Skip to main content

.

.

आडकित्ता Fri, 02/12/2011 - 01:46

अथवा लेखात १०% पेक्षा जास्त इंग्रजी अक्षरे वापरू नयेत.
धन्यवाद!

सोकाजीरावत्रिलोकेकर Fri, 02/12/2011 - 10:34

भरमसाठ माहितीच्या ओझ्यामुळे धागाकर्त्याला नेमके काय म्हणायचेय से समजून घ्यायच्या फंदात पडलो नाही.
माहितीचा फाफट्पसारा कमी करून जर 'वाचले जावे' अश्या प्रकारे लिहीले असता लेख वाचनीय झाला असता.

असो एक चांगला विषय फु़कट घालवल्याबद्दल धागाकर्त्याचा निषेढ....

- (निरपेक्ष) सोकाजी

चेतन सुभाष गुगळे Sat, 03/12/2011 - 20:55

In reply to by संगणकस्नेही

तसं मी वरती कंसात स्पष्टीकरण दिलेलं आहेच तरी पुन्हा एकदा आपण http://www.aisiakshare.com/node/261?page=1#comment-4261 ही प्रतिक्रिया वाचावी. इथे ह्या ले़खावरील माझ्या प्रतिसादावर दोन सदस्यांनी प्लॅटोनिक लव्ह या संकल्पनेवर अविश्वास दाखविला आहे त्या अनुषंगाने ही माहिती तिथेच मांडावयाची होती परंतु एकतर माहितीचा आवाका मोठा आहे व ती त्या मूळ लेखातील विषयाला काहीशी अवांतर आहे. असे असेल तर संपादक नंतर त्यास अन्यत्र हलवून पुन्हा वेगळा धागा करतात (जसे माझ्या भारताला गरज भरताची ह्या लेखावरील श्री. अशोक पाटील यांची अनुकंपा तत्वावरील नोकर्‍यांसंदर्भातील प्रतिक्रिया हलवून पुन्हा वेगळा धागा काढला होता). संपादकांचे हे भावी कष्ट वाचविण्याकरिताच मी हा विषय स्वतंत्र धाग्यावर टाकला.

वस्तूत: हा माझा स्वतंत्र लेख नसून ती एक संदर्भाकरिता दिलेली संग्रहीत / संकलित माहिती आहे व त्यावर माझे स्वत:चे असे अगदीच थोडेसे विवेचन आहे. तेव्हा मी या लेखाचा लेखक नसून माहितीचा संकलक आहे असे म्हणणे योग्य ठरेल.

आपल्या निराशेबद्दल दिलगीर आहे. पण इथे या अनुषंगाने चर्चा व्हावी असा माझा उद्देश आहे. या विषयावर मी माझे मत थोडक्यात या लेखातच मांडले आहे. इतरांनीही त्यांची मते मांडावीत अशी अपेक्षा आहे. थोडक्यात हा एक खुला चर्चाप्रस्ताव आहे. म्हणजे विचारांना आताशी सुरूवात झाली असून इतरांनीही त्यात सहभाग नोंदविल्यावरच त्यास पूर्णत्व येईल. अशा प्रकारे इतरांच्या सहभागाने पूर्णत्वास जाणारे धागे यापूर्वी अनेक मान्यवर सदस्यांनी टाकले आहेत. अर्थात माझा मात्र अशा प्रकारचा हा पहिलाच धागा आहे.

त्याशिवाय "शारिरीक प्रेम / गरज" या (काहीशा धाडसी) विषयावर अलीकडे विपुल लेखन होत असून मानसिक / भावनिक / वैचारिक / बौद्धिक गरजांकडेही (कुणाला हे नॉन ग्लॅमरस / डाऊन मार्केट ही वाटू शकते) लोकांचे लक्ष वेधले जावे व त्या अनुषंगाने त्यांनी आपली मते मांडावीत असे माझे आग्रही प्रतिपादन आहे.

नंदा प्रधान Fri, 02/12/2011 - 16:21

नुसत्या लिंक्स वाचून काहीच अर्थबोध होत नाही.लेखकाने या लिंक्स वाचून त्यावर स्वतःची मते मांडली असती तर ते अधिक आवडले असते.

चेतन सुभाष गुगळे Fri, 02/12/2011 - 17:28

In reply to by नंदा प्रधान

मी सर्व लिंक्स वाचलेल्या असून त्यापैकी मला पटलेले विचार ह्या उपशीर्षकाखाली जे विचार मांडले आहेत त्यांच्याशी मी सहमत आहे. या विषयावरील माझं हेच मत समजावं.

मनीषा Fri, 02/12/2011 - 19:32

खूपच complicated दिसतय हे प्रकरण ..

मला " हमने देखी है उन ऑखोंकी ... " आणि " छुपा लो यु दिल में..." ही दोन्ही गाणी आवडतात.

स्मिता. Fri, 02/12/2011 - 19:34

लेख जरी माहिती आणि लिंकांचा भडिमार असला तरी तो कोणत्या अनुशंगाने आलाय हे माहिती असल्याने त्यातल्या भावना समजल्या.
मला व्यक्तिशः असं वाटतं की एका स्त्री आणि पुरुषात शारिरीक आकर्षणाशिवायही प्रेम असू शकतं. प्रत्येक पुरुष प्रत्येक (पर) स्त्रीबद्दल मनात एकाच पद्धतीचा विचार करतो हे विधान मला अगदी टोकाचे वाटते.
बाकी स्त्री आणि पुरुषात शारिरीक आकर्षणाखेरीज इतर भावना असूच शकत नाही असे मानणार्‍यांपुढे जास्त न बोललेलेच बरे.

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 02/12/2011 - 20:09

In reply to by स्मिता.

लेख फारसा वाचवला नाही. त्या निमित्ताने 'खामोशी'ची गाणी पुन्हा एकदा ऐकली. शारीरिक हा शब्दच अशुद्ध लिहील्यामुळेही असेल. शिवाय "शारिरीक प्रेम" असा शब्दप्रयोग कानाला खटकला, "शारीर प्रेम" हा शब्दप्रयोग ठीक वाटतो.

एका स्त्री आणि पुरुषात शारिरीक आकर्षणाशिवायही प्रेम असू शकतं. प्रत्येक पुरुष प्रत्येक (पर) स्त्रीबद्दल मनात एकाच पद्धतीचा विचार करतो हे विधान मला अगदी टोकाचे वाटते.

स्त्री आणि पुरूषांमधे मैत्री असूच शकते, असते; पण त्यात काही प्रमाणात शारीर आकर्षणाचाही भाग असतो असं काहीसं माझं मत आहे. सज्जनांच्या मैत्रीत शारीर आकर्षण बाजूला ठेवून मैत्री रहाते, क्वचित कधी आपल्या आकर्षणाच्या भावनेवर ताबा ठेवता येत नाही. मैत्री आहे म्हणून आकर्षण नाहीच असं म्हणणं कठीण आहे.

बाकी चालू द्या.

१. शारीरिक, मानसिक, ऐच्छिक, इ. "इक" हा प्रत्यय आहे, 'ईक' नाही.
इथे आई, बहीण अशा नात्यांचा विचार केलेला नाही.

चेतन सुभाष गुगळे Sat, 03/12/2011 - 11:12

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

लेख फारसा वाचवला नाही. >>

स्वतंत्र असा ले़ख नव्हेच हा. ही ह्या विषयावरील वेगवेगळ्या ठिकाणाहून एकत्र केलेली माहिती आहे. ह्या निमित्ताने ह्या विषयावरील सदस्यांची मते जाणून घेण्याचा प्रयत्न आहे.

स्त्री आणि पुरूषांमधे मैत्री असूच शकते, असते; पण त्यात काही प्रमाणात शारीर आकर्षणाचाही भाग असतो असं काहीसं माझं मत आहे. >>

हे असं का होतंय ठाऊक आहे? कारण स्त्री पुरूष शारिरीक आकर्षणामुळे जवळ येतात हे अनेक वर्षांपासून आपण पाहत / ऐकत / वाचत आलोय त्यामुळे आपल्या मनावर बसलेला हा एक पगडा आहे. दोन स्त्रियांमध्ये किंवा दोन पुरुषांमध्ये असलेल्या मैत्री विषयी आपण असा संशय कधी यापूर्वी घेत नसायचो परंतू एक स्त्री व एक पुरूष यांच्यात मैत्री असली की ती कितीही विशुद्ध असली तरी कुणाला तरी असा संशय हटकून येत असे.

आता गेल्या काही वर्षांपासून समलिंगी संबंधांच्या चळवळी आक्रमक झाल्यात. पाश्चात्यांनी तर यावर अनेक साहित्य व चित्रपट निर्मिती केली परंतू देशी लोकांनीही या विषयाला चित्रपट व साहित्यातून लक्षणीय प्रसिद्धी दिली आहे. त्यामुळे असे संबंध असतात असे एकदाचे उर्वरित समाजाने मूकपणे मान्य केले आहे. त्यामुळे गंमत अशी झालीय की दोन पुरुषांच्या किंवा दोन स्त्रियांच्या घनिष्ठ मैत्रीलाही आता संशयाच्या चष्म्यातून बघितले जाऊ लागलेय.

नुकत्याच येऊन गेलेल्या यशराज फिल्म्सच्या ’लव का द एन्ड’ या चित्रपटात तर एका पुरुष पात्रावर त्याचे दुसर्‍या एका पुरुष पात्राशी तसले संबंध असल्याचा संशय घेतला गेल्यावर तो उद्वेगाने विचारतो, "तो क्या दो लडकोंके बीच सिर्फ दोस्ती नही हो सकती क्या?" असा प्रश्न पूर्वी स्त्री-पुरुषांच्या विशुद्ध मैत्रीबद्दल आक्षेप घेणार्‍यांना विचारला जात असे.

थोडक्यात काय? तुमच्या मनावर ज्या विचारांचा पगडा असेल त्याप्रमाणे तुम्हाला त्या संबंधांकडे बघताना संशय वाटू शकतो.

३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 04/12/2011 - 00:37

In reply to by चेतन सुभाष गुगळे

लोकांना काय वाटतं याचा काय संबंध? लोकांचं सोडा, मी माझ्या एका जवळच्या मैत्रिणीला अनेक महिन्यांनी भेटले तेव्हा आम्हाला दोघींना प्रेमाचं अंमळ भरतं आलं होतं. शेजारून एक सिनीयर कलीग जात होते म्हणून आम्ही त्यांना अगदीच "काय या मुली चेकाळल्या आहेत" असं वाटू नये म्हणून जरा बर्‍या वागत होतो. त्यावर आमचाच एक मित्र म्हणे, "चालू द्या तुमचं; आम्हाला कोणाला काही अडचण नाही." इ.इ. (हे इत्यादी इत्यादी जाहीर लिहीण्याइतपत वाचकांची तयारी आहे का नाही याची कल्पना नाही म्हणून लिहीलेलं नाही.)

एक ऐकलेला विनोद सांगते. दोन अमेरिकन आया एकमेकींशी बोलत असतात. एक दुसरीला म्हणते, "मी माझ्या मुलाला त्या शाळेतून काढून टाकणार आहे. तो अमका शिक्षक समलिंगी आहे म्हणे." दुसरी पहिला म्हणते, "त्या शाळेतले बरेचसे शिक्षक भिन्नलिंगी संबंध ठेवणारे आहेत म्हणून मी माझ्या मुलीला नाही त्या शाळेतून काढणार."

लोकांनी सांगितलं, अगदी धर्माचा धाक घातला तरीही समलिंगी लोकं भिन्नलिंगी होत नाहीत. मांजराला कितीही सांगितलं "तू कोल्हा आहेस", तरीही ती मांजरच रहाणार. तसंच लोकांनी सांगितलं म्हणूनच स्त्री-पुरूषांना एकमेकांबद्दल आकर्षण वाटतं असं नाही; लोकांनी नाही सांगितलं तरी ते आकर्षण वाटतंच. आकर्षण वाटणं, असणं आणि त्यापुढे तद्वत वर्तन करणं यांच्यात तुम्ही गल्लत करत आहात असं वाटतंय. याउप्पर माझं काहीही म्हणणं नाही.

चेतन सुभाष गुगळे Sun, 04/12/2011 - 08:37

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

तसंच लोकांनी सांगितलं म्हणूनच स्त्री-पुरूषांना एकमेकांबद्दल आकर्षण वाटतं असं नाही; लोकांनी नाही सांगितलं तरी ते आकर्षण वाटतंच. आकर्षण वाटणं, असणं आणि त्यापुढे तद्वत वर्तन करणं यांच्यात तुम्ही गल्लत करत आहात असं वाटतंय. याउप्पर माझं काहीही म्हणणं नाही. >>

लोकांनी सांगितलं म्हणून त्या दोघांना एकमेकांविषयी आकर्षण वाटतं असं मला म्हणायचं नसून अनेक वर्षांपासून हे (म्हणजे स्त्रीपुरूष आकर्षण)ऐकत आल्यामुळे इतर लोकांना त्यांच्यात ते तसे आहे असं (अनेकदा उगीचच) वाटतं हे मला म्हणायचं होतं.

आकर्षण वाटणं, असणं आणि त्यापुढे तद्वत वर्तन करणं यांच्यात मी गल्लत करत नसून त्या दोघांत आकर्षण आहे किंवा ते तसे वर्तन करतात असे इतरेजनांना वाटणे हा त्या इतर लोकांच्या डोक्यावर बसलेला पारंपारिक विचारांचा पगडा आहे हे माझं मत आहे. कदाचित ते मी पूर्वी मांडलेल्या प्रतिसादातून व्यवस्थित ध्वनित झालं नसावं म्हणून पुन्हा विस्ताराने मांडतोय.

चेतन सुभाष गुगळे Sat, 03/12/2011 - 12:09

In reply to by शिल्पा बडवे

अनेक दुवे दिले असले तरी ते केवळ संदर्भाकरिता दिले आहेत. ते सगळे माझेच मत आहे असे म्हंटलेले नाहीये. त्यातील नेमके कुठल्या लेखातील विचार मला पटले आहेत तेही दिले असून

तरी अव्यवहारिक प्रेम हे व्यापक अर्थाने दुर्लक्षितच राहिले. त्यातील कुठल्याही कथेला / हकीकतीला लैला-मजनू, रोमिओ-ज्यूलिएट यांच्याप्रमाणे अमरत्व लाभले नाही याची खंत वाटते. >>

ही माझी व्यथा आवर्जून मांडलेली आहे.

बाकी मी काय खोडसाळपणा केलाय हे जरा उलगडून सांगितलेत तर बरे..

अज्ञात Sat, 03/12/2011 - 19:10

बाकी स्त्री आणि पुरुषात शारिरीक आकर्षणाखेरीज इतर भावना असूच शकत नाही असे मानणार्‍यांपुढे जास्त न बोललेलेच बरे.>>

हे विधान माझ्या त्या धाग्यावरच्या प्रतिक्रियेच्या संदर्भाने केले असावे असे वाटते. ती प्रतिक्रिया नीट वाचल्यास असे लक्षात येईल की ते विचार माझे नसून कुणा एका पुरुषाचे, कधी तरी पूर्वी त्याने मला सांगितलेले ( जो येथे नाही व आता त्याचे काय विचार आहेत माहिती नाही) असुन मी फक्त येथे नोंदवले.
बाकी स्त्री पुरुष आकर्षणाविषयी सायकॉलॉजीमधे बराच उहापोह झाला आहे आणि मोठ्यामोठ्यांनी त्यावर भाष्य केले आहे. ( त्यांच्याशी ) मी सहमत असो वा नसो, माझ्याशिवाय कोणालाच फरक पडणार नाही, पण सरसकट त्यांचे विचार चूकच आहेत असे मी समजू नये ( तेवढे माझे त्या विषयावर प्रभुत्व नाही याची मला जाणीव आहे). ईतरांनी तसे विधान केले तर ते मला धाडसाचे वाटते पण कदाचित त्यांचा अभ्यासही दांडगा असावा.
तरीही वरील वाक्यातून 'Holier than thou ' असा थोडासा भास होतो. त्याचा निषेध.
प्लॅटॉनिक लव्ह वर परत कधीतरी....

अज्ञात Sun, 04/12/2011 - 00:01

तो दुसरा धागा "लैंगिक उपासमार व गुन्हेगारी" वर आहे. तेथे प्लॅटॉनिक लव्ह चा मुद्दा अवांतर ठरू शकला असता म्हणून चर्चेसाठी येथे नविन धागा काढला ते उत्तम.
त्या निमित्ताने २ उत्कृष्ट गाणी ऐकाला मिळाली हे ही उत्तम !
तुमच्या मताचा आदर आहे.
माझे प्लॅटॉनिक लव्ह वर विचार मांडायचे झाल्यास एक निबंधच होईल, तेव्हा विस्तारभयास्तव येथे देत नाही.

अवांतरः माझ्याशी (प्लॅटॉनिक लव्ह) मयतरि करनार कं ? ( कृ. ह. घेणे ) :bigsmile: =))

अज्ञात Sun, 04/12/2011 - 01:14

In reply to by आडकित्ता

हे मयतरि कर्नर च्या शेवट नेहेमी कं? असा कं होतो?? >>

तीच तर गंमत आहे ! आता बघुया तुम्हाला कोण कोण मोठे व्हा, अभ्यास वाढवा असे सल्ले देतय्.... :bigsmile:

चेतन सुभाष गुगळे Sun, 04/12/2011 - 08:30

In reply to by अज्ञात

माझे प्लॅटॉनिक लव्ह वर विचार मांडायचे झाल्यास एक निबंधच होईल, तेव्हा विस्तारभयास्तव येथे देत नाही. >>

इथे कसलं आलंय विस्तारभय? त्या विषयावर लिहीण्यासाठीच तर हा धागा काढलाय ना?

माझ्याशी (प्लॅटॉनिक लव्ह) मयतरि करनार कं ? >>

आम्ही तर प्लॅटोनिकच्या बाजूचेच आहोत. आमची काहीच हरकत नाही. फक्त ते प्लॅटोनिक (प्लॅटो नावाच्या तत्ववेत्याने शोधलं म्हणून) प्लेटॉनिक व्हायला नको. नाहीतर त्याची प्ले (खेळ) + टॉनिक (स्फूर्तिदायक औषध) अशी फोड होईल.

कोदरकर Sun, 04/12/2011 - 23:30

धागा.. विवाहबाह्य संबंधाकडे झुकणारा वाटतो.... वय उलटुन गेल्यावर वाटणारे प्रेंम अशारिरीक प्रेमच....