Skip to main content

प्रेम म्हणजे काय ?

खुसरो रैन सुहाग की जागी पी के संग,
तन मेरो मन पिऊ को दोउ भए इक रंग

.

लैला मजनूच्या प्रेमाच्या गोष्टी ऐकल्या होत्या. मजनूच्या पाठीवर पडणाऱ्या कोड्यांचे व्रण लैलाच्या पाठीवर उमटायचे. कारण शरीराने अलग-अलग असले तरी त्यांचे ह्रदय एक होते. लैला मजनूच प्रेम हे खरं प्रेम होत. आज ही आपण त्यांच्या प्रेमाचे पोवाडे गातो.

मनात एक प्रश्न आला, आजच्या तरुण पीढ़ीच्या प्रेमाच्या कल्पना काय?

तो स्मार्ट - ती सुन्दर, त्याला ती आवडली आणि तिलाही तो आवडला. त्यानी एकत्र सिनेमा पाहिला, एकमेकांच्या गळ्यात हात घालून फिरले आणि बहरलेल्या यौवनाचा आनंद घेतला. त्याना वाटले ते प्रेमात पडले. त्यानी प्रेम विवाह केला. एकत्र एकाच घरात राहण सुरु झाल. एकमेकांच्या आवडी-निवडी वादाचे विषय होऊ लागले. शुल्लक गोष्टींवरून भांडणे सुरु झाले. दोघांचाही अहंकार मोठा होता. परिणाम -

"देहाचा आकर्षणाने दोघ जवळ आले
प्रेमा अभावी ते शीघ्र डायवोर्सि झाले"

'ती' - मी प्रेमात आंधळी झाली होती, 'तो' -मी मूर्ख होतो म्हणून हिच्या प्रेमात पडलो. पडनारच! कारण याना प्रेमाचा अर्थ कळलेला नव्हता.

काहींची प्रेमाची गाड़ी लग्ना पर्यंत ही पोहचत नाही. कारण देहाचे आकर्षण क्षणभंगुर असते व ते संपल्यावर प्रेम ही संपते. तो किंवा ती कोणी तरी एक प्रेमभंगाला कारणीभूत ठरतो. आपण वर्तमानपत्रांत रोज वाचतो प्रेमभंग झाल्याने कोणी आत्महत्या करतो तर कोणी खून सुद्धा. कारण यानाही प्रेमाचा अर्थ कळलेला नसतो.

काही आपापला स्वार्थ सिद्ध करण्यासाठी प्रेमाचा देखावा करतात. मी ही डॉक्टर -ती ही डॉक्टर, आपण एकत्र आलो तर चैनित आयुष्य जाईल. किंवा दोघही नौकरी करणारे - स्वार्थ मनात ठेउन प्रेम करतात. कवितेच्या भाषेत म्हणायचं तर -

प्रेमाचा देखावा आज
फायद्याचा सौदा आहे,
विवाह सुध्दा आज
देह भोगण्याचा करार आहे

.

स्वार्थापोटी केलेल प्रेम भंग पावणारच. मग घटस्फोट हा होणारच यात आश्चर्य नाही. कारण यानाही प्रेमाचा अर्थ कळलेला नाही.

मग प्रेम म्हणजे काय?

आपल्या सोंदार्याचा अभिमान बाळगून पर्वतराज हिमालयाची कन्या पार्वती कामदेवाच्या मदतीने शंकराचे प्रेम जिंकायला निघाली. परिणाम काय झाला -शंकराने आपले तीसरे नेत्र उघडले व कामदेव भस्म झाला. पार्वतीला आपली चूक कळली. तिने तपस्येचा मार्ग धरला. आपला अहंकार, अभिमान इत्यादि तपस्येच्या अग्नित भस्म केले. अखेर शंकर प्रसन्न झाले. पार्वतीलाही प्रेमाचा अर्थ कळला.
आपण पहातोच, वसंतात बहरलेल्या कच्च्या कैरीला ही ग्रीष्माच्या उन्हात तपावे लागते, मगच रसाळ-मधुर असा आम्बा आपल्याला खायला मिळतो. आपल्या मनातिल विकाराना अग्नित भस्म केल्या शिवाय प्रेमाचा अर्थ कळणे अशक्य म्हणूनच एका उर्दू शायरने प्रेमाबद्धल म्हंटले आहे

"इक आग का दरिया है
तैर के जाना है"

आणि आगीचा दरिया पार करण्यासाठी डोळे उघडे असायला पाहिजे. आंधळ्यामाणसाचे हे काम नव्हे. एकदा शेजारच्या एका आजीला विचारले -तुम्ही कधी प्रेम केले आहे का? पेमाचा अर्थ काय? आजी म्हणाली प्रेमाच तर सोडा त्या काळी लग्नाआधी मुलाला मुलगी दाखविण्याची पद्धत ही नव्हती. बायको म्हणजे - आईच्या मदतीला घरकामासाठी आणलेली हक्काची बाई. ती आपल्याला देह सुख ही देते व घराला वारस ही. त्या काळी बायकाना कष्ट हे करावे लगायचेच. कधी - कधी मार ही खायला मिळायचा. आपले माहेरचे अस्तित्व विसरून नवर्या साठीच आपल आयुष्य आहे हे मनात ठरवून सासरी संसार सुरु केला. काही वर्षात चित्र बदलले. एका दुसर्ऱ्याची सवय लागली. त्यांच्या मनात जिव्हाळा निर्माण झाला. माझ्यासाठी त्यानी आपला स्वभाव ही बदलला. माझ्या आवडी -निवडीकड़े ते जातीने लक्ष देऊ लागले. मला काय हवे त्याना न सांगताच समजू लागले होते. आज एका दुसऱ्याच्या मनात काय आहे हे न बोलताच आम्ही समजू शकतो. आताही त्यांच्या मनात काय विचार चालला आहे, हे मी सांगू शकते. त्यागाशिवाय प्रेम सम्पादित करता येत नाही हेच खरं. संसाराचे चटके बसल्या शिवाय प्रेमाचा अर्थ कळने अशक्यच. आजीचे बोलणे मला पटले. आजीने खरोखरच तपस्या केली होती म्हणून तिला प्रेमाचा अर्थ कळला होता. असे प्रेम पाहूनच अमीर खुसरो ने म्हंटले आहे-


खुसरो रैन सुहाग की जागी पी के संग,
तन मेरो मन पिऊ को दोउ भए इक रंग.

शरीराने अलग-अलग असले तरी प्रेम रंगात भिजुन दोघांचे ह्रदय एक झाले होते. कारण प्रेमात द्वैत नाही. सूफी संतांच्या मते लौकिक प्रेम ही अलौकिक प्रेमाची पायरी आहे. कारण ज्याच्या हृदयात प्रेम आहे तोच ईश्वराला प्राप्त करू शकतो.

याचा अर्थ लग्ना आधी प्रेम नाही केले पाहिजे असा नाही. प्रेम अवश्य करा, पण आपण प्रेमात पड़त आहो असे वाटत असेल तर आंधळेपणाने राहू नका, आपले डोळे उघडा- स्वत:लाच प्रश्न विचारा- हे देहाचे आकर्षण तर नाही ना? यात आपला स्वार्थ तर नाही ना? कुठल्याही परिस्थितीत आपण त्याचा/ तिचा साथ देऊ शकतो का? त्याच्या/ तिच्या साठी आपण आपल्या सर्वस्वाचा अर्थात आपला अहंकार, अभिमान इत्यादींचा त्याग करू शकतो का? याचे उत्तर होय असेल तरच पुढे पाऊल उचला. अन्यथा प्रेमात पड़नारच. खऱ्या प्रेमाच्या प्राप्ति साठी तपस्या ही करावीच लागते. दोघाना शरीराने आणि मनानी एक व्हावे लागते. तेंव्हाच प्रेमाची प्राप्ति होते, म्हणूनच कबीरदासानी म्हंटले आहे -


जब मै था तब हरि नाही, जब हरि है मै नाही,
प्रेम गली अति सांकरी, ज्यामे दो न समाई.


प्रेम करण्या पूर्वी किंवा प्रेमात पडलेल्यानी, हा लेख अवश्य वाचावा. आपली प्रतिक्रिया अवश्य कळवा.

Node read time
4 minutes
4 minutes

गब्बर सिंग Sat, 28/12/2013 - 15:17

प्रेमाचा देखावा आज
फायद्याचा सौदा आहे,
विवाह सुध्दा आज
देह भोगण्याचा करार आहे

यातून जे ध्वनित होतेय त्याबद्दल मला बोलायचे आहे.

यातून असे ध्वनित होतेय की ... देह भोगणे हे कुठेतरी चुकीचे आहे. व माझा यालाच आक्षेप आहे.

बाकी चालु द्या.

............सा… Sat, 28/12/2013 - 15:25

In reply to by गब्बर सिंग

भोगणे हा मराठी शब्दच थोड़ा नकारात्मक आहे अशी शंका आहे. विशेषत: देह भोगणे - त्या दृष्टीने वरील ओळी बरोबरच आहेत असे वाटते. हिंदीत भोग लगाना चा अर्थ वेगळा आहे. भोग = प्रसाद.

............सा… Sat, 28/12/2013 - 15:20

प्रेम कोणीही करेना का अशी फ़रियाद खोटी
प्रेमा लाभे प्रेमळाला त्याग ही त्याची कसोटी. - माधव ज्युलियन

गब्बर सिंग Sat, 28/12/2013 - 15:30

बायको म्हणजे - आईच्या मदतीला घरकामासाठी आणलेली हक्काची बाई. ती आपल्याला देह सुख ही देते व घराला वारस ही. त्या काळी बायकाना कष्ट हे करावे लगायचेच. कधी - कधी मार ही खायला मिळायचा. आपले माहेरचे अस्तित्व विसरून नवर्या साठीच आपल आयुष्य आहे हे मनात ठरवून सासरी संसार सुरु केला. काही वर्षात चित्र बदलले. एका दुसर्ऱ्याची सवय लागली. त्यांच्या मनात जिव्हाळा निर्माण झाला. माझ्यासाठी त्यानी आपला स्वभाव ही बदलला. माझ्या आवडी -निवडीकड़े ते जातीने लक्ष देऊ लागले. मला काय हवे त्याना न सांगताच समजू लागले होते. आज एका दुसऱ्याच्या मनात काय आहे हे न बोलताच आम्ही समजू शकतो. आताही त्यांच्या मनात काय विचार चालला आहे, हे मी सांगू शकते. त्यागाशिवाय प्रेम सम्पादित करता येत नाही हेच खरं. संसाराचे चटके बसल्या शिवाय प्रेमाचा अर्थ कळने अशक्यच. आजीचे बोलणे मला पटले.

चिंताजनक आहे.

त्यागाशिवाय प्रेम संपादित करता येत नाही - हे जर खरे असेल तर प्रेम हे हितसंबंधांशिवाय अस्तित्वात येऊच शकणार नाही. म्हंजे प्रेम हे प्ल्युटॉनिक वगैरे बकवास ठरेल. प्रेम हे स्वार्थ्/हितसंबंध यांवर आधारलेले असेलच.

तिने त्याच्यासाठी त्याग करायचा व त्याने तिच्यासाठी. तिने त्याच्यासाठी त्याग केला म्हंजे तिने त्याच्या हितसंबंधांची पूर्ती केली. त्याने तिच्यासाठी त्याग केला म्हंजे त्याने तिच्या हितसंबंधांची पूर्ती केली. पण इतका सगळा आटापिटा व outsourcing of safeguarding of हितसंबंध का करेल माणूस ? त्यापेक्षा माणूस असे का म्हणणार नाही की - I will safeguard my interest and you safeguard yours. बात खतम.

............सा… Sat, 28/12/2013 - 15:37

In reply to by गब्बर सिंग

लहान मूलं अन विकलांग लोक त्यांचे त्यांचे हितसंबंध सेफगार्ड कसे करणार? बळी तो कान पीळी या न्यायानेचा जर वागले तर झालेच मानव जातीचे कल्याण. म्हणून प्रेम वगैरे भावना कदाचित उत्क्रांतीत निर्माण झाल्या असाव्यात.

गब्बर सिंग Sun, 29/12/2013 - 12:23

In reply to by ............सा…

लहान मूलं

मी जो मुद्दा मांडणार आहे तो या धाग्यावर अवांतर आहे.

एक माता जिस प्रेम और ममता की बौछार अपने शिशु पर करती है ... उस प्रेम के लिये वो शिशु किस आधार पर पात्र होता है ?

अजो१२३ Sat, 28/12/2013 - 16:35

In reply to by गब्बर सिंग

जिथे व्यवहार संपतो, तिथे प्रेम चालू होते. तेच 'चिंताजनक' शब्दांत पटाईतजींनी मांडले आहे. नीट वाचाल तर त्यात चिंताजनक काही आढळणार नाही.

राजेश घासकडवी Sat, 28/12/2013 - 20:20

हा लेख अनेक ठिकाणी सापडला. नितीन ठाकुर, विवेक पटाईत, युवराज मोहिते, पवारजी अशा बऱ्याच नावांनी तो वेगवेगळ्या वेळी प्रसिद्ध झालेला आहे. हा मुळात तुम्हीच लिहिलेला आहे का?

विवेक पटाईत Sun, 29/12/2013 - 08:35

हा लेख पूर्वी माझ्या ब्लोग http://vivekpatait.blogspot.in/ व मराठी सृष्टी, मी मराठी इत्यादी वेब साईट वरआधी प्रकाशित झालेला आहे. कदाचित तो वाचण्याची शक्यता.
मी मूळ दिल्लीचा (तीन पिढ्यांपासून). हिंदी भाषेत शिक्षण झाले आहे. घरात मराठी वातावरण असल्या मुळे सरकारी केंद्रीय पुस्तकालयात पुस्तके वाचून मराठी शिकलो (म्हणायला हरकत नाही). अमीर खुसरो आणि कबीर दास माझे आवडते कवी.

बाकी लोकांनी कदचीत प्रेम या विषयावर लेख लिहिला असेल पण त्यांचे शब्द निश्चित अलग असतील. युवराज मोहितेंचा ब्लोग बघितला. काही सापडले नाही. ते स्वत: लेखक असल्यामुळे दुसर्यांचा लेख आपल्यानावाने खपवणार नाही हे निश्चित.

राजेश घासकडवी Sun, 29/12/2013 - 09:06

In reply to by विवेक पटाईत

युवराज मोहितेंच्या ब्लॉगवरच्या लेखाची लिंक.
http://blog.yuvrajmohite.com/2012/04/blog-post_05.html
खालील ब्लॉगवर तो १ ऑगस्ट २०१० ला प्रसिद्ध झाला होता. गोविंद पवार नावाखाली.
http://pawarji.blogspot.com/2010_08_01_archive.html
विवेक पटाइत या नावाच्या ब्लॉगवर तो २०१२ च्या फेब्रुवारीमध्ये प्रसिद्ध झाला होता. गोविंद पवार यांच्या पोस्टच्या नंतर.
http://vivekpatait.blogspot.com/2012_02_01_archive.html

या तीनही लेखांत 'शब्द अलग असतील' अशी शंका आली नाही. तुम्ही हवं तर ते पुन्हा वाचून पहा.

तुम्हाला साधा प्रश्न विचारला होता, की या लेखाचे मूळ लेखक तुम्ही आहात का? त्याला हो की नाही असं स्पष्ट उत्तर देणं कृपया टाळू नका. दरम्यान आम्ही गोविंद पवार यांच्याशी संपर्क साधून विचारत आहोतच.

विवेक पटाईत Sun, 29/12/2013 - 12:42

निश्चित हा लेख माझा आहे सर्वात आधी हा लेख मी मराठी सृष्टी इथे 10434] प्रेम म्हणजे काय? (131 Hits) (10 Comments) To Edit This Article Send Message To Admin Daily Hits Send General Message To Admin
Author: विवेक पटाईत / vivek patait (vivekpatait2009) | Date: 13-07-2010 12:32:58| साहित्य/ललित लेखन : विशेष लेख
दिनक १३.७.२०१० रोजी प्रकाशित केला होता. http://www.marathisrushti.com/articles/index.php?lang=marathi&article=1…

मी एक निजी सचिव (राजपत्रित अधिकारी) आहे. गेल्या १७ वर्षांपासून प्रधानमंत्री कार्यालयात कार्यरत आहे. जिम्मेदारी काय असते हे मला माहित आहे. निश्चित या दोघांनी मराठी सृष्टीवरचा माझा लेख सरळ सोप्या शब्दात म्हणायचं तर चोरला आहे. माझ्या लेखनात हिंदीचा प्रभाव आहे. हा ब्लोग वाचून तुम्हाला कळेलच शिवाय आनखिन
http://www.marathisrushti.com/articles/index.php?lang=marathi&article=1… प प्रेम (१)/ सौदा ही क्षणिका दिनांक ५.७.२०१० रोजी मराठी सृष्टी वर प्रकाशित झाली आहे. http://www.marathisrushti.com/articles/index.php?lang=marathi&article=1…प्रेम (2)/ देहाचे आकर्षण ही क्षणिका १३.७.२१० प्रकाशित केली आहे.

दोघांचे ब्लोग या नंतरचे आहेतच.
आपल्या शंकांचे समाधान झाले असेल. कुणा चित्रगुप्त नावाच्या व्यक्तीने मला ई मेल ने या वेब साईट बाबतीत सांगतले होते. मला आवडणारा हा जुना लेख मी इथे टाकला. आता साहित्य चौर्य रोकनणे हे मालकांचे कार्य आहे. (मराठीसृष्टी वर जुना रेकॉर्ड सापडला अन्यथा मूळ लेखकच चोर ठरला असता). दुसरे सांगायचे म्हणजे मराठी श्रुष्टी कडून मराठी टंकन करण्याचे ज्ञान मिळविले. माझे जुने अधिकांश लेख त्या वर आहेत. मोहिते आणि पवारांना एवढेच म्हणणे आहे त्यांनी स्वत: लिहिणे शिकावे. दुसर्यांचे लेख चोरू नये. श्री. घासकवडी यांना धन्यवाद नाही तर मलाही कळले नसते.

राजेश घासकडवी Sun, 29/12/2013 - 21:03

In reply to by विवेक पटाईत

खुलाशाबद्दल धन्यवाद. काही लेखन कुठेतरी वाचलेलं असल्याचा संशय येतो. त्यामुळे सर्च करून बघण्याची मला सवय आहे. मूळ लेखकालाच त्यातून जाब विचारल्याप्रमाणे परिस्थिती आल्याबद्दल क्षमस्व. पण विचारणं हे माझं काम होतं.

हा लेख शोधण्यासाठी मी गूगल सर्च विंडोमध्ये 'कोड्यांचे व्रण लैलाच्या पाठीवर' अशी स्ट्रिंग टाकली. प्रत्येकच लेखकाने आपलं लेखन अधूनमधून अशी स्ट्रिंग सर्च करून कोणी आपल्याच नावाने डकवत तर नाहीये ना, याची खातरजमा करून घ्यायला हवी.

अजो१२३ Sun, 29/12/2013 - 11:40

मी विवेकजींना व्यक्तिशः ओळखत नाही, परंतु मीमराठीवर त्यांच्या व्यक्तित्वाचे अनेक कंगोरे पाहिले आहेत. त्यांचं रेप्यूटेशन वादातीत आहे. अर्थात् राजेशजींना या विपरित म्हणायचं आहे असं नाही, राजेशजी आपलं काम करत आहेत. परंतु हे नोंदवावे वाटले.

विवेक पटाईत Sun, 29/12/2013 - 12:12

पवारांचा ब्लोग बघितला - कोपी पेस्ट करताना त्यांनी दोहा, क्षणिका पण योग्य रीतीने 'alignment; करण्याचे कष्ट ही केला नाही. आहे. युवराजांनी फक्त एक फोटो आणि शेवटी एक त्यांची कविता (?) टाकली आहे. त्यांना ई-मेल करून जाब विचारला आहे. पवारांचा ही ई-मेल मिळाला तर त्यांना ही विचारता येईल.

विवेक पटाईत Sun, 29/12/2013 - 13:00

govindjgd@gmail.com

प्रिय गोविंद, ऐसी अक्षरे या बेवसाईट बद्धल मला दोन-तीन दिवस आधी माहित मिळाली. त्यात मी मराठी सृष्टी वर प्रकाशित माझा एक जुना लेख प्रेम म्हणजे काय असते हा टाकला. प्रतिसाद वाचल्या वर मला कळले. तुम्ही हा लेख आपल्या ब्लोग वर आपल्या नावानी प्रकाशित केला आहे. मला किती मानसिक त्रास झाला असेल याचा विचार केला आहेत का? मला एवढेच म्हणायचे आहे कृपा करून तुम्ही हा ब्लोग काढून टाका किंवा तो माझा लेख आहे एवढे तरी ब्लोग वर टाका. दोन्ही लिंक मी खाली दिल्या आहे:
31 aug 2010
http://pawarji.blogspot.in/2010/08/blog-post_2458.html

13 july 2010
http://www.marathisrushti.com/serve/index.php?article=10434&lang=marath…

देव आपल्याला सद्बुद्धी देवो हीच अपेक्षा

प्रकाश घाटपांडे Sun, 29/12/2013 - 15:10

आश्चर्य आहे! चक्क लेख चोरला. समजा या लोकांनी मूळ लेखकाच्या नावे जरी दिला असता तरी एकवेळ समजू शकलो असतो.

नगरीनिरंजन Sun, 29/12/2013 - 15:22

लेख चांगला आहे.
परंतु बहुतेकांना वयाच्या एका विशिष्ट मर्यादेनंतर मार्गारेट अ‍ॅटवूडला पडलेला "Who invented the word 'love'?" असा प्रश्न पडत असेल असे वाटते.

मन Mon, 30/12/2013 - 10:34

तुमचं लेखन खूपदा पटत नाही. पण तुम्ही चोरी करणार नाही ह्याची तुमचा एकूण जालवावर व जालवागणूक पाहता , अगदि खात्री वाटते.

ऋषिकेश Mon, 30/12/2013 - 14:44

पण आपण प्रेमात पड़त आहो असे वाटत असेल तर आंधळेपणाने राहू नका, आपले डोळे उघडा- स्वत:लाच प्रश्न विचारा- हे देहाचे आकर्षण तर नाही ना? यात आपला स्वार्थ तर नाही ना? कुठल्याही परिस्थितीत आपण त्याचा/ तिचा साथ देऊ शकतो का? त्याच्या/ तिच्या साठी आपण आपल्या सर्वस्वाचा अर्थात आपला अहंकार, अभिमान इत्यादींचा त्याग करू शकतो का? याचे उत्तर होय असेल तरच पुढे पाऊल उचला.

खिक्!
उशीरच झाला म्हणायचा! ;)

प्रेमात "पडणे" हा वाक्प्रयोगाकडे लक्ष वेधु इच्छितो. प्रेम असं प्लान करता येत नाही. त्यात माणूस नकळत 'पडतो' अशी आपली माझी (दवणीय) समजूत!

बाकी, येत रहा लिहित रहा!

विवेक पटाईत Tue, 31/12/2013 - 21:28

युवराज मोहिते आणि गोविंद पवार ( या दोघांना ई-मेल केली होती. आज जाब विचारला होता. दोघांची उत्तरे मिळाली. दोघांनी या बाबत खेद व्यक्त केला आहे. त्यांनी पाठविलेली ई-मेल खाली देत आहे.
विवेक साहेब

uvraj Mohite
तुमच्या भावना दुखावल्या बद्दल मी तुमची माफी मागतो..

तुम्हाला जर वाईट वाटले असेल तर तुम्ही मला तसा मेल करा. तो लेख मी लगेच काढतो कारण हा लेख विकायला ( खपविला ) टाकला नाही आणि मला कोणी मोठा लेखक म्हणवून घ्यायची इच्छा पण नाही. तत्पूर्वी तुम्हाला एक प्रश्न विचारावासा वाटतोय.

ज्ञानेश्वरांनी भगवतगीता असताना ज्ञानेश्वरी का लिहिली. ?
आणि गोविंद यांची ई-मेल
sorry dear but now i am in somewhere there is no internet faculty here when i have time i will remove ur things
thnks

दोघांनी माफी मागितली. माझ्या मनात ही त्यांच्या बद्धल कुठला ही राग नाही. दोघांनी त्वरित माफी मागून मोठेपण दाखविले. त्या मुळे विषय संपला. युवराज यांच्या दुसर्या प्रश्नाचे उत्तर भगवतगीता संस्कृत भाषेत होती. ज्ञानदेवांनी ती प्राकृतात (मराठीत) आणली. तुम्ही ही तेच भाव आपल्या शब्दात मांडले असते ही परिस्थिती आली नसती. माझ्या लेखनावर (कितीही बेकार असले तरी) शंका उत्पन्न झाल्यावर, समाधान करणे भाग होते. असो.

शहराजाद Thu, 02/01/2014 - 04:23

In reply to by विवेक पटाईत

दोघांनी त्वरित माफी मागून मोठेपण दाखविले.

मो ठे प ण ?
गोविंद ह्यांना इ- मेल वाचता लिहिता येत आहे तेव्हा लवकरच चोरीचा लेख काढू टाकता यावा ही आशा.
युवराज तर निर्लज्जपणे तोंड वर करून ' ज्ञानेश्वरांनी नाही का चोरले (?), मग मी चोरले तर त्यात गुन्हा तो कोणता ' असला मतलबी युक्तिवाद करत आहेत. लेख विकला नाही तर तो चोरणे गैर नाही असे त्यांचे मत दिसते. मला यात मोठेपण नाही तर 'चोर तो चोर, वर शिरजोर' चा प्रकार दिसतो आहे.
आपणच त्यांना मोठेपणाने क्षमा केली आहे तेव्हा.. असो.
ऐसीवर स्वागत.

मन Thu, 02/01/2014 - 09:24

In reply to by विवेक पटाईत

ज्ञानेश्वरांनी कृष्णाचे/व्यासांचे नाव कृष्णाने त्यांना काँट्याक्ट करेपर्यंत लपवून ठेवले होते काय?
अ व्यक्तीने ब चे लिखाण आवडले म्हणून त्याला quote करायला हरकत नाही; पण सरळ पेस्टवून स्वतःच्या नावावर टाकायला आहे.
इथल्या अनेकांप्रमाणेच मी सुद्धा लै जालिय प्रतिसाद - लेख quote करतो. पण ते माझेच स्टेटमेंट आहे असे भासवत नाही.