दाखला

मागितलाच कोणी कधी
माझ्या जिवंतपणाचा पुरावा,
की शोधाशोध चालू होते असंख्य
कवितांची, वह्या-कागदांची, ई-मेल्स् ची,
अश्रू पडून फुटलेल्या शाईची,
(त्यातलं काही नाहीच मिळालं,तर)
आपल्या दिवसरात्रींची, उन्हापावसाची, हसण्यारडण्याची
(पण हे सगळं कधीच संपून गेलंय!)
फोटो, मिस्ड् कॉल्स्, मेसेजेस्, फॉरवर्ड्स् ची
(आता तर तुझा नंबरही माहीत नाही)
...
न गवसणाऱ्या, न उरलेल्या, निरुपयोगी
निरर्थक, निर्जीव, निर्माल्य सगळ्यात
सतत, केवळ तुलाच धुंडाळत राहणं,
इतकाच माझ्या सजीवतेचा दाखला
पुरेसा नाहीये का तुला?
(का पुरेसा नाहीये तुला?)

field_vote: 
4
Your rating: None Average: 4 (2 votes)

प्रतिक्रिया

रोचक!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

रोचक आहेच!
शेवटचा कंसतील पाठभेद अधिक आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आणि हो! लिहिते झाल्याबद्दल ऐसीवर स्वागत! Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आवडली. ईश्वर किंवा प्रेयसी कोणत्याही रुपकात कविता समजावून घेता येतेय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रेयसी हाच ईश्वर?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

होय तशीच काहीशी आहे Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रेयसी हाच ईश्वर?

प्रेयसी = ईश्वर किंवा ईश्वर = प्रेयसी असच काहिसं 'भय इथले संपत नाही' या कवितेला पण लागू होईल असं वाटतं

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आधी रोटी खाएंगे, इंदिरा को जिताएंगे !

मस्तय कविता! शेवटला कंस तर भारीच!
वाचून मनात Gotye चं Somebody that I used to know थोडसं डोकावलं!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्तच आहे.

शेवटच्या दोन ओळीतली शब्द आगेमागे केलेली द्विरुक्ती (तदनुषंगाने आलेला अर्थबदलही) कल्पक आहे. एक म्हणावे, तर युक्ती आवडली. परंतु मग थोडेसे असेही वाटते, की असे gimmick कवितेतल्या भावनांना थोडा बिलोरीसुद्धा करते. पण मग त्यापुढे असेही वाटते, की कदाचित ही व्यथा पौगंडावस्थेतल्या प्रेमभंगाची आहे, आणि असा मनस्वी तडफडणारा तरी किंचित उथळ भाव अतिशय योग्यसुद्धा आहे. ("The Raven"मधला तरुण दःखी आहे, पण मुद्दामून दु:खात रमून जाणाराही आहे, म्हणून त्याचे दु:खद उद्गार शब्दखेळात रमतात, अशा प्रकारचे विश्लेषण खुद्द कवी एडगर अ‍ॅलन पो याने दिलेले आहे ; तसाच काही प्रकार.)

पैकी कुठलाही शब्दक्रम वेगवेगळ्या वजनाने वाचला, तर हेच दोन अर्थ सांगू शकतो :
पुरेसा नाहीये का तुला?
पुरेसा नाहीये का॒ तुला?

का पुरेसा नाहीये तुला?
का पुरेसा नाहीये तुला?

कदाचित शेवटची ओळ नुसतीच द्विरुक्त केली असती, तर कविता दुसर्‍या-तिसर्‍यांदा वाचताना वाचकाला वेगळा अर्थ समजून आला असता, आणि पूर्न कविताच बदलल्याचा अनुभव आला असता.

(मर्ढेकरांच्या या ओळी घ्या : "येऊ दे वाणीत माझ्या सूर तूझ्या आवडीचे." येथे आपणा सर्वांना आधी एक मग नंतर दुसरा अन्वय सुचतो. तुला जे सुर आवडतात, ते सुर माझ्या वाणीत येऊ दे. किंवा : मला तुझी आवड आहे, त्याबाबतचे सुर माझ्या वाणीत येऊ दे. प्रत्येक अन्वयाने कवितेचा मोहरा बदलून जातो. तसा अनुभव या कवितेबाबत आला असता.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0