तंत्र विद्येची ओळख

अति-प्राचीन भारतीय वैदिक परंपरेत चार वेद आणि सहा दर्शने आहेत . परंतु पुराण-काळात म्हणजे इ.स.पूर्व १००० पासून भारतीय अध्यात्माला बदनाम करणारा वामाचारी पंथ अस्तित्वात आला . मूळ तंत्र विद्या ही कुंडलिनी जागरण आणि आत्मसाक्षात्कार /सिद्धी-साधना या उद्दिष्टा साठी होती .परंतु काही स्वार्थी /लबाड आणि आसुरी प्रवृत्तीच्या लोकांनी वामाचारी तंत्र-मंत्र विद्या चा प्रचार-प्रसार केला .

भगवद्गीतेत “दैवासुर-संपद्विभाग-योगात” श्रीकृष्णाने सांगितल्याप्रमाणे “देवांना भजणारे देवतांकडून आशीर्वाद मिळवून कामे पूर्ण करून घेतात ,भूत-पिशाच्च /असुरांना भजणारे भूतांकडून कामे करून घेतात ,आणि मला भजणारे भक्त अंतिम परम-सत्याची उपासना करून माझ्यातच समाविष्ट होतात”. विश्वात सप्त-पाताल आणि सप्त स्वर्ग आहेत ,अशी समजूत आहे .यापैकी सप्त-स्वर्गात देवता /ऋषी-मुनी /पुण्यात्मे राहतात .तर सप्त पाताळात भूत-पिशाच्चे /असुर आणि राक्षस असतात .

वामाचारी तंत्र विद्येत मुख्यता:विश्वातील आसुरी शक्ती चे सहाय्य घेवून आपली विविध कामे करून घेणे असं प्रकार आढळतो . विविध तांत्रिक-मांत्रिक आणि अघोरी बाबा हे स्मशानात साधना करून अश्या दुष्ट शक्तींना वश करून घेतात आणि मग त्या शक्तींना बळी देवून त्याबदल्यात आपली कामे करून घेतात .

तंत्र विद्येत इंद्रजाल नावाची विद्या आहे ,या विद्येद्वारा अनेक प्रकारे शत्रूला त्रास देणे किंवा सुंदर स्त्री ला मोहात पडून वश करणे / पुण्य चोरणे इत्यादी कामे केली जातात .
१ स्तंभन –
२ मारण –
३ आकर्षण-
४ विद्वेषण-
५ उच्चाटन –
६ मोहन [वशीकरण]-

आद्य शंकराचार्य ,चाणक्य आदी थोर समाज-सुधारक आणि संत मंडळीनीही या वामाचारी तांत्रिक परंपरेची वेळोवेळी निंदा केलेली असून वामाचारी तांत्रिक आणि त्यांच्या गिऱ्हाईका ना गुन्हा सिद्ध झाल्यास देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा ही दिल्याचे उल्लेख आहेत.गुरुचरित्र या ग्रंथात जारण--मारण हे अति-निंद्य कृत्य असून ते करणारा नीच चांडाळ योनीत जन्म पावतो असं उल्लेख आहे .

या सर्व काळ्या तंत्र विद्येच्या मुळाशी "सायको-काय्नेसीस"नावाचे शास्त्र आहे . मानवी मन आणि त्याच्या शक्ती /मर्यादा या अनंत आहेत .शास्त्रज्ञांच्या मतानुसार मानवी मेंदूच्या एकूण शक्तींपैकी आपण फक्त १० % शक्ती वापरत असतो .इतर शक्तींचा वापर अज्ञान /विस्मृती आणि भ्रांती यामुळे करता येत नाही .जर विशिष्ट साधना /उपासना किंवा विज्ञान-निष्ठ brainwave entrainment सारखे उपाय केल्यास मेंदूच्या या सुप्त शक्ती जागृत करता येतात .तसे केल्यास मेंदू अधिक तल्लख आणि अंतर्मन अधिक शक्तिशाली बनते .परंतु या शक्तिशाली मनाचा वापर चांगल्या कारणासाठी करायचा कि वाईट? हे शेवटी आपल्या हातात असते .

तर सायको कायनेसीस या शास्त्रात अंतर्मनाच्या अद्भूत शक्तींचा वापर करून भौतिक जगतातील काही वस्तूंवर ताबा मिळवणे शक्य होते. तसेच दुसऱ्याच्या मनावर प्रभाव टाकणे , मृतात्म्याचा माध्यम म्हणून वापर करून काही गोष्टी घडवणे हे शक्य होते.

प्राचार्य अद्वयानंद गळतगे आणि डॉक्टर प.वि.वर्तक यांच्या पुस्तकांमध्ये सदर विषयांची चर्चा आहे .तसेच "मृत्यूनंतरचे जीवन "नामक एका पुस्तकात ही अश्या अनेक गोष्टींचा उल्लेख आहे .

मनुष्य स्वभाव क्लिष्ट आहे. बरेचदा बऱ्याच गोष्टी ज्याला सामाजिक मान्यता नसते, ते करण्याचा कल काही लोकांचा असतो. The silence of the lambs हा सिनेमा बघावा. Dr. Hannibal Lector ची व्यक्तिरेखा खूप उद्बोधक आहे. क्राईम कशाला म्हणावा आणि कशाला म्हणू नये हे वेगवेगळ्या काळात नियम आणि मान्यता वेगळ्या होत्या..

तंत्रात ५ मकारांना मान्यता आहे.
१. मांस
२. मुद्रा
३. मदिरा
४. मैथुन
५. मत्स्य

तसे पहिले तर या वासना किंवा इच्छा प्रत्येकालाच असतात. प्रत्येकाला चमचमीत मांसाहार करावासा वाटू शकतो, दारू प्यावीशी वाटते, मैथुन तर सगळ्यांना आवडतेच, तीच गोष्ट मुद्रा (पैसा) ची.

तंत्रात माणसाच्या या आदिम ओढीचा वापर योग साधण्यासाठी करण्याचा प्रघात आहे. जर जमले तर खूप छान प्रकार आहे. पण बहुतेकदा यातच गुंतून जाणे अधिक बघितले जाते. म्हणून हा मार्ग बहुतेक लोकांना रुचत नाही.. संभोग (मैथुन) हि क्रिया खूप एकाग्रतेने करावी लागते हे प्रत्येक अनुभवी माणसाला ठाऊक असेल. जर एकाग्रता ढळली तर त्रास होतो. जर हि एकाग्रता वापरून विषय बदलता आला (जोडीदाराऐवजी ईश्वर, किंवा इतर कुठला विषय) तर या क्रियेत देखील खूप उत्कृष्ट ध्यान साधता येते.

पतंजली सांगतात कि एकाच विषयावर चित्त एकाग्र करणे म्हणजे ध्यान आणि त्या विषयाशी एकरूप होणे म्हणजे समाधी. जर संभोग करताकरता हे करण्याची कला जमली तर हे शक्य आहे. पण संभोगात दोन जीव असतात आणि दोघेही एकाच मानसिक प्लेन वर राहतीलच याची ग्यारंटी देता येत नाही. जर ती क्रिया आवडू लागली तर मग हे ध्यान राहत नाही.

तीच गोष्ट दारू आणि इतर मादक द्रव्य (अफू, गांजा इत्यादी) यांचे आहे. हे घेऊन ध्यान करायचा प्रयत्न करणारे असतातच. जर कुणी इथे गांजा घेतला असेल तर सांगा, अनुभव काय होता. अर्थात सगळे गांजेकस योगी असतात असे नाही. पण अगदी विरला एखादा योगी असतो जो कधीकधी हे द्रव्य घेऊन ध्यान करतो. पंडित भीमसेन जोशी, असे म्हणतात, कि व्हिस्कीचा एक पेग मारून मैफिलीमध्ये गायला बसत. इथे तो पेग म्हणजे मनातले inhibitions घालवायला वापरण्यात येणारे टूल आहे. तीच गोष्ट गांजा, आणि संभोगाची.

येनकेनप्रकारेण मनाची संपूर्ण एकाग्रता साधायची असेल तर काही लोक काही सपोर्ट वापरतात. हे सपोर्ट योग्य प्रकारे कसे वापरायचे आणि इप्सित समाधी कशी साधायची, या कलेला तंत्र म्हणतात.
ऑड म्हणजे मारामारी, हिंसा, असे काही करणे ज्याने मती "सुन्न" होऊन जाईल (जसे मेलेले मनुष्य खाणे, हत्या करणे इत्यादी) या गोष्टीदेखील बऱ्याच लोकांना शांती देणाऱ्या असतात. कित्येक सैनिकांना "जीव घेणे" आवडू लागते. याचा अर्थ हा नाही कि सगळेच सैनिक असे असतात आणि याचा हा देखील अर्थ नाही कि ते सगळे सैनिक ज्यांना जीव घेण्याची प्रक्रिया आवडते आहे, ते दैनंदिन आयुष्यात लोकांना मारत सुटतात. पण कधीकधी काही लोकांचे मानसिक संतुलन ढळते आणि ते सिरीयल किलर वगैरे होतात. एका सिरीयल किलर ला तीच मानसिक शांती मिळते याचा अर्थ हां आहे कि पण त्याचे संतुलन बिघडले आहे आणि तो आता इतरांसाठी धोका झाला आहे. अघोरी तांत्रिकांचे तेच असते.

इथे किती जणांनी मारामारी केली आहे? किती जणांनी बकरे अथवा कोंबडी कापली आहे? किती जणांनी मेलेल्या कोंबडीचे अथवा बकऱ्याचे मांस कापले आहे आणि धुतले आहे, रक्तात हात माखवले आहेत? किती जणांनी हातात तडफडणारा मासा पकडला आहे? बहुतेक लोकांना जे हि कामे रोज करतात पहिल्या अनुभवानंतर संवेदना बोथट होते नि त्या बद्दल काहीही वाटत नाही. पण काही लोकांना पहिल्या अनुभवाची संवेदना तितकीच, किंबहुना अधिक प्रकर्षाने राहते. हि प्रोसेस ते आधी एन्जॉय करतात आणि नंतर एन्जॉय करणे बंद होऊन यानंतर शांती अनुभवू लागतात. हे लोक प्रमाणाने समाजात कमी असतात म्हणून समाज सुरळीत चालतो.

या लोकांना वाळीत न टाकता यांना त्यांची ओढ "त्यातल्यात्यात" कमी हानिकारक प्रकारे पूर्ण करून समाजाला धोका उत्पन्न होऊ नये हा विचार आपल्या प्राचीन ऋषींनी केला आणि अघोरी प्रकार सुरु झाला. यातले बरेच लोक "ठग" बनत, गुप्तहेर बनत, सुपारी घेऊन किलर बनत आणि हत्या करीत. त्यामुळे राजकीय व्यवस्थेला देखील असली कामे करणारे लोक हवे असत (आणि आजही आहेत). अधिक यांचे मठ दुर्गम जंगलात स्थापन करून यांचा समाजाच्या दैनंदिन व्यवहारात काही त्रास होणार नाही याची काळजी देखील घेतली जाई.

अधिक एकदा समाधी अनुभवता येऊ लागली कि बरेच लोक हि सपोर्ट सिस्टीम वापरायचे सोडून देतात. एकदा कृष्ण दिसला तर कोण वेडा कामिनीकांचनच्या मागे लागेल? तेव्हा हि लोक हे मार्ग वापरणे सोडून द्यायचे. इतर संतुलन ढळलेले लोक राजाकडून अथवा समाजाकडून मारले जात. आणि ज्यांनी वेळेत सगळे धरले आणि वेळेत सास्गले सोडले आणि धरताना अगर सोडताना संतुलन ढळू दिले नाहीत, ते योगी म्हणवतात.

नवनाथांची यांची चरित्रे वाचल्यास जाग मच्छिंदर गोरख आया, या हाकेतली ओढ काय आहे ती लक्षात येईल.. तंत्रमार्गाबाबत एक गोष्ट लक्षात घ्यायची असते कि हे एक "तंत्र" आहे. एक टेक्निक आहे. योग हे देखील एक तंत्र आहे. तंत्र मार्ग सांख्य आणि योग यांपासून खूप प्रभावित आहे.

ज्या विषयावर ध्यान करतोय त्याशी एकरूप होणे म्हणजे समाधी आणि त्या ओघात "मीपण" विसरून तो विषय होऊन जाणे म्हणजे योग. योग शब्दाचा अर्थ "मिलन" आहे, एकरूपता आहे.

जर ड्रायविंग करीत आहात, तर त्या क्रियेशी इतके एकरूप व्हायचे कि कालांतराने चालक आणि वाहन यांच्यातील द्वैत नाहीसे होऊन दोघेही एकरूप होणे, हा झाला "सारथ्ययोग".

तीच गोष्ट प्रेमाची, कर्माची, भक्तीची. हे एकरूप होता आले, स्वत्व विसरता आले कि विषयात कौशल्य प्राप्त होते, म्हणून गीतेत कृष्ण म्हणतो 'योगः कर्मसु कौशलं"..

हा योग साधणे हेच तंत्राचे देखील साध्य आहे. कुणाला सिद्धी हवी कि मुक्ती हवी, जो जे वांछील तो ते लाहो. त्यामुळे जर कुणी हि टेक्निक चुकीच्या साध्यासाठी वापरली तर दोष टेक्निक चा नाही, तर वापरणाऱ्याचा. ज्ञानेश्वर, निवृत्तीनाथ, टेंबेस्वामी, इतर नवनाथ, चांगदेव, इतर खूप असे योगी जे प्रसिद्ध नाहीत, त्यांनी हीच टेक्नीक मोक्षासाठी वापरली जाणतेपणी.

कित्येक संत देखील अजाणतेपणी हीच टेक्निक वापरत. माती मळणारा गोरा कुंभार इतका तल्लीन होऊन गेला कि पायाखाली मुलगा तुडवला गेला याकडे लक्ष नाही. तो राहिलाच नव्हता मुळे, माती, तो, आणि सर्व जग विठोबा झाले होते. हा क्षण म्हणजेच योग. आणि या क्षणापर्यंत गोराकुंभार ज्या टेक्निक ने पोहोचले, ती टेक्निक म्हणजेच योग आणि तंत्र. हे त्यांना माहिती होते कि नाही माहिती नाही. पण प्रोसेस हीच ती..

आधी अनुभव घ्यावा. आणि उचित साध्य मिळवायला जर स्वभाव अनुरूप असेल आणि रुची असेल तर तंत्र अंगीकारावे. ते सगळे लोक ज्यांनी उत्कटतेचा एक क्षण देखील जीवनात अनुभवला आहे ज्यात ते त्यांचे स्वत्व विसरले आहेत, त्या सगळ्या लोकांनी तो क्षण जाणते अगर अजाणतेपणी योगाचे तंत्र (योगाची टेक्निक) वापरून अनुभवला असतो. इतर बहुतेकांच्या सबंध आयुष्यात तो एक उत्कट क्षण कधीच येत नाही.

तर मंडळी आपण तंत्र विद्येचा आढावा घेत आहोत,बर्याच जिज्ञासू लोकांनी अधिक मोठे लेख लिहिण्या विषयी सांगितल आहे ,परंतु कार्य-बाहुल्या मुळे ते शक्य होत नाही...नंतर सर्व भाग एकत्र प्रकाशित करेन...
तर या तंत्रा मध्ये एकटोप्लाझ्म नावाच्या द्रव्याची विशेष महती आहे . एकटोप्लाझ्म नावाचे द्रव्य मानवी शरीरा सभोवती लपेटलेले असते .ज्याला ऑरा असे म्हणतात .हे द्रव्य अतिशय विरळ असून ते वायुरूप असते . या द्रव्यला जीव-द्रव्य असेही म्हणतात .

निरोगी व्यक्तीचा ऑरा चांगला सशक्त/ शुभ्र असतो ,तर एखादा किंवा अनेक शारीरिक/मानसिक रोग झालेल्या व्यक्तीचा ऑरा हा निर्बल व काळपट/पिंगट असतो

जगात अनेक ठिकाणी अनाकलनीय रोगांचे निदान करण्यासाठी / आध्यात्मिक रोगांचे निदान करण्यासाठी ऑरा रीडिंग चा आधार घेतला जातो .

तर पूर्वोल्लेखीत वामाचारी दुष्ट तान्त्रीकाना या एकटोप्लाझ्म मध्ये फार रस असतो . दुसऱ्या व्यक्तीचे एकटोप्लाझ्म पळवणे /त्यासाठी ऑरा वर हल्ला करणे यासाठी ते नानाविध उपाय योजत असतात .

हे सर्व प्रकार जाणीवेच्या निराळ्या पातळीवर घडतात ज्याला astral world असे नाव आहे. भारतीय आध्यात्म-शास्त्रात त्याला भुवर्लोक असे म्हणतात .

अमेरिका-स्थित डॉक्टर ब्रूस गोल्डबर्ग या शास्त्रज्ञाने लिहिलेल्या self-defense from psychic attacks या पुस्तकात या प्रकार बाबत सविस्तर चर्चा केलेली आहे .

तर हे शाक्त तांत्रिक रात्रीच्या वेळी व विशेषत: पहाटे सूक्ष्म-देहाने संचार करून लोकांचे व मृतात्म्यांचे एकटोप्लाझ्म पळवतात .त्यासाठी आपले भूवर्लोकीय पातळी वरील गुंड-मवाली त्यांनी पाळलेले असतात .यालाच astral group किंवा underworld असे म्हणतात .व या गुंडाना energy vampires अशी संज्ञा आहे .

हे मवाली जिवंत व मृत अशा दोन्ही प्रकारच्या व्यक्तीचे एकटोप्लाझ्म पळवतात , त्यासाठी ते स्मशानात जावून तेथील मृतात्म्यांना वश करून त्यांचे जीव-द्रव्य पळवतात

तंत्र आणि अध्यात्म यातील मोठा फरक म्हणजे नीतीमत्ता .खऱ्या आध्यात्मिक सद्गुरुंकडे नीतीमत्ता ,माणुसकी,,दया-क्षमा -शांती आढळते ,पण या दम्भाचारी तांत्रिक गुरूंच्या ठायी नीतीमत्ता आणि इतर सद्गुण औषधालाही सापडणार नाहीत .

खरे सद्गुरू शिष्याच्या अहंकाराचा विलय करून त्यास ईश्वर-चरणी स्थिर करतात ,तर हे दांभिक गुरु शिष्याच्या/गिऱ्हाईकाच्या अस्मितेवरच हल्ला करून त्याचे व्यक्तिमत्त्व नासवून टाकतात .त्याला एक बाहुला बनवतात ,जो कथित गुरूच्या लहरीवर अवलंबून राहील ,त्यासाठी वशीकरण आणि तत्सम साधनांचा वापर केला जातो.

साधक हा अहंकार आणि काम-क्रोध-लोभ-मद-मोह-मत्सर या विकारांपासून मुक्त असावा अशी आध्यात्माची पहिली गरज आणि पात्रता असते ,परंतु तंत्रात द्वेष,मत्सर,दंभ आणि अहंकार यांनी लडबडलेले गुरु आणि शिष्य ठायी-ठायी आढळतात .तंत्राचे सगळे विधी करण्या मागचे उद्देश दुसऱ्याचे वाईट करणे /लुबाडणे किंवा स्त्रीमोह असेच असतात .

खरा सद्गुरू हा लोकेषणा,वित्तेषणा आणि पुत्रेषणा अशा तीन मोहापासून निर्मुक्त असतो ,म्हणजे त्याला कीर्ती/प्रसिद्धी यांची हाव नसते,,तसेच त्याला पैशाचा मोह नसतो आणि आपल्या पोराबालांचे कसे होई,,? असा स्वार्थ नसतो.असे साईबाबा म्हणत .साईबाबा नी खरा गुरु ओळखण्यासाठी ह्या तीन चाचण्या सांगितल्या आहेत .त्यात आपण कोणत्याही गुरूला पारखून घ्यावे.

स्वार्थ,अहंकार,दंभ,दुराग्रह,हट्ट,दुराभिमान यात गळ्यापर्यंत बुडालेल्या अशा तान्त्रीकाना गुरु म्हणणे म्हणजे भारतीय अध्यात्माचा अपमान आहे .हे नीच आसुरी प्रवृत्तीचे गुंड आपल्या झोटिंग-शाहीने निष्पाप कोवळ्या जीवना नाडत असतात ,यास्तव सावधान !!!!!!!!!!!!!!!!

सदरहू लेख आमचे एक स्नेही जे छोटा भीम या टोपण-नावाने लेखन करतात ,त्यांनी गेल्या वर्षी प्रसिद्ध केलेला आहे. त्यांच्या रीतसर पूर्व-परवानगीने हा लेख इथे देत आहे. धन्यवाद.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
0
No votes yet

अभ्यासपूर्ण, माहितीने ठेचून भरलेला, विद्वत्ताप्रचुर इ इ लेख वाचून मन आदराने इतके भारावले आहे की विच्चारता सोय नाही.

पण अगदी विरला एखादा योगी असतो जो कधीकधी हे द्रव्य घेऊन ध्यान करतो. पंडित भीमसेन जोशी, असे म्हणतात, कि व्हिस्कीचा एक पेग मारून मैफिलीमध्ये गायला बसत. इथे तो पेग म्हणजे मनातले inhibitions घालवायला वापरण्यात येणारे टूल आहे. तीच गोष्ट गांजा, आणि संभोगाची.

अगदी नेमके सांगितलेत. लेखन करताना वाट्टेल तसे काहीही खरडायला माझ्या मनाचा धीर होत नाही. मनातले inhibitions घालवण्यासाठी आता हेच तंत्र योजणार आहे. बं भोले!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

लेखन करताना वाट्टेल तसे काहीही खरडायला माझ्या मनाचा धीर होत नाही. मनातले inhibitions घालवण्यासाठी आता हेच तंत्र योजणार आहे. बं भोले!

लेखन करताना वाट्टेल तसे काहीही खरडण्याकरिता आम्हांस अशा बाह्य उद्दीपनांची आवश्यकता भासत नाही.

- (परमयोगी) 'न'वी बाजू.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आपण (परमगतीस)पोचलेले आहात याबद्दल शंकाच नाही. वरील तांत्रिक माहिती आमच्यासारखा खालच्या पातळीवरच्या मुमुक्षूंसाठी आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्राचार्य अद्वयानंद गळतगे आणि डॉक्टर प.वि.वर्तक यांच्या पुस्तकांमध्ये सदर विषयांची चर्चा आहे .

पहिले नाव कोठेतरी ऐकल्यासारखे वाटते. कोठे बरे?

(बैदवे, 'उडन खटोला' म्हणजे 'विमान'च ना? चूभूद्याघ्या.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पहिले नाव विंग कमांडरांकडून उल्लेखलेले पाहिले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

पहिले नाव विंग कमांडरांकडून उल्लेखलेले पाहिले आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0