पर्सनल फायनान्स - भाग ३ - नवी नोकरी
या आधीच्या भागांचा प्रतिसाद बघून उत्साह वाढला आहे, त्याबद्दल सर्वांना धन्यवाद. मी काही एक्पर्ट लेखक नाही, पण माझा प्रयत्न तुम्ही समजून घ्याल अशी आशा आहे. ऋषिकेशने सांगितल्याप्रमाणे जरा वेगळ्या विषयाने सुरुवात करू.
आपली आर्थिक परिस्थिती सुधारण्याचा उपाय म्हणजे खर्च भागवून पॉझिटिव्ह शिल्लक उरवणे आणि मग त्याची योग्य गुंतवणूक करून स्वतःची पुंजी वाढवणे. आता पॉझिटिव्ह शिल्लक उरवायची तर त्याचा उपाय पण एकच. उत्पन्न वाढवणे किंवा खर्च कमी करणे. (Ideally ह्या दोन्ही गोष्टी जमल्या तर सोन्याहून पिवळे).
बहुतेक जणांचा उत्पन्नाचा सोर्स म्हणजे नोकरी करून मिळणारा पगार. या भागात बघुया सर्वांच्या जिव्हाळयाचा विषय. नवी नोकरी आणि ती घेताना काय-काय बघायचे?
सगळ्यात महत्वाचे म्हणजे तुम्ही काय शिकलात, तिथूनच सुरुवात होते. Managing your career is like investing - the degree of difficulty does not count. So you can save yourself money and pain by getting on the right train.
कॉलेजमधून नुकताच पास होऊन पहिलीच नोकरी बघणार्याला काही फार चॉईस नसतो. मिळेल ती पहिली नोकरी पकडून, अनुभव घ्यायला सुरुवात करायची हे त्याचे/तिचे एकमेव उद्दीष्ट असते. पण एकदा थोडा अनुभव आला, की आपली बाजारातली किंमत काय आहे, ते जाणून घ्यावे. यासाठी आंतरजालावर अनेक ठिकाणी माहिती मिळू शकते. (उदा: salary.com, payscale.com) दुसरा उपाय म्हणजे नवीन नोकरीची गरज नसली, तरी अधून-मधून डमी इंटरव्यूला जायचे. कधी-कधी याचा फायदा होऊन चांगली संधी मिळू शकते. अगदीच काही नाही तर काय प्रश्न विचारतात ते कळते, कम्युनिकेशन स्किल सुधारते आणि नवीन ओळखी पण होतात. तुम्हाला एखादी कंपनी आवडली तर त्या कंपनीच्या वेबसाईटवर नजर ठेवता येते.
एखाद्या कंपनीचा जॉब आवडला, तर आधी त्या कंपनीची माहिती करून घेणे गरजेचे आहे. ती जर पब्लिक कंपनी असेल तर फारच छान, कारण त्याची स्टॉक किंमत आणि कंपनी फायनान्शियल रिपोर्टचा अभ्यास करता येतो. कंपनी कुठल्या सेक्टरमध्ये काम करते, त्यानुसार पगारसुद्धा बदलतो. पण लक्षात असू द्या: junk companies pay high salary for the same reason junk bonds pay high yield.
मुलाखत चांगली झाली आणि नोकरी मिळण्याची शक्यता आहे असे वाटले की खर्या वाटाघाटी (negotiations) सुरू होतात. तुमची पगाराची अपेक्षा काय असे विचारले तर लगेच नंबर सांगू नका. मार्केट-रेटपेक्षा मी चांगला आहे, त्यानुसार पगार किती ऑफर करू शकाल, ते उलट विचारा. या जॉबसाठी तुमच्या कंपनीत काय रेंज आहे, ते विचारा. (min-max आणि midpoint काय ते विचारा). एच.आर. सारखे चावट लोक कोणी नसतील, तुम्ही विचारले नाही तर स्वतःहून कोणी माहिती देणार नाही. नोकरी म्हणजे तुम्ही स्वतःला प्रॉडक्ट म्हणून विकत आहात. Never be afraid to ask for too much when selling or offer too little when buying.
पगाराबरोबर बघायच्या इतर गोष्टी:
* सुट्टी: भारताचे माहित नाही, पण अमेरिकेत वार्षिक सुट्टी negotiable "असू" शकते. अगदी सुरुवातीला २-३ आठवडे तरी सुट्टी मिळाली पाहिजे.
* बोनस, कमिशन: किती टक्के एलिजीबिलिटी आणि गेल्या काही वर्षात किती टक्के मिळाला, ते विचारून घ्या. (नुसती २०% एलिजीबिलिटी आहे, म्हणजे तितका मिळेलच अशी काही खात्री नाही.)
* साईनिंग बोनस: तुम्ही अनुभवी असाल, तर मिळू शकतो. (टीपः जर तुम्ही कंपनीसाठी थेट application केले असेल तर याची शक्यता जास्त असते, कारण जॉब प्लेसमेंट कंपनीला द्यावा लागणारे पैसे वाचणार असतात, म्हणजे मॅनेजरच्या हातात पैसे शिल्लक असतात. पण तुम्ही मागितले नाहीत, तर मिळणार नाहीत.)
* स्टॉक ऑप्शन्स: तुम्ही अनुभवी असाल आणि विशेष स्किलचे किंवा अतिविशिष्ट प्रोजेक्टवर काम करणार असाल, तर मिळू शकतात. vesting आणि forfeiture rules विचारून घ्या. आधीच्या कंपनीत मिळालेले स्टॉक ऑप्शन्स बेकार जाणार असतील, तर नवीन कंपनीकडून भरपाई करून घ्या.
* इतर सोयी
- अमेरिकेत: 401(k) मध्ये कंपनी मॅचिंग किती आहे, vesting नियम काय आहेत (immediate असेल तर उत्तम), Roth 401(k) चा पर्याय आहे का?
- पेन्शन योजना आहे का (आता शक्यता खूप कमी), इतर काही personal wealth plans?
- रिलोकेशनसाठी असणारे फायदे काय, ते विचारून घ्या.
* इतर फायदे
- कामावर जाण्या-येण्यासाठी बस किंवा कार अलाउन्स आहे का? (भारतात महत्वाचे)
- कंपनीत फुकट जेवण मिळते का?
- कंपनीत जिमची (gymnasium) सोय आहे का?
- पाळणाघराची सोय आहे का?
- फ्लेक्सिबल टायमिंगची सोय आहे का?
- घरून काम करायची सोय आहे का?
- Alternate Friday Off आहे का?
सर्वात महत्वाचे म्हणजे तुमच्या द्रुष्टीने total package ची काय किंमत आहे आणि तुम्हाला व्यक्तिगत द्रुष्टीने काय महत्वाचे वाटते, या द्रुष्टीने निर्णय घ्या.
धाग्याचा प्रकार निवडा:
माहितीमधल्या टर्म्स
छान लेख आणि
छान लेख आणि प्रतिसाद.
भारतातील आयटीवाल्यांकडे नोकरी बदलताना दोनचार ऑफर्स असतील तर केवळ फायनल ऑफर न बघता
* ट्याक्स बास्केट कशी आहे ते नीट विचारावे.
* ग्रुप आरोग्य, जीवन विमा आहे का? त्याचे हप्ते कंपणी देते की स्वतः द्यावे लागतात? फक्त स्पाऊस, २मुलं की पालकदेखील आहेत?
सुट्ट्यादेखील फार कमीजास्त असतात. एका सर्विस कंपणीत १५+१० दुसर्या प्रोडक्ट कंपणीत २४+१० आणि टेकएममधे तर चक्कचक्क ३० की ३२+१० ऐकलय.
आणखी एक
आयटीवाल्यांनी नोटीस कालावधी किती आहे ते विचारुन ठेवावे. काही कंपन्यांमध्ये राजीनामा दिल्यावर १ महिना तर काहींमध्ये अगदी ३ महिन्यांपर्यंत नोटीस कालावधी आहे असे ऐकले आहे. काही कंपन्यांमध्ये नोटीस बायआऊट करण्याचा पर्यायच नसतो. मला नोकरी बदलताना २ महिन्यांच्या नोटीस कालावधीचा चांगलाच त्रास झाला होता. नवीन कंपनी सहसा दोनतीन आठवड्यांपेक्षा जास्त वाट पाहत नाही.
401(k)
हा प्रतिसाद बघा, म्हणजे कळेल 401(k) काय आहे. इथे जरा सविस्तर लिहितो.
401(k) प्लॅन म्हणजे IRS च्या 401(k) टॅक्सकोड आधारित आहे म्हणून त्याला तसे नाव पडले आहे. नॉनप्रॉफिटमध्ये (युनिव्हर्सिटी, हॉस्पिटल वगैरेमध्ये) असाच प्रकार 403(b) असतो.
हा जवळपास प्रॉव्हिडंड फंडसारखा प्रकार आहे, म्हणजे आपण पगारातून थोडे पैसे टाकायचे, आणि त्याला जोडून तुमची कंपनी पण त्यात तितकेच पैसे टाकणार. निवृत्त झाल्यावर ते पैसे तुम्हाला मिळणार किंवा तुम्ही नवीन कंपनीत गेलात तर ते सोबत नेता येतात.
कंपनी मॅचिंग काँट्रीब्यूशन (किंवा कंपनी मॅच): तुम्ही जितके पैसे टाकणार, त्याच्या काही प्रपोर्शनमध्ये कंपनीपण पैसे देते. उदा. company will match dollar-for-dollar upto 6% of your annual salary. याचा अर्थ तुम्ही तुमचा ६% पगार 401(k) मध्ये टाकला तरच कंपनीपण तुम्हाला ६% मॅचिंग काँट्रीब्यूशन देईल. तुम्ही १५% पगार 401(k) मध्ये टाकला, तरी कंपनी काँट्रीब्यूशन ६% च राहाणार, पण ३% च टाकला तर कंपनी मॅचिंग काँट्रीब्यूशनपण ३% च मिळणार. म्हणून कंपनीचे सगळे काँट्रीब्यूशन मिळवण्यासाठी तुम्ही किमान ६% पगार 401(k) मध्ये टाकला पाहिजे. हे विसरू नका आणि कंपनी मॅचवर पाणी सोडू नका (जे आपल्यासाठी फुकटचे आहेत).
vesting rule म्हणजे कंपनी मॅचिंग १००% तुमचे कधी होणार. समजा तुमचा पगार वार्षिक $१००,००० आहे. तुम्ही १०% = $१०,००० वर्षाला 401(k) मध्ये टाकता आणि कंपनी $६,००० मॅचिंग देते. असे तुम्ही ३ वर्षे केले (समजा: तिन्ही वर्षे पगार स्थिर आहे $१ लाख). कंपनीचा vesting rule असा असू शकतो की company match will vest after 3 years. याचा अर्थ तुम्ही ३ वर्ष काम केले तरच ३ वर्षांनी कंपनी मॅचचे $१८,००० तुम्हाला मिळणार. त्याआधी कंपनी सोडली तर मॅचिंग काँट्रीब्यूशन शून्य. (तुमचे स्वतःचे काँट्रीब्यूशन नेहमी तुमच्या मालकीचे असते, त्याचा प्रश्न नाही.) कंपनी असे का करते? तुम्हाला जमेल तितका वेळ जखडून ठेवायला. कधी-कधी कंपनी जरा दयाळू असेल तर नियम असेलः company match will vest as 1/3rd every year upto 3 years when you are vested 100%. पण जर कंपनी चांगली असेल तर ताबडतोब (इमिडियेट) वेस्टिंग असू शकते, जे आपल्यासाठी चांगले. नाहीतर कंपनीचे वेस्टिंगचे नियम आणि तुम्ही तिथे किती वेळ नोकरी करणार, याचा विचार करावा.
401(k) मध्ये गुंतवायचे ३ प्रकारः
१. pre-tax = टॅक्स कापायच्या आधी गुंतवणूक, म्हणजे तुमचा यावर्षीचा टॅक्स वाचतो. पण तुम्ही पैसे काढाल तेव्हा गुंतवणूक + गेन याच्यावर टॅक्स भरावा लागतो.
२. post-tax = टॅक्स दिल्यावर केलेली गुंतवणूक, म्हणजे तुम्ही यावर्षीचा टॅक्स भरला आहे. तुम्ही पैसे काढाल तेव्हा गुंतवणूकीवर टॅक्स नाही, पण जो गेन झाला त्याच्यावर टॅक्स भरावा लागतो.
३. Roth = थोडाफार post-tax सारखाच प्रकार. टॅक्स दिल्यावर केलेली गुंतवणूक, म्हणजे तुम्ही यावर्षीचा टॅक्स भरला आहे. पण तुम्ही पैसे काढाल तेव्हा गुंतवणूकीवर + गेन याच्यावर टॅक्स नाही.
तुम्ही निवृत्त झाल्यावर कमी टॅक्स ब्रॅकेटमध्ये असाल असा तुमचा अंदाज असेल, तर 401(k) pre-tax हा पर्याय चांगला आहे. (निवृत्त झाल्यावर कमी दराने टॅक्स भरू की, आज जास्त दराने का भरायचा? शिवाय अजून काही वर्षांनी पैशाची किंमत inflation मुळे ढासळलेली असणार, त्यामुळे तेव्हा टॅक्स भरायचा. टॅक्स जितक्या उशीरा भराल, तितके चांगले, याला tax deferring म्हणतात. 401(k) मध्ये Deferred tax हा सोयीचा प्रकार आहे.
401(k) मध्ये वय ७०.५ झाले की पैसे काढावेच लागतात मग तुम्हाला गरज असो किंवा नसो. Roth 401(k) अशी सक्ती नसते. तुम्ही Roth 401(k) पुढच्या पिढीच्या नावे करू शकता. एस्टेट प्लॅनिंगसाठी Roth 401(k) हा चांगला पर्याय आहे.
नवीन कंपनीत जाताना:
१. 401(k) ची शिल्लक $५००० पेक्षा कमी असेल तर बहुतेक वेळा कंपनी सरळ डिस्ट्रीब्यूशन देणार. प्लॅन डिझाइन कसे आहे, ते नियम समजावून घ्या. डिस्ट्रीब्यूशनचा तोटा म्हणजे कंपनी १०% अर्ली विदड्रॉअल फी आणि बहुदा टॅक्स कापणार.
२. हे टाळण्यासाठी जुना 401(k), नवीन कंपनीच्या 401(k) मध्ये किंवा नवीन IRA मध्ये रोलओव्हर करा. रोलओव्हर म्हणजे पैसे तुमच्या नावाने न घेता नवीन अकाऊंटमध्ये परस्पर ट्रान्सफर करायचे.
उत्तम लेख.. आभार माझ्यासाठी
उत्तम लेख.. आभार
माझ्यासाठी कंपन्या बदलणे हा क्वचित होणारा व/वा अपवादात्मक प्रकार असल्याने याचा उपयोग व्हायला काही काळ जावा लागेल. मी त्याच कंपनीत निगोशिएट (रादर भांडून) आवश्यक त्या गोष्टी मिळावायला प्राधान्य देतो. मला त्या मिळायची घाई नसल्याने ते शक्यही होते.
====
याशिवाय पगारासारखेच टॅक्स बचतीच्या वेगवेगळ्या मार्गांवरही प्रकाश टाकावा. 80C, 80D माहितीचे आहेत. बाकीही (80CCC, 80CCD, 80DD, 80E, 80G, 80GG, 80GGA, 80RRB इत्यादी बरेच) कॉलम्स फॉर्म १६त दिसतात तिथे आकडे आणावेत का? ते किती फायद्याचे असतात?
http://www.etf.com/sections/f
http://www.etf.com/sections/features/22420-bernstein-dont-bother-with-i…
If You Can: How Millennials Can Get Rich Slowly या पुस्तकाची पीडीएफ (मोफत उतरवून घेण्यासाठी) - http://www.etf.com/docs/IfYouCan.pdf
छान
बेनिफीट्स इन काइंड किंवा रिटायरमेंट१ बेनिफिट्स हे नेहमी मूठभर२ मीठ घालून जोखावेत.
रिटायरमेंट बेनिफिट्सचा आकार पगाराच्या मानाने जास्त असू नये. (हल्ली पगाराच्या १२% पीएफ वगैरे स्टॅण्डर्ड बेनिफिट असतात त्याखेरीज इतर बेनिफिट्स नीट पाहून घ्यावेत). रिटायर होताना कंपनी दहा कोटी देणार आहे म्हणून सध्या १० रु रोजावर काम करा असे असू नये.
रिटायरमेंट बेनिफिट्स पैकी ग्रॅच्युइटी आणि सुपर अॅन्युएशन हे जनरली ५ वर्षे नोकरी केल्यावरच लागू होतात. पण ते सीटीसीमध्ये दाखवलेले असतात.
व्हेरिएबल पे मोठा असू नये.
१. रिटायरमेंट बेनिफिट खरे तर आजच्या जमान्यात विचारात धरूच नयेत. कारण तुम्ही त्याच कंपनीतून रिटायर व्हायची शक्यता खूप कमी३ असते. पीएफ वगैरे बेनिफिट स्टॅण्डर्ड असतात ते कोणत्याही कंपनीत मिळतातच.
२. विथ अ पिंच ऑफ सॉल्टचे पुढचे रूप.
३. तुम्ही त्याच कंपनीतून रिटायर व्हायच्या जवळपासच्या वयाला कंपनी जॉईन करत असाल तर वरच्या लेखाची तुम्हाला गरजच नाही. इतपत जाणकारी तुम्ही आजवर मिळवलीच असेल. ;)
आयटीवाल्यांसाठी टिप/टीप:
ऑनसाईट बेनिफिट मिळतील असे धरून मूळ पगारात कॉम्प्रोमाइज करू नये. कारण अ. ऑनसाइट संधी मिळेलच याची शाश्वती नसते. आणि ब. ऑनसाइटविषयीच्या कंपनीच्या पॉलिसीज कधीही बदलू शकतात. :(