ईच्छा

मुंबईतून निघता निघता थंडी परत आली होती. सकाळी ९ वाजता उकाड्याऐवजी सुखद गारवा जाणवत होता. वर्ल्ड ट्रेड सेंटर कडून जाणार्‍या बसमधून बाहेरची मजा बघताना मला ती दिसली. बारिक अंगकाठी, अंगभर पदर, तोंडाचं बोळकं झालेलं काही अंतरावरूनही दिसतंय. वयापेक्षा आघाताने आल्यासारखं म्हातारपण सोबतीला. रस्तादुभाजकावर केलेल्या फ्लॉवरबेड्च्या कडेला सुर्यप्रकाशाकडे तोंड करून बसलेली. हातात कोपर्‍याला अडकवलेली साधी कापडी पिशवी आणि आईस्क्रिमचा कप. सभोवतालच्या गर्दीशी देणंघेणं नसल्यासारखी ती शांतपणे आईस्क्रिम खात होती. पण मला त्यातही तिच्या चेहर्‍यावरल्या नि:संगतेचं कुतुहल वाटलं. का घेतलं असेल तिने आईस्क्रिम? सकाळी आणि तेही थंडीत एकटी खातेय म्हणजे फारच मनापासून खावंसं वाटलं असणार तिला. इथे बसून का खातेय? कदाचित घरी नातवंड असतील . त्यांनाचं देताना तिची खायची ईच्छा राहून जात असेल. "ही हल्लीची मुलं म्हणजे. परवा मी एक किलोचा आईस्क्रिमचा डबा नेला. काल फ्रिज उघडून बघतो तर चमचाभर सुद्धा शिल्लक नाही. केव्हा खाल्लं देव जाणे? ज्याने आणलं त्याला थोडं द्यायचीही पद्धत नाही. आम्हालाही वाटतं ना खावंसं थोडं. आमच्यावेळी एवढे प्रकार कुठे होते? " असा एकदा एका आजोबांचा वैताग व्यक्त झालेला ऐकला होता. पण आपण मनापासून खातोय या आनंदाचा मागमूस तिच्या चेहेर्‍यावर नव्ह्ता. एखादं रूटीन काम शांतपणे करावं तसं वाटतं होतं. वाढत्या वयानॆ ईच्छा पूर्ण करण्याची उतावीळ वाढत असेल; तशी ती पूर्ण झाल्यावर होणारं समाधान उणावत असेल का? का मन, ’ झालं समाधान? आता पुढे काय?’ असं विचारत असेल? साधी साधी ईच्छाही ’ही नको रहायला’ म्हणून पूर्ण करावी वाटत असेल का? अश्या साठलेल्या ईच्छाचा साठा संपत आल्यावरचा अंधार भेडसावत असेल का?
मला तिच्या जागी मी दिसले. एवढया साध्या नाहीत पण किती ईच्छा मारून मी रहातेय. रोज ऑफिसला जाताना दिवस म्हणजे ओझं वाटायचा. या ठिकाणी आपण का येतोय? असं वाटायचं. इथून बाहेर निघता यावं म्हणून मी क्वार्टर्स सोडले. मध्यमवर्गीयात सर्रास दिसणारे आणि लोभस वाटणारे ’हम दो हमारे दो’ या चित्राऐवजी जुना त्रिकोणच आपलासा केला. ऑफिसच्या कुठल्याच गप्पा, पोस्ट्स , प्रमोशन्सचे चान्सेस कशातच लक्ष घातलं नाही. मग आता बाहेर का पडत नाहीय मी? सवय झालीय.

सवयीत स्वातंत्र्य उपभोगायचीही सवय लागते. आपल्याला आवडत नसणार्‍या गोष्टीही कश्या उपयुक्त आहेत हे वर्षानुवर्ष मनाला पटवून दिलेलं असतं ते पट्कन पुसून टाकता येत नाही. आपल्या आर्थिक स्वातंत्र्याच्या बळावर आपण बर्‍याचश्या गोष्टी झेललेल्या असतात. करिअरिस्ट बाईचं जगणं हे असं विचित्र झालेलं आहे. करिअरिस्ट हा शब्द केवळ प्रचलीत म्हणून वापरलाय एवढंच. ईमानेईतबारे चाकरी बजावणार्‍यां ,घरासाठी नोकरी करणार्‍या आणि नोकरी करताना घराकडे त्याही पेक्षा आपल्या आवडींकडे दुर्लक्ष होत असल्याची खंत बाळगणार्‍या मला हा शब्द काही शोभत नाही. तरीही अगदी पाट्या टाकून रहाता येईल असंही काम माझं नाही. आणि उगाच वितंडवाद घालून ’ हे काम माझं नाहीच " वगैरे म्हणणारे जसे सुखी दिसतात तसंही माझ्या बाबतीत अशक्यच आहे.

"अमुक तमुकची आवड होती हो पण जमलंच नाही" असं म्हणत वयाच्या साठीनंतर गाणं, नाच शिकणार्‍या, लिहिणार्‍या बायका मी बघत आलेय. मी लहान असताना या बायकांचं कौतुकही वाटायचं. पण आता जाणवतं ते त्यांच्यातलं अपुरेपण, वर्तमान/ सत्यपरिस्थितीशी सांगड घालण्यात आलेला थिटेपणा, स्वत:बद्द्लची कीव , न्यूनगंड आणि अभिमान यांचं विचित्र मिश्रण. काही अपवाद असतीलही पण अश्या लोकांना शाबासकी फार पटकन हवी असते. स्वकेंद्रीतता फार असते आणि आपले कमी दिवस उरलेत अशी भावना असल्यामुळे की काय शिकणं ओरबाडून घेण्याकडे कल असतो. त्यात संसाराचा कोशात फार गुरफटून गेलेल्या असल्याने निर्व्याजपणे आवडत्या गोष्टीत रमता येत नाही. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे कुठल्या ना कुठ्ल्या व्याधी हमखास मागे लागलेल्या असतात. त्यामुळे येणारी बंधनं .

मी स्वत:ला अशी नाही बघू शकत. खूप प्रयत्न केले मी नोकरीत रमायचे. पण आता नाही शक्य होत. मग असं काही दिसलं की आत काहीतरी हलतं. विपश्यना, ब्रम्हविद्या, REBT वगैरेची औषधं देऊन शांत केलेलं मन गडबड करू लागतं. आणि निर्णय पकका होऊ लागतो. पण कोणाला तो शहाणपणाचा वाटत नाही. जर कोणाला वाटला तर त्यातले धोकेही तत्परतेने दाखवली जातात. माझी किंमत ही फक्त मी माझ्या टेक्निकल फिल्ड्मध्ये किती पैसे कमवू शकते यावरंच अवलंबून आहे की काय असं वाटायला लागतं . ठरवून न वाढवलेल्या जबाबदार्‍या, साध्या सवयी या विचारात घेण्याजोग्या वाटतंच नाहीत कुणाला. "मुलीच्या शिक्षणासाठी आहेत पैसे. लग्नाला हवे असतील तर तिचे तिने साठवावेत नाहीतर साधं लग्न करावं. " हे माझ वाक्यं मला आई म्हणून बेजबाबदार ठरवून जातं. आपली ईच्छा आणि जगाची मतं या गोष्टी इतक्या गोंधळून टाकणार्‍या का असाव्यात? का आपलं आपल्यालाच ओळखता येत नाही? आणि ठरवणं एवढं अवघड का असावं?

"बघ कसं ते. तू ठरव. " अश्या वाक्यांनी विषयाचा समारोप झाल्यावर एक भान येतं की निर्णय आपला आपल्यालाच घ्यायचाय. अगदी एकटे आहोत आपण. आपण तोंड्देखलं का होईना "कर रे तू हवं ते माझी नोकरी आहे ना " असं नवर्‍याला म्हटलेलं असतं. पण तो असला मुर्खपणा बिल्कूल करत नाही. "तू तुझा निर्णय घ्यायला स्वतंत्र आहेस. तुझ्याएवढं मला कुठे कळतं तुझ्या विषयातलं. " असं म्हणत त्याने आपल्यावरची जबाबदारी तर झटकलेली असतेच पण पुढे नावं ठेवायचं आपलं स्वातंत्र्यही अबाधीत राखलेलं असतं. रडणं, ईमोशनली ब्लैक्मेल करणं, मी तुझ्यावरं(च) कशी अवलंबून आहे हे पुन्हा पुन्हा प्रत्येक कृतीतून दाखवून देणं ही बायकांच्या हातातल्या पारंपारिक शस्त्र त्यागून आपण आपलं कसं नुकसान केलय हे जाणवतं. चलो यही सही. सुरुवात अशीच व्हावी. स्वतं:वरचा विश्वास कमावण्याची, आपल्याला जे करायचय ते स्वत:च्याच बळावर करायची आणि प्रत्येक प्रवासाची. ज्याची सुरुवात अवघड तो प्रवास आपल्याला सुंदरसं काहीतरी देणार ही खुणगाठ पक्की बांधूनच स्वत:च्या मनातला डोंगर चढायला सुरुवात करायला हवी.

field_vote: 
4.444445
Your rating: None Average: 4.4 (9 votes)

प्रतिक्रिया

दोन मुद्दे आहेत - निर्णय विचार करून घेतले असतील तर बेरजा वजाबाक्या स्विकारलेल्या असतात, आणि बेरिज अधिक असते म्हणूनच वजाबाकी स्विकारलेली असते, हा झाला व्यवहारिक हिशोब, त्यात त्याग, किंवा स्वार्थाची भावना असल्यास मूल्यमापन परत तपासले पाहिजे असे मला वाटते. दुसरा मुद्दा हा की हे सगळ्याच निर्णयांना लागू पडते पण इथे किंवा तुम्ही पालकत्वाच्याच निर्णयाबद्दल अधिक बोलत आहात म्हणून मी तुमचे हे 'मूल्यमापन'(लेबल) इतरही निर्णयांना लागू पडते काय असे विचारले होते. पण एकंदर (इथे तुम्हाला) स्त्रियांना परंपरावादी चौकट मोडताना होणार्‍या विरोधातून तुम्ही हे मत बनविले आहे हे लक्षात येते आहे, त्या विरोधकांना जोडे मारण्यासाठीच हि लेबले तुम्ही लावत आहात, अन्यथा स्वतः घेतलेल्या निर्णयांना तुम्ही अशी लेबले बहुदा लावणार नाही असे दिसते. तुम्ही म्हंटल्याप्रमाणे आणि मलाही पटते आहे तेंव्हा इथे हा खेळ थांबवूयात.

पालकत्व हे त्रासदायक आहे का ही तुमची वैयक्तिक भावना असल्याने त्यावर मी माझे मत व्यकत करत नाही आणि तो इथल्या चर्चेचा मुद्दाही नाही.

(आता मात्र दमले बुवा.)

बुवा किर्तन मस्ट गो ऑन. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

१. पालकत्वाचा निर्णय हा फक्त उदाहरणादाखल घेतलेला निर्णय आहे. तिथे इतर कुठलेही उदाहरण घेता येईलच.
२. मुळात विरोध उदात्तीकरणाला आणि त्यातून निर्माण होणार्‍या दबावाला आहे. कुठल्याच व्यक्तिगत निर्णयांना नाही.
३. मी ही लेबले स्वतः घेतलेल्या निर्णयांना लावत नसून, स्वतःच्या नकारार्थी निर्णयाच्या समर्थनार्थ लावते आहे.

असो. इतक्या गुर्‍हाळाच्या कालावधीत सुभद्रेस पोरदेखील झाले असते... Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

तुम्ही त्याग, स्वातंत्र्याचा संकोच वगैरे विचार/भावना फक्त मुल होण्यासंदर्भातच व्यक्त केल्या आहेत, त्याचप्रमाणे आयुष्यातील बरेचसे मोठे निर्णय स्वातंत्र्याचा थोड्याफार प्रमाणात संकोच करतात त्यामुळे अशा सर्वच निर्णयांना अशी लेबले लावता येतील काय? कि हे विचार फक्त मुल होण्यासंदर्भातच आहे?

त्याग या मुल्याच्या आडून ज्या ज्या स्वातंत्र्याचा संकोच करायला स्त्रियांना भाग पाडले जाते - दबाव आणला जातो - त्या त्या सार्‍यांना हे लागु पडावे.
अगदी उलट, मातृत्त्वाची आस असणार्‍या किंवा मुलांचे पालन करायची इच्छा असणार्‍या एखाद्या स्त्रीने घरच्या जबाबदार्‍यांसाठी नोकरी करण्यास नकार दिला तरीही हे असेच ऐकावे लागते!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

स्त्रियांना भाग पाडले जाते - दबाव आणला जातो

अशा स्त्रियांबद्दल मान्य आहे पण विचार करणार्‍यांनी लेबल लावावे काय असे विचारतो आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

विचार करणार्‍यांच्या विचाराला दिशा असणारच ना? त्या दिशेबरहुकूम लेबल लावले जाणार. अशी लेबले लावणे स्वतःच्या निर्णयांपुरते असले की झाले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

१. भारतात (किंवा कुठेही) हे निर्णय स्त्रियांनी स्वतः घेतलेले असतात असे नेहमी असेलच असे नाही
२. जर कोणत्याही कारणाने एखाद्या स्त्रीला मुल ठरवून नको असेल तर लगेच "ती पक्की स्वार्थी आहे, कुटुंबासाठी जर्रा वेळेचा नी पैशाचा त्याग करायला तयार नाही' वगैरे बेलगाम इन्सेसिटिव्ह वक्तव्ये अनेकदा ऐकलेली आहेत, तेव्हा समाजात स्त्रिया मुले जन्माला घालताना (कसलातरी) त्याग करतात असे किमान पर्सेप्शन नक्की आहे. (आणि अनेक केसेसमध्ये ते खरेही आहे)
३. त्याग म्हणजे या गोष्टी आहेत की नाहित हे इथे गौण आहे. ज्याला त्याग असे त्या त्या ठिकाणी/लोकांत समजले जाते, त्या गोष्टी केल्यानेच एखादी व्यक्ती चांगली होते अन्यथा त्या व्यक्तीला भरपूर दुषणे सहन करावी लागतात. विशेषतः स्त्रियांनी (तथाकथित वा खरोखरचा असा कसाही) त्याग केला नाही तर अनेक पातळ्यांवर हीनतेस प्रसंगी क्रोर्यतेस सामोरे जावे लागते ते प्रचंड निंदनीय आहे. "त्याग" या (तथाकथित* चांगल्या) मुल्याचा वापर दुसर्‍यावर- विशेषतः स्त्रियांवर- अंकूश ठेवायला म्हणून केला जातो यासारखे क्रूरकृत्य नसावे.

--
* कोणतेही मुल्य, गुण हा त्याचा वापर कसा होतो, कधी होतो त्यावर सद्गुण की दुर्गुण ते ठरते. हा गुण 'नि:संशय' सद्गुणच आहे वगैरे घाऊक सरसकटीकरण मला मान्य नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

* कोणतेही मुल्य, गुण हा त्याचा वापर कसा होतो, कधी होतो त्यावर सद्गुण की दुर्गुण ते ठरते. हा गुण 'नि:संशय' सद्गुणच आहे वगैरे घाऊक सरसकटीकरण मला मान्य नाही.

वाईट त्यागाची, वाईट आदराची नि वाईट प्रेमाची उदाहरणे द्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

हिटलरबद्दल तत्कालीन जर्मन नागरीकांना वाटलेला आदर / प्रेम आणि त्यापोटी त्यांनी गप्प ठेवलेली तोंडे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

वेल, हिटलरबद्दल कोणाला ना आदर होता ना प्रेम. जर्मन लोकांना ज्यूंचा द्वेष होता. त्या द्वेषाला न्याय मिळवून द्यायच्या वचनाखाली म्हणून दिलेला आदर, प्रेम हे आदर प्रेम म्हणता येणार नाही. सबब हे उदाहरण द्वेषाचे आहे. नीटपैकी वाईट आदर/ प्रेम / त्याग यांचे उदाहरण द्या. प्रेमाच्या नावाखाली लपलेल्या द्वेषाचे नको.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

तुम्ही न म्हटल्याने तो आदराचा अनादर होतो काय? निव्वळ ज्यूद्वेष हे एकमेव कारण नव्हते, त्याने बाकी सुधारणाही केल्याच की. असा सोयीस्कर मुद्दा फिरवता येणार नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

तुम्हाला अजूनही हे उदाहरण मान्य नाहीये का? "असो" का? उदाहरण मान्य नसल्यास ह्या उदाहरणावरील तुमची बाजू (अमान्य का आहे हे) ऐकायला आवडेल अजो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

घनुजी,
मी सद्गुणांची उदाहरणे (म्हणजे त्या गुणांची सामान्य नामे) देण्याचा प्रयत्न करतोय. आता मी उदाहरण दिले कि सगळे म्हणत आहेत कि हा तर सद्गुण नव्हेच. सत्य, प्रेम, त्याग, आदर, इ नव्हे तर सद्गुअण दुसरे काय आहेत?

आता जर मला जे सद्गुण म्हणायचे आहेत आणि ते तुम्हाला सद्गुण आहेत हे मान्यच नाही तर त्याचा अर्थ काय होतो? सरळ अर्थ होतो सद्गुण नावाचा प्रकारच जगात नाही नि त्याचे सामान्यनामवाचक उदाहरणच देता येत नाही.

प्रारंभी मला वाटले कि बहुधा 'त्याग' शब्द डोक्यात जातो आहे, म्हणून प्रेम नि आदराचे उदाहरण देऊन पाहावे, पण तिथेही तोच प्रकार.

मी ५ हि धन संख्या आहे इतके साधे विधान करतोय, आणि लोक -(-५) ही धन संख्या कशी काय म्हणून विचारत आहेत. म्हणून असो.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
आता आपण प्रश्न विचारला आहे तर मी उत्तर देण्याचा प्रयत्न करतो. आपण हिटलर ऐवजी घरचे नरेंद्र मोदींचे उदाहरण घेऊ.

प्रथमतः मूल्य काय आणि वर्तन काय यांत भेद केला पाहिजे. एखादे वर्तन हे अनेक मूल्यांचा परिपाक असू शकते व तसेच एखाद्या मूल्यातील आस्था (असणे / नसणे) अनंत घटकांचा परिपाक असू शकते.

१. प्रेम, आदर नि त्याग इ मूल्ये अभ्यासताना राजकीय उदाहरणे टाळावीत कारण राजनेत्यांबद्दल असलेली "भावना" काय आहे हिचा सर्वे झालेला नसतो. तरीही,
२. मोदींना "जनतेचा" विकास करावा या स्वार्थासाठी लोकांनी त्यांना निवडून दिले असावे. An ex-MLA of Odisha is working as a construction labor and literally carrying bricks at a site in the same constituency. This MLA is retired from politics without any allegations on him. उद्या मोदींची अशी अवस्था झाली तर ५० कोटी (एकूण मतदान)* ३६% (एन डी ए चे मतदान) पैकी किती लोक त्यांना भेटायला जातील?
३. काही लोकांना, विकास बाजूला असू देत, मोदी मुसलमानांचे लांगूनचालन करणार नाहीत म्हणून त्यांच्यात आस्था आहे.
४. काही लोकांना ते मुसलमानांना चांगलाच धडा शिकवणार आहेत, वा किमान ते सत्तेत असताना आम्ही शिकवू शकू म्हणून त्यांच्यात आस्था आहे.

या प्रत्येक ठिकाणी लोकांचे प्रेम काही वेगळेच आहे, मोदी केवळ या प्रेमाचा चेहरा आहेत. व्यक्तिशः मोदींनी काहीही केले, कसेही वागले तर आयुष्यभर त्यांचेवर प्रेम करणारे लोक ते त्यांचे खरे प्रेमी.

प्रेम कोणाचं आहे, नक्की कोणावर वा कशावर आहे, किती आहे, किती पक्कं आहे हे जरा खोलात जाऊन बघावं लागतं. वर क्र. ४ मधे लोकांना ना मोदीवर आहे, ना देशावर, ना मानवतेवर. त्यांचा सल वेगळाच आहे. पण या द्वेषाचे मूर्त प्रकटीकरण "मोदींवरील प्रेमाच्या" रुपातच होत आहे. सबब हे नि अशी उदाहरणे मी खारीज करत आहे. राष्ट्रस्तरीय वर्तनातून एक मूल्य पकडायचे नि त्यावर भाष्य करायचे असंभव आहे, म्हणून पून्हा असो.
------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------व्यक्तिगत जीवनात मात्र मूल्यांचा हिशेब (वरच्यामानाने गणित करणे या अर्थाने) सोपा आहे. आपण जेव्हा कौटुंबिक वा सामाजिक सल्ले,संकेत, करार पाळतो तेव्हा इतर सदस्यांचा मूळ उद्देशच आपल्यावर अन्याय करण्याचा असतो अशी भावना असणे अनावश्यक आहे. आणि एकेकाळच्या आनंददायी, लोकमान्य बाबीने नंतर कधीकाळी भयंकर दु:ख होईल इतकी मूल्यांची उलथापालथ एका जीवनात करू नये. सामान्य सन्मूल्यांना धरून माणूस शेवटपर्यंत आनंदाने जगू शकतो, त्यात उगाच आपल्याला नाडवले गेले आहे अशी भावना करून घ्यायची गरज नाही. कौटुंबिक व सामाजिक सल्ले वा मूल्यांचा आग्रह हा अंततः सदस्याच्या हितासाठीच वा किमान त्या हेतूने असतो. अन्यथा ते शत्रूत्वातून आलेले असतात नि त्यांकडे दुर्लक्ष करायचे असते. व्यक्तिगत मूल्ये वा वर्तन समाजाच्या सरासरीपासून बरेच भिन्न ठेवायचे असेल तरी त्यासाठी सुबुद्ध समाजाचा बराच अकोमोडेटीवनेस असतो. एका थ्रेशोल्ड पलिकडे अशा वेगळ्या वर्तनाची चिकित्सा करण्याची गरज असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

तुमची बाजू मांडल्याबद्दल व माझ्या प्रतिक्रियेला 'डिट्टेल' प्रतिसाद दिल्या बद्दल मनापासून धन्यवाद!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ह्याला खवचट श्रेणी का द्यावी कोणी? मी "मनापासून" धन्यवाद असं लिहील असतांना.... असो!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

श्रेण्या कधी कधी प्रतिसादाचा दर्जा दर्शवितात, कधी कधी श्रेणीदात्याची पातळी. डजन्ट मॅटर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

त्याने बाकी सुधारणाही केल्याच की.

भयंकर औद्योगिकरण, खासकरुन हत्यारांचे. त्याबाबतीत तो थोर होता.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

यग्जाक्टलि. मिलिटरायझेशन त्याने उत्तमच केले. प्लस माझे स्मरण बरोबर असेल तर जर्मणीतील ऑटो-बान्स अर्थात हायवेंचे जाळे तयार करण्यात त्याचा दट्ट्या महत्त्वाचा होता. नुस्त्या ज्यूद्वेषाने पोट भरत नसते. त्याने अन्य सुधारणा केल्या म्हणून जर्मन लोकांना तो आवडायचा. पहिल्या महायुद्धात जर्मनीवर अतिशय अपमानास्पद अटी लादल्या गेल्या होत्या. त्या अपमानातून जर्मनीला बाहेर काढून ताठ मानेने त्याने जगायला शिकवलेच की. त्यामुळे हिटलरच्या यशामागे, त्याला मिळणार्‍या प्रेमादरामागे फक्त ज्यूद्वेष हेच एकमेव कारण नव्हते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

"त्याने हत्यारांचे औग्योगिकीकरण देशांतर्गतच केले होते का FDI अलाउ केले होते?" हा अत्यंत अवांतर व खवचट प्रश्न विचारणे टाळातो आहे Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हिटलरचा विषय आला की विशिष्ट देशातील विशिष्ट राज्याच्या विशिष्ट माजी मुख्यमंत्र्याचा येनकेनप्रकारेण बादरायण संबंध आणावाच लागतो काय, हाही ट्रोल प्रश्न विचारणे टाळतो आहे. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

प्रश्न 'टाळण्याची' ही अभिनव पद्धत भयंकर आवडल्या गेली आहे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

मलाही!! टाळल्यासारखे दाखवून बादरायण मढी उकरण्याची पद्धत तर त्याहून भयंकर आवडल्या गेली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अश्या प्रकारच्या लेखनाला काहितरी शब्द आहे. मागे उपक्रमावर मी या शैलीत एक प्रतिसाद दिल्यावर त्यावर प्रतिसाद देताना नंदनने सांगितला होता.
नंदन, काय रे म्हणतात या लेखनप्रकाराला?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

प्रश्न विचारणे टाळलंत ते बरं केलंत नाहितर - त्याशिवाय "कॉन्सट्रेशन कँपसाठी जमिनीचं अधिग्रहण कधी सुरू होतंय?" असे नेहमीचे मजेशीर प्रतिसाद वाचत करमणूक करून घ्यायची संधी कशी मिळेल?- असे उत्तर दिले असते , पण आता असे उत्तर देणेच टाळतो आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अरे अरे अरे..बादरायण संबंध लावून मनोरंजन तर केलेतच, असे अर्धवट सोडून जाऊ नका ना. पुढचे मनोरंजन कोण करणार?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

छे तो थोर होता, पण तुम्ही काय म्हणत होता ते लक्षात आले नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रेमाच्या नावाखाली लपलेल्या द्वेषाचे नको.

त्यागाच्या इच्छेमागे लपलेला वर्चस्ववाद बरा चालतो मग!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हिटलरबद्दल कोणाला ना आदर होता ना प्रेम

बरं..करा घाऊक सरसकटीकरण!

सर्व्हे केला का तुम्ही? किती जर्मन लोकांना ओळखता? किती रिलायेबल ऐतिहासिक पुस्तकं वाचलीत याबद्दलची? विदा द्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

खंडीभर उदाहरणे देता येतील पण तुम्हाला त्यांची योग्यता पटवून देण्यात मला माझी शक्ती खर्च करायची नाही.

आणि मला मुळी कंटाळाच आलाय निवडक वाक्ये उचलून उगाच किस पाडणे आणि स्वतःला सोयीस्कर असे अर्थ काढणे ह्या प्रकाराचा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

निवडक वाक्ये उचलून उगाच किस पाडणे

अंमळ डॉळे चोळून पुनरेकवार वाचलं तेव्हा कळ्ळं काय म्हणायचंय ते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

नीटपैकी म्हणजे काय?! तुम्हांला सोईचं उदाहरण नसेल, तर ते द्वेषाचं म्हणायचं का?! कमॉन!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

तसं करणं एकवेळ बरोबर अन समजण्यासारखं आहे. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

हिटलरबद्दल आदर असणे, झालंच तर अल कायदाबद्दल प्रेम असणे.

शिवाय कुणासाठी त्याग करावा तर त्याला त्यागकर्त्याची अन त्यागामुळे मिळालेल्या संपत्तीची कदर नसणे या केसमध्ये तो त्यागही वाईटच-विशेषतः त्या संपत्तीच्या धड वापराने बर्‍याच जणांचा फायदा होत असेल तर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

चांगले - वाईट, सदगुण दुर्गुण हे तुम्ही त्या गुणाच्या कोणत्या बाजुला उभे आहात त्यावर ठरते.

समजा भारताने उद्या काश्मिरचा विनाअट "त्याग" केला तर त्या त्यागाला तुम्ही सद्गुण म्हणाल की दुर्गुण?
अतिरेकी एका धर्माच्या आदरापोटी अनेकांना मारून टाकतात, अश्या प्रकारचा आदर बाळगणे चांगले की वाईट?
समजा माझ्या जोडिदाराने इतरही दोघांवर प्रेम केले तर ते चांगले का वाईट?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हिटलर प्रतिक्रियांत आला म्हणजे धागा मो़क्षाप्रत पोचल्याची पावतीच ती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी नै हो आणला हिटलरला.. बघा बरे!
आमच्याच्याने नै व्हायचं या धाग्याला मोक्षबिक्ष देणे Blum 3

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

@ सारिका,मिपा Thanks.
@ ऋषिकेश काय चेष्टा करता काय राव!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऋ च्या प्रतिसादाची श्रेणी बघा हो! Smile

नया है वह?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

वादप्रतिवाद करण्याच्या घाईत तुमच्या सुरेख टिपणाला दाद देणं राहून गेलं. स्वारी! अगदी प्रवाही, नितळ लिहिलं आहे तुम्ही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

पाने