्रश्नांना सर्वेक्षणाची जोड नसल्याने नेमक्या आकडेवारी शिवाय आहेत त्या मुळे ह्या चर्चेत आपापल्या अनुभव आणि ऑब्झर्वेशन नुसार चर्चा होणार हे स्वाभाविक आहे. कौल सुविधा ऐसीवर उपलब्ध आहे पण अद्याप अशा विषयावर निष्कर्ष काढण्या इतपत मतदान होत नाही पण शैक्षणिक पार्श्वभूमींच्या बाबत भविष्यात कौल लावावयाचे झाल्यास कौलात कोण कोणते पर्याय द्यावेत.
(माझ्या मुद्यांबाबत कुठे स्पष्टीकरण हवे असे होऊ शकते. उत्तरे देण्याचा प्रयत्न नक्की करेन पण जरासा व्यस्त राहणार असल्याने माझ्या स्वतःच्या चर्चा सहभाग आणि प्रतिसादांना उशीर होण्याची शक्यता आहे पण माझी उपस्थिती कमी असतानाही काही छान चर्चा होईल असा विश्वास आहे. आपल्या सर्वांच्या चर्चा सहभाग आणि प्रतिसादांसाठी धन्यवाद)
हम्म मला वाटते ऐसीच्या कौल
हम्म मला वाटते ऐसीच्या कौल पेक्षा गूगल स्प्रेडशीटचाचा फॉर्म वापरून हे काम अधिक चांगले होऊ शकेल. कौल पानावरूनच गूगल फॉर्म एंबेड करता येईल असे वाटते. विदा बद्दल अजून कुणाच्या काही सूचना असल्यास जरूर कळवाव्यात. मराठी विकिपीडियावरून काही विदा सध्या प्राप्त होते परंतुवापरकर्त्यांच्या बद्दलच्या मराठी विकिपीडियाच्या आणि इतर मराठी संकेतस्थळांच्या विदांमध्ये फरक पडतो असा अनुभव आहे.
प्रतिसादासाठी धन्यवाद
सॉरी मी प्रतिसाद लौकर
सॉरी मी प्रतिसाद लौकर दिल्याने पुन्हा संपादीत करता येत नाहीए का ? पण एनी वे हेंडींग्स जरूर सुचवावीत गरजेचे आह असे मलाही वाटते. मी काही सामाजिक अंगाने अल्प अॅनालिसीस मिपावर केले आहे त्यात मराठी संकेतस्थळांची अलेक्सा आकडेवारीच्या आधारावर तुलना केलेली आहे त्याचा दुवा आपणास स्वडीने शोधून देईन. (आपल्या उद्देश्याला बहुधा ते पुरेसे व्हावे) खरे म्हणजे माझ्या या धागा मालिकेत नजीकच्या काळात (आधीच्या माझ्या मिपा लेखनाचा आधार घेऊन) कदाचित एखादा लेख सामाजिक विषयाचा अप्रत्यक्ष टच करेल असा अंदाज आहे.
ऑफेन्सिव वाटू शकते हे खरे;
ऑफेन्सिव वाटू शकते हे खरे; प्राथमिक विश्लेषणा पुरते आर्थिक शहरी ग्रामिण धर्म इतर अंदाज अप्रत्यक्षपणे येत असतातच (काही स्रोत मला उघड करता येत नाहीत, पण मला बर्या पैकी अंदाजा येतो) त्याचा आणि अलेक्सा रेटींगचा आधार घेत मिपावर अप्रत्यक्ष विश्लेषणाने काही उपयूक्त मुद्दे मिपा नोंदवलेले आहेतच. सर्वेक्षणांचे यश डायरेक्ट पेक्षा इनडायरेक्ट क्वश्चनिंगवरही बरेचसे अवलंबून असते त्या मुळे प्रश्न त्याच शब्दात न विचारता पुरेशी योग्य माहिती मिळाली आणि विश्लेषण करता आले म्हणजे झाले. मराठी संकेतस्थळे सर्वसमावेशक सहभागाची करण्याचे सर्वांना रुचतील असे मार्ग शोधता यावेत यासाठी ढोबळ विश्लेषण करावयाचे आहे आपल्याला खूपच बिनचूक माहिती असली पाहिजे असे नाही.
आपल्या प्रतिसादासाठी धन्यवाद
मराठी संकेतस्थळांवर अभियंते
मराठी संकेतस्थळांवर अभियंते डॉक्टर्स व्यवस्थापन ई ई क्षेत्रातील पांढरपेशी व्हाईट कॉलर मंडळी आहेत ,मराठी आंतरजालाच्या स्थापनेत व ती चालवण्यात प्रामुख्याने परदेशस्थ वा महाराष्ट्राबाहेरच्या लोकांचा व्हेस्टेड इंटरेस्ट आहे, त्यामुळे या लोकांची जी शैक्षणिक प्रार्श्वभूमी आहे तशी वा त्यासदृश्य शिकलेले लोकच इथे दिसणार/ दिसतात.जेव्हा मराठी आंतरजालाचा केंद्रबिंदू महाराष्ट्रात येईल तेव्हा बराच फरक पडेल.
आपल्या संस्कृतीपासून,
आपल्या संस्कृतीपासून, मातीपासून, भाषेपासून, लोकांपासून दूर असल्याचं शल्य असतं. या लोकांची दोन जगं असतात नि पैकी एक जग त्यांच्यापासून प्रचंडच दुरावलेलं असतं. त्या दुरावलेल्या जगातलं बरंच काही ते मिस करत असतात. पण ते तसं आहे हे जाहीर सांगता येत नाही. सांगू नये असा नागरी संकेत आहे. मग एक चर्चास्थळ स्थापून वा त्याचे सदस्य बनून जीवनातल्या या उणिवेची आपूर्ती करायची हा अंतस्थ हेतू असू शकतो. म्हणजे व्हेस्टेड शब्दाला अधिकृतरित्या कोणती निगेटेव टिंज नाही. तसंच या हेतूला देखिल नाही. चार दिवसासाठी विदेशात गेलेला भारतीय मनुष्य फार 'चार्जड' असतो, म्हणजे तो तिथलं सगळं चांगलंच पाहायला गेलेला असतो नि तसंच त्याला सगळं दिसतं. हा चार्ज उतरतो तेव्हा आपल्या देशात काय काय चांगलं आहे याची एक यादी अंतर्मनात आपसूकच बनू लागते.
----------------------------------
शहरात नविन आलेली पिढी गावाच्या आठवणींत रमणे नि एन आर आय लोक भारताच्या आठवणींत रमणे यात तत्त्वतः फारसा फरक नसावा.
आपल्या संस्कृतीपासून,
आपल्या संस्कृतीपासून, मातीपासून, भाषेपासून, लोकांपासून दूर असल्याचं शल्य असतं. या लोकांची दोन जगं असतात नि पैकी एक जग त्यांच्यापासून प्रचंडच दुरावलेलं असतं. त्या दुरावलेल्या जगातलं बरंच काही ते मिस करत असतात. पण ते तसं आहे हे जाहीर सांगता येत नाही. सांगू नये असा नागरी संकेत आहे. मग एक चर्चास्थळ स्थापून वा त्याचे सदस्य बनून जीवनातल्या या उणिवेची आपूर्ती करायची हा अंतस्थ हेतू असू शकतो. म्हणजे व्हेस्टेड शब्दाला अधिकृतरित्या कोणती निगेटेव टिंज नाही. तसंच या हेतूला देखिल नाही. चार दिवसासाठी विदेशात गेलेला भारतीय मनुष्य फार 'चार्जड' असतो, म्हणजे तो तिथलं सगळं चांगलंच पाहायला गेलेला असतो नि तसंच त्याला सगळं दिसतं. हा चार्ज उतरतो तेव्हा आपल्या देशात काय काय चांगलं आहे याची एक यादी अंतर्मनात आपसूकच बनू लागते.
निळा आणि हिरवा हे दोन वेगळे परिच्छेद अपेक्षित होते का? दोन मुद्दे वेगवेगळे वाटताहेत.
---
प्रतिसादाशी सहमत आहे. व्हेस्टेड इंट्रेस्ट शब्दाला हिणकस छटा नाही याकडे ग्रेटथिंकर यांनीही निर्देश केला आहे.
निळा आणि हिरवा हे दोन वेगळे
निळा आणि हिरवा हे दोन वेगळे परिच्छेद अपेक्षित होते का? दोन मुद्दे वेगवेगळे वाटताहेत.
असं म्हणता येईल. मला असं म्हणायचं होतं कि देशांतर करणे हा एक मोठा निर्णय असतो. त्याचं माणसाने मनात बरंच समर्थन केलेलं असतं. क्वचितप्रसंगी काहींचा विरोध हाताळताना बरेच मुद्दे मांडलेले असतात. ही मनोवस्था चार दिवस पर्यटनासाठी जाणार्या माणसासारखीच असते. भारतातून फ्रान्सला जाणारा पर्यटक खूप 'उत्साहित' असतो. त्याचा उत्साह परत येईपर्यंत कायमच असतो. तिथलं सगळं काही कसं खूप चांगलं आहे याचा चार्ज शेवटपर्यंत उतरत नाही. सर्व साधारणपणे "पर्याय, इ असेल तर तुम्ही तिथे कायमचे राहाल काय?" याला त्याचे उत्तर जवळजवळ "निश्चितच" अश्या प्रकारचे असते. हा चार्ज कायमचे जाण्याचा निर्णय घेतला जाण्याच्या वेळी देखिल तितकाच असतो. पण कालांतराने ओसरतो. आणि ते भारताशी कनेक्ट करण्याचा प्रयत्न करू लागतात. ते भारतात वैगेरे येतात तेव्हा जाम खूष असतात.
पण एक लॉट उलटा देखिल आहे. ते अगदी कॉलेजात असतानापासून मनाने अमेरिकेतच, इ होते. त्यांना अमेरिकेचे, इ नागरीकत्व मिळाल्यावर "फिलिंग सो प्राउड" इ वाटते. नि जसा एक पाश्चिमात्य भारताला मागास मानतो तसे ते देखिल मानू लागतात, तुच्छ मानू लागतात. म्हणजे भारत निर्विवादपणे मागास आहे पण आपुलकीमुळे लोक तसं मानत नाहीत असं यांच्याबाबतीत होत नाही. त्यांचे भारतात 'मागे राहिलेलंले' लोक हे अपात्र वा दुर्दैवी आहेत याच्या थोडंफार जवळ जाणारं मत त्यांचं असतं.
कामाच्या ठिकाणी असलेला रिकामा
कामाच्या ठिकाणी असलेला रिकामा वेळ हा जालावरच्या सहभागाचा डिटर्मिनंट आहे. म्हणूनच नेहमी संकेतस्थळावर "पडीक असतात" असे वाटणारे सदस्य अधून मधून व्यस्त होऊन दिसेनासे (सहभाग घेईनासे होतात).
आयटी सेक्टरमधील कामाच्या स्वरूपामुळे प्रत्येकजण संगणकावर काम करतो + इंटरनेट कनेक्शन कायम उपलब्ध असते म्हणून त्यांचा सहभाग जास्त दिसतो.
जे लोक संगणकाखेरीज इतर प्रकारे कागद-पेन-टेबल स्वरूपात काम करतात त्यांचा जालसहभाग फावल्या वेळात होणार हे उघड आहे. जरी मोबाइलवर आजकाल फेसबुक/व्हॉट्स-अॅप उपलब्ध असले तरी संगणकावर काम करणार्याला जसे अल्ट-टॅब करून कामाची खिडकी आणि संकेतस्थळाची खिडकी टॉगल करता येते तसे त्या लोकांना जमणार नाही.
मुळात आंतरजालावर सक्रिय
मुळात आंतरजालावर सक्रिय असणारे भारतीय किती असतील? (एक बेक्कार अनुमान म्हणजे ४%) त्यातले मराठी किती असतील?
ह्या अनुषंगाने एक विचार करता येईल
दुसरा, की मोबाईलवर आंजा आल्यामुळे चिक्कार नवे आणि अपरिचित लोकही आंजाकडे वळले असणारेत. तेव्हा त्यांचा समावेशही हळूहळू वाढेल.
सध्यापुरता नव्या आंजाकरांचा वावर फेसबुक आणि तत्सम लोकप्रिय ठिकाणीच असेल, पण नंतर तो वाढून मराठी संस्थळांवरही येईल, असं वाटतं.
विदा मागवा.
१.वय-
२. लिंग-
३.माध्यमिक शिक्षणाचे माध्यम-
४.शिक्षण शाखा-
५.सध्याचा व्यवसाय-
६.आंजा माध्यम संगणक/मोबाईल-
७.घरातून /कामाच्या ठिकाणाहून्-
८.स्वखर्चाने- ऑफिसखर्चाने.