.

.

field_vote: 
4.666665
Your rating: None Average: 4.7 (6 votes)

गवि हे नाव दिसल्यानं सर्वप्रथम उद्गार आले ते "व्वा"
आता पुडह्चं वाचतो,.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

बर्मुडा ट्रँगल मधे गायब झाल अस अजून कुणी म्हणल्याच ऐकीवात नाही. बाकी पायलटवर किती मानसिक ताण असतो हा प्रश्न मला नेहमी सतावतो. कदाचित आपण शहरात गाडी चालवत असताना जेवढा असेल तेवढाच असतो असेही असू शकेल. किंवा बस ड्रायव्हर वर जेवढा असतो तेवढाही असेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

या प्रकारच्या विमानांत (बोईंग - एअरबस आदि आधुनिक एव्हिऑनिक्स असलेल्या विमानात) ताण काही नसतो. टेकऑफ आणि लँडिंगखेरीज बहुतांश गोष्टी आपोआप होत असतात आणि फक्त लक्ष ठेवायचं असतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कचकून आभार!
टिव्हीवर, पेपरात नुसत्याच बातम्यांचा ढिग आहे, त्यात असे छान- टु द पॉईंट - वार्तांकन का नाहिये त्यांनाच ठाऊक! असो.

बाकी, हा घटनाक्रम वाचून "लॉस्ट" सिरीज आठवली Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

वरचं सर्व कम्युनिकेशन सोडा, विमान कोसळल्यानंतरही त्याचा ब्लॅक बॉक्स खुद्द पडल्या जागेवरुन स्वतःच्या रेडिओमार्फत डिस्ट्रेस सिग्नल ट्रान्समिट करत राहतो. शिवाय ऐकू येतील असे आवाजी सिग्नल्सही फेकत राहतो.. किमान काही दिवस.. अगदी पाण्याखालूनही.. हे आवाजी सिग्नल अर्थातच फार दूर जात नाहीत.. पण रेडिओ सिग्नल तुलनेत सहज मिळतात. यावरुन तो ब्लॉकबॉक्स कुठे आहे ते शोधायला मदत होते.

ते बहुदा अल्ट्रासॉनिक सिग्नल ट्रान्स्मिट करतं, पण खार्‍या पाण्यामुळे किंवा ब्लॅकबॉक्स खोल पाण्यात असल्यास सिग्नल वाचायला त्रास होउ शकतो असे वाचण्यात आले. एअर फ्रान्सच्या AF447 बरोबर ह्याची तुलना करण्यात येत आहे, AF447 सापडायला जवळपास २ वर्षे गेले होते त्यामुळे आत्ता गेलेला वेळ फार आहे असं म्हणता येणार नाही.

महत्त्वाचा मुद्दा असा वाटतो कि ज्या ठिकाणी MH370 नाहिसे झाले ते ठिकाण रडारच्या क्षेत्रात होतं, अनेक देशांच्या रडार प्रणाली त्या भागाचे निरिक्षण करत असणार आणि हे असताना विमान नाहिसे होणं चमत्कारीक वाटतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गवि,

तुंम्ही खूप सुंदर सगळं सांगितलंत. जेव्हा केव्हा हे गूढ उकलेल, तेंव्हा पुन्हा त्यावर लिहाच.
गविंचा पंखा,
- स्वधर्म

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाटच पाहात होतो गवि लिहीतील म्हणून. भरपूर माहिती मिळाली.
मलातरी यात घातपात वाटत नाही; कारण अतिरेक्यांनी असे काही केले तर त्याची "जबाबदारी" घेऊन जाहिरात करायला ते नक्कीच पुढे आले असते.
किंवा हायजॅक करायचा प्लॅन असेल पण विमानात अशा काही घटना घडल्या असतील की विमानाचा स्फोट झाला आणि २३९ लोकांचा जीव गेला म्हटल्यावर ज्यांनी हायजॅकिंगचा प्लॅन केला ते आता घाबरुन गप्प बसले असतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ननि म्हटले तेच म्हणायचे आहे.
बाकी पकाकाकांनी उल्लेख केल्याप्रमाणे बर्म्युडा ट्रँगलसंबंधित कहाण्यांची आठवण झालीच.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

Why are cellphones of passengers ringing

http://indiatoday.intoday.in/story/missing-malaysian-plane-why-are-cellp...
.
.
The unprecedented mystery behind the disappearance of Malaysian Airlines flight MH 370 deepened on Monday when relatives claimed they were able to call the cellphones of their missing loved ones.

Read More: Missing Malaysian plane: Terror attack suspected, hunt on for Iranian

According to the Washington Post, family of some of the 239 people on board the vanished Boeing 777 said that they were getting ring tones and could see them active online through a Chinese social networking service called QQ.

Repeatedly telling Malaysian Airlines officials about the QQ accounts and ringing telephone calls, they hoped that modern technology could simply triangulate the GPS signal of the phones and locate their relatives.

According to a China.org.cn report, 19 families signed a statement saying that dialing their loved ones' phones leads to a ring, rather than going straight to voicemail, as one would expect of a phone in airplane mode or otherwise unable to be reached.

The relatives have asked for a full investigation and some complained that Malaysian Airlines is not telling the whole truth.

This new eerie development comes as the Malaysian authorities said they were now switching the focus of their search zone for the plane southwards - on the other side of the Malaysian peninsular.

However, the answer to the mystery of ringing phones lies in technology. According to Devin Coldewey of NBC News, "however eerie this seems, it may have more to do with how mobile phones and networks operate than any deeper mystery."

Coldewey writes: "When you hit the call button on some phones, a ringing tone begins immediately…. The search for the party on the receiving end may be nearly instantaneous, or take a few seconds - during which time the phone (depending on model, network and other variables) may or may not make a ringing noise to indicate to the caller that it is attempting to make the cell connection. So while it may ring four times for you, the person you're calling may only hear it ring once -- or not at all."

.
.
.
घटनेचे दिलेले स्पष्टीकरण मी तरी समजू श्कलो नाही. कॉल लागलेला नसताअना रिंग दिली जाते म्हणे.
पटले नाही. समजलेही नाही.
आणि खरोखर रिंग जात असेल तर मोबाइल कंपन्यांच्या सहाय्याने ट्रॅक कसं केलं जात नाही; हे ही समजलं नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

स्काइप वरून मोबाइल अथवा लँडलाइन वर फोन करण्यासाठी 'कॉल' वर दाबताच एक दोन सेकंदात एक फोनची रिंग येणे सुरू होते...पण प्रत्यक्षात उचलणार्‍याकडे ती रिंग येत नसते. काही क्षणांच्या या 'फेक' रिंगिंग नंतर एक थोडी वेगळी रिंग ऐकू येते जी खरोखरी ज्याला फोन केला आहे त्याच्या फोनवर वाजत असते. हे मी स्काइपवर अनेक वेळा अनुभवलेले आहे. त्यामुळे वर दिलेल्या बातमीतील 'फेक रिंगिंग' म्हणजे यासारखेच असावे जे मोबाइल टू मोबाइल कॉलवर सुद्धा असावे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मोबाइल/स्काइपचे जाऊ द्या. आपली जुन्या जमान्यातली पीअँडटीने दिलेली जी जुनीपुराणी लँडलाइन असायची (ज्याबरोबर तो बोट घालून डायल फिरवण्याचा टेलिफोन यायचा), त्यातसुद्धा कॉलरला ऐकू येणारी रिंग (खरे तर रिंग रिटर्न टोन) आणि प्रत्यक्षात ज्याला कॉल केला त्याला ऐकू जाणारी रिंग यांचा काहीही संबंध नसे. म्हणजे, इथे कॉलरला जरी रिंग रिटर्न टोन ऐकू आला, तरी प्रत्यक्षात ज्याला कॉल केला, त्याला ती रिंग जात असेलच, याची शाश्वती तेव्हाही देता येत नसे. (किंबहुना, पलीकडच्याला ती रिंग गेलीच नाही, असा अनुभव, विशेषतः एसटीडी कॉलवर पण बहुधा कधीकधी लोकल कॉलवरसुद्धा, सर्रास येत असे.)

फार कशाला, समजा कॉलरला रिंग रिटर्न टोन ऐकू आला, आणि ज्याला कॉल केला त्याला रिंग ऐकू जरी आली, तरी त्यांचाही काहीही परस्परसंबंध नसे - अगदी फेज़ वगैरे वेगळी असू शके, इ.इ. (हा प्रयोग बाबा आदमच्या जमान्यात शेजारीशेजारी ठेवलेल्या दोन फोनांवर एका फोनावरून दुसर्‍या फोनाला कॉल करून प्रत्यक्ष करून पाहिलेला आहे.)

(सांगण्याचा मतलब, रिंग रिटर्न टोन आणि प्रत्यक्षात जाणारी रिंग यांचा पूर्वापार थेट संबंध नाही.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

http://timesofindia.indiatimes.com/world/rest-of-world/Missing-Malaysia-...?

या ठिकाणच्या वृत्तानुसार विमान क्वालालंपूर रडारवरुन दिसेनासे झाल्यावर एक तास चाळीस मिनिटांनीही एका एअरफोर्स रडारवर डिटेक्ट झाले होते.मूळ मार्ग सोडून आणि कमी उंचीवर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भेंडी.
लैच गुंता आहे स्साला

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

सुन्न करणारा लेख. प्रवाशांना मृत्यूपूर्वी कशाकशातून जावे लागले असेल (जर...)? त्यांच्या आप्तांची काय हालत असेल?

इंधन ०.०४ लिटर प्रतिटन प्रतिकिमी हा नॉर्म दिलेल्या आकडेवारीतून निघतोय. एक कार एक टनाची मानली, १५ किमीचे अ‍ॅवरेज मानले तर ०.०७ उत्तर येते. म्हणजे विमानाची सरासरी बरीच बरी आहे! रस्त्याची फ्रिक्शन नसते म्हणून?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

इंधन ०.०४ लिटर प्रतिटन प्रतिकिमी हा नॉर्म दिलेल्या आकडेवारीतून निघतोय. एक कार एक टनाची मानली, १५ किमीचे अ‍ॅवरेज मानले तर ०.०७ उत्तर येते. म्हणजे विमानाची सरासरी बरीच बरी आहे! रस्त्याची फ्रिक्शन नसते म्हणून?

जेट इंजिन विरुद्ध पिस्टन इंजिन हा प्रकार त्यात असावा काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

या इंधनाची ऑक्टेन व्हॅल्यू वेगळी (बरीच जास्त) असणार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

व्हाईट पेट्रोल का काय म्हंटात ते हेच काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

केरोसीन असतं या प्रकारच्या इंजिनात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ओह अच्छा, धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

धन्यवाद. टीवी चॅनल्समध्ये दाखवीत आहेत त्यापेक्षा निराळी माहिती मिळाली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

एखाद्या विषयाची 'पॅशन' असेल तर त्या विषयावर किती सुरेख लिहिले जाते याचे उदाहरण म्हणता येईल असा लेख. लेखातल्या तांत्रिक बाबींसोबतच त्यातला मानवी दृष्टीकोनही आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

उसके दुष्मन है बहुत, आदमी अच्छा होगा

असंच म्हणतो. इतक्या स्वच्छ आणि सुस्पष्टपणे तसंच लोकांना कळेल अशा शब्दांत तांत्रिक माहिती आली की नक्की काय घडतंय? या सगळ्याचा अर्थ काय? अशा प्रश्नांना समाधानकारक उत्तरं मिळतात. इतका छान लेख लिहिल्याबद्दल, तसंच वेळोवेळी प्रतिसादांत अपडेट दिल्याबद्दल गवि यांचे आभार.

पूर्वीच्या काळी बर्म्युडा ट्रायांगल नावाच्या भागाबाबतही अशाच गूढपणे विमानं नाहीशी झाल्याच्या कथा होत्या. आता अर्थातच ते वलय नाहीसं झालं आहे. या वलयाची, त्यामागच्या कारणांची, तत्कालीन तंत्रज्ञानाची गोष्ट गविंकडून वाचायला मिळावी अशी फार इच्छा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अनुमोदन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

+२

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

लेखाची शेवटची ओळ....'आपण त्यात नाही हा केवळ योगायोग.. यू नेव्हर नो.'
एका मित्राकडून कळले की ह्या फ्लाईट मध्ये परिचयातील व्यक्तिचेच आई, वाडिल आणि भाऊ आहेत.
हे समजल्यापासून ह्या बातमीने आणखीन जास्तच अस्वस्थ केले...बातमी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आत्ताच बातमी आली आहे की मूळ फ्लाईटपाथच्या जवळ चीनला काही तरंगणारे मोठे अवशेष त्या अपघातानंतर लगेच रविवारी नोंदवले गेले होते. ही गोष्ट तीन दिवसानी का जाहीर केली याचा उल्लेख नाही.

या मोठ्या डेब्रीज खरेच MH 370 च्या निघाल्या तर मग विमान मूळ मार्ग सोडून पश्चिमेकडे 350 किलोमीटर गेलं होतं किंवा परत फिरलं होतं या सर्व गोष्टी चूक ठरतात.

आता काय होतेय अवशेषांचं ते बघू.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

राघागुरुजी काही म्हणोत, जोवर या नाहीशा झालेल्या विमानाबाबत काहीच अधिकृत माहिती/स्पष्टीकरण मिळत नाही तोवर ते परग्रहवासियांकडून अपहृत झाले आहे असेच आम्ही मानणार... Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आता फारच मोठी बातमी आली आहे. वॉल स्ट्रीट जर्नलने काही तंत्रज्ञ सूत्रांच्या हवाल्याने असं म्हटलं आहे की या विमानातली रोल्स रॉईसची इंजिने दर ३० मिनिटांनी आपला स्टेटस लॉग जमिनीवरच्या केंद्रांकडे आणि पर्यायाने परस्पर रोल्स रोईसकडे पाठवत असतात. हा डेटा रोल्स रॉईसला तांत्रिक अ‍ॅनलिसिससाठी लागतो.

तर आता अशी बातमी आहे की या इंजिनांनी उड्डाणापासून पाच तास असे लॉग्ज पाठवले, म्हणजे ५ तास इंजिने चालू होती. याचा अर्थ शेवटचा काँटॅक्ट झाल्याच्या क्षणापासून आणि ठिकाणापासून विमान पुढे चारेक तास चालू होतं.

या कालावधीनुसार विमान या काळात कोणत्याही दिशेला साधारण २२०० नॉटिकल माईल्स (४०७४ किलोमीटर्स) जात राहिलं.

या अंतराचा विचार केला तर सध्या शोध चालू असलेल्या रेंजपासून ते फार म्हणजे फार कुठच्याकुठे असणार. (शेवटी क्रॅश झालं असलं /नसलं तरी.)

हिंदी महासागर, अरबी समुद्र वगैरे हा भागही या २२०० नॉ माईल्सच्या रेंजमधे येतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

म्हणजे आधीच पत्ता लागला अस्ता तर त्या चार पाच तासात त्या तरंगणार्‍या जीवांना वाचवायची संधी होती तर....

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

चार तास ते विमान उडत असणार असं त्या रिपोर्टवरुन ध्वनित होतंय. जमिनीवर आलेल्या / स्थिरावलेल्या विमानाची इंजिन्स जागच्याजागी फुल किंवा क्रूझ पॉवरवर चालू राहू शकत नाहीत, ती डिसैंटिग्रेट होतील किंवा विमानाला फरपटवून नष्ट करतील आणि अर्थातच स्वतःही बंद पडतील. चार तास फिरत नाही राहणार.

त्या इंजिनांनी नेमके काय स्टेटस पाठवले हे जाहीर होईपर्यंत काहीच बोलता येत नाही. पण फेटल एरर टाईपचे स्टेटस असलेली इंजिन्स चार तास चालू राहतील हे तर्कदुष्ट आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

या चार तासांमध्ये ते इतर कोणत्याही देशाच्या रडारमध्ये दिसले नाही, त्याच्या पायलटनी कसलाही संपर्क केला नाही, त्याच्या मार्गात इतर कोणतेही विमान आले नाही, त्यातील (संभाव्य) अपहरणकर्त्यांनी आजवर कोणताही संदेश दिला नाही हे सर्व अतर्क्य आहे.

कोणीतरी काहीतरी लपवत आहे हे नक्की.
http://www.smh.com.au/world/malaysia-airlines-plane-may-have-flown-for-h...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सेकंडरी रडारचा ट्रान्सपाँडर बंद करुन (खुद्द) पायलट विमान रडारवर अदृष्य करु शकतो, पण प्रायमरी रडार (लष्करी मुख्यतः) हे केवळ सिग्नलच्या रिफ्लेक्शनवरुन हवेतल्या वस्तू स्कॅन करत असल्याने त्यात विमानाचा स्पॉट दिसणार, पण हे नेमके कोणते विमान आहे वगैरे ते नावगाव / उंची कळणार नाही. अशावेळी ते विमान जर तीव्र संवेदनशील / प्रतिबंधित क्षेत्रातून उडत नसेल तर कोणी फार पाठपुरावा न करण्याची शक्यता बरीच आहे.

शिवाय ठराविक उंचीपेक्षा खालून विमान उडवलं तर ते प्रायमरी रडारच्या स्कॅनरमधे येत नाही. समुद्रावर असं खूप जमिनीलगत विमान उडवणं शक्य आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खूप कमी उंचीवरून विमान उडवलं तर इंधन जास्त जळत असेल असे वाटते. अशा कमी उंचीवर चार तास पुरेल इतके इंधन विमानात असेल काय?

आणि अर्थातच, त्या चार तासात सातत्याने अ‍ॅबनॉर्मल टर्बाईन एअर प्रेशर्स, आरपीएम, थ्रस्ट आणि फ्युएल कंझप्शन इ. इ. असे लॉग्ज रोल्स राईसला मिळत असताना त्यांनी त्याकडे दुर्लक्ष कसे केले असेल?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

तर्क योग्य आहे, पण एक्स्टेंडेड रेंज टँक्स असल्याने आणि लाँग ड्युरेशन फ्लाईट + आल्टरनेट डेस्टिनेशन फ्युएल असे सर्व भरुन घेतलेले असल्याने लो आल्टिट्यूडवरही चार तास इंधन पुरणे साहजिक आहे. (विमान इंधन संपेपर्यंत उडत राहिले असं मानायचं कारण नाही, पण तसं मानलं तरीही.)

शिवाय हे लॉग्ज थेट रोल्स रॉईसकडे येत असले तरी ते कदाचित "लाईव्ह" नसावेत.. आर्काईव्ह टाईप असावेत. आणि त्यांच्याकडे लेट पोचले असावेत. शिवाय माहिती एकदम बाहेर लीक करण्याच्या स्पीडवरही तिथे काही कंट्रोल ठेवला जात असणार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

शक्यता १.
जेव्हा विमान ऑटो पायलट मध्ये असतं तेव्हा पायलट वगैरे कॉकपिटबाहेर फिरत असतील तर त्या काळात कोणीतरी विमानाचा ताबा घेऊ शकतं. [म्हणजे क्रू सोबत झटापट वगैरे काही नाही + डिस्ट्रेस सिग्नल वगैरे काही नाही]. विमान अजून व्यवस्थित आहे आणि हायजॅक्ड आहे.

शक्यता २.
हायजॅकर्सच (११ सप्टेंबर सारखे) विमान चालवत होते. त्यांनी विमान इतरत्र नेऊन नष्ट केले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

चांगला लेख आणि माहिती, धन्यवाद

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

असेच म्हणतो

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

मला वाटते मलेशियन सरकारने बेजबादारपणे हे प्रकरण हाताळले आहे.
त्यांच्या रडारवर हे विमान दिसले होते तर त्यांनी ती माहिती वेळीच द्यायला हवी होती.
कालच्या बातमीनुसार विमान भारतावरून गेले आणि लक्षात आले नाही, असे झाले असेल तर प्रकरण गंभीर आहे.
(बहुदा भारतावरून गेले नसावे असे वाटते.)
एकुणच सर्वच घडामोडी चमत्कारिक आहेत हे मात्र खरे.

आजच्या बातमीनुसार दहशतवादी हल्ला झाला असावा असे गृहीत धरले जाते आहे.
कुण्या पकडलेल्या दहशतवाद्याने असे सांगितले की त्याने
मलेशियन पायलटला बुटातली स्फोटके दिली होती आणि हा हायजॅकचाच बेत होता.
त्यामुळे हे विमान कुठे तरी उतरवले गेले असावे असे आता काही लोक मानताहेत.
हे विमान उतरायला ४५ मिटर रुंद १५०० मिटर्स लांब धावपट्टी पुरेशी आहे म्हणे.
विमान परत उडवायचे नसेल तर मातीच्या धावपट्टीवरही उतरू शकते.
असे असले तरी मोबाईल आणि डिजिटल कॅमेर्‍यांच्या युगात 'विमान उतरलेले कळणार नाही' असा कोणता प्रदेश असेल?

रोज येणार्‍या नवनवीन बातम्या आणि शक्यतांमुळे नातेवाइकांच्या भावनांचा काय खेळ होत असेल ते तेच जाणोत.

आता बेपत्ता लोकांच्या नातेवाईकांद्वारे मलेशियन एयर विरुद्ध दावे दाखल केले जातील का?
केल्यास असे खटले कुठे लढले जातील?
लंडनला? - कारण इन्शुरन्स तेथला आहे.
क्वलालंपूर ? - कारण कंपनी तेथे आहे
चीन? - कारण चीनी हद्दीत गायब झाले आहे
की जेथे विमान उतरले असेल तेथे?

विमान बनवणारी कंपनी अमेरिकन, आणि इंजिने बनवणारी रोल्स रॉइस युरोपीय, हे पण प्रतिवादी होऊ शकतील का?
माझ्या ऐकीव माहितीनुसार एयर फ्रान्स ४४७ क्रॅश वरुन सुमारे ४७५ मिलियन डॉलरचे दावे क्लास अ‍ॅक्शनद्वारे दाखल झाले होते.
त्यातले बरेच कोर्टाबाहेर मिटवले गेले व उरलेल्यांना १८२ मिलियन या एकरकमी तडजोडीत निकाली काढले.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-निनाद

अरे काय.... १० दिवस झाले अजून काहीच ठोस हाती आलं नाहीये!

गेल्या २५ वर्षात तंत्र इतके विकसित झाल्यावर मला वाटते ही पहिली घटना असेल की एखादे विमान असे "गायब" झाले आणि त्याचे काय झाले ते काहीच कळले नाही. - गवि - याबद्दल काही अधिक माहिती देऊ शकाल का?

कुटुंबीय बिचारे तकलादू आशेवर दिवस ढकलताहेत! जरी समजा ते विमान पडले नाही तरी आत्ता त्या मधले लोक जिवंत असतील का? असलेच तर किती भयानक परिस्थिती मध्ये असतील (चाचेगिरी,हायजॅक वगैरे च्या शक्यता लक्षात घेता!) या विचाराने मी फार खिन्न होऊन जाते.
२-४ वयोगटातील ५ मुलं होती त्या विमानात! - आई गं!!!

असं वाटतं - पडलं , हायजॅक झालं जे काय असेल ते - काहीतरी तरी कळायला पाहिजे त्या कुटुंबीयांना.. निदान त्यांचं दुबळ्या आशेवरती थांबून राहिलेलं आयुष्य कटू सत्य पचवून पुढे तरी सुरू होईल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

हे List of accidents and incidents involving commercial aircraft मिळाले गुगलवर.

१९७९ च्या या घटनेनंतर
January 30 1979 – In the 1979 Boeing 707-323C disappearance, a Boeing 707 operated by Varig and bound for Rio de Janeiro-Galeão International Airport, disappears over the Pacific Ocean 125 miles (201 km) after takeoff from Tokyo Narita International Airport; the cause for the disappearance remains unknown, as neither survivors (6-man flight crew) nor wreckage have ever been found.

एकदम

May 17 2010Pamir Airways Flight 112, an Antonov An-24 with 38 passengers and 5 crew, disappears from radar 10 minutes after takeoff from Kunduz Airport in Afghanistan.

हेच आहे.

आणि मग आत्ताचे मलेशिया चे Malaysia Airlines Flight 370

यातून अ‍ॅव्हिएशन इंडस्ट्री काय बोध घेईल आनि भविष्यात असे घडू नये म्हणून काय उपाय अमलात आणले जातील याचा विचार करते आहे. पुन्हा कॉलिंग गवि!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

आता सर्च एरिया अमर्याद वाढल्यामुळे आणि कालापव्यय झाल्यामुळे विमान सापडण्याची शक्यता बरीच विरळ झाली आहे. या काळात शेकड्यांनी नवनव्या थियरीज पुढे आल्या आहेत. यापैकी बरीचशी तर्कटे केवळ एक शक्यता म्हणून मांडली गेलेली आहेत. कोणत्याही खास माहितीविनाही असे अंदाज करता येतात. उदा. विमानात असलेल्या संवेदनशील कार्गोमुळे विमान अन्यत्र नेले गेले. किंवा ते अमेरिकेच्या दिएगो गार्सिया या तळावर उतरवले गेले. किंवा भारतावरुन पूर्ण प्रवास या विमानाने सिंगापूर एअरलाईन्सच्या त्याच वेळी प्रवास करणार्‍या कायदेशीर विमानाच्या मागेमागे अत्यंत जवळून उडत केला, ज्यामुळे रडार्सवर त्या दोन्हीचा मिळून एकच ठिपका दिसला असणार आणि तीही फ्लाईट सिंगापूर एअरलाईन्सच्या सावलीत क्लियर झाली. एअरबॉर्न कोलिजन अव्हॉईडन्स सिस्टीममुळे जवळजवळ उडणार्‍या विमानाची वॉर्निंग एरवी सिंगापूर एअरलाईन्सच्या विमानाला मिळाली असती, पण MH370ने आपल्या सिस्टीम्स बंद करुन ते टाळलं इत्यादि.

या थियरीज म्हटलं तर केवळ तात्विकदृष्ट्या शक्य आहेतच, पण प्रत्यक्षात कितपत घडू शकल्या असतील याविषयी मोठी शंका घेता येईल.

एकूण काही संकीर्ण मुद्दे खाली नोंदवतो आहे.

- मलेशियाने अधिकृतरित्या असं जाहीर केलं होतं पायलट्सकडून आलेला शेवटचा संदेश "ऑल राईट, गुड नाईट" हा विमानाची ACARS सिस्टीम मॅन्युअली बंद करण्यापूर्वी / आपोआप बंद होण्यापूर्वी आलेला नसून ती बंद केल्यावर / झाल्यावर आला होता. याचा अर्थ पायलट्सनी एक सिस्टीम बंद होऊनही कोणताही दुरित संदेश न देता संभाषण संपवलं होतं. पण आज मलेशिया म्हणते की वरील माहिती अयोग्य असून आता आम्ही असे म्हणतो की पायलट्सचा "ऑल राईट गुड नाईट" हा शेवटचा संदेश हा सिस्टीम बंद होण्यापूर्वी आलेला नव्हता.

याचा अर्थ अजूनही होय होय- नाही नाही असा प्रकार आणि माहितीच्या बाबतीत यू टर्न्स चालू आहेतच.

-शेवटचा संदेश को पायलटच्या आवाजात होता. म्हणजे एकट्या मुख्य पायलटवर संशय घेऊन भागणार नाही.

- मुख्य पायलट हा "पोलिटिकली अ‍ॅक्टिव्ह" होता, आणि तो विरोधी पक्षप्रमुखाचा खंदा समर्थक होता, आणि तो फ्लाईटपूर्वी या प्रमुखावर चाललेल्या खटल्याला हजर राहिला होता, आणि त्याबद्दल अस्वस्थ होता. अशी माहिती जाहीर झाली आहे. मुख्य पायलटचे काही फोटो जाहीर झाले आहेत. त्यात त्याने "डेमॉक्रसी इज डेड" असा संदेश परिधान केलेला दिसतो आहे.

पण एकूण माहितीवरुन थेट पायलटवर संशय घेणं अत्यंत हीनतेचं वाटतं. समजा डेमॉक्रसीचा गळा घोटला जात आहे अशा मताची व्यक्ती असली तरी तरी या प्रकारच्या व्यक्तीच्या विचारधारेचा कडवा सपोर्ट डेमॉक्रसीला म्हणजे लोकशाहीला असणार. अशा वेळी ही व्यक्ती अन्य काही लोकशाहीच्या तत्वाने प्रतिकार करेल.. अतिरेकी मार्गाने विरोध का व्यक्त करेल?

त्या विरोधी पक्षनेत्यानेही पायलटवर घेतल्या जाणार्‍या संशयाविषयी अतिशय तीव्र निषेध केला आहे.

हायजॅक किंवा अपहरणाची थियरी मानण्यात अत्यंत मोठा धोंडा म्हणजे मोटिव्ह, अर्थात उद्देशाचा अभाव. कोणताही मोटिव्ह दुरुनही नजरेत न येणं हा मोठा प्रॉब्लेम आहे.

आठ दिवसांत पॅसेंजर्स किंवा पायलट्स किंवा अपहरणकर्ते यांच्याकडून कोणताही संपर्क नसणं हे न पटण्यासारखं आहे. अपहरणकर्त्यांना आठ दिवस गप्प बसून अडीचशे लोकांना गुप्तपणे विमानासह दडवून ठेवणं हे अशक्यप्राय आहे.

याचाच अर्थ विमान आता अस्तित्वात नसण्याची सर्वात जास्त शक्यता आहे.

माझ्यामते विमानाचा ब्लॅक बॉक्स भविष्यात कधीच मिळणार नाही (न मिळण्याची फारच मोठी शक्यता आहे..)

कारणे:

विमानाचा क्रॅश झालाच असेल तर तो त्याच दिवशी इंधन संपताक्षणी झाला असणार. म्हणजे त्याला ९-१० दिवस झाले. विमान इन्टॅक्ट पाण्याखाली गेलं नसेल तर विमानाचे तरंगणारे हलके भाग म्हणजे खुर्च्यांची कुशन्स, बॅगा, कपडे इत्यादि. हे गेल्या दहा दिवसांत मूळ ठिकाणापासून शेकडो किलोमीटर रँडमली भरकटले असणार. पण ब्लॅक बॉक्सेस मात्र मूळ जागीच पाण्यात बुडाले असणार. त्यामुळे आता तरंगणारे अवशेष जरी सापडले तरी ब्लॅकबॉक्सचा थांग त्यावरुन लागणार नाही.

जर हिंदी महासागरात ते बुडाले असतील तर त्यांचे संदेश पृष्ठभागापर्यंत पोहोचण्याची शक्यता बहुतांश भागांत शून्यवत आहे. आणि हे जे काही संदेश ट्रान्समिट होतात ते ३० दिवसांपर्यंतच होतात. बॅटरी तेवढीच असते. पूर्ण हिंदी महासागर तळातून सावडणे जवळजवळ अशक्य आहे. आणि तसं केलं तरी महिन्याभरात तिथे पोचणं त्याहून अशक्य. जाणार्‍या प्रत्येक दिवसासोबत समुद्रतळाशी विसावलेले ब्लॅकबॉक्स आणि इतर पार्ट्स वाळूखाली गाडले जाण्याची शक्यता जास्तजास्त.

वाट पाहणं भयानक असतं. मृत्यू तुलनेत खूप लवकर स्वीकारला आणि पचवला जातो, पण ज्या लोकांचं जवळचं कोणी बेपत्ता झालेलं असतं ते कितीही प्रयत्न केले तरी आशा सोडू शकत नाहीत आणि त्याचवेळी ती व्यक्ती कुठे आणि कशी असेल किंवा असेल की नसेल याचे विचार थांबवू शकत नाही.

त्यामुळे खरंच बाकी काही कळो न कळो, या लोकांचं काय झालं याचा निकाल मात्र नक्की लागू दे अशी तीव्र इच्छा..

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाट पाहणं भयानक असतं. मृत्यू तुलनेत खूप लवकर स्वीकारला आणि पचवला जातो, पण ज्या लोकांचं जवळचं कोणी बेपत्ता झालेलं असतं ते कितीही प्रयत्न केले तरी आशा सोडू शकत नाहीत आणि त्याचवेळी ती व्यक्ती कुठे आणि कशी असेल किंवा असेल की नसेल याचे विचार थांबवू शकत नाही.

त्यामुळे खरंच बाकी काही कळो न कळो, या लोकांचं काय झालं याचा निकाल मात्र नक्की लागू दे अशी तीव्र इच्छा..

+१

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आणखी काही मुद्दे:

अचानक उद्भवलेला तांत्रिक दोष--> पायलट्स अचानक / कमी वेळात बेशुद्ध किंवा मृत --> इंधन संपेपर्यंत विमान ऑटो पायलटवर सरळ जात राहून कोसळणे. या (हेलिओस क्रॅशप्रमाणे) शक्यतामालिकेच्या विरोधात जाणारे बरेच मुद्दे गेल्या दोनतीन दिवसात पुढे आले आहेतः

- पहिले डायव्हर्शन हे विमानाच्या कंट्रोल कॉलमने (फिजिकल कंट्रोल हाताने फिरवून) केलेले नसून फ्लाईट कॉम्प्युटरला फीड केलेल्या प्लॅनमधे बदल करुन घडवलेले दिसले आहे. इमर्जन्सीत, बेशुद्ध होताहोता केलेली इमर्जन्सी वळण्याची किंवा अन्य हालचाल ही कॉम्प्युटर एंट्रीतर्फे केली जाईल हे शक्य दिसत नाही.

- आकार्स आणि ट्रान्सपाँडर या दोन वेगवेगळ्या सिस्टीम्स काही काळाच्या अंतराने बंद केल्या गेल्या आहेत. "सडन फेल्युअर"च्या किंवा सडन क्रॅशच्या केसमधे सर्व सिस्टीम्स एकदम बंद पडायला हव्या.

-इंधन संपेपर्यंत विमान उडत राहिले असेल तर ते शेवटच्या ट्रॅजेक्टरीमधे ऑटोपायलटवर स्ट्रेट अ‍ॅन्ड लेव्हल फ्लाईटमधे उडत राहायला हवे. पण इथे मात्र त्या विमानाने पुढचा प्रवास हा ठराविक चेकपॉईन्ट्स पार करत (VAMPI --> GIVAL) केला. म्हणजेच मूळ मार्गावर नसलेले चेकपॉईन्ट्स त्याने घेतले. हे चेकपॉईन्ट्स घेताना मार्ग बदलावा लागतो. या चेकपॉईन्ट्सना वापरुन प्रवास करण्याने ठराविक एअरवेवर राहून कोणत्यातरी ठिकाणाकडे कूच करण्याचा उद्देश सरळ दिसतो. सर्वजण बेशुद्ध होऊन मूळ मार्गावर विमान राहिले असते तर ते बीजिंगच्या दिशेत जात राहिले असते. जर बेशुद्ध होण्यापूर्वी पायलटने नवी दिशा दिली असती तर त्या दिशेत जात राहिले असते. पण असे वेगळ्या मार्गाचे चेकपॉईंट्स घेतले नेमके क्रमाने घेतले नसते.

-शिवाय मूळ ३५००० फुटांच्या पातळीवरुन ४५००० फुटांपर्यंत उंच आणि २३००० आणि कदाचित ५००० फूट, इतक्या प्रकारे लेव्हल्स चेंज केल्या. फ्लाईट लेव्हल कमी होणंही कदाचित समजता येईल, पण खाली उतरुन परत वर चढणं आणि तेही हजारांच्या पटीत फूट, हे आपोआप होणारं मॅनुव्हर नक्कीच नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जर अपहरण नाही तर मग ज्याने हे सगळे केले त्याने ते का केले हा प्रश्न अनुत्तरितच राहणार!

त्या विमानातल्या बेपत्ता प्रवाशांच्या किंवा त्यांच्या मागे राहिलेल्या कुटुंबियांच्या एक एक कथा कुठे ना कुठे तरी प्रकाशित होत राहतात आणि मन परत परत सुन्न होत राहाते.

आजच सकाळी मुक्तेश बॅनर्जी या भारतीय वंशाच्या पण कॅनडीयन नागरिकत्व असलेल्या प्रवाशाचा फोटो पाहिला. तो व त्याची मंगोलियन वंशाची बायको दोघेही विमानात होते. फेसबुकवर दोघांचे प्रोफाइल पण आहे, दोन अनुक्रमे ७-८ आणि २-३ वर्षाची अतिशय गोंडस मुले आहेत त्यांना! सुदैवाने मुले नव्हती फ्लाइट मध्ये पण....त्या मुलांचे आयुष्य कायमसाठी बदलून गेले आता!

आज शेवटी यासंबंधी बातमी फॉलो करणे थांबवावे असे ठरवले होते पण तेही जमत नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

मला वाटते की हे विमान हायजॅक करुन दिएगो गार्सियाकडे वळवले असणार, घातपात करण्यासाठी.. परंतु श्यामकाकांनी ते आकाशातच उडविले असेल व अवशेष गायब केले असणार, बोंबाबोंब होऊ नये म्हणुन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

™ ग्रेटथिंकर™

एक चांगला लेख वाचनात आला. A Startlingly Simple Theory About the Missing Malaysia Airlines Jet

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

लेख चांगला आहे. क्रेडिबल आहे असे वाटत आहे. पण त्या विषयात गती नाही म्हणून कमेंट करणे शक्य नाही.

त्याने अधिकार्‍यांशी संपर्क केला आहे का हे कळले नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

बहुतेक अवशेष मिळाले वाटतं

ब्लॅकबॉक्स मिळाला पाहिजे मगच नक्की काय झाले ते कळेल!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

प्रकाटाआ

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-निनाद

खात्रीशीर सांगितले नाहीये. पण असावेत असे म्हंटले आहे. ही चित्रे अमेरिकन उपग्रहांनी काढली आहेत. त्यासाठी आता ऑस्ट्रेलियन विमाने शोधास गेली आहेत. चीनी लष्कर यात येणार अशी बोलवा आहे. हिंदी महासागरात भारताच्या आंगणात(?) हे सगळे घडत असताना आपण फक्त पाहात आहोत?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-निनाद

>>हिंदी महासागरात भारताच्या आंगणात(?) हे सगळे घडत असताना आपण फक्त पाहात आहोत?

भारताच्या अंगणात हे जरा अंमळ ओव्हरबोर्ड वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

तसेही, भारताने याबद्दल नेमके काय करणे अपेक्षित आहे?

------------------------------------------------------------------------------------

बोले तो, शोध/मदतकार्य वगैरेंबद्दल नव्हे. ते तर भारत सरकार तसेही करतच असावे. हे सगळे ऑष्ट्रेलियन, चिनी, झालेच तर अमेरिकन उपग्रह वगैरे, 'भारताच्या अंगणा'त घुसून बागडताहेत वगैरे, त्याबद्दल म्हणतोय.

आणि काय म्हणून?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

नाव इंडीयन ओशन पण खरे तर तो 'चायनोमेरिकन' समुद्र आहे.रशियाने टाकुन दिलेले कबाड कुठुन तरी ठिगळं लावुन आणायचं आणि आमचे नाविक सामर्थ्य फार मोठे आहे अशा फुशारक्या मारायच्या, हे भारताने सोडुन द्यायला हवे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

™ ग्रेटथिंकर™

नावाशी काय, जिथे हे अवशेष सापडले ते ऑस्ट्रेलियाचे अंगण जास्त वाटते. आणि बरेच मोठे अंगण आहे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

भारताचे अंगण

अहो भारताच्या किनार्‍यावर अगदी मुम्बै ला पाकिस्तानी माणसे बोट घेउन येतात. हे सुद्धा कळत नाही भारताला, तर हे विमान कुठले कळायला.

जर हे विमान, भारतात कुठल्या शहरावर पडले असते, तर च भारताला कळले असते, ते सुद्धा ते विमान पडल्यावर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आता जिथे संशयास्पद अवशेष उपग्रहातून दिसले (होते) ती जागा समुद्रात साधारण चौदाशे नॉटिकल माईल्स (अडीच हजार किलोमीटर्सच्या आसपास) इतकी दूर आहे. शोधकार्यासाठी ही निखालस एक अत्यंत अवघड जागा आहे. यात असंख्य समस्या आहेतः

१. त्या जागी शोधपथकाच्या विमानाला एक फेरी मारायची तरी जाऊन येऊन पाच हजार किलोमीटर्सचा प्रवास (चार + चार = आठ तास) करावा लागणार.
२. त्या ठिकाणी अर्थातच लँडिंग करता येणार नसल्याने परतीचे फ्युएल निघतानाच घ्यावे लागणार. तसंच तिथे शोधकार्यासाठी उडत राहण्याचं फ्युएलही निघतानाच घ्यावं लागणार. याचा अर्थ परत येण्याची शाश्वती हवी असेल तर शोधविमानाला तिथे संशयित घटनास्थळी शोध घेण्यासाठी एका खेपेत फार कमी वेळ मिळणार. (सध्याची काही शोधविमानं तिथे दोन तास(च) घिरट्या घालू शकताहेत.
३. तिथे विमानाने शोधकार्य करण्यात आणखी अन मुख्य अडचण अशी की विमानाला हेलिकॉप्टरप्रमाणे स्थिर तरंगत राहून एका विशिष्ट जागेचे जवळून निरीक्षण करता येत नाही. शिवाय हेलिकॉप्टरप्रमाणे विमानाला दोरी खाली सोडून लटकता मनुष्य उतरवता येत नाही.
४. हेलिकॉप्टर्स या ठिकाणी स्वतः उडत पोहोचणे विमानापेक्षा आणखी कठीण. कारण हेलिकॉप्टर्सचा वेग विमानापेक्षा फार कमी असल्याने तिथे पोचायला आणखी बरेच तास लागतील, आणि इंधन खाण्याची हेलिकॉप्टरची भूक अन रेंज पाहता एकाच फ्युएलिंगमधे हेलिकॉप्टर्स इतका लांबचा प्रवास येऊन जाऊन करु शकतील हे शक्य दिसत नाही.
५. म्हणजेच मोठ्या बोटी हाच पाण्याच्या पृष्ठभागालगत अनेक दिवस स्थिर राहून शोध घेण्याचा मार्ग आहे. मोठ्या लष्करी बोटीवरुन हेलिकॉप्टर्स आणि काही विमानं टेकऑफ / लँडिंग आणि इंधन भरणे या गोष्टी करु शकतात.
६. या ठिकाणी बोटी पोहोचण्यासाठी अनेक दिवस लागतील. योगायोगाने त्याच भागात सध्या असलेली नॉर्वे देशाची कमर्शियल बोट शोध घेतेय, पण ती या कामासाठी खास बनलेली बोट नाही.
७. समुद्राची खोली या ठिकाणी अंदाजे १३००० ते १६००० फूट आहे. बोटी त्या ठिकाणी पोहोचल्या आणि प्रत्यक्ष शोध सुरु झाला तरी विमानाचा ब्लॅक बॉक्स त्या अवशेषांच्या ठिकाणी बुडलेला असेलच अशी शक्यता कमी आहे. तरंगणारे अवशेष एव्हाना भरकटत मूळ ठिकाणाहून बरेच दूर आले असणार. त्यामुळे ब्लॅक बॉक्स नेमका कुठे बुडला ते कळणं फारच कठीण आहे.
८. वर दिलेल्या सर्व गोष्टी या एका गृहीतकावर अवलंबून आहेत. ते उपग्रहाला दिसलेले अवशेष प्रत्यक्षात शोधपथकाला डोळ्यांनी दिसले आणि ते MH370चेच अवशेष आहेत हे सिद्ध झालं तरच या सर्व गोष्टी अ‍ॅप्लिकेबल आहेत. आजरोजी अजून तरी प्रत्यक्ष त्या ठिकाणी असे अवशेष सापडलेले किंवा दिसलेले नाहीत. उपग्रहाने डिटेक्ट केलेली ती चित्रं पाच दिवसांपूर्वीची आहेत.

इतक्या दूरवर हे विमान नेऊन कोसळवणे (किंवा इतक्या दूरवर ते विमान जाऊन कोसळणे अशी शब्दरचना करता येईल..) म्हणजे घोस्ट फ्लाईट (पायलट्स / पॅसेंजर्स मृत किंवा बेशुद्ध असणे, आणि विमान सरळ रेषेत उडत राहणे) किंवा पायलटची आत्महत्या इतकेच पर्याय मलातरी दिसतात. बाकी कोणत्याही मेकॅनिकल किंवा अन्य फेल्युअरने हे होऊ शकणं माझ्यातरी विचारकुवतीपलीकडचं आहे.

घोस्ट फ्लाईट किंवा आत्महत्या या दोन्हीमधे विमान इंधन संपेपर्यंत ऑटो पायलटवर उंची मेंटेन करुन सरळ उडत राहतं. इथे मात्र विमानाकडून मार्ग आणि उंचीही -खाली आणि परत वर- बदलत गेल्याचे रिपोर्ट आहेत. यापैकी एक गोष्ट चुकीची आहे हे नक्की.

हे अवशेष जर खरंच MH370चे निघाले तर ही आतापर्यंतची विमानविश्वातली सर्वात गूढ घटना आणि सर्वात लांब फ्लाईटपाथ डायव्हर्जन असेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जर त्या पायलट नी मुद्दाम हे विमान पळवले असेल तर तो नक्कीच असल्या ठिकाणी जाणार नाही. आणि काही अपघात असेल तरी पण ते विमान इतक्या लांब जाणार नाही.
हे अवषेश त्या विमानाचे नक्की नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ते अवशेष कदाचीत लांबवर वाहत आले असावेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

™ ग्रेटथिंकर™