छत्रपती शिवाजी महाराजांचा जीवनपट - महत्वाच्या घडामोडींचा आलेख

तसे पहाता मी नविन धागे उघडत नाही वा नाही प्रतिसाद द्यायला जात. पण मायबोलीवर २००५ साली टाकलेला हा तपशील, महत्प्रयासाने येथेही टाकतो आहे. यास कारण झाले ते म्हणजे http://www.aisiakshare.com/node/262 या धाग्यावरील मन यान्ची http://www.aisiakshare.com/node/262#comment-3953 ही पोस्ट. तेथे त्यान्नी शिवकालाचे विशिष्ट टप्पे वर्णन करुन त्याचे विशेष सांगितले आहेत. त्यास सहाय्यकारी होईल असे वाटल्याने हा पुढील तपशील इथे देत आहे.

छत्रपति श्री शिवाजीमहाराजांच्या आयुष्याचा कालपट
श्री त्रंबक शंकर शेजवलकर यांचा श्री शिवछत्रपति हा ग्रंथ व मल्हार रामराव चिटणिस विरचित व श्री रघुनाथ विनायक हेरवाडकर संपादित शककर्ते श्रीशिवछत्रपतिमहाराज हे पुस्तक यांच्या आधारे तयार केलेला हा कालपट महाराष्ट्र राज्य शासनाने सन १९७४ मध्ये शिवराज्याभिषेकास ३०० वर्षे पुर्ण केल्या निमित्ताने काढलेल्या स्मरणीकेत/अन्कात समाविष्ट आहे. या सर्वान्चे आभार
----------------------------------


वर्ष (कालखंड) शिवाजीमहाराजान्च्या आयुष्यातील् प्रमुख घटना
१९.०२.१६३० ते ३१.१२.१६३६, शिवनेरी १९.०२.१६३० शिवाजीमहाराजान्चा जन्म व बालपण
०१.०१.१६३७ ते २८.०२.१६४१, कसबे खेड बापूजी मुद्गल नहेकर यान्च्या वाड्यात वास्तव्य
०१.०३.१६४१ ते २८.०२.१६४२, बन्गळुर
०१.०३.१६४२ ते ३१.०३.१६४७, पुणे व खेडेबारे. १६४५ शिवाजीमहाराजांनी हिन्दवी स्वराज्याची प्रतिज्ञा घेतली. ०७.०३.१६४७ दादोजी कोन्डदेवान्चा मृत्यू
०१.०४.१६४७ ते ३१.०५.१६४९, खेडेबारे कोन्ढवा व पुणे. शिवाजीमहाराज तोरणा घेतात. ०९.१०.१६४८ शिवाजीमहाराज पुरन्दर घेतात. ११.०४.१६४९ शिव-समर्थ भेट
०१.०६.१६४९ ते ३१.१२.१६५४, पुणे व चाकण
०१.०१.१६५५ ते ३१.१२.१६५५, पुणे व पुरन्दर
०१.०१.१६५६ ते १५.०९.१६५६, जाव़ळी रायरी. १५.०१.१६५६ शिवाजीमहाराज जावळी घेतात. ६ एप्रिल रायगड सर. प्रतापगड बान्धला. मे १६५६ प्रबळगड घेतला.
१६.०९.१६५६ ते ०७.१०.१६५६, सुपे घेतले
०८.१०.१६५६ ते २८.०२.१६५७, पुरन्दर. सकवारबाई गायकवाडांशी याच काळात लग्न
०१.०३.१६५७ ते ३१.०३.१६५७, पुणे
०१.०४.१६५७ ते १५.०५.१६५७, पुणे पुरन्दर् १४.०५.१६५७ सम्भाजीमहाराजांचा जन्म
१६.०५.१६५७ ते ३०.०६.१६५७, नौसीरखानाशी युद्ध व जुन्‍नरची लूट
०१.०७.१६५७ ते ३०.०९.१६५७, पुरन्दर
०१.१०.१६५७ ते १३.०१.१६५८, शिवाजीमहाराज कल्याण भिवंडी बाजूस गड पहाण्यास गेले
१४.०१.१६५८ ते ३०.०९.१६५८, प्रथम राजगड व नन्तर पुरन्दरवर वास्तव्य
०१.१०.१६५८ ते ३१.१२.१६५८, शिवाजीमहाराज कर्नाटकात मसलतीस गेले
०१.०१.१६५९ ते ०९.०३.१६५९, शिवाजीमहाराजान्चे राजगडावर वास्तव्य
१०.०३.१६५९ ते ०९.०७.१६५९, शिवापट्ट्ण व राजगड
१०.०७.१६५९ ते ३१.०८.१६५९, जावळीस वास्तव्य सईबाईचा यावेळी मृत्यू
०१.०९.१६५९ ते १७.०९.१६५९, शिवाजीमहाराज राजगडास असावेत
१८.०९.१६५९ ते १०.११.१६५९, प्रतापगडास वास्तव्य. १०.११.१६५९ अफजलखानाचा वध
११.११.१६५९ ते ०१.०३.१६६०, पन्हाळा घेतला व विजापूरच्या बाजूस लूट
०२.०३.१६६०.ते १३.०७.१६६०, पन्हाळगडच्या सिद्दी जौहरच्या वेढ्यात
१४.०७.१६६० ते ३१.०७.१६६०, विशाळगडास पलायन. तेथून पुरन्दर व नन्तर राजगडास प्रयाण
०१.०८.१६६० ते १५.०१.१६६१, राजगडास वास्तव्य. शाहिस्तेखानाशी तहाची बोलणी
१६.०१.१६६१ ते ०५.०६.१६६१, शिवाजीमहाराज कोकणच्या स्वारीवर. करतलब खानाशी युद्ध. दाभोळ प्रभावळी काबीज. राजापूर शृन्गारपुर घेऊन सन्गमेश्वर चिपळूणकडे गेले, महाड कल्याण भिवंडीला गेले व राजगडास परत
०६.०६.१६६१ ते ११.१०.१६६१, राजगडावर वास्तव्य
१२.१०.१६६१ ते ११.११.१६६१, श्रीवर्धनला वास्तव्य
१२.११.१६६१ ते ३१.०१.१६६२, राजगडास वास्तव्य
०१.०२.१६६२ ते २८.०२.१६६२, नामदार खानावर स्वारी व पेणवर हल्ला
०१.०३.१६६२ ते ३१.०३.१६६३, राजगडास वास्तव्य
०१.०४.१६६३ ते १२.०४.१६६३, शाहिस्तेखानावर हल्ला व सिन्हगडावर प्रयाण
१३.०४.१६६३ ते ३०.०६.१६६३, कुडाळ वेन्गुर्ल्यावर स्वारी
०१.०७.१६६३ ते ३१.०७.१६६३, जावळी येथे मुक्काम
०१.०८.१६६३ ते ०५.१२.१६६३, राजगडास वास्तव्य
०६.१२.१६६३ ते ०४.०२.१६६४, सुरतेच्या पहिल्या स्वारीवर त्या आधी कोकणात गेले
०५.०२.१६६४ ते २९.०५.१६६४, राजगडास वास्तव्य
३०.०५.१६६४ ते ०६.०६.१६६४, सिन्हगड
०७.०६.१६६४ ते ३०.०९.१६६४, राजगडला वास्तव्य
०१.१०.१६६४ ते ०७.१२.१६६४, कुडाळला आगमन. बा़जी घोरपड्यास मारले. खवासखानाचा पराभव. खुदावन्तपूर लुटले. याच सुमारास सिन्धुदुर्ग व हर्णै किल्ले बान्धले
०८.१२.१६६४ ते २५.१२.१६६४, खानापुर व हुबळी ही शहरे लुटली
२६.१२.१६६४ ते ३१.१२.१६६४, राजगडावर वास्तव्य
०१.०१.१६६५ ते १५.०१.१६६५, महाबळेश्वरला वास्तव्य
१६.०१.१६६५ ते ३१.०१.१६६५, राजगडला वास्तव्य
०१.०२.१६६५ ते २२.०३.१६६५, कोकणात जाऊन मग बसरूरच्या स्वारीवर. ०८.०२.१६६५ बसरूरवर स्वारी
२३.०३.१६६५ ते २५.०३.१६६५, पुरन्दरला वास्तव्य
२६.०३.१६६५ ते ०८.०६.१६६५, राजगडावर वास्तव्य
०९.०६.१६६५ ते १३.०६.१६६५, जावळिइस प्रयाण. जयसिन्ह व दिलेरखानाची भेट व पुरन्दरचा तह
१४.०६.१६६५ ते ३१.०८.१६६५, राजगडावर वास्तव्य
०१.०९.१६६५ ते ३०.०९.१६६५, विजापुरला प्रयाण. फोन्डा घेण्यात अपयश
०१.१०.१६६५ ते १५.११.१६६५, राजगड. जयसिन्गाच्या मदतीस जाण्याची तयारी
१६.११.१६६५ ते १०.०१.१६६६, विजापूर घेण्यास शिवाजीची मोन्गलास मदत
११.०१.१६६६ ते १६.०१.१६६६, पन्हाळ्यावरील अयशस्वी हल्ला
१७.०१.१६६६ ते ०४.०३.१६६६, राजगडावर वास्तव्य
०५.०३.१६६६ ते ११.०९.१६६६, आग्रा प्रकरण. ०५.०३.१६६६ शिवाजीमहाराजान्चे आग्र्यास प्रयाण. १२.०५.१६६६ शिवाजीमहाराज व औरन्गजेब भेट. १९.०८.१६६६ शिवाजीमहाराजांची आग्र्याहून सुटका.
१२.०९.१६६६ ते १०.०४.१६६७, ९.०२.१६६७ पर्यन्त राजगड नन्तर सिन्धुदुर्ग्
११.०४.१६६७ ते १२.०५.१६६७, रान्गण्याचा वेढा शिवाजीमहाराजांनी उठविला
१३.०५.१६६७ ते १५.०६.१६६७, मनोहरगडास वास्तव्य
१६.०६.१६६७ ते ३१.१०.१६६७, राजगडास वास्तव्य
०१.११.१६६७ ते ३०.११.१६६७, कोकणात बारदेशची स्वारी
०१.१२.१६६७ ते १५.१०.१६६८, राजगडास वास्तव्य
१६.१०.१६६८ ते ३०.११.१६६८, शिवाजीमहाराज कोकणात. अष्टमी व राजापुरास मुक्काम. गुप्तपणे गोवे घेण्याचा अयशस्वी प्रयत्न
०१.१२.१६६८ ते २०.१०.१६६९, राजगडास वास्तव्य
२१.१०.१६६९ ते ३१.१०.१६६९, पेणच्या आसपास
०१.११.१६६९ ते ३१.०७.१६७०, राजगडास वास्तव्य. २४.०२.१६७० राजाराम महाराजान्चा जन्म. ०४.०२.१६७० कोन्ढाणा सर केला. नन्तर रायगडात
०१.०८.१६७० ते ०५.०८.१६७०, रायगडास वास्तव्य
०६.०८.१६७० ते ०४.०९.१६७०, जुन्‍नरला वेढा
०५.०९.१६७० ते २०.०९.१६७०, रायगडावर वास्तव्य
२१.०९.१६७० ते ०३.११.१६७०, सुरतेची दुसरी स्वारी. १७.१०.१६७० दिन्डोरीची लढाई
०४.११.१६७० ते २१.११.१६७०, नांगावला वास्तव्य
२२.११.१६७० ते २५.११.१६७०, रायगडावर वास्तव्य
२६.११.१६७० ते १५.०१.१६७१, खानदेश व बागलाणच्या स्वारीवर. कारन्जे लुटले. अहिवन्त रवळा जवळा किल्ले घेतले. सालेरीचा किल्ला घेतला
१६.०१.१६७१ ते ३१.१२.१६७१, रायगडास वास्तव्य. २६.०१.१६७१ सम्भाजीमहाराजान्कडे कारभार सोपविला
०१.०१.१६७२ ते २०.०१.१६७२, महाड येथे वास्तव्य. दिलेरखानाने चाकण व पुणे घेतल्याने शिवाजीमहाराज कुडाळ वेन्गुर्ला भागातून सैन्य गोळा करीत होते
२१.०१.१६७२ ते ०८.०३.१६७३, रायगडास मुक्काम. उस्टिकने मे महिन्यात व अब्राहम् लेपेकरने जुलै महिन्यात शिवाजीमहाराजांची भेट घेतली
०९.०३.१६७३ ते १५.०४.१६७३, पन्हाळ्यास वास्तव्य. १५ एप्रिल उमराणीची लढाई
१६.०४.१६७३ ते १९.०५.१६७३, रायगडास मुक्काम्
२०.०५.१६७३ ते ०२.०६.१६७३, तीर्थस्नानासाठी गेले
०३.०६.१६७३ ते ०९.१०.१६७३, रायगडास वास्तव्य. ३ जून निकल्सची भेट
१०.१०.१६७३ ते १५.१०.१६७३, सातायास प्रयाण
१६.१०.१६७३ ते १५.१२.१६७३, कानडा प्रदेशावर् स्वारी
१६.१२.१६७३ ते १४.०४.१६७४, रायगडास् वास्तव्य. ३ एप्रिल नारायण शेणव्याची भेट
१५.०४.१६७४ ते ११.०५.१६७४, चिपळूणला प्रयाण. २२ एप्रिल कारवारला प्रयाण
१२.०५.१६७४ ते १५.०५.१६७४, रायगडास वास्तव्य
१६.०५.१६७४ ते २०.०५.१६७४, प्रतापगडावर भवानीदेवीच्या दर्शनास गेले
२१.०५.१६७४ ते ३०.०९.१६७४, रायगडावर वास्तव्य. ०६.०६.१६७४ शिवाजीमहाराजान्चा राज्याभिषेक. १८.०६.१६७४ जिजाबाईन्चा मृत्यू
०१.१०.१६७४ ते १५.१०.१६७४, कल्याण व नन्तर पाली येथे वास्तव्य
१६.१०.१६७४ ते १५.१२.१६७४, २० व २५ आ.ऑक्टोंबरच्या दरम्यान सातारा बेळगाव बाजूस नन्तर खानदेश व बागलाणवर स्वार्‍या. धरणगाव लुटले
१६.१२.१६७४ ते१४.०३.१६७५, रायगडास वास्तव्य
१५.०३.१६७५ ते ११.०६.१६७५, कोकणात राजापूर कुडाळ २२ व २३ मार्च इन्ग्रज व्यापार्‍यांची भेट. फोन्डा शिवेश्वर अन्कोला कारवार ही ठिकाणे घेतली
१२.०६.१६७५ ते ३०.११.१६७५, रायगडास वास्तव्य ७ व १२ सप्टेम्बर आच्स्टिनची भेट
०१.१२.१६७५ ते २५.०१.१६७६, सातायास आजारी
२६.०१.१६७६ ते ०७.०२.१६७६, कोकणात वास्तव्य
०८.०२.१६७६ ते १५.०२.१६७६, रायगडास वास्तव्य
१६.०२.१६७६ ते २०.०४.१६७६, पन्हाळ्यास वास्तव्य
२१.०४.१६७६ ते ३०.०९.१६७६, रायगडावर वास्तव्य
०१.१०.१६७६ ते ३०.११.१६७६, बेळगावच्या किल्ल्यास वेढा विजापूरकरान्च्या मुलखात लुटालुट सातारा जिल्ह्यातील खटाव ठाणे व कोट घेतला वाईजवळचा मुलुख काबीज
०१.१२.१६७६ ते ३१.१२.१६७६, रायगडास मुक्काम
०१.०१.१६७७ ते १५.०१.१६७७, रायगडाहून बेळगावास प्रयाण
१६.०१.१६७७ ते २८.०२.१६७७, भागानगरकडे
०१.०३.१६७७ ते ३१.०३.१६७७, भागानगरला मुक्काम
०१.०४.१६७७ ते ०३.०४.१६७८, कर्नाटकाची स्वारी. १५ मे जिंजी काबीज. २३ मे वेरुळचा ___???वेषा. २५ जून शेरखान लोदीचा पराभव. १२ जुलै शिवाजी व्यन्कोजी भेट
०४.०४.१६७८ ते १०.०५.१६७८, विजापुरचा कब्जा घेण्यास निघाले मसौदने त्याचा ताबा घेतल्याचे समजल्याने पन्हाळ्यास परत
११.०५.१६७८ ते ०५.०६.१६७८, रायगडाला वास्तव्य
०६.०६.१६७८ ते १०.०६.१६७८, राजापुरास भेट
११.०६.१६७८ ते २८.०२.१६७९, पन्हाळ्यास
०१.०३.१६७९ ते २२.०३.१६७९, विजापूरचा शाहपूरा लुटला
२३.०३.१६७९ ते ३१.०५.१६७९, पन्हाळ्यास वास्तव्य
०१.०६.१६७९ ते २३.१०.१६७९, रायगडावर वास्तव्य
२४.१०.१६७९ ते ३०.११.१६७९, विजापुरकरास मदत करण्यासाठी पन्हाळ्यास आले तेथून विजापूरकडे सेलगूरपर्यन्त गेले नन्तर मोगली मुलखातील जालना व इतर गावे लुटीत पट्टागडास आले
०१.१२.१६७९ ते १५.०२.१६८०, पन्हाळ्यास मुक्काम सम्भाजीची भेट वाकेनवीस टिपणा प्रमाणे ३१ डिसेम्बर ते ४ फेब्रुवारीपर्यन्त शिवाजीमहाराज सज्जनगडास होते
१६.०२.१६८० ते ०२.०४.१६८०, रायगडास वास्तव्य. १४ मार्च राजाराममहाराजान्चे लग्न. शिवाजीमहाराजान्चा मृत्यू
field_vote: 
1.5
Your rating: None Average: 1.5 (2 votes)

प्रतिक्रिया

सॉरी, वरील मजकुराकरता टेबल फॉरम्याटची टेस्ट करत होतो. जमले नाही

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शिवाजी महाराज की जय!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

थोडक्या जागेत पुरेशी माहिती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

तुम्ही शिवचरित्राच्या कालखण्डाचे जे टप्पे तिकडे दिले आहेत, ते इथे संक्षिप्त रुपाने सनावळीमधे दर्शवू शकाल का? म्हणजे मला याच सनावळीमधे, तुमच्या त्या वर्णनाची भर घालता येईल, जी अभ्यासकांस अधिक उपयुक्त ठरेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अख्ख्या शाळेत इतिहास विष्यात पैला नंबर अस्नारे लिंबाभौ तुम्चा!
आय्ला इत्क्या सनावळ्या!!
लै डेन्जर भो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

नै रे भो आडकित्त्या पैला नम्बर नै Sad
मात्र एकहे, साळतं इतिहास्-भुगोल मार्कान्करता हात द्यायचे पण बाकी विषय गनिमासारखे घात करायचे.
इतिहासभुगोलात ( अन चित्रकलेत) कद्दीबी लाल रेघ नै मिळाली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भरपूर असली तरीहि बरिचशी माहिती निरुपयोगी वाटते.
असो, प्रयत्नाबद्दल अभिनंदन!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सनावळ्या तशाही सामान्य वाचकांच्या दृष्टीने उपयोगी नसतात. वरील संग्रह हा जे इतिहासाचे अभ्यासक आहेत, त्यांचे केवळ "संदर्भा" करीता मूळ सरकारी स्त्रोतातील प्रसिद्ध केलेल्या स्मरणीका/स्मरणीका/पुन्हा सर्व टंकलेखित करुन बनविली आहे. माझे श्रेय केवळ टंकलेखानापुरते आहे. या सनावळी मूळे काही रोचक वगैरे मिळणार नाही हे नक्की.
मात्र ज्यास जरा जास्त समजुन घ्यायचे आहे, जसे की मूळ तपशीलात, प्रत्येक कालावधीदरम्यानचे दिवस देखिल आहेत, म्हणजेच, तेवढे तितके दिवस त्या त्या घटना/स्थळाशी संबंधित आहेत हे समजुन येते. अमुक घटनेच्या वेळेस महाराजांचे वय काय होते हे देखिल तत्काळ समजुन येते. जसे की केवळ २८/२९ वय असताना अफजलखानाचा वध केला, इत्यादीक. ज्याला या विषयावर भाष्य (भाषण/लेखन) करायचे आहे, त्यास अशा स्वरुपाचा तपशील खात्रीशीररित्या विशिष्ट वाक्ये पेरण्याच्या दृष्टीने आवश्यक असतो.
जेव्हा केवळ गड वा स्थळान्चा उल्लेख आहे तो देखिल तत्कालिक अन्य राजकीय परिस्थितीसापेक्ष महत्वाचा आहे.
प्रतिसादाबद्दल धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ह्म्म.. बरोबर आहे.
हा कच्चा विदा आहे.. याचे माहितीत रुपांतर करणे (Data --> Information) बाकी आहे याच्याशी सहमत..
निरुपयोगी हा शब्ध मागे घेतो व लिंबुटिंबू यांची हा शब्द त्याच्या लेखनासंबंधाने वापरल्याबद्दल माफी मागतो

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

विदा आणि माहिती यांच्यातला फरक सोदाहरण सांगितल्याबद्दल लिंबूटिंबू आणि ऋ यांचे आभार.

इतिहासात फार गती आणि रस नसल्यामुळे मूळ धाग्याबद्दल 'हं' एवढेच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

ही माहिती बरीचशी निरुपयोगी आहे हे ऋषिकेश ह्यांचे विधान मला पटत नाही.

आपल्या इतिहासात ठोस आणि ताडून पाहण्याजोगी माहिती अभावाननेच दिसते. पहावे तिकडे उपलब्ध असलेल्या तुटपुंज्या पुराव्यावर उभारलेले अंदाज. विक्रमादित्य नावाचे राजे किती होते? पाचुंदाभर. साधारण केव्हा होऊन गेले ते? इ.स. ४००च्या पुढेमागे केव्हातरी. कालिदासाचा काळ काय? इ.स. १०० ते ६०० केव्हाहि. शिवाजी हा जवळजवळ पहिला मराठी नेता दिसतो की ज्याच्याबाबत इतक्या तारखा मांडून दाखविता येतात. त्यांचे वाचन केल्याने इतिहासाला एक प्रकारची immediacy आल्यासारखे वाटते.

माझ्या मते ह्याचे मुख्य कारण म्हणजे कारकुनी वाटणारे बारीकसारीक तपशील नोंदवून ठेवण्याचा राज्यकारभाराला आणि समाजाला दिशा देण्याला मोठा उपयोग होतो हे आपल्या नेत्यांना कधी जाणवलेच नाही. कारण ब्राह्मणवर्ग आपल्या जातीची श्रेष्ठता इतरांवर लादण्यात, भिक्षुकी करण्यात आणि (काही विद्वान) घटपटाचा वांझ खटाटोप करण्यात बुडलेले होते. राजे एकमेकांवर कुरघोडया करून रक्तपात करण्यात गुंतलेले होते. ('अमक्यातमक्या राजाने शत्रूंचा प्रचंड संहार केल्याने त्या शत्रूंच्या स्त्रिया रडल्या आणि त्या अश्रूंनी त्यांच्या स्तनावर लेपलेली कस्तूरी वाहून जाऊन स्नान करायची सरोवरे सुवासित झाली' इति भाटचारण!)

विल्यम १ (William the Conqueror) ह्याने आपल्या नवीन जिंकलेल्या राज्यातील सर्व मालमत्ताधारकांची संपूर्ण मोजदाद करून Domesday Book तयार केले जे आजहि पहावयास मिळते. ८व्या हेन्रीचा राज्याभिषेक १५०९ साली झाला त्याचा समारंभाची शिस्त आखून देणार्‍या पुस्तकाची हेन्रीची स्वत:ची प्रत, त्याच्या स्वहस्ताक्षरातील नोंदींसह, उपलब्ध आहे. हॉलबेइनने काढलेली त्याची आणि त्याच्या परिघातील अनेकांची चित्रे आज आपण पाहू शकतो. आपल्याकडे शिवाजीचे एक अस्सल चित्र आणि हस्ताक्षराचा नमुना मिळतामिळता मारामार.

तेव्हा अशा सनावळ्या dry असल्या तरी निरुपयोगी निश्चित नाहीत. त्या हाडांच्या सांगाडयासारख्या आहेत. दिसायला ओंगळ पण शरीराला आधार देतात!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझ्या विधानाबद्द्ल वर आधीच माफी मागितलेली आहे.
बाकी प्रतिसादाशी सहमत

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

खतरनाक माहिती! एवढ्या सनावळ्या वाचुन चक्कर यायचीच बाकी होती! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शिवराज्याभिषेकास ३०० वर्षे पुर्ण केल्या निमित्ताने काढलेल्या स्मरणिकेतून जीवनपटाचा तपशील घेतला आहे असे लेखकाने सांगितले आहे. शिवराज्याभिषेकाचा विचार केला की तो भव्य सोहळा ज्याची आपण अनेक पुस्तकातून वर्णने वाचली आहेत त्याची आणि ३२ मण सोन्याच्या सिंहासनाची आठवण आल्याशिवाय रहात नाही. ह्या ३२ मण सोन्याच्या सिंहासनाचे पुढे (शिवाजीमहाराजान्च्या मृत्यूनंतर) काय झाले? (शिवाजीमहाराजान्च्या मृत्यूनंतर)? ह्याविषयी काही खात्रीशीर माहिती काही मिळत नाही. कुठे वाचायला मिळत की अष्टप्रधान मंडळाने ते लपवून ठेवलं तर कुठे असही आंतरजालावर वाचायला मिळत की पेशव्यांनी ते वितवळून त्याचा वापर पैशासाठी केला किंवा आणखी काही.
जाणकारांनी अधिक माहिती द्यावी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुंदर !!!!
मला एक प्रश्न विचारायचा होता की सुलतान ढवा म्हणजे काय ?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सुलतानढवा म्हणजे निकराचा हल्ला. गूगलमध्ये हा शब्द घातल्यास हा अर्थ दाखविणारे अनेक उतारे पुढे येतील.

सभासदाच्या बखरीमध्ये हयाचा असा वापर आहे.

<ऐसे म्हणून दुसरे दिवशी दिलेलखान मिरजाराजियाच्या भेटीस आला आणि बोलू लागला की, "उगेच काय म्हणून बैसलेत? गोटाजवळ कोंढाणा व पुरंधर हे दोन किल्ले आहेत. पुरंधरास आपण सुलतानढवा करितो आणि गड घेतो. तुम्ही कोंढाणा गड घेणे. गड घेत चालला म्हणजे शिवाजी येईल.">

(http://www.shivchhatrapati.com/biography/SHIVCHARITRA.pdf पान २६.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

३२ मणाचा हा आकडा कोठे मिळाला हे कळल्यास अधिक अभ्यास करता येईल.

'मण' (आणि अन्य वजनी आणि मापी मोजदादीची साधने) कधीच ठराविक नव्हती. स्थान आणि काळ ह्यानुसार त्यांची वेगवेगळी कोष्टके पहायला मिळतात. उदा. एका कोष्टकानुसार ५ शेर = १ पायली आणि १६ पायल्या = १ मण. म्हणजेच ८० शेर = १ मण. १ शेर म्हणजे साधारणपणे ८५० ग्रॅम आणि ३२ मण म्हणजे २१७६ किलो. शिवाजीच्या राज्यात एका ठिकाणी इतके सोने असेल काय ह्याची शंका वाटते आणि असले तरी शिवाजीसारखा दूरदर्शी आणि व्यवहारी राजा सैन्याची उभारणी, गडकिल्ले बांधणे, आणि अशी अन्य आवश्यक कामे समोर पडली असता तिकडे हा पैसा न लावता आपल्या सिंहासनासारख्या दिखाऊ वस्तूवर तो वाया घालवेल असे वाटत नाही.

मणाचा अर्थ कसाहि बदलला तरी ह्या तर्कात बदल होईलसे वाटत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

३२ मण सोन्याच्या सिहासनाचा संदर्भ मला ह्या http://www.ssmrae.com/admin/images/28ba4b40e997cbddcb1d542cb6c5c765.pdf लिंक मधून मिळाला होता. पान क्र. २ वर हा संदर्भ आहे.
इतिहास विषयाचे सामान्य वाचक (सामान्य वाचक ह्या अर्थाने की असे वाचक की जे बखर किंवा तत्सम ग्रंथ वाचत नाहीत, ह्या बखरी किंवा तत्सम ग्रंथांचा अभ्यास करून लिहिलेली इतिहासावरची ललित स्वरूपातील पुस्तके उदा. श्रीमान योगी किंवा राजा शिवछत्रपती वाचतात) जे वाचतात तसाच मी ही सामान्य वाचक आहे.
३२ मण सोन्याच्या संदर्भ जर विश्वासू शिवचरित्रात नसेल तर तो नेमका कसा आहे की सिहासन सोन्याचे नव्हतेच हे जाणून घेण्यास आपल्यासारख्या जाणकाराकडून (तुम्ही जो मणाचा हिशेब दिला आहे आणि तुमचे उपक्रम वरचे इतर लेखन वाचून जाणकार हा शब्द वापरला आहे) नक्कीच आवडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रसाद,

तुम्ही दिलेला संदर्भ -(प्रा.कुडसे ह्यांचा 'रिसर्च पेपर(!)'- मी वाचला. एक गोष्ट तात्काळ लक्षात आली. ती म्हणजे हा तथाकथित संशोधननिबंध म्हणजे जदुनाथ सरकारांच्या 'Shivaji and His times' ह्या ग्रंथातील राज्याभिषेकाच्या भागाची चक्क copy/paste - पण तसे कोठेहि न म्हणता अथवा सुचविता - केलेली आवृत्ति आहे. सुरुवातीचा काही भाग म्हणजे सरकारांच्या लिखाणाचाच सारांश, जवळजवळ त्यांच्याच शब्दात, दिलेला आहे. तदनंतर #Scene of Shivaji's Coronation येथून जी copy सुरू होते ती एकहि शब्द न बदलता जिजाबाईच्या मृत्यूपर्यंत चालत राह्ते.

अर्थात हे करत असतांना प्राध्यापकमहाशयांनी एक हुशारी दाखविलेली आहे. सरकारांचे जे उल्लेख त्यांना तसेच्या तसे copy करणे आजच्या शिवभक्तिप्लुत वातावरणात धोक्याचे वाटले तेव्हढे त्यांनी वगळले आहेत. (अर्थात त्या बाबींत आपला आणि सरकारांचा मतभेद का आहे हे त्यांनी कोठेच सांगितलेले नाही.)उदा. उपनयन समारंभानंतर (२८ मे) दोन दिवसांनी शिवाजीने तिसरे लग्न केले आणि राज्याभिषेकानंतर २ दिवसांनी चौथे लग्न केले. सरकारांच्या मते ही दोन्ही लग्ने वेदोक्त मंत्रांचा क्षत्रिय म्हणून आपल्याला असलेला अधिकार सार्वजनिक पातळीवर दर्शविण्याचा भाग म्हणून केली गेली असावीत. प्राध्यापकमहाशयांनी तिसर्‍या लग्नाला अनुल्लेखाने वगळलेले आहे आणि चौथे लग्न हे पूर्वीच्याच एका पत्नीबरोबर केलेले पुनर्लग्न होते असे म्हटले आहे. असे म्हणण्यासाठी आधार अथवा पटणारा तर्क असे काहीच नमूद केलेले नाही. वैदिक विधींचा कोठेच उल्लेख नाही.

अजूनहि एक हुशारी ध्यानात घ्यायला हवी. ग्रंथचौर्याचा आरोप येऊ नये, 'plausible deniability'चे कवच उपलब्ध असावे अशा हेतूने प्रबंधाच्या अखेरीस संदर्भांच्या यादीत सरकारांच्या उपरिनिर्दिष्ट ग्रंथाचेहि नाव घातलेले आहे.

असो. हे एक थोडे अवांतरच झाले. ३२ मणांच्या सिंहासनाचा उल्लेख सभासदाच्या बखरीमधून सुरू होतो. सभासदाने दिलेला राज्याभिषेकाच्या एकूण खर्चाचा दिलेला आकडा, १ कोटि ४२ लाख होन, हा अविश्वसनीय आहे असे सरकारांचे मत आहे आणि त्यांनी राज्याभिषेकाच्या एकूण खर्चाचा हिशेब (सिंहासन, देणग्या-दक्षिणा, जेवणखाण) १० लाख होन अथवा ५० लाख रुपये इतका असावा असा अंदाज केला आहे आणि त्याला काही आधारहि दाखविला आहे. अर्थातच त्यामुळे प्रा. पोपटरावांनी तोच आकडा पुढे केला आहे, मात्र त्याला काही आधार दर्शविलेला नाही.

मलाहि असे वाटते की सभासदाचा हा आकडा अतिशयोक्त आहे आणि आपला patron राजाराम ह्याला ऐकायला आवडेल असे त्याने लिहिले आहे. ३२ मण सोन्याचे सिंहासन कल्पनेवर ताण टाकते हे पूर्वी आलेलेच आहे. राजारामाला आवडेल तसे लिहिण्याचे अन्यहि पुरावे सभासदाच्या लिखाणात दिसतात. उदा. संभाजी पुढे कसे वागेल आणि राजाराम दौलत कशी सांभाळेल हे १६८० साली मृत्युसमयी शिवाजीला आधीच ठाऊक असणे शक्य नाही पण हे सर्व तंतोतंत भविष्य आसन्नमरण शिवाजीच्या तोंडून सभासदाने वदवून घेतलेले आहे.

शक्यता अशी वाटते की बहुमूल्य असले तरी हे सिंहासन संपूर्ण सोन्याचे नसावे - ३२ मण काय किंवा कमी वजनाचे काय - तर सोन्याचा पत्रा चढवलेले असावे. शिवाजीच्या काळाच्या आसपासचे हिंदुस्तानात बनलेले एक सिंहासन उपलब्ध आहे आणि मी ते स्वतः पाहिलेले आहे. इस्तंबूल येथे 'टोपकापी' ह्या ऑटोमन बादशाहांच्या ५०० वर्षे जुन्या राजवाडयात आजघडीला एक म्यूझियम आहे आणि ऑटोमन बादशाहांच्या काळापासूनच्या मौल्यवान चीजा, जडजवाहिर, शस्त्रास्त्रे, कपडे, पैगंबर आणि अन्य इस्लामच्या जुन्या पवित्र व्यक्ति ह्यांच्या वापरातील वस्तु इत्यादि तेथे बघायला मिळतात. नादिरशहाने दिल्लीवरील स्वारीत लुटलेलले एक मुघल बादशहांचे सिंहासन त्याने नंतर ऑटोमन बादशहाला भेट म्हणून पाठविले. ते सिंहासन (आणि अन्य अशाच हिंदुस्तानशी संबंधित चीजा) तेथे आहेत. प्रस्तुत सिंहासनाचे चित्र सोबत जोडत आहे. (http://akshay-chavan.blogspot.com/2010/05/last-surviving-mughal-throne.html येथून साभार. सिंहासनाची आणि म्यूझियमची अन्य माहिती तेथे पहावी.)

हे सिंहासन अनेक जडावाची रत्ने वापरून आणि सोन्याच्या पत्र्याने मढविलेले आहे. मुघल बादशाहांपाशी शिवाजीच्या तुलनेने कितीतरीपट अधिक धनदौलत होती तरीहि त्यांचे सिंहासन जड सोन्याचे नसून सोन्याच्या पत्र्याचे आहे हे दिसते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहितीपूर्ण प्रतिसादाबद्दल आपले आभार. आपण दिलेली लिंक पाहिली. मुघलांचे सिहासन पाहून बरीक निराशा झाली. सिहासानाबद्दल लहानपणापासून जे आपण ऐकतो, ऐतिहासिक ललित कादंबऱ्यांमध्ये वाचतो किंवा चित्रपटात पाहतो, त्यापेक्षा हे सिहासन वेगळे आहे आणि तेच खरे आहे (कारण फोटो उपलब्ध आहेत).
आपण दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

३२ मणाचा हा आकडा कोठे मिळाला हे कळल्यास अधिक अभ्यास करता येईल.

'मण' (आणि अन्य वजनी आणि मापी मोजदादीची साधने) कधीच ठराविक नव्हती. स्थान आणि काळ ह्यानुसार त्यांची वेगवेगळी कोष्टके पहायला मिळतात. उदा. एका कोष्टकानुसार ५ शेर = १ पायली आणि १६ पायल्या = १ मण. म्हणजेच ८० शेर = १ मण. १ शेर म्हणजे साधारणपणे ८५० ग्रॅम आणि ३२ मण म्हणजे २१७६ किलो. शिवाजीच्या राज्यात एका ठिकाणी इतके सोने असेल काय ह्याची शंका वाटते आणि असले तरी शिवाजीसारखा दूरदर्शी आणि व्यवहारी राजा सैन्याची उभारणी, गडकिल्ले बांधणे, आणि अशी अन्य आवश्यक कामे समोर पडली असता तिकडे हा पैसा न लावता आपल्या सिंहासनासारख्या दिखाऊ वस्तूवर तो वाया घालवेल असे वाटत नाही.

मणाचा अर्थ कसाहि बदलला तरी ह्या तर्कात बदल होईलसे वाटत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कोल्हटकर आणि प्रसाद यांच्या प्रतिसादांतून बरीच माहिती मिळते आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

सहमत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0