आयुष्यावर काही क्षणिका

कमरेच्या दुखण्या मुळे गेल्या काही दिवसांपासून घरीच होतो , बिस्तरावर पडल्या -पडल्या मन स्वैर-भैर भटकत होत. आयुष्य म्हणजे काय एकच विचार मनात येत होता.

जगणे म्हणजे सूर्याचा प्रकाश, दिवस आणि रात्र ... (ब्लोग वर पूर्व प्रकाशित)



(१)

आहे गगनी सूर्य जोवरी
वेचून घ्या आनंदी फुले.

(२)

किती ही जोडा
उरणार शेवटी "शून्य".

(३)

सकाळची चंचलता
दुपारची स्थिरता
सायंकाळची उदासीनता
विराम रात्रीचा.

(४)

अस्ताचलचा सूर्य
रोखण्यास धावतो.
हरणार युद्ध
रोज खेळतो.

field_vote: 
0
No votes yet

प्रतिक्रिया

आहे गगनी सूर्य जोवरी
वेचून घ्या आनंदी फुले.

क्या बात है पटाईतसाहेब Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

संवाद
राजहंसाचे चालणे | भूतळी जालिया शाहाणें | आणिकें काय कोणें | चालावेचिना?

>>आयुष्य म्हणजे काय एकच विचार मनात येत होता. <<
सलील संदीप च्या कुठल्यातरी कवितेत आयुष्य म्हणजे कांदे पोहे म्हटलय ब्वॉ! काय भानगड आहे काही कळत नाही. प्रत्येक जण आयुष्य म्हणजे काहीतरी वेगळच म्हणत असतो. मला तर जन्म व मृत्यु यातील अंतराला आयुष्य म्हटलेल पटत ब्वॉ!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

आहे गगनी सूर्य जोवरी
वेचून घ्या आनंदी फुले.

छान
पण "शून्य" तरी उरेल का?
fact("शून्य") = १ ना ? म्हणून तेही उरणे नाहीच असो... कविता आवडली Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0