डांगर
कधी कधी भाजी उपलब्ध नसल्यास माझी आजी डांगर-भाकरी असा आमचा प्रचंड आवडीचा मेनू बनवायची. हे डांगर आपल्यातल्या बर्याच जणांनी खाल्लंही असेल,
साहित्यः
उडीद डाळ, धणे, भाजलेले जिरे
कृती: (अत्यंत सोपी)
एकदम मंद आचेवर जाड बुडाची कढई ठेऊन त्यात उडीद डाळ खरपूस भाजायला घ्यावी. डाळ पाचेक मिनिटे भाजली गेली की त्यात धणे घालावेत. (धणे भाजले जाण्यास तुलनेने वेळ कमी लगतो म्हणून). डाळ खमंग भाजून झाली की गॅस बंद करुन त्यात भाजलेले जिरे घालावेत आणि उलथन्याने थोडे वर खाली करावे.
हे मिश्रण थंड झाले की मिक्सरला काढून बरणीत भरून ठेवा. ज्यावेळी खायचे असेल तेव्हा या डांगरात दही, फोडणी, कोथिंबीर, मीठ आणि उपलब्ध असल्यास तळलेली भरली मिरची असे सगळे घालून कालवावे.
हा भाकरी बरोबरचा बेत आवर्जून करुन पहाच. आणि मला सांगा आवडला तर.
डांगर पचडी
पाककृतीबद्दल आभार.
फोडणी नक्की कुठली ? तेलातली (मोहरी-हिंग-हळद), की तुपातली (जिरे-हिंग)? या फोडणीसोबत कढिलिंब असतो का ?
---
जालावर शोधले असता 'डांगर पचडी' किंवा 'उरद दाल रायता' या नावाने हा पदार्थ प्रसिद्ध आहे असे दिसते. (डांगर म्हटल्यावर पोह्याच्या पापडाच्या डांगराखेरीज दुसरे चित्र डोक्यात येत नाही) तंजावुरकडचा हा पदार्थ आहे. तुमची पाककृती थोड्याफार फरकाने वापरलेली आहे. दुवा १, २, ३. चित्रेही आहेत.
प्रमाण आणि इतर शंका
अस्मि - दोन वाट्या उडीद डाळ असेल तर पाव वाटी धणे आणि पाव वाटी जिरे.
अमुक - फोडणी तेलाचीच घालावी. तेल, मोहरी, हिंग, कढीपत्ता
डांगर कालवताना आपण बर्याच गोष्टी वापरू शकतो, जसं की मेतकूट, कोथिंबीर किंवा सविता यांनी सांगितल्याप्रमाणे कांदा(कच्चा किंवा तेलावर भाजलेला).
हा प्रकार माझ्या बाबांना फार
हा प्रकार माझ्या बाबांना फार आवडायचा. पण आता फारसा होत नाही. पण आता परत या कृती प्रमाणे करुन बघायला पाहिजे.
यातील उडिद आणि भाजणे यावरुन वाटले की कोणितरी थालिपिठाच्या भाजणीची कृती टाकली पाहिजे. खरतरं बरेचजण टाकू शकतील कारण व्यक्ती तितक्या प्रकृती या न्यायाने घर तितक्या भाजणीच्या कृती इतकी भाजणीची व्हर्जन्स मिळतील.
टोमॅटोचे रायते
टोमॅटो चे रायते (आईचा तोच शब्द होता. हे वेगळे रायते, पंजाब्यांचे दही-रायता नाही) करताना, त्यात मेथीदाणे टाकले म्हणजे करताना, टोमॅटो शिजवताना, लाल तिखट्+गूळ (सॉरी साखर नाही)+मीठ.व मेथीदाणे बस्स!! ओह माय गॉड प्रचंड सुंदर लागतं ते. कडू, गोड, आंबट आणि खारट सर्व चवींनी वर्णी लावलेला साधा पण मस्त पदार्थ आहे तो.
आनि हो कोथिंबिर, हिरवी मिर्ची असे स्वत:ची ठळक चव असलेले पदार्थ घालायचे नाहीत. फक्त ५ चवी लागल्या पाहीजेत - मेथीची कडू + गूळाची गोड +मीठाची खारट + टोमॅटोची आंबट + लाल तिखटाचीच तिखट्
मात्र मेथ्या (मेथीदाणे) अजिबात विसरायचे नाहीत.
         
वाहव्वा
परवाच बचकाभर डांगर खाउन संपवलय.
कुटुंबातील मागच्या पिढीतील स्त्रिया हे मस्त बनवतात आमच्याकडे.
मला डांगर, पूडाचटणी अत्यंत प्रिय.