एका चंद्रासाठी...

तुझ्या एका चंद्रासाठी
माझं अख्खं आभाळ गहाण टाकलेलं मी तेव्हा..
माझ्या असंख्य चांदण्यांपेक्षा,
मला महत्वाचा होता तुझा कवडसा..
आणि तोसुद्धा मला तुझ्याचसोबत वाटून घ्यायला हवा असायचा..
त्याला पूर्णत्व यायचंच नाही त्याच्याशिवाय माझ्यालेखी..
पण आता असं राहिलं नाही..
आधी मुद्दाम आणि आता सवयीनेच हे टाळतेय..
हल्ली माझ्या आभाळातली छोटी मोठी चांदणी पण
अपार कौतुकाने न्याहाळत असते मी..
शांतपणे त्यांचे कवडसे मुरवून घेत असते स्वतःमध्येच..
आणि हे सगळं होताना स्वतःमधले बदल पहात रहाते
त्रयस्थपणे...
आता तर हे इतकं सराईतपणे होतय की
कधी काळी मला चंद्राचं असलं वेड होतं हे
चांदण्याच सांगत असतात मला अधूनमधून..
पण आता सवय झालीये..
खरच सवय झालीये..
मान्य आहे तुझ्यासोबत असताना कवडसे जसे लखलखायचे
तसे आता नाही चमकत..
पण आता येणारा काळोखही फारसा अंधारा नसतो..
ते लखलखणं आणि त्या काळोखी गर्तांतले हेलकावे झेपेनासे झालेत..
माझ्या चुकार चांदण्यांचे किरण घेवून चालत असते मी आता..
खरंच..
तुझ्या एका चंद्रासाठी
अख्खं आभाळ गहाण टाकायचं वय मागे पडलंय आता...

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

आशय आवडला...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- सुमित

"दिसे जे कवीला,न दिसते रवीला...सांगूनी गेले कुणीसे शहाणे..."

छानच.. कल्पना, प्रकटन सगळेच आवडले.
मागे धुक्याच्या कवितेच्या वेळीही जाणवले होते, रुपके आणि त्यांचा वापर तुम्ही छानच करता.
मुक्तछंदातही एक नाद असतो, तोही घालता आला तर चार 'चंद्र' लागतील Smile

बाकी, का कोण जागे (अनेकांचे आ/नावडते कवी) श्री. संदीप खरे यांच्या ओळी आठवल्या

विळीपरी कधी एक चंद्रकोर घ्यावी
हिरवीशी स्वप्ने धारेधारेने चिरावी
कोर कोर चंद्र चंद्र हारता हारता
मनातून पूर्णबिंब तगायला हवे
कधीतरी वेड्यागत वागायला हवे

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सुंदर आहे कल्पना.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0