व्यायाम
काल रात्री मध्येच जाग आली अन बराच वेळ फारेन्ड यांची समीक्षा आठवून हसू येत राहीले. मग एकेका व्यक्तीच्या प्रतिक्रिया आठवू लागल्या अन पैकी उसंत सखू यांची आठवण झाली. याचे कारण मला जे २ विनोद आवडले होते बरोब्बर त्याच २ विनोदांना त्यांनी दाद दिलेली होती. पहीला विनोद तर आठवला पण दुसरा आठवेच ना. खूप वेळ मेंदूला ताण दिला तरी आठवेनी. मग अल्झाइमर्स चा ऑनसेट तर नाही ना :O असं काहीसं वाटू लागलं, अन मग एक आयडीया केली - फरीश्ते या सिनेमाची फारएन्ड यांनी केलेली समीक्षाच आठवू लागले.
कळले आपल्याला? प्रतिक्रिया आठवण्याकरता, स्टोरी-सिक्वेन्स आठवू लागले. २ मिनीटात दुसरा जोक आठवला अन हुश्श झाले.
मग माझा एन डी ई चा धागा व त्यावरच्या प्रतिक्रिया आठवू लागले. पैकी पहीली प्रतिक्रिया होती घासकडवींची. त्यांनी ३ पॅरिग्राफ=३ मुद्दे मंडले होते. पैकी पहीला अर्धाच अन तीसरा पूर्ण आठवला पण २ रा अज्जिबात आठवला नाही. परत काँप्युटर वर येऊन पहावा लागला.
मग मात्र "युरेका" असं ओरडावसं वाटलं. का? कारण एक "टूल" सापडले, तंत्र सापडले असे वाटले. कदाचित अनेकांना अवगत असेल पण मला मात्र काल सापडले. अन मग लक्षात आलं हे एक टूल आज सापडलं आहे- मेंदूच्या व्यायामाचे.धागा आठवायचा, व एखाद्या आयडीची प्रतिक्रिया आठवायचा प्रयत्न करायचा.बिलीव्ह मी वाटते तितके सोपे नाही.मेंदूचा एक उत्तम व्यायाम होतो. ऐसीच काय आयुष्यातील अन्य क्षेत्रातही हा व्यायाम लागू करता यावा.
अनेकजण कदाचित हा व्यायाम करतही असतील तर काहींना नव्याने कळेल. कोणाला फायदा झाला तर आनंदच आहे. इसी बातपे मेंदूचे असे अन्य व्यायाम या धाग्यावर मांडावे ही विनंती.
माहितीमधल्या टर्म्स
लक्षात ठेवणे
लक्षात ठेवण्यावर मुद्दाम लक्ष न देणे ही माझी जुनी खोड आहे. म्हणजे पुस्तक वाचले तर त्याचे नाव काय आहे, लेखक कोण, प्रकाशन, आवृत्ती, पात्रांची नावे, घटनांचे अचूक काळ, पात्रांची नाती, लेखकाला नक्की सांगायचं आहे याकडे मी लक्षही देत नि लक्षात तर ठेवतच नाही. फक्त मला कळलेला विषय नि आशय हे लक्षात राहतात. लोक चित्रपट पाहतात तेव्हा त्यांनी डायरेक्टर, म्यूझिशियन, संवादलेखक, पार्श्वगायक, इ इ बरंच माहित असतं. माझे मित्र या ऐवजी हा डायरेक्टर असता तर बरं झालं असतं अशी चर्चा करू लागतात तेव्हा मी डायरेक्टर पिक्चरमधे नक्की काय काय करतो हा प्रश्न चर्चेच्या अंती विचारतो. मार्केटमधे वाहनांचे शेकडो एक ब्रँड्स असावेत. फक्त डिझाईन्स पाहून मी फारतर ८-१० ओळखेन, बाकीचे नाव वाचल्याशिवाय कळणार नाहीत. तसेच मला आवडणार्या गाण्यांची यादी फार मोठी आहे, पण कोणत्याही गाण्याचा कवि, गायक, इ इ मला माहित नसतो. हे गाणं पक्कं तुकारामांनी रचलं असावं असं मला वाटत असताना ते जगदीश फेबूडकरांनी रचलेलं निघतं. लक्षात ठेवण्यावर जोर फक्त बारावीच्या परीक्षेत दिलेला, जबरदस्त डिटेलमधे सगळं लक्षात ठेवलेलं. त्यानंतर असं काही लक्षात ठेवायची गरज पडली नाही. मला ३० एकं पर्यंत पाढे पाठ होते. ते उतरावून १२ एक पर्यंत केले. ऑफिसचा बोर्ड नंबर नि बायकोचा नंबर हे दोनच फोन नंबर, माझ्या स्वतःच्या फोन नंबरशिवाय मला पाठ आहेत. आता त्या वेलांट्या नि उकार किती लक्षात ठेवायचे?
लक्षात न ठेवायची ही लक्झरी मूलतः काही कारणांनी मी घेतो -
१. मला लक्षात ठेवायचं नाही म्हणताना मला लक्षात राहत नाही असा आरोप स्वतःवर करता येत नाही.
२. लक्षात न राहण्याचे दोन प्रकार आहेत - न आठवणे नि कोणी सांगीतले तरच आठवणे. दुसर्यांनी आठवण करून दिली तर ते उत्तर योग्य आहे का हे मला नेहमी जवळजवळ पक्के माहित असते. म्हणजे मेमरी आहे पण रिकॉल नाही असा प्रकार.
३. मेमरीही नाही नि रिकॉलही नाही, तेव्हा काय करणार? काही बेंचमार्क माहित असणं. प्रत्येकाच्या काही व्हिविड मेमरिज असतात. त्यावापरून काही ठोकताळे बांधता येतात. गांधीजी कधी जन्मले हे आठवत नसले तरी इतर माहितीआधारे एक ठिकपैकी गेस करता येतो.
४. परीक्षेला नाही तर लक्षात ठेवायची गरज नाही.
५. Absence of image consciousness - तल्लख स्मृती असणारांची फार तारीफ होते. ऐसीवरच ज्या व्यक्तिचे व्याकरण, वाक्यरचना, आशयाचा फ्लो, इ इ अखंडपणे व्यवस्थित असेल अशा आयडींची त्यावरून एक चांगली प्रतिमा असेल. त्यात (म्हणजे प्रतिमेत) रस नसला तर एवढ्या छोट्या बाबतीतच हजारो गोष्टी लक्षात ठेवायचे बंधन निघून जाते.
प्रोफेशनल बाबतीत मात्र अशी लक्झरी घेता येत नाही. शेकडो लोक, कितीतरी कंपन्या, व्हॅल्यू चेन, त्यांची उत्पादने, त्यांचे स्पेक्स, तंत्रज्ञान, कायदे, इ इ चोखपणे लक्षात ठेवावं लागतं. शिवाय डॉक्यूमेंट्स, कागदपत्रे, त्यांचे डिटेल्स इ इ लक्षात ठेवावे लागतात. पण हे काही परिक्षेच्या पेपरसारखे नसते. म्हणजे हे करायला रिजनेबल वेळ मिळतो. आणि प्रकल्प संपला कि माहिती डंप करायची. इथेही सगळ्या माहितीत नि विचारांत सुसुत्रता नसेल तर मेमरीवर ताण पडतो. पण सुसुत्रता असेल तर माहिती मेंदूवरचा ताण बनत नाही.
शिवाय संगणक, लायब्ररी, वृत्तपत्रे, इ इ भरपूर प्रमाणात ऐनवेळी माहिती देतात. म्हणून किचकट, कमी वापराव्या लागणार्या गोष्टी लक्षात ठेवायची गरज नाही. आउटलूक मधे मिटिंग, पेंडिंग कामे, टू डू, फ्लॅग केलेले मेल, इ इ असतात. संगणक इतकी मदत करतो कि विचारता सोय नाही. काँप्यूटर नि डॉक्यूमेट्स रिलेटेड सवयी व्यवस्थित असतील तर फार काही लक्षात ठेवायची गरज नसते.
मेमरीवर लक्ष न देण्याचा एक तोटा हा आहे कि कधी कधी असा माणूस sponteneous discussions मधे बाहेर फेकला जाऊ शकतो. त्याला गप्प राहावं लागतं. त्यामुळं मलाही एकदा वाटलं होतं चला आपणही आपला स्मृत्यालस दूर करू या. तेव्हा इतर काही बिनकामाचं नि अवघड इ इ आठवत बसण्यापेक्षा मी अर्धाएकतास माझे ऑफिसचे त्याच दिवशीचे ८ तास जितक्या डिटेलमधे आठवता येतील तितक्या डिटेलमधे आठवत असे. (याचा फायदाही असायचा.) खास करून सारी विशेषनामे, आकडे, स्थाने नि वेळा. आठवून जर संतोष झाला तर मग अजून मागचा एक दिवस. ते ही फास्ट जमलं तर अजून एक दिवस मागे, इ इ. इथे आपणच प्रधान पात्र असल्याने प्रक्रियेत एक सोपेपणा आहे, छळ नाही. काही काळाने माझ्या असं लक्षात आलं कि ऑफिसकाम मी फारच व्यवस्थित आठवू शकतो. पण इतरत्र पुन्हा नन्नाचा पाढा. म्हणजे मी काँशस होऊन जितके लक्षात ठेवी तितके सगळे लक्षात राही नि जेव्हा मी "चिल्ड" मोड असे तेव्हाचे लक्ष न दिलेले पुन्हा पहिले पाढे पंचावन्न. म्हणजे एकूणता उपयोग नाही.
...
म्हणजे पुस्तक वाचले तर त्याचे नाव काय आहे, लेखक कोण, प्रकाशन, आवृत्ती, पात्रांची नावे, घटनांचे अचूक काळ, पात्रांची नाती, लेखकाला नक्की सांगायचं आहे याकडे मी लक्षही देत नि लक्षात तर ठेवतच नाही. फक्त मला कळलेला विषय नि आशय हे लक्षात राहतात.
मला आज पाहिलेला पिच्चर उद्या आठवत नाही. कशासाठी लक्षात ठेवायचा?
मात्र, कधीकधी त्यातले अत्यंत इर्रेलेवंट डीटेल्स उगाच (किंवा इर्रेलेवंट असतात म्हणूनच) लक्षात राहतात.
एकदा, 'ताल' नामक ('बाबूजी'-छाप) पिच्चर बायकोबरोबर पाहिल्यावर, काही दिवसांनी त्या पिच्चरचा विषय असाच निघालेला असताना, 'पण त्या पिच्चरमध्ये ऐश्वर्या राय नेमकी कुठे नि कधी होती?' असा प्रश्न विचारून बायकोला झीट आणली होती.
मात्र, त्याच पिच्चरमध्ये, गबरश्रीमंत अमरीश पुरी त्याचा मुलगा परदेशातून शिक्षण संपवून परत येतो तेव्हा त्याचे स्वागत करताना दंताड केवळ अमरीश पुरीच वेंगाडू शकतो तितके वेंगाडून आणि तोंडातून बादलीभर लाळ गाळत, "बेटे, मैं ने तुम्हारे लिए सिंगापूर एअरपोर्ट से१ डिजिटल फ्लॉऽऽऽपी कॅमेरा लाया है" म्हणतो, तो स्टुपिड प्रसंग अजूनही चांगलाच लक्षात आहे.
आता बोला!
====================================================================================================
१ सिंगापूर एअरपोर्टवरून, बरे का. सिंगापूरवरून नव्हे.
सिंगापूर से
सिंगापूर एअरपोर्ट से१
यात काय चुक आहे? म्हणजे मी देखिल क्वाला लंपूर विमानतळावरच# "गुदांग* गरम" सिगारेटचा मोठा पॅक विकत घेतला होता.
# म्हणजे arrangements did not include travelling outside airport. शिवाय तिथे कस्टम शॉप, इ इ होते. (अवांतर-मला पण खरंतर डिजिटल हँडीकॅम घ्यायचा होता. पण किंमत योग्य आहे का कळेना. नंतर भारतात आल्यावर कळले कि आपलं हजारोनी नुकसान होणार आहे.)
* हा शब्द मी खट्याळपणे वापरत नाहीय. तेच आहे नाव. शिवाय बहासा इंडोनेशिया मधे संस्कृतोद्भव शब्द आहेत, तेव्हा सिगारेट्चा अगदी हाच अस्पेक्ट हेरून नाव देणे म्हणजे किती झालं!!
अमरीश पुरी ट्रान्झीट एअरपोर्टवर घेतला असे म्हणायचे असेल, त्यासाठी तळटीप का?
प्रचंड स्मृती असलेले लोक बघून
प्रचंड स्मृती असलेले लोक बघून भारी कौतुक वाटतं.
केस लॉ ची नावं वगैरे मी परीक्षेत अंदाजपंचे हाणत असे. उदा. "सीआयटी वि. प्यारा सिंग" या केसचे मुद्दे, कोर्टाचा निर्णय वगैरे लक्षात राहिलं तरी नाव रहात नसे, आणि परीक्षेत "सीआयटी वि. बलम सिंग" असं काहीसं दणकावून येई. एक हॉकिन्स प्रेशर कुकरची केस आहे. परीक्षेच्या ताणात मला प्रेशर कुकर आठवला, पण हॉकिन्स काही केल्या आठवेना. मग ऐन परीक्षेत प्रेशर कुकरचे ब्रँड्स आठवत बसलो होतो.
ज्या मित्रांना हे माहीत होतं, ते परीक्षेनंतर मुद्दाम गाठत आणि स्वतःची करमणूक करून घेत.
प्रसिद्ध वकील पोरस काका यांनी लढवलेली एक केस मागे बसून ऐकली होती. सेक्शन, त्यावरचा केस लॉ वगैरे तर ते तोंडपाठ सांगत होतेच - पण कुठल्या केसमध्ये बेंचवर कोण होतं वगैरे सुद्धा त्यांना लक्षात होतं!
हो, पण ते लक्षात ठेवणं इज नो
हो, पण ते लक्षात ठेवणं इज नो मीन फीट.
एकाच विषयावर एकाच हायकोर्टाच्या निर्णयांत फरक पडला होता. त्यामागची कारणं काय असावीत असा प्रश्न न्यायमूर्तींनी विचारल्यावर पोरस काकांनी त्या दोन केसेसमधले न्यायाधीश, त्यांची त्या विशिष्ट मुद्द्यांवरची मतं, पूर्वीच्या त्या न्यायमूर्तींच्या निर्णयातले ट्रेंड्स वगैरेचे दाखले देत अतिशय समर्पक उत्तर दिलं होतं.
समोरच्या न्यायमूर्तींकडून काय प्रश्न येतील हे एका मर्यादेपलिकडे anticipate करणं प्रचंड अवघड असतं. त्या विशिष्ट केसमधला हा मुख्य/महत्त्वाचा मुद्दाही नव्हता. न्यायमूर्तींकडून आलेला एक रँडम प्रश्न. तरी काका त्यासाठी तयार होते!
किंबहुना काकांच्या ख्यातीमुळेच न्यायमूर्तींनी हा प्रश्न त्यांना विचारला. नाहीतर बाजू मांडणार्या वकिलाला कायदेशीर बाबींबद्दलचं त्याचं (वैयक्तिक) मत विचारणं खूप दुर्मिळ असतं.
हॅ हॅ हॅ, प्रचंड हे नेपाळच्या
हॅ हॅ हॅ,
प्रचंड हे नेपाळच्या माजी पंतप्रधानांचे नाव होते.
Anomic_aphasia
ऐसीकरांनो तुम्हाला लोकांची नावं आठवत नसतील तर तुम्हाला हा आजार(Anomic_aphasia) आहे हे नक्की समजा.
एक विनोद आठवला नाही तर
एक विनोद आठवला नाही तर अल्झाय्मर्स चा ऑनस्लॉट ?
(इथे मी विनोद खन्ना आणि विनोद मेहरा या पैकी कोण आठवले ? असा जोक केलेला नाही याची कृ. नोंद घेणे)
(एक पी जे )
एका नोकरीसाठी च्या मुलाखतीमधे उमेदवाराला प्रश्नं विचारला जातो 'डिमिनिशिंग मार्जिनल युटीलीटी ची व्याख्या सांगा .
उमेदवार गप्प बसतो . मुलाखत घेणारा विचारतो
"आठवत नाही का ?"
उमेदवार ,
"थोडं आठवतय"
मुलाखत घेणारा,
"जितके आठवते आहे ते सांग".
उमेदवार जरा विचार करून सांगतो,
" .... धिस इस कॉल्ड डिमिनिशिंग मार्जिनल युटीलीटी "
या केस ला काय म्हणाल ?
मेंदूच्या व्यायामाचे.धागा
मेंदूच्या व्यायामाचे.धागा आठवायचा ???
लिंक द्या