नोकरदार..२

याआधी
तोवर समोरच्या दारातून अरुण नी बॅट्या स्केट करत येत होता. ते ही त्याच टेबलवर आले. अरुण आल्याआल्याच म्हणाला "काय आली ना लेटर्स? झाली ना रडारड नी दु:ख सुरू. म्हणून मी म्हणत होतो, पूर्वीच्या लोकांना लेटर्सच येत नसत ती अधिक सुखी होती". अरूणच्या डोक्यावर श्रेण्यांचं वादळ घोंगावू लागलं. मात्र अरुण यांनी सराईतपणे त्यांना सहज झटकले आणि म्हणाले "हे बघा तुम्हाला माझं म्हणणं पटत नसेल तर तसं सांगा, त्यामुळे माझा भाषेच्या दौर्बल्याचा मुद्दा सिद्ध होईल, आणि मत पटल्यास पूर्वी सारे आलबेल होतं हा मुद्दा सिद्ध होईल. थोडक्यात काय तर मी बरोबर बोलतो"

"अर्थात, बॉस इज ऑलवेज राइट" मेघना पुटपुटली. तिच्या डोक्यावर खवचट आणि मार्मिक अश्या श्रेण्या घोंगावू लागल्या.

"हे बघ मी नावालाच तुमचा बॉस आहे. कधी बॉस सारखा वागतो?" अरुणने सवाल केला. त्यावर बॅट्या, मनोबा, मेघना नी ऋष्या एकमेकांकडे बघू लागले.

"आम्हाला मिळालेली हाईक जाऊद्या, तुम्ही आम्हाला चांगलं रेटिंग का दिलं नाहीत?" मनोबाने विषय बदलला.
"मी सुद्धा त्याच संस्थळावर आहे म्हटलं. बघत असतो तुम्ही काय आणि किती काम करता ते" अरुण उत्तरला "संस्थळांवर प्रतिसाद देणारी लोकं त्या वेळेपुरती निकम्मी असतात हे माझं मत अजूनही बदललेलं नाहीये मी. यावेळी मनोबा तू ४२१, मेघना २२०, बॅट्याने ४२० आणि ऋष्याने १००च प्रतिसाद दिले. त्यामुळे सगळ्यात कमी निकम्मा ऋष्या असल्याने त्याला सर्वाधिक रेटिंग दिले."
"ही चिटिंगे, तुमचे स्वतःचे ५५१ प्रतिसाद विसरलात वाटतं" मेघना पुन्हा पुटपुटली
"नी त्या ऋष्याचे एकेक प्रतिसाद मेगाबायटी असतात. निव्वळ व्हॉल्युमकडे बघून कसं चालेल?" मनोबाने विचारलं

"हे बघा त्यांच्या प्रोजेक्टमध्ये त्यांनी कोणते निकष ठेवावेत हा त्यांचा प्रश्न आहे. अरुण, तु खुशाल कोणत्याही कारणावरून मला कमी रेटिंग दे!"
हे कोण बोलीले बोला म्हणून सगळ्यांनी मागे पाहिलं तर दारात साक्षात गब्बर उभा. तो आज ऑनसाईट वरून येणार असल्याचं सगळे पार विसरूनच गेले होते. त्याच्या सोबत विविध रंगांच्या नी नवनव्या स्थळांच्या लिंकाही सोबत घेऊन आला होता. त्याला बघताच राजेश, बॅट्या आदी चर्चोत्सुक मंडळी आनंदून गेली. ऋष्या, मनोबा, मेघना सारखी मंडळी सरसावून बसली.
"ये ये, तू पैलतीरावर बराच दंगा केल्याची माहिती आहेच. आता इथे ऐलतिरीही धमाल येणार तर!"
गब्बरने आल्याआल्या हवेतल्या हवेत काही तर गणित केले नी सर्वात फायदेशीर पदार्थ खायला मागवला. अपेक्षेहून लवकर, भरपूर, चविष्ट आणि तरीही स्वस्त असा तो पदार्थ बघून गब्बरच्या विचाराला सगळ्यांनी मनातल्या मनात दाद दिली.

एकीकडे खाताखाता तो बोलू लागला "माझं इथे येण्यामागचं एक विशेष प्रयोजन आहे. परवा माझ्याकडे वासलेकर आले होते त्यांनी त्यांच्या एका गुप्त योजनेमध्ये मला आणि माझ्या सोबत काही निवडक 'ऐ'करांना सोबत घेण्याची परवानगी दिली आहे. त्यासाठी एक प्रयोग करावा लागणार आहे. या प्रयोगावर भारतीय पंतप्रधानच नाही तर विविध राष्ट्रप्रमुखांची नजर असणार आहे असे मला वासलेकर म्हणाले."

अचानक त्या क्यांटिनचा मूडचा पालटला. गब्बरच्या डोक्यावर रोचक श्रेण्या मावणार नाही इतक्या घोंगावू लागल्या. "मात्र मला पूर्ण प्रयोगाची कल्पना देणे शक्य नाही. त्यासाठी मला तुमच्यापैकी प्रत्येकाला काही प्रश्न विचारावे लागतील. त्याच्या उत्तरावरून मी माझी टीम निवडेन".
असं म्हणून मनातल्या मनात विचार करून त्याने एक धागा बनवला व संस्थळावर भिरकावला.

सगळ्यांनी आपापले 'ऐसे गॉगल' घातले आणि प्रश्न वाचू लागले.

१. समजा तुम्हाला अनिर्बध सत्ता दिली आणि एकच कायदा बदलायचा असेल तर तुम्ही कोणता कायदा बनवाल?
२. समजा तुम्हाला अपरिमित पैसा दिला व तो वापरून देशातील प्रत्येकाला ५ टप्प्यात सुखी करा असे म्हटले तर तुम्ही काय कराल?
३. समजा तुम्हाला अविश्रांत व अतुल्य बळ दिलं तर पुढिलपैकी कोणत्या गोष्टींत कार्य करायला प्राधान्यक्रम द्याल?
अ. व्यक्तिस्वातंत्र्य व अभिव्यक्ती स्वातंत्र्य
ब. धर्म
क. पैसा
४. तुमचा आवडता रंग कोणता: १.सफेद २.भगवा ३.लाल ४.हिरवा ५.नोटेचा?
५. तुम्हाला गुप्त योजना काय असेल असे वाटते आहे हे जास्तीत जास्त ५ वाक्यात लिहा

प्रश्न वाचल्यावर त्या धाग्यावर निरर्थक पासून रोचक पर्यंत सगळ्या श्रेण्यांचा भडिमार झाला. गब्बर म्हणाला सध्या मला एका कॉन्फरन्सला जायचंय तोवर तुम्ही याचा विचार करा नी तुमची उत्तरे माझ्या पत्त्यावर भिरकवा.

राजेश नी बॅट्या हे प्रश्न वाचून लगेच काही माहिती शोधायला आपापल्या जागांवर गेले. मनोबाच्या जिमची वेळ झाल्याने त्यानेही काढता पाय घेतला. अरुणचे यात सहभागी व्हावे की नाही हे ठरत नव्हते. मेघना आणि ऋष्या तिथेच बसून काहीतरी चर्चा करू लागले...

(क्रमशः)

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (3 votes)

प्रतिक्रिया

टिपः ज्यांना इच्छा आहे त्यांनी -कथेत उल्लेख झालेल्यांनीच नाहीत तर कोणीही- या प्रश्नांची उत्तरे इथे प्रतिसासांत दिलीत तरी चालतील. त्यानुसार कथेचा पुढिल रोख काही प्रमाणात ठरवला जाईल

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

हायला! लिहिते थोड्या वेळात.

***

ए चले... फारच विचार करायला लागतोय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

मस्त. एवढंच म्हणून रुमाल टाकत्साता होतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सध्या रुमाल टाकल्या गेला आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

+१

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

गब्बरपण आले का आता :-D.
कहर आहे _/\_.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Biggrin

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बिपिन कार्यकर्ते

थोडक्यात काय तर मी बरोबर बोलतो

इतकं खवचट? माझ्याशी चूकून माकून भेटलास तर शिरस्त्राण घालून ये. आणि मी नजरेआड होइपर्यंत काढू नको.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

उत्तरं देण्याचा प्रयत्न करुन पाहतो.
पण मी आता जी उत्तरं देतोय ती माझ्याच थोड्यावेळानं दिलेल्या उत्तराशी जुळतीलच असं नाही.
जेव्हा जे डोक्यात चमकून गेलं ते लिहितोय.

१. समजा तुम्हाला अनिर्बध सत्ता दिली आणि एकच कायदा बदलायचा असेल तर तुम्ही कोणता कायदा बनवाल?
सौंदर्य प्रसाधनांना सवलत व उत्तेजन देणारा कायदा करीन एखादा.

२. समजा तुम्हाला अपरिमित पैसा दिला व तो वापरून देशातील प्रत्येकाला ५ टप्प्यात सुखी करा असे म्हटले तर तुम्ही काय कराल?
पैसा वाटीन. ज्याला जे महत्वाचं वाटतं ते त्यानं करावं. हरेकाच्या भलं करण्याचा हेड्याक मी ओढवून घेणार नाही.
अर्थात ह्यातून पुन्हा पॅरिटो प्रिन्सिपल सारखी ८०-२० अशी संपत्तीची विभागणी आपोआप खूपच लवकर होइल ह्याचीही खात्री आहे.
पण त्या विभागणीस ती जनता स्वतः कारणीभूत असेल. मी स्वतः कुणालाच श्रीमंत वा गरिब बनवण्याचा प्रयत्न करणार नाही.
हर किसी को अपनी मौत मरने का हक़ है भाई |

३. समजा तुम्हाला अविश्रांत व अतुल्य बळ दिलं तर पुढिलपैकी कोणत्या गोष्टींत कार्य करायला प्राधान्यक्रम द्याल?
अ. व्यक्तिस्वातंत्र्य व अभिव्यक्ती स्वातंत्र्य
ब. धर्म
क. पैसा
अ क ब (किंवा जमत असल्यास ब नाहिच.)

४. तुमचा आवडता रंग कोणता: १.सफेद २.भगवा ३.लाल ४.हिरवा ५.नोटेचा?

आकाशी रंग आमचा आवडता. पण तो इथे पर्यायात नाही.
उरलेल्यांपैकी अर्थातच नोटेचा र्म्ग आमचा आवडता.

५. तुम्हाला गुप्त योजना काय असेल असे वाटते आहे हे जास्तीत जास्त ५ वाक्यात लिहा
घंटा योजना. गब्बर गेम घेउन र्‍हायलाय असे वाटते.
किंवा फार्फार तर अ‍ॅम्वे, क्वेस्ट गोल्ड कॉइन ह्यासारखी एखादी चेन मार्केटिंग आयड्या मोठी नावं वापरुन गळ्यात मारत असणार हा ड्यांबिस.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

१. समजा तुम्हाला अनिर्बध सत्ता दिली आणि एकच कायदा बदलायचा असेल तर तुम्ही कोणता कायदा बनवाल?

गब्बरसारख्या सगळ्या निर्लेप (व्यक्तिगत रोखाच्या आणि लेबलं न लावता लिहीणाऱ्या) लोकांना संकेतस्थळांवर प्रवेशबंदी करावी.

२. समजा तुम्हाला अपरिमित पैसा दिला व तो वापरून देशातील प्रत्येकाला ५ टप्प्यात सुखी करा असे म्हटले तर तुम्ही काय कराल?

अॅड कँपेन (मोदींसारखं).

३. समजा तुम्हाला अविश्रांत व अतुल्य बळ दिलं तर पुढिलपैकी कोणत्या गोष्टींत कार्य करायला प्राधान्यक्रम द्याल?

ब. धर्म

४. तुमचा आवडता रंग कोणता: १.सफेद २.भगवा ३.लाल ४.हिरवा ५.नोटेचा?

क्रेडिट कार्डचा

५. तुम्हाला गुप्त योजना काय असेल असे वाटते आहे हे जास्तीत जास्त ५ वाक्यात लिहा

प्रत्येकाला एकेक निबंध वाचायला द्यायचा. त्याचा अर्थ त्यांना विचारायचा आणि मग आपल्या डोक्यात गुणाकार-भागाकार सुरू करायचे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

पुढील अंक कधी?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

पुढचा अंक नाही येणारे. डोक्यातली कल्पना विरली आहे.
आता जुलमाने पुन्हा बांधण्यात मजा नै.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

जा फुट मग

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

जा फुट मग

फुट आणि मग यांच्या साहचर्याचे कारण समजेल काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

एक बघा त्या फुट मधला फू दुसरा पाहीजे ना?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0