छायाचित्रण पाक्षिक-आव्हान ३३ : आभूषणे

बदलत्या काळानुरूप स्त्री आणि पुरुषांनी घालायची आभूषणे / दागिने यात प्रचंड बदल झाला आहे. पूर्वी मूलतः सोन्याचांदीत घडवले जाणारे दागिने आता विविध प्रकारच्या मटेरीअल पासून बनवले जातात आणि अशा प्रकारे घडवल्या गेलेल्या दागीन्यात कमालीची विविधता दिसून येते. अशाप्रकारे वैविध्यतेमुळे म्हणा किंवा वैचित्र्यामुळे शोभनीय / दर्शनीय / लक्षणीय झालेली आभूषणे आणि अशी आभूषणे परिधान केलेल्या व्यक्ती या पंधरवड्यासाठी विषय म्हणून देतो आहे. दागिन्यात वैचित्र्य / वैविध्य नसले तरी परिधान करणाऱ्या व्यक्तिविशेषामुळे एकंदर चित्राला काही मजा येत असेल तरी अशी छायाचित्रे टाकायला प्रत्यवाय नाही. मी काढलेला एक फोटो उदाहरणादाखल देत आहे.

अनेक वेळा कच्चे फोटो हे काहीसे धूसर आणि रंगांनी कमी संपृक्त असतात. गिंप, पिकासासारख्या चित्रसंस्करण प्रणाली वापरून छायाप्रकाशभेद, रंगप्रमाण बदलून तर चित्र खुलविता येतील. तसेच योग्य प्रमाणात कातरल्याने मांडणीही संतुलित आणि आकर्षक होऊ शकते. तसा प्रयत्न जरूर करावा आणि केलेले संस्करण नमूद करावे.
स्पर्धेचे नियम पुढीलप्रमाणे आहेत:
१. केवळ स्वतःने काढलेले छायाचित्रच स्पर्धेच्या काळात स्पर्धेसाठी प्रकाशित करावे. मात्र त्याविषयाशी संबंधित इतरांची, इतरत्र पाहिलेली चित्रे योग्य परवानगी घेऊन इथे टाकल्यास हरकत नाही. स्पर्धाकाळात टाकलेले इतरांचे चित्र स्पर्धेसाठी धरले जाणार नाही.
२. एका सदस्याला जास्तीत जास्त ३ चित्रे स्पर्धेसाठी प्रकाशित करता येतील. जर/जी छायाचित्रे स्पर्धेसाठी नसतील तर प्रतिसादात ठळकपणे तसे नमूद करावे.
३. आव्हानाच्या विजेत्यास पुढील पाक्षिकात आव्हानदाता आणि परिक्षक व्हायची संधी मिळेल. अर्थात आधीच्या आव्हानाचा विजेता पुढील पाक्षिकाचा विषय ठरवेल आणि विजेता घोषित करेल. (मग तो विजेता त्यापुढील पाक्षिकाचा आव्हानदाता व निरीक्षक असे चालू राहील.)
४. ही स्पर्धा १५ दिवस चालेल. म्हणजे आज सुरू होणार्‍या स्पर्धेचा शेवट ३ मे रोजी भा.प्र.वे.नुसार रात्री १२:०० वाजता होईल. ४ मे रोजी निकाल घोषित होईल व विजेती व्यक्ती पुढील विषय देईल.
५. पाक्षिक आव्हानाच्या धाग्यावर प्रकाशित झालेल्या चित्रांच्या तंत्रावर शंका विचारण्यावर, निकोप टिपण्या करण्यावर बंदी नाही. मात्र हे आव्हान आहे हे लक्षात घेऊन जिंकण्यासाठी/हरवण्यासाठी उगाच एखाद्याला टीकेचे लक्ष्य करू नये अशी विनंती. अर्थात तुम्हाला हव्या त्या चित्रांबद्दल मुक्त, निकोप चर्चा करण्यास प्रोत्साहन देण्याचेच धोरण आहे.
६. आव्हानाचा विजेता घोषित करण्याचे पूर्ण अधिकार आव्हानदात्यांचे असतील. त्यासाठी त्याने ठराविकच निकष लावावेत असे बंधन नाही. त्याने आव्हान द्यावे व त्याचे आव्हान कोणी सर्वात उत्तम पेलले आहे ते ठरवावे इतके ते सोपे आहे. शक्यतो ३ क्रमांक जाहीर केले जातील.(मात्र पुढील पाक्षिकात फक्त प्रथम क्रमांकाची व्यक्ती आव्हान देईल). आव्हानदात्याकडून काय आवडले हे सांगण्याचे बंधन नसले, तरी अपेक्षा जरूर आहे.
७. आव्हानदात्याला प्रथम क्रमांकाचा एकच विजेता/विजेती घोषित करणे बंधनकारक आहे.
८. आव्हानात स्पर्धेसाठी प्रकाशित चित्रे प्रताधिकाराच्या दृष्टीने निकोप असावीत अशी अपेक्षा आहे.
९. आव्हानदाता स्वतःची चित्रे प्रकाशित करू शकतो मात्र ती स्पर्धेत धरली जाणार नाहीत.
१०. कॅमेरा व भिंगांची माहिती देणे बंधनकारक. शक्य असल्यास इतर तांत्रिक तपशील द्यावेत.
----------
सूचना : 'ऐसी अक्षरे' संकेतस्थळावर आपली चित्रे कशी प्रदर्शित करावीत, याबद्दल अधिक मार्गदर्शन या धाग्यावर आहे. त्याचा लाभ घ्यावा.
चित्रे या संकेतस्थळावर टाकताना, जर Width आणि Height (दोन्ही) दिली नाही तर ते फोटो इंटरनेट एक्सप्लोरर् (९) वर दिसत नाहीत. (पण फायरफॉक्सवर दिसतात.) यावर उपाय म्हणजे Width आणि Height दोन्ही रोमन अंकांमध्ये द्यावेत किंवा त्यांचा उल्लेखच इमेज टॅगमधून वगळावा. कृपया याची नोंद घ्यावी.

0
Your rating: None

Comment viewing options

Select your preferred way to display the comments and click "Save settings" to activate your changes.

विषयबदल ..

आभुषणांचे काही नवीन प्रकार बघायला मिळतील अशी अपेक्षा होती ..
पण आकर्षक असलेली छायाचित्रे "स्पर्धेसाठी नाही" असा शेरा घेउन आली.

अपेक्षेइतकी छायाचित्रे पण आलेली नाहीत .. तेव्हा विषय बदलून पाहूया ..
संध्याकाळपर्यंत नवीन विषय देतो

बाबा बर्वे
" समर्थाचिया सेवका वक्र पाहे
असा सर्व भूमंडळी कोण आहे ? "

फ़ोटो mobile वर काढलेला

फ़ोटो mobile वर काढलेला आहे.
ट्रायबल पद्धतीचे नेकलेस आहे. मधल्या चकतीवर मारलेले ठोके जवळून दिसून येतात - खावाल्यान सारखी नक्षी आहे.
खरं तर गडद रंगाच्या कपड्यावर ते नेकलेस उठून दिसले असते. पण...

जोडपी (स्पर्धेसाठी नाहीत)

"जोडपी" हे शीर्षकच खूप रोचक

"जोडपी" हे शीर्षकच खूप रोचक आहे. आवडले.

विषय अवघड आहे का ?

ऐसीकरांना हा विषय अवघड वाटतो आहे का ?
मुदतवाढ द्यावी की विषय बदलावा ??

बाबा बर्वे
" समर्थाचिया सेवका वक्र पाहे
असा सर्व भूमंडळी कोण आहे ? "

मला वाटत विषय बदलावा.

मला वाटत विषय बदलावा.

Amazing Amy

अवघड आहे का विषय?

अवघड आहे का विषय?

Amazing Amy

स्पर्धेसाठी नाही

बाप्पांची आभूषणे - दूर्वांची कंठी आणि जास्वंदीची फुले

Camera NIKON D60
Focal Length 27mm
Exposure 1/30
F Number f/2.8
ISO 1000

वेअर् द वर्ल्ड् (अवांतर)

नवे आभूषण 'फिन'

बाप रे, तुम्ही दिलेल्या फोटो

@बर्वे - बाप रे, तुम्ही दिलेल्या फोटो मधला प्रकार नेमका आहे काय पण?
मला वाटतं ते आभुषण नसून श्रवणयंत्राचा एखादा प्रकार असावा, वर ते अँटेना सारखं काहीतरी ध्वनी लहरी पकडण्यासाठी?
आणि ते "शोभनीय / दर्शनीय / लक्षणीय" पेक्षा "विक्षिप्त" जास्त वाटतय.

बादवे मागील पाक्षिक आव्हान जिंकल्याबद्दल तुमचे हार्दिक अभिनंदन!

श्रवणयंत्र नाही हो … हे

श्रवणयंत्र नाही हो … हे कर्णभूषणच आहे . हा माणूस अशा प्रकारची अनेक विकतही होता

बाबा बर्वे
" समर्थाचिया सेवका वक्र पाहे
असा सर्व भूमंडळी कोण आहे ? "

स्पर्धेसाठी नाही.

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

आव्हान

शोभनीय / दर्शनीय / लक्षणीय झालेली आभूषणे

हे शक्य आहे, पण 'घातलेल्या' आभूषणांचा (तपशील) देणारे छायाचित्र काढणे कठीण असणार आहे. ह्या विषयावर येणार्‍या चित्रांबद्दल उत्सुक आहे.

आभूषणे परिधान केलेल्या व्यक्ती

हे मात्र जरा अवघड आहे, पब्लिक डोमेनमधील चित्रे परवानगीशिवाय छापणे दुस्तर आहे, आणि 'दुसर्‍याला' परवानगी देणारे सापडणे अधिक दुस्तर आहेत. म्हणजे कँडिड छायाचित्र किंवा क्रॉप केलेले छायाचित्र पहावे लागणार, तुम्हीही तसेच दिले आहे त्यामुळे फोटोचा बेरंग होणे शक्य आहे.