Skip to main content

२०१३ विधानसभा अंदाज व प्रत्यक्ष निकाल: छत्तीसगढ

राजस्थान नंतर आपण काल निवडणूकांच्या दोन्ही फेर्‍या झाल्या आहेत अशा छत्तीसगढकडे बघुयात. त्याची सद्यस्थिती व इतिहास असा:

छत्तीसगढ २००८

पक्ष जागा मतांची टक्केवारी
भाजपा ५० ४०.३%
काँग्रेस ३८ ३८.६%
बसपा ६.१
छत्तीसगढ २००३

पक्ष जागा मतांची टक्केवारी
भाजपा ५० ३९.३%
काँग्रेस ३७ ३६.७%
बसपा ४.४%
राष्ट्रवादी काँग्रेस ७%

असे दिसते की २००३ पेक्षा २००८ मध्ये भामिळालेव काँग्रेस दोघांच्याही मतांत वाढ झाली आहे. मात्र जागा तेवढ्याच राहिल्या आहेत.

२००९चे लोकसभा निकाल बघितले तर हा कल भाजपाकडे अधिकच झुकलेला दिसतो. भाजपाला विधानसभेत निवडून दिलेल्या मतदारसंघांपैकी ४० क्षेत्रातून भाजपाला लोकसभेत बहुमत टिकून होते तर काँग्रेसचे बहुमत केवळ १७ क्षेत्रात उरले होते. शिवाय काँग्रेसने भाजपाकडून (विधानसभेत भाजपा जिंकली आहे अशा) केवळ ८ विधानसभा क्षेत्रात आघाडी मिळवली होती तर हा करिश्मा भाजपाला १९ क्षेत्रात करता आला होता. (लोकसभेच्या निकालांनुसार मते विधानसभेत पडली असती तर भाजपाला ६० जागा मिळाल्या असत्या तर काँग्रेसला केवळ २५).

या पाच वर्षात अजून झालेले बदल म्हणजे नक्षलवाद्यांचा वाढता प्रभाव. लोकसभेचे निकाल बघितले तर ४ विधानसभाक्षेत्रात डाव्यांचा प्रभाव लक्षात येतो.

हे सारे लक्षात घेऊन तुर्तास अंदाज वर्तवण्यासाठी प्रत्येक मतदारसंघाचा विचार करून अंदाज देत आहे.
त्याआधी माझे गृहितक मांडतो:
-- भाजपाविरुद्ध अ‍ॅन्टीइन्कम्बसी शहरी/निमशहरी/मोठी गावे या भागात नाममात्र आहे. मात्र खेडी, आदीवासी यांच्यात ती बर्‍यापैकी आहे.
-- मोदींच्या देशपातळीवर नेतृत्त्व घोषणेमुळे फारसा फरक नाही. रमणसिंह यांचे काम हाच प्रचाराचा मुख्य गाभा.
-- मात्र भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांपेक्षा अधिक उत्साह आहे. अर्थात प्रचार अधिक व अधिक जोमाने
-- यंदा जवळजवळ सरासरी ७५% मतदान झाले आहे.

अंदाजः

पक्ष माझा अंदाज CNN-IBN एक्झिट पोल
काँग्रेस २५-३० ३२-४०
भाजपा ५३-५९ ४५-५५
बसपा २-३
सीपीआय ०-१
अपक्ष/इतर ०-१ ०-२

सदर धाग्यावर तुमचेही अंदाज, छत्तीसगढ निवडणूकांसंबंधीच्या बातम्या, चर्चा आल्यात तर अधिक मजा येईल. शेवटी निकाल लागल्यावर याच धाग्यावर प्रत्यक्ष विदा दिला जाईल

सदर अंदाज हा अत्यंत वैयक्तिक असून यासाठी कोणताही सर्व्हे घेतलेला नाही. निव्वळ आकडेमोडीवर आधारीत अंदाज काढून, एकेक मतदार संघाचा इतिहास अभ्यासून व्यक्त केलेला ढोबळ + 'कंसर्व्हेटिव्ह' अंदाज आहे. या अंदाजासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त शास्त्रीय पद्धतीचा अवलंब केलेला नाही

ऋषिकेश Wed, 20/11/2013 - 11:08

अगदी आकडेवारीसहित नाही पण किमान कोण जिंकेल याचा एक ढोबळ अंदाज प्रत्येकाने लावला असेलच.
किमान तो तुम्हाला वाटणार्‍या कारणांसकट दिलात तरी चालेल. आपले अंदाज/गट फिलिंग किती योग्य आहे हे नंटर कळेलच

मन Wed, 20/11/2013 - 11:41

छत्तीसगढ मध्ये राज्यपातळीवर PDS बरीच कार्यक्षम आहे असे ऐकले आहे.
त्याचा थेट फाय्दा सत्ताधार्‍यांना विधानसभेत व्हावा.

ऋषिकेश Thu, 05/12/2013 - 10:21

एग्झिट पोल्सचे अंदाज अपडेट केले आहेत.
माझ्या अंदाजात व एक्झिट पोल्समध्ये काँग्रेसच्या मतांत बर्‍यापैकी फरक आहे. भाजपाकडे ( व त्यामुळे दुरंगी लढतीत काँग्रेसकडे) झालेल्या ध्रुवीकरणाचा सगळ्यात मोठा तोटा छोट्या पक्षांना होईलसे दिसते.

राजेश घासकडवी Sun, 08/12/2013 - 11:41

एनडिटिव्हीवर आत्तापर्यंत ९० जागांचे कल आलेले आहेत
कॉंग्रेस ४५
भाजपा ४५

भाजपाला ५ जागा गेल्यावेळपेक्षा कमी. कॉंग्रेसला ७ जागा जास्त. सत्ताबदल - ?.