मनातले छोटे मोठे प्रश्न - भाग १९
व्यवस्थापकः ही धागामालिका आपल्या मनात येणारे, नेहमी नेहमी डोकावणारे विचार मांडण्यासाठी आहे. कधी कधी आशय फार मोठा नसतो. फार खोल विचार केलेला नसतो. तो विचार/ कल्पना/ प्रश्न/ गंमत डोक्यात येते, जाते. कधी कधी आपण विसरतो, कधी कधी ती ती पुन्हा पुन्हा येत असल्याने आपण विसरू शकत नाही.
यापूर्वीच्या धाग्यावरचे प्रतिसाद १०० च्या वर गेले आहेत म्हणून हा पुढचा धागा
===========
पत्रकारिता नैतिकतेशी जोडली गेलेली असली तरी, वृत्तपत्र/प्रकाशन चालवणे हा एक व्यवसाय आहे, व्यवसायाच्या अनुषंगाने घ्यावे लागणारे निर्णय हे पत्रकारितेच्या मुळाशी येणे शक्य आहे. हे माहित असतानाही अभिव्यक्ती दाबली जात आहे असा सुर लावणे कितपत व्यवहार्य आहे? वृत्तपत्राची वाचकसंख्या/व्यापकता हा निकष महत्त्वाचा असला तरी सध्याचे सेन्सॉरमुक्त असे डिजिटल युग उपलब्ध असताना मुस्काटदाबी होणार्या त्या जगाची अपरिहार्यता शिल्लक का आहे? वास्तवात सत्तेच्या गणितांमुळे सेन्सॉरशिप अटळ आहे हे लक्षात आल्यानेच प्रकाशक/वृत्तपत्र संपादक/मालक ह्यांच्या नावाने खडे फोडणे सहज/सोपे असावे काय? मग काठावर उभे राहून टिका करणार्या मध्यमवर्गापासून हे वेगळे कसे?
================
पुरवणी - मागे झालेल्या चर्चेत, जंतूंच्या म्हणण्याप्रमाणे अभिव्यक्ती दडपली जात आहे हि टिका करणार्यांनाच लक्ष्य केल्यास 'शुटिंग दि मेसेंजर' होऊ शकेल जे अपेक्षित नाही, कारण ह्या वैचारिक वर्गाची अभिव्यक्ती दडपण्यात समाजाची हानी आहे, पण ह्या दडपशाही व्यवस्थेला समांतर व्यवस्था चालवण्याचे प्रयत्न होतात काय? झाल्यास ते नक्की कुठे कमी पडतात ह्या अनुषंगाने चर्चा सरकल्यास बरे.
विकिलिक्स, स्नोडेन केस हि समांतर व्यवस्थेची काही उदाहरणे आहेत असे म्हणण्याइतपत ती विश्वासाहार्य आहेत काय? मोदींच्या विजयाच्या पार्श्वभुमिवर ब्लॉग्स/फेसबुक/ट्विट्विटर ह्या माध्यमांचा दुरुपयोग करणारे अधिक यशस्वी ठरत आहेत काय? आर्थिक मागासलेपणामुळे हे माध्यम अपेक्षीत यशस्वीरित्या वापरता येणे ह्या वैचारीक वर्तुळाला शक्य होत नाही काय?
काही व्यवसायांना बळंच नैतिकता
काही व्यवसायांना बळंच नैतिकता चिकटवली जाते. उदा. शिक्षकी पेशा, पत्रकारिता. असल्या व्यवसायात शुद्ध कमर्शियल वर्तन ठेवणं अवघडच.
शुद्ध कमर्शियल वर्तन नेहमीच अनैतिक असतं का ? केलेल्या कामाचा योग्य मोबदला मागणं / जेवढा मोबदला तेवढं काम असा विचार करणंच अनैतिक आहे की ठराविक व्यवसायातील व्यक्तींनी असा विचार केला तरच फक्त तो अनैतिक ठरतो ?
वर बाबा बर्वे यांचा प्रतिसाद
वर बाबा बर्वे यांचा प्रतिसाद वाचणे.
मला म्हणायचंय ते असं:
आपला डे जॉब संपल्यावर वैयक्तिक आयुष्यातही विशिष्ट प्रकारे वागायची सक्ती काही व्यवसाय करतात.
उदा:
| सॉफ्टवेअर इंजिनियर विजय | शिक्षक संजय |
| १. आठवड्यात ३५ तास इमानेइतबारे काम करतो | १. आठवड्यात ३५ तास इमानेइतबारे काम करतो |
| २. शुक्रवारी काम संपल्यावर डेस्कवर दारू पितो | २. शुक्रवारी शाळा सुटल्यावर वर्गात दारू पितो |
| ३. शनिवारी वेश्यागमन करतो | ३. शनिवारी वेश्यागमन करतो |
| वरील कारणांपायी कोणी विजयला सॉफ्टवेअर इंजिनियर असण्याला नालायक ठरवत नाहीत | वरील कारणांपायी संजयला शिक्षक असण्याला नालायक ठरवतात |
किंचित मतभेद
२. शुक्रवारी काम संपल्यावर डेस्कवर दारू पितो
भारतात या गोष्टी कशा चालतात याबद्दल खात्रीनिशी बोलू शकत नाही, परंतु माझ्या अंदाजानुसार केवळ हेच कारण सॉ.इं. विजयला जागच्या जागी नोकरीतून बडतर्फ करण्याकरिता पुरेसे ठरावे.
(बाकी, शुक्रवारी काम संपल्यावर सॉ.इं. विजयने स्वतःच्या घरी किंवा पबमध्ये/बारमध्ये दारू पिऊन वाट्टेल तेवढा धिंगाणा घातला, तरी त्या बाबी त्यास सॉ.इं. असण्याला सहसा नालायक ठरवू नयेत, याबद्दल बव्हंशी सहमत.)
काही व्यवसायांना बळंच नैतिकता
काही व्यवसायांना बळंच नैतिकता चिकटवली जाते. उदा. शिक्षकी पेशा, पत्रकारिता. असल्या व्यवसायात शुद्ध कमर्शियल वर्तन ठेवणं अवघडच
नैतिकता ही त्या कार्याशी संबंधित गोष्टींबद्द्ल अपेक्षित असते. अन्यथा नाही.
पत्रकारांनी घरी पत्नीस मारहाण केल्याने त्यास वाईट पत्रकार म्हणणार नाहीत (वाईट व्यक्ती म्हणू शकतील पण ते वेगळे).
व्यावसायिक नैतिकता आवश्यक. मला विनाकारण गोळ्या देणार्या (व्यवसायाप्रती अनैतिकता) डॉक्टरकडे जाणे मी टाळेन, मात्र प्रत्यक्षात घरी बायकोला मारणार्या मात्र नेमकी परिक्षा व उपाययोजना करू शकणार्या डॉक्टरकडे जायला अजिबात कचरणार नाही.
मग जर काठावरून टिका मंजूर आहे
मग जर काठावरून टिका मंजूर आहे तर टिका करणार्यानेच त्याच्या व्यावहारिक सोल्युशनचाही विचार केला पाहिजे का? तसे का? हे करणे गैर वाटते, अनैतिक वाटते इतके सांगणे पुरेसे का नाही?
'काठावरून उभे राहून टीका करणे पुरेसे नाही' इतके सांगणे पुरेसे नाही असे का वाटते ;)
व्यवहारिकता आणि फरक
मग जर काठावरून टिका मंजूर आहे तर टिका करणार्यानेच त्याच्या व्यावहारिक सोल्युशनचाही विचार केला पाहिजे का?
टिका व्यवहार्य नाही म्हणजेच टिकेचे सकारात्मक कृतीच्या दृष्टिने मुल्य कमी आहे, त्याप्रकारची टिका तर मध्यमवर्ग रोजच करत असतो, हेच जर पत्रकारिता करणार्यांनी केले तर फरक कसा पडणार?
पत्रकारिता नैतिकतेशी जोडली
पत्रकारिता नैतिकतेशी जोडली गेलेली असली तरी
पत्रकारिता नि नैतिकता यांचा काही संबंध आहे हे कधी जाणवले नाही. तथाकथित उच्च माध्यमांत काम करणारे अधिकतर ग्राउंड लेवल पत्रकार हे प्रचंड धावपळ करून थकणारे कामगार असतात. ते इतके थकतात कि बहुसंख्य बेवडे (ताल सुटेल इतकी जास्त पिणारे) असतात. जे वरच्या लेवलला काम करतात ते भाषांत निष्णात असतात. त्यांच्यालेखी काही विशिष्ट लोक नि संकल्पना 'प्रतिष्ठित' असतात. त्यांच्या वाईट बातम्या रस काढून लिहायच्या. दुसरे काहे लोक नि संकल्पना 'तुच्छ' असतात. त्याबद्दल काहीही लिहिलेले चालते. अशा प्रकारे भारतातली अतिप्रतिष्ठित माध्यमे चालतात. प्रचंड बुद्धिमत्ता, सामान्यज्ञान, आत्मविश्वास. त्याच्या जोडीला मिडिया स्वातंत्र्य, ओळखी, इ इ. समस्या काय आहे नि त्याचे उत्तर काय असावे याबद्दल डेप्थ नाही, फक्त उपदेशाचा सूर कायम ठेवायचा.
संपादकांना विनंती - हा
संपादकांना विनंती - हा प्रतिसाद नव्या धाग्यात हलवावा.
प्रचंड बुद्धिमत्ता, सामान्यज्ञान, आत्मविश्वास. त्याच्या जोडीला मिडिया स्वातंत्र्य, ओळखी, इ इ. समस्या काय आहे नि त्याचे उत्तर काय असावे याबद्दल डेप्थ नाही,
कदाचीत ती डेप्थ असणार्यांचीच मुस्काटदाबी होत असावी.
>> व्यवसायाच्या अनुशंगाने
>> व्यवसायाच्या अनुशंगाने घ्यावे लागणारे निर्णय हे पत्रकारितेच्या मुळाशी येणे शक्य आहे. हे माहित असतानाही अभिव्यक्ती दाबली जात आहे असा सुर लावणे कितपत व्यवहार्य आहे?
इथे प्रश्न असा उभा राहतो की "सरकार" किंवा "बाहेरचा समाज" नामक एण्टिट्या जेव्हा मीडिया(हाउस)वर उदा. चॅनेलच्या कार्यालयावर नियंत्रण आणू पाहतात तेव्हा हे मीडिया हाउसेस* "अभिव्यक्ती स्वातंत्र्या"च्या नावे गळा काढतात. पण तसे स्वातंत्र्य ते आपल्या पत्रकारांना देत नाहीत.
*अर्थात हे मीडिया हाउसेस हा कांगावा पत्रकारांच्या मार्फतच करतात.
ओल्ड स्कूल
ओल्ड स्कूल नावाचा एक पिक्चर आहे. त्यात ग्रुप मध्ये घेण्यासाठी नायक एक परीक्षा घेते सदस्यांची. त्यात तो ...ला दोरी बांधतो आणि दोरीच्या दुसऱ्या टोकाला दगड बांधलेला असतो. आता सगळे वीर इमारतीच्या कठड्यावर उभे राहून दोर खाली सोडतात. थोडक्यात हिम्मत तपासण्यासाठी. तर हाच प्रयोग करून बघा म्हणजे नक्की नागड्या माणसाबाबातीत म्हणजे नक्की कोणाची भीती पळेल हे कळून येईल
प्रश्न वाचून पडलेले प्रश्न
>> पत्रकारिता नैतिकतेशी जोडली गेलेली असली तरी, वृत्तपत्र/प्रकाशन चालवणे हा एक व्यवसाय आहे, व्यवसायाच्या अनुषंगाने घ्यावे लागणारे निर्णय हे पत्रकारितेच्या मुळाशी येणे शक्य आहे. हे माहित असतानाही अभिव्यक्ती दाबली जात आहे असा सुर लावणे कितपत व्यवहार्य आहे?
पत्रकारिता नैतिकतेशी जोडलेली नाही असं मानू आणि तात्पुरती बाजूला ठेवू. तरीही, जर विशिष्ट विचार समाजातल्या एका पुरेशा मोठ्या भागाच्या हिताचा आहे, पण ज्यांच्या हिताचा तो आहे त्यांच्यापर्यंत तो पोहोचण्यात मूठभर लोकांचा स्वार्थ आड येतो आहे तर अशी परिस्थिती व्यापक समाजहिताची आहे का? 'व्यवहार्य' म्हणजे अशा वेळी नक्की काय?
>> वृत्तपत्राची वाचकसंख्या/व्यापकता हा निकष महत्त्वाचा असला तरी सध्याचे सेन्सॉरमुक्त असे डिजिटल युग उपलब्ध असताना मुस्काटदाबी होणार्या त्या जगाची अपरिहार्यता शिल्लक का आहे? वास्तवात सत्तेच्या गणितांमुळे सेन्सॉरशिप अटळ आहे हे लक्षात आल्यानेच प्रकाशक/वृत्तपत्र संपादक/मालक ह्यांच्या नावाने खडे फोडणे सहज/सोपे असावे काय? मग काठावर उभे राहून टिका करणार्या मध्यमवर्गापासून हे वेगळे कसे?
'सत्तेच्या गणितांमुळे सेन्सॉरशिप अटळ आहे' हे गृहीतक प्रत्येकानं मान्य करावं की त्याला पर्याय शोधावेत? व्यापक समाजहित कशात आहे? सत्तेची गणितं करणारे नेहमीच मूठभर असतात. बहुसंख्यांचा वैयक्तिक स्वार्थ कशात आहे?
>> पुरवणी - मागे झालेल्या चर्चेत, जंतूंच्या म्हणण्याप्रमाणे अभिव्यक्ती दडपली जात आहे हि टिका करणार्यांनाच लक्ष्य केल्यास 'शुटिंग दि मेसेंजर' होऊ शकेल जे अपेक्षित नाही, कारण ह्या वैचारिक वर्गाची अभिव्यक्ती दडपण्यात समाजाची हानी आहे, पण ह्या दडपशाही व्यवस्थेला समांतर व्यवस्था चालवण्याचे प्रयत्न होतात काय? झाल्यास ते नक्की कुठे कमी पडतात ह्या अनुषंगाने चर्चा सरकल्यास बरे.
जर समांतर व्यवस्था दडपशाही व्यवस्थेला पर्यायी असेल, तर ती दडपशाही व्यवस्थेच्या गैरसोयीची असणार हे उघड आहे. अशा गैरसोयीच्या व्यवस्था मूठभर दडपशहांच्या हितांच्या आड येत असल्यामुळे त्यांच्यासाठी त्या अव्यवहार्यही असणार. त्यामुळे ते दडपशहा त्या पर्यायी व्यवस्थांच्या अभिव्यक्तीचा गळा घोटू पाहणार हे स्वाभाविक आहे. अशा वेळी एक सामान्य नागरिक, किंवा अगदी काठावर उभा राहून टीका करणारा मध्यमवर्गीय नागरिक म्हणून कोणती बाजू घेणं 'व्यवहार्य', कोणती बाजू घेणं 'नैतिक'? मूठभर दडपशहांची बाजू घेण्यात सामान्य नागरिकाचा किंवा अगदी काठावर उभा राहून टीका करणाऱ्या मध्यमवर्गीय नागरिकाचा स्वार्थ असेल का?
कोर्टाचा काहीएक निर्णय असला
कोर्टाचा काहीएक निर्णय असला तर त्याची अंमलबजावणी कधीपासून होते? अमुक एक निकाल आला अशी बातमी आल्यापासून तो राबवल्या जाईपर्यंत साधारणपणे किती काळ जातो? इथे तो निर्णय फुल & फायनल आहे असे मानतो आहे. हायकोर्टातल्या निकालास सुप्रीम कोर्टात आव्हान वैग्रे तूर्त इग्नोरवले आहे.
माझा अंदाज असा आहे की याने
माझा अंदाज असा आहे की याने फरक पडतो.
आईचे दूध हे सभोवतालची भौगोलिक परिस्थितीवगैरेचा प्रभाव पडून त्या त्या बालकासाठी योग्य त्या अँटीबॉडीज पुरवत असते.
म्हणजे दुसर्या स्त्रीचे दूध चालणार नाही असे नाही पण स्वतःच्या आईच्या दुधा इतका फायदा म्हणा किंवा "नेमकी" घटकद्रव्ये म्हणा बाळाला मिळण्याची शक्यता कमी होते.
अर्थात हे अतिशय अनाभ्यासपूर्ण मत.
आडकित्ता आणी इतर 'ऐसे डॉक्टर' यांना अधिक व योग्य माहितीसाठी आवाहन करतो.
सामान्यज्ञान
जगात Republic of Congo आणि Democratic Republic of Congo हे पूर्णतः भिन्न, एकामेकांपासून सार्वभौम देश आहेत याची आयडीया आपणांस होती काय?
http://worldnews.about.com/od/congobrazzaville/f/twocongos.htm
तैवान
roc = republic of china = तैवान
proc = people's republic of china = (आज ज्याला आपण "चीन" म्हणतो तो) चीन, कम्युनिस्ट चीन.
भारताच्या दक्षिणेला जसं लंका हे बेट आहे, तसच तैवान हे चीनजवळचं बेट.
तैवानचं सर्कार स्वतंत्र आहे. त्यांची इलुशी इलुशी का असेना मिलिटरी आहे.
आता ते "युनोची मान्यता नाही" वगैरे तांत्रिक बाबी आहेत; प्रत्यक्षात तिथे सर्कार आहे.
द कोरिया - जपानसारखा किंवा जगातील इतर आघाडीच्या देशांसारखाच एक अत्यंत सुस्थित सधन मध्यमवर्ग आहे.
हॉंग काँग , सिंगापूर, द. कोरिया ह्यांच्याच बरोबरीने तैवान हा asian tigers मध्येही गणला जात होता.
थोडक्यात ती एक well established entity आहे.
त्याला युनोची मान्यता असणं नसणं मला तांत्रिक मुद्दा वाटतो.
तैवानवर सध्या कम्युनिस्ट चीनचा दावा आहे.
पण तैवानमध्ये जायचे असेल तर कम्युनिस्ट चीन त्याची व्यवस्था करु शकेल काय ?
की आपल्याला तैवानी सरकारचा व्हिसा घ्यावा लागेल?
त्यांचा शेप्रेट व्हिसा घ्यावा लागत असेल तर त्याला सार्वभौम का म्हणायचे नाही?
(शिवाजी महाराजांनी १६७४च्या आसपास राज्याभिषेक करुन घेतला हे खरेच. पण त्यांचा अंमल त्या भागात त्याआधीच
कैक दशके सुरु होताच की. शिवाजी हा तसाही लोकांचा लाडका de facto राजाच होता. नंतर राज्याभिषेक ही निव्वळ
तांत्रिकता; तीसुद्धा फक्त विजापूर - दिल्ली/आग्रा आणि इतर सत्तांसंदर्भात एक statement करण्यासाठी.
शिवाजीचा अंमल ही ग्रौंड रियालिटी ही आधीपासूनच होती.
अजून अवांतर :-
तांत्रिक दृष्ट्या पाहिलं तर सोनिया मॅडम ह्या यूपीएच्या काळात एक खासदार होत्या. काँग्रेसच्या अध्यक्ष वगैरे होत्या.
इतर काही समित्यांवर वगैरे त्यांची नियुक्तीही होती सल्लागार वगैरे मह्णून; किंवा यूपीए नामक आघाडीच्या त्या सूत्रधार का कायसेसे होत्या. त्यांना अधिकृत मंत्रीपद नव्हतं. पण ही निव्वळ तांत्रिकता झाली.
प्रत्यक्षात त्यांचं सरकारवर एका खासदाराचं असतं तितकच नियंत्रण होतं का ?
मनमोहनसायबाकडे पीएमकडे असते त्या अर्थानं सत्ता होती का ?
)
बहुतांश पब्लिकसाठी ह्यात नवीन काहीही नसणार, पण आपलं नोंदवून ठेवावं म्हणून टंकतोय.
मी त्याला वादग्रस्त <अबक>
मी त्याला वादग्रस्त अबक> (अबक हा तत्सम भुभागाचे नाव, जसे काश्मिर, अक्साई चीन्, अरुणाचलाचे काही जिल्हे, तैवान, सान्केकु(?) आयलंड्स, येरुसलेम इत्यादी)
पाकव्याप्त व भारतव्याप्तही ही ठिकच आहे. त्याला ऑब्जेक्शन नाही
अख्खा काश्मिर आमचा (वा तत्सम) वगैरे गर्जना राजकीय पक्षाच्या नेत्यांनी करणे अपरिहार्यतेमुळे समजु शकतो. मला त्या करायचे कारण आणि त्यामागील सत्यासत्यता दिसत असूनही तशा गर्जना करायचा आवेश काही गवसत नै.
गयाना, गिनी
दक्षिण अमेरिकेतही तीन गयाना - फ्रेंच, डच (सध्याचे सुरिनाम) आणि ब्रिटिश (सध्याचे गयाना) आहेत.
आफ्रिकेतल्या गिनीचीही तीच गत - फ्रेंच (सध्याचे गिनी), पोर्तुगीज (सध्याचे Guinea-Bissau) आणि स्पॅनिश (सध्याचे Equatorial Guinea)
काँगो, मध्यपूर्व आणि इतर भागांप्रमाणेच वसाहतवादी राष्ट्रांची सोय हे यामागचं मुख्य कारण.
???
कोण म्हणतो रीडर्स डायजेष्ट हे दर्जेदार मासिक आहे म्हणून?
(अमेरिकन उजव्यांना आपला प्रचारच जर करायचा असेल, तर त्यांनी तो जरूर करावा; त्यांना तो अधिकार आहे. पण मी तो पैसे देऊन विकत घ्यावा, ही अपेक्षा जरा अतीच होते.)
नाही म्हणायला, रीडर्स डायजेष्टमधली विनोदांची सदरे ('लाफ्टर, द बेष्ट मेडिसीन', 'ह्यूमर इन युनिफॉर्म', 'लाइफ इन दीज़ युनायटेड ष्टेट्स' - इतरत्र 'लाइफ इज़ लाइक द्याट', 'ऑल इन अ डेज़ वर्क' वगैरे) अजूनही बरी असतात. पण तेवढ्याकरिता विकत घेऊन पैसे वाया घालवणे उचित वाटत नाही.
बाकी, लिटररी व्हॅल्यूकरिता 'रीडर्स डायजेष्ट' विकत घेण्याचे दिवस कित्येक दशकांपूर्वी गेले, असे वाटते. नावडेज़, इट इज़ येट अनदर टिपिकल अमेरिकन ट्र्याशी म्यागझीन.
बाकी, तो स्वीपष्टेक्स वगैरे फालतूपणा पुरातन आणि सनातन आहे; ही आजची गोष्ट नाही.
ओरिगामी
उन्हाळ्याच्या सुटीमुळे जवळच्या डॉलर स्टोअरमध्ये ओरिगामीचे रंगीत कागद (प्रिंटेड ओळींसह) मिळाले.
हंस व क्रौंच पक्षी बनवलाय. घुबड बनवण्याची थोडी प्रॅक्टिस केली (पेंग्विन म्हणूनही खपून जाईल). त्याचे रंगीत कागद तात्पुरते संपले होते त्यामुळे साध्या वहीच्या कागदावर सराव केला. इथे कोणाला ओरिगामीमध्ये रस आहे काय?
| हंस | उडणारा क्रौंच/सारस | घुबड |
|
|
|
|
व्यवस्थापकः height="" टाळावे, त्यामुळे सर्व बाऊझर्सवर चित्रे दिसत नाहित.
काय काय करता?
मी सध्या होडी, टोपी, कॅमेरा, बर्डबेस वापरून दोनतीन पक्षी असे प्राथमिक शिकलो आहे. एखाददुसरे फूल येते. पुण्यामुंबईत ओरिगामी ग्रूप्स वगैरे आहेत काय? इथल्या एका ग्रूपला मी भेट दिली होती पण ते लोक फारच अॅडवान्स्ड (कोळी किंवा इतर लहान किडे वगैरे) गोष्टी करत होते. त्यामुळे सध्या जालावरच माहिती मिळवून शिकतोय.
ओरिगामीविषयी काही
इथे कोणाला ओरिगामीमध्ये रस आहे काय?
..........प्रतिसाद धावपळीत देत आहे -
ओरिगामीसाठी पुस्तके :
१. आइज़ाओ होन्डा
२. अरविंद गुप्ता
सर्वोत्तम उपाय म्हणजे यू-ट्यूबवरच्या चित्रफिती.
१. जो नाकाशिमा
२. ताडाशी मोरी
३. ताविन्
--------
रॉबर्ट जे. लॅन्ग या व्यक्तीने कुठल्याही प्राणी-पक्षी-वस्तूचा गणितातील सूत्रांनी ओरिगामीच्या आकृती आणि कृतींत कसे रूपांतर केले जाते यावरचे दिलेले एक छोटे व्याख्यान.
लॅन्गचे स्वतःचे संकेतस्थळ.
-----------------
इतर काही -
सिफो माबोना या ओरिगामी कलाकाराच्या मदतीने बनविलेली प्रेमकहाणी -
----------------
५० अमेरिकी सेंट किंमतीचा 'फोल्डोस्कोप' (फोल्डिन्ग मायक्रोस्कोप) बनविणार्या मानु प्रकाश या स्टेन्फर्ड विद्यापिठातल्या प्राध्यापकाचे १० मि. चे व्याख्यान.
फोल्डोस्कोपचे संकेतस्थळ.
मनु प्रकाश यांचे संकेतस्थळ.
---------------
गोल्डमाईन
झकास. अशीच माहिती पाहिजे होती. (धावपळ कमी झाल्यावर) येऊ द्या आणखी... मी 'एबीसी ऑफ ओरिगामी' हे पुस्तक आणून सुरुवात केली होती. मात्र त्यात बऱ्याच गोष्टी (उदा. स्क्वेअर बेस, बर्ड बेस वगैरे) वाचकांना माहिती असाव्यात हे अध्याहृत होते असे वाटले. एबीसी ही ओरिगामीची मुळाक्षरे नसून डिग्री पदवीचे पुस्तक आहे असे वाटून गेले. होन्डा यांच्या पुस्तकाबद्दल एकदोन ठिकाणी वाचले आहे. लायब्ररीत वगैरे मिळते का ते शोधावे लागेल
ऐसीवरच्या सेटिंगनुसार पासवर्ड
ऐसीवरच्या सेटिंगनुसार पासवर्ड रोमन लिपीत असतो.
पण तुम्ही बोलनागरी किंवा विंडोजचं मराठी टंकन वापरून संगणकावर कुठेही, कधीही देवनागरी लिहू शकत असाल तर तुम्हाला देवनागरीतही पासवर्ड ठेवता येईल. पासवर्ड देवनागरीत असेल तर तुमच्या कीबोर्डवर त्याचं स्पेलिंग काय याने काहीही फरक पडणार नाही. फरक पडतो ते कोणती युनिकोड कॅरॅक्टर्स वापरता यामुळे. ती कोणत्याही प्रकारे तिथे आणलीत तरी चालेल. ऐसीवर अगदी 'चोप्य-पस्ते'सुद्धा चालेल.
(हे असं काही वापरत असाल तर जपून, विशेषतः बँकांचे पासवर्ड टंकताना रोमन कीबोर्ड आहे का देवनागरी हे तपासून पहा. कीबोर्ड देवनागरी असेल, आणि पासवर्ड रोमनमधला असेल तर तीनदा चुकीचा पासवर्ड टाकून बँक खातं लॉक करून घेऊ शकता. अनुभवाचे बोल.)
राहू-केतु
राहूची कथा सर्वश्रूतच आहे. या राहू राक्षसाबद्दल मला नेहमीच एक भयकारी अन इरेझिस्टिबल कुतूहल वाटत राहीलेलं आहे. एक तर नवग्रहातील या ग्रहाच्या स्तुतीमध्ये त्याला पराक्रमी दानवमंत्री म्हणून संबोधले जाते.
राहुर्दानवमन्त्री च सिंहिकाचित्तानंन्दनः |
अर्धकायः सदाक्रोधी चन्द्रादित्यविमर्दनः ||१||
सिंहीका राक्षसीचा हा मुलगा. अमृतवाटपाचे समयी मत्सरग्रस्त होऊन, देवांना फसविण्याच्या मिषाने, देवांचेच एक रुप घेऊन, अमृत प्राशनास बसला. त्याने जागाही निवडली ती नेमकी चंद्र व सूर्याच्या मधे. या कृतीतूनच त्याची फसवणूकीची वृत्ती कळो येते व राक्षसी महत्त्वाकांक्षादेखील. मग ती चांगली की वाईट ते अलाहिदा कारण देवही कुठे मोठे दूधात न्हालेले (दूधमे नहाये), निष्कपटी होते! तेदेखील मोहीनीकरवी राक्षसांना फसवतच होते की.
बरं मग अमृत मिळूनतरी याचे समाधान झाले का, तुष्टी मिळाले का? तर तेही त्याच्या नशीबी नव्हते. कारण चंद्राने, मोहीनीरुपी विष्णूस चहाडी केली अन अगदी हातातोंडाशी आलेले अमृत, इतके की घशापर्यंत अमृताचा घोट पोहोचलेला न सुदर्शन-चक्राने त्याचे मुंडके छाटले गेले. पण झाले हे की अमृत प्राप्तीमुळे ते मुंडके झाले अमर. तर सुदर्शन-चक्राच्या स्पर्शामुळे केतुला (धड) मिळाला मोक्ष.
अन मग हे २ अमर ग्रह , ज्योतिषानुसार २ छायाबिंदू मानवांना भले-बुरे अनुभव देण्यासाठी तारकामंडलात भ्रमण करु लागले. वाचलेल्या ज्योतिषाचा ४०% भाग तरी मी राहूवरच्या वाचनावर एकाग्र केलेला आहे. याचे कारण त्याचे वाटणारे भयकारी कुतुहल.
ज्योतिषात राहू चंद्रास ग्रासतो असे म्हणतात तर केतु ग्रासतो सूर्यास. पैकी राहूचे (राक्षसी भूक, अतृप्ती, प्याला ओठांशी येता येता हिसकावला जाणे) चंद्राशी (माया, संसार) काय नाते आहे हे मेडिटेशन, विचार करुनही गूढच राहीले आहे. याउलट केतु (अहंकाराचा अंत, मोक्षदर्शक) याचा ग्रास सूर्यास (इगो,अहंकार) कसा होतो हे इंट्युइटिव्हली लक्षात येते.
लग्नी राहू असणारे अर्थात बाह्य जगावर राहूचे गुणावशेष प्रोजेक्ट (प्रक्षेपित) करणारे जातकही काय की माहीत नाही पण गूढतेकडेच निर्देश करत राहीले आहेत.
कोणा ज्योतिषप्रेमीला राहू चंद्राला ग्रासतो म्हणजे काय हे जर कळले असेल तर कृपा करुन सांगावे.
एअर कंडिशनिंग युनीटबद्दल प्रश्न
घरात एअर कंडिशनिंगसाठी १ मोठे युनीट बसवणे चांगले की अशी २ लहान युनीट बसवणे चांगले की त्याने काही फरक पडत नाही?
घराला फक्त तळमजला आहे (अमेरिकन भाषेत १ स्टोरी घर). सेंट्रलाइज्ड एअर कंडिशनिंग आहे, विंडो युनीट्स नाहीत. कॅपॅसिटी दोन्ही बाबतीत सारखीच आहे. पैशाच्या दृष्टीने १ युनीटपेक्षा २ लहान युनीट महाग असतात. पण एफिशिअन्सी, लाँगटर्म वापर, मेंटेनन्स दृष्टीने एका युनीटचा फायदा/तोटा काय?
(२ मजली घर असेल तर २ युनीट्स बरी असे मत आंतरजालावर वाचले आहे, पण १ स्टोरी घरासाठी अशी काही माहिती मिळाली नाही.)
अनेक फॅक्टर्स
घराचे क्षेत्रफळ, ह्युमिडीटी, डक्टिंग, तापमान वगैरे गोष्टींवरून हे ठरले. डक्टिंग छताकडे आहे असे मानले तर तापमान जास्त असल्यास एकच युनिटमुळे पावर कंझम्प्सन नोटीसेबली वाढू शकते/परफॉर्मन्स घटू शकतो. घराच्या लेआऊट वगैरे गोष्टी गृहित धरून एस्टिमेट करावे लागेलसे वाटते. 'वन फिट्स ऑल' उत्तर सापडणे अवघड आहे.
खवचट
अमित शहा उत्तर प्रदेश भाजपचे आता प्रभारी नाहीत. कोणत्याही निवडणूका तोंडासमोर नाहीत. तरीही यूपीत दंगे का होत असावेत बाबा?
----------------------------------------------------------------------------
अमित शहा आता सगळ्या भारताचे भाजपचे प्रभारी आहेत. तरीही सगळ्या भारतात दंगे का होत नसावेत बाबा?
किंवा असंही
मनमोहन सिंग आता पंतप्रधान नाहीत. काँग्रेसही आता सत्तेत नाही. तरीही टोमॅटोचे भाव का वाढत असावेत?
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
राहुल किंवा सोनिया सत्तेत नाहीत. तरीही देशात महागाई़ वगैरे का वाढत असावी?
अर्थातच मोदी-जेटली हा काँबो
अर्थातच मोदी-जेटली हा काँबो मनमोहन्-चिडू-माँटेक या काँबोपेक्षा फार कै शहाणा नाही, पण किमान ट्माट्याच्या रोपाला टमाटे लागायला जितका वे़ळ लागतो तितका वेळ वाट पाहून कमेंट करावा.
------------------------------
प्रश्नाचे उत्तर न देता प्रतिप्रश्न विचारण्याची प्रवृती माणसात का असावी?
भाव वाढल्याची तक्रार होतेय ती
भाव वाढल्याची तक्रार होतेय ती टोमॅटोचे भाव की सॉसचे भाव?
सॉसचे भाव स्थिर असतील ते जिथून टमाटे घेतात तिथून घ्या ना. त्यांना दर आठवड्याला टमाटे प्रॉक्यूर करावे लागतात. सॉस एक वर्ष टिकतो, टमाटे फारतर आठवडाभर टिकतात.
आज भाजीवाल्याकडे जे टोमॅटो दिसताहेत ते १६ मे पूर्वीचे आहेत काय, तेवढे सांगा!!
टमाटे नसले तरी त्यांची रोपटी तरी पूर्वीची आहेत ना? ती किती असावीत नि त्यांचेकडे किती लक्ष द्यावे याचे निर्णयन १६ मे पूर्वीच झालेले आहे. भारतात आंध्र कर्नाटकात देशातली अर्धी टमाटी होतात. स्थानिक लोकांच्या कोणते पीक/इ घ्यायचे या निर्णयाचा परिणाम होणार नाही का? शिवाय exports, value added food products, medicines, beauty products, इ इ उद्योगांची खरेदी करायची वेगवेगळी शैली नि सायकल्स असतात.
...........
तर... २-३ महिन्यांत सरकारने लोकांना मार्केट तत्त्वांच्या विरुद्ध काम करतानादेखिल शिक्षा केली नाही तर नक्कीच आरोपीच्या घरात ठेवता येईल. पण 'result oriented ground work' ला हा काळ अपुरा आहे.
-----------------
आपल्या कार्यकालात सरकारने गावागावत छोटी, नि शहरांत, इ मोठी कोल्ड, इ स्टोरेजेस बांधू असे वचन दिले आहे. त्यानंतर माल वाहतूक करण्यासाठी व्यवस्था उपलब्ध करून देऊ असेही सांगीतले आहे. शिवाय नक्की मागणी किती आहे नि कोणते शेतकरी कोणते पीक घेण्याचा प्लॅन करत आहेत याची information system उभी करू असेही म्हटले आहे. याने price shocks येणार नाहीत वा कमी होतील.
.......
पण हे करायला २-३ महिने पुरेसे नाहीत. ५ वर्षांत असे काही नाही झाले तर आपण सरकारला सगळे मिळून शिव्या घालू. काँग्रेसने हे करू म्हणून ७-८ वर्षांपूर्वी सांगीतलेले नि ती ढीम्म हलली नाही. अगदी ही स्टोरेजेस नि लॉजिस्टिक्स कुठे कसे किती असावे याचा डीपीआर देखिल बनवला नाही. म्हणून त्यांच्या नावे बोंबा ठोकणे योग्य होते.
http://labourbureau.nic.in/in
http://labourbureau.nic.in/indtab.pdf
वर मे पर्यंतच रिटेल प्राईस इंडेक्स आहे. पुढचे आकडे कृपया द्याल का?
मोदी नि भाजप
http://www.thehindu.com/news/national/farmers-deserve-a-standing-ovatio…
गब्बर नेहमी म्हणतात कि मोदी चांगले नि भाजप वाईट. आता मोदी देखिल गरीब शेतकर्यांचे पाठीराखे होऊ लागले आहे. हिंदुत्ववादी,इ तर अगोदरच आहेत. मग फरक काय उरला?
हे कसले हिंदुत्ववादी?
>> हिंदुत्ववादी,इ तर अगोदरच आहेत
त्यांनी जनतेला काल 'ईद मुबारक' म्हटलं आहे. मुंबईत 'हाज हाऊस'मध्ये इफ्तर पार्टी आणि आता हे. सगळं तर स्यूडो-सेक्युलरांसारखंच चाललंय ;-)
काल दिल्लीत 'प्रथेप्रमाणे'
काल दिल्लीत 'प्रथेप्रमाणे' पार्ती का दिल्ली नाही म्हणून गोहिल साहेबांनी रात्रीच बोंबा ठोकलेल्या. मेसेजात पण त्यांना मजा आला नाही. फारच पातळ करून ग्रीटींग्ज दिल्या असे कॉग्रेसला वाटत होते.
----------------------
पण असो, इफ्तार तर भाजपची पार्टी आहे. मोदीची नाही म्हणून गब्बर स्पष्टीकरण देऊ लागत नाही. शेतकर्यांबद्दल मात्र लागतो.
ते इद मुबारक मुख्यमंत्री
ते इद मुबारक मुख्यमंत्री असताना देखिल म्हणत. त्यात काय न्यूज नाय. http://www.narendramodi.in/chief-minister-greets-muslims-in-gujarat-%E2…
आन तवा ते परदानमंत्री पदाचे उमेदवार बी नवते.
+१
इतरवेळी 'तुम्हांला नै ना आवडत, काढा तुम्ही चांगल्या शाळा' इ.इ. मुक्ताफळे उधळली जातात पण हा विरोधाभास कै खुपत नाही. इतकं असेल तर काढा म्हणावं स्वतःचं व्यासपीठ, प्रस्थापितांनी हाकललं तर गळा कशाला काढता उगीच?