छायाचित्रण पाक्षिक आव्हान ३४ : सूर्यास्त

मागील आव्हानाला पुरेसे प्रतिसाद न आल्यामुळे विषय बदलतो आहे .. सुर्योदय आणि सूर्यास्त ह्या नित्यनेमाने घडणार्या घटना .. वर्षानुवर्षे रोज होणार्या .. तरीही प्रत्येक सुर्योदय आणि प्रत्येक सूर्यास्त काही वेगळाच वाटेल इतकी विविधता निसर्ग दाखवून जातो .. तेव्हा ह्या वेळेस असे वेगळे दिसणारे, असणारे किंवा भासणारे, वैविध्यपूर्ण सूर्यास्त चित्रबद्ध करुया ..
मी काढलेले एक छायाचित्रे इथे देत आहे ..
हे छायचित्र शहरातील सूर्यास्ताचे आहे .. उंच इमारतींच्या आड अस्तास जाणारा सूर्य मला समुद्रावरील / sunset point वरील सुर्यास्तापेक्षा थोडासा वेगळा भासला ...

अनेक वेळा कच्चे फोटो हे काहीसे धूसर आणि रंगांनी कमी संपृक्त असतात. गिंप, पिकासासारख्या चित्रसंस्करण प्रणाली वापरून छायाप्रकाशभेद, रंगप्रमाण बदलून तर चित्र खुलविता येतील. तसेच योग्य प्रमाणात कातरल्याने मांडणीही संतुलित आणि आकर्षक होऊ शकते. तसा प्रयत्न जरूर करावा आणि केलेले संस्करण नमूद करावे.
स्पर्धेचे नियम पुढीलप्रमाणे आहेत:
१. केवळ स्वतःने काढलेले छायाचित्रच स्पर्धेच्या काळात स्पर्धेसाठी प्रकाशित करावे. मात्र त्याविषयाशी संबंधित इतरांची, इतरत्र पाहिलेली चित्रे योग्य परवानगी घेऊन इथे टाकल्यास हरकत नाही. स्पर्धाकाळात टाकलेले इतरांचे चित्र स्पर्धेसाठी धरले जाणार नाही.
२. एका सदस्याला जास्तीत जास्त ३ चित्रे स्पर्धेसाठी प्रकाशित करता येतील. जर/जी छायाचित्रे स्पर्धेसाठी नसतील तर प्रतिसादात ठळकपणे तसे नमूद करावे.
३. आव्हानाच्या विजेत्यास पुढील पाक्षिकात आव्हानदाता आणि परिक्षक व्हायची संधी मिळेल. अर्थात आधीच्या आव्हानाचा विजेता पुढील पाक्षिकाचा विषय ठरवेल आणि विजेता घोषित करेल. (मग तो विजेता त्यापुढील पाक्षिकाचा आव्हानदाता व निरीक्षक असे चालू राहील.)
४. ही स्पर्धा १० दिवस चालेल. म्हणजे आज सुरू होणार्या स्पर्धेचा शेवट १७ मे रोजी भा.प्र.वे.नुसार रात्री १२:०० वाजता होईल. १८ मे रोजी निकाल घोषित होईल व विजेती व्यक्ती पुढील विषय देईल.
५. पाक्षिक आव्हानाच्या धाग्यावर प्रकाशित झालेल्या चित्रांच्या तंत्रावर शंका विचारण्यावर, निकोप टिपण्या करण्यावर बंदी नाही. मात्र हे आव्हान आहे हे लक्षात घेऊन जिंकण्यासाठी/हरवण्यासाठी उगाच एखाद्याला टीकेचे लक्ष्य करू नये अशी विनंती. अर्थात तुम्हाला हव्या त्या चित्रांबद्दल मुक्त, निकोप चर्चा करण्यास प्रोत्साहन देण्याचेच धोरण आहे.
६. आव्हानाचा विजेता घोषित करण्याचे पूर्ण अधिकार आव्हानदात्यांचे असतील. त्यासाठी त्याने ठराविकच निकष लावावेत असे बंधन नाही. त्याने आव्हान द्यावे व त्याचे आव्हान कोणी सर्वात उत्तम पेलले आहे ते ठरवावे इतके ते सोपे आहे. शक्यतो ३ क्रमांक जाहीर केले जातील.(मात्र पुढील पाक्षिकात फक्त प्रथम क्रमांकाची व्यक्ती आव्हान देईल). आव्हानदात्याकडून काय आवडले हे सांगण्याचे बंधन नसले, तरी अपेक्षा जरूर आहे.
७. आव्हानदात्याला प्रथम क्रमांकाचा एकच विजेता/विजेती घोषित करणे बंधनकारक आहे.
८. आव्हानात स्पर्धेसाठी प्रकाशित चित्रे प्रताधिकाराच्या दृष्टीने निकोप असावीत अशी अपेक्षा आहे.
९. आव्हानदाता स्वतःची चित्रे प्रकाशित करू शकतो मात्र ती स्पर्धेत धरली जाणार नाहीत.
१०. कॅमेरा व भिंगांची माहिती देणे बंधनकारक. शक्य असल्यास इतर तांत्रिक तपशील द्यावेत.
----------
सूचना : 'ऐसी अक्षरे' संकेतस्थळावर आपली चित्रे कशी प्रदर्शित करावीत, याबद्दल अधिक मार्गदर्शन या धाग्यावर आहे. त्याचा लाभ घ्यावा.
चित्रे या संकेतस्थळावर टाकताना, जर Width आणि Height (दोन्ही) दिली नाही तर ते फोटो इंटरनेट एक्सप्लोरर् (९) वर दिसत नाहीत. (पण फायरफॉक्सवर दिसतात.) यावर उपाय म्हणजे Width आणि Height दोन्ही रोमन अंकांमध्ये द्यावेत किंवा त्यांचा उल्लेखच इमेज टॅगमधून वगळावा. कृपया याची नोंद घ्यावी.

स्पर्धा का इतर?: 
field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

1) Clearwater Beach, Florida
Camera : Canon T1i
Lens : Canon 18-135
Focal length : 135 mm
Aperture : f/10
Shutter speed : 1/250 s
ISO : 100

2) Clearwater Beach, Florida
Camera : Canon T1i
Lens : Canon 55-200
Focal length : 200 mm
Aperture : f/13
Shutter speed : 1/200 s
ISO : 200

3) Ceder key, Florida
Camera : Canon T1i
Lens : Canon 18-55
Focal length : 27 mm
Aperture : f/25
Shutter speed : 0.5 s (tripod used)
ISO : 100

आईच्यान्. काय खतरा चित्रे आहेत! विशेषतः पहिले चित्र तर केवळ अवर्णनीय आहे. मान गये _/\_

बाकी, सर्व फटूंमध्ये कप्तान जॅक स्पॅरोच्या वेळची जहाजे कशी काय दिसत आहेत? आम्रविकेत अद्यापही तेव्हाची जहाजे वापरतात की काय?

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

धन्यवाद! अर्थात या छायाचित्रांत माझे कौशल्य २५% आणी उरलेले ७५% टक्के निसर्गाची कमाल आहे. ते जुन्या काळचे जहाज म्हणजे समुद्री चाचे या थीमची क्रूज आहे, १-२ तास त्या जहाजातून फिरवून आणतात.
सुर्यास्ताचा आणखी काही आवडलेला फोटो चिकटवत आहे (स्पर्धेसाठी नाही).

याच फोटोचा कातरलेला भाग

अच्छा, थीम आहे तर. सहीच!

ही चित्रेही उत्तम, यद्यपि अगोदरची चित्रे जास्त आवडली. बादवे ही चित्रे सूर्योदयाची म्हणूनही खपतील, नै Wink

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

बादवे ही चित्रे सूर्योदयाची म्हणूनही खपतील, नै (डोळा मारत)

हो हो... फक्त उलट्या बाजूने पहा, म्हणजे झाले.

==========
भुंकणारा ब्राह्मण (B. B., अर्थात डबल बी).

किंवा न'व्या बाजूने.

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

नाही. थोड्या निरीक्षणांती फरक कळू शकेल. सूर्योदयाच्या वेळी प्रकाश बर्‍याच अंशी निळी झाक असलेला असतो. तर सूर्यास्तावेळी लाल/केशरी झाक असलेला.

अर्थात शेवटी खपवायला काय, काय पण खपवता येतं....

काहीकाही सूर्यास्ताचे फोटो हे सूर्योदयाचे म्हणून खपवता येऊ नयेत - त्यात तात्त्विक अंतर्विरोध येतो.

उदाहरणार्थ: 'चौपाटीवरील / गोव्याच्या किनारपट्टीवरील सूर्यास्त' हा फोटो 'चौपाटीवरील / गोव्याच्या किनारपट्टीवरील सूर्योदय' म्हणून खपवता येऊ नये.

पहा विचार करून.

- (रात्रीची जास्त झाल्याच्या भानगडीत एकदा 'बीचवरचा सूर्योदय काही करून पाहायचाच' असा चंग बांधून, न जाणो, सकाळी लवकर जाग नाही आली तर काय घ्या, म्हणून आख्खी रात्र गोव्याच्या बीचवर काढलेला) 'न'वी बाजू.

==========
भुंकणारा ब्राह्मण (B. B., अर्थात डबल बी).

रात्रीची जास्त झाल्याच्या भानगडीत एकदा 'बीचवरचा सूर्योदय काही करून पाहायचाच' असा चंग बांधून, न जाणो, सकाळी लवकर जाग नाही आली तर काय घ्या, म्हणून आख्खी रात्र गोव्याच्या बीचवर काढलेला

मॉर्निंग मॉर्निंग पॅरट हॅपन्ड, राईट?

*********
आलं का आलं आलं?

...झाला खरा.

पण 'पॅरट झाला', हे सहसा त्या पॅरटचे बारसे झाल्याशिवाय लक्षात येत नाही, हा सृष्टीचा न्याय आहे. त्याला काय करणार?

==========
भुंकणारा ब्राह्मण (B. B., अर्थात डबल बी).

>>चौपाटीवरील / गोव्याच्या किनारपट्टीवरील सूर्यास्त' हा फोटो 'चौपाटीवरील / गोव्याच्या किनारपट्टीवरील सूर्योदय

सहमत आहे. पण तोच फोटो चेन्नैच्या किनारपट्टीवरील सूर्योदय म्हणून खपवता येईल. Smile

--------------------------------------------
गमभन मॉड्युल आता ऑफीसमधूनही चालत आहे.

प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एम सी पी

...चेन्नैतल्या सूर्योदयाच्या फोटोत कोणाला इंटरेष्ट असणार आहे?

त्याला ते ग्ल्यामर नाही.

==========
भुंकणारा ब्राह्मण (B. B., अर्थात डबल बी).

अमानवीय निसर्गाचे ग्ल्यामर दोहोंतही सारखेच असेल असे वाटते.

मानवीय ग्ल्यामरची गोष्ट वेगळी.

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

खरे आहे, पण गंमत म्हणून अशा एखाद्या वैचित्र्यपूर्ण दृष्टिकोनातून चित्र काढायची माझी इच्छा आहे. मुद्दामून परिणाम साधायला गेल्यास हे चित्र तसे चक्रावणारे होऊ शकले असते. गोव्यातील एका रुंद खाडीवर होणारा सूर्योदय कोणीतरी टिपलेला आहे :

This photo of Zuari View is courtesy of TripAdvisor
मुद्दामून प्रयत्न केला, तर कदाचित क्षितिजावर नुसते पाणी दिसेल, असे वाटते.

(दक्षिणायनात दोना पावला येथून असे चित्र काढता येईल, असा विचार करून गूगल शोध घेतला, आणि वरील चित्र सापडले.)
मुंबई कुलाब्यावरूनसुद्धा पाण्याच्या क्षितिजावरील सूर्योदयाचे चित्र काढता येईल बहुतेक.

हम्म. निळसर झाकीबद्दल थोडा असहमत आहे, पण पाहिले पाहिजे.

सूर्योदय की झाकी है, अभी देखना बाकी है.

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

अपरिमेय जी, फोटो फारच सुंदर आहेत.

सुंदर !

मस्त! पहिले आणि तिसरे विशेष आवडले. (तिसर्‍या चित्राचा खालचा १/६ भाग कातरल्यास कदाचित अधिक उठाव यावा).

या विषयावर अनेक चांगली चित्रे आली आहेत. आपली चित्रे विशेष आवडली. रचना व छाया प्रकाश संतुलन उत्तम आहे. पहिल्या चित्रातील शीडाच्या रुपातला उत्कर्षबिंदु विशेष आवडला. तिसर्‍या चित्रातला विषय खुलवणारा परिणाम प्रभावी आहे.

धन्यवाद. "पहिल्या चित्रातील शीडाच्या रुपातला उत्कर्षबिंदु विशेष आवडला. तिसर्‍या चित्रातला विषय खुलवणारा परिणाम प्रभावी आहे." हे वाचून गटण्याचे समालोचन आठवले Smile

१. सूर्यास्त (सूर्यास्त बघत सिगरेटचे झुरके घेणार्‍या म्हातार्‍याचे मागून चित्र टिपायचे होते...पण तो वळला आणि हे असे चित्र आले.)

Camera NIKON D40X
Lens Nikkor 18-55mm
Focal Length 50mm
Exposure 1/320
F Number f/8
ISO 200

२. संधिकाली लांब सावली

Camera NIKON D40X
Lens 18-55mm
Focal Length 18mm
Exposure 1/640
F Number f/8
ISO 200

३. संध्याकाळ

Camera NIKON D40X
Lens Nikkor 18-55mm
Focal Length 26mm
Exposure 1/30
F Number f/6.3
ISO 200

उठावदार आहे. श्वेत श्यामल चित्रात अलगद रंग भरल्याचा परिणाम सुरेख आहे.

चित्रक्रमांक १

Lens : Nikkor 18-55mm f/3.5-5.6
ISO 200
Focal length 30 mm
Aperture f/11
Exposure 1/125 sec
No flash

चित्रक्रमांक २

Lens : Nikkor 18-55mm
ISO 160
Focal length 48 mm
Aperture f/8
Exposure 1/250 sec
No flash

चित्रक्रमांक ३

Lens : Nikkor 55-300mm f/4.5-5.6G
ISO 100
Focal length 300 mm
Aperture f/13
Exposure 1/200 sec

कॅमेरा: निकॉन D-5100

चित्र स्पर्धेसाठी नाही. जालावरून साभार. मॅनहॅटनहेन्जबद्दल अधिक माहिती येथे.

रोचक चित्र पण त्या शेलाट्या मुलीमुळे छायाचित्र अधिक रोचक झाले आहे आणि स्ट्रीट फोटोग्राफीमधे रँडमली प्लेस केलेल्या स्त्रीयांमुळे चित्र अधिक रोचक होते ह्यासंदर्भी काही छायाचित्रकार मित्रांशी चर्चा केल्याचे आठवते.

किंवा

शेलाट्या मुलीमुळे चित्राचा फोकस पुर्णपणे मॅनहॅटनहेन्जवर रहात नाही.

फोकस जर्रा कमी झाला हेच आणि इतकंच मान्य. बाकी या केसमध्ये ते चित्र अधिक रोचक वाटण्यासारखं पोर्ट्रेयल आहेच कुठे Wink

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

'लेस इज मोअर' किंवा 'ब्युटी लाइज इन दि आय ऑफ...' वगैरे वगैरे...;)

हॅ हॅ हॅ. तरी असहमत. हां एखादी बिगरशेलाटी कुणी सुंदरखाशीसुबकठेंगणी(उंच पण चालेल) स्थूलहि न कृशहि न असती तर गोष्ट येगळी Wink

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

गंभीरपणे - सुर्यास्ताचे प्लेसिंग आणि मुलीचे प्लेसिंग आणि इतर रँडम प्लिसिंग्स मधे सुर्य(ऑफकोर्स) आणि बॅग घेउन चालणारा माणूस आणि अंगावर+मोकळ्या सोडलेल्या केसांवर नारंगी रंग परिधान करणारी युवती चित्राला बघणेबल बनवते.

वास्तविक पहाता मॅनहॅटनहेन्ज हे प्रकरण खालिल चित्रात अधिक लक्षात येते पण हि चित्रे परत परत पहावी अशी नाहीत.

मुद्दा कळाला. यद्यपि वैयक्तिक मताप्रमाणे मशारनिल्हे फॅक्टर्स इतके महत्त्वाचे नै वाटत.

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

दिवे आगार-
कॅमेरा- सॅमसंग गॅलक्सी ग्रॅन्ड.

वास्को दा गामा आणि दोन प्रेमी

सूर्यास्त आवडला, विषय वेगळ्या पद्धतिने हाताळला आहे.

स्पर्धेकरता नाही.

मॅट्रीक्स, आमच्या दारी!

फोटो: आयफोन ४ कॅमेरा.

फारच आवडले. कॉन्ट्रास्ट् कमी करून अधिक नाट्यमय करता आले असते.

हाण तेच्यायला. जबराच!

आत्याबाईला मिशा असत्या तर काका म्हटले असते = काका व्हायला पुरुष असण्याची गरज नाही. फक्त आत्याबाईला मिश्या लावा की झाले काम.

शॉट दि कॅमेरामॅन अ‍ॅट दि सनसेट -

तांत्रिक माहिती (मर्यादित) -
कॅमेरा - निकॉन डि ५०
लेन्स - निकॉर ५०-२०० एम.एम.
स्थळ - परभणी किंवा सांगोला असं म्हंटल्याने इथे फारसा फरक पडणार नाही.

क्यामेरामनलाच गोळी घातल्यावर चित्र निघणे दुरापास्तच.

बरोबरच आहे.

==========
भुंकणारा ब्राह्मण (B. B., अर्थात डबल बी).

गांधींच्यासंदर्भी चर्चा चालू असताना हा उल्लेख रोचक आहे...वगैरे वगैरे.

अहो चित्र दिसले नाही असे सांगायचेत नं.

मी स्वःतहा काढलेला फोटु.
हा सुर्यास्त आहे की सुर्योदय सांगा बरे.

स्त!!!! Smile
हा नक्की सूर्यास्त आहे.

निकॉन डी ६०, निकॉर १८-५५


File size 854.63K
Camera C770UZ
Lens -
Focal Length 63mm
Exposure 1/800
F Number f/5
ISO 64

निकॉन डी ६०, निकॉर १८-५५

निकालास थोडा उशिर झाल्याबद्दल क्षमस्व …

अनेक चांगली चित्रे "स्पर्धेसाठी नाहीत " असा शेरा घेउन आल्याने थोडी निराशा झाली.

अपरिमेय यांची सर्वच चित्रे अप्रतिम … विशेषत: Clearwater Beach, Florida वरील चित्र क्र. १ आणि Ceder key, Florida - चित्र क्र. ३ फारच सुंदर … दोन्ही चित्रांची रचना, रंगसंगती व छाया प्रकाश संतुलन झकास .. पण पुन्हा चित्रे स्पर्धेसाठी नाहीत.

ऋता यांचे सूर्यास्त बघत सिगरेटचे झुरके घेणार्‍या म्हातार्‍याचे आणि "संध्याकाळ"चे चित्र चांगले आहे. "संधिकाली लांब सावली" मात्र दुपारची वाटते आहे.

उपाशी बोका यांचे चित्र क्र. २ आणि ३ खूपच छान … केशरी रंगाचा इफेक्ट आवडला ..

Nile यांचा matrix चा फोटू पण एक नंबर …

रचना (composition), फोकस, रंगसंगती आणि वेगळेपणा ह्यांचा प्रामुख्याने विचार करून मला आवडलेली चित्रे … अर्थात निकाल …

क्रमांक ३ - ऋता यांचे संध्याकाळ - चित्रात रंग भरल्याचा परिणाम (shading effect) मस्त साधलाय.

क्रमांक २ - रोचना यांचे "वास्को दा गामा आणि दोन प्रेमी" (संकल्पनेला पैकीच्या पैकी मार्क … मात्र चित्रात डावीकडे स्मारकाचा थोडा अधिक भाग आला असता आणि पर्यायाने प्रेमी युगुल थोडे अजून उजवीकडे सरकले असते तर चित्र अजून उठावदार झाले असते.

क्रमांक १ - उपाशी बोका यांचे चित्र क्र. ३ - रंगसंगती आणि सूर्याला झाकणाऱ्या ढगांमुळे पूर्ण चित्र ३ भागात विभागले जावून येणारा १/३ effect सुंदर …

सर्व सहभागी स्पर्धकांचे आणि प्रतिसादकांचे आभार मानतो आणि उपाशी बोका ह्यांनी पुढला विषय जाहिर करावा अशी त्यांना विनंती करतो.

बाबा बर्वे
" समर्थाचिया सेवका वक्र पाहे
असा सर्व भूमंडळी कोण आहे ? "

नवीन विषय लवकरच देतो.