एक संवाद
"शुचि तुझी मजा आहे बाई नवीन नवीन पार्ट्या अन सोशल इव्हेंट्स नेहमी एन्जॉय करत असतेस. मला तुझा हेवा वाटतो बरेचदा" - कामिनी
पुढे केलेली पोह्याची प्लेट घेत, गेल्या काही महिन्यभरा तील तीसरे रीपीट वाक्य मला बोलली.
"कामे हजारदा तुला सांगीतले आहे - कितीका उडले तरी मी खरी किंचित पटकन विशवास न टाकणारी अन संषयीच आहे. तुला माझं "मिथुन" लग्न तेवढं दिसतं अन वृश्चिक स्टॅलिअम मात्र तू सोइस्कर रीत्या विसरतेस. ...........लिंबू खोबरं घालून घे." - मी चिडूनच बोलले.
"शुचि तुझा प्रॉब्लेम काय आहे? तुझं मिथुन लग्न मला बरयापैकी आनंदी, फुलपाखरी, स्वच्छंद अन सकारात्मक देणगी वाटते." - कामिनी आपला मुद्दा रेटत अन चमचा तोंडात खुपसत म्हणाली.
"कामि तुझ खरे आहे माझा स्वभाव पहिल्या भेटीत खुपसा उथळ, स्वच्छंद अन फुलपाखरी असा तू म्हणतेस तसा भासतो. अन तशा प्रकारच्या स्वभावाकडे आकर्षित होणारे दिव्य लोक माझ्याभोवती रूंजीही घालतात. पण मी काय म्हटले ते तू ऐकलास का नीट? "भासतो" म्हणजे मी तशी आहे असे नव्हे. लगनराशी ही केवळ मुखवटा असते हे मी तुला सांगायला नको. तेवढं ज्योतिष तू ही जाणतेस. दर वेळी पुढे काय होते तुला माहीती आहे - वृश्चिकेच्या स्टलिअम ने आलेली खोली अन इंटेंसिटी लक्षात येताच बरेच जन टर्न ऑफ़ होतात अन पोबारा करतात." - मी
"पण तू तुझी वृश्चिक बाजू दाखवातेसच कशाला?" कामी नी मठ्ठ गुगली टाकला. एव्हाना पोहे आवडल्याचे तिच्या चेहर्यावर स्पष्ट झळकत होते.
"अगं कशाला म्हणजे काय कामे, मी तशीच आहे. त्यामुळे ते कधीना कधी बाहेर येतच. वृश्चिकेच्या कार्कत्वाखाली येणारे बरेच विषय मला हॉट वाटतात. माझा उपाय नाही." - मी चहाचा कप तिच्याकडे सारत स्पष्टीकरण दिले.
"कोणते विषय?" - कामी विचारती झाली.
"मिस्टीकल, near डेथ, अब्यूस, सेक्शुअलिटी शी निगडीत अशा गंभीर विषयांची यादीच आहे. शिवाय अन्य जलराशीतील ग्रह मदत सोडाच उलट हे विषय हायलाइटच करतात Sad " - मी वैतागने म्हटले.
"वेलदोडा जास्त पडला का ग?" - मी
"नाही! सगळं छान आहे.?" ....कामी विचारती झाली - "शुचि मग दुखते कुठे?"
"कामे प्रथमदर्शनी फुलपाखरी स्वभावाला भुललेले लोक जेव्हा एकेक करून काढता पाय घेतात तेव्हा ही मजा बाहेर निघते. अन म्हणे सकारात्मक जगते मी. तुझ्या नानाची टांग." - मी मोठा घुटका घेऊन म्हटले.
कामीही तशी हुशार आहे. तिने मार्मिक प्रश्न टाकला - "शुचे कोणी वृश्चिक किंवा जल राशीचा मित्र नाही भेटला का मग?"
"माझ्याबरोबर राहून राहून हुशार झालीएस कामे" मी हसत म्हटले. "तसा एक मित्र सापडलाय अन अजून तरी त्याने सुम्बाल्या केलेला नाहीये. पण मी तुला इतक्यात काहीच सांगणार नाही." - (दात काढत) अस्मादिक!
यावर केस उपटत कामी म्हणाली "हेच हेच तुम्हा जल राशीच्या लोकांचे. अर्धवट सांगून उत्सुकता ताणायची अन मग एकदम गप्प होऊन जायचं.
यावर मी म्हणाले "सांगेन गं योग्य वेळ आल्यावर. पण तुझ पटतय आता. I am quite lucky to have this planetary alignment." ......... "कामे लाजते का ग? नीट खा ना, न लाजता ." मी तिला झापत म्हटले.
कामी नी फ़क्त डोक्याला हात लावला.
कल्पना
कल्पना रंजक आहे. ज्योतिषाचे वावडे असेल त्यांनी दूसरा धागा उघडावा
ही सूचना वाचूनही ज्योतिष दोन मिनिटं बाजूला ठेवून वाचलं.
व्यक्ती एकच/तीच; पण सुरुवातीला भेटणारी व्यक्ती आणि नंतर परिचय्-दोस्ती-गट्टी जमणे ह्या सगळ्या पायर्यांदरम्यान भेटत जाणारी व्यक्ती अगदि वेगवेगळी भासू शकते.
व्यक्तीमत्वाचे पापुद्रे उलगडत जातात.
ह्या संकल्पनेवर बरीचशी प्रायोगिक नाटकं पाहिलित पुण्यात. बहुतांश नाटकांची थीम तीच.
काही कारणानं एकांत मिळालेला असतो, दोन व्यक्ती एकमेकांना भेटतात, काही काळ सोबत असतात, नंतर जेव्हा पुन्हा एकमेकांकडे पाह्तात, तेव्हा अगदि सुरुवातीला त्याच्याबद्दल आपला झालेला ग्रह आणि आता दिसणारी ती व्यक्ती ह्यातला बराच फरक जाणवतो.
रोजच्या आयुष्यात पहायचं तर सार्वजनिक आयुश्यात भेटलेली लोकं नेहमी छान, चांगली,सोज्ज्वळ किम्वा हसतमुख वाटतात.
कारण ते पब्लिक डोमेन मध्ये त्यांचय व्यक्तिमत्वाचा तेवढाच भाग येउ देतात.
जशी जशी ओळख वाढेल तसं तसं प्रत्येक व्यक्ती हे वेगळच कॉकटेल आहे; हरेकाची किक भलत्याच ठिकाणी बसते हे जाणवतं.
प्रेमविवाह केलेला असेल तर हा अनुभव येण्याची शक्यता अधिक असते.
अर्थात व्यक्तीमत्वाचा प्रवास नेहमीच हसतमुख्/आपलेपणा वाटेल अशा चेहरयकडून भीषणतेकडे, रौद्ररुपाकडे वगैरे होइलच असे काही नाही.
तसे फक्त आर्ट फिल्म मध्ये होते.
प्रत्यक्षात नंतरचे आणि आधीचे दोन्ही रुपं भावू शकतात.
ह्याबद्दल आतिवास तैंचा एक भारी धागा "वर्तुळ परिघाचं नातं" त्यात त्यांनी चपखल उदाहरण दिलय.
(जावई अधून मधून यावा. त्यानं आपला मान सन्मान करुन घ्यावा हे पारंपरिक घरात पाळलं जातं. तोच जावई फार दिवस सासर्याकडे तेही डिपेंडंट म्हणून राहिला की अंतू बर्वा म्हणतो तसं त्याला "चक्क आळं सारवायला लावतात")
तोच जावई फार दिवस सासर्याकडे
तोच जावई फार दिवस सासर्याकडे तेही डिपेंडंट म्हणून राहिला की अंतू बर्वा म्हणतो तसं त्याला "चक्क आळं सारवायला लावतात"
आळं नव्हे, खळं. खळं म्हणजे घरापुढची जागा. आळं म्हणजे झाडाभोवती बनवलेला नॅनो-खंदक. झाडाला घातलेलं पाणी तिथेच टिकून रहावं, वाहून जाऊ नये म्हणून ते बनवतात.
केंद्र परिघाचं नातं
केंद्र परिघाचं नातं
ह्या धाग्याचा उल्लेख माझ्या प्रतिसादामध्ये आहे http://www.aisiakshare.com/node/860
हे तो जर्दाळूंचे छाटणे/जळो संपादकाचे जिणें
prune 2 (prn)
v. pruned, prun·ing, prunes
v.tr.
1. To cut off or remove dead or living parts or branches of (a plant, for example) to improve shape or growth.
2. To remove or cut out as superfluous.
पहा : (पण खरे म्हणजे आता यापुढे कशाला पहाता.)
काल परत टाईप करता आले नाही
काल परत टाईप करता आले नाही म्हणून लिहीले नाही.
आत्ता लिहीते - पहील्यांदा मी एक व्हर्शन लिहीले. मग त्यात सुधारणा केली. (खरं तर सन्जोप्रावांच्या कथेतील टेक्निक (तंत्र) वापरलं. म्हणजे, लाडू/पोहे वगैरे खातानाचे सूक्श्म नीरीक्षण ज्यायोगे वाचकांना अधिक गुंतवता येते)
पण या व्हर्शनमध्ये - ते ज्योतीष विषयक विधान सुटले :(
_________________
असो ऐसी च्या स्वसंपादन सुविधेचा मी फायदा घेतला. आभारी आहे.

विनंती
'ज्योतिषाचे वावडे' वगैरे तूर्तास मरू द्या, पण कृपया माणसाला समजू शकेल अशा मराठीत या लेखाचे भाषांतर कोणी करू शकेल काय?
(अर्थात, मला व्यक्तिशः काहीच फरक पडत नाही म्हणा. मी तसाही दुसरा धागाच उघडणार आहे. पण तरीही, ही केवळ जनहितार्थ याचिका. धन्यवाद.)