चपाती "खाण्याचा" कंटाळा आल्यावर करायचे पराठे
साहित्यः
एक वाटी मैदा, एक वाटी गव्हचे पीठ,
ओवा, भजलेले तीळ, जीरे (सर्व १ चमचा)
२ चमचे कसुरी मेथी गरम पण्यात भिजवून
चवीनुसार मीठ, चाट मसाला, तेल, टेबल बटर, पाणी
क्रुती:
मैदा आणि गव्हचे पीठ चाळून घ्या. त्यात ओवा, भजलेले तीळ, जीरे, भिजवलेली कसुरी मेथी, मीठ, पाणी घालून मळून घ्या. मळलेल्या पीठाला थोडे तेल लावून पुन्हा थोडे मळून घ्या. एका ओल्या सुती कापडात हा गोळा गुन्डाळून ठेवा.
तासाभरानी ही कणिक चान्गली भिजेल. आता कणकेचा गोळा करुन मैद्यावर मध्यम आकाराची पोळी लाटून घ्या. त्यावर बोटाने थोडे तेल आणि चाट मसाला लावून घ्या. पोळीची त्रिकोणी घडी करून घ्या. घडी करताना प्रत्येक घडीला मध्ये तेल आणि चाट मसाला लावून घ्या. आता हलक्या हाताने पराठा लाटून घेऊन तो बटर लावून भाजून घ्या.
हे पराठे पन्जाबी भाज्यान्बरोबर मस्त लागतात.
मला इकडे भेटा:
मुलुखगिरी
फोटो चिकटविणे
मला असे दिसते छोटुकलीबाईंचा (वदतो व्याघाताचे उत्तम उदाहरण!) ब्लॉग आहेच आणि तेथे त्या फोटोहि चिकटवतात. तेथे लेख प्रथम प्रसिद्ध करून त्याचे readymade HTML coding तेथून उचलले आणि 'ऐसी'च्या 'लेखन करा'मध्ये चिकटविले तरी सर्व चित्रे येथे दिसतील. ह्याचा आणखी लाभ असा की चित्रे साठवण्याच्या अन्य काही संस्थळांवर विनामूल्य सदस्यांच्या चित्रसंख्येवर बंधन असते तसे येथे काहीच बंधन नाही.
Maida is a finely milled and
Maida is a finely milled and refined and bleached (either naturally due to atmospheric oxygen or using other chemical bleaches) wheat flour
सोपी पाककृती आवडली.
ऐसीवर स्वागत. सोपी पाककृती आवडली.
कसुरी मेथी गरम पण्यात भिजवून
यामागे काही कारण आहे का? मी कसुरी मेथी जेव्हा कमी प्रमाणात वापरते, तेव्हा पाण्यात न भिजवताच वापरते सहसा, म्हणून विचारले.
अतुल ठाकुर, मैदा वगळूनही हे पराठे करता येतील, पण ते दिसायला, चवीला किंचीत वेगळे असतील. त्यांचा पोतही वेगळा असेल.
शंका
मारी आन्त्वानेतबाई माझ्या स्वप्नात येऊन मला "बै ग" कशासाठी म्हणेल? (नाही म्हणजे, आन्त्वानेतबाईने माझ्या स्वप्नात यायला आक्षेप नाही१, पण...)
(बैदवे, आन्त्वानेतबाई "पाव मिळत नसेल, तर केक खा" असे म्हणालीच नव्हती, ते नंतर कोणीतरी तिच्या नावावर उठवून दिले, अशीही एक थियरी वाचण्यात आलेली आहे.)
================================================================================================================
१ माणसाने स्वप्ने नेहमी मोठमोठी२ पाहावीत.
२ इन विचेवर सेन्स ऑफ द वर्ड.
भाषिक अडचण
हो बोलली खरी. 'पार्डन माय फ्रेंच' अशी इंग्रजीतून प्रस्तावना करून उर्वरित सर्व ती फ्रेंचमधून बडबडली. दुर्दैवाने आम्हांस फ्रेंच कळत नसल्याकारणाने आमच्याकरिता ती अगम्य बडबड स्वतःशी केल्यासारख्यातच जमा होती.
अर्थात, आन्त्वानेतबाई जन्माने ऑष्ट्रियन असल्याकारणाने ती जर्मनमधून बडबडली असण्याची शक्यताही अगदीच नाकारता येत नाही; आमचे जर्मनचे अज्ञान आमच्या फ्रेंचच्या अज्ञानाइतकेच अगाध असल्याकारणाने नक्की सांगता येणे आम्हांस अशक्य आहे. केवळ त्या 'पार्डन माय फ्रेंच'वरून आम्ही ती फ्रेंचमधून बोलत असावी अशी अटकळ बांधली, इतकेच. (एलेमेंटरी, माय डियर...)
मात्र, अधिक विचाराअंती, ती त्या वेळी वधस्तभाकडे चालली होती - मच अगेन्स्ट हर ओन विल, ऑफ कोर्स - हे लक्षात घेता, ते 'पार्डन माय फ्रेंच' हे 'त्यांना (पक्षी: तिला वधस्तंभाकडे नेऊ करणार्या त्या फ्रेंचांना) क्षमा कर (कारण ते काय करतात ते त्यांचे त्यांनाच कळत नाही)' अशा अर्थाने घेता यावे किंवा कसे, अशी शंका आता येऊ लागते. ('पार्डन माय फ्रेंच' मधील 'माय'वरून तिला फ्रेंच जनतेबद्दल प्रचंड ममत्व शेवटपर्यंत वाटत होते, आणि/किंवा ती फ्रान्सला 'आपली फ्रेंच मायभूमी' मानू लागली होती, असे निष्कर्षही अर्थात काढता यावेतच.)
मात्र, अधिक विचाराअंती, ती
मात्र, अधिक विचाराअंती, ती त्या वेळी वधस्तभाकडे चालली होती - मच अगेन्स्ट हर ओन विल, ऑफ कोर्स - हे लक्षात घेता, ते 'पार्डन माय फ्रेंच' हे 'त्यांना (पक्षी: तिला वधस्तंभाकडे नेऊ करणार्या त्या फ्रेंचांना) क्षमा कर (कारण ते काय करतात ते त्यांचे त्यांनाच कळत नाही)' अशा अर्थाने घेता यावे किंवा कसे, अशी शंका आता येऊ लागते. ('पार्डन माय फ्रेंच' मधील 'माय'वरून तिला फ्रेंच जनतेबद्दल प्रचंड ममत्व शेवटपर्यंत वाटत होते, आणि/किंवा ती फ्रान्सला 'आपली फ्रेंच मायभूमी' मानू लागली होती, असे निष्कर्षही अर्थात काढता यावेतच.)
यावरून गाळीव इतिहासातील मायदेशावरची पुल-कोटी आठवली.
बाकी आन्त्वानेतबाई स्वप्नात आल्याबद्दल हबिणंदण!!! केक्स ऑल ओव्हर ;)
ऐसीवर स्वागत. पाकृ सोपी
ऐसीवर स्वागत.
पाकृ सोपी सुटसुटीत आहे. करून बघेन बहुदा
पाकृ बरोबर तयार पदार्थाचे फोटोही बघायला आवडतील.
फोटो कसे चढवावेत हा धागा मार्गदर्शन करेलच