Skip to main content

मूलतः मादक वगैरे

(व्यवस्थापक : वाचनावरून निघालेली चर्चा वेगळ्या वळणावर गेल्यामुळे त्या धाग्यावर अवांतर वाटू शकेल, पण चर्चा अनेक वाचकांना 'मूलतः रोचक' वाटत असणे शक्य वाटल्यामुळे वेगळ्या धाग्यात हलवली आहे. अरुण जोशींना वाटल्यास ते मूळ प्रतिसादात भर घालू शकतात.)

मी मादक बायकांची मुबलक चित्रे असलेले मॅगझिन प्रवासात चाळतो. त्या पलिकडे पेसंस नाही.

पण साला कोणी मनोहर रहस्यकहानियाँ वैगेरे प्रकार शेजारी वाचू लागला आणि त्यात एखादे टायटल लै भारी दिसले कि अवश्य डोकावतो.

मी Wed, 18/06/2014 - 18:08

मी मादक बायकांची मुबलक चित्रे

'मादक बायकांची' की 'बायकांची मादक'?

गब्बर सिंग Thu, 19/06/2014 - 19:56

In reply to by अजो१२३

मादक बायका दिसल्या कि मला व्याकरण सुचत नाही.

अंतिम सत्य हेच आहे. सत्याचा नेहमीच विजय होत असतो.

चिंतातुर जंतू Wed, 18/06/2014 - 18:19

In reply to by मी

>> मादक बायकांची' की 'बायकांची मादक'?

चित्र यथातथ्यवादी असेल असे मानून चित्रातली बाई मूलतःच मादक असणे हे गृहितक बहुधा अशा वेळी प्रेक्षकाची मानसिक गरज अधिक चांगली भागवते. अन्यथा (उदा : फोटोशॉप वगैरे करून) मादक केलेले चित्र असा अर्थ लावायचा असला तर 'बायकांची मादक चित्रे' म्हणता येईल. पहिल्यात पाहणारा स्वतःची अधिक फसवणूक करून घेतो आहे असे मी मानतो, पण त्यात अधिक सुख असावे असाही अंदाज आहे. ;-)

चिंतातुर जंतू Wed, 18/06/2014 - 18:26

In reply to by मेघना भुस्कुटे

>> मूलतः मादक असे काही असते का? सारे काही नजरेत असते, असे ऐकून आहे बॉ.

म्हणूनच तर 'पाहणारा स्वतःची फसवणूक करून घेतो आहे' असं म्हटलंय ;-)

अजो१२३ Wed, 18/06/2014 - 23:44

In reply to by मेघना भुस्कुटे

मूलतः हे क्रियाविशेषण कोणत्याही विशेषणाला कोणत्याही नामासाठी कोणत्याही संदर्भात लावता येत नाही. For all practical purposes, तितक्या खोलात जायची गरज नाही.

मी Thu, 19/06/2014 - 11:12

In reply to by चिंतातुर जंतू

पण त्यात अधिक सुख असावे असाही अंदाज आहे.

एवढा विचार करणे थोर आहे पण 'अंदाज' पेक्षा 'अनुभव' ;) शब्दप्रयोग अधिक फिट बसला असता. :प

ऋषिकेश Thu, 19/06/2014 - 11:21

In reply to by मी

ईश्य! कायतरी बै तुम्चM! :P

पाहणार्‍याला (पक्षी अजोंना) कशात अधिक सुख वाटत असावे याचा चिंजंना अंदाजच करता येत असावा यावा - असा आपला माझा अंदाज आहे. ;)
अर्थात त्यांना तसा अनुभव असल्यास हर्कत नाही पण... असो. :P ;)

नंदन Thu, 19/06/2014 - 11:33

In reply to by मी

एवढा विचार करणे थोर आहे पण 'अंदाज' पेक्षा 'अनुभव' (डोळा मारत) शब्दप्रयोग अधिक फिट बसला असता. (जीभ दाखवत)

अंदाज अपना अपना ;)

अजो१२३ Thu, 19/06/2014 - 12:02

In reply to by चिंतातुर जंतू

एक तर मी इतकी भिकार मॅगझिन्स घेत नाही कि त्यात फोटोशॉप वैगेरे केले असावे.

पण तरीही,
पावडर लावलेली (मंजे शृंगार , इ केलेली) बायको नि फोटोशॉप केलेले माहित नसलेल्या स्त्रीचे मॅगझिनमधले चित्र यांत तसा काय फरक आहे? शृंगार न केलेली पत्नी देखिल मूलतः मादक नव्हे का? मला फोटोशॉपमधले काही कळत नाही. मला जे चित्र दिसते ते मी पाहतो. आवडले तर आवडले. त्यात मला कसे फसवले गेले असावे असा विचार करण्याची माझी (ऋषिकेशीय) प्रवृत्ती नाही.

बॅटमॅन Thu, 19/06/2014 - 12:04

In reply to by अजो१२३

मला जे चित्र दिसते ते मी पाहतो. आवडले तर आवडले. त्यात मला कसे फसवले गेले असावे असा विचार करण्याची माझी (ऋषिकेशीय) प्रवृत्ती नाही.

हाण तेच्या मारी!!

चिंतातुर जंतू Thu, 19/06/2014 - 17:19

In reply to by अजो१२३

>> एक तर मी इतकी भिकार मॅगझिन्स घेत नाही कि त्यात फोटोशॉप वैगेरे केले असावे.

  1. ह्यात भिकार मासिकं फोटोशॉप करतात असं गृहितक आहे. ते चुकीचं आहे. अत्यंत गुळगुळीत, उत्तम निर्मितीमूल्यं असणारी परदेशी मासिकंसुद्धा आता डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून फोटो अधिक आकर्षक करतात.
  2. फोटोशॉप हे केवळ उदाहरण आहे. ग्लॅमर फोटोग्राफीमध्ये विविध मार्गांनी वास्तव अधिक साजिरं केलं जातं.

>>पण तरीही,
पावडर लावलेली (मंजे शृंगार , इ केलेली) बायको नि फोटोशॉप केलेले माहित नसलेल्या स्त्रीचे मॅगझिनमधले चित्र यांत तसा काय फरक आहे? शृंगार न केलेली पत्नी देखिल मूलतः मादक नव्हे का?

ते बायको कशी आहे आणि तुमची आवड काय आहे ह्यावर अवलंबून आहे. माझ्या परिचयातले बहुतेक पुरुष वेगवेगळ्या 'मूलतः मादक' स्त्रियांकडे वेगवेगळ्या कारणांसाठी आकर्षित होतात. त्यात चेहरा, इतर अवयव, चालणं, बोलणं, वेशभूषा वगैरे अनेक घटक अंतर्भूत असतात. नेमक्या कोणत्या घटकांमुळे कोणत्या पुरुषाला किती फरक पडतो ते फार सापेक्ष असतं, पण बायको मूलतः मादक असावी असा आग्रह साधारणतः पुरुष धरत नाहीत किंवा तो त्यांना परवडत नाही.

>>मला फोटोशॉपमधले काही कळत नाही. मला जे चित्र दिसते ते मी पाहतो. आवडले तर आवडले. त्यात मला कसे फसवले गेले असावे असा विचार करण्याची माझी (ऋषिकेशीय) प्रवृत्ती नाही.

अशी प्रवृत्ती नसली तर फसवणूक होत नाही असं म्हणायचं आहे का? ;-)

अजो१२३ Thu, 19/06/2014 - 18:23

In reply to by चिंतातुर जंतू

ह्यात भिकार मासिकंच फोटोशॉप करतात असं गृहितक आहे

वेल, माझं म्हणणं तुमच्याप्रमाणेच फोटोशॉपबद्दल नाही. मूळात बोलायचं आहे ते जी स्त्री सुंदर नाही तिला जबरदस्तीने सुंदर दाखवून वाचकांना "फसवायचा मूळ उद्देश असणे" याबाबत. बाकी मी साधाच फोटो देणे, मेक-अप करणे, अजून जास्त मेक करणे, विशिष्ट पोज देणे, विशिष्ट प्रकारे फोटो काढणे, त्याला फोटोशॉपमधे अजून सुंदर करणे, इ इ काय झाले आहे नि काय नाही याची चिकित्सा करत नाही. जे डोळ्यासमोर आहे ते आवडले आहे का इतकेच बघायचे. समजा नंतर कळले ती स्त्री तितकी सुंदर मूळात नाहीचै तर तेव्हा बदलू या ना मत! कोण रोखले आहे? पण निष्कारण अगोदरच सौंदर्याचा आनंद न घेता त्याची तांत्रिक चित्कित्सा करणे वा शंका घेणे पटत नाही.

पण बायको मूलतः मादक असावीच असा आग्रह साधारणतः पुरुष धरत नाहीत किंवा तो त्यांना परवडत नाही.

मादक स्त्रीयांना पती मिळत नाहीत असे म्हणायचे आहे कि काय? उलट मादक स्त्रीला बायको करून घेण्यासाठी प्रचंड चढाओढ असते. इथे मादकता केवळ लोकांना दाखवायचे वा ते आतमा परमातमा टाईपचे आत्मिक सुख नव्हे. इट मीन्स ऑन बेड मादकता. भारतात अद्यापि विवाहापूर्वी स्त्री-पुरुष एकमेकांचे लैंगिक विचार जाणून घेऊ शकत नाहीत वा प्रात्यक्षिक करून आवडी निवडी जाणून घेऊ शकत नाहीत. पण काय करायचं आहे याच्या सुप्त इच्छा अनंत आहेत. त्या कारणाने (सुद्धा)इकडे लिव्-इन ला बढावा मिळत आहे. मादकता इज द क्रायटेरिया.

अशी प्रवृत्ती नसली तर फसवणूक होत नाही असं म्हणायचं आहे का?

हे मात्र खरं आहे. होत नाही असं म्हणता येत नाही. आहे असं म्हणता येत नाही. जाणवलेल्या नि न जाणवलेल्या अशा दोन्ही फसवणूका असतात. नच कळलेल्या फसवणूकांबद्दल कसं काय बोलता येईल?

मी Thu, 19/06/2014 - 18:27

In reply to by अजो१२३

उलट मादक स्त्रीला बायको करून घेण्यासाठी प्रचंड चढाओढ असते.

आय डाऊट, बायको साधी'च' हवी हा हट्ट बर्‍याचदा असतो, मादक 'दुसरीच' हवी असे काहीतरी असते.

चिंतातुर जंतू Thu, 19/06/2014 - 18:59

In reply to by अजो१२३

>> मादक स्त्रीयांना पती मिळत नाहीत असे म्हणायचे आहे कि काय? उलट मादक स्त्रीला बायको करून घेण्यासाठी प्रचंड चढाओढ असते.

ह्यामागे काही गृहितकं आहेत -

  1. मादकता हा व्यक्तिनिरपेक्ष गुणधर्म आहे. प्रत्यक्षात तो पुष्कळसा व्यक्तिसापेक्ष असावा असं लोकांच्या रुचिवैविध्यावरून दिसतं.
  2. बायको निवडताना पुष्कळशा पुरुषांसाठी मादकता हाच सर्वात महत्त्वाचा घटक असतो. प्रत्यक्षात लग्न टिकवण्याच्या दृष्टीनं लोक अनेक घटक विचारात घेऊन मग बायको निवडत असावेत. मादकता हा त्यापैकी एक घटक असू शकतो, पण कोणता घटक किती महत्त्वाचा हेदेखील व्यक्तिसापेक्ष असतं.

थोडक्यात, मादक स्त्रीची व्याख्या एकच एक नसल्यामुळे आणि बायको निवडताना वेगवेगळे घटक कमीअधिक प्रमाणात महत्त्वाचे ठरत असल्यामुळे नक्की कोणत्या मुलीला वाग्दत्त वधू म्हणून पसंती मिळणं सोपं जातं, त्याचा 'मादकता' ह्या घटकाशी परस्परसंबंध कसा लागतो हे पाहून शिवाय त्यात खात्रीलायक कारण-परिणाम सापडतो आहे असं त्यावरून म्हणणं अंमळ सरसकट वाटतं. तरीही, विदा असला तर तो आम्ही पाहू ;-)

अजो१२३ Thu, 19/06/2014 - 19:12

In reply to by चिंतातुर जंतू

थोडक्यात, मादक स्त्रीची व्याख्या एकच एक नसल्यामुळे आणि बायको निवडताना वेगवेगळे घटक कमीअधिक प्रमाणात महत्त्वाचे ठरत असल्यामुळे नक्की कोणत्या मुलीला वाग्दत्त वधू म्हणून पसंती मिळणं सोपं जातं, त्याचा 'मादकता' ह्या घटकाशी परस्परसंबंध कसा लागतो हे पाहून शिवाय त्यात खात्रीलायक कारण-परिणाम सापडतो आहे असं त्यावरून म्हणणं अंमळ सरसकट वाटतं.

हे वाक्य कळायसारखं रिफ्रेज करून लिहाल काय? इनंति.

चिंतातुर जंतू Thu, 19/06/2014 - 19:24

In reply to by अजो१२३

>> हे वाक्य कळायसारखं रिफ्रेज करून लिहाल काय? इनंति.

  1. मादक स्त्रीची व्याख्या एकच एक नाही.
  2. बायको निवडताना वेगवेगळे घटक कमीअधिक प्रमाणात महत्त्वाचे ठरतात.

म्हणून,

  1. नक्की कोणत्या मुलीला वाग्दत्त वधू म्हणून पसंती मिळणं सोपं जातं ह्याचा अभ्यास समजा कुणी केला, आणि -
  2. त्याचा 'मादकता' ह्या घटकाशी परस्परसंबंध कसा लागतो हे पाहिलं, शिवाय -
  3. त्यात खात्रीलायक कारण-परिणाम सापडतो आहे असं त्यावरून सिद्ध केलं (म्हणजे, 'मादकता' हे कारण आणि 'पसंती मिळणं' हा त्याचा परिणाम).

असं होणं जरा कठीण वाटतं.
आणि त्यामुळे, तसा दावा कुणी करत असेल तर तो अंमळ सरसकट वाटतो.

............सा… Thu, 19/06/2014 - 19:40

माझी मादकपणाची व्याख्या इथे संपते. -
अर्थात पद्मा खन्ना अतिशय सुंदर आहे असे नाही पण मादक आहे. अन विशेषतः या गाण्यात,गुलाबी-हिरव्या रंगांचा केलेला वापर सुंदरच. गाण्याचा आशयही तसाच.

______________

"पिवळ्या पानाचा देठ की हो हिरवा...." , "या भाऊजी, बसा भाऊजी...."वगैरे गाणी मादकपेक्षा आव्हान देणारी अन शृंगारीक वाटतात.
_________
अगदी ज्योतिषी भाषेत बोलायचं झालं तर - शुक्र अन मंगळ दोन्ही कामप्रधान ग्रहं पण शुक्र आकर्षित करतो,जागच्या जागेवरुन दुसर्‍याला घायाळ करतो, तर मंगळ पाठलाग (Romantic chase) करतो, आव्हान देतो. वरील गाण्यात हाच शुक्र-मंगळातील फरक आहे.