घर बदलणे

घर बदलणे ही किचकट क्रिया आहे. जिथे घर घ्यायचे आहे तिथे जाऊन अगोदर शंभर चौकश्या कराव्या लागतात. मग घर फायनल करायचे. अगोदरच्या घरमालकाला एक दोन महिन्यांची नोटीस द्यावी लागते. तारीख ठरवावी लागते. दुसर्‍या घरमालकाशी करार करावा लागतो. त्याचे रजिस्ट्रारकडे पंजीकरण करावे लागते. पहिल्या घरातून टीव्ही, ए सी, आर ओ, इ इ उतरावून ठेवावे लागते. पहिल्या घरात पंखे होते, दुसर्‍यात नाहीत, ते घ्या. पडदे घ्या. ट्रान्सपोर्ट ठरवावा लागतो. कुठे गॅस असतो तर कुठे पी एन जी. ते पहावे लागते. मुलाला नविन शाळेत अ‍ॅडमिशन द्यावे लागते. त्याच्या प्रवासाची वेगळी व्यवस्था लागली तर ती पाहावी लागते. गुंतवणूक, बॅ़ंक, विमा येथे पत्ता बदलावा लागतो. लँडलाईन फोन अगोदरचा परत द्यायचा. दुसरीकडे नवा घ्यायचा. ब्रॉडबँडचेही तेच. पीठे, मसाले वाहून नेण्यापूर्वी कोंबावे लागतात. मोबाईलच्या बिलांचा पत्ता बदलावा लागतो. मागच्या घरी पाण्याची मोटार, टंकी लागत असली आणि नव्या घरात लागत नसली तर तिचे काय करावे हा प्रश्न येतो. अग्रवालसारखा पॅकर नेमावा तर दिल्लीतल्या दिल्लीत ३० किमी घर शिफ्ट करायला तो ७०,००० रु मागतो. म्हणून कामे सुटी सुटी करून घ्यावी लागतात. एखादे फर्निचर तुटतेच. काही सामान राहून जातेच. टाटा स्काय काढून घ्या, दुसरीकडे लावा, दोन्ही वेळी त्याला बोलावा, ६०० रु अत्यंत फालतू कामाला द्या, हे भोगावे लागते. कामवाली बाई नवी पाहावी लागते. गाडी साफ करणारा नवा पाहावा लागतो. नवी जागा मिळवून देणार्‍या एजंटला एक दोन महिन्याचे भाडे फी म्हणू द्यावे लागते. नविन घराचे डीपॉझिट कधी दुप्पट असते तर कधी दहापट. नव्या परिसरात बाजार, सर्विस शॉप, माळी, इलेक्ट्रीशिअन, इ नव्याने शोधावे लागतात. हे झाले शहरात स्थलांतरण.
दुसर्‍या गावी जाताना, आपण स्वतः अगोदर स्थिर होणे नि मग कुटूंब आणणे हा एक प्रकार करावा लागतो. स्पाउअसच्या नोकरीचा वांदा होऊ शकतो.
दुसर्‍या देशात जाताना तर प्रचंड भोग असावेत. दोन वर्षाखाली मी इंडोनेशियाला शिफ्ट करणार होतो. बर्‍यापैकी सिरिअस विचार होता. तोपर्यंत मी केवळ अमेरिकेच्या एकदोन व्हिसाप्रकारांचे नावे जाणून होतो. इंडोनेशियाच्या व्हिसा फॉर्म्यलिटीज पाहून दडप्पून गेलो. यातला मला करायचा भाग खूप कमी होता तरी. माझे भारतात घर नसताना, सामान कोठे ठेवणार?
नोकरी सोडून दुसर्‍या नोकरीसाठी घर बदलणे अजून कर्मकठीण. असो.

मी अजून ४०चा नाही, पण जन्मापासून आजपावेतो माझे स्वतःचे आणि माझ्या पालकांचे (कारण नेहमीच त्यांच्या सोबत राहत नाही, पण ते घर माझेच मानतो.) मिळून ५५ वेगवेगळे पत्ते झाले. माझा मोठा भाऊ आणि मी मिळून इतके पत्ते मोजले नि अवाक झालो. तीन वर्षापूर्वी एरवी मोकळ्या गुरगावात राहत असताना मी काय दुर्बुद्धी सुचली आणि चक्क जुन्या दिल्लीत (ऑफिस ४५ ऐवजी ८ किमीवर पडते म्हणून्)शिफ्ट झालो. अर्थात हा भाग नेमका जुन्या दिल्लीत नाही, पण विधानसभा, सिविल लाईन्स आणि दिल्ली विद्यापीठ यांच्या रम्य परिसराच्या शेजारीच आहे. म्हणूनच मी इथे शिफ्ट होण्यासाठी फसलो. आता पुन्हा इथे प्रचंड वाढलेल्या रहदारीमुळे, बेशिस्तीमुळे वैताग वाढला आहे आणि पुन्हा शिफ्ट करायचा विचार मनात डोकावत आहे. शिवाय गुरगावच्या गेटेड, कॉस्मो कम्यूनिटीत राहून उत्तर दिल्लीच्या विचित्रशिक्षित, अतिश्रीमंत, व्यापारी राहणे वेगळेच वाटू लागले आहे. नोएडाच्या एका गेटेड कम्यूनिटीत घर पाहून आलो आणि मानसिक द्विधा प्रचंड वाढली आहे. त्यानिमित्ताने मी मागे पाहून विचार केला तेव्हा असे जाणवले कि घरे (आणि नोकर्‍या) बदलणे has immense economic cost. याच्याने नाती पण affect होतात, पण तो भाग वेगळा.

माझे घर बदलण्याबद्दलचे अनुभव, मते आहेत आणि तुमचीही असतील तर ऐकायची इच्छा आहे.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
3
Your rating: None Average: 3 (1 vote)

घर बदलताना एक मोठी अडचण असते ती नव्या घराच्या निवडीबद्दल. अगदी घर कोणत्या परिसरात असावे यापासून घरात मतभिन्नता आढळते. नवर्‍याच्या, बायकोच्या कि मुलाच्या शाळेजवळ कि मध्येच? ते एकदा ठरले कि ते कोणत्या मजल्यावर असावे, किती खोल्यांचे असावे, इ इ. म्हणजे नवर्‍याला प्रचंड आवडलेले व्यवस्थित घर बायको केवळ भिंतीतली कपाटे नाहीत म्हणून व्हेटो करून लावते. कोणाला सोसायटी कशी आहे याचे जास्त पडलेले असते (स्विमिंग पूल आहे का) तर कोणाला इंटेरिअर कसे आहे ते पडलेले असते. घर पाहणारांत यामुळे एकमत व्हायला बराच वेळ लागतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

द पॅराडॉक्स ऑफ चॉईस.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कितने सामान कर लिये पैदा
इतनी छोटीसी जिंदगी के लिए ।

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

व्वा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

हजारो यादें लिपट के रोती है
जब कोई शख्स घर बदलता है

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

व्वा

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

मला घरे, व्यक्ती दोन्ही पटकन आवडत नाहीत. आवडली की इतक्या सहज सोडवत नाहित.
त्यामुळे दोन्हीचा संग्रह अगदी मोजका. घर तर एकच - केवळ रहाते. त्यामुळे यावर फारशी मते नाहीत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

माझं उलट असावं.
मी व्यक्तींना किंवा घरांनाही फारसा आवडत नाही. मी आवडलो की त्यांना मला सोडवत नाहित.
त्यामुळे दोन्हीचा संग्रह मोजका. म्हणजे अ‍ॅट अ टाइम मोजका.
आज हिनं entertain केलं; हिच्यासोबत.
हिनं हाकललं मग दुसरीकडे approach केलं.
हेच घराबाबत. मी कुठेही स्थिर व्हावं म्हटलं की गाढवाच्या शिंगानं लिहिली गेलेली आमची नियती भाल्तीकडेच आमची ट्रान्सफर्/बदली करते.
मग जिथं राहतो ते गैरसोयीचं व्हायला लागतं.
थोडक्यात, मी व्यक्तींना काय , घराला काय दरवेळी जोडून घ्यायला जातो.
पण इतर व्यक्ती व घर हेच मला दरवेळी हाकलून लावतात राव.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

आज हिनं entertain केलं; हिच्यासोबत.
हिनं हाकललं मग दुसरीकडे approach केलं.

कुणाला तरी हे वाचायला द्यावे अशी शिफारस करतो Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

आता काय सिच्यूएशन आहे पहा-

नवे घर-
१. मूलाची शाळा खूपच अव्वल, सोसायटीच्या दारात (सकाळी ८ ला जाऊन २ ला घरी)
२. सोसायटी हाय्-फाय (डबल सेक्यूरीटी,सर्व स्पोर्ट्स, स्विमिंग, क्लब, जिम, फोटोजेनिक पार्क)
३. स्वच्छता - जुन्या घराचा परिसर नेहमी बांधकाम चालल्याने आणि जनरलच घाण आहे.
४. मोकळेपणा - मोकळे रस्ते, जवळजवळ शून्य रहदारी, पार्क्स, इ
५. सोसायटीत मूलभूत सुविधा (याची प्रचंड किंमत करता येते.)
६. सोसायटीत माझ्या क्लासचे (नोकरी करणारे, बाहेरून आलेले) लोक आहेत. याच्यामुळे पुन्हा ऑफलाईन मित्र मिळण्याची शक्यता.
७. पण ऑफिसपासून चांगले ३० किमी दूर, एकेरी प्रवासाचा वेळ ५० मिनिट
८. आजूबाजूला घरगुती सोयी कमी. सगळ्याच सोयी दूर. सोसायटीच्या बाहेरचा परिसर विरळ, कदाचित (पायी, इ)असुरक्षित
९. घर खूपच लहान, २ बीएचके फक्त ९०० चौरस फूट कार्पेट एरिया
१०. केवळ बोलावली टॅक्सी उपलब्ध होणार. इतरत्र आपली कारच/दुचाकी इच वापरावी लागणार.
जुने घर
१. घर मोठे आहे
२. आजूबाजूला सर्व सोयी आहेत, सोसायटीत एकही नाही.
३. ऑफिसपासून ८-१० किमी, प्रवासाचा वेळ ४५ मिनिट. दोन्ही कडे वेळ सारखाच लागत असला तरी इकडे पेट्रोल कमी लागते/लागत असावे.
४. परिसर अशक्य गर्दीचा, मला प्रचंड नावडता
५. सेक्यूरीटी कमी वा नाही
६. भेटीस येणारांना सोपे, जवळ व साधने उपलब्ध असलेले. विमानतळ, रेल्वे स्टेशन, पासून जवळ. पण आमच्याकडे महिन्यात एकच भेटकर्ता/पाहुणा असतो.
७. सेवांचा दर्जांचा बेकार. उदा. गेल्या ३ वर्षांत ३-४ प्रकारचे नेट कनेक्शन घेतले. कोणतेच समाधानकारक रित्या चालत नाही. नेहमी कट होते. बदलावे लागते.
८. वीजपुरवठा अत्यंत रिलायेबल. नव्या ठिकाणी पावर बॅकअपचे अधिकचे पैसे.
९. शेजार अत्यंत भिकार. सगळे निर्वासित पंजाबी, एकमेकांत घट्ट विणलेले लोक. नव्या कॉलन्यांमधले कॉस्मो लोक मिसळतात तसे वातावरण नाही.
१०. पार्किंगचे प्रचंड वांधे
११. मुलाची शाळा समाधानकारक नाही. नव्या शाळेच्या तुलनेत कँपस अगदीच भकास वाटला. इथेच शिफ्ट व्हायच्या भावनेने उचल खाल्ली. घरापासून १० किमी पेक्षा जास्त. मुलगा ७ वाजता जाउन ३.४५ ला परत घरात.

द्विधेचे मुद्दे.
१. ३० किमी * २ , म्हणजे रोज ६० किमी आणि १ तास ४० मिनिट किमान गाडी चालवायचा पेशन्स माझ्यात बहुधा नसावा. असला तरी लवकरच नष्ट होण्याची शक्यता. दुसरीकडे कंजेस्टेड एरियात राहून जीव गुदमरतो. बाहेरदेखिल पडावे वाटत नाही.
२. पण नव्या घरात त्याच किमतीत अनेक सुविधा आहेत आणि जुन्या घरात क्षेत्रफळ बर्‍यापैकी जास्त आहे.
३. नोकरी बदलावी लागली तर शिफ्टींगचा खर्च फुकट जाईल. दिल्ली मला अगोदर फार आवडे. पण आता राष्ट्रीय राजधानी क्षेत्राची लोकसंख्या ३ करोड झाली आहे आणि त्याचे परिणाम सगळीकडे दिसू लागले आहेत. पण नोकरी बदलण्याबाबतची अनिश्चितता असते ती आहेच. आणि नवी नोकरी नव्या घराजवळच लागायची शक्यता खूपच कमी.
४. सामान हलवणे आणि एजंटची फी या संक कॉस्ट आयुष्यात इतक्यांदा (२००६ पासून ७दा) वेचल्या आहेत कि ...नको वाटते. सर्व सेट अप नव्याने करायचा... नको वाटते.

आठवड्यापासून मी आणि बायको चर्चा करतोय. दोघेही कितीदातरी फ्लिप फ्लॉप करतोय. मुलाचे नव्या शाळेचे अ‍ॅडमिशन फिस भरून येत्या शनवारी फायनल करायचे आहे, नाहीतर मग तीही जागा जाईल.

आता हे सगळं इथे लिहायचं एक कारण आहे. समजा दोन्ही ऑप्शन्स कॉस्ट न्यूट्रल आहेत, तर आपण काय केले असते? I mean as your personality goes? अजून कोणती माहिती आवश्यक आहे का निर्णय घ्यायला?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

"आपण काय केले असते" याचे उत्तर
मी घर बदलले नसते, असे आहे.

आहे तिथे सौ. वहिनी खुश आहेत असे वाटते. जरा त्यांचे ऐका. घरात त्या रहातात. तुम्ही नाही.

तुम्ही स्वतः दिवसभर हापिसात अन घरी असलात तर काँप्युटरला चिकटून अस्ता. त्यामुळे ऑफलाईन फ्रेंड्स वगैरे काही सांगू नका.
गर्दीचा एरिया हीच मुळात सिक्युरिटी असते, त्यामुळे इथे गर्दी आहे, सिक्युरिटि नाही, या वाक्याला अर्थ नाही.
वीज रिलायेबल आहे हा फायदा कमी वाटतो तुम्हाला???

"आजूबाजूला सर्व सोयी आहेत, सोसायटीत एकही नाही." हे तुम्हीच लिहिलेय ना??

>.(२००६ पासून ७दा) << ७ वर्षांत ६ घरे ऑल्रेडी?? अहो, २०१४ जस्ट सुरू होतंय!
माफ करा,
मला तरी वाटते, तुम्हाला घर बदलायची ओसीडी आहे. नैतर वयाला ४० वर्षे झाली नाहीत अजून अन ५५ घरे//पत्ते?? दर वेळीच काय घर मालक ११ महिन्याचा करार पाळायला भाग पाडतो की काय तुम्हाला?? नक्की करता काय तुम्ही असं?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-: आमचे येथे नट्स क्रॅक करून मिळतील :-

सल्ल्याबद्दल धन्यवाद.

नैतर वयाला ४० वर्षे झाली नाहीत अजून अन ५५ घरे//पत्ते?? दर वेळीच काय घर मालक ११ महिन्याचा करार पाळायला भाग पाडतो की काय तुम्हाला?? नक्की करता काय तुम्ही असं?

मला घरे बदलायची हौस नाही. लाईफ circumstances. आणि माझ्या आणि आईवडलांच्या दोहोंच्या सर्व पत्त्यांचा समावेश आहे. हे अति आहे हे मान्य, पण सच्चाई आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

निर्णय कठीण आहे.

मला प्रशस्त घरे आवडतात. शेजार आपल्या हातात नसतो (त्या छान सोसायटीतही नेमका तुमचा शेजार वैट्ट निघाला तर काय कराल?)
दुसरे असे की मला शाळा हा प्रकार एका पातळीपेक्षा अधिक महत्त्वाचा वाटत नाही. मुलांना शिकायचे तर ते कुठेही चांगले/वाईट शिकु शकतात. त्याची प्रोबॅबिलीटी शाळेमुळे प्रचंड प्रमाणात बदलत नाही. शाळेत शिक्षकच येत नाहीत किंवा शिकवतच नाहीत, मुलांना घरची कामे करायला लावतात वगैरे असे काही असेल तर बाब वेगळी.

फक्त या परिस्थितीत माझ्यासाठी द्वीधेचे केवळ एकच मुद्दा आहे: मलाही शांतता महत्त्वाची वाटते. गजबजाटात मी फार राहु शकत नाही.

पण बाकी अनेक गोष्टींकडे पाहुन मी बहुदा घर बदलले नसते. खास करून केवळ शांततेसाठी, मुला-बायकांच्या सवयीच्या भागातून काढून दूर एकांड्या लहान घरात रहायला गेलो नसतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

शाळेत शिक्षकच येत नाहीत किंवा शिकवतच नाहीत, मुलांना घरची कामे करायला लावतात वगैरे असे काही असेल तर बाब वेगळी.

नाही हो. असा प्रकार मुळीच नाही. जुनी शाळा चांगलीच आहे पण नवी शाळा अतिच चांगली आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मी घर बदलले नसते!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

मुख्य कारण?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

तुम्ही सांगितलेले नवीन घराबद्दलचे मुद्दे:
१. मूलाची शाळा खूपच अव्वल, सोसायटीच्या दारात (सकाळी ८ ला जाऊन २ ला घरी)
- ही नवीन शाळा आहे, अजून बदलली नाहीये. करेक्ट? त्याचे आत्ताच्या शाळेत मित्र असू शकतात, तो तिथे आधीच रमलेला असू शकतो
२. सोसायटी हाय्-फाय (डबल सेक्यूरीटी,सर्व स्पोर्ट्स, स्विमिंग, क्लब, जिम, फोटोजेनिक पार्क)
- वाप्रणार आहात का या सगळ्या गोष्टी?
३. स्वच्छता - जुन्या घराचा परिसर नेहमी बांधकाम चालल्याने आणि जनरलच घाण आहे.
- आजू बाजूला मोकळी जागा असेल तर नवीन ठिकाणी पण बांधकामे सुरू होणार नाहीत कशावरून?
४. मोकळेपणा - मोकळे रस्ते, जवळजवळ शून्य रहदारी, पार्क्स, इ
- हा चांगला मुद्दा आहे.
५. सोसायटीत मूलभूत सुविधा (याची प्रचंड किंमत करता येते.)
६. सोसायटीत माझ्या क्लासचे (नोकरी करणारे, बाहेरून आलेले) लोक आहेत. याच्यामुळे पुन्हा ऑफलाईन मित्र मिळण्याची शक्यता.
- आडकित्ता यांच्या प्रतिसादाप्रमाणे माझे मत, त्यामुळे बाद.
७. पण ऑफिसपासून चांगले ३० किमी दूर, एकेरी प्रवासाचा वेळ ५० मिनिट
- वेळ नवीन आणि जुन्या ठिकाणी तितकाच लागणार त्यामुळे मी याला न्युट्रल मुद्दा म्हणेन
८. आजूबाजूला घरगुती सोयी कमी. सगळ्याच सोयी दूर. सोसायटीच्या बाहेरचा परिसर विरळ, कदाचित (पायी, इ)असुरक्षित
- हे फार वाईट आहे, घरात असणार्‍या माणसाला काडेपेटी आणायला २ किलोमीटर तंगडावे किंवा गाडी काढावी लागणार असेल दर वेळी तर काय उप्योग? आणि त्यात सुरक्षितपणा नसेल तर काय चुलीत घालायची सोसायटीच्या आतील सिक्युरिटी?
९. घर खूपच लहान, २ बीएचके फक्त ९०० चौरस फूट कार्पेट एरिया
- ९०० ला लहान म्हणणे चूक त्यामुळे हा मुद्दा बाद.
१०. केवळ बोलावली टॅक्सी उपलब्ध होणार. इतरत्र आपली कारच/दुचाकी इच वापरावी लागणार.
- पुन्हा अतिशय वाईट मुद्दा. घराबाहेर राहणार्‍या लोकांना फरक पडत नाही पण घरी असणार्‍यांना हे फार गैर्सोयीचे असते

आता तुम्ही सांगितलेले जुने घराचे मुद्दे:
१. घर मोठे आहे
- असलेले वाईट नाही पण तीन माणसांना खरच गरज नसते ७००-८०० चौरस फूट पेक्षा जास्त.
२. आजूबाजूला सर्व सोयी आहेत, सोसायटीत एकही नाही.
- अतिशय उत्तम गोष्ट
३. ऑफिसपासून ८-१० किमी, प्रवासाचा वेळ ४५ मिनिट. दोन्ही कडे वेळ सारखाच लागत असला तरी इकडे पेट्रोल कमी लागते/लागत असावे.
- किंचित चांगला मुद्दा
४. परिसर अशक्य गर्दीचा, मला प्रचंड नावडता
- मान्य पण ही इतकी मोठी गोष्ट आहे का की ज्या साठी बाकीच्या गैरसोयींचे लचांड लावून घ्यावे?
५. सेक्यूरीटी कमी वा नाही
- वरचा मुद्दा ८ पाहा
६. भेटीस येणारांना सोपे, जवळ व साधने उपलब्ध असलेले. विमानतळ, रेल्वे स्टेशन, पासून जवळ. पण आमच्याकडे महिन्यात एकच भेटकर्ता/पाहुणा असतो.
- या मुद्द्याचा निदान मला तरी काही फरक पडत नाही
७. सेवांचा दर्जांचा बेकार. उदा. गेल्या ३ वर्षांत ३-४ प्रकारचे नेट कनेक्शन घेतले. कोणतेच समाधानकारक रित्या चालत नाही. नेहमी कट होते. बदलावे लागते.
८. वीजपुरवठा अत्यंत रिलायेबल. नव्या ठिकाणी पावर बॅकअपचे अधिकचे पैसे.
- उत्तम
९. शेजार अत्यंत भिकार. सगळे निर्वासित पंजाबी, एकमेकांत घट्ट विणलेले लोक. नव्या कॉलन्यांमधले कॉस्मो लोक मिसळतात तसे वातावरण नाही.
- तुम्हाला खरेच गरज आहे का?
१०. पार्किंगचे प्रचंड वांधे
- मान्य पन परत मुद्दा ४ पाहा.
११. मुलाची शाळा समाधानकारक नाही. नव्या शाळेच्या तुलनेत कँपस अगदीच भकास वाटला. इथेच शिफ्ट व्हायच्या भावनेने उचल खाल्ली. घरापासून १० किमी पेक्षा जास्त. मुलगा ७ वाजता जाउन ३.४५ ला परत घरात.
- कँपस पेक्षा शिक्षक वगैरे इतर गोष्टी कशा आहेत?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-सविता
----------------------------
|| स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही ||

धन्यवाद विस्तृत प्रतिसादासाठी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

एवढं सगळ रहाटगाडगं घेऊन घर बदलण्याचा अनुभव नाही. त्यामुळे याविषयी फार बोलु शकत नाही. पण
९. घर खूपच लहान, २ बीएचके फक्त ९०० चौरस फूट कार्पेट एरिया >> ९०० कार्पेटचा २बीएचके लहान वाटतो तुम्हाला??

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

९०० कार्पेटचा २बीएचके लहान वाटतो तुम्हाला??

ते सापेक्ष आहे. मुकेश अंबानीला मुख्यमंत्र्यांचा वर्षा बंगलादेखिल लहानच वाटेल!! Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

गुरगावला असताना १६०० चौ फूट पेक्षा जास्त कार्पेट एरिया असणार्‍या घरांत (रा वर अनुस्वार आहे) ४ वर्षे राहिलो आहे. शिवाय मागे मोकळा (कपडे इ धुण्याचा भाग, पुढे छ्होटीशी बाग). म्हणून ...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

+१
अहो इथे येउन म्हणालात ९०० कार्पेट एरियाचा मालक आहे तर किडन्याप होताल.
मला तर इथे ४३० स्क्वेअर फूट कार्पेट पुरून उरतोय दोघांत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

कार्पेट एवढं आहे म्हणल्यावर घर बरच मोठं असणार, आणि हो ते कार्पेट दोघांना काय बर्‍याच जणांना पुरुन उरेल.

पाटी- हा प्रतिसाद विनोदी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पाटी- हा प्रतिसाद विनोदी आहे.
ROFL

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-मेघना भुस्कुटे
***********
तुन्द हैं शोले, सुर्ख है आहन

Smile
ह्या "मी" नावाच्या आयडीला शिव्याही घाल्ता येत नाहित.
"मी हरामखोर आहे लेकाचा" असं म्हटलं तरी पंचाइत.
भाड्यानं लै डोकं लावून आयडी घेतलाय.
आता खा मनोबा तोंड दाबून बुक्क्यांचा मार.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

उसने खुदखुशी* हि तो कि है फिर ताज्जुब़ कैसा|
प्रतिसाद क़बूल ना हो तो लोग आयडी बॅन कर देते है||

*खुद(मी) को गाली देके खुश होना.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

कुठल्यातरी लंपन-कथेत प्रतिस्पर्धी टिंबचं नाव "माझी टीम" असतं ते आठवलं!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

********
It is better to have questions which don't have answers, than having answers which cannot be questioned.

उगाच आपलं काहीतरी. पुण्यात २ बी एच के घरे ६५० ते १००० चौ फूटाचीच आहेत. जास्त्तीत जास्त घरे ८०० चौ फूटाची आहेत. आणि असे मालक लाखानी असतील.
असो. ऑफिस शहराच्या किनार्‍यावर असेल तर अजून दूर खूप मोठाली घरे खूप स्वस्त असतात. दुर्देवाने ऑफिस शहरात असेल तर जवळपास भाडे प्रचंड असते. आणि घरेही छओटी असतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

५२-५३ साली भारताने दशमान पद्धती स्वीकारल्यापासून क्षेत्रफळ चौरस फूटात मोजणे आणि त्याप्रमाणे व्यवहार करणे हे कायद्यानुसार अवैध ठरते काय?

म्हाडा आणि सिडको यांच्या जाहिरातीत चौरस मिटर वापरलेले असते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0