कौटुंबिक संस्थाचालन

पुरुषप्रधान मानसिकता स्त्रियांचीही असू शकते

असं इथले एक (बहुतेक आधुनिक स्त्रीवादी, इ.) सदस्य म्हणाले. यावर विचार केला असता असे जाणवले कि, एतत्सम विचार करणार्‍या लोकांचा विरोध हा पुरुषांना नसून पुरुषप्राधान्याला आहे. हे पुरुषप्राधान्य पुरुष वा स्त्रीया कोणीही (आपल्या स्वार्थासाठी वा आंधळेपणाने आपल्या अहितासाठी) राबवू शकत असू शकते.
उदा. पुरुषप्रधान स्त्री आपल्या पतीचे आडनाव स्वतःला लावायचा आग्रह धरू शकते. पतीने कमवावे व सर्वात मोठी रिस्क त्याने घ्यावी, तिचा (रिस्कचा) माझा संबंध नाही असे ती मानत असू शकते.
तसेच पुरुषप्रधान पुरुष माझ्या बहिणीचे लग्न मीच लावून देणार म्हणून स्वतःचे आर्थिक नुकसान करून घेऊ शकतो. शिवाय कमवण्याचा अधिकार माझाच आहे म्हणून बायकोला, मुलीला नोकरी करण्यात बाधा आणू शकतो.

आता कुटुंब एक संस्था आहे नि ती राज्यसभेप्रमाणे चालते असे म्हणता यावे. म्हणजे काही सदस्य सभा सोडतात (दुसर्‍या कुटुंबांत जातात) वा रिटायर होतात (मरतात) पण जनरली ती एक गोईंग एंटीटी असते. काहींचे म्हणणे असेल कि नवविवाहित नव्या घरात जातात तेव्हा एक नवे कुटुंब चालू होते आणि पैकी शेवटचा मरतो तेव्हा संपते. काही का असेना, कुटुंबाचे कंपोझिशन नेहमी बदलत असते. परिस्थिती नेहमी बदलत असते. वय, गरजा, उत्पन्न, स्थान, सामाजिक स्तर, शैक्षणिक स्तर, आवडी निवडी, इ इ फार बदलत असतात. बहुधा कुटुंबाकडे असलेल्या वेळात नि असलेल्या स्रोतांत सगळ्यांच्या सगळ्या गरजा भागवणे असंभव असावे.

क्षणभर असे समजू की सारे कुटुंबातले सदस्य समजूतदार आहेत. म्हणजे कोणालाही कोणताही अन्याय करायची इच्छा नाही. असेही समजू कि कोणतीही लिंगप्रधानता नाही. पण आपले रास्त सुख हवे आहे. त्यासाठी शांतपणे वाटाघाटी करायच्या आहेत. कुटुंब चालवण्यासाठी, म्हणजे प्रधान म्हणून निर्णय घेण्यासाठी वा अन्यथा, जी शारिरीक क्षमता लागते, बुद्धिमत्ता लागते, समाजशीलता लागते, इ इ लागते, त्यांचा नि लिंगाचा काही एक संबंध नाही.

(माझ्या व्यक्तिगत मताने याला फक्त खालिल अपवाद आहेत -
Unless made clear otherwise through explicit declaration right at the beginning of marriage -
१. मुलाच्या जन्मावेळी स्त्रीयांनी सारे व्यक्तिगत फायदे आवश्यक असल्यास बाजूला ठेवणे. यात नोकरी आली, पदे, प्रमोशने, पैसे, इतर फायदे, इ इ सगळे आले. शिवाय जो डोक्टरही सांगू शकत नाहीत तो स्त्रीयांच्या जीवालाच होणारा ऐनवेळीचा धोका देखिल आला.
२. मुल जोपर्यंत सज्ञान होत नाही तोपर्यंत पालकांनी कोणतेही कॉंप्रो न करता त्याच्या सार्‍या आर्थिक, सामाजिक, मानसिक, वेळ देण्याच्या, इ इ गरजा समाधानकारक रित्या पूर्ण करणे. यातही स्त्रीयांनी मुले विशेषतः लहान असताना जास्त सहभाग घेतला पाहिजे.)

जेव्हा पुरुषप्रधानतेवर टिका होते, तेव्हा त्यात एकूण पुढील प्रमाणे काही म्हणायचे असते - "पुरुष स्वतःच्या स्वार्थासाठी नि स्त्रीया ब्रेन वॉश झाल्याने कुटुंबात पुरुषांच्या हितांचे निर्णय घेतात, जेणेकरून स्त्रीयांवर अन्याय होतो." यात लक्षात घ्यायची गोष्ट ही आहे कि टिका पुरुषप्रधानतेवर, तिच्या इंट्रींसिकली (अंतर्भूत) अन्याय्य असण्यावर आहे. शब्दा मग इथे कुटुंबचालकांचे चार प्रकार पडतात १. पुरुषप्रधानवादी पुरुष २. अशीच स्त्री ३. पुरुषप्रधानवादी नसलेला पुरुष ४ अशीच स्त्री.

यातल्या आंतर्भूत शब्दावर मला आपत्ती आहे. उदा. १. मुलीने लग्नानंतर मुलाघरी जायचे नि २. मुलाने लग्नानंतर मुलीघरी जायचे हे दोन आणि दोनच पर्याय असतील आणि त्यातला क्रमांक एक समाजाची निवड असेल तर तो अन्याय ठरत नाही. (इथे दरवेळी भांडायची तेव्हा समाजात इच्छा नव्हती असे धरू.)
(इथे मला पहिला प्रश्न पडतो - "आम्ही पुरुषप्रधानवाद्या पुरुषांसारखे नाही पण आम्हीच (मीच, पुरुषच) घर चालवू" असे म्हणणारे पुरुष वास्तविक पुरुषप्रधानवादी असतात का?)

शिवाय पुरुषप्रधानवाद्यांवर टिका करताना त्यात बर्‍यापैकी रास्तपणा, सच्चेपणा असावा. म्हणजे आडनाव बदलले अन्याय म्हणता येईल, गुन्हा म्हणता येईल का? नाही. शिवाय अन्याय म्हणताना देखिल थोडा विचार करावा. म्हणजे कोणाच्याही नातेवाईकांत ५०% स्त्रीया असतात. त्यांची (वा पुरुषांचीही)नावे वाचताना होस्टेलच्या सदस्यांची नावे वाचतोय इतकी भिन्न दिसू नयेत. कोणत्या लिंगाचा व्यक्ति लग्नापूर्वी व लग्नानंतर कोणत्या कोणत्या पालकांची किती किती मधली नावे नि आडनावे लावतोय याने घोळ होईल. उदा. अशी नावे ८-१० पिढ्या वापणारांना "तुम्ही मुळचे कुठले?" हा प्रश्न विचारला तर तो "इनव्हॅलिड क्वेश्चन" होईल. मला कोणतेही कपडे आवडत असले तरी कंपनीत जाताना मला तिचे नियम वापरून त्यांच्या संकेतांत बसणारे कपडे घालावे लागतात. आज कंपनी ही एकत्र कुटुंबाचे दुसरे नाव आहे.

शिवाय लिंग एकटेच सारे काही ठरविते हे गृहितक नकळत धरले जाते. नाते, इ देखिल फार महत्त्वाचे असतात. मुलीची मुलगी जनरली भावाच्या मुलापेक्षा प्रिय असते. म्हणून पुरुषप्रधान म्हणून टिका करताना "दिसताक्षणी गोळी घालण्याचे आदेश" पाळू नयेत.

असो. आता प्रश्न येतो कि विभक्त कुटुंबांत, ज्यांत दोन्ही सदस्य (व नंतर येणारी मुले)कोणतीही लिंगप्रधानता पाळत नाहीत त्यांनी निर्णय कसे घ्यावेत? कुटुंब रडरलेस असू शकत नाही. खालिल प्रश्न उद्भवतात -

पून्हा लक्षात घ्या खालील मुद्दे उपस्थित करताना सदस्यांचा स्वार्थ नाही आणि समजूतदारपणा त्यांना शक्य तितका आहे.
१. सहजीवन प्रारंभ करण्यापूर्वी दोघांनी संपूर्ण आयुष्यात महत्त्वाच्या डिसिजन्सवर काय भूमिका असेल यावरचे सारे प्रमुख मतभेद मिटवले पाहिजेत का? ते रेकॉर्ड केले पाहिजेत का?
२. दोघांनी आपापल्या कमाईचे पैसे सवते ठेवले तर - पैसे उसने कधी द्यायचे? व्याज इ लावायचे का? परत घ्यायचे का? एकमेकांना सांगायचे का?
३. नेहमी नात्यासाठी एक्झिट प्रोसिजर बनवून ठेवायची का? कोणाचे असेट कोणते असतील? मुले कोणाची असतील?
४. बायकोला अजून एक मूल नको, नवर्‍याला हवे. दोघांचे (खूप हुशार असल्याने) बरेच, बराच वेळ युक्तिवाद होणार. काय करायचे? हेच मुलाचे शिक्षणाचे मिडियम, परदेशी पाठवायचे कि नाही, इ इ बर्‍याच बाबतीत झाले तर? अशा बाबतीत केवळ एक निर्णय होऊ शकत नाही म्हणून घटस्फोट घ्यायचा का?
५. शेवटी मीच का पडती बाजू घ्यायची असे प्रत्येकाला वाटू लागले तर? हा निर्णय मी करणार, पुढचा तू, ही स्टाईल विचित्र नाही का?
६. निर्णयप्रक्रियेच्या अवघडपणामुळे एका जीवनात १-२/३-४/४-५ घटस्फोट नॉर्मल जरी मानले तरी घटस्फोट टू घटस्फोट काळात देखिल निर्णय फार सुखाने घेतले जातील अशी शाश्वती आहे काय?
७. बायकोला तिच्या माहेरी जायचेय, नवर्‍याला त्याच्या, पैसे नि सुट्या लिमिटेड असतात, दोन्ही आजीआजोबांना नातवंडे पाहायचीत. दोन्हीकडे काहीतरी महत्त्वाचं आहे. कोणीही माघार घेत नाहीय. काय करणार?
८. बायकोचा कझिन (वा एक मित्र) नवर्‍याला आवडत नाही, नवर्‍याचा कझिन बायकोला अजिबात आवडत नाही. पण त्यांना एकमेकांशिवाय करमत नाही. कसे ठरवणार कोण, कधी घरी येणार?
९. कॉमन खर्च कोण किती करणार? दुसर्‍याने त्याचे पैसे कसे खर्चावे, खर्चून नये वा गुंतवावे हे पहिल्याला नाही आवडले तर?
१०. बायकोने सिग्रेट प्यायला चालू केली. या विषयावर दोघांची काय स्वातंत्र्ये आहेत यावर पूर्वी काही चर्चा झाली नव्हती. हे नव र्‍याला अजिबात खपले नाही. कोणाकडे दाद मागणार?
११. नवर्‍याला बरेच पैसे देवाला वाहायचे आहेत. बायकोला पसंद नाही. काय करणार?

घर ही महत्त्वाची संस्था नाही का? इथे काय निर्णय घेतले जातात त्याने सदस्यांचे सुख ठरत नाही का? जिथे एकवाक्यता आहे तिथे प्रश्न नाही. जिथे मेरिट आहे तिथे पार्टनर कौशल्य मान्य करून निर्णयांचे अधिकार देईल. पण जिथे इच्छांमधे, अधिकारांमधे, स्वतःला एखाद्या विषयात किती अक्कल आहे याच्या जाणिवेत दोहोंत बराच फरक असू शकतो. शिवाय कोणत्याही दोन व्यक्तिंच्या जीवनाच्या सामान्य कल्पनांतील तफावत हे डायरेक्ट त्यांच्या शिक्षणाचे नि पुढील एक्सपोझरचे फंक्शन आहे नि कालाप्रमाने ही तफावत वाढणारच आहे.

सध्याला तरी संपूर्ण जगात पुरुषप्रधानतेचा सूर्य अगदी डोक्यावर आहे. माझा असा कयास आहे कि सांप्रतकालीन बहुसंख्य पुरुषप्रधानतेचा विरोध करणार्‍या स्त्रीया (काहीवेळा असे पुरुष) केवळ कशाचा विरोध फॅशन मधे आहे हे पाहून त्या गोष्टींवर फोकस करतात. वडीलांची संपत्ती त्यांच्या नि आईच्या नावावर करणे, ही संपत्ती वारश्याने मुलींनाही समान प्रमाणात मिळणे, असे नसेल तर सासरचा वारसा मुलगी असल्याप्रमाणे (नवर्‍याला तसेच स्वतःला वेगवेगळा) मिळणे, मूल जन्मण्यापूर्वी न नंतर मिळून किमान दोन वर्षे संपूर्ण फायदे नि संपूर्ण पगार मिळणे सुट्टीसहित मिळणे, आपल्या पालकांना आपल्याजवळ ठेवण्याचा अधिकार असणे, आपले काही उत्पन्न त्यांना देण्याचा अधिकार असणे, चांगल्या नोकर्‍या सोडाव्या लागतात अशा बदल्या टाळणे, आपल्या उत्पन्नाचा हिशेब नवर्‍यापासून वेगळा ठेवणे, घरगुती निर्णयांची लेडिज लिस्ट व कंकरंट लिस्ट बनवणे हे खरे विषय असायला हवे. हे फार बेसिक झालं. यानंतर त्या वर दिलेल्या ११ उदाहरणांसारख्या निर्णयप्रक्रिया.

मग माझा एक साधा प्रश्न आहे - "पुरुषप्रधानते मुळे होणारा अन्याय" नि "आजकालच्या समताप्रधान कुटुंबांच्या निर्णयप्रक्रियांच्या जटिलतेतून निर्माण होणार्‍या ताणतणावांमुळे होणार अन्याय" यांची आपण कधी तुलना केली आहे काय?

नि अजून एक - केवळ एक मानव एका भिन्न लिंगाचा आहे म्हणून त्यावर अन्याय करायचा असतो अशी माणसाची मानसिकता इव्हॉल्व झाली आहे का?

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
2.2
Your rating: None Average: 2.2 (5 votes)

पहिल्या टू मिनिट्समधेच मॅगी नूडल्स झाल्या डोक्यात.

पण शेवटचे प्रश्न वाचल्यावर असं वाटलं की हे सर्व आधीच ठरवण्याइतका, रेकॉर्ड करण्याइतका, रिव्ह्यू करण्याइतका समजूतदारपणा आपसांत असेल तर मूळ चर्चाविषयच रद्दबातल ठरेल. तो नसतो हीच तर बोंब आहे ना.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गविजी, विषय मानवी मनाच्या समजूतदारपणाचा नाही. प्रचलित वा निवडलेली व्यवस्था (सिस्टीम) कोणती आहे (पुरुषप्रधान, स्त्रीप्रधान, अप्राधान्यवादी)याचे सुखाने कुटुंब चालवण्यासाठी काही तांत्रिक, अब्सॉल्यूट फायदे नि तोटे आहेत. सबब विषय ते चर्चिण्यासाठी आहे.

पण समजूतदारपणाच चर्चायचा झाला तर मी खालिलप्रमाणे म्हणतो - लिंगप्रधान संस्कृतीत अगदी कमी समजूतदार असलेले लोकही व्यवस्थेचा भाग बनतील. लॉ अँड ऑर्डर नीट राहिल. हेच कमी समजूतदार लोक अप्राधान्यवादी सिस्टिममधे असतील तर उभ्या आयुष्यात (irrespective of number of divorces) सुखी असू शकणार नाहीत. इथे घटस्फोटांच्या संख्येला शून्य महत्त्व दिले नि केवळ रुटीन आयुष्याचे सुख पाहिले तर ही सिस्टीम फेल दिसेल.

इथे अप्राधान्यवादी "लिंगप्रधानता हाच अन्याय" असे म्हणतील. पण मला त्यात मेरीट आहे असे वाटत नाही. काही कितीही टाळली तरी समाजातून वयप्रधानता (अकारण), अनुभवप्रधानता (कपल्ड विथ दुर्गुण स्वीकर), व्यक्तित्वप्रधानता (कपल्ड विथ क्षमताहिनता), प्रांतप्रधानता (अकारण), शरीरप्रधानता (देवाने दिलेली), बुद्धिप्रधानता (कपल्ड विथ अन्याय करण्याची वृत्ती), इ इ आपण टाळू शकतो. म्हणजे काय अशी प्रधानता अयोग्य ठरतात का? त्यांचे फायदेच जास्त आहेत.

माझा प्रयत्न पुरुष कसे श्रेष्ठ आहेत, पुरुषप्रधानता ही स्त्रीप्रधानतेपेक्षा चांगली कशी इ इ सांगण्याचा नाही. स्त्रीप्रधानता असली तरी कै वाइट नाही फक्त ट्रांझिशन कॉस्ट जास्त नको नि रस्ता भटकायला नको. As a system, patriarchy is not unfair and not at all intrinsically iniquitable; rather it could be technically a better choice of lifestyle looking at increasing difference in the life attitudes of modern society.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

एतत्सम विचार करणार्‍या लोकांचा विरोध हा पुरुषांना नसून पुरुषप्राधान्याला आहे

बापरे! इतके दिवस चर्चा होऊनही आता हे कळले? असो.

व्यक्तीगत अपवादांवर बोलत नाही कारण ती व्यक्तीगत मते आहेत.

बाकी प्रश्न हे एकमेकांत सामंजस्य नसेल तर! या मुद्द्याभोवती केंद्रीत आहेत. ते नसले तर कोणत्याही प्रकारच्या दोन व्यक्तींनी संसार चालु ठेऊ नये असे माझे मत आहे. (मुळात अशा व्यक्तींनी एकमेकांशी लग्नच करू नये, पण आधी सगळे गुण समजत नाहीत - लव मॅरेजमध्येही नाहीत कारण दोघांचे रोल्स वेगळे असतात)

सामंजस्य व परस्परांबद्दल मर्यादेत आदर असेल तर हे प्रश्न सामंजस्याने सुटतात. एकमत होणे हे प्रसंगी वेळखाऊ असेलही पण प्रत्येक प्रश्नात शक्य असते. आम्ही गेली ३०+ वर्षे (त्याआधीही बहुदा ३++वर्षे) हा "सर्वानुमते" नावाचा खेळ ५-६ जणांच्या कुटुंबात खेळत आहोत. कष्टाचे आहे पण त्यातच मौज आहे. वरचे प्रीरिक्विसिट पार केले (सामंजस्य व परस्परांबद्दल आदर) तर कोणाही एकाचेच मत एकमेकांवर न लादता चर्चेने प्रत्येक प्रश्न सुटतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

बापरे! इतके दिवस चर्चा होऊनही आता हे कळले? असो.

जास्त हिरो बनायचं काम नाय !!! प्रत्येक पुरुषप्राधान्याला असलेला विरोध हा अंततः पुरुषांनाच असतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

प्रत्येक पुरुषप्राधान्याला असलेला विरोध हा अंततः पुरुषांनाच असतो.

ROFL
ROFL ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

र्‍याडिकल फेमिनिष्ठांपुरते तरी हे वाक्य १००% खरे आहे अन सध्या त्यांचीच चलती आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

त्यांची चलती नाहीये हो.

म्हणजे इथे संस्थळावर कायबी असो. जगात त्यांची "चलती आहे" असं म्हणण्यासारखी परिस्थिती नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

बरोबर. मीडियात बर्‍याच अंशी ते लोक वरचढ दिसतात मात्र.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मिडीयाचे माहिती नाही इथे ते वरचढ असल्यासारखे भासतात कारण त्यांच्या मुद्द्यात अनेकदा दम असतो Blum 3 (आता पळतो! Wink )

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

चर्चा 'र्‍याडिकल' फेमिनिष्ठांबद्दल चाललीये हे नमूद करणे गरजेचे आहे. त्यांच्या मुद्यांत दम आहे असे वाटत असेल तर मी धाग्यावरून रजा घेतो. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

बरोबर.

जेव्हा मनासारखं होत नसतं तेव्हा माणूस पुन्हा पुन्हा आपले मत मांडतो. जगात श्रद्धाळूंची चलती आहे म्हणून पुरोगामी लोक आपले मत हिरिरीने मांडतात. म्हणून संस्थळांवर ते जास्त व्हिजिबल दिसतात. पण वास्तव जगात ते पराभूतच असतात.

असो. चर्चेतला हा फाटा अवांतर आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

म्हणून संस्थळांवर ते जास्त व्हिजिबल दिसतात. पण वास्तव जगात ते पराभूतच असतात.

मोदी समर्थकांबद्दल हे बरोबर आहे का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

हो.....

जोवर मोदी सत्तेत आले नव्हते तोवर ते हायली व्हिज़िबल होते.
आता ते कमी दिसतील (आपण जिंकलो हे पुरेसे आत मुरल्यावर). आता मोदी विरोधक जास्त दिसू लागतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मोदी समर्थकांबद्दल हे बरोबर आहे का?

मोदी समर्थक यशस्वी असते तर ते यूपीएच्या धोरणांमुळेच यशस्वी असते. अयशस्वी असल्यानेच त्यांनी मोदींना निवडून देऊन यशस्वी होण्याच्या दिशेने प्रयत्न केले आहेत असा समज आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हम्म सहमत. आपका मुद्दा और अवांतर फाटा, दोनोंसे..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

सामंजस्य व परस्परांबद्दल मर्यादेत आदर असेल तर हे प्रश्न सामंजस्याने सुटतात.

मला आशा आहे कि 'पुरुषप्रधान घरातील सदस्य समंजस नसतात.' व 'लिंगप्रधानता नसलेल्या घरांतील लोक समंजसच असतात.' असे वैगेरे शोध या वाक्यातून अभिप्रेत नाहीत.

समजा माझ्या घरात पुरुषप्रधानता आहे नि माझ्या बायकोच्या घरात (माहेरी) देखिल आहे. मी नि तिचा भाऊ दोघेही समंजस आहोत. दोहोंची परिस्थिती समान आहे/नाही.
नि
तुमच्या घरात लिंगप्रधानता नाही नि बायकोच्या माहेरीही नाही. आपण नि तिचा भाऊ दोघेही समंजस आहात. दोहोंची परिस्थिती समान आहे/नाही.

काय फरक पडतो?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

बाकी एक राहिलं
कुटुंब काय घर काय ही "संस्था" आहे असे मानले तर त्याचे चालक/मालक/पालक असे प्रश्न उद्भवण्याची शक्यता निर्माण होते. कुटुंब ही सर्वाची विविध गोष्टींसाठी निर्माण झालेली सद्य सोय आहे इतपत सगळ्यांना मान्य असलं की 'माझं कुटुंब' जाऊन 'आमचं कुटुंब' हा प्रवास सुलभ होतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

लेखाला ५ स्टार श्रेणी दिली आहे. [लेखाच्या मांडणीसाठी].

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मांडणी उत्तम आहे. खरे आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खालचा मुद्दा कळीचा दिसतो आहे, त्यामुळे त्यावरिल माझे मत -

मग माझा एक साधा प्रश्न आहे - "पुरुषप्रधानते मुळे होणारा अन्याय" नि "आजकालच्या समताप्रधान कुटुंबांच्या निर्णयप्रक्रियांच्या जटिलतेतून निर्माण होणार्‍या ताणतणावांमुळे होणार अन्याय" यांची आपण कधी तुलना केली आहे काय?

दोन्हीही व्यवस्थाच आहेत, पहिली व्यवस्था एकाच लिंगाचे 'वैचारीक' स्वातंत्र्य अबाधीत असल्याचा संकेत देते, तर दुसरी व्यवस्था किमान दोघांचे 'वैचारीक' स्वातंत्र्य अबाधीत असल्याचा संकेत देते, हि सोय व्यवस्थेत आहे पण त्याचा अर्थ व्यवस्था(पहिला अथवा दुसरी) राबवणारे वैचारीकरित्या सक्षम असतीलच असे नाही त्यामुळे पहिल्या किंवा दुसर्‍या व्यवस्थेत ताण निर्माण होणे सहज शक्य आहे पण त्यांची तुलना करण्यासाठी पुरेसा विदा उपलब्ध होणे गरजेचे आहे, तो दुसर्‍या व्यवस्थेसाठी पुरेसा उपलब्ध आहे असे मला वाटत नाही.

केवळ एक मानव एका भिन्न लिंगाचा आहे म्हणून त्यावर अन्याय करायचा असतो अशी माणसाची मानसिकता इव्हॉल्व झाली आहे का?

वर्चस्व गाजवण्याची मानसिकता उत्क्रांतीमुळे मानवात निर्माण झाली असावी असे म्हणण्यास वाव आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वर्चस्व गाजवण्याची मानसिकता उत्क्रांतीमुळे मानवात निर्माण झाली असावी असे म्हणण्यास वाव आहे.

एकाच स्पेसित एका लिंगाने दुसर्‍या लिंगावर?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

एकाच स्पेसित एका लिंगाने दुसर्‍या लिंगावर?

'बळी तो कान पिळी'

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बिचार्‍या बळीराजाने कधी कुणाचा कान पिळल्याचे आठवत नाही. वामन मात्र उगा येऊन पाताळात दाबून गेला त्याला. हे उत्तरेकडचे लोक असेच! जर्रा कुणाला दाक्षिणात्यांचं बरं म्हणून झालेलं बघवत नाही. लंकस्थ दशग्रंथी ब्राह्मणांच्या जिवावर उठलेले ते अयोध्येकरही असेच!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

मग, म्हणजे ही जर पुरुषाची उत्क्रांत भावना असेल तर नि त्याधारे त्यांनी पुरुषप्रधान समाज बनवला असेल व आजही ते तसेच वागू इच्छित असतील तर त्यात त्यांचा काय दोष? ते जसे बनले आहेत वा नैसर्गिक रित्या ते जसे आहेत तसेच ते वागत आहेत. त्यांनी थोडेच स्वतःला तसे उत्क्रांत करून घेतले आहे.

मला वाटते अशी विचारसरणी गोल गोल फिरवून संभ्रम निर्माण करते. "पुरुषप्रधानताच अन्याय्य आहे" असे म्हणत उत्क्रांतीपर्यंत जाताना शेवटी "पुरुष काही चूक करत नाहीयेत." असे मान्य करावे लागते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

त्याअर्थी इतर कुठल्याही लिंगाच्या कुठल्याच वागण्यावर टिका करता येणार नाही हे ही मान्य आहे काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझी भूमिका -
कुटुंबाचे निर्णय पुरुषांनी घेतले तर ते कोणत्याही लिंगावर अन्यायकारक नसतील.

विरुद्ध भूमिका -
पुरुषांकडेच मुख्य निर्णयाधिकार असणे "आंतर्भूतरित्या" स्त्रीयांसाठी अन्यायकारक आहे.

म्हणून मी विचारले कि याचा स्रोत उत्क्रांतीत आहे असे त्यांना वाटते का? असेल तर मग पुरुषांचा दोष कसा? त्यांना देवाने बनवले तसे ते वागताहेत. नसेल तर "अंतर्भूत अन्याय" आहे म्हणणे चूक. यात माझे स्वतःचे काहीच मत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

समजा एका लिंगनिरपेक्ष कुटुंबात एक जोडीदार, क्ष, दुसर्‍या जोडीदाराच्या, य च्या , १५०% कमावतो. त्यासाठी त्याने हा आग्रह धरला कि कुटुंबातील सर्व आर्थिक सुखांचे समान अधिकार हवे असतील तर य ला घरात अधिक काम करून ते कंपेनसेट करायला लागेल. अशा भूमिकेस आपण असमंजस म्हणाल काय? असे असमंजस म्हणणे basic priciples of justice च्या विरुद्ध जात नाही का?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

चीज फ्लेवरचे पॉपकॉर्न भारी लागतात. असतील कोणाकडे तर घेऊन येणे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

मला कॅरमलाईज्ड आवडतात.
तुम्हाला चाल्णार असतील ते माझ्याकडे आहेत, पण त्याचा उपयोग इथे होईलसे वाटत नाही. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

पॉपकॉर्न खाताय, सावधान. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

basic priciples of justice

ती कोणती?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी जास्त कमवत असेल तर दुसर्‍याने घरात जास्त खपावे. मी का फुकट माझे कष्ट दुसर्‍यावर उधळू?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

aka गब्बर सिंग

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

१-११ प्रश्न दोन व्यक्तींमध्ये असणारे प्रश्न आहेत, समाजाचे नाहीत. किंवा मोठ्या प्रमाणातल्या व्यक्तींचे नाहीत. त्याची उत्तरंसुद्धा सरसकटीकरणाने देता येणारी नाहीत. व्यक्तींनी आपापली सोडवायची आहेत. या चर्चेत एकेकट्या व्यक्ती आणि व्यक्तींचा समूह - समाज - यांच्यात गल्लत केलेली जाणवते.

"पुरुष स्वतःच्या स्वार्थासाठी नि स्त्रीया ब्रेन वॉश झाल्याने कुटुंबात पुरुषांच्या हितांचे निर्णय घेतात, जेणेकरून स्त्रीयांवर अन्याय होतो."

हे सोपं स्पष्टीकरण आहे, प्रत्यक्षात यापेक्षा बऱ्याच जास्त गुंतागुंतीच्या गोष्टी घडतात. प्रत्येक पुरुष, प्रत्येक वेळी स्वार्थासाठीच पुरुषांच्या हिताचा+स्त्रियांसाठी अन्यायकारक निर्णय घेतो असं नाही. पुरुषही ब्रेनवॉश्ड असतात. उदा - लग्नानंतर आडनाव बदलणं. अनेक पुरुष यातल्या असमानतेची जाणीव करून दिल्यानंतर आडनाव न बदलण्याचा आग्रहही धरतात.
स्त्रियासुद्धा व्यक्तिगत फायद्याचा विचार करताना इतर स्त्रियांवर अन्याय करतात. उदा. - एकत्र कुटुंब पद्धतीत चालणारं स्वयंपाकघरातलं राजकारण (kitchen politics) स्त्रिया स्वतःच्या, व्यक्तिगत फायद्यासाठी, सत्तेतला जास्तीतजास्त वाटा मिळवण्यासाठी करत असतात. इतपत क्षुद्र विचार - आपल्या इतर नातेवाईक स्त्रियांवर अन्याय - करण्याची वेळ पुरुषप्रधान संस्कृतीमधल्या व्यवस्थेमुळे आलेली असू शकेल, पण त्यात स्वार्थ असतो हे नाकारता येत नाही.

"पुरुषप्रधानते मुळे होणारा अन्याय" नि "आजकालच्या समताप्रधान कुटुंबांच्या निर्णयप्रक्रियांच्या जटिलतेतून निर्माण होणार्‍या ताणतणावांमुळे होणार अन्याय" यांची आपण कधी तुलना केली आहे काय?

पुरुषप्रधानतेमुळे होणारा अन्याय काय हे मला स्वच्छ समजतं. पण "आजकालच्या समताप्रधान कुटुंबांच्या निर्णयप्रक्रियांच्या जटिलतेतून निर्माण होणार्‍या ताणतणावांमुळे" नक्की काय प्रकारचा "अन्याय" होऊ शकतो याबद्दल कुतूहल आहे. मोल्सवर्थमध्ये अन्याय या शब्दाचा अर्थ असा दिलेला आहे -
अन्याय (p. 031) [ anyāya ] m (स) Injustice, iniquity, impropriety, wrong. 2 A fault, offence, crime.
सगळ्यांना समान हक्क असताना जे ताणतणाव निर्माण होतात, त्यातून आपल्याला डावललं गेल्याची भावना निर्माण होऊ शकते, हे सगळं समजलं तरीही अन्याय कसा होतो हे लक्षात आलं नाही.

नि अजून एक - केवळ एक मानव एका भिन्न लिंगाचा आहे म्हणून त्यावर अन्याय करायचा असतो अशी माणसाची मानसिकता इव्हॉल्व झाली आहे का?

नाही. आपल्या सुखचैनीसाठी वेळप्रसंगी दुसऱ्या कोणत्याही व्यक्तीचा बळी गेला तरी चालेल, अशी मानसिकता असते. ती बहुतेक सगळ्याच स्त्री-पुरुषांची असते. (नसते त्यांना संत म्हणतात. उदा. - 'जे का रंजले गांजले...') "स्त्री ही स्त्रीची शत्रू असते" अशासारखी मिथकं प्रस्थापित झालेली आहेत, पण आजही आजूबाजूला पाहिलं तर पुरुषही दुसरी व्यक्ती पुरुष आहे म्हणून मुद्दाम मदत करायला जातात, निदान पाय खेचत नाही असं दिसेलच असं नाही. आपापल्या नात्यागोत्यांमध्ये, संबंधित लोकांशी प्रेमाचं वर्तन असतं, तेवढंच. त्यातही सत्तासंघर्ष असतातच. वेळप्रसंगी, मुघल राजपुत्रांनी आपल्या सख्ख्या बाप-भावांची कत्तलही केलेली आहे.

असं असूनही, बहुतेकदा मनुष्य स्वतःपुरता विचार करत असूनही, मोठ्या प्रमाणावर स्त्री-पुरुष असमानता का निर्माण झाली, मोठ्या प्रमाणावर पुरुष शोषक आणि स्त्रिया शोषित अशा जाती का निर्माण झाल्या याचा मोठा इतिहास आहे. आणि एका प्रतिसादात मांडता येईल असा त्याचा आवाका नाही. म्हणून तुमच्या प्रश्नाचं सोपं उत्तर - नाही - असं आहे.

---

अवांतर - कालच वाचनात आलेला हा दुवा. इथे साधारण तीच चर्चा सुरू आहे म्हणून इथे डकवला आहे.
Indian women will never be equal as long as these 9 laws remain on the books

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.