बाबांचे अनर्थयोगशास्त्र
दोन दिवसांपूर्वी बाबा रामदेवांनी एक नवाच बाँबगोळा टाकला. त्यांनी असे सांगितले की सध्या बत्तीस प्रकारचे डायरेक्ट टॅक्सेस आणि पन्नास साठ प्रकारचे इनडायरेक्ट टॅक्सेस यांनी नागरिकांना हैराण केलेले आहे. शिवाय या डोईजड करांमुळे कर चुकवण्याला प्रोत्साहन मिळते, त्यातून भ्रष्टाचार जन्माला येतो आणि काळ्या पैशाचे ढीग तयार होतात, पॅरलल इकॉनॉमी तयार होते. या सगळ्यावर जालिम उपाय म्हणजे सरसकट सगळे कर रद्द करून टाकावेत आणि फक्त एक नवा बँक ट्रँजॅक्शन टॅक्स सुरू करावा. बाबांच्या माहितीप्रमाणे सध्या सगळ्या प्रकारच्या करांमधून जेवढे उत्पन्न सरकारांना मिळते त्याच्या तिप्पट उत्पन्न या एका करामधून त्यांना मिळेल आणि नागरिकांनाही अगदी कमी कर भरावा लागेल. आता जनतेला कर द्यावा लागणार नाही पण सरकारला तो वाढून मिळेल. मग ते पैसे कुठून येणार आहेत? हे गूढ कोण जाणे किंवा ते बाबाच जाणोत. शिवाय ५०० आणि १००० रुपयांच्या सगळ्या नोटा सरळ रद्द कराव्यात. यामुळे देशातला सगळा काळा पैसा अदृष्य होईल. त्याच्या मालकांना परदेशातल्या बँकांमध्ये ठेवलेला पैसा देशात आणावा लागेल आणि तोही सरकारला मिळेल. वगैरे वगैरे.
या विषयावर एनडीटीव्हीवरील अँकर रवीशकुमार यांनी सलग दोन दिवस सकाळी चर्चा घडवून आणल्या. यात काही अर्थशास्त्री, राजकारणी, प्राध्यापक, पत्रकार वगैरेंनी भाग घेतला. खुद्द रामदेव बाबांनीही टेलिकॉन्फरन्सद्वारे त्यात सहभाग घेतला. त्यात त्यांच्या जिलबीसारख्या गोलगोल बोलण्यामधून मला एवढे समजले की त्यांना देशाच्या अर्थकारणात आमूलाग्र बदल करायचा आहे. मोठ्या रकमेच्या नोटा आणि सारे टॅक्स रद्द करायचे, त्यात एक्साइज ड्यूटी, कस्टम्स ड्यूटी, जकात, टोल वगैरे कशातले काहीही शिल्लक ठेवायचे नाही. यामुळे असे होईल की टॅक्स चुकवण्याचा प्रयत्नच कोणाला करावा लागणार नाही आणि त्यामुळे भ्रष्टाचार संपून जाईल. या सगळ्या करभरणीसाठी भरावे लागणारे निरनिराळे किचकट फॉर्म्स भरण्यात आणि त्यावर अपील करणे, कोर्टकचेर्यात खेटे घालणे वगैरेमध्ये जाणारा सगळ्यांचा वेळ वाचेल. सगळ्या वस्तूंच्या किंमती अर्ध्याहून खाली येतील. सगळे लोक सुखी आणि प्रामाणिक होतील. सुराज्य येण्यासाठी आणखी काय पाहिजे?
देशाचे इतके सगळे भले होऊ घालणारी अशी ही अफलातून सूचना असली तरी 'अर्थक्रांती' नावाची मोहीम चालवणार्या संघाचे एक प्रतिनिधी सोडल्यास त्या पॅनेलमधल्या इतर कोणालाही बाबांचे सांगणे मुळीच पटलेले दिसले नाही. कारण सैन्यदल, पोलिस, न्यायदान, शिक्षण, आरोग्यसेवा वगैरे अनेक अत्यावश्यक कामांसाठी सरकारला पैसे कुठून मिळणार असा प्रश्न त्यांना पडला होता. त्यासाठी बाबांच्या या सूचनेला एक पुरवणी होती ती अशी की भारतातल्या प्रत्येक माणसाच्या नावाने बँकेमध्ये खाते उघडायचे, त्याला चेकबुक आणि क्रेडिट किंवा डेबिट कार्ड द्यायचे आणि त्यानंतर त्याने पैशाचे सर्व व्यवहार फक्त बँकांमार्फतच करायचे. युरोपअमेरिकेत सध्या ही परिस्थिती बर्याच प्रमाणात अस्तित्वात आलेली आहे. आपला देश तितका प्रगत झाला तर ती इथेही येणे अशक्य नाही. रामदेवबाबांची सूचना अशी आहे की यातल्या प्रत्येक व्यवहारात (ट्रँजॅक्शनमध्ये) बँकेने दोन टक्के रकम ठेऊन घ्यावी आणि त्यातला काही भाग बँकांनी सरकारला देत रहावे. यामधून सरकारांना पुरेसे पैसे उपलब्ध होतील. समाजामधल्या प्रत्येक व्यक्तीचा पगार, मजूरी, फी, कमिशन वगैरे त्याचे जे काही उत्पन्न असेल त्यातले दोन टक्के वगळता उरलेले ९८ टक्के पैसे थेट बँकेत जाणार. ते खर्च करतांना घरमालक, रेल्वे, बसकंपनी, टॅक्सी ड्रायव्हर, धोबी, न्हावी वगैरेंना तो जितके पैसे देईल, वीज, पाणी, टेलिफोन वगैरेची जी बिले तो भरेल त्या सगळ्यामधले दोन टक्के बँक ठेवून घेईल, बाजारातून जे सामान, ज्या वस्तू तो विकत आणेल त्यांच्या किंमतीमधले दोन टक्के कापून उरलेले दुकानदाराला मिळतील. त्या माणसाने कोणत्याही कारणासाठी आपल्या मुलाला, पत्नीला, भावाबहिणींना किंवा आईवडिलांना पैसे द्यायचे असले तरी ते त्यांच्या खात्यात जमा करतांना त्यातले दोन टक्के बँक कापून घेईल.
म्हणजे नागरिकाने पैसे कमावतांना त्यातले दोन टक्के बँक घेईल त्याचप्रमाणे ते खर्च करतांना ती पुन्हा दोन टक्के घेईल असे असले तरी उरलेले ९६ टक्के त्याच्या खर्चासाठी उरले तरी काय हरकत आहे? इतर कुठलाच टॅक्स भरायचा नसला तर हा सौदा फायद्याचाच होणार हे ऐकायला बरे वाटते, पण ते तितके सरळ सोपे असणार नाही. जे लोक पंचवीस तीस टक्के आयकर भरतात अशा संपन्न लोकांना कदाचित त्याचा फायदा होईलही, पण त्यांची संख्या फक्त २-३ टक्केच असेल. बहुसंख्य जनता सध्या इनकमटॅक्स भरतच नाही, पण त्यांनासुद्धा आता हा बँक ट्रँजॅक्शन टॅक्स मात्र भरावाच लागेल, म्हणजे तो त्यांच्याकडून परस्पर कापून घेतला जाईल. व्यापार किंवा उद्योगधंद्यामध्ये कच्च्या मालाचा मूळ उत्पादक आणि पक्का माल विकणारा किरकोळ व्यापारी यांच्या दरम्यान अनेक मध्यस्थ कड्या असतात, अनेक वाहतूकदार असतात. यातल्या प्रत्येकाला स्वतःचे उत्पन्न कमी होऊ द्यायचे नसणार. यामुळे ते वसूल करून त्याखेरीज हा कराचा बोजा पुढल्या कडीवर ढकलावा लागणार. म्हणजे मालाच्या विक्रीची किंमत वाढत जाणार.
शेअर मार्केटमधले दलाल अगदी क्षुल्लक कमिशन आकारतात, पण खरेदीविक्रीच्या प्रत्येक व्यवहारामध्ये दोन दोन टक्के बँकेला द्यायचे असतील तर ते व्यवहार ठप्प होतील, निदान अगदी कमी होतील. बँकेकडून कर्ज घेतले तर त्यातले ९८ टक्केच हातात येतील आणि ते परत करतांना त्याने दिलेल्या रकमेच्या ९८ टक्केच बँकेला मिळतील. बँकेने दिलेले पूर्ण पैसे व्याजासह परत मिळायचे असल्यास तिला व्याजाचा दर जास्त लावावा लागणार. यामुळे उत्पादनखर्च वाढत जाणार. भारतातल्या प्रत्येक व्यक्तीच्या जमा आणि खर्चाचा प्रत्येक व्यवहार बँकेच्या माध्यमामधूनच होणार असल्यास बँकांच्या कामाचा व्याप आणि खर्च अनेकपटीने वाढेल. ते करणे शक्यतेच्या कोटीतले तरी आहे की नाही हा एक प्रश्न आहेच. शिवाय तो भागवण्यासाठी बँकेने कापलेल्या दोन टक्क्यामधले पुरेसे पैसे ठेवून घेणे तिला भाग पडेल. उरलेल्या पैशातला किती हिस्सा केंद्र सरकारला, किती राज्य सरकारला, किती स्थानिक स्वराज्य संस्थांना द्यायचा हे कोण आणि कसे ठरवणार? त्या बाबतीत सबघोडे बारा टक्के करून कसे चालेल? प्रत्येक राज्याच्या आणि शहराच्या समस्या आणि गरजा वेगळ्या असतात, त्यासाठी लागणारा खर्च निराळा असतो. त्यासाठी लागणारा पैसा कसा उभा करायचा हे सध्या राज्य सरकारे किंवा महापालिका ठरवतात. रामदेवबाबांच्या योजनेत ते कसे बसवायचे?
याशिवाय आपल्या लोकल्याणकारी राज्याला समाजाच्या विकासासाठी बरीच कामे करावी लागतात. त्यासाठी धोरणे आखतांना त्यावर किती खर्च करायचा आणि तो निधी कुणाकडून आणि कसा गोळा करायचा याचा विचार करावा लागतो. या बाबतीत काही गैरव्यवहार होतात असे असले तरी ते थांबवून टाकणे हा त्यावर उपाय असू शकत नाही. हे आणि अशा प्रकारचे जे प्रश्न विचारले गेले त्यावर बाबांनी शुद्ध टोलवाटोलवी केली. "सध्या देशात इतका भ्रष्टाचार आहे, इतकी अनागोंदी आहे, इतका काळा पैसा देशात आणि देशाबाहेर आहे. परिस्थिती आताच इतकी वाईट आहे, याहून आणखी वाईट काय होऊ शकणार आहे?" अशा प्रकारची उत्तरे ते देत राहिले. अखेर ते सध्या ज्या भाजपाचे समर्थन करत आहेत तो पक्ष तरी त्यांची ही नवी अर्थनीती मान्य करून अंमलात आणणार आहे का? या प्रश्नालाही त्यांनी बगल दिली. सध्याच्या करप्रणालीत अनेक दोष आहेत, ते दूर करणे त्याची पुनर्रचना करणे आवश्यक आहे यात शंका नाही. त्या दृष्टीने काही पावले टाकली जात आहेत, आणखी बरेच करायला पाहिजे हे देखील मान्य करता येईल, पण ती चौकटच मोडून टाकायची हे भयानक वाटते.
करआकारणी करतांना तो भरण्याची केवढी कुवत कुणाकडे आहे आणि खर्च करतांना त्याचा लाभ कुणाला आणि किती मिळणार आहे याचा विचार करून निर्णय घेतले जातात आणि त्यांची अंमलबजावणी होते. असे आजवर जगभरात सर्व राष्ट्रांमध्ये होत आले आहे. फक्त खनिज तेलापासूनच गडगंज पैसे मिळवणार्या अरब राष्ट्रांना कदाचित नागरिकांकडून कर घेण्याची गरज वाटत नसेल. आपली परिस्थिती तशी नाही. आपल्या देशाच्या गरजा इथल्या नागरिकांनीच भागवायच्या आहेत. रामदेवबाबांनी सुचवलेला करमुक्तीचा प्रयोग याआधी कुठे केला गेला आहे का? किंवा सध्या केला जात आहे का? त्याचे काय परिणाम झाले? अशा प्रश्नांना बगल देतांना "तुम्हाला हवे असेल तर तुम्ही ते शोधून काढा. आपला देश स्वतंत्र आहे, आपण इतरांकडे कशाला पहायला पाहिजे?" अशी उत्तरे मिळाली. 'आउट ऑफ दि बॉक्स' विचार करणार्यांबद्दल मलासुद्धा आदर वाटतो. पण इतक्या अव्यवहार्य योजना विचारात घेण्यालायक वाटत नाहीत. अर्थशास्त्राच्या सिद्धांतांना सरसकट मोडीत काढणारे हे 'अनर्थयोगशास्त्र' कुणाकुणाला पटणार आहे आणि कायद्याच्या चौकटीत ते कसे काय बसणार आहे हे पहायचे आहे.
फक्त एक नवा बँक ट्रँजॅक्शन
फक्त एक नवा बँक ट्रँजॅक्शन टॅक्स सुरू करावा.
मी फक्त या प्रपोजल चे विश्लेषण करतोय -
१) ट्रँजॅक्शन हे मूलभूत इकॉनॉमिक युनिट आहे.
२) बँक हे ट्रँजॅक्शन घडवून आणण्याच्या प्रक्रियेत अनिवार्य इंटरमिजियरी म्हणून भूमिका पार पाडेल.
---
संपूर्ण लेख परत एकदा वाचल्यावर मत देईन.
---
मला सोयिस्कर भाग वाचून झाल्यावर ही प्रतिक्रिया -
पण पॅरलल इकॉनॉमी (काळ्या पैशाची) अगदीच वाईट आहे असे मला वाटत नाही. ती अनऑफिशियल आहे हे मान्य. पण समाजातील एका सेक्शन ला खूप टॅक्स (दरडोई) व दुसर्या मोठ्या सेक्शन ला शून्य/नगण्य टॅक्स आणि वर नि:शुल्क संरक्षण/सोयी/सुविधा/अन्न्/आरोग्यसेवा (अमर्त्य सेनांनी नुकताच ऑफर केलेल्या)/ श्रीमंतांच्या शाळेत रिझर्व्हेशन्स्/सबसिड्या/लाडली लक्ष्मी योजना/ लालबहाद्दूर योजना/ रोहयो वगैरे वगैरे पाहता ही काळ्या पैशाची इकॉनॉमी हीच ऑफिशियल असायला हवी व पांढर्या पैश्याची इकॉनॉमी ही खराब असायला हवी अशी knee-jerk प्रतिक्रिया नोंदवावीशी वाटते. इतकं झाल्यावर सुद्धा - आम्ही इन्डायरेक्ट टॅक्सेस भरतो की - असा दावा.
तुमचा प्रतिसाद पांढरी
तुमचा प्रतिसाद पांढरी अर्थव्यवस्था कशी शुद्ध व्हावी हे सोडून काळी अर्थव्यवस्था कशी वृद्धिंगत व्हावी याजबद्दल आहे. यात मूलभूत तत्त्व कि काळी अर्थव्यवस्था ही पूर्णतः श्रीमंताकडे असते हे ही आपण मान्य करत आहात.
क्षणभर असे मानले कि देशातील सर्व घटकांची संपत्ती ही त्यांच्या असेट्सशी प्रमाणात असते तर श्रीमंताकडे जास्तीत जास्त असेट्स असतात. म्हणून संरक्षणाची गरज त्यांनाच असते. ज्याचे काही नाहीच त्याला संरक्षण कशाला? अगदी मोगल आले तेव्हा देखिल गरीबांना फरक पडला नाही.
अर्थसंबंध श्रेष्ठ कि कायदा
अर्थसंबंध श्रेष्ठ कि कायदा श्रेष्ठ? श्रेष्ठ म्हणजे सर्वार्थाने श्रेष्ठ.
जर अर्थसंबंध श्रेष्ठ असतील तर गरीब लोक आपली ताकद (मतांची) वापरून श्रीमंतांना लोकशाहीत लुटताहेत (तुम्ही म्हणता, मी नाही) ते योग्य.
कायदा श्रेष्ठ म्हणत असाल तर काळी अर्थव्यवस्था राबवणारे सगळे झोडपून काढले पाहिजेत.
माझे दोन पैसे...
अर्थशास्त्राचा जाणकार असल्याचा कोणताहि दावा न करता ह्या विषयावरचे माझे मत मांडतो.
सर्व प्रकारचे अन्य कर रद्द करून आणि सर्व प्रकारचा 'पैसा'हि रद्द करून Transaction Tax आणि डेबिट/क्रेडिट कार्डेच केवळ वापरून संपूर्ण देशाचे अर्थकारण चालवणे शक्य आहे. 'पैसा'शेवटी करतो काय तर क्रयशक्ति एकाकडून दुसर्याकडे हस्तान्तरित करतो. सुताराला बोलावून त्याचे काम झाल्यावर मी त्याला शंभर रुपये देतो तेव्हा मी माझ्याजवळची १०० रुपयाइतकी क्रयशक्ति सुताराकडे हस्तान्तरित करतो. एकेकाळी हा 'पैसा' म्हणजे खरोखरीचा नाण्यांच्या स्वरूपातील पैसाच होता पण नाण्यांचे अर्थकारणातील केन्द्रीय स्थान आणि महत्त्व नंतर नोटांनी, धनादेशांनी आणि अलीकडे डेबिट/क्रेडिट कार्डांनी बरेच आवरत आणले आहे. हीच प्रक्रिया आणखी पुढे नेऊन Hard Cash ला पूर्णतः व्यवस्थेमधून काढून टाकून केवळ नोटांनी, धनादेशांनी आणि अलीकडे डेबिट/क्रेडिट कार्डांनी सर्व व्यवहार करणे अशक्य नाही. किंबहुना प्रगत देशांमध्ये अशी स्थिति खूपशा प्रमाणात आलेलीच आहे. बहुतेक प्रत्येक व्यापार्याकडे आणि दुकानामध्ये डेबिट/क्रेडिट कार्डांनी पैसे देणे शक्य असल्याने Hard Cash नसली म्हणून फारसे काहीच अडत नाही.
तेव्हा तत्त्वतः cashless society निर्माण करणे अशक्य नाही. वस्तुस्थितीमध्ये अडचणी काय येतील इतकेच पाहून त्या त्या अडचणींवर तोडगे काढावयास लागतील. पहिली अडचण म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या - वा कुटुंबातील प्रमुख व्यक्तींच्या - नावे बँक खाती उघडून त्यांच्या हातात डेबिट/क्रेडिट कार्डे पोहोचविणे आणि बँक व्यवहार तसेच डेबिट/क्रेडिट न हरवता आणि न खराब करता सांभाळणे, त्याचा दुसर्यांकडून दुरुपयोग होऊ न देणे, ते न गोंधळता वापरणे (उदा. त्याचा PIN Number लक्षात ठेऊन तो बिनचूक भरणे) ह्या गोष्टींचा १०० टक्के प्रसार होणे सध्या तरी भारतात शक्य दिसत नाही. खेडयातील खोपटात राहणारा वा शहरातील झोपडपट्टीत राहणारा ती कार्डे सुरक्षितपणे कोठे ठेवू शकेल? इतक्या संख्येने बँका कोठे आहेत? आपले क्रेडिट कार्डाचे स्टेटमेंट मिळवून त्यावर नजर ठेवण्याइतपत प्रगल्भता कितीजणांकडे आहे?
हे जेव्हा शक्य होईल तेव्हा सर्व कर रद्द करून एकच Transaction Tax लावता येईल. तेव्हा त्याचा दर २ टक्के असणे हे फार वाटेल, बहुतेककरून अर्धा वा पाव टक्काहि पुरेसा होईल. मात्र सध्यातरी हे मृगजळाइतके दूर आणि असाध्य वाटत आहे.
हे दिशेने थोडी वाटचाल सुरू झालीच आहे. प्रतिवर्षी VAT ह्या indirect tax चे वजन वाढत आहे आणि आयकर ह्या direct tax ची करपात्र उत्पन्नाची पातळी वरवर जात आहे. आयकराचे महत्त्व कमी करण्याची ही नांदी असू शकेल.
(आयकर अजिबात नष्ट झाला तर व्यक्तिव्यक्तींमधील उत्पन्नाची तफावत कमी करण्याचे शस्त्रच नष्ट होईल. विशिष्ट गुंतवणूकींना प्राधान्य देणे, विशिष्ट उद्योगांकडे भांडवल वळवणे ह्यासाठी काहीच सुकाणू हाती राहणार नाही. Transaction Tax हा अशा बाबतीत कामाचा नाही. तो 'सब घोडे बारा टक्के' असे काम करतो हेहि ध्यानात घ्यायला हवे.)
थीअरोटीकली बरोबर पण
थीअरोटीकली बरोबर पण पर्त्याक्षात उतरणे कठीण आहे. त्यासाठी किमान ९९% लोकांनी बँक वापरली पाहिजेल. जवळपास सगळे व्यवहार अत्यंत पारदर्शकपणे ट्रेस करता आले तर वरील शक्य आहे. सिंगापोर किंवा आखाती देशात भरपूर कर आणि बिसनेस मधून मिळतो असे माझे तरी मत आहे. त्यामुळे ब्राझील मध्ये हां प्रयोग फेल गेला हे पण पाहायला पाहिजेल.
टोलबद्दल व्यक्तीशः माझी फारशी
टोलबद्दल व्यक्तीशः माझी फारशी तक्रार नाही. ज्यांना जलद रस्ता वापरायचा आहे त्यांनी जास्तीचा कर भरला. विमानात बसणारे रेल्वेपेक्षा जास्त किमतींचे तिकीट काढतात, तसंच काहीसं. त्यातला भ्रष्टाचार निराळा आणि त्याबद्दल प्रेम नाही.
आणखी जास्त काही या विषयावर बोलावं एवढा माझा अभ्यास नाही. पण वेगळा प्रश्न आहे. बाबा रामदेवांना अजूनही, अण्णा आंदोलन संपल्यानंतर एवढ्या दिवसांनंतरही, भाव मिळतो का?
+ / -
मलाही टोल असण्याबाबतीत तक्रार नाही. मात्र जर टोल असणारा एखादा मार्ग असेल तर नागरीकांकडे विनाटोल रस्त्याचाही पर्याय उपलब्ध असला पाहिजे. आणि तो रस्ताही चांगल्या स्थितीत हवा. (टोल रोड हा एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी त्या पर्यायी मार्गापेक्षा जलद पोचवेल इतकेच).
सध्या प्रत्येक ठिकाणी असे पर्याय दिसत नाहीत व नागरीकांना जवळ्जवळ टोल भरणे अनिवार्य झाले आहे. आक्षेप या पर्यायाच्या अनुपलब्धतेला / या जबरदस्ती - अनिवार्य - टोल वसुलीला आहे
अनुपलब्धतेबद्दल एक प्रश्न.
अनुपलब्धतेबद्दल एक प्रश्न. मुंबई-पुणे प्रवासासाठी आता टोलवाला द्रुतगती मार्ग आहे. तर जुना घाटाचा मार्ग होता तो अजूनही चालू आहे की आता तो बंद झाला?
अनिवार्य टोल वसुली - गेल्या पंधरावीस वर्षांत जे गाड्यांचं प्रमाण वाढलेलं आहे, ते पहाता असे मोठे रस्ते बांधणं हेच मुळात अनिवार्य झालं होतं. आता हे बांधायचे तर त्या टॅक्ससाठी सर्वसाधारण जनतेवर बोजा का टाकावा? ज्या लोकांना गरज आहे अशांनीच एकत्र होऊन पैसे काढणं न्याय्य आहे. उलट सर्वांमध्ये हा खर्च वाटून घेतला तर तो रस्ता न वापरणारांवर अनिवार्य टोल वसुली टॅक्समधून झाली असती.
एस. टी. बसेसना हा टोल भरावा लागतो का? लागत असो वा नसो, मुंबई ते पुणे प्रवास २०० रुपयांच्या आत, सुमारे साडेतीन तासात करता येणं हा अत्यंत स्वस्त पर्याय आहे. निमआराम गाडीचं आत्ताचं तिकीट रु. २१०. लाल डब्याचं तिकीट माहीत नाही - पण दीडशेच्या आसपास असावं. वीस वर्षांपूर्वी एशियाडचं, निमआराम गाडीचं तिकीट पन्नासेक रुपयाच्या आसपास होतं असं अंधुकपणे आठवतं. पण प्रवासाला किमान साडेचार तास लागायचे. मुद्दा असा की एक्स्प्रेसवे तयार झाल्यापासून सामान्य माणासाच्या खर्चात वाढ (महागाईपलिकडे) झालेली नाही.
-१
जुन्या घाटमार्गाचा काही भाग अजूनही चालु आहे.
आता हे बांधायचे तर त्या टॅक्ससाठी सर्वसाधारण जनतेवर बोजा का टाकावा? ज्या लोकांना गरज आहे अशांनीच एकत्र होऊन पैसे काढणं न्याय्य आहे. उलट सर्वांमध्ये हा खर्च वाटून घेतला तर तो रस्ता न वापरणारांवर अनिवार्य टोल वसुली टॅक्समधून झाली असती.
असहमत आहे. जनता रस्ता थेट वापरत नसली तरी त्यांना रोज लागणार्या वस्तुंची आयात/निर्यात त्याच रस्त्यांवरून होते. त्यांच्या सोयीसाठी सरकारने आपल्या खर्चातून रस्ते बांधणे मला अयोग्य वाटत नाही.
अधिक रस्त्यांची गरज आहे हे मान्य आहेच. नवे रस्ते टोलसहित असावेत हे ही समजण्यासारखे आहे. मात्र त्यासाठी जुन्या/पर्यायी टोलरहित मार्गाचा पर्याय नाहिसा करण्यावर आक्षेप आहे.
जनता रस्ता थेट वापरत नसली तरी
जनता रस्ता थेट वापरत नसली तरी त्यांना रोज लागणार्या वस्तुंची आयात/निर्यात त्याच रस्त्यांवरून होते. त्यांच्या सोयीसाठी सरकारने आपल्या खर्चातून रस्ते बांधणे मला अयोग्य वाटत नाही.
पण अशा आयात निर्यात करणाऱ्या वाहनांवरही टोल लागतोच की.
त्यांच्या सोयीसाठी सरकारने आपल्या खर्चातून रस्ते बांधणे मला अयोग्य वाटत नाही.
'आपल्या' खर्चातून म्हणजे नक्की काय? कारण शेवटी तो खर्च जायचा तिथूनच जातो, जनतेच्या खिशातून. फक्त सरकारला इतकं भांडवल उभं करता येत नाही म्हणून त्यांनी भांडवलउभारणी आणि रस्तेबांधणीचं काम आउटसोर्स केलं. या आउटसोर्स केलेल्या कंपनीला नफ्याचं आमीष तर असलं पाहिजे. त्यासाठी अमुक एक काळपर्यंत टोल घ्यायला परवानगी देणं यात वावगं काय ते कळत नाही. जर कंपन्यांना काहीएक फायदा देऊन भराभर रस्ते बांधले जाणार असतील तर त्यात हरकत काय?
रस्त्याच्या बाबतीतलं उदाहरण पटत नसेल तर इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर कंपन्यांबद्दल काय मत आहे? या कंपन्याही इंटरनेटवर वेगवेगळ्या ठिकाणी जाण्याचा रस्ता वापरण्यासाठी तुम्हाला काही फी आकारतात. ज्यांच्याकडे कॉंप्युटर आहे आणि जे इंटरनेटवर जातात त्यांनाच ही फी पडते. रस्त्यांच्या टोलचंही असंच आहे.
पण अशा आयात निर्यात करणाऱ्या
पण अशा आयात निर्यात करणाऱ्या वाहनांवरही टोल लागतोच की.
होय. लागतो मग? मुद्द समजला नै.
फक्त सरकारला इतकं भांडवल उभं करता येत नाही म्हणून त्यांनी भांडवलउभारणी आणि रस्तेबांधणीचं काम आउटसोर्स केलं.
जिथे रस्ता नाही नव्यातून रस्ता निर्मिती करायची आहे तिथे काही काळापुरता टोल मान्य आहेच हे आधी सांगितलं आहे. पण अनेकदा असं दिसतं की जुना मार्ग आहे त्यालाच रूंद वगैरे करून त्यावर कंत्राटदारांचे टोल सुरू होतात. ज्यांना दुरच्या/मुळच्या मार्गाने रमतगमत जायचं आहे त्यांना तो पर्यायच उपलब्ध रहात नाही. प्रत्येकाने अत्यंत निष्प्राण व नीरस रस्त्यांवरून जलद पळतच जावे ही सक्ती मला नकोशी वाटते.
एक उदा देतो. पूर्वी कोल्हापूर-पुणे रस्त्यावर दुतर्फा कण्हेर (म्हणजेच करवीर), आंबा, चिंच व भरपूर बहाव्याची झाडे होती. अगदी छान झाडांच्या कमानीखालून तेही उन्हाळ्यात बहावा फुललेला असताना (त्याचे घोसच्या घोस लटकत असत) पिवळ्या जर्द सावलीतील प्रवास आल्हाददायक असे. ५:३०/६ तास लागत पण प्रवास त्रासाचा नव्हता, (खंबाटकी घाट वगळता) धोकादायक नव्हता की रस्त्याची अवस्था वाईट नव्हती. पण अचानक हा मार्ग रूंद, चकचकीत, गुळगुळीत व अती-द्रुतगती वगैरे करायच्या नादात कुरूप व विद्रुप केला गेला. आता मला या अत्यंत कमी वेळात पोचवणार्या परंतू अतिशय कोरड्याठाक, एकाच साचातल्या रस्त्यावरून जायची सक्ती तर आहेच त्याहून असे की त्यावरही टोल भरावा लागतो. त्यापेक्षा मुंबई-पुण्यासारखा वेगळा एक्सप्रेसवे काढून त्यावर टोल लावला असता आणि मुळ रस्ता तसाच ठेवला असता तर अधिक पर्याय उपस्थित झाले असते.
आता हे मुद्दे मुळ विषयाशी काहिसे अवांतर आहेत हे खरंय पण ही सशुल्क, नीरस रस्त्यावरून, वेगाने जायची सक्ती अगदीच माझ्या आवडीच्या मुळाशी आली आहे. :(
मुद्दा
मुद्दा दुसरीकडेच जाइल पण ....बोलतोच.
एक प्रवाद ऐकला आहे :-
चांगली सार्वजनिक सेवा सर्वत्र उपलब्ध असली असती तर गाड्यांचं प्रमाण आटोक्यात राहू शकत होतं.
पण मुंबै मध्ये पब्लिक ट्रान्स्पोर्ट चांगला आहे.
मुंबै-पुणे कनेक्टिव्हिटी जबरदस्त आहे. मुंबै पुणे जाणं येणं करण्यासाठी प्रचंड ऑप्शन्स आहेत.
अगदि भरपूर , अफाट प्रमाणात रेल्वे, लाल पिवळी, निम आराम ,वोल्वो अगदि कॅब्जसुद्धा आहेत.
इतकं असून गाड्यांची संख्या वआधते आहे.
म्हणजे तो प्रवाद चुकीचा आहे का?
अरे पण मुंबईत लोकसंख्येशी
अरे पण मुंबईत लोकसंख्येशी (आणि पुण्याशी) तुलना करता दररोज रस्त्यावर उतरणार्या गाड्यांचं प्रमाण खरोखरच बरेच कमी असावे.
अर्थात दोन गोष्टीत गल्लत करतो आहेस. गाड्या विकत घेणे वेगळे आणि त्याचा दैनंदिन वापर वेगळा. सार्वजनिक व्यवस्थेचा फंडा दनंदिन वापर कमी करतो, विकत घेणे त्याप्रमाणात कमी होत नाही.
दुसरे असे की सार्वजनिक व्यवस्थेचा नी आंतरशहरातील गाड्यांच्या प्रमाणाचा संबंध तितका अधिक नसावा. ती थियरी शहरांतर्गत व्यवस्थेपुरती मर्यादीत असावी.
नाही
नाही.
अमेरिका - युरोप ही त्याबाबत आदर्श तुलना ठरावी.
माझी ऐकिव माहिती :-
अमेरिकेत कार लॉब्यांचं प्रस्थ अधिक आहे. ते रेल्वेचा पुरेसा प्रसार होउ देत नाहित. त्यांनी होउ दिला नाही.
युरोप दोन महायुद्धात बेचिराख राख. पण नंतर त्यांनी अगदि राखेपासून सुरुवात केली.
काही युरोपीय देशात रेल्वेचं जाळं चांगलं आहे, तिथे एका शाहरातून दुसरय शहरात गाड्या घेउन जाणे कमी आहे.
अमेरिका म्हणजे लांबच लांब सुबक रस्ते. त्यावर झकास धावणारी तुमची गाडी. अधेमधे लागणारे मॉल्स आअणि फुड जॉइण्ट्स.
विसाव्या शतकानंतरच्या "अमेरिकन ड्रिम"चा हा जणू एक भागच झालाय.
खरंय. मुंबईपुण्यामध्ये
खरंय.
मुंबईपुण्यामध्ये सार्वजनिक व्यवस्था भरपूर वापरली जाते असे दिसतेच पण इतकी नाही की त्यामुळे खाजगी वाहने क्वचितच बाहेर पडावीत. सार्वजनिक व्यवस्था तितकी सोयीची नाहिये (रेल्वे स्टेशने लांब आहेत आणि बसेस पुरेशा महाग. पुरेशा म्हणजे ४ व्यक्ती असताना एसी वोल्वेपेक्षा कारने जाणे स्वस्त पडावे.) इथेही एकटी व्यक्ती कारने आंतर-शहर प्रवास करते आहे असे कमी दिसते.
बाकी, भारतात अशी लॉबी रस्ते कंत्राटदारांची होत आहे असे दिसते. :(
अमेरिकेतलं कार लॉब्यांचं प्रस्थ
अमेरिकेत कार लॉब्यांचं प्रस्थ अधिक आहे. ते रेल्वेचा पुरेसा प्रसार होउ देत नाहित. त्यांनी होउ दिला नाही.
हे कितपत खरं आहे याबद्दल शंका आहे. अमेरिकेतही दुसऱ्या महायुद्धापर्यंत बरे रस्ते नव्हते. आयसेनहॉवर सेनापती म्हणून जर्मनीत गेला, तिथे त्याने अॉटोबाहन (auto-bahn / महामार्ग) पाहिले. महायुद्ध संपल्यावर अमेरिकेचा दौरा रस्त्यांवरून केला, त्यात त्याची हाडं खिळखिळी झाली आणि मग रस्त्यांची अवस्था सुधारणं मनावर घेतलं. जुने अमेरिकन सिनेमे पाहिले तर त्यात बऱ्यापैकी प्रमाणात रेल्वे दिसते. उदा - Some Like It Hot. आईन रँटच्या* 'अॅटलस श्रग्ड'मधे (काहीच्या काही कल्पना असल्या तरीही) तिला ट्रेन दाखवण्याची इच्छा झालीच.
फोर्डचं, कोणत्याही गोष्टीच्या mass production ची सुरुवात करणारं, मॉडेल टी रस्त्यावर आलं १९०८ मधे. आणि इंटरस्टेट हायवे अॅक्ट आहे १९५६ चा. (शोधलं तर विकीपीडीयावर काहीही सापडतं याचं आता आश्चर्य वाटणार नाही असं वाटलं होतं. पण 1956 in rail transport या नावाचं विकीपान पाहून आश्चर्य वाटलं. ज्या वर्षी इंटरस्टेटचा कायदा पारीत केला तेव्हाही अमेरिकेत रेल्वेवर खर्च होत होता.)
मधल्या काळात लोकांनाच रेल्वेची वाट पहाणं नकोसं झालं. लोकांनीच, mass produce झालेल्या स्वस्त गाड्या आणि स्वस्त पेट्रोल यांच्यामुळे रेल्वे वापरणं कमी केलं. अमेरिकेत वेगवेगळ्या ठिकाणी, बरेच जुने, आता वापरात नसलेले ट्रेन ट्रॅक्सही दिसतात. लोकांनी ही लॉबी बनवून रेल्वे मारण्याची शक्ती कार कंपन्यांच्या हातात दिली. (या पार्श्वभूमीवर 'वाट पाहीन पण एस्टीनेच जाईन' या घोषणेचं महत्त्व समजतं.)
भारत किंवा युरोपात अशा प्रकारचं लॉबिंग होणं आता तसं कठीण आहे, किंवा रेल्वे, सार्वजनिक वाहतूक पार डब्यात जाणार नाही असा माझा आशावाद आहे म्हणा! या विचारामागचं कारण असं की भारत, चीन, युरोप या देशांमधे, भूभागात मोठमोठ्या अंतरांवर शहरं आहेत. आणि दोन शहरांमधे माणसंही खूप आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था चालण्यासाठी असे ग्राहक असणं आवश्यक आहे. 'सुवर्ण चतुष्कोन' झाल्यानंतरही भारतात मालवाहतूक रेल्वेवर अवलंबून आहे; रेल्वेला त्यातून बरेच पैसेही मिळतात. अमेरिका, कॅनडा, अॉस्ट्रेलिया(?) या देशांमधे, लांब अंतरासाठी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था चालणं आता तर फारच कठीण वाटतं.
(*ही चूक मुद्दामच केली आहे.)
ह्या अत्यंत क्रांतिकारी उपाय
ह्या अत्यंत क्रांतिकारी उपाय योजनांसाठी बाबा रामदेव यांना श्रेय देण्याचे फारसे कारण नाही . त्यांचा पढवता 'अर्थक्रांती' आहे. पुष्कळ दिवसांपूर्वी ह्यांचे संपूर्ण प्रपोजल वाचण्यात आले. पहिल्याच ओळखीत 'कैच्याकै', 'आवरा आता' असल्या प्रतिक्रिया मनात येत असल्या तरी स्वतःला आवरत पूर्ण साईट वाचून काढली. ह्या प्रकारची व्यवस्था कुठेच अस्तित्वात नाही आणि त्यामुळे काही तरी नवीन विचार आहे तर फक्त वेगळा आहे महणून विरोध करता कामा नये आणि फ़ेअर चान्स द्यावा म्हणून हा अट्टाहास.
मात्र दोन, चार MBA धाटणीच्या bullet point मांडणाऱ्या, पाचवीच्या मुलांसाठी बनवलेले Animation असलेल्या प्रपोजलला सिरीयसली घ्यावे तरी कसे ? आता मी उठून जर दोन पानं हातात घेऊन आण्विक उर्जेसंधार्भात Nuclear Physicist ला संपूर्ण प्लांटचा नकाशाच बदलायला लावत असेल तर तिथे मला कुणी २ मिनीट तरी उभे राहू देईल काय?
ह्यांच्यात कुणी अर्थतज्ञ नाही , ह्याना सपोर्ट करणार रामदेव बाबा आणि नरेंद्र महाराज अश्यात यांना सिरीयसली घ्यावे तरी कसे ?
मेन मुद्दा हा असा :
कुठलीही नीती (policy ) राबवण्या आधी तिची शास्रीय पद्धतीने चाचणी करावी लागते. छोट्या policies साठी सुद्धा बरेच efforts लागतात. ह्यांना तर संपूर्ण अर्थरचनाच बदलायची आहे त्यासाठी ह्याचा अभ्यास काय तर दोन तीन पानांच घोषणापत्र ? ह्यांनी स्वतःला सिरीयसली घ्यावे मग इतर (ज्यांना ह्या विषयातील थोड फार कळत ) लोक ह्यांना सिरीयसली घेतील
ह्यांच्यात कुणी अर्थतज्ञ नाही
ह्यांच्यात कुणी अर्थतज्ञ नाही , ह्याना सपोर्ट करणार रामदेव बाबा आणि नरेंद्र महाराज अश्यात यांना सिरीयसली घ्यावे तरी कसे ?
यांच्या भगव्या रंगाला, अन आजकालच्या हवेला भुलणारे बरेच लोक यांना सिरियसली घेतात हा प्रॉब्लेम आहे.
त्यापेक्षा मोठा प्रॉब्लेम हा आहे, की यांना विरोध केला, तर तो विरोध करणारा/री काँग्रेस प्रचारक, अर्थातच भ्रष्टाचारास उत्तेजन देणारी, किंवा कम्युनिस्ट, किंवा विचारजंत, वा अनेक विशेषणांनी युक्त इ. आहे असा प्रचार आजकाल चालू आहे.
कोणत्या बिण्डोक क्षणी मतदानाचे वय २१ वरून १८ वर आले कुणास ठाऊक... ;)
ई बँकिंग
जी चर्चा ऐकून मी हा लेख लिहिला होता त्यात ई बँकिंगचा उल्लेख आला नव्हता त्यामुळे त्या माध्यमाचा उल्लेख आला नाही. आज मी बहुतेक बिले इंटरनेटवरूनच भरतो, तसेच बहुतेक मोठ्या कंपन्या त्यांचे बरेचसे आर्थिक व्यवहार या माध्यमामधून करतात, उदाहरणार्थ लाखो भागधारकांना त्यांना मिळणारे सगळे डिव्हिडंड्स आता त्यांच्या खात्यात जमा होतात. हे काम यंत्रांद्वारे होत असल्यामुळे बँकेतल्या कर्मचार्यांचे कामसुद्धा त्याने वाढत नाही. आता तर मोबाइलवरूनसुद्धा बिले भरता येतात. या प्रकारच्या सुधारणांमुळे बर्याच प्रमाणात कॅशलेस सोसायटी निर्माण होणे येऊ घातले आहे.
सर्व व्यवहारांवर सरसकट कर लावून सध्याचे कर हटवण्याने त्यामागचे उद्दिष्ट साध्य होणार नाही. उलट सिगरेट, दारू वगैरे ज्या चैनीच्या किंवा अनिष्ट वस्तूंवर आज जास्त कर आहेत त्यांनाच त्याचा जास्त फायदा होणार आहे.
केवळ नोटा व्यवहारातून बाहेर काढल्यामुळे भ्रष्टाचार नाहीसा होणार नाही. जोपर्यंत माणसाच्या मनात हाव आहे आणि शिक्षेचे भय नाही तोपर्यंत त्यातून सुटका नाही. भ्रष्ट माणूस अन्य मार्गाने आपला स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करेल.
बाबा
एखादी गोष्ट फक्त बाबा रामदेव त्यांच्या सिग्नेचर स्टाइल भंपक पद्धतीनं बोलताहेत म्हणून ती चूक असे समजणे मल योग्य वाटत नाही.
"कररचना सोपी,सुटसुटित करा. प्रत्यक्ष रक्कम वापरण्याची गरज कमी ठेवा." ही त्यातली बॉटमलाइन आहे.
ही मागणी जगातील अर्ध्याहून अधिक दिग्गज अर्थशास्त्री आधीपासूनच करताहेत.
"स्विस ब्यांक नावाचे मोठ्थे लॉकर आहे. तिथे भारतातून गेलेल्या तथाकथित काळ्या नोटा लॉकर मध्ये भरुन ठेवलयहएत ." अशी सरळसोपी मॉबला उत्तेजित करु शकणारी धारणा अनेकांची असू शकते.
प्रत्यक्षात स्विस ब्यांकेतून पैसा वळवून तो मोठ्या प्रमाणात पुन्हा भारतातच आणला जातो हे तर्कानेही कळू शकएल.
वरती अतिअशहाण्याने म्हटल्याप्रमाणे सोने-जमीन्,फ्लॅत व इतर अनेकानेक मर्गात तो पैसा दबून आहे.
कुणाला खरोखर काळ्या पैशावर कारवाई करायची तर इथल्या इथे भारतातही अनेक मार्गांनी ते करता येणे शक्य असल्याचे मानले जाते.
इक्विटी मार्केटमधील p notes व इतर्त्र मॉरिशस मार्गे भारतीय अर्थव्यवस्थेला पडलेले भगदाड ह्यावर माझ्यापेक्षा चांगली माहिती इथले अभ्यस्त लोकच अधिक देतील.
थोडक्यात स्विस ब्यांक हे काही "लॉकर" नव्हे. तिथे गेलेला पैसा पुन्हा इथेच परततो. निवडणुकीच्या काळात जरा जास्तच परततो ही कुजबूज तर आहेच.
असो.
१९९७चे चिदंबरम ह्यांचे पब्लिकपासून कॉर्पोरेट्स ना खुश करुन गेलेले "ड्रीम बजेट" काय होते? कररचना सुलभीकरण, निर्क्लिष्टीकरण (नि:क्लिष्टीकरण)च होते की.
त्याने पब्लिक खुश झालीच, शिवाय महसूलही काही रोडावला नाही. प्रगतीस हातभार लागला.
योग्य धोरण हे अशा प्रकारे फार मोटह ठसा, इम्पॅक्ट ठेवून जाउ शकते.
त्या संदर्भात कुणी पार नवीन मुद्दा जरी मांडत असला तरी तो ऐकून घेतला जावा असे वाटते.
.
.
राहिला प्रश्न लहान नोटांचा. तर त्या धोरणानेही फाय्दा होणार नाहीच असे इथल्या पब्लिकला का वाटते ते समजत नाही.
काळा पैसा असणारे सारेच लोकं साराच पैसा स्विस मार्गे वगरिए पाठवतात असे नाही. लहान मोठे सनदी अधिकारी वगैरे
कित्येक वेळा गादीखाली, छतामध्ये, कमोडमध्ये नोटांचे ढिगारे लपवल्याचे किस्से दर दिवसाआड ऐकण्यात-वाचण्यात येतात.
"सर्वात मोठी रक्कम असणारी नोट बाद केल्यास ह्यास आळा बसेल " ह्या विधानात चूक काय आहे?
.
.
बाकी, "ह्या अम्क्याला अधिक ट्याक्स. त्या तम्क्याला कमी ट्याक्स" ह्याने उत्तेजन वगैरे मिळत असेलही; पण व्यवस्थेत अन्याय्य संपत्ती पुनर्वाटप होते असे वाटते.
ह्यातून चुकीचे लाभार्थी तयार होतात. शिवाय जो गुंता तयार होतो, त्यामुळे ज्यांना लाभ मिळण्यासाठी सगळे तयार केले गेले आहे, तो घटक राहतो दूर आणि भलतेच उपटसुंभ लाभार्थी म्हणून उभे राहतात.
१. रामदेव बाबांचे म्हणणे
१. रामदेव बाबांचे म्हणणे योग्य आहे. करांचे प्रकार आणि त्यातील गुंतागुंत प्रचंड आहे. ती कमी करण्याचे सरकारचे कासवगतीने प्रयत्न होत आहे पण वास्तवात उलटेच होत आहे. पण सगळे टॅक्स काढा म्हणणे मूर्खपणाचे आहे. त्याने सरकार आपले फिस्कल पॉलिसी टूल्स वापरू शकत नाही.
२. मोठ्या नोटा नष्ट केल्याने काळा पैसा कमी होतो. या नोटा रिप्लेस करताना विशिष्ट रकमेच्या वर रक्कम गेली तर सारे डीटेल्स द्यावे लागतात. भारतात बहुतेक जनता सरकारने असे केले होते (म्हणूनच पडले असावे). तरी स्विट्झर्लँडमधील बँकात भारतीय रुपये असण्याची शक्यता कमी. बँकेत पैसे असणे आणि लॉकरमधे असणे यात फरक आहे. तिथला लॉकर वापरण्यासाठी तिथे कोणी पैसे नेत नसावा.
३. Bank transaction tax एक उत्तम कल्पना आहे. कारण त्याने टॅक्स नेट रुंदावते. पण तो किती असावा हे हळूहळू मोजले पाहिजे. बहुतेक आजही १०००० रु वरच्या व्यवहारांना तो लागू आहे. २% सुरुवातीला जास्त.
रामदेव बाबा
रामदेवबाबा व एकूणच संघटित समुदायासमोर भाषण करणार्यांच्या भंपक ट्रिक्सचा इथे छान मागोवा घेतलाय.
http://www.loksatta.com/sampadkiya-news/impact-of-effective-speech-3035…
पटाऊ वक्तव्यांमधील तर्कचुकवेगिरी
फडर्य़ा वक्त्यांचे म्हणणे एकदम पटल्यासारखे वाटते, पण काही तरी गडबड आहे असे मनात खुटखुटत राहाते, पण नेमकी काय गडबड आहे यावर बोट ठेवता येत नाही. शंकानिरसन होण्यासाठी अगोदर शंका मुखर तर झाली पाहिजे! पण, 'एवढा मोठा माणूस चुकीचे कसे बोलेल?' असे वाटून, आधीच असलेला न्यूनगंड बळकट होतो. असे 'लटकते प्रभाव' मनात जमा होतात. मग स्वत:च्या बुद्धीला पटून निर्णय घेणार तरी कसा?
प्रभावी वक्त्याचे भाषण, टोनिंगचे चढउतार, पॉजेस व लयकारीमुळे सांगीतिकदृष्टय़ा सुंदर असते. भाषणाच्या ओघात याने कुठे कुठे घुमवून आणले, हे श्रोत्यांच्या लक्षात येत नाही. असे एकेक भाषण जर, अनेक कार्डावर मुद्देनिहाय लिहून काढले आणि कार्डे पसरून ती एकमेकांशी लावून पाहिली, तर त्यातील अनेक गडबडी/विसंगती ध्यानात येतील. एखादे म्हणणे बरोबर असल्यानेही छान वाटू शकते, पण यावरून छान वाटल्याने बरोबर ठरते, असे मात्र अजिबात नाही.
कुठलेही विधान उलटय़ा बाजूने (व्यत्यास) खरे असेलच असे नाही. किंबहुना बहुतेक वेळा नसतेच, ही खूणगाठ बांधूनच पुढे जायला हवे. म्हणजे ताíकक घोटाळे टाळण्याची एक निश्चित सुरुवात तरी होईल. उदाहरणार्थ कलाकृतीची श्रेष्ठता ही तिच्या लोकप्रियतेवरून ठरवू नये, असे जरी मानले तरी, मग लोकप्रिय न ठरणारी प्रत्येक कलाकृती, त्याखातर श्रेष्ठ ठरत नसते. किंवा, अिहसाव्रती पलटवार करणार नाही हे खरेच, पण पलटवार न करणारा तो अिहसाव्रती, असे ठरत नाही. तो भित्रा असेल वा दबा धरून असेल! एकच तर्कदोष सोडवून पाहू. ही तीन विधाने घ्या. १. भांडवलदार स्वार्थी असतात. २. कामगार भांडवलदार नसतात. त्या अर्थी (देअरफोर) ३. कामगार स्वार्थी नसतात.
प्रत्यक्षात कामगारही स्वार्थी असतात, हे तर दिसते आहे. येथेही 'स्वार्थी असणे हे फक्त आणि फक्त भांडवलदारांनाच शक्य असते' असा विधान १चा व्यत्यास खरा मानून घोटाळा झालेला आहे. व्यत्यास खरा नसू शकतो हे तर्कशास्त्रातील एक सूत्र मी सांगितले. अशी भरपूर सूत्रे आहेत. (इन्ट्रोडक्शन टू लॉजिक, लेखक आय. एम. कोपी)
पण महत्त्वाचा मुद्दा असा की, प्रभावी वक्तेअशा उघड उघड तार्किक गफलती करत नाहीत. ते असे पाहातात, की त्यांच्या युक्तिवादाच्या तार्किक गाभ्यापर्यंत, तुम्हाला पोहोचूच द्यायचे नाही. म्हणूनच तर्कदोषांपर्यंत पोहोचूच न देण्यासाठी केलेले अवैध भाषिक डावपेचही, वाद-दोषांत अर्थात फॅलसीजमध्ये, आवर्जून समाविष्ट केलेले असतात.
अप्रस्तुत आधार व संदिग्धता
दमदाटी, अभिमान, पवित्र म्हणून प्रमाण, असे जे जे अ-वैचारिक व भावनांना हात घालणारे प्रकार चालतात, त्यांना भुलून चालणार नाही. एखादी रूढी दीर्घकाळ चालली तरी ती त्याज्य असू शकते. यावर कोणी, 'आपले पूर्वज काय मूर्ख होते का?' असे म्हटले तर 'अजूनही त्यांच्या काळात वावरणारे तुम्ही मूर्ख आहात' असे उत्तर देता आले पाहिजे.
'कोण बोलतोय पहा!' हा अजून एक हमखास टाकला जाणारा डाव आहे. योग्य वादात, 'विधान करणाऱ्याची लायकी काय?' हा मुद्दा नसून, 'विधानाची लायकी काय?' हा मुद्दा असतो. 'कायद्याचं बोला' या सिनेमात मकरंद अनासपुरेच्या तोंडी हे तत्त्व छान येते. ''मी सनदी वकील नाही, हे आत्ता सिद्ध झाले, पण म्हणून मी आत्तापर्यंत जे सिद्ध केले, ते असिद्ध कसे काय ठरते?'' जर कोणी धर्ममरतडाच्या आविर्भावात उपदेश ठोकू लागले, तर 'तुम्ही स्वत: तरी पाळता काय?' हा नतिक अधिकाराचा प्रश्न रास्त आहे. पण विधान म्हणून पाहाता, वेडाच्या झटक्यात बरळलेले विधानसुद्धा, जर सत्य असले तर ग्राह्य़ धरणे, ही विवेकवादाची एक कसोटी आहे.
वादमुद्दय़ाशी संबंध नसलेल्या गोष्टी मांडणे, ही प्रभावी वक्त्यांची खेळी असते. एक माजी अर्थमंत्री, एका संमेलनाच्या समारोपाच्या भाषणात म्हणाले होते, ''हे म्हणतात शेतकऱ्यांनाही प्राप्तिकर लावा. अरे, शेतकऱ्यांनी स्वातंत्र्यलढय़ात केवढा त्याग केला होता! आपला कोरडवाहू तीन एकराचा शेतकरी. बिचारा काय टॅक्स देणार?''(टाळ्या) स्वातंत्र्यसनिकांसाठी ज्या योजना असतील त्यातून शेतकऱ्यांना वगळले आहे काय? ज्याला इन्कम टॅक्स लिमिटच्या वर वट्ट नफा होऊ शकतो, तो शेतकरी 'बिचारा' कसा? पण टाळ्यांच्या गजरात असे प्रश्न सुचणे थांबलेले असते.
एकाच युक्तिवादात एक शब्द दोन अर्थानी वापरणे हा संदिग्धतेचा गरवापर असतो. 'नो-बडी' इज परफेक्ट, आय अॅम 'नो-बडी', देअरफोर आय अॅम परफेक्ट! यात केलेला 'नो-बडी'चा वापर पाहा. पळवलेल्या विमानातील 'निष्पाप नागरिक' निष्पापच असतील कशावरून? यात निष्पापचा अर्थ कधीच कोणतेच पाप न केलेले असा नसून, 'त्या समरप्रसंगात' सहेतुकपणे न उतरलेले पण यदृच्छया सापडलेले, इतकाच आहे.
शब्दाचा अर्थ जरी एकच असला तरी तो वाक्यात वेगळेच काही ध्वनित करू शकतो. जो कधीच दारू पीत नाही त्याच्याही बाबतीत 'तो आज प्यायलेला नाही' हे विधान सत्यच असते, पण 'म्हणजे एरवी पितो' असे उगाचच ध्वनित होते.
शब्दांचा क्रम चुकला की विनोद होतात किंवा गंभीर चुकाही होऊ शकतात. विनोदाचे उदाहरण म्हणजे 'लग्नाच्या पन्नासाव्या वाढदिवसाला'ऐवजी 'पन्नासाव्या लग्नाच्या वाढदिवसाला'. गंभीर चूक म्हणजे, 'काही तमिळ-अतिरेकी िहदू असतात'पासून 'काही तमिळ िहदू-अतिरेकी असतात' अशी वाक्यरचना फिरविणे. अण्णा हजारे एकदा, राजकीय पक्ष घटनाबाह्य़ आहेत, असे म्हणाले होते. घटनेनुसारचे सगळे कायदे हे काही घटनेच्या 'मजकुरा'त नसतात. येथे 'बाह्य़'ने, 'भंग करणारे' असे ध्वनित होते.
एरवीही 'बाह्य़' म्हणजे कशाच्या बाहेर हे स्पष्ट हवे? उदाहरणार्थ मेंदूत चालणारी विद्युत-रासायनिक प्रक्रिया ही 'शरीराच्या आत', पण 'जाणिवेच्या बाहेर' चालते. कितीही मेंदूतज्ज्ञ झाला, तरी त्याला 'समोरचे फूल सुगंधी आहे' असेच अनुभव येतात. जर ''माझ्या अमुक मज्जापेशीने तमुक मज्जापेशीत इतका करंट मारला'' असे 'अनुभव' यायला लागले, तर त्याला वेगळ्याच तज्ज्ञाकडे न्यावे लागेल!
गृहीतातच साध्य आणि शितावरून भातावर
'भिक्षा वाटून घ्या', हे कुंतीचे उद्गार वाच्यार्थाने घेण्यामागे पांडवांना द्रौपदीचा मोह पडला, हेच खरे कारण होते. द्रुपदाला अशा लग्नाची धम्र्यता पटविताना युधिष्ठिर म्हणतो, ''माझे मन कधीच अधर्माकडे घेत नाही, परंतु ते या विवाहाकडे ओढ घेते आहे. त्याअर्थी हा विवाह धम्र्यच असणार.'' धम्र्यतेची सार्वत्रिक कसोटी 'मनाला' लावण्याऐवजी युधिष्ठिराने 'त्याचे मन' हीच कसोटी बनवली आहे! .
'जे होणार असते ते झाल्याशिवाय राहात नाही' हे एक निर्थक वाक्य आहे. कारण 'अमुक होणार आहे' ही भविष्यवाणी कोणी केलेली असती तर ती खरी ठरली असती, इतकेच म्हणता येईल. पण जे कोणाच्याच मनातही आले नाही आणि झाले तर ते 'होणार असणे' कुठेच अस्तित्वातच नसेल. झाले आहेच म्हटल्यावर मागाहून, 'होणारच होते' म्हणण्याला तर अजिबातच अर्थ नाही. गृहीतातच साध्य लपवणे व ते बाहेर काढून दाखवणे या प्रकाराला सिद्धसाधकाचा दोष किंवा पेटीशिओ प्रिन्सिपी असे म्हणतात. सगळेच गूढवाद या दोषाने ग्रस्त असतात.
शितावरून भाताची परीक्षा या तत्त्वाला इंडक्शन असे नाव आहे. पण ज्या भांडय़ातले शीत घेतले त्याच भांडय़ातल्या भाताविषयी हे ठीक आहे, जगातील सर्व भांडय़ांतले सर्व भात नव्हेत. सोयीस्कर असेल, तर एक-दोन केसेसवरून एक तथाकथित सामान्य नियम मान्य करायचा, अशी वाईट सवय अनेकांना असते. त्यात न बसणारे उदाहरण दाखवले तर ''अपवादानेच नियम सिद्ध होतो'' असे धादांत चुकीचे विधान फेकले जाते. अपवादाने नियम बाधितच होत असतो. नव्या माहितीला सामावण्यासाठी नियम दुरुस्त करावा लागतो. ''अपवादानेच नियम सिद्ध होतो'' हे धादांत चुकीचे विधान ज्या विचारातून आले, तो अगदी वेगळा आहे. जेव्हा 'सर्व काही अनुभवमात्रच आहे' अशी विधाने केली जातात तेव्हा 'सर्व काही'त न मोडणारे काही उरतच नाही व त्यामुळे उलटा ताळा घेता येत नाही. याउलट सजीव हे स्वत:ची प्रत काढू शकतात यासाठी, निर्जीव वस्तू तसे करू शकत नाहीत, हा उलटा ताळा उपलब्ध आहे. ईश्वराबाबत, 'पुराव्याचे नसणे हा नसण्याचा पुरावा नसतो' हा एपिग्रॅम झकास आहे, पण म्हणून 'असण्याचा पुरावा' मिळत नसतो. विधान तपासता आले पाहिजे. सत्य विधान हे बाधित होऊ शकणारे, पण अद्याप बाधित न झालेले असे असले पाहिजे.
वैचारिक बेशिस्तीचा अंदाधुंद कारभार सर्वत्र चालू आहे. तो चालवणाऱ्या बेपर्वा 'प्रचारवंतां'ना तुमच्या व्याख्या सांगा, तुमची मध्यवर्ती विधाने सांगा, ती बरोबर कशावरून ते सांगा, अशा मागण्या करून वठणीवर आणले पाहिजे. ते वठणीवर येवोत न येवोत, पण वैचारिक शिस्तीच्या आग्रहामुळे आपल्या जीवनात विवेकपूर्ण निर्णय घेण्याची, आपली क्षमता तरी निश्चितच वाढेल.
.
.
.
मानवी निर्बुद्धपणा ह्या दगडावर आजवर डोके आपटून झाले आहे.
कंटाळा येत असला तरी ह्यापुढेही आपटात रहिन.
१. भांडवलदार स्वार्थी असतात.
१. भांडवलदार स्वार्थी असतात. २. कामगार भांडवलदार नसतात. त्या अर्थी (देअरफोर) ३. कामगार स्वार्थी नसतात.
प्रत्यक्षात कामगारही स्वार्थी असतात, हे तर दिसते आहे.
-
तुझ्या ह्या उदाहरणाचा उद्देश समजला. उदाहरण मात्र आहे हे समजले. मुद्दा समजला.
तू कामगार व स्वार्थी हे दोन शब्द एका वाक्यात वापरलेस म्हणून सांगतो. (मला कामगारांवर तोंडसुख घ्यायला चान्स आहे म्हणून बोल्तो.) कामगार हे महाप्रचंड स्वार्थी असतात. विशेषतः युनियनाइझ्ड.
१) संघटनाचा अधिकार सर्वांना आहे. कामगार युनियन ही संघटना आहे. माझ्या माहीती प्रमाणे कामगार युनियन ही टॅक्स फ्री संघटना असते. संघटना काढायची व तिच्यामार्फत फायदे उपटायचे. पण टॅक्स न देता.
२) उद्योजक बिचारा टॅक्स ही देतो, युनियन च्या दादागिरिला नमून पगारवाढ , भत्ते ही देतो. आणि वर सरकारी नोकर (उदा. Chief Election Commissioner ) व राजकारणी (उदा. सुषमा स्वराज) अवाजवी टीका करतात ते ही सहन करतो. हे लोक हे कसे विसरतात ती त्यांचा पगार्/तनख्वा हे बहुतांश याच उद्योजकांनी दिलेल्या टॅक्स मधून आलेले आहेत??? व सगळ्यात कहर म्हंजे रेग्युलेशन असतेच डोंक्यावर बसलेले. सीसीआय, सेबी, एम्पीसीबी, जयंती नटराजन/जयराम रमेश, वगैरे.
३) किती कामगार इंडिव्हिज्युअल इन्कम टॅक्स भरतात ?
पटाऊ लेखांमेधील तर्कचुकवेगिरी
पण महत्त्वाचा मुद्दा असा की, प्रभावी वक्तेअशा उघड उघड तार्किक गफलती करत नाहीत. ते असे पाहातात, की त्यांच्या युक्तिवादाच्या तार्किक गाभ्यापर्यंत, तुम्हाला पोहोचूच द्यायचे नाही. म्हणूनच तर्कदोषांपर्यंत पोहोचूच न देण्यासाठी केलेले अवैध भाषिक डावपेचही, वाद-दोषांत अर्थात फॅलसीजमध्ये, आवर्जून समाविष्ट केलेले असतात.
इथे आणि कितीतरी जागी सरळ तसे न लिहिता श्रोते मूर्ख असतात असा एक महान तर्क लेखकाने लावला आहे.
मनोबा अरे काय
http://aisiakshare.com/node/2458#comment-43529
मनोबा अरे काय सॉलिड्ड्ड्ड्ड्ड्ड्ड प्रतिसाद दिलायस ___/\___ हॅट्स ऑफ टू यु.
थांब आता तुझे एकेक प्रतिसाद वेचून वाचून काढते . खूप छान प्रतिसाद दिलेला आहेस. इथे मी सत्वहीन धागे विणत बसते आणि तुझे प्रतिसादच्या प्रतिसाद धाग्याच्या लायकीचे सापडतायत.
या आधीच्या प्रतिसादात मी
या आधीच्या प्रतिसादात मी अर्थक्रांती यांचे प्रपोजल हे पुरेसे अभ्यासपूर्ण नसल्याने सिरीयसली घेऊ जाऊ शकत नाही असे बोललो. त्याची Analogy Clinical Trials च्या अंगाने घ्यावी. एखाद्या कंपनीने जर नवीन Drug शोधले तर ते कितीही परिणामकारक असे तरी योग्य त्या चाचण्या झाल्याशिवाय त्याला बाजारात आणता येत नाही.
तरीसुद्धा जर ह्यातील मुद्दे बघायचे असतील तर दोन दिसतात
१) सध्याची करप्रणाली बदलून संपूर्ण नवीन प्रणाली वापरात रूढ करणे. ह्याचा विचार करतानाच मनात वेगवेगळ्या शक्यता, परिणाम ह्यांचा इतका गुंता होतो की त्यातुन माझ्याकडून काहीच निष्पन्न होत नाही. ह्याच्या जवळपास जाणारी योजना म्हंजे सध्याच्या आर्थिक क्रायसिस मध्ये 'International Transactions ' ला 'Transaction Tax' लावण्याची योजना. मात्र ही योजना स्वीकारण्यात आली नव्हती.
२) दुसरा मुद्दा हा आहे ५०० व १००० च्या नोटांच्या बाबतीत. हा काहीसा छोटा आणि विचार करता येण्याजोगा मुद्दा आहे. RBI ने या आधी अश्या प्रकारचे काम केले आहे. RBI ने हा निर्णय घेतला तर पुष्कळ काळा पैसा हा मुख्य अर्थव्यवस्थेत येऊ शकतो. आणि RBI / सरकारने असे करावे असे पुष्कळ लोक मागणी सुद्धा करत आहेत.
चक्क गब्बरसिंगाशी विशेषतः
चक्क गब्बरसिंगाशी विशेषतः शेवटच्या भागाशी बर्यापैकी सहमती आहे.
नुसत्या पडून असलेल्या काळ्या पैशाने (त्यावर कर भरला जात नाही हे वगळता) नेमके आमचे काय नुकसान होते आहे?
प्रत्येक बँक ट्रान्जोझेक्शनवर उद्या टॅक्स लावला तर मी बँक ट्रान्झक्शन्स करणे टाळेन अर्थात काळ्या व्यवहारात वाढच होईल हा तर्क चुकीचा कसा?
मुळात भ्रष्टाचारविरोधी कायदा करताना प्रत्येक जण भ्रष्टाचार करतोय, गुन्हेगार आहे हे जसं गृहितक आहे तसंच इथेही दिसतंय!
गुंत
काळ्या पैशाचा गुंता फार फार दूरवर जातो साहेब. असा तत्काळ सुचत नाही. पण इतर केव्हाही मोठे प्रॉब्लेम आले, नि त्यांच्यावरील उपाययोजनेच्या मुळाशी जायला लागलं की हा साला मधेच कडमडतो. ह्यामुळे सगळ्या पॉलिसीज चुकतात्,ढेपाळतात. कैकदा भलत्याच पॉलिसीज बनवल्या जातात. कारण एकच :- काळा पैसा जितका जास्त, तितकं अर्थव्यवहाराचं चित्र अस्पष्ट व न आवरण्यासारखं.
मग अगदि इन्फ्लेशन इंडेक्स पासून ते विविध बाबतीतला गोंधळ आवरताना सरकारला तारेवरची कसरत करावी लागते. कधी हा आयटम उडव, कधी तो आयटम इन्फ्लेशनच्या यादीत घाल असे उद्योग होतात.
हे सगळं स्पायरल इफेक्टनं वाढत जाउन सगळ्यांनाच शेकतं. ज्यांनी भरपूर काळापैसा केलाय, त्यांना एकप्रकारे त्यांनी केलेल्या hedging चा फायदा मिळतो. जो जितका प्रामाणिक, त्याची तितकी आर्थिक धुलाई होते. व्यवश्तेतील नियमांना सहकार्य करणार्यास शिक्षा मिळते, तोडणार्अयस भरभरुन बक्षीस मिळते.
ही व्यवस्थेची हरामखोरी आहे.
आता स्पेसिफिक असे डेटा पॉइण्ट्स नाहित गब्बर किंवा थत्ते ह्यांच्यासारखे; पण पुनः पुनः वेगवेगळ्या संदर्भात पडलेल्या प्रशांची उकल करताना जाणवलं ते हेच की
हे सगळं स्पायरल इफेक्टनं वाढत जाउन सगळ्यांनाच शेकतं
मान्य हैच! पण तरीही, टॅक्स
मान्य हैच! पण तरीही, टॅक्स रद्दच करा वगैरे टोके गाढण्याइतके यात वाईट काय आहे, म्हणजे हे प्रश्न बाबाजींच्या उपायांनी कसे सुटतील?
काळा पैसा असा वेगाने संपेल वगैरे कोणी म्हटले की हसूच जास्त येते.
जो जितका प्रामाणिक, त्याची तितकी आर्थिक धुलाई होते. व्यवश्तेतील नियमांना सहकार्य करणार्यास शिक्षा मिळते, तोडणार्अयस भरभरुन बक्षीस मिळते.
बाबाजींच्या उपायांनी नियमांना सहकार्य केल्यास २% टॅक्स आहे, न केल्यास ०% मग तुम्ही कसा व्यवहार कराल?
कोणत्याशा (चीझी) हिंदी
कोणत्याशा (चीझी) हिंदी सिनेमात हा प्रसंग पाहिला होता.
पैशाचा माज असणारी हिरवीण (किंवा हिरोही असेल) सगळीकडे प्लास्टीक मनी नाचवत असते. तिने डेबिट किंवा क्रेडीट कार्डाने हॉटेलाच्या बिलाचे पैसे भरले म्हणून ती माजुर्डी. (असेल बुवा, आपल्याला काय कळतंय त्या 'चीज'मधलं!) मग कोणी भिकारी येतो आणि त्याला चहा पिण्यासाठी भीक द्यायला हिच्याकडे चिल्लर नाही म्हणून हिला वाईट वाटतं. मग आपला (!) हीरो, मगाशी हॉटेलात मिळालेले सुट्टे भिकाऱ्याला चहा प्यायला देतो, म्हातारा भिकारी त्याला तोंडभर आशीर्वाद देतो आणि मग हिरवीणीचं तोंड एवढंसं.
रामदेव बाबांनी असा गरीब भिकाऱ्यांचा विचार केला नाही म्हणून त्यांचा निषेध.
!!!
मगाशी हॉटेलात मिळालेले सुट्टे भिकाऱ्याला चहा प्यायला देतो
हे असले लोक भिकार्यांना नसत्या सवयी लावतात. करप्ट कण्ट्री!
आमच्या अटलाण्टा महानगरपालिकेसमोर उभे राहणारे भिकारी असे नाही हो करत! ते कसे, छानपैकी "विल वर्क फॉर फूड" अशी पाटी हातात घेऊन उभे राहतात. नि मग येणार्याजाणार्यांपैकी कोणी सुट्ट्या नोटा दिल्या, की निमूटपणे स्वीकारतात, नि छानपैकी "गॉड ब्लेस यू" म्हणतात. तुमच्या इण्ड्यासारखे नै कै!
नि त्यांना 'भिकारी' म्हणायचे नसते कै, 'पॅनहॅण्डलर्स' म्हणतात त्यांना! मग? त्यांची पण कै डिग्निटी आहे की नै? 'मिनिमम भीक लॉ'खाली अद्याप येत नसले म्हणून काय झाले?
(पूर्वी डौनटौनातच दिसायचे फक्त. हल्ली आमच्या ग्रेटेस्ट कंट्री ऑन अर्थची इकॉनॉमी धुपायला लागल्यापासून आमच्या सबर्बियातसुद्धा सर्रास दिसू लागलेत. पण ते एक असो.)
(न्यूयॉर्कात तर आणखीच जम्मत आहे म्हणे. तिथे ते लोक म्हणे जे काही पाचदहा डॉलर पाहिजे असतील, ते मागतबिगत नैत कै. सरळ टाळक्यात हाणतात नि स्वतःच्या हातांनी काढून घेतात म्हणे. देवाने जे दोन हात दिलेत, त्यांचा वापर करण्याऐवजी भीक कसली मागायची, नै का? अर्थात, स्वतः अनुभवलेले नाही, नुसतेच ऐकलेय, तेव्हा चूभूद्याघ्या.)
(बैदवे, तो पिच्चर कुठला म्हणालात? 'L’Affaire रंगीला-गडी' काय हो, बायेनीचॅन्स?१)
==================================================================================================
१ बोले तो, ' L’Affaire' वापरून घेण्याचा चॅन्स आम्हीही तेवढ्यात मारून घेतला, म्हणून 'बायेनीचॅन्स'.
आमच्या आष्टीनात, लोकल
आमच्या आष्टीनात, लोकल बातमीवाहिनीवर या लोकांना 'होमलेस' म्हणतात. ते लोक बहुतेकदा कार्डबोर्डावरच 'गॉड ब्लेस यू' लिहीतात. साधारण निम्मे (हा माझा रस्त्यातून जातायेता केलेला अंदाज) लोक अमेरिकन फौजेतून निवृत्त झालेले आहेत असं बोर्डांवरून दिसतं. अंदाजे गोरे लोकच जास्त दिसतात (बाकीच्या वंशाच्या लोकांपेक्षा). सिंगल पेरेंट आहोत, असं सांगणारे काही पुरुषही पाहिले आहेत. सध्या थंडीत संख्या जास्त दिसते, उन्हाळा येईल तसे हे लोक इथून बहुदा थंड जागी जातील.
त्या पिच्चरचं नाव तेेव्हाही माहित नव्हतं. असंच टीव्ही सर्फ करताना दिसलं तेवढं "मागल्या जन्मीचं पाप" म्हणून पाहिलं. कमल सदानाह किंवा गुलशनकुमारचा भाऊ किंवा तसलाच छपरी दिसणारा कोणीतरी त्या सिनेमात हिरो (!) असल्याची धूसर आठवण आहे. हिरवीणतर दिव्या भारती किंवा रम्या छाप कोणी गोरीगोमटी, तरूण बाई होती यापुढे काहीच आठवत नाही.
ही बातमी - रिझर्व ब्यॉन्क
ही बातमी -
रिझर्व ब्यॉन्क २००५ पुर्वीच्या नोटा वापरातुन काढ्नार -
http://timesofindia.indiatimes.com/business/india-business/Reserve-Bank…
आता ते शिकागोचे म्हटल्यावर
आता ते शिकागोचे म्हटल्यावर शंपीटरचा प्रभाव असनाराच. मात्र केंशीयन नाहीत असे मला नाही वाटत. सध्या कारण केन्सचे डिप्रेशनचे अर्थकारण (Mostly)कुणीही नाकारत नाही. त्या बाबतीत बव्हंशी Consensus आहे. मात्र ते कश्या प्रकारे वापरावे यात अनेक मतांतरे आहेत.
याबाबत फ्रिडमनचे प्रसिद्ध वाक्य आहे
""In one sense, we are all Keynesians now; in another, nobody is any longer a Keynesian.""
आता ते शिकागोचे म्हटल्यावर
आता ते शिकागोचे म्हटल्यावर शंपीटरचा प्रभाव असनाराच.
शंपीटर हार्वर्ड मधे होता.
विशेष हे की हायेक / फ्रिडमन हे शिकागो चे टॉप चे गुरु मानले जात असूनही राजन हे शंपीटर यांचा प्रभाव मान्य करतात.
----
सध्या कारण केन्सचे डिप्रेशनचे अर्थकारण (Mostly)कुणीही नाकारत नाही. त्या बाबतीत बव्हंशी Consensus आहे. मात्र ते कश्या प्रकारे वापरावे यात अनेक मतांतरे आहेत.
:-)
हो
तुमचे म्हणणे बव्हंशी बरोबर आहे.
Deficit spending is expansionary - हे अतिसंक्षिप्त स्वरूप केन्स च्या पॉलिसी प्रिस्क्रिप्शन्स चे. म्हंजे अर्थसंकल्पीय्/वित्तीय्/राजकोषिय तूट ही अर्थव्यवस्थेस मंदीतून बाहेर आणण्यास संप्रेरक म्हणून काम करते.
----
डिस्क्लेमर्स -
याचा अर्थ असा नव्हे की - ONLY deficit spending is expansionary.
याचा अर्थ असा ही नव्हे की - Deficit spending is ALWAYS expansionary.
----
सरकारी हस्तक्षेप - ही संज्ञा थोड्या वेगळ्या संदर्भात वापरली जाते.
हे का प्रत्य़क्शात तोत्याचे
हे का प्रत्य़क्शात तोट्याचे ठरेल:
http://indianexpress.com/article/opinion/columns/not-by-babanomics/2/
काळ्या पैशाविषयी एक
काळ्या पैशाविषयी एक शंका.....
समजा मी एक सरकारी अधिकारी आहे. मी दररोज ५००० रु खातो. त्यानुसार मी वर्षाला सुमारे १५ लाख रु भ्रष्टाचार करून मिळवतो. माझे नोकरीचे उत्पन्न २० लाख आहे. मी समजा ३५ लाख रु उत्पन्न दाखवून त्यावर पूर्ण टॅक्स भरला तर ते (भ्रष्टाचारातून मिळवलेले*) १५ लाख रु काळे आहेत की पांढरे?
*आयकर रिटर्नमध्ये मी कुठल्या तरी फुटकळ व्यवसायातून १५ लाख रु मिळवले असे दाखवू शकेन.
पैसा काळा की पांढरा ठरण्याआधी
पैसा काळा की पांढरा ठरण्याआधी एक शंका:
-- मुळात सरकारी नोकरी करताना मिळकीतीच्या दुसर्या सोर्सची (जो काही फुटकळ व्यवसाय दाखवणार आहात त्याची) माहिती सरकारला दिली होतीत काय? त्यांच्याकडून त्याची NOC मिळवली होतीत काय?
बाकी, काळा पैसा म्हणजे नुसता टॅक्स भरलेला पैसा असे वाटत नाही. ज्या पैशाचा उगम (सोर्स) माहिती नाही त्यालाही काळा पैसा म्हणता यावे. अर्थात या केसमध्ये दुसर्या सोर्सची माहिती सरकारला असेल व त्यांनी NOC दिली असेल तर या वरकमाईला पांढरा दाखवता येईल.
व्यवसाय दाखवणे रिटर्न्समध्ये
व्यवसाय दाखवणे रिटर्न्समध्ये अनिवार्य नसते.
तरीही काळा पैसा म्हणजे भ्रष्ट मार्गांनी मिळवलेला पैसा असेही असावे. पण बिल्डर २० टक्के रक्कम रोखीने घेतो त्याला काळा पैसाच म्हणतात (म्हणजे त्याने संपूर्ण पैसा चेकने घेतला तर त्याला व्हाइट म्हणतात. तेव्हा कर न भरलेला पैसा म्हणजे काळा पैसा असे समजले जाते.
(गुंडाने खंडणी म्हणून घेतलेल्या पैशावर टॅक्स भरला तर तो पांढरा पैसा की काळा? उदा. त्याने एक सिक्युरिटी सर्विसेस एजन्सी सुरू केली आणि त्या नावाने खंडणी गोळा केली तर?)
अवांतरः तुम्हाला काळा पैसा म्हणजे नुसता टॅक्स न भरलेला पैसा असे म्हणायचे असावे.
व्यवसाय दाखवणे रिटर्न्समध्ये
व्यवसाय दाखवणे रिटर्न्समध्ये अनिवार्य नसते
माहिती अयोग्य आहे. ऋटर्न भरताना तुम्हाला सोर्स ऑफ ईन्कमचा TAN नंबर सुद्धा द्यावा लागतो.
तुम्ही नोकरी करत असाल तर कम्पनीचा टॅन फॉर्म-१६ वर मिळतोच
शिवाय तुमच्या बँकेतील कारभारावरचे व्याज वगैरेंचा लेखजोखा बँक ज्या रिपोर्टमध्ये देते तिथे तिचा टॅन मिळतो.
जर तुम्हाला पैसे देताना TDS कापलेला नसेल तरी TDS हा विभाग भरावा लागतो ज्यात ही माहिती घेतली जाते.
तरीही काळा पैसा म्हणजे भ्रष्ट मार्गांनी मिळवलेला पैसा असेही असावे. पण बिल्डर २० टक्के रक्कम रोखीने घेतो त्याला काळा पैसाच म्हणतात (म्हणजे त्याने संपूर्ण पैसा चेकने घेतला तर त्याला व्हाइट म्हणतात. तेव्हा कर न भरलेला पैसा म्हणजे काळा पैसा असे समजले जाते.
नव्हे जर बिल्डरने रोखीने घेतलेला पैसा अॅग्रीमेंटमध्ये नमुद असेल व त्यावर स्टँपड्युटी, रजि फी भरलेली असेल तर तो काळा पैसा नसतो.
भ्रष्टाचार हा रोखीमुळे होत नाही ती रोख रक्कम घोषित न केल्याने होतो.
उद्या बिल्डरने ही रक्कम घोषित करायचे ठरवले तर देणाराही अडचणीत येऊ शकेल की त्याच्याकडे ती रक्कम कुठून आली? त्याच्याकडे याचे उत्तर नसेल तर तो अडचणीत येईल
थोडक्यात काळ्यापैशाची
थोडक्यात काळ्यापैशाची व्याख्या, जो व्यवहार/पैसा सरकारला आपल्या आर्थिक लेखाजोख्यात मांडता येत नाही, त्या पैशाच्या अस्तित्त्वाची माहिती नसते असा सगळा पैसा.
वरच्या केसमध्ये भ्रष्टाचारातून मिळालेला पैसा दुसर्या 'अधिकृत' व्यवसायाची मिळकत म्हणून 'घोषित' केला व त्यावर कर भरला तर तो काळा पैसा नसेल. मात्र त्या व्यवसायाला तो पैसा कोणाकडून मिळाला या प्रश्नाचे उत्तर इन्कम टॅक्स विभागाने विचारल्यास देता यायला हवे.
शेती
तुम्ही सांगितलेला प्रकार भारतात राजरोस चालतो.
शेतीतील उत्पन्न म्हणून काहीही पब्लिक खपवते असे ऐकले आहे.
बर्यापैकी काळा पैसा पांढरा होउ शकतो शेतीत. बाकी जमीन खरेदी विक्री व्यवहार वगैरे मध्ये सेफ हेवन्स आहेतच.
तज्ञ किंवा अनुभवी पब्लिकनी माहिती दिली तर बरं होइल.
अवांतर :-
पुण्यात आणि मुंबैत एक बरं आहे. "मी सारा व्यवहार चेकनेच करेन. " असे तुम्ही ठरवल्यावर निदान काही ऑप्शन्स तरी उपलब्ध असतात.
डी एस के, परांजपे वगैरे मंडळी कितीही महागडी म्हणवली जात असली तरी व्यवहारात चोख आहेत. "कॅशनेच रक्कम द्या " असा आग्रह ते धरत नाहित.
अगदि बंग्लो किंवा डुप्लेक्स घेतले तरी तुम्ही काही सोसायट्यांमध्ये संपूर्ण पांढरा व्यवहार करु शकता.
माझ्या मूळ गावी मात्र फ्लॅट - बंग्लो वगैरेची चौकशी करायला गेलो तर सरळ अमुक अमुक टक्के कॅश मध्ये द्यावी लागेल, फ्लॅट्/बंग्लोची कागदोपत्री किंमत इतकी इतकीच असेल असं स्वच्छ सांगण्यात आलं.
डोकं चक्रावलं. जो तो हेच सांगे . बांधकामाच्या पन्नासेक साइट्स बघून शेवटी वैतागून त्या गावाचं ऑप्शनच सोडणं भाग पडलं.
विविध साइट्स्वर खाकी कपडे घातलेले काका आणि पांढरे कपडे घातलेले दाढी मिशा घेतलेले काका पण हातात ब्रिफकेस घेउन येताना दिसले.
माझ्या मूळ गावी मात्र फ्लॅट -
माझ्या मूळ गावी मात्र फ्लॅट - बंग्लो वगैरेची चौकशी करायला गेलो तर सरळ अमुक अमुक टक्के कॅश मध्ये द्यावी लागेल, फ्लॅट्/बंग्लोची कागदोपत्री किंमत इतकी इतकीच असेल असं स्वच्छ सांगण्यात आलं.
मी टॅक्स चुकवण्याचे मन:पूर्वक समर्थन करतो. (मी हे समर्थन करणे तेव्हाच बंद करीन जेव्हा एकतर कल्याणकारी राज्य संपूर्ण बंद होईल. किंवा कल्याणकारी राज्यासाठी लागणारा निधी उभा करताना सरकार तो केवळ ऐच्छिक योगदानातून उभा करेल.)
प्रतिसाद गब्बरभाऊंनाच
प्रतिसाद गब्बरभाऊंनाच होता.
मी टॅक्स चुकवण्याचे मन:पूर्वक समर्थन करतो. (मी हे समर्थन करणे तेव्हाच बंद करीन जेव्हा एकतर कल्याणकारी राज्य संपूर्ण बंद होईल. किंवा कल्याणकारी राज्यासाठी लागणारा निधी उभा करताना सरकार तो केवळ ऐच्छिक योगदानातून उभा करेल.)
ही माहिती मिळाली, पण त्या विचारांमागचं कारण नीट कळलेलं नाही म्हणून म्हटलं.
@गब्बर :- न सुटणारी समस्या
माझ्या मूळ गावी मात्र फ्लॅट - बंग्लो वगैरेची चौकशी करायला गेलो तर सरळ अमुक अमुक टक्के कॅश मध्ये द्यावी लागेल, फ्लॅट्/बंग्लोची कागदोपत्री किंमत इतकी इतकीच असेल असं स्वच्छ सांगण्यात आलं.
मी टॅक्स चुकवण्याचे मन:पूर्वक समर्थन करतो. (मी हे समर्थन करणे तेव्हाच बंद करीन जेव्हा एकतर कल्याणकारी राज्य संपूर्ण बंद होईल. किंवा कल्याणकारी राज्यासाठी लागणारा निधी उभा करताना सरकार तो केवळ ऐच्छिक योगदानातून उभा करेल.)
मी काय करावं अशी अपेक्षा अहे. टॅक्स बुडवण्याचं समर्थन वगैरे ठीक आहे , पण केस अशी ग्रुहित धरा :-
(ह्या केसपुरतं, vat,servie tax आणि इतर खर्च नगण्य, शे-दोनशे वगैरे ग्रुहित धरा.)
समजा मी २० लाखाचा बंगला २ लाख किंमत दाखवून घेतला.१८ लाख कॅश दिले. ठीक?
बिल्डरनं ट्याक्स दिला नाही, हे सोडून द्या.
पाच वर्षानं मला काही कारणानं बंगला विकावा लागतोय. आता किंमत ५० लाख झाली आहे.
मला प्रत्यक्ष झालेला फायदा :- ३० लाख.
मी सरकारला देणं लागतो :- ३० लाखावरील ट्याक्स.(निम्न उत्पन्न व inflation adjusted indexing त्याक्ल्स सूट मिळवली म्हणून १०% ट्याक्स जरी पकडला, तरनयेत.३० लाखाचे १०% म्हणजे तीनेक लाखाहून अधिक देता कामा नयेत.)
प्रत्यक्ष सरकारच्या नजरेत माझा नफा :- ५०लाख - २ लाख. = ४८ लाख.
४८ लाखाचे १०% = ४.८ लाख म्हणजे जवळजवळ ५ लाख!
सरकार मह्णते, ४८ लाख कमावलेस, आता भर पाच लाख बेत्या.
मी कितीही सांगितलं की माझा नफा ३० लाखच आहे, तीन लाखाहून अधिक मी देणं लागत नाही.
तरी उपयोग नाही.
मला पाच लाख भरणं भाग आहे.
आकड्यांत हा फरक का आला ?
कारण सरळ आहे. बिल्डरनं भरायला हवा होता तो ट्याक्स मी भरतोय.
उपाय काय ?
१. अशा माणसाकडून घरच न घेणं
२.बिल्डरनं जशी कमी किंमत दाखवून त्याक्स बुडवलाय, तसेच मी ही करणं
३.गपगुमान बिल्डरच्या ट्याक्स च्या हिश्श्यासकट ट्याक्स मी भरणं.
.
.
.
गब्बर ते समर्थन वगैरे कितीही करत असला, तरी ऐनवेळी सरकार नावाच्या हत्तीनं मला तुडवायला सुरुवात केली तर वाचवायला गब्बर येणार नाही. सरकारचा सरळमार्गी माणसाला धाक आहेच. (ज्यांना असायला हवा त्या गुंड पुंडाना नाही ही ट्राजेडी आहे; पण तो विषय वेगळा.) शिवाय एकदा कायदा आहे म्हटलं, तर तो गंभीरपणं पाळावा असा माझा कल असतो. भलेही मी कायद्याविरुद्ध लै मोठ्या बोंबा मारेन, पण आहे तोवर तो पाळावा.(अनलेस तो अगदि मुळावरच येत नाही. उदा :- bravehart मध्ये दाखवलेला, स्कॉतिश लोकांवर लादला गेलेला share your wife with english nobility छाप कायदा.(तो ही चित्रपटात दाखवलाय, प्रत्यक्षात कधी अस्तित्वात होता की नाही ह्यावरही वाद आहेतच्.तेही असोच.) पण तसं आता हल्ली होत नाही.)(An organisation can NOT run by everyone's opinion and understanding.There will always be people who would complain that they are on wrong side of law.What max we can do is to minimize these people, minimize their loss and be humanitarian.)प्रत्येक जण "मला पटतो तेवडहच काय्दा पाळीन " म्हणू लागल तर सरकारच काय कोणतीच संस्था,instituion चालणार नाही.
.
.
.
सगळं सगळं सोडून द्या. बिल्डर ट्याक्स बुडवतोय, तेव्हा ग्राहकानं काय करायचं? भविष्याचा विचार कसा करायच, हे जरा उलगडून सांगा ब्वा.
हां ते सलमान रश्दी, रासबिहारी बोस, खानखोजे किंवा इतर काही पब्लिक सारखा मी आख्ख्या governement शी भांडण घेउन देशाबहेर जाउ शकतो ही शक्यता नाही; हे सोडून सांगा. ज्यांना बाहेर asylym मिळतो त्यांनी काय वाट्टेल ते डेरिंग मारावं.
नाही तर देशाबाहेर पडण्याचे नक्की काय काय मार्ग आहेत ते तरी सांगा बुवा.
पाच वर्षानं मला काही कारणानं
पाच वर्षानं मला काही कारणानं बंगला विकावा लागतोय. आता किंमत ५० लाख झाली आहे.
थेट उत्तर- उपाय/विकल्प २. किंमत ढीग ५० लाख झाली असेल. तू सरकारला ३ लाख च विक्रीकिंमत आहे हे दाखवू शकतोसच ना. तुझ्याकडून जो फ्लॅट विकत घेणारे त्याला कॅश द्यायला सांगून. या हिशेबाने तुझी टॅक्स लायबिलिटी रु. दहा हजार फक्त.
व मी याचे च समर्थन करतोय. थेट. हे योग्यच आहे. कारण तू जर ५० लाख किंमत दाखवलीस व ५ लाख टॅक्स भरलास तर त्यातुलनेत (प्रपोर्शन मधे) तुला सरकारच्या सेवा मिळतात का ?
हे ५ लाख सरकार ऐतखाऊ गरिबांवर वाटणार आहे. त्यापेक्षा तू त्यांचा वापर जास्त चांगला करू शकतोस. काल नीना मुंक चा दुवा याच साठी दिला होता तुला. जेफ्री सॅक्स चा जो काही "बाझीचा-ए-अत्फाल" चालू आहे त्याबद्दल.
सरकार
ती ४७ लाख रुपये कॅश हॅन्डल कशी करायची ?
हातात घेउन फिरता येणार नाही.
प्लस, काही हितशत्रूंमार्फत सरकारला व्यवहाराची कल्पना मिळाली किंवा इतरही मार्गाने सरकार माग काढत असतेच ; तसे सरकार मागे लागले तर पळायचं कुठे?
शेवटी रहायचं इथच आहे.
एक गब्बर स्टाइल पर्याय :- जो धरायला येइल त्याच्याही घशात पाच्-सात हजार घालायचे.
अरे पण तो पैसे कमावणयतच इंटरेस्टेड आहे, आमची वाजवण्यात नाही, ह्याची ग्यारंटी कोण घेणार ?
आमची वाजवण्यासाठी त्याला अधिक रक्कम कुणी ऑफर केली तर तो सहज फास आवळेल.
किंवा तसंही हल्ली देशाच्या प्रगतीमध्ये अडथळे आणणारी एक बदनाम , नालायक जमात आहे, "प्रामाणिक" लोक नावाची. धरायला आलेली व्यक्ती त्या हरामखोर जमातीपैकी निघाली तर करायचं काय भो?
मुळात व्यवहार चोख असेल तर किंवा काहीही केलं तरी आपण इथून सुटून सहज* जाउ शकतो, ही ग्यारंटी असेल तर आपल्याला अशी घाबरायची गरज पडणार नाही.
आपला आवाज चढता राहणार.
.
.
.
* दाऊदच्या कुटुंबियांना खाजगी प्लेनने एक थोर्थोर, दिग्गज वगैरे वगैरे माजी केंद्रिय मंत्री,माजी मुख्यमंत्री भारताबाहेर सुरक्षित सोडून आले अशी वदंता आहे.
किंवा भोपाळ वायू दुर्घटनेनंतर त्या कंपनीच्या प्रमुख परकीय अधिकार्यालाही तत्कालीन केंद्रिय मंत्र्यानच भारताबाहेर पोचवायची तजवीज केली होती. तर आपण दाउदचे कुटुंबीय असलो तर किंवा इतके दांडगे अधिकारी असलो तर घाबरायची गरज नाही. अदर्वाइज.....
काळा पैसा आणि काळी अर्थव्यवस्था
याबद्दल अनेक मते आणि समज किंवा गैरसमज आहेत. मी अर्थशास्त्रज्ञ नसल्यामुळे त्यांच्या परिभाषेमधून भाष्य करू शकत नाही. सरळ सोप्या शब्दात माझे विचार मांडतो. ज्या पैशाच्या देवघेवीची कुठल्याही हिशोबात नोंद झालेली नाही असा 'अनअकौंटेड पैसा' म्हणजे 'काळा पैसा' अशी त्याची साधी व्याख्या आहे. आपल्या देशातला प्रत्येक माणूस त्याच्याकडे होणारी रोख पैशाची आवक आणि जावक यांच्या काटेकोर नोंदी ठेवतच नाही. संघटित कामगार आणि नोकरवर्गाला मिळणारे वेतन, शासनसंस्थांचे कारभार आणि उद्योगव्यवसायातल्या बँकांमार्फत होणा-या उलाढाली सोडल्या तर इतर बहुसंख्य देवघेवींची नोंद होत नाही ही वस्तुस्थिती आहे.
आपल्याकडे काळ्या रंगालाच 'वाईट' समजले जाते (वर्णद्वेष?) यामुळे 'काळा पैसा'सुद्धा 'वाईट'च समजला जातो, पण असे म्हणत असतांनाच काही लोक तो निर्माण करायला मदत करत असतात (आणि त्याबद्दल फुशारकी मारत असतात.) खालील उदाहरणे पहा. दुकानामधून एकादी वस्तू विकत घेतांना "आपल्याला पावतीची गरज नाही" असे म्हणून काही लोक सेल्सटॅक्स वाचवतात. अशा व्यवहारांमध्ये काही वेळा एक्साइजड्यूटीसुद्धा भरलेली नसते. त्या ग्राहकांनी दुकानदाराला दिलेला (पांढरा) पैसा त्यांच्या पगारामधून राजरोसपणे आलेला असला तर त्याची रीतसर नोंद केलेली असते. पण दुकानदाराकडे गेल्यावर तो 'काळा पैसा' होतो त्याचप्रमाणे त्याच्या ताब्यात असलेली ती वस्तूसुद्धा 'काळी' होते. काही अपवाद वगळता केलेल्या खर्चाचे विवरण ठेवणे आवश्यक नाही. यामुळे एरवी त्या 'काळ्या' व्यवहाराने काहीसुद्धा फरक पडत नाही, पण ती वस्तू चोरीला गेली किंवा काही कारणाने छापा मारतांना त्यात सापडली आणि तिची मालकी सिद्ध करण्याची गरज पडली तर पंचाईत होते. रोजच्या सर्व किरकोळ व्यवहारात (भाजीखरेदी, टॅक्सीचे भाडे, कामवाल्या बाईला दिलेला पगार वगैरे वगैरेमध्ये) कोणीही पावती मागत नाही, त्यावर करही भरायचा नसतो. मग त्याचा रंग काळा होतो का? तत्वतः तो होतोच, पण या प्रश्नाचे उत्तर संदिग्ध वाटते. अशा व्यवहारावर करभार नसेल तर पैसे देणा-याची काहीच चूक नसते, तो गुन्हा ठरत नाही, पण ज्याला ते पैसे मिळतात ती व्यक्ती आयकरपात्र असली आणि तिने ते उत्पन्न हिशोबात दाखवले नाही तर त्या पैशाचा रंग नक्कीच बदलतो. प्रायव्हेट प्रॅक्टिस करणारे बहुतेक डॉक्टर त्यांनी घेतलेल्या फीची पावती क्वचितच देतात. त्यांची रोख कमाई हे याचे उदाहरण म्हणता येईल. मेडिकल क्लेम करण्यासाठी कोणाला पावतीची गरज असल्यास त्यासाठी काही डॉक्टरांची फी वेगळी असते. या उदाहरणात पैशाचा रंग पांढरा राहतो, पण नैतिक दृष्टीने ते किती योग्य आहे याचा विचार करावा लागेल.
परदेशामधून आलेल्या लोकांनी कस्टम्स ड्यूटी कशी वाचवली (किंवा कमी भरली) यातली हुषारी सांगतांना अनेकदा ऐकायला मिळते. ते करतांना काही इम्पोर्टेड वस्तू इतर सामानात लपवल्या जातात, काही नव्या को-या वस्तू रोजच्या वापरातल्या आणि जुन्या असल्याचे दाखवले जाते आणि काही वस्तूंची किंमत कमी करून दाखवली जाते. यात कर चुकवला गेला असला तरी या वस्तू त्या माणसाने स्वतः वापरल्या तर त्यातून काळा पैसा निर्माण होत नाही. पण त्या वस्तू दिसायला चकचकित असल्या तरी कायद्याप्रमाणे त्या वस्तू मात्र 'काळ्या होतील'. त्या विकल्या गेल्या आणि त्याची कुठेच नोंद झाली नाही तर त्यातून मिळालेला नफाच नव्हे तिची सगळी किंमत 'काळ्या पैशात' राहील.
ज्या पैशाच्या देवघेवीची कुठल्याही हिशोबात नोंद झालेली नाही असा अनअकौंटेड पैसा म्हणजे काळा पैसा. कुठल्याही मार्गाने कोणाकडे तो आला आणि त्याने तो बँकेत भरला किंवा त्या पैशामधून जमीनजुमला, सोने, हिरे वगैरे उघडपणे विकत घेतले तर त्याची नोंद होईल. त्यानंतर तो सफेद होईल. पण तो कुठून आला या प्रश्नाचे समाधानकारक उत्तर देता येत नसले तर मात्र लोक असे व्यवहार रोख रकमेत करतात. काही लोक हजार पाचशे रुपयांच्या नोटांची बंडले कपाटातल्या चोरकप्प्यांमध्ये, गाद्या आणि उशांमध्ये, बाथरूममधल्या टाकीत, माळ्यावर वगैरे लपवून ठेवतात असे आपण बातम्यांमध्ये वाचतो किंवा नाटकसिनेमांमध्ये पाहतो. अर्थातच हा सगळा काळा पैसा असतो. पण काळे धन फक्त रोख रकमेमध्ये असते आणि तेसुद्धा हजार पाचशे रुपयांच्या नोटांच्या स्वरूपात असते असे मात्र नाही. त्याचे या स्वरूपात असणे बहुतेक वेळा तात्पुरते असते. शक्य तितक्या लवकर त्याचे स्थावरजंगम मालमत्तेत रूपांतर करण्याचा प्रयत्न केला जातो.
कर वाचवणे हे आर्थिक उलाढालींची नोंद न ठेवण्यामागले एक कारण आहे. त्याखेरीज एकादा व्यवहारच बेकायदा असणे हे मुख्य आणि धोकादायक असे कारण असते. अशा व्यवहाराची नोंद ठेवली तर तो करणारे कायद्याच्या कचाट्यात सापडतात. या व्यवहारात त्याने कर चुकवला एवढेच होत नाही तर अनिष्ट गोष्टी केल्या असे होते. अशा व्यवहारांमध्ये गुंतवलेला, कमावलेला किंवा गमावलेला सगळा पैसा काळा असतो. तो पैसा इतर सामान्य कामासाठीदेखील रोख खर्च केला जातो. अशा या उलाढालींची एक मोठी मालिका तयार होते. त्यातून एक समांतर अर्थव्वस्था (पॅरॅलल इकॉनॉमी) तयार होते. गंमत म्हणजे त्या बाजारातल्या वस्तू केंव्हा सामान्य बाजारातही आल्या आणि तिथून घरी आल्या हे त्या घेणा-याला कळतही नाही.
हा जुना धागा पुन्हा वर आल्याचे पाहून त्यावरील प्रतिक्रियांना हा प्रतिसाद दिला आहे. याने मूळ लेखामधल्या विचारांना कोठे छेद दिला नसावा.
? " " ' ' !
'काळा पैसा' म्हणजे काय?
'काळा पैसा' म्हणजे काय ह्या प्रश्नाला वरील चर्चेमध्ये बरीच वेगवेगळी उत्तरे मिळाली आहेत.
ऋषिकेश म्हणतात, ’थोडक्यात काळ्यापैशाची व्याख्या, जो व्यवहार/पैसा सरकारला आपल्या आर्थिक लेखाजोख्यात मांडता येत नाही, त्या पैशाच्या अस्तित्त्वाची माहिती नसते असा सगळा पैसा.’
आनंद घारे म्हणतात, ’ज्या पैशाच्या देवघेवीची कुठल्याही हिशोबात नोंद झालेली नाही असा 'अनअकौंटेड पैसा' म्हणजे 'काळा पैसा' अशी त्याची साधी व्याख्या आहे.’
नितिन थत्ते म्हणतात, ’ काळा पैसा म्हणजे भ्रष्ट मार्गांनी मिळवलेला पैसा असेही असावे.’
'काळा पैसा' म्हणजे आयकर ह्या संकल्पनेचे अपत्य आहे. जेथे कर आहे तेथे करचुकवेपणा असणार हे मानवी स्वभावास धरूनच आहे. तदनुसार ब्रिटिश दिवसांमध्ये आयकर हिंदुस्तानात आला तेव्हापासून करचुकवेगिरीहि चालू झाली. जेव्हाजेव्हा हा प्रश्न हाताबाहेर जात आहे आणि करभरणीला मोठी गळती लागली आहे असे जाणवले तेव्हातेव्हा ह्या वागणुकीचा अंत करण्याच्या अपेक्षेने कमिशने बसली, त्यांनी सूचना दिल्याप्रमाणे आयकर कायद्यामध्ये बदल झाले, अधिकार्यांना जास्ती अधिकार मिळाले, वेळोवेळी अॅम्नेस्टी योजनाहि मोठया गाजावाजाने जाहीर झाल्या, त्यांना त्या त्या वेळेस कमीअधिक यशहि मिळाले पण मूळ प्रश्न सुटलेला नाही. (तो सुटणारहि नाही. सर्वच देशांच्या आयकर विभागांना हा प्रश्न भेडसावतो आणि प्रत्येक देश आपल्या कुवतीनुसार तो सोडविण्याचा प्रयत्न करीत असतो. आता अर्थव्यवहाराचे मोठया प्रमाणात आन्तर्राष्ट्रीयीकरण झाल्याने प्रश्नाचे स्वरूपहि अधिक जटिल झाले आहे. २५ वर्षांपूर्वी कोणी विशेष न ऐकलेल्या Tax Haven, Double Taxation Avoidance Agreements, Transfer Pricing अशा संकल्पनाहि आता चर्चेत येऊ लागल्या आहेत. Tax Avoidance विरुद्ध Tax Evasion ह्यांमधील धुरकट रेषा स्पष्ट करून सांगण्याचे प्रयत्न कोर्टांकडून केले जात आहेत. ह्या संदर्भात भारतीय सुप्रीम कोर्टाने २०११ च्या ऑक्टोबर महिन्यात वोडाफोन केसमध्ये दिलेला निर्णय वाचनीय आहे. ह्यामध्ये ११,००० कोटि रुपये इतका कर भारतीय आयकर विभागाने वोडाफोनकडून मागितला होता. कोर्टाच्या निर्णयानुसार वोडाफोन कंपनी ह्यातून सुटली. हे कायद्याचे कोडे सुप्रीम कोर्टाने कसे सोडविले ही एक मनोरंजक कथा आहे. अभ्यास करून त्यावर एक चांगला माहितीपूर्ण लेख तयार करता येईल. Tax shelters चा वकिली हुशारीने उपयोग, मॉरिशस रूट अशा अनेक बाबींवर त्यातून प्रकाश टाकता येईल. )
काळा पैसा ह्याची व्याख्या सरळ आहे: ज्या उत्पन्नावर कर द्यावयास हवा पण जे उत्पन्न आयकर विवरणात दाखविले नाही आणि त्यायोगे कर चुकविला ते उत्पन्न म्हणजे काळा पैसा होय. असे उत्पन्न रोखीच्या व्यवहारामधून उत्पन्न झाले वा कसे, हिशेबाच्या वह्या त्यासाठी ठेवल्या होत्या का नाही, उत्पन्न मिळण्यासाठी केलेली कृति कायद्याच्या मर्यादेच्या आत आहे का बाहेर, अशा प्रकारचे सर्व मुद्दे गौण आहेत, हिशेबाच्या वह्या न ठेवताही एखाद्या व्यापार्याने प्रामाणिकपणे सर्व उत्पन्न दाखवून कर भरला तर त्याने काळा पैसा निर्माण केला असे म्हणता येणार नाही. (अर्थात हिशेबाच्या वह्या नसणे ह्यातून त्या व्यापार्यावर आपले उत्पन्न खरोखरच दाखविले आहे तेवढेच आहे, त्याहून अधिक नाही हे दाखविण्याचा भार - onus - अधिक जड होईल हे खरे आहे पण तो भार तो काही अन्य मार्गाने हलका करूहि शकेल. तसेच एखाद्याने गैर मार्गाने काही पैसा जमा केला - उदा. सरकारी अधिकार्याने लाचलुचपतीमधून माया उभी केली आणि ती माया उजळपणे वापरता यावी म्हणून एक कपोलकल्पित व्यवसाय दाखवून त्या व्यवसायाचे हे उत्पन्न आहे असे भासवून पूर्ण कर भरला तर लाच घेतली हा त्याने जो गुन्हा केला तो अलाहिदा, पण त्याचा हा पैसा काळा नाही.) अशी अनेक उदाहरणे देता येतील.
काळ्या पैशाचा मूळ उगम कर चुकविण्याच्या इच्छेतून निर्माण होतो हे वर म्हटलेच आहे. पण असा पैसा एकदा निर्माण खाला की तो एक स्वत:ची अशी शृंखला बनवितो आणिओ त्या शृंखलेमधून नवानवा काळा पैसा निर्माण होत राहातो. हे समजण्यासाठी एका ’प्रामाणिक’ बांधकामव्यवसायिकाचे उदाहरण घेऊ. आपले हे श्री. बिल्डर हे तसे कायद्याला भिऊन असतात आणि व्यवसायातून मिळालेला पैसा बिनधास्त उपभोगता यावा म्हणून आपल्या व्यवसायाच्या उत्पन्नावर लागेल तो कर द्यायची त्यांची प्रामाणिक इच्छा आहे. नवी इमारत बांधण्य़ासाठी त्यांना एक मोक्याची जागा हवी आहे. त्या जागेचे भाव पुढेमागे वाढणार अशा हिशेबाने श्री. जागामालक ह्यांनी दहा वर्षांपूर्वीच ही जागा विकत घेऊन मोकळी ठेवली आहे आणि आता तिचा भाव पुरेसा वर गेल्यामुळे ती विकायला ते तयार आहेत. जागेची अपेक्षित किंमत रु. ५० लाख आहे. ही जागा त्यांनी १० वर्षांपूर्वी ५ लाखाला घेतली होती म्हणजे -अन्य किरकोळ खर्च बाजूस ठेवले तर - त्यांना ४५ लाख उत्पन्न ह्यातून मिळेल. त्यांची ही गुंतवणूक भांडवली धरली गेली तर त्यांना ह्या रकमेवर भांडवली उत्पन्नाच्या कराअकरणीच्या दराने कर भरावा लागेल. अशा प्रकारची अनेक उत्पन्ने त्यांनी मिळविली असली तर ही जमीन त्यांचा स्टॉक-इन-ट्रेड मानला जाऊन त्यांना ह्या उत्पन्नावर व्यापारी उत्पन्नाच्या कराच्या दराने त्यांना कर भरावा लागेल. कशाहि मार्गाने विचार केला तरी काही कर भरावाच लागेल. ह्यावर एक मार्ग म्हणजे ते श्री. बिल्डर ह्यांना सांगतात की आपण जागेची किंमत कागदावर २५ लाखच दाखवू आणि २५ लाख तुम्ही मला रोख स्वरूपात विक्रीकरार नोंदविण्यापूर्वी द्यावा. आता श्री. बिल्डर ह्या प्रामाणिक माणसापुढे दोन रस्ते आहेत. एक म्हणजे मला हे करायचेच नाही असे रामशास्त्री बाण्याचे उत्तर देऊन जागेचा नाद सोडायचा किंवा २५ लाख रोख द्यायचे. ही रक्कम ते आपल्या खात्यातून काढून देऊ शकतात पण त्या कृतीला अन्य फाटे फुटू शकत असल्याने ते तसे करत नाहीत. त्याऐवजी आपल्या प्रस्तावित बिल्डिंगमध्ये बुकिंग करायला आलेल्या प्रत्येकाकडून दीडदोन लाख रोख घेऊन २५ लाख श्री. जागामालक ह्यांना देतात. साहजिकच प्रस्तावित इमारतीतील प्रत्येक गाळा असा हिशेबात कमी किंमतीचा दिसल्याने त्यांच्याकडूनहि उत्पन्नाची चोरी व्हायची शक्यता निर्माण होते.
इकडे श्री जागामालक कर चुकविलेल्या काळ्या २५ लाखाचे काय करतील? त्याला उत्तरे असंख्य आहेत. एकतर ते दुसर्या व्यवहारात ती रक्कम वापरतील आणि हे चक्र थोडे पुढे नेतील. आपल्या मुलाच्या मेडिकल प्रवेशासाठी मेडिकल कॉलेजच्या व्यवस्थापनातील उच्चपदस्थांना ती रक्कम पोहोचवतील. आपल्या परदेश प्रवासासाठी काळ्या बाजारात डॉलर्स घ्यायला ती वापरतील. मुलीच्या लग्नात सढळ हाताने खर्च करतील, तिच्या अंगावर भरपूर सोने घालतील इत्यादि इत्यादि.
काळा पैसा कसा निर्माण होतो आणि तो निर्माण झाल्यावर वापरात आणण्यासाठी काय तोडगे शोधले जातात ह्यावर लिहावे तितके थोडेच आहे. वानगीदाखल एकच मजेदार उदाहरण देतो.
१९८५च्या पुढेमागे तथाकथित गुंतवणूक कंपन्यांची हवा शेअरमार्केटात निर्माण झाली. कोणीहि असल्या फॅन्सी नावाची कंपनी शेअरमार्केटात नोंदविली की भोळ्या गुंतवणूकदारांच्या त्या कंपन्यांच्या शेअर्सवर उडया पडू लागल्या. ह्याचा फायदा उठविण्यासाठी काही किरकोळ खर्च करून बर्याच बोगस कंपन्या - ज्यांना shell companies असे म्हणतात - नोंदवून शेअरमार्केटात आणल्या गेल्या. शेअर मार्केटात नोंदणी करायचे तेव्हाचे नियम अगदीच ढिले होते. कोणीहि उठावे आणि १-२ कोटि भांडवलाच्या कंपनीची शेअर मार्केटात नोंदणी करून घ्यावी अशी परिस्थिति होती. अशा शेल कंपन्यांचे तयार केलेले कायदेशीर कागदपत्र त्यांच्या निर्मात्यांनी बाजारात विकले. विकत घेणारे होते काळा पैसा धंद्यात उजळमाथ्याने वापरण्याचा मार्ग शोधणारे मुख्यत्वेकरून कलकत्त्यामधील काही लोक. त्यांनी हे कागदपत्र ताब्यात घेऊन कंपनीचे अधिकृत भांडवल गोळा करण्याची प्रक्रिया सुरू केली. त्या साठी आपलेच पित्ते वापरून त्यांना आपल्याजवळचेच भांडवल (जवळचाच काळा पैसा) मागून पुरवून ती रक्कम शेअर कॅपिटल म्हणून जमा केली. लवकरच कंपनीच्या शेअर्सची शेअर बाजारात खरेदीविक्री सुरू झाली आणि काही दिवसात वा महिन्यात १० रुपयाचा शेअर १ रुपया, २ रुपये असा क्वोट होऊ लागला. ही सर्व उलाढाल आणि भाव पाडणे हे आतीलच लोकांनी केले होते. भाव पुरेसे खाली आणल्यावर काळा पैसा वापरात आणू इच्छिणार्या मूळच्या लोकांनी १० रुपयाचे ते शेअर्स १ वा २ ला घेतल्याचा देखावा केला. अशा रीतीने १० रुपये आता कंपनीचे भांडवल म्हणून पांढरे झाले आणि हे करायला पित्त्यांना शेअरमागे १-२ रुपये द्यावे लागले एव्हढीच किंमत. त्याच १० रुपयावर उत्पन्न म्हणून कर भरला असता तर तो ३-४ रुपये तरी झाला असता. Not a bad bargain! हे झाल्यावर कंपनीचे काम संपले. ती नावाने शिल्लक आहे पण काहीच व्यवसाय करीत नाही
आयकर विभागाने हे सर्व कारस्थान त्यांना माहीतच असल्याने एकूण भांडवलच unexplained investment म्हणून कलम ६९ खाली उत्पन्नात धरण्याचा प्रयत्न करून पाहिला पण तो यशस्वी होणारच नव्हता. कारण कंपनी आणि तिचे शेअरहोल्डर्स ह्या कायद्याने भिन्न व्यक्ति असल्याने कंपनीत झालेली गुंतवणूक तिच्या प्रमुख शेअरहोल्डर्सचे भांडवल मानणे अपीलात टिकले नाही. आयकर खात्याशी पंगा घेणे फार परवडणारे नसल्याने अखेर आयकर विभाग आणि असे लोक ह्यांच्यामध्ये अखेर समझोता झाला आणि ३०% भांडवल उत्पन्न म्हणून कंपनीने दाखवून त्यावर कर भरावा असे उभयपक्षी ठरले.
नवीन माहिती कळल्याने आनंद
नवीन माहिती कळल्याने आनंद झाला. मात्र कार्यकारणभाव काहीच न समजल्याने या अधांतरी तरंगणाऱ्या माहितीचं काय करावं या संभ्रमात मी पडलेलो आहे.
कार्यकारण भाव हा आहे की - श्रीमंत व उच्च-मध्यमवर्गाकडून जबरदस्तीने जमा केलेला टॅक्स हा कल्याणकारी राज्य चालवण्यासाठी वापरला जातो. तो खरं म्हंजे संपूर्णपणे "पब्लिक गुड्स" पुरवण्यासाठी वापरला गेला पाहिजे. व जर कल्याणकारी राज्य चालवायचे असेल तर त्यासाठी लागणारा निधी हा ऐच्छिक योगदानातूनच उभा केला पाहिजे.
गरिबांना अन्न/वस्त्र्/निवारा पुरवणे हे सरकारचे काम असेलही पण ते काम पार पाडण्यासाठी निधी हा जबरदस्तीने टॅक्स द्वारे उभा करायचा नाही.
पण सरकार असे करत नाही. सरकार हे श्रीमंतांकडून/उच्च मध्यमवर्गाकडून जबरदस्तीने टॅक्स वसूल करते व उलट त्यांच्यावरच भुंकायला सुरु करते. गरिबांकडून एक पै ही टॅक्स घेत नाही व त्यांच्या सेवेस मात्र स्वस्त अन्न, धान्य, सबसिड्या, पाणी, स्वस्तदरात कर्ज, बियाणे, कर्जमुक्ती, कर्जमाफी, रोहयो, लाडली लक्ष्मी योजना, संजय गांधी निराधार योजना ....... राबवते. ह्या सगळ्यास माझा सक्त विरोध आहे.
एकदा व्यक्तीने टॅक्स दिला की तो पैसा देशाचा झाला. हे ठीक आहे. पण ९०% लोकांकडून टॅक्सच न घेणे हे ही अयोग्य आहे. व त्यांच्याकडून टॅक्स घ्यायचा नाही ते नाही ... पण वर त्यांना वरील सगळ्या सुविधा द्यायच्या - हा टॅक्स देणार्यावर सरळ सरळ प्रचंड अन्याय आहे.
देशात जर सगळे समान असतील (एक व्यक्ती एक मत) तर सगळ्यांनी समान टॅक्स भरायला हवा. समान अधिकार व समान जबाबदार्या.
पण असे होत नाही.
म्हणून मी काळा पैसा, टॅक्स चुकवणे, स्वीस ब्यांकेतील अकाऊंट्स - या सगळ्याचे थेट समर्थन करतो. श्रीमंतांनी व उच्च मध्यमवर्गाने भरपूर टॅक्स चुकवावा व काळा पैसा बाळगावा, स्वीस ब्यांकेत अकाऊंट्स उघडावे, टॅक्स हेवन्स मधे असलेल्या फंडांमधे पैसे गुंतवावेत, गरिबांच्या (असल्यानसल्या) मालमत्तेच्या अधिकाराचे उघडउघड/सरळसरळ उल्लंघन करावे असे मला मनापासून वाटते. याउप्पर जर गरीब हिंसामार्गाचा अवलंब करणार असतील असे दिसले तर दयामाया न बाळगता त्यांवर preemptive attack करावा.
(माझ्याशी शंभरातले दोनशे लोक असहमत असणारेत हे मला माहीती आहे.)
>>जर कल्याणकारी राज्य
>>जर कल्याणकारी राज्य चालवायचे असेल तर त्यासाठी लागणारा निधी हा ऐच्छिक योगदानातूनच उभा केला पाहिजे.
गरिबांना अन्न/वस्त्र्/निवारा पुरवणे हे सरकारचे काम असेलही पण ते काम पार पाडण्यासाठी निधी हा जबरदस्तीने टॅक्स द्वारे उभा करायचा नाही.
तुम्ही विसरताय ........
असे करण्यास मीच (आणि तुम्हीसुद्धा) आपल्या सरकारला सांगितले आहे. सरकार माझे आणि तुमचे (नोकर) असल्याने माझे आणि तुमचे ऐकणे सरकारला भागच आहे.
पण सरकार असे करत नाही. सरकार हे श्रीमंतांकडून/उच्च मध्यमवर्गाकडून जबरदस्तीने टॅक्स वसूल करते व उलट त्यांच्यावरच भुंकायला सुरु करते. गरिबांकडून एक पै ही टॅक्स घेत नाही व त्यांच्या सेवेस मात्र स्वस्त अन्न, धान्य, सबसिड्या, पाणी, स्वस्तदरात कर्ज, बियाणे, कर्जमुक्ती, कर्जमाफी, रोहयो, लाडली लक्ष्मी योजना, संजय गांधी निराधार योजना ....... राबवते. ह्या सगळ्यास माझा सक्त विरोध आहे.
एकदा व्यक्तीने टॅक्स दिला की तो पैसा देशाचा झाला. हे ठीक आहे. पण ९०% लोकांकडून टॅक्सच न घेणे हे ही अयोग्य आहे. व त्यांच्याकडून टॅक्स घ्यायचा नाही ते नाही ... पण वर त्यांना वरील सगळ्या सुविधा द्यायच्या - हा टॅक्स देणार्यावर सरळ सरळ प्रचंड अन्याय आहे.
एखादी गोष्ट पुन्हा पुन्हा सांगितली की ती खरी वाटू लागते असे म्हणतात तशीच गरीबांकडून टॅक्स घेतला जात नाही ही गोष्ट आहे.
केंद्राचा एकूण टॅक्स रेव्हेन्यू १२ लाख ३५ हजार कोटी. त्यातील आयकर फक्त २ लाख ४७ हजार कोटी (म्हणजे २०%) कॉर्पोरेट टॅक्स ४ लाख १९ हजार (म्हणजे ३४%). याबरोबरच राज्यांचा एकूण टॅक्स रेव्हेन्यू ३० लाख कोटी जो मुख्यत्वे व्हॅट मधून येतो. व्हॅट हा वस्तूच्या विक्रीवर लावल्यामुळे गरीब श्रीमंत दोघांनाही तो लावला जातो. या आकड्यांची तुलना केली तर केवळ श्रीमंतांकडून (आणि उच्च-कनिष्ठ मध्यम वर्गा कडून) घेतला जाणारा टॅक्स का एकूण करांच्या १४% सुद्धा नाही. सो द क्लेम इज नॉट टेनेबल.
अधिक आकडे पाहिले तर अधिकच डिटेल्स दिसतील.
झोपडपट्टीत राहणार्यांविषयी सुद्धा असाच समज प्रचलित आहे. परंतु थोड्या थोड्या काळाने काही विशिष्ट तारखेपर्यंतच्या झोपड्या अधिकृत केल्या जातात. २००५ पर्यंतच्या झोपड्या अधिकृत झाल्या असतील तर त्या सर्व झोपड्यांकडून पाणीपट्टी, आणि म्युनिसिपल टॅक्स घेतला जातो. (रादर अधिकृत करण्याचे कारणच टॅक्स घेता यावा हे असते).
देशात ज्या प्रमाणात ज्याला सेवा सुविधा मिळतात त्या प्रमाणात त्याच्याकडून टॅक्स घेतला जातोच.
खालील लिंका पहा - (यात
खालील लिंका पहा - (यात व्यक्तीगत प्राप्तीकराचा डेटा आहे).
१) दुवा 1
२) दुवा 2
३) दुवा 3
४) दुवा 4
५) दुवा 5
यात काही लोकांनी ५ कोटी, ८ कोटी रुपये प्राप्तीकर भरल्याचा डेटा आहे -
१) या लोकांनी खरे उत्पन्न दाखवले तर कदाचित या लोकांची टॅक्स लायबिलिटी कायद्यानुसार याही पेक्षा जास्त असेलही.
२) मी असे गृहित धरतो की वृत्तपत्रात आलेला डेटा हा किमान काही प्रमाणावर तरी विश्वसनीय असतो. हा डेटा खोटा आहे असे तुम्ही म्हणत असाल तर मी माझे आर्ग्युमेंट बिनशर्त मागे घेतो. मी तुम्हास असे विचारणार नाही की तुम्ही कशाच्या जोरावर हा डेटा खोटा आहे असे म्हणता. कारण हा खरा आहे असा मी दावा केला तरी तो कशाचा जोरावर खरा आहे हे मी सांगू शकत नाही. मी केवळ गृहित धरू शकतो.
३) यातल्या काहीजणांचा डेटा अॅडव्हान्स टॅक्स आहे. व अॅक्च्युअल टॅक्स कमी जास्त असू शकतो.
नितीन भाऊंना प्रश्न - या लोकांनी केंद्रसरकारच्या अशा कोणत्या सेवा वापरल्या की ज्यांची किंमत ५ कोटी रुपये प्रतिवर्षी आहे ?
>>नितीन भाऊंना प्रश्न - या
>>नितीन भाऊंना प्रश्न - या लोकांनी केंद्रसरकारच्या अशा कोणत्या सेवा वापरल्या की ज्यांची किंमत ५ कोटी रुपये प्रतिवर्षी आहे ?
असं पर्सन टु पर्सन@ तुलना करणं चूक आहे. प्रश्नाचं उत्तर असंही देता येईल की त्यांना इतके पैसे मिळवता यावेत म्हणून शासन लॉ अॅण्ड ऑर्डर नावाचं काहीतरी चालवते. त्याचा अप्रत्यक्ष लाभ मिळतो. श्रीमंतांच्या बेटावर इतरांनी आक्रमण करू नये अशी तजवीज सरकार करते. आक्रमण करण्याची इच्छा होऊ नये* अशा प्रकारची धोरणं राबवते. राजेश घासकडवींनी इन्शुरन्स पॉलिसी चं उदाहरण दिलं आहे ते योग्य आहे.
@ तुम्ही एक्स्ट्रीम उदाहरणे घेऊन तुलना करू शकत नाही. तशा तुलनेत डिस्टॉर्शन दिसू शकते.
* समाजवादाच्या काळात टॅक्सही जास्त घेत असत आणि शिवाय हे लोक बांडगुळ आहेत असा प्रचारही करत असत त्याला कदाचित चुकीचे म्हणता येईल.
अवांतर: शिवाय प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की या लोकांनी पर्सनली असं काय "काम" केलं त्याबद्दल त्यांना इतके पैसे मिळाले?
+१ -१
असं पर्सन टु पर्सन@ तुलना करणं चूक आहे. प्रश्नाचं उत्तर असंही देता येईल की त्यांना इतके पैसे मिळवता यावेत म्हणून शासन लॉ अॅण्ड ऑर्डर नावाचं काहीतरी चालवते. त्याचा अप्रत्यक्ष लाभ मिळतो. श्रीमंतांच्या बेटावर इतरांनी आक्रमण करू नये अशी तजवीज सरकार करते. आक्रमण करण्याची इच्छा होऊ नये* अशा प्रकारची धोरणं राबवते. राजेश घासकडवींनी इन्शुरन्स पॉलिसी चं उदाहरण दिलं आहे ते योग्य आहे.
@ तुम्ही एक्स्ट्रीम उदाहरणे घेऊन तुलना करू शकत नाही. तशा तुलनेत डिस्टॉर्शन दिसू शकते.
* समाजवादाच्या काळात टॅक्सही जास्त घेत असत आणि शिवाय हे लोक बांडगुळ आहेत असा प्रचारही करत असत त्याला कदाचित चुकीचे म्हणता येईल.
ह्या सगळ्याला +१
शिवाय प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की या लोकांनी पर्सनली असं काय "काम" केलं त्याबद्दल त्यांना इतके पैसे मिळाले?
हा प्रश्न विचारणं चूक आहे असं विविध गप्पांतून जाणवलं.
कुणालातरी ते करताहेत त्याला "काम" म्हनावसं वाटलं, आणि कुनीतरी त्यांना ती रक्कम दिली हे मान्य करणं भाग आहे.
अन्यथा सेवा क्षेत्रातील सगळ्यांच्याच पोटावर पाय यायचा.
खेलाडू, कलाकार हे मेले तरी काही फरक पडत नाही. जीवनाचं रहाटगाडगं सुरु राहू शकतं; असं मी माने.
प्रत्यक्ष शेत पिकवणारा, किम्वा शेतमाल वाहून नेनारा, त्याचा लेखा जोखा ठेवणारा इत्यादींचीच काय ती "गरज" समाजाल आहे.
इतर साली बांडगुळच.
निदान खेळाडू, कलाकार हे असे अव्वाचय सव्वा कसे कामवतात हे अजूनही समजलं नाही.
अन्न हे केंद्र पकडलं आणि त्यापासून दूर दूर जाणारं एक स्पायरल टाइप वर्तुळ काढलं तर जितके तुम्ही दूर जाल, तितके तुम्ही अधिक उत्पन्न कमावाल असं दिसतं.
कारण ठाउक नाही, पण असं आहे खरं.
एकदा चलनव्यवस्था व त्याही पूर्वी एक्स्चेंज व्यवस्था नामक प्रकर मान्य केला हे सगळच त्यात आलं.
.
.
विशिष्त पातळीन्म्तरच्या आर्थिक उलाधाली ह्या प्रत्यक्षात "निर्माण" काहिच करत नाहित. फक्त सट्टा असतो, रकमेचे हस्तांतरण असते.
derivatives, superderivatives व त्याचे भाउबंद; अगदि forex market सुद्धा हे असेच काहीही निर्माण न करता फक्त उलाढाल करीत राहतात.
it turns out to be a zero sum gain.
लॉजिकल विस्तार
अन्न हे केंद्र पकडलं आणि त्यापासून दूर दूर जाणारं एक स्पायरल टाइप वर्तुळ काढलं तर जितके तुम्ही दूर जाल, तितके तुम्ही अधिक उत्पन्न कमावाल असं दिसतं
ह्याचेच लॉजिकल विस्तारीकरण असे मांडता येईल -
कोणत्याही राष्ट्राचा GDP मुख्यत्वे तीन मार्गांतून येतो. शेतीमाल, उद्योग-धंदे आणि सेवा क्षेत्र.
ढोबळमानाने असे दिसते की जी राष्ट्रे अविकसीत आहेत, त्यांचा GDP बह्वंशी शेतीक्षेत्रातून येतो. जी राष्ट्रे विकसनशील आहेत, त्यांचा GDP बव्हंशी उद्योग-धंद्यातून येतो. आणि जी राष्ट्रे विकसीत आहेत, त्यांचा GDP बव्हंशी सेवाक्षेत्रातून येतो. काही अपवाद असतीलच पण ते नियम सिद्ध करण्यापुरते.
असं पर्सन टु पर्सन@ तुलना
असं पर्सन टु पर्सन@ तुलना करणं चूक आहे. तुम्ही एक्स्ट्रीम उदाहरणे घेऊन तुलना करू शकत नाही. तशा तुलनेत डिस्टॉर्शन दिसू शकते.
मी एक्झॅक्टली डिस्टॉर्शन बद्द्ल च बोलतोय. I am not talking about general things in which there are distortions or outliers. I am only talking about outliers.
दुसरे म्हंजे पर्सन टू पर्सन तुलना हीच इष्ट आहे. Because that is the only thing that should matter. Because the basis of democratic policy is one vote per person.
काही लोकांवर प्रचंड टॅक्स्/कॉस्ट इंपोझ करून त्यातून दुसर्या काही लोकांना बेनिफिट्स देणे (without letting them incur any costs) हे अन्याय्य शिवाय दुसरे काही असूच शकत नाही.
----
अवांतर: शिवाय प्रश्न असा विचारला जाऊ शकतो की या लोकांनी पर्सनली असं काय "काम" केलं त्याबद्दल त्यांना इतके पैसे मिळाले?
Josepth Stiglitz asked similar question - In last few years rich have increased their income by 300%. But what did the rich do so great that led them to be so productive that they deserved 300% increase in income ?
यावर उत्तर हे की What did the poor do so great that they deserve minimum wage ? wealth distribution ? subsidies ? Food stamps ? Food security ? MNREGA ? लाडली लक्ष्मी योजना (ही व्यक्ती तर आत्ताच जन्मास आलेली आहे व तिच्यामधे आपण अशी काय प्रॉडक्टिव्हिटी पाहीली की - She deserves so and so Rupees to be deposited in her name by default ? (I know that the main/hidden goal of this लाडली लक्ष्मी scheme is to prevent female foeticides but...)
हा प्रश्न विचारण्याचा सरकारला अधिकार कसा ? बंडोपंतांनी चिंतोपंतांना सेवा पुरवली व त्याबदल्यात चिंतोपंतांनी बंडोपंतांना मोबदला दिला. बंडोपंतांना सेवा देण्यास नकार देण्याचा अधिकार होता तसेच चिंतोपंतांना सेवा घेण्याचे बंधन नव्हते. तसे सरकारचे नसते. टॅक्स देणे हे वैकल्पिक नसते.
------
त्यांना इतके पैसे मिळवता यावेत म्हणून शासन लॉ अॅण्ड ऑर्डर नावाचं काहीतरी चालवते. त्याचा अप्रत्यक्ष लाभ मिळतो.
हॅरोल्ड डेम्सेट्झ यांनीही अशाच स्वरूपाचे पण जास्त पटणेबल आर्ग्युमेंट केले होते - की - the provision of a market (for the side effect [e.g., smoke-stack emissions that fall on nearby houses]) is itself a valuable and costly service.
जर लॉ अँड ऑर्डर ही बहुमूल्य सेवा आहे तर ती पुरवण्याचे शुल्क श्रीमंतांनी Direct + Indirect टॅक्स देऊन भरायचे. श्रीमंतांनी घेतलेल्या वस्तूंवर जास्त विक्रीकर लावून त्याचा incidence श्रीमंतांवरच जास्त कसा पडेल - याची काळजी घेऊन सेल्सटॅक्स चा रेट लावायचा. व दुसरीकडे गरिबांनी Indirect टॅक्स दिला असे अनौपचारिक रित्या जाहीर करायचे. (किती व कोणता याचा कोणताही लेखाजोखा न देता.) आणि वर गरिबांना सगळ्या सबसिड्या, कर्जमाफी, स्वस्त दरात धान्य वगैरे पण द्यायचे ???
आणि वर श्रीमंत डिस्टॉर्शन/आऊट-लायर आहेत तेव्हा व्यक्ती टू व्यक्ती तुलना करायची नाही असे ही जाहीर करायचे - ही अन्यायाची परिसीमा झाली.
गब्बरभौ: तुमचा आक्षेप नक्की
गब्बरभौ:
तुमचा आक्षेप नक्की कशावर आहे?
अ. सरकारने कोणताही टॅक्स घेण्यावर?
ब. सरकारने आयकर वा इतर डायरेक्ट टॅक्स घेण्यावर?
क. सरकारने प्रत्येक वर्गाकाडून वेगळ्या दराने टॅक्स लावण्यावर?
ड. समाजवादी सरकारने श्रीमंतांकडून जास्त टॅक्स घेण्यावर?
ई. टॅक्स ज्या प्रमाणात त्या प्रमाणात अधिकच्या/कमीच्या सोयी न पुरवण्यावर?
फ. इतर काही?
पहिला आक्षेप "तुमचा" या
पहिला आक्षेप "तुमचा" या शब्दावर आहे. :-)
काही लोकांकडून जबरदस्तीने पैसा घेऊन तो गरिबांकडे हस्तांतरित करणे - यावर आक्षेप आहे. जबरदस्तीवर आधारलेले कल्याणकारी राज्य - यावर आक्षेप आहे. From the one with the best of ability to the one with best of the need - यावर आक्षेप आहे.
सगळ्यांना एक मत असेल तर सगळ्यांकडून समान टॅक्स घ्यायला हवा. If a person wants equal say in the policy making (one person one vote) then the person should make equal payment of tax. - या नियमापासून कोणतेही डेव्हिएशन होत असेल तर त्यावर आक्षेप आहे.
तूर्त इतके पुरे.
चला वाद घालू या: स्मृतीहीन विश्लेषण अंक पहिला
काही लोकांकडून जबरदस्तीने पैसा घेऊन तो गरिबांकडे हस्तांतरित करणे - यावर आक्षेप आहे.
'सरकार' समजा निरुद्योगी गरीबांनी शक्कल लढवून निर्माण केलेली एक कंपनी आहे. आता या कंपनीने श्रीमंतांकडून पैसे लाटल्यास त्यात आक्षेपार्ह काय आहे? श्रीमंतांनी शक्कल लढवून 'सरकार' या कंपनीचा ताबा मिळवायला हवा. (श्रीमंत तसे करतही असतील.)
गब्बर ठशातः उत्पादक श्रीमंत आणि रिकामटेकडे-ऐतखाऊ गरीब यांच्या सरकारवर ताबा मिळवण्याच्या रिपिटेड गेममध्ये नेहमी (भारतात तरी) गरीब जिंकत असल्यास यास गरीबांच्या बौद्धिक मालमत्तेचा परतावा समजला जावा, असे मत ऑस्ट्रियन लोक कसे चुकीचे ठरवतील?
ठीक आहे. निरुद्योगी गरीबांनी
ठीक आहे. निरुद्योगी गरीबांनी शक्कल लढवून निर्माण केलेली एक कंपनी जर सरकार असेल आणि या कंपनीने श्रीमंतांकडून पैसे लाटले तर ते आक्षेपार्ह नसेल तर - श्रीमंतांनी काळा पैसा बाळगणे, स्वीस ब्यांकेत अकाउंट उघडणे, टॅक्स हेव्हन मधील फंडात पैसा गुंतवणे, गरिबांची सर्वात महत्वाची मालमत्ता - त्यांचे शरीर - यावर बेबी केमिकल वेपन्स चा मारा करून गरिबांना मारणे - हे ही आक्षेपार्ह नाही. लेट द फन बिगिन.
फडतूसांचे कैवारी क्रुगमन म्हणतात तसे एकॉनॉमी इज नॉट अ मोरॅलिटी प्ले.
Reasonable people use violence or threat thereof - असे जर म्हंटले तर ते खरे आहे.
----
उत्पादक श्रीमंत आणि रिकामटेकडे-ऐतखाऊ गरीब यांच्या सरकारवर ताबा मिळवण्याच्या रिपिटेड गेममध्ये नेहमी (भारतात तरी) गरीब जिंकत असल्यास यास गरीबांच्या बौद्धिक मालमत्तेचा परतावा समजला जावा, असे मत ऑस्ट्रियन लोक कसे चुकीचे ठरवतील?
मी काही ऑस्ट्रियन स्कूल चा समर्थक नाही. ते वाचलेले आहे. पण समर्थक नाही.
गरीब जिंकत असल्यास यास गरीबांच्या बौद्धिक मालमत्तेचा परतावा समजला जावा. अवश्य.
... हे ही आक्षेपार्ह
... हे ही आक्षेपार्ह नाही.
फ्रेमवर्कमध्ये आक्षेपार्ह नाही.
त्याच फ्रेमवर्कमध्ये 'फडतूस' गरीबांनी खोटेच गळे काढणे हेही आक्षेपार्ह नसावे कारण तो त्यांच्या स्ट्रॅटजीचा भाग आहे. म्हणजेच सरकारने वगैरे वगैरे शक्कल लढवून कर चूकवणार्या चतुर श्रीमंतांना जबरदस्तीने शिक्षा करणेही गैर नाही.
वोक्के
हे फ्रेमवर्क मारवाड्याच्या दुकानातील गीतासाराप्रमाणे आहे: 'जो हुआ अच्छा हुआ, जो हो रहा है अच्छा हो रहा है, जो होयेंगा वोभी अच्छा होयेंगा'. तर मग गब्बरभाऊशेठ, तूमचे शब्द बोल्ड बोल्ड ठसामें अंडरलाइन घालके कायको चिल्लाते भाई? तुमतो ऑस्ट्रियन स्कुलकाभी नहीं.
मै ऑस्ट्रियन स्कूल का नही
मै ऑस्ट्रियन स्कूल का नही लेकीन उनको मिसरिप्रेझेंट करनेवाले बहोत मिल जायेंगे. ऑस्ट्रियन स्कूल हे माझ्यासारखे गरीब विरोधी (क्रूर, खुनशी, निष्ठूर) नाही. व मी ऑस्ट्रियन स्कूलच काय इतर कोणत्याही स्कूल ला मिसरिप्रेझेंट करणारे भेटले की त्यांच्या विरूद्ध प्रतिवाद करण्याचा यत्न करतो.
खालील दुवा ऑस्ट्रियन स्कूल वर केली गेलेली प्रॉपर टीका आहे -
मै ऑस्ट्रियन स्कूल का नही
मै ऑस्ट्रियन स्कूल का नही लेकीन उनको मिसरिप्रेझेंट करनेवाले बहोत मिल जायेंगे. ऑस्ट्रियन स्कूल हे माझ्यासारखे गरीब विरोधी (क्रूर, खुनशी, निष्ठूर) नाही. व मी ऑस्ट्रियन स्कूलच काय इतर कोणत्याही स्कूल ला मिसरिप्रेझेंट करणारे भेटले की त्यांच्या विरूद्ध प्रतिवाद करण्याचा यत्न करतो.
खालील दुवा ऑस्ट्रियन स्कूल वर केली गेलेली प्रॉपर टीका आहे -
http://econfaculty.gmu.edu/bcaplan/whyaust.htm
---
बोल्ड बोल्ड ठसामें अंडरलाइन घालके कायको चिल्लाते भाई - हे तुमचे म्हणणे मात्र सुयोग्य आहे.
हे फ्रेमवर्क मारवाड्याच्या
हे फ्रेमवर्क मारवाड्याच्या दुकानातील गीतासाराप्रमाणे आहे: 'जो हुआ अच्छा हुआ, जो हो रहा है अच्छा हो रहा है, जो होयेंगा वोभी अच्छा होयेंगा'.
(नंदन मोड) म्हणजे वैचारिक दृष्ट्या लेझी-अफेयर? (नंदन मोड संपला)
काहीही चालू द्यावं अशी मागणी करणारे नेहमीच - सरकारने धंद्याच्या बाबतीत नाक खुपसू नये, मात्र वैयक्तिक मालमत्ता जपावी असं म्हणतात. म्हणजे आमचं शक्तीस्थान (पैसा) जपावा, आणि आम्ही तो कसा वापरतो हे सांगू नये मात्र इतरांचं शक्तीस्थान (पैसा हिरावून घेण्याची क्षमता) खच्ची करावं. सोशल कॉंट्रॅक्टची मालमत्तेदार बाजू बळकट व्हावी असा यात प्रयत्न दिसतो. हा प्रयत्न समर्थनीय असेल तर सरकार तयार करून आपल्यालाही त्या मालमत्तेचा किंचित फायदा करून घेण्याचा प्रयत्नही समर्थनीयच आहे. किंबहुना समर्थनीय या शब्दालाच काही अर्थ राहत नाही.
मूल्य आणि किंमत
या लोकांनी केंद्रसरकारच्या अशा कोणत्या सेवा वापरल्या की ज्यांची किंमत ५ कोटी रुपये प्रतिवर्षी आहे ?
प्रश्न नितिनला असला तरीही थोडं माझं मत मांडते.
हा कर या प्रसिद्ध तारे-तारकांसाठी सोन्यासारखा आहे. सोन्याची खरंतर किंमत काय, खाता येत नाही, पांघरता येत नाही किंवा त्यासाठी ठीक नाही, घरही बनवता येत नाही. मग सोनं का महत्त्वाचं? लोकांना महत्त्वाचं वाटतं म्हणून. उद्या सगळ्यांनी ठरवलं की सोनं आणि लोखंड, इतर धातूंच्या किंमती त्यांच्या व्यवहारी उपयोगानुसार ठरवायच्या. तर लोखंड, तांबं महाग होईल. पण असं होत नाही.
या लोकांना आपण किती कर भरला, किती लवकर भरला यावरून आपली पत वाढवायची असते. (त्याशिवाय अशा तपशीलाने भरलेल्या बातम्या येणार कशा?) मी तुझ्यापेक्षा जास्त कर भरला, याचा अर्थ मी तुझ्यापेक्षा जास्त कमावले, म्हणजे मी तुझ्यापेक्षा जास्त dawg. हा प्रकार मला वेडपटपणा वाटत असेलही, पण काही लोकांना वाटत नाही, हे गेल्या काही वर्षातल्या बातम्यांवरून दिसतं. एखाद्या समाजवादी फ्रान्समधे, ७५% कर भरायला लागल्यामुळे एखादा जेरार्द दिपार्दिऊ देश सोडून देेण्याच्या धमक्या देतो; आणि फ्रेंच जनता त्याला सरळ "टाटा" म्हणते.
मूल्य आणि किंमत - नितिन थत्ते.
--
अवांतर - उगाच स्वप्नरंजन म्हणून, माधुरी दीक्षित किंवा अक्षय कुमार देश सोडून इरानमधे रहायला गेले असा विचार केला. इरानमधे चांगले आणि बरे सिनेमे बनतात, पण समजा कमी कर भरावा लागतो. हे लोक थोड्या मेकपसहित इरानी दिसतात असं दाखवताही येईल. पण या लोकांना सिनेमात काम देणार कोण?
आज पटाईत काकांनी एक धागा
आज पटाईत काकांनी एक धागा काढला वैदर्भीय शेतकऱ्यांच्या येणाऱ्या अच्छे दीना बाबत.त्याच्यात अच्छे दिनकर्ते श्री रामदेव यांचा प्रकल्प आहे. याच रामदेव यांनी काही वर्षांपूर्वी काले धन यावर धुरळा उडवला होता. त्यावर ऐसी वर घमासान चर्चा झालेली दिसली. आज याच रामदेवांच्या याच प्रकल्पावर मार्केट प्राइस पेक्षा कमी दरात 230 एकर जमीन मिळाली असल्याचा आरोप आहे. आता हा काळा व्यवहार का कसा मानावा( आरोप खरा असेल तर ) ? गब्बर सकट सर्व तज्ज्ञांना नवीन वादाकरिता पाचारण ....
माझ्या माहिती प्रमाणे
माझ्या माहिती प्रमाणे अमेरिकेत हि १०० $ पेक्षा जास्त मोठी नोट नाही आहे. जेंव्हा सर्व व्यवहार चेक किंवा कार्डच्या माध्यमातून किंवा ई-बेन्किंग नि होतील. काळा पैसा कमविणे मुश्की होईल. उदा: गेस सबसिडी सरळ खात्यात जाऊ लागली. सरकारचे २०,००० कोटी वाचले. अर्थात एवढा काळा पैसा पैदा होणे बंद झाले. दिल्लीत ९०% टक्के कार वाले इन्कमटॅक्स देत नाही. जर केवळ शाळेची फी आणि पेट्रोल पंपावर कॅश बंद केली तरी हि जे लोक आपली आय ५०-६० हजार वर्षाची दाखवितात आणि मुलांना महागड्या शाळेत शिकवितात. त्यांना आपली आय पाच सात लाख तरी दाखवावी लागेल. लेखकाचे ग्यान कमी असल्यामुळे बाबांचा योग त्यांना अनर्थ योग वाटतो.
गेस सबसिडी सरळ खात्यात जाऊ
गेस सबसिडी सरळ खात्यात जाऊ लागली. सरकारचे २०,००० कोटी वाचले.
पटाइत साहेब - हे निव्वळ खोटे आहे बरं का. असाच खोटा प्रचार लोकांनी सबसीडी नाकारल्यामुळे २०००० कोटी वाचले असा केला जात होता. आत्ता माझ्या कडे विदा नाही पण जास्तीत जास्त २००० कोटी वाचले. बाकीचे वाचले ते तेलाचे भाव कमी झाल्यामुळे.
विषय काढालाच आहे तर एक प्रश्न
विषय काढालाच आहे तर एक प्रश्न विचारून घेतो
५० रू. च्या वरच्या नोटा रद्द करून काळ्या पैश्याचा (आणि भ्रष्टाचाराचा) प्रश्न मिटवता येईल असे अर्थक्रांती वाले म्हणतात
आणि टॅक्सेशनसाठी हे करणं फायदेशीर असेल असाही त्यांचा दावा आहे
यात कितपत तथ्य आहे हे इथले अर्थशास्त्राचे अभ्यासक सांगू शकतील का?
मी फार पूर्वी थोडीफार आकडेमोड करून यातलं तथ्य शोधण्याचा प्रयत्न केला होता, दाव्यांमध्ये अतिषयोक्ती आहे असे वाटले होते.
परंतू ईकॉनॉमिक्स काही माझ्या अभ्यासाचा विषय नाही त्यामूळे त्यात चूकाही असतील