Skip to main content

गृहस्थ व्हा!

सुजीत आणि नेहा आठ-दहा वर्षे लंडनमधे राहिले. तिथे असतानाच एक वर्षापूर्वी त्यांना मुलगा झाला. सुजीत आयटी इंजिनियर तर नेहा कॉमर्स ग्रॅज्युएट. सुजीत लंडनमधे भरपूर पगाराची नोकरी करतानाही नेहाने काही बँकांमधे छोट्या-मोठ्या कंत्राटी नोकर्‍या केल्या. नंतर सुजीतने इंग्लंडचे नागरिकत्व घेतले आणि तो एकुलता एक मुलगा असल्याने म्हातारे आई-वडील भारतात एकटेच असतात व आईची तब्येत खूप खराब झाली म्हणून नेहाच्या संमतीने भारतात परतण्याचा निर्णय घेतला. आठ-दहा वर्षांमधे सुजीतने पुण्यात दोन फ्लॅट व एक प्लॉट घेऊन ठेवला होताच. भारतात परतल्यावर सुजीतचे आई-वडील त्यांच्याबरोबर राहू लागले. नेहाला मात्र मनासारखी नोकरी मिळत नव्हती म्हणून तिने तीन लाख रुपये फी भरून SAPचा दोन महिन्यांचा कोर्स केला आणि त्यानंतर IBMमधे तिला मनासारखी चांगल्या पगाराची नोकरी मिळाली. आता सगळे स्थिर-स्थावर झाले असे वाटत असतानाच नेहा आणि तिच्या सासूमधे कुरबुरी सुरू झाल्या. एकमेकींचा अपमान करणे, घरातल्या कामावरून टोमणे मारणे असे नेहमीचेच प्रकार सुरु झाले. नेहाच्या मते सुजीतची आई खोडसाळपणा करत होती तर सुजीतच्या आईच्या मते नेहा तिला अजिबात आदराने वागवत नव्हती. सुजीतला कोणाची बाजू घ्यायची ते कळत नव्हते. भांडणे वाढत गेली आणि एके दिवशी कडाक्याच्या भांडणानंतर सुजीतच्या आई-वडिलांनी गावी परतण्याचा निर्णय घेतला. आता लहानग्या मुलाला सांभाळण्याचा प्रश्न आला. भरपूर पैसे द्यायची तयारी असूनही बरीच शोधाशोध केल्यावर अखेर त्यांना रोज आठ तास मुलाला सांभाळेल अशी एक घराजवळच्या झोपडपट्टीत राहणारी बाई मिळाली. त्या बाईला स्वत:चीही छोटी मुले असल्याने संध्याकाळी सातनंतर थांबणे तिला शक्य नव्हते. ऑफिसमधे वारंवार जास्त काम किंवा उशीराने क्लायंट मीटिंग असल्याने सातच्या आत कोणी घरी जायचे यावरून सुजीत आणि नेहाचे खटके वारंवार उडू लागले. हळूहळू मतभेद विकोपाला गेल्याने दोघेही विभक्त व्हायचा विचारात आहेत.
संगिताचा नवरा शिरीष एका मोठ्या स्वीडिश कंपनीत डिव्हिजनल मार्केटिंग मॅनेजर आहे. कामानिमित्ताने त्याला महिन्यातले दहा-बारा दिवस परदेशप्रवास करावा लागतो. त्यांना अनुक्रमे पाच आणि एक वर्षांच्या दोन मुली आहेत. संगिताने पहिल्या मुलीच्या वेळी नोकरी सोडली होती आणि चार वर्षे गृहिणी म्हणून घरीच होती पण तिला आता नोकरी करायचीच होती. एमएस्सी करूनही घरी बसणे तिच्या मनाला पटत नव्हते म्हणून तिने एका खाजगी कॉलेजमध्ये लेक्चररची नोकरी धरली. शिरीषच्या मोठ्ठ्या पगारात आधीच तीन बीएचकेचा एक आणि टू बीएचकेचा एक असे दोन फ्लॅट घेऊन कर्ज फेडून झाले असल्याने आर्थिक काही काळजी नव्हती. त्यामुळे तिच्या मासिक पगाराच्या ८०% रक्कम देऊन त्यांनी मुलींना दिवसभर सांभाळायला एक बाई ठेवली. त्या बाईची मुलेही तिच्याबरोबर घरी येऊन मुलींशी खेळायची. एकदा संगिताने मुलीला काही अपशब्द उच्चारताना ऐकले. त्यामुळे काळजीत पडलेल्या संगिताने त्या बाईला तिच्या मुलांना घरी आणायचे नाही असे सांगितले पण त्या बाईला ते शक्य नसल्याने तिने नोकरी सोडली. आता संगिताने महिनाभर बिनपगारी रजा घेतली आहे आणि नव्या बाईच्या शोधात आहे.
रणजित पुण्यात एका अमेरिकन विमाननिर्मितीकंपनीच्या कारखान्यात मोठ्या हुद्द्यावर आहे. त्याची बायको विशाखा आळंदीला एका शाळेत शिक्षिका आहे. त्यांना चार वर्षांचा एक मुलगा आहे. आठवड्यातले फक्त दोनच दिवस त्याच्यासोबत घालवायला मिळत असल्याने त्याचे भरपूर लाड होतात आणि तो प्रचंड जाड झाला आहे. नुकताच त्याचा पाय खूप दुखत होता म्हणून त्याला दवाखान्यात नेले असता डॉक्टरांनी त्याच्या जाडपणामुळे त्याच्या लैंगिकतेवर विपरीत परिणाम होत असल्याचे त्यांना सांगितले. विशाखा आणि रणजित काळजीत पडले आणि त्यांनी त्याला एका महागड्या जिममध्ये पर्सनल ट्रेनर व डायटेशियनच्या कोर्सला घातले आहे.
या आणि अशा अनेक केसेस आपण आजूबाजूला पाहतो. सांख्यिकीदृष्टीने या कदाचित नगण्य असतील पण मध्यमवर्गात लहानपण घालवलेल्या आणि आता उच्चमध्यमवर्गीय होणार्‍या लोकांच्या जगण्याची एक दिशा निश्चितच दाखवतात.
जसजशी आर्थिक प्रगती होईल आणि अधिकाधिक लोक खालच्या वर्गातून वरच्या वर्गात येण्याचा प्रयत्न करतील तसतशा या गोष्टी अधिकाधिक सार्वत्रिक होतील.

मार्केटचा अदृष्य हात
फुले, कर्वेंसारख्या द्रष्ट्या लोकांमुळे आपल्या समाजात स्त्रीचे स्थान सुधारले. मुली शिकू लागल्या त्याला आता शतक उलटून गेले आहे. आता मुली शिकतात यात काही अप्रूप नाही आणि ते तसे वाटून घेणे हाच मागासलेपणा आहे. आजची स्त्री जास्त नसेल तर किमान पुरुषाइतकीच सक्षम आहे. ज्यात स्त्रियांना प्रवेश वर्ज्य आहे किंवा ज्यात स्त्रिया मागे आहेत असे कोणतेही क्षेत्र आता उरलेले नाही. समाजातल्या सुखवस्तु लोकांमधील बहुसंख्य स्त्रियांना आता पुरुषाच्या बरोबरीने स्थान आहे. हे सगळं चांगलंच आहे.
पण दुर्दैवाने नफा म्हणजेच सर्व काही असे समजणार्‍या मार्केट इकॉनॉमीने ही गोष्ट फार लवकर हेरली आणि स्त्रीच्या स्वातंत्र्याला काही लाक्षणिक गोष्टींमध्ये अडकवून टाकले.
पुरुष जे करेल ते स्त्रीने करून दाखवले म्हणजे स्त्री स्वतंत्र वा कर्तबगार झाली असा नकळत एक समज वाढीला लावण्याचे काम प्रसारमाध्यमांच्या प्रचारयंत्रणेतून पद्धतशीरपणे पसरवला गेला आणि जातोय. स्त्री आणि पुरुष हे एकमेकांमध्ये फिट्ट बसून पूर्णगोल होणारे अर्धगोल उरले नसून एकमेकांवर आपटणारे गोटे केले जात आहेत.त्यामुळे गरज नसली तरी, स्त्रीने नोकरी/व्यवसाय केलाच पाहिजे नाहीतर ती मागास असा काही लोकांचातरी नक्कीच समज झालेला दिसतो.
मार्केट इकॉनॉमी नेहमी नफ्यात जास्तीत जास्त वाढ करण्याच्या प्रयत्नात असते. अर्थशास्त्र सांगते की अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी तंत्रज्ञान, भांडवल वा श्रमशक्ती या तीनांपैकी एकात तरी वाढ झाली पाहिजे. एका कुटुंबातून एकापेक्षा जास्त माणसे काम शोधू लागली तर उपलब्ध श्रमशक्ती वाढणारच आणि त्यामुळे श्रमशक्तीची किंमत कमी होऊन नफा वाढणार ही गोष्ट या मार्केट इकॉनॉमीच्या अगदी पथ्यावर पडते त्यामुळेच याविरुद्ध बोलणारे आवाज आज अतिशय क्षीण आहेत आणि पद्धतशीरपणे दुर्लक्षित केले जात आहेत.
त्यातही पुन्हा एकत्र कुटुंबपद्धती आता नष्ट झाली आहे. का झाली आहे? स्त्रीला स्वतःचे निर्णय घ्यायचे, नोकरी/व्यवसाय करण्याचे स्वातंत्र्य असेल तर एकत्र कुटुंबपद्धतीत वाईट काय आहे? काही लोकांच्या व्यावहारिक अडचणी असतीलही पण तरीही त्यात एक वाईट हेही आहे की एकत्र कुटुंबपद्धतीने ग्राहकांची संख्या घटते. नवीन घरकुल झाले नाही तर घर, टीव्ही, फ्रिज, फर्निचर घेतल्या जाणार नाहीत. एका कुटुंबाची दोन झाली की आपोआपच सगळा नवीन सेट घेतला जातोच.
शिवाय एका म्यानात दोन तलवारी एकवेळ राहतील पण एका घरात दोन स्त्रिया राहू शकत नाहीत. याच्या कारणात कोणी शहाण्याने जाऊ नये.
पण मग हे असेच चालत राहणार का? आर्थिक प्रगती म्हणजे कौटुंबिक मूल्यांचा र्‍हास असेच समीकरण आहे का? याला उपाय काय?

गृहस्थ व्हा!
ज्यांचा "ग्रीड इज गुड" या उक्तीवर विश्वास नाही पण ज्यांना स्त्रियांवर बंधनेही आणायची नाहीत आणि मुलांनाही चांगला वेळ द्यायचा आहे अशा सवत्स पुरुषांनी करायचा एक उपाय आहे. तो म्हणजे स्वतः खरोखर गृहस्थ होणे.
तोंडाने घरकामाला खालचा दर्जा नाही असे म्हणणे वेगळे आणि स्वतः प्रत्यक्ष ते करून सिद्ध करणे वेगळे. पुरुषांनी मोठ्या प्रमाणावर "होममेकर" होऊन ते सिद्ध करण्याची वेळ आली आहे असे मला वाटते.
कल्पना करा. कार्यालयात मध्यम पातळीचा व्यवस्थापक असलेल्या माणसाने वरच्या पातळीवरच्या लोकांनी ठरवलेल्या उद्दीष्टांप्रमाणे त्याच-त्याच चार-पाच टाळक्यांना हाताशी घेऊन काचेच्या बंद पिंजर्‍यात तेच-तेच काम करणे चांगले की स्वतःच्या घरात, स्वतःच्या प्रियजनांसाठी, स्वत:च्या मर्जीने रोज वेगवेगळे काम करणे चांगले?
रोजच्या घरच्या कामातही कल्पनाशक्तीला किती वाव असतो! बायको आणि मुले सकाळी कार्यालयात-शाळेत जाण्यापूर्वी त्यांच्यासाठी रोज एकच नाश्ता बनवणे इथे मंजूर नसते. आठवड्याभरात नाश्त्या-जेवणात एकही पदार्थ रिपीट होऊ नये असे आव्हान स्वत:हून घेणे हे आपल्या बॉसने डोक्यावर लादलेल्या ऑब्जेक्टीव्हपेक्षा जास्त समाधानदायी नसेल का? त्यासाठी महिन्याभराच्या सामानाची यादी करणे, ते सामान कुठे चांगले मिळते, कुठे स्वस्त मिळते यासाठी दुपारच्या वेळी शहरातल्या वेगवेगळ्या भागात जाऊन येणे, वेगवेगळ्या लोकांशी बोलणे, घासाघीस करणे हे काम कोणत्याही परचेस मॅनेजरपेक्षा जास्त गमतीशीर नाही काय? शिवाय बरोबर दुसरा होममेकर मित्र असेल तर एक बीअरचा हाफपाईंट प्यायलाही कोण हरकत घेणार आहे?
आणलेले सामान व्यवस्थित काढून डब्यांमधे भरणे, त्याची मांडणी कोणता पदार्थ कितीवेळा लागतो त्याप्रमाणे करणे, दूध-पेपर इत्यादी रतीबांचा हिशोब ठेवणे या गोष्टी कोणत्याही इन्व्हेंटरी मॅनेजमेंटपेक्षा हीणकस आहेत काय? बायकोने कमवून आणलेल्या पैशात जास्तीत जास्त चांगल्याप्रकारे घर चालवणे आणि गुंतवणूकींचे निर्णय घेणे हे कोणत्याही फिनॅन्शियल मॅनेजमेंटपेक्षा कमी महत्त्वाचे आहे काय?
शिवाय घरी ऐनवेळी पाहुणे आले किंवा बायकोने आपल्या मैत्रिणींना अचानक घरी आणले तरी तारांबळ होऊ न देता व्यवस्थित पाहुणचार करणे हे कोणत्याही कंटिन्जन्सी प्लॅनिंगपेक्षा कमी अवघड आहे काय?
सकाळचा स्वयंपाकाचा धबडगा आवरून मग दुपारच्या निवांत वेळी चार डोकी जमवून गप्पांच्या फडाबरोबर पापड लाटणे, मसाला करणे असले उद्द्योग खरच कंटाळवाणे असतील का? शिवाय हे सगळं करून घरबसल्या इतर काही वेगवेगळे उद्द्योग करणे किंवा वाचन करून स्वतःची व्यक्तिगत वाढ करून घेणे हे किंवा शाळेतून मुले आली की त्यांच्याबरोबर खेळून त्यांचा आणि स्वतःचा व्यायाम करून घेणे हे एकाचवेळी आव्हानात्मक आणि सहजसाध्यही नाही काय?
कोणी म्हणेल की रोज-रोज घरकाम करून कंटाळा येईल. तो तर रोज ऑफिसला जातानाही येतोच. शिवाय स्त्रियांना त्याची चांगली जाणीव असल्याने, स्त्रिया दयाळू असल्याने व त्यांना बाहेरचे खाणे अतिशय आवडत असल्याने दर सुट्टीच्या दिवशी कामातून सुट्टी म्हणून बाहेर खाणे होईलच.
ऑफिसमध्ये स्वत:ची ओळख करून देताना मी अनेक पुरुषांना म्हणताना ऐकले आहे की त्यांना त्यांच्या कुटुंबाबरोबर वेळ घालवायला आवडते पण प्रत्यक्षात कृती मात्र अगदी विपरीत असते. घरकामाला प्रतिष्ठा आहे यावर विश्वास ठेवून ऑफिसमध्ये काम करतो त्या तडफेने काम केले तर पुरुष यात जास्त नाही तरी स्त्रियांइतकेच चांगले काम करतील यात काहीही संशय नाही.
अर्थात ही गोष्ट अनेक थोर पुरुषांनी फार पूर्वीच अंमलात आणली आहे आणि त्यांच्याबद्दल मला अतीव आदर आहे म्हणूनच त्या सर्व पुरुषांना हा लेख मी समर्पित करतो आणि अधिकाधिक पुरुष त्यांचे अनुकरण करतील किंवा आपल्या मुलग्यांना तसे शिकवतील अशी आशा करतो.

Node read time
6 minutes
6 minutes

बॅटमॅन Sat, 16/11/2013 - 16:01

आपला नवरा घरी बसेल ही कल्पना किती बायकांना रुचेल हे पाहिले तर ही कल्पना टू गुड टु बी ट्रू ऑन ए लार्ज स्केल आहे हे उघड व्हावे. नवर्‍याने कमावते असावे, इतकेच नव्हे तर त्याचा पगार आपल्यापेक्षा जास्त असावा ही अपेक्षा करणार्‍या बायकांची संख्या जोपर्यंत कमी होत नै तोपर्यंत हे होणार नाही. पुरुषप्रधान समाजव्यवस्था आणि हावरटपणाला बायॉलॉजी समजणार्‍या स्त्रिया ही अभद्र युती यामागे असल्याने कुछ नै होगा सरजी, किमान भारतात तरी. स्कँडिनेव्हिया स्वप्नभूमी आहे.

पुरुष Sun, 17/11/2013 - 05:54

In reply to by बॅटमॅन

सुखवस्तु वर्गातल्यातरी काही स्त्रिया कर्तबगार झाल्या आहेत हे या लेखातले गृहीतक आहे. नवर्‍याला घरी बसण्याचे स्वातंत्र्य द्यायला त्यातली एखादी स्त्री तयार नसेल तर त्या स्त्रीला दुसर्‍यांकडून तिच्या स्वातंत्र्याची गळचेपी होणार नाही अशी अपेक्षा ठेवण्याचा नैतिक अधिकार उरत नाही.

३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 17/11/2013 - 20:42

In reply to by बॅटमॅन

स्कँडिनेव्हिया स्वप्नभूमी आहे.

तुम्हाला वाटते तेवढी ती भूमी आणि तिथली जनता स्वप्नवत नसावी.

स्कँडिनेव्हियात, इतर देश, समुदायांच्या तुलनेत जेंडर गॅप (याला चांगला मराठी शब्द सुचवा कोणीतरी) बरीच कमी आहे हे खरंच. पण तिथेही सुखवस्तू, कमावत्या, श्रीमंत, सर्व आर्थिक, सामाजिक गटातल्या (बहुसंख्य) स्त्रियांना आपला साथीदार आपल्यापेक्षा जास्त कमावणारा हवा असतो. (स्त्री-पुरुषांच्या mating strategies चा अभ्यास करणाऱ्या संशोधनांमधून हा विदा दिसतो. या भाषणात त्याचा उल्लेख आहे.) स्त्रियांची पुरुषांकडून असलेली आर्थिक स्थैर्य, (स्वतःच्या कमाईपेक्षा) अधिक कमाईची अपेक्षा संस्कृती, समाजरचनेवर अवलंबून नाही. ही उत्क्रांतीमधून आलेली अपेक्षा आहे, असं समजलं जातं.

अजो१२३ Sun, 17/11/2013 - 21:26

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

स्त्रियांची पुरुषांकडून असलेली आर्थिक स्थैर्य, (स्वतःच्या कमाईपेक्षा) अधिक कमाईची अपेक्षा संस्कृती, समाजरचनेवर अवलंबून नाही. ही उत्क्रांतीमधून आलेली अपेक्षा आहे, असं समजलं जातं.

बहुतेक शरीरातल्या जीनांना त्या पुरुषांच्या नोटांचा/नाण्यांचा आवाज ऐकू येत असावा म्हणून अशी उत्क्रांती झाली. उद्या जर चेस/पोकर्/पत्ते सर्वजण खेळू लागले तर बायकांच्या जीनांना पुरुषांचे रँकिंग/लक इत्यादी कळू लागेल.

शिवाय पैसा १०००-२००० वर्षांपूर्वीचा, तो ही कुठे कुठे, तेव्हा ही उत्क्रांती फार फास्ट झाली म्हणायची.

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 18/11/2013 - 21:07

In reply to by अजो१२३

बहुतेक शरीरातल्या जीनांना त्या पुरुषांच्या नोटांचा/नाण्यांचा आवाज ऐकू येत असावा म्हणून अशी उत्क्रांती झाली. उद्या जर चेस/पोकर्/पत्ते सर्वजण खेळू लागले तर बायकांच्या जीनांना पुरुषांचे रँकिंग/लक इत्यादी कळू लागेल.
शिवाय पैसा १०००-२००० वर्षांपूर्वीचा, तो ही कुठे कुठे, तेव्हा ही उत्क्रांती फार फास्ट झाली म्हणायची.

आर्थिक स्थैर्य, पैसा हा आजचा निदर्शक झाला.

एकेकाळी स्त्रिया पुरुषांची अन्न कमावण्याची तयारी आणि खरोखरच किती शिकार करून आणतो हे निश्चितच बघू शकत. पुरुषांचे शिकारीसाठी आवश्यक असणारे स्नायू स्त्रियांपेक्षा अधिक सशक्त असणं, पुरुषांच्या धडाचा V आकार आकर्षक वाटणं, पोट सुटलेल्या पुरुषांपेक्षा शरीर कमावलेले पुरुष स्त्रियांना अधिक आकर्षक वाटणं यामागे हीच कारणं आहेत. एकेकाळी अर्थातच पैसे नव्हते पण वस्तुविनिमय पद्धती होती. शेजारी कुटुंबासोबत शिकारीचा वाटा वाटून घेण्याचीही पद्धत होती. आणि या सगळ्यातून स्त्रियांना कोणत्या प्रकारचे पुरुष आवडतात याचा अभ्यास आज करायचा झाला तर आर्थिक स्थिती हाच मापक शिल्लक रहातो. स्कँडीनेव्हियात कमी असणाऱ्या जेंडर गॅपमुळे, ही स्त्रियांची उत्क्रांतीमधून आलेली मानसिकता आहे हे लक्षात आलं. उलट दिसलं असतं तर हा कदाचित संस्कृतीचा परिणाम आहे असं म्हणायला जागा राहिली असती.

म पिलांचा सांभाळ नीट करणारी बायको असावी ही अपेक्षा उत्क्रांती मधून आली असेल का?

पूर्णपणे नाही. लैंगिक पुनरुत्पादनात ज्या लिंगाच्या प्राणी/व्यक्तींना पुढच्या पिढीची काळजी घेण्यातून आधी मान सोडवून घेता येते, ते असं करतात. माणसांमधे, पुरुषांना १०-२० मिनीटांमधेही आपली गुणसूत्रं पुढे पाठवता येतात, स्त्रियांना निदान ९ महिने थांबावं लागतं. अर्थात पुरुष (इतर प्रजातींमधे नर, अपवादांमधे माद्या) आपलं gamete देतात आणि संभोगासाठी, खरंतर पुढच्या मुलासाठी नवा जोडीदार शोधायला निघतात. हे वाचून पुरुष कसले हरामखोर असतात, असं काही वाटू शकतं. पण हे काही ठरवून, मोजूनमापून आणलेली मानसिकता नाही. त्यामुळे याबद्दल judgemental होणं अयोग्य. (वस्तू हातातून, पकडीतून सोडल्या, सुटल्या तर खाली पडतात म्हणून गुरूत्वाकर्षण कसं हरामखोर आहे, असं म्हणण्यासारखं होईल.)

उत्पादनातल्या सरप्लसमुळे काही लोकांना शेती, अन्ननिर्माण सोडून पूर्णवेळ इतर काही करता यायला लागलं तेव्हापासून बदल व्हायला लागला. काही लोक शेती, शिकार सोडून मडकी बनवायला लागले, धातू गाळायला लागले. अलिकडच्या काळात काही लोक पाळणाघरं चालवायला लागले. राजेशच्या प्रतिसादात आलंय त्याप्रमाणे ४०-४५ वर्षांच्या आयुष्यात ७ मुलं असं गणित सुटून ८०-९० वर्षांचं आयुष्य आणि १-२-३ मुलं असं समीकरण झालं. आता गर्भधारणेचा काळ कमी, मुलं सांभाळण्यासाठी आईनेच कष्ट करण्याची आवश्यकताही फार कमी, कामाचं स्वरूपही शारीरिक असेलच असं नाही (अगदी प्रसूतीच्या आदल्या दिवसापर्यंत बायका कार्यालयात दिसतात.) तेव्हा मुलांचं संगोपन आईनेच करावं अशी समाजव्यवस्था राहिलेली नाही. ती टिकवून ठेवण्यात नुकसानही आपलंच आहे. व्यक्तिशः त्या स्त्रियांचा तोटा होतोच पण समाज म्हणून आपण हुशाार, कर्तबगार व्यक्तिंना फक्त मुलं सांभाळण्यात अडकवून ठेवतो. अनेक न्यूटन, एडवर्ड जेन्नर, डार्विन, मेरी क्यूरी किंवा अमर्त्य सेन फक्त समाजव्यवस्थेने लादल्यामुळे घरातच चूल आणि मूल करून सडले ... आपल्याला त्यांचा पत्ताच नाही.

या बदललेल्या सामाजिक, आर्थिक व्यवस्थेमुळे मुलाचं (गर्भारपण, प्रसूती, सुरूवातीचं पोषण या शारीर फरकामुळे असणाऱ्या आवश्यकता वगळता बाकी) सगळी जबाबदारी आईनेच घ्यावी ही व्यवस्था त्या बाईवर अन्यायकारक आहेच, शिवाय समाजाचं दूरगामी नुकसान करणारी आहे.

तिथले सोशल इंडिकेटर्स पाहता आपल्या बुर्सटलेल्या मायभूमीच्या तुलनेत स्वप्नभूमीच वाटते.

भारतीय पुरुषांची वखवख आणि बायकांना दिलेली वर्तणूक पहाता भारतीय स्त्रियांनाही मायभूमीच्या तुलनेत ती स्वप्नभूमीच वाटावी.
(आता पुस्तक हाताशी नाही, पण Evolutionary psychology नामक पुस्तकात डेव्हीड बस या लेखकाने या संदर्भात गोळा केलेली आकडेवारी दिलेली आहे. उदा: भारतात ९०% वर लोकांना आपला/आपली जोडीदार लग्नावेळी अनाघ्रात असावेत असं वाटतं. स्कँडीनेव्हीयात, (स्वीडन किंवा नॉर्वे) ५-७% असा काहीसा आकडा दिसला. वर पुन्हा आपल्याकडची प्रसारमाध्यमं, बलात्काराची बातमी छापताना त्यात तोंड झाकलेल्या मुलीचं स्केच टाकणार.)

प्रोव्हायडर क्वालिटीज पाहिजेत हे ठीक, पण म्हणून आपल्यापेक्षा जास्तच पाहिजेत हा हावरटपणा झाला. त्याला बायालॉजीचे आवरण देऊन मखलाशी करणे म्हणजे निर्लज्जपणाचा कळस आहे.

त्यामुळे याबद्दल judgemental होणं अयोग्य. (वस्तू हातातून, पकडीतून सोडल्या, सुटल्या तर खाली पडतात म्हणून गुरूत्वाकर्षण कसं हरामखोर आहे, असं म्हणण्यासारखं होईल.)

याउलट एका बाईकडून आपलीच मुलं होणार आणि मुलं झाल्यानंतर त्यांचं पितृत्त्व शोधण्याची सोय असताना, दिसली मुलगी की टाकली फ्रेंड रिक्वेस्ट, किंवा दिसली बाई की पाहिलं तिच्याकडे मान मोडेस्तोवर वळून, हे असं पुरुषांचं वर्तन जेवढं नैसर्गिक आहे त्यापेक्षा स्त्रियांचं हे वर्तन काहीही निराळं नाही. पुरुष जेवढे संभोगासाठी वखवखलेले तशा बायका पैशांसाठी हावरट. दोन्ही लिंगांची आपापली वेगवेगळी mating strategy.

(व्यावहारिक मोड अॉन) प्रत्येकालाच असं का वाटू नये, की आपला जोडीदार आपल्यापेक्षा जास्त कमावणारा/कमावणारी, अधिक किंवा तुल्यबळ सामाजिक स्थान मिळवणारा/मिळवणारी असावी? जास्त पैसा, जास्त स्थैर्य हवं असतंच तर मग ताकाला जाऊन भांडं का लपवा? (व्यावहारिक मोड अॉफ)

मग पुरुषांचीही घरेलू आणि आपल्यापेक्षा हॉट बायकोची अपेक्षा तशीच आली असेल, नै का? नै म्हणजे सर्व कल्चर्समध्ये तसेच दिसते म्हणून म्हणालो. म्हणजे आपण कशाही असलो तरी आपल्यापेक्षा जास्त कमावणारा नवरा अपेक्षिणे नैसर्गिक, तर त्याच न्यायाने आपण ओम पुरीपेक्षा कुरूप असलो तरी बायको *** (चूज युवर ओन फ्यांटसी) सारखी देखणी पाहिजे हेही नैसर्गिकच, नै का?

बायका आपली कुवत पाहून किती अपेक्षा धरायची ते ठरवतात. पुरुष मात्र आपण टकले, पोटे, मामा कसेही दिसणारे असू किंवा रिचर्ड ब्रॅन्सन असू वा ५०० स्क्वे. फूटाच्या घराचं भाडं कसंतरी परवडत असेल पण, दिसली बाई की धरला हव्यास, असं करतात म्हणे! या बाबतीत मात्र men are dogs असं त्या Evolutionary psychology नामक पुस्तका"वर" वाचलं.

पण पुन्हा एकदा, याबद्दल मी तरी काही judgemental होत नाही. (तसं करणं, वस्तू हातातून, पकडीतून सोडल्या, सुटल्या तर खाली पडतात म्हणून गुरूत्वाकर्षण कसं हरामखोर आहे, असं म्हणण्यासारखं होईल.)

अवांतर - ओम पुरी मला तरी आवडतो ब्वॉ! तुम्हाला नसेल ते अंग म्हणून बायकांना काय तो आवडू नये का काय? कर्तबगार आहे, चांगला अभिनेता आहे, हुशार वाटतो ... अलिकडे कायतरी बायकोला मारलं म्हणे. पण ते निराळं. त्याबद्दल निषेधच. तसा इयन हीलीसुद्धा काही देखणा नव्हे, पण तो का आवडू नये बायकांना?

वस्तू हातातून, पकडीतून सोडल्या, सुटल्या तर खाली पडतात म्हणून गुरूत्वाकर्षण कसं हरामखोर आहे, असं म्हणण्यासारखं होईल.)
हे उदाहरण प्रचंड आवडलं. भारिच. पण दोन पाच ओळीत तिसर्‍यांदा तेच वाचलं तेव्हा पूर्ण वाचायचा कंटाळा आला.

बॅटमॅन Mon, 18/11/2013 - 21:28

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

त्यामुळे याबद्दल judgemental होणं अयोग्य. (वस्तू हातातून, पकडीतून सोडल्या, सुटल्या तर खाली पडतात म्हणून गुरूत्वाकर्षण कसं हरामखोर आहे, असं म्हणण्यासारखं होईल.)
याउलट एका बाईकडून आपलीच मुलं होणार आणि मुलं झाल्यानंतर त्यांचं पितृत्त्व शोधण्याची सोय असताना, दिसली मुलगी की टाकली फ्रेंड रिक्वेस्ट, किंवा दिसली बाई की पाहिलं तिच्याकडे मान मोडेस्तोवर वळून, हे असं पुरुषांचं वर्तन जेवढं नैसर्गिक आहे त्यापेक्षा स्त्रियांचं हे वर्तन काहीही निराळं नाही. पुरुष जेवढे संभोगासाठी वखवखलेले तशा बायका पैशांसाठी हावरट. दोन्ही लिंगांची आपापली वेगवेगळी mating strategy.

अगदी बरोब्बर. मग फक्त पुरुषांचे सौंदर्याचे निकष टीकास्त्रांनी डागाळताना हे लॉजिक कुठे गेलं होतं?

(व्यावहारिक मोड अॉन) प्रत्येकालाच असं का वाटू नये, की आपला जोडीदार आपल्यापेक्षा जास्त कमावणारा/कमावणारी, अधिक किंवा तुल्यबळ सामाजिक स्थान मिळवणारा/मिळवणारी असावी? जास्त पैसा, जास्त स्थैर्य हवं असतंच तर मग ताकाला जाऊन भांडं का लपवा? (व्यावहारिक मोड अॉफ)

असं असेल तर मग सगळेच कुत्रे आहेत. एकट्या पुरुषांना बोलायचं काम नाही.

बायका आपली कुवत पाहून किती अपेक्षा धरायची ते ठरवतात. पुरुष मात्र आपण टकले, पोटे, मामा कसेही दिसणारे असू किंवा रिचर्ड ब्रॅन्सन असू वा ५०० स्क्वे. फूटाच्या घराचं भाडं कसंतरी परवडत असेल पण, दिसली बाई की धरला हव्यास, असं करतात म्हणे! या बाबतीत मात्र men are dogs असं त्या Evolutionary psychology नामक पुस्तका"वर" वाचलं.

सिलेक्टिव्ह रीडिंग बाकी मस्त जमतं बॉ तुला. व्यक्तिगत मत कुठे आणि मिनिमम स्टँडर्ड कुठे. व्यवहारात काय होतं ते न सांगता बाष्कळ कमेंटरी सुरू!!! एकूण लौकिकाला साजेसेच आहे सगळे =))

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 18/11/2013 - 21:38

In reply to by बॅटमॅन

व्यवहारात काय होतं ते न सांगता बाष्कळ कमेंटरी सुरू!!!

व्यवहार? त्याबद्दल मी काहीही बोलत नाहीये. व्यवहारात लोक बऱ्यापैकी वेगळं वागतही असतील, वागतातही. हे Evolutionary psychology बद्दल सुरू आहे. दोन्हींमधे फरक आहे. संस्कृती, आर्थिक-सामाजिक स्थान, त्यामुळे बदलणारं वर्तन, विचार, मूल्यं यांचा इथे काहीही संबंध नाही.

अवांतर:

एकूण लौकिकाला साजेसेच आहे सगळे

या असल्या व्यक्तिगत रोखाच्या vitrioli चा कंटाळा येत नाही का हो?

बॅटमॅन Mon, 18/11/2013 - 21:49

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

असे असेल तर मग पुरुषी मेंटॅलिटीलाच फक्त नावे ठेवू नयेत जी कायम ठेवली जातात.

बाकी व्हिट्रिऑलची दीक्षा तुमच्याकडूनच घेतली आहे, कल्जि नसावी.

अनुप ढेरे Sun, 17/11/2013 - 22:25

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

म पिलांचा सांभाळ नीट करणारी बायको असावी ही अपेक्षा उत्क्रांती मधून आली असेल का?

बॅटमॅन Mon, 18/11/2013 - 01:49

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

तिथले सोशल इंडिकेटर्स पाहता आपल्या बुर्सटलेल्या मायभूमीच्या तुलनेत स्वप्नभूमीच वाटते.

अन

स्त्रियांची पुरुषांकडून असलेली आर्थिक स्थैर्य, (स्वतःच्या कमाईपेक्षा) अधिक कमाईची अपेक्षा संस्कृती, समाजरचनेवर अवलंबून नाही. ही उत्क्रांतीमधून आलेली अपेक्षा आहे, असं समजलं जातं.

प्रोव्हायडर क्वालिटीज पाहिजेत हे ठीक, पण म्हणून आपल्यापेक्षा जास्तच पाहिजेत हा हावरटपणा झाला. त्याला बायालॉजीचे आवरण देऊन मखलाशी करणे म्हणजे निर्लज्जपणाचा कळस आहे.

तसेच असेल तर मग पुरुषांचीही घरेलू आणि आपल्यापेक्षा हॉट बायकोची अपेक्षा तशीच आली असेल, नै का? नै म्हणजे सर्व कल्चर्समध्ये तसेच दिसते म्हणून म्हणालो. म्हणजे आपण कशाही असलो तरी आपल्यापेक्षा जास्त कमावणारा नवरा अपेक्षिणे नैसर्गिक, तर त्याच न्यायाने आपण ओम पुरीपेक्षा कुरूप असलो तरी बायको *** (चूज युवर ओन फ्यांटसी) सारखी देखणी पाहिजे हेही नैसर्गिकच, नै का?

तसे असेल तर मग पुरुषांच्या सौंदर्य व होमलिनेस प्रेफ्रन्सला इथे ऐसीवर हजारवेळा शिव्या घातल्या गेल्या त्या व्यर्थच म्हणायच्या. मागणी-पुरवठा दोन्ही बाजूंनी आहे. निषेध असा सोयीस्करपणे केला तर तर्कदुष्टतेचे पितळ उघडे पडण्याखेरीज काही हाती लागत नाही.

बॅटमॅन Mon, 18/11/2013 - 16:22

In reply to by मन

आयमाय स्वारी. त्यातल्यात्यात अनक्यूट चेहरा म्हणून तोच डोळ्यासमोर आला. अनक्यूट म्हणजे कुरूप नव्हे हे मान्य. त्यामुळे त्याच्या जागी आजवर पाहिलेला सर्वांत कुरूप पुरुष कल्पावा.

'न'वी बाजू Sat, 16/11/2013 - 20:06

"...बैलोबांस घोरावसाहेबजी," एवढेच प्रस्तुत लेखकमहोदयांस अतिशय नम्रपणे आणि आदरपूर्वक सुचवावेसे वाटते.

(च्यामारी, सकाळीसकाळी काय विषय काढलाय! लेखकमहोदय शीनियर शिट्टीझन असावेत किंवा कसे, अशी शंका येते. कारण, अन्यथा, इतके पकाऊ (विषयावरचे) प्रवचन देणे हे केवळ त्या (थ्यांकफुली) मरू घातलेल्या पिढीचेच प्रेरॉगेटिव होते, अशी जी भाबडी समजूत होती, ती आज पार धुळीस मिळते की काय, अशी सार्थ भीती वाटू लागलेली आहे. इतका पकाऊपणा तर 'सनातन प्रभात' नामक त्या दिव्य संस्थेचे पाईकही न करू जाणोत!

जाता जाता: (१) 'टू माइंड वन्स ओन बिझनेस' ही संकल्पना इण्डियन संस्कृतीत ज्या दिवशी रुळेल, आणि (२) त्या इंग्रजी संज्ञेकरिता चपखल अशी एखादी नेटिव प्रतिसंज्ञा किमान एका तरी भारतीय भाषेत ज्या दिवशी आढळेल, (या दोन्ही अटींची पूर्तता ज्या दिवशी होईल) त्या दिवशी जगबुडी होईल, असे भाकीत आहे. (न झाल्यास त्या दिवशी आम्ही स्वतः घरच्या बादलीत पाणी भरून त्यात घरचाच जग जातीने बुडवू. प्रॉमिस!))

नगरीनिरंजन Sat, 16/11/2013 - 22:06

स्त्री आणि पुरुष हे एकमेकांमध्ये फिट्ट बसून पूर्णगोल होणारे अर्धगोल उरले नसून एकमेकांवर आपटणारे गोटे केले जात आहेत.

At the end of the 20th century, the modern myth of sexual equality has finally triumphed completely over the complementarity of gender, in which the plurality of cultures - distinct ways of living, dying and suffering - was rooted. The reign of vernacular gender marked a profoundly different mode of existence than what prevails under what I call the regime of economic sex. They are male/female dualities of a very different kind: Economic sex is the duality of one plus one, creating a coupling of exactly the same kind; gender is the duality of two parts that make a whole which is unique, novel, nonduplicable.
- Ivan Illich (The Sad Loss of Gender)

राजेश घासकडवी Sat, 16/11/2013 - 22:54

पण दुर्दैवाने नफा म्हणजेच सर्व काही असे समजणार्‍या मार्केट इकॉनॉमीने ही गोष्ट फार लवकर हेरली आणि स्त्रीच्या स्वातंत्र्याला काही लाक्षणिक गोष्टींमध्ये अडकवून टाकले.

हे विश्लेषण पटलं नसलं तरी लेखाचा रोख आवडला. नवरा-बायको मिळून बनणारं उत्पादन एकक नक्की कशा प्रकारे कार्य करू शकेल याची समीकरणं बदलली आहेत हे निश्चित. एके काळी फर्टिलिटी रेट सात होता, आणि स्त्रियांचं अपेक्षित आयुष्य चाळीस-पन्नास वर्षांचं होतं. त्यातली कर्तबगारीची वर्षं वीस ते चाळीस-पंचेचाळीस. म्हणजे फक्त वीस पंचवीस वर्षं. त्यात सात मुलं होऊ द्यायची म्हणजे गरोदर असण्यात, त्यांच्या संगोपनात प्रचंड काळ जायचा. यांत्रिकीकरण झालेलं नसल्यामुळे घरच्या कामाचा धबडगाही प्रचंड असायचा. त्यामुळे एवीतेवी मुलं होण्यापायी बाई बराच काळ घरी असणारच आहे, तर तिच्यावरच घरकामं करण्याची पाळी येणं साहजिक होतं. आता स्त्रीच्या उमेदीचा कालावधी चाळीसेक वर्षांचा झालेला आहे आणि फर्टिलिटी रेट दोनच्या जवळ आला आहे. यामुळे मुलं होऊ देण्यापुरता मर्यादित काळ वजा केला तर पुरुषांशी तुलना करता येण्याइतका काळ करिअरसाठी उपलब्ध असतो. याचा फायदा घेऊन स्त्रियांनीच आपापल्या पायावर उभं रहायला सुरूवात केलेली आहे.

जसजसे अधिक लोक फायदेशीर करिअर करणं सुरू करतील, तसतसा रिकामा वेळ असलेल्या, मुलं सांभाळणाऱ्या बायका कमी उपलब्ध होतील. आणि अर्थातच मुलं सांभाळण्यासाठी लागणारा खर्च वाढेल. मुलांना सांभाळणं म्हणजे केवळ त्यांना सुरक्षित ठेवणं किंवा कशाततरी गुंतवून ठेवणं एवढीच मर्यादित सर्व्हिस सध्या मिळते. अनेक आयांना किंवा बापांनाही, आपण ही उत्तरोत्तर महाग होणारी पण अगदीच तुटपुंजं देणारी सर्व्हिस विकत घेण्यापेक्षा स्वतःची नोकरी सोडून ती पुरवणं फायद्याचं, आरामाचं आणि अधिक आनंददायी वाटू शकेल.

त्यासाठी 'घरकाम म्हणजे केेवळ बायकांचं' असं समजून त्याकडे तुच्छतेने पहाण्याची मनोभूमिका सोडली पाहिजे हा लेखाचा मुख्य गाभा पुरेपूर पटला.

अर्थात ही गोष्ट अनेक थोर पुरुषांनी फार पूर्वीच अंमलात आणली आहे आणि त्यांच्याबद्दल मला अतीव आदर आहे म्हणूनच त्या सर्व पुरुषांना हा लेख मी समर्पित करतो आणि अधिकाधिक पुरुष त्यांचे अनुकरण करतील किंवा आपल्या मुलग्यांना तसे शिकवतील अशी आशा करतो.

धन्यवाद, माझ्या वडलांतर्फे.

मन Sat, 16/11/2013 - 23:25

In reply to by राजेश घासकडवी

तुमची केस ही क्लासिकल केस स्टडी होउ शकते इतकी झकास आहे.
तशीही ती टीव्हीवर येउन गेलेली आहे.
त्याबद्दल तुम्हाला अधिक काही मांडता येइल का इथे ?

पुरुष Sun, 17/11/2013 - 05:21

In reply to by राजेश घासकडवी

नवरा-बायको मिळून बनणारं उत्पादन एकक नक्की कशा प्रकारे कार्य करू शकेल याची समीकरणं बदलली आहेत हे निश्चित.

एककातल्या प्रत्येक भागाने सगळी कामे करणे अपेक्षित असेल तर प्रत्येक भाग एकक होतो.
उदा. टीव्ही हे एकक मानले तर त्यातल्या प्रत्येक भागाने ठराविक काम करणे अपेक्षित आहे. प्रत्येक भाग सगळी कामे करु शकत असेल तर प्रत्येक भाग हा एक टीव्ही होईल.
प्रतिक्रियेबद्दल धन्यवाद.

अजो१२३ Sun, 17/11/2013 - 00:03

फुले, कर्वेंसारख्या द्रष्ट्या लोकांमुळे आपल्या समाजात स्त्रीचे स्थान सुधारले. मुली शिकू लागल्या

जुन्या काळात स्त्रीयांच्याच काय पुरुषांच्या पण शाळा नव्हत्या. शिक्षण कसे मोजायचे याचे काही परिमाण मानले तर अगोदर स्त्रीया (पुरुषांच्या मानाने) शिकलेल्या नव्हत्या म्हणायला काही कारण नाही. सगळे शिक्षण घरच्या घरी होत असे आणि मुलांबरोबर मुलींनाही शिकवत. पण अगोदरच्या काळातल्या शिक्षणाचे मूल्यमापन करताना शाळेचे सर्टीफिकेट नाही म्हणून स्त्रीयांना अशिक्षित गणण्याचा एक विचित्र प्रकार अलिकडे चालू झाला आहे. परंपरागत रित्या एकूण लिटरसी रेट १०% च्या आसपास होता आणि स्त्रीयांचा लिटरसी रेट २ ते ६% होता, म्हणजे फरक होता पण असा ० व १०० असा नव्हता.
वरील विधान जर मी 'फूल्यांमूळे/कर्व्यांमूळे मूली शिकू लागल्या'असे वाचले तर तो वस्तूस्थितीचा विपर्यास आहे. फूले पुण्यापलिकडे कोणाला माहित नव्हते आणि कर्वे आजही माहित नाहीत.

मिहिर Sun, 17/11/2013 - 00:38

In reply to by अजो१२३

सगळे शिक्षण घरच्या घरी होत असे आणि मुलांबरोबर मुलींनाही शिकवत.

सगळे म्हणजे काय काय शिकवत म्हणे मुलींना?

परंपरागत रित्या एकूण लिटरसी रेट १०% च्या आसपास होता आणि स्त्रीयांचा लिटरसी रेट २ ते ६% होता, म्हणजे फरक होता पण असा ० व १०० असा नव्हता.

ह्या आकड्यांचा स्रोत काय?

अजो१२३ Sun, 17/11/2013 - 10:30

In reply to by मिहिर

शिक्षणाचे दोन प्रकार करता येतील. शाळा यायच्या अगोदरचे घरचे शिक्षण. शाळापद्धती आल्यानंतरचे फॉर्मल शिक्षण.

माझ्या सगळ्या खापरपणज्या, पणज्या, आज्ज्या पहिल्या पद्धतीप्रमाणे शिक्षित होत्या पण दुसर्‍या प्रमाणे अशिक्षित मानता येतील. मी कितीतरी म्हातार्‍या पाहिल्या आहेत ज्या व्यवस्थित साक्षर आहेत/होत्या पण शाळेत कधीच गेल्या नाहीत. त्यांची एकूण जाण पाहता मी त्यांना साक्षरच म्हणतो. मला मिळालेल्या फिडबॅकनुसार हे पिढ्यानपिढ्या असंच आहे.

तो सगळे शब्द गाळून वाक्य वाचले तरी चालेल.

आकड्यांचा स्रोत आठवत नाही. आधुनिक शिक्षण व्यवस्था येण्यापूर्वी भारतात स्त्रीसाक्षरता किती होती याचा आठवत असलेला आकडा दिला आहे. मुद्दा आकडा नाही, तो पुरुष साक्षरतेच्या फारच कमी नव्हता हा आहे.

अरविंद कोल्हटकर Sun, 17/11/2013 - 22:11

In reply to by मन

मेकॉले ह्या साम्राज्यवाद्या दुष्टाने भारतीयांना कायमचे गुलामीत ठेवण्यासाठी आणि थोर भारतीय संस्कृति त्यांच्या पूर्ण विस्मरणात जावी अशासाठी इंग्रजी विद्या भारतात आणली, हे एक मोठे षड्यन्त्र होते, तत्पूर्वी भारतात शिक्षणाच्या बाबतीत सर्व आबादीआबाद होती, स्त्रिया शूद्र, सर्वांना शिक्षण उपलब्ध होते, गावोगावी शाळा होत्या आणि मेकॉलेने हे सर्व नासवले असे मानणारा मोठा गट अस्तित्वात आहे. ते सर्व आधारासाठी गांधीवादी विचारवंत धरमपाल ह्यांचे The Beautiful Tree हे पुस्तक उद्धृत करत असतात. दक्षिण हिंदुस्तानातील काही जिल्ह्यांमधून गोळा केलेल्या काही आकडेवारीवर हे पुस्तक आधारलेले आहे.

जिज्ञासूंनी हे पुस्तक अवश्य वाचून आपापले मत बनवावे.

lakhu risbud Mon, 18/11/2013 - 14:25

In reply to by अजो१२३

जोशी सर, अक्षर ओळख असणे आणि सुशिक्षित असणे यात फरक आहे असे नाही वाटत का ?
आणि तुमचे घराणे ज्या संवर्गाचे प्रतिनिधित्व करते तो समाजाच्या एकूण संखेच्या तुलनेने फारच कमी वाटत नाही का ?
इथे सुशिक्षित असणे याचा अर्थ शिकलेल्या स्त्रियांचा नोकर्या करण्याचा अधिकार,पिढीजात उद्योगधंदा असेल तर नवर्याच्या बरोबर आर्थिक व्यवहार सांभाळणे असा घ्यावा.
पुरुष वर्गाची मानसिकता बदलणे उदा. आत्ता नसल्या तरी येणाऱ्या भविष्यात स्त्रिया आपल्या बरोबर अर्थार्जनासाठी नोकरीच्या ठिकाणी असणार आहेत हे मान्य करणे,आणि हि अपरिहार्य घटना मानून reluctantly होकार देणे. यामागची मानसिकता घडविणे हे फुले आणि कर्व्यांचे काम नाही का ?
सांख्यिकी विदा देऊन आणि त्यावर तुलना करून Larger Picture दुर्लक्ष होते आहे असे मला वाटते. अशा बाबतीतील सांख्यिकी विदा हा फक्त काही प्रमाणातच परीप्रेक्ष्य देतो. त्या काळातील सामाजिक, सांस्कृतिक स्थितीबद्दल दुर्लक्ष केले जाते.

लेखाचा विषय स्त्री आणि पुरुष साक्षरता/शिक्षण्/इइ भेद असा आहे. माझे म्हणणे असे आहे कि सामाजिक बदलांचा काळ सोडला तर स्त्री व पुरुषांच्या साक्षरतेत वा शिक्षिततेत वा अर्थिक स्वातंत्र्यात पराकोटीचा फरक नव्हता.

शिवाय
१.इथे जिला आपण सुशिक्षित स्त्री म्हणताय तिला सबल (एम्पॉवर्ड) स्त्री म्हणतात.
२. फुले आणि कर्वे यांचे काम स्त्री विषयक सुधारणा नाही असे मी म्हणत नाहीय. पण इंग्रजांच्या ऐवजी त्यांना श्रेय देणे चूक आहे. आमच्या कंपनीत टॉप मॅनेजमेंटने सॅप इंप्लिमेंट केलं आणि केवळ माझ्या डिपार्टमेंट मधे मी (एक सहकर्मचारी म्हणून) कर्मचार्‍यांचा विरोध हाताळला तर मी सगळ्या कंपनीत सॅप लावले म्हणणे चूकीचे आहे.
३. विद्यामधे सामाजिक सांस्कृतिक बाबी घातल्या तर आज महाराष्ट्रात १००% स्त्रीशिक्षण असायला हवे होते. महाराष्ट्राची तशी पार्श्वभूमी आहे. पण ती वगळूनही आपल्या राज्याची स्थिती वासरात लंगडी गाय टाईप आहे.
४. बहुतेक सुधारकांचा विचारांचा मूल स्रोत इंग्रज/ त्यांची केवळ उपस्थिती होती. तरीही प्रत्येक वेळी भारतीय लोक डायरेक्ट इंग्रजांना पाहतच होते ना. आपल्या सुधारकांनी त्यांना सांगितले म्हणून आपले लोक सुधारले (बद्ल अ‍ॅड्जस्ट करून घेतला) असे म्हणणे गैर आहे.

आणि मी काही सर वैगेरे नाही, मला अरुण म्हणा अशी विनंती.

Nile Sun, 17/11/2013 - 01:13

In reply to by अजो१२३

फूले पुण्यापलिकडे कोणाला माहित नव्हते आणि कर्वे आजही माहित नाहीत.

माहित असायची गरज आहेच असे नाही. बहुसंख्य स्त्रियांना (खरंतर कुटुंबांना म्हणायला हवं) फॅमिली प्लानिंगचा पर्याय आज सहज उपलब्ध आहे आणि बहुसंख्य मुलींना शिक्षण मिळणे सहजसोपे झाले आहे यात कर्वे आणि फुलेंच्या कार्याची महती आहे, किती लोकांना त्यांचे नाव आणि कार्य माहित आहे यात नाही.

असले "माहित नाहीत" सारखे ट्रिव्हियल मुद्दे उपस्थित करून त्यांच्या कार्याला कमीपणा दाखवणे (इंटेन्शनली ऑर नॉट) लाजिरवाणे आहे.

अजो१२३ Sun, 17/11/2013 - 10:48

In reply to by Nile

http://www.mapsofindia.com/census2011/literacy-rate.html
मधे केरळ व पूर्वोत्तरेची (सगळीच) राज्ये महाराष्ट्रापेक्षा स्त्रीसाक्षरतेत पुढे आहेत. हे कसे ते सांगू शकाल का? जिथे ठिणगी पडली ते राज्य इतर तुल्य राज्यांपेक्षा पुढे आहे खरे पण अगदीच भिकार मार्जिनने. शिवाय फूल्या, कर्व्यांचा ओढून ताणूनही संबंध इतर भारताच्या साक्षरतेत संबंध आणता येत नाही.

आणि महान लोकांचे कार्य महान असते, त्यांचे जीवन, विचार सगळं महान असतं. कोणी त्याला कमीपणा द्यायचा प्रयत्न करू नये. पण जे वास्तव ते वास्तव. कोणाला अस्थानी/अवाजवी श्रेय द्यायचं योग्य नसावं. व्यक्तित्वं आहेत तितकीच श्रेष्ठ मानली जावीत, त्यापेक्षा जास्त नाहीत. भारतीयांच्या अशा सवयींमुळे रजनीकांत्/बच्चन्/गांधी/तेंडूलकर/खान इ इ विचित्र कल्टस निर्माण होत आहेत.

फुल्यांचं चित्र बसपाच्या पोस्टरवर असतं म्हणून इतरत्र ते माहित आहेत पण ते आणि स्त्रीसाक्षरता? छे हो.

Nile Mon, 18/11/2013 - 03:41

In reply to by अजो१२३

फुले आणि कर्वे यांच्यामुळे काहीही फरक पडला नाही असा तुमचा मुद्दा आहे असे तुमचा प्रतिसाद वाचून माझे मत झाले आहे, बरोबर?

बॅटमॅन Sun, 17/11/2013 - 01:38

In reply to by अजो१२३

असहमत. अव्वल इंग्रजी (१८५७ च्या अगोदर) काळातल्या रिपोर्ट्समध्ये गावात अनेक (अर्थातच दलितेतर) जातींची पोरे शिकत अशा शाळांचा उल्लेख आहे. पंतोजीची शाळा म्हणत पण शिक्षक ब्राह्मणेतरही असत.

आणि अमुक एका परिसरापलीकडे माहिती नसण्याने त्यांच्या कार्याचे महत्त्व कमी होते ही थिअरी गर्हणीय आहे. तसे तर मग चारपाच जिल्हे सोडल्यास शिवाजीचे राज्यच नव्हते. पण त्याचे महत्त्व कशासाठी आहे ते लक्षात घेतले पाहिजे. उपमा एकवेळ सोडा, फुले पुण्याबाहेर कुणाला माहिती नव्हते हे मला खरे वाटत नाही. किमान मुंबै प्रांतात तरी ते नक्कीच पॉप्युलर झाले होते, यद्यपि हयातीत इतके नसले तरी. महाराष्ट्र सोडून उरलेल्या ठिकाणी म्हटल्यास एकवेळ ठीके पण तेही तपासणे गरजेचे आहे.

अन संशोधक वर्तुळात कर्व्यांना कुणी नाकारते असे वाटत नाही.

अजो१२३ Sun, 17/11/2013 - 11:39

In reply to by बॅटमॅन

स्त्रीयांनी कारभार पाहू नये अशी मानसिकता भारतात कधीच नव्हती. परंतु सामाजिक बदलांच्या पार्श्वभूमीवर हे जेव्हा तपासले जाते तेव्हा हे साफ खोटे वाटते आणि होते. ते सामाजिक बदल असे - १. स्त्रीयांना घराबाहेर सरकारी शाळेत पाठवणे. २. स्त्रीयांना घराबाहेर नोकरीस पाठवणे. या दोन गोष्टींना प्रथम फार विरोध झाला. पण यामागची भूमिका स्त्रीयांनी शिकू नये व कमवू नये अशी हिणकस नव्हती. कारण ज्या घरात पूर्वी शिक्षण होते त्या घरात मूलींना शिकवत आणि ज्या घरात स्त्रीया कमावू शकत त्या घरात कमावत. 'घराबाहेर' शिक्षण वा उत्पन्न प्रकार सहसा टाळला जाई, तरीही कितीतरी प्रकारच्या कमाया घराबाहेरच कराव्या लागत. माळीणी फूले (स्वतःच्या) घराबाहेरच विकत, अनेक उदाहरणे देता येतील.

ज्या काळात प्रारंभी स्त्रीयांना शिक्षणासाठी (१८०० ते आज) वा कमाईसाठी (१९०० ते आज) घराबाहेर जावे लागले तेव्हा त्याला विरोध होत आहे. हा सगळा विरोध केवळ स्त्रीयांचे प्राबल्य वाढू नये म्हणून होता असे म्हणणे अत्यंत हिणकसपणाचे आहे. (एकदमच) पर पुरुषांच्या आज्ञेखाली आपली बायको, इ असणे हा प्रकार लोकांना नवीन्/अस्वीकार्य होता, जे नोकरीच्या ठीकाणी अपेक्षित होते. स्त्रीयांची (आजच्या काहींना गळेपडू/अनावश्यक वाटणारी) सुरक्षिततेची काळजी, मुलांच्या संगोपनातले आणि घरातल्या कामांमधले असंतुलन हे ही होते. या तीन कारणांना अर्थ नाही असे मानणारे महाभाग चिकार आहेत.

असे जर नसते तर कमावणार्‍या मूलींना जी अतिप्रचंड मागणी आली आहे ती आली नसती. तिजोरीचा चाव्यांचा जुडगा नेहमी पाटलीच्याच कमरपट्ट्याला पाहिला आहे. जगात नेहमीच एक सुप्त स्त्रीराज्य असते.

१. शिवाजी आणि कर्वे यांच्यात फरक आहे. लाट जर जिवंत वा फोफावत राहीली तर त्या प्रवर्तकाचे स्वतःचे कार्यक्षेत्र काय याला अर्थ नाही. शिवाजीचा फोटो लावून शाखा भरवणारा (त्यांची प्रेरणा असणारा) संघ आज भारतावर राज्य करू पाहतोय. कर्व्या/फूल्यांचं असं काय आहे?

मन Sun, 17/11/2013 - 11:47

In reply to by अजो१२३

जगात नेहमीच एक सुप्त स्त्रीराज्य असते
हे वाक्य प्रचंड आवडले. वाद, चर्चा , समज, गैरसमज ह्यासगळ्याचा ठासून मालमसाला असलेलं वाक्य.

मेघना भुस्कुटे Mon, 18/11/2013 - 14:47

In reply to by अजो१२३

बाप रे, तुम्हांला खरेच असे वाटते की, भारतीय स्त्रीच्या आजच्या आणि काही दशकांपूर्वीच्या (आर्थिक, सामाजिक, मानसिक) स्थानात काहीच फरक नव्हता? आणि काही फरक असलाच, तर तो दूर करण्यात फुले आणि कर्वे यांचे काहीच महत्त्वपूर्ण योगदान नाही? (मी पुन्हा पुन्हा विचारते आहे, माफ करा. पण मला विश्वास ठेवणे जड जाते आहे. उगाच सगळे संशय नीट फेडून न घेता, वाद नको म्हणून खबरदारी.)

ऋषिकेश Mon, 18/11/2013 - 14:50

In reply to by मेघना भुस्कुटे

फुले कर्व्यांचे योगदान जाऊंद्या एकवेळ, माझ्यापुरते ते दुय्यम आहे.. पण पहिल्या प्रश्नाच्या उत्तराच्या मीही प्रतिक्षेत आहे

अजो१२३ Mon, 18/11/2013 - 15:40

In reply to by मेघना भुस्कुटे

आता हे आकड्यांत केवळ उदाहरणासाठी आहे, लगेच तेच आकडे का असा विचार करू नये.

तुम्ही जे स्थान (सौख्य) म्हणताय ते जर आकड्याने दर्शविले तर
शतकांपूर्वी - पुरुष - १००, स्त्री -९०
दशकांपूर्वी - पुरुष -१०००, स्त्री -९५०
आता - पुरुष -५०००, स्त्री - ४९००

एकूण सौख्य वाढत आहे, समता वाढत आहे हे मान्य पण पूर्वी निव्वळच १०० -० असा प्रकार होता हे अमान्य आहे.

तसं या आकड्यांनीही आपल्या शंकेचं समाधान होणार नाही. म्हणून मी माझी विचार करायची पद्धत सांगतो. मग नीट वाद करता येईल.

दुसरा -"स्त्री पुरुष समानता असती तर दशरथानंतर कौसल्या राणी (राज्यप्रमुख या अर्थाने) झाली असती, न की राम".
मी -"पहिले म्हणजे दशरथ जिवंत असताना कौसल्या राणी होती. ती राजा असू शकत नाही कारण बायकांना राजा म्हणत नाहीत. दुसरे म्हणजे दशरथानंतर सीता पून्हा राणी झाली. म्हणजे स्त्रीजातीवर अन्याय झाला नाही. निव्वळ समता"
दुसरा -"कौसल्या मेल्यावर (समजा दशरथ जिवंत असता) सीता राणी झाली नसती. हा स्त्रीयांवर अन्याय आहे. फक्त पुरुष मेल्यावर सब्स्टीट्युशन योग्य नाही."
मी -"हे मान्य आहे. पण उलट सिस्टिम चालू केली कि पुरुषांवर अन्याय होणार. तो का व्हावा?"
दुसरा - "पण स्त्रीयांवर तरी का अन्याय व्हावा?"
मी -"चला, पारंपारिकरित्या स्त्रीयांवर अन्याय झाला आहे हे मान्य, पण १००% नाही. फक्त १०% वेळा (आधार विचारू नका)राणीच नसणारे राज्य चालते म्हणू आणि ९०% समता आहे म्हणू."

मेघना भुस्कुटे Mon, 18/11/2013 - 16:22

In reply to by अजो१२३

सर्वप्रथम - मी स्थानाबद्दल बोलते आहे. सौख्याबद्दल नाही. शिकून, अर्थार्जन करून सुख लाभतं का-मुळात स्वातंत्र्यात सुख आहे की पारतंत्र्यात-ज्ञानात सुख आहे की अज्ञानात, असल्या निष्कारण फाटे फोडणार्‍या वादांत मला शिरायचं नाही.

पूर्वी सुख किती होतं नि दु:ख किती होतं, हे मला ठाऊक नाही. ठाऊक करून घेण्याची इच्छा नाही.

मला असं म्हणायचं आहे की, (महाराष्ट्रात तरी) फुले आणि कर्वे यांच्यापूर्वी बायकांनी शालेय - कागदोपत्री शिक्षण घेण्याची प्रथा नव्हती. सवर्ण बायकांना तर घराबाहेर पडणंही वर्ज्य होतं. पण इतर जातींतल्या स्त्रियांना तर शिक्षण नव्हतं, बाहेरचे + घरातले कष्ट करावे लागत होते आणि शिवाय त्या कष्टाच्या पैशांवर अधिकार नव्हता. बाई जे मिळवेल ते घराकरता, तेही घरातल्यांनी परवानगी दिली तर, घरातलं सगळं नाकीनिपटलं आवरल्यानंतरच - हे गृहीतक होतं (तेव्हाचं कशाला, अजूनही बर्‍याच ठिकाणी, बर्‍याच प्रमाणात ते आहेच असं दिसतं. पण ते असो.).

फुल्यांच्या शाळेत अगदी सुरुवातीला, माझ्या अल्प माहितीप्रमाणे (कुणाकडे इतर विदा असला तर द्या बुवा) ४ धनगर मुली, १ मराठा मुलगी आणि १ ब्राह्मण मुलगी अशी संख्या होती. म्हणजे इतर जातींतल्या स्त्रिया बाहेर पडत असल्या, तरी शिक्षणाची गरज त्यांनाही दडपून ठेवलेल्या सवर्ण स्त्रियांइतकीच असावी. फार तर त्यांना सवर्णांच्याइतक्या कठोर नि कर्मठ दडपणुकीला सामोरं जावं लागत नसेल. पण शिक्षणाच्या नावानं (रूढ, कागदोपत्री घेतलं जाणारं शिक्षण. नाहीतर सांगाल त्यांना स्वैपाकातलं अमकं कळत होतं नि शेतीतलं वा धनगरकीतलं तमकं कळत होतं, म्हणून) बोंबच.

बरं, समाजानं हे मुलींचं शिक्षण सहजी स्वीकारलं का? सावित्रीबाईंनाच शेणा-दगडांचा मारा सहन करावा लागला हा अगदी सर्वतोमुखी असलेला इतिहास. हिंगण्याच्या संस्थेत मुलगी शिकायला गेली, तर तिचं काहीतरी 'तसलं' लफडं असणार हेही गृहीतच धरलं जात असे. (अवांतर - लांब कशाला? माझ्या लहानपणी साधारण २५ वर्षांपूर्वीपर्यंत स्वयंचलित दुचाकी चालवणार्‍या एकच बाई ठाण्यात होत्या. पण हे अतीच अवांतर. त्यामुळे तेही असोच.) म्हणजे समाजात स्त्रियांचं शि़क्षण सर्वमान्य नव्हतंच नव्हतं.

आधी फुले दांपत्य नि मग कर्व्यांचे अथक - आजीवन प्रयत्न यांमुळे बायकांनी शिकणं (पदवी मिळवणं, सासरच्यांची परवानगी असल्यास बाहेर पडून नोकरी करणं, अर्थार्जन करणं) महाराष्ट्रात तरी हळूहळू सर्वमान्य होत गेलं. यांत अर्थातच अनेक सुधारकांचे प्रयत्न असतील. मुख्यत्वेकरून नाव मात्र या दोघांचं घेतलं जातं. रूढ शिक्षणाला प्रत्यक्ष सुरुवात (फुले दांपत्य) आणि लक्षणीय संस्थात्मक काम (कर्वे) या दणदणीत कामगिरीमुळे ते योग्यही आहे.

यांतलं काय तुम्हांला अमान्य आहे? नि का?

नितिन थत्ते Sun, 17/11/2013 - 12:11

In reply to by अजो१२३

स्त्रियांनी नोकरी करू नये किंवा शिक्षण* घेऊ नये हे प्रश्न समाजातल्या उच्चवर्गीयांतच होते.

*कनिष्ठ वर्गांत शिक्षणच घेतले जात नसल्याने "स्त्रियांचा म्हणून" हा प्रश्न नव्हताच.

मन Mon, 18/11/2013 - 11:40

In reply to by नितिन थत्ते

स्त्रियांना शिक्षण घेउ देत नव्हते आणि स्त्रियांना दुय्यम स्थान होते ही एकाच लायनीवरची वाक्ये वाटतात.
एका समाजात पुरुषही शिक्षण घेत नाहित; पण स्त्रियांना दुय्यम स्थान देतात असे असू शकते.
"शिक्षणासाठी झटून केलेले कार्य" हे अ‍ॅक्चुअली दुय्यम स्थानाविरुद्ध द्यायच्या वैचारिक लढ्याचे प्राक्टिकल्,मूर्त रूप होते.
मूर्त- अमूर्तात असा फरक राहणारच की.
(सावरकर नास्तिक असले तरी हिंदुंना एकत्र करायला देवाचे नाव घ्यायला त्यांना हरकत नाही. त्यांच्या अमूर्त ध्येयाचे ते मूर्त रूप आहे.)

नितिन थत्ते Mon, 18/11/2013 - 11:45

In reply to by मन

कळलं नाही काय म्हणताय ते.

बॅटमॅन Mon, 18/11/2013 - 01:35

In reply to by अजो१२३

बह्वंशी सहमत. स्त्रीवादातही एक वर्गवर्चस्ववाद आहे याचे एक उदाहरण म्हणजे घराबाहेर न पडण्याचा मुद्दा. तथाकथित उच्चजातीय बायका सोडल्या तर अन्यजातीय बायका घराबाहेर जातच होत्या. ते न पाहता उच्चजातीय स्त्रियांची दु:खेच कवटाळून बसली तर होणारच तसे.

बाकी सुप्त स्त्रीराज्याबद्दल सहमत आहे. नै का म्हणत, "ही संस्कृती स्त्रियांनी स्त्रियांसाठी पुरुषांकरवी चालवलेली आहे."

वामन देशमुख Mon, 18/11/2013 - 15:13

In reply to by अजो१२३

>>>जगात नेहमीच एक सुप्त स्त्रीराज्य असते.

काय बोल्लात अरुणभॉव!

गेल्या कित्येक (म्हणजे दोनच) दशकांपासून मला हे बोलायचं होतं, पण तोंड उघडण्याची छाती होत नव्हती!

Nile Sun, 17/11/2013 - 01:44

गृहस्थ होण्यात काही कमीपणा नाही हा मुद्दा न पटण्याचे काही कारण नाही. त्याला एक जोडमुद्दा द्यायचा तर, घरकाम करूनही उत्पन्न मिळवता येईल अशा गोष्टी (पार्टटाईम) करता येणं शक्य आहे. (ज्याप्रमाणे अगदी काहीच वर्षापूर्वी मुलं-घर सांभाळून शिवणकाम इ. द्वारे घरकामाला हातभार लावणे होत होते त्याप्रमाणेच.)

बायकोला उच्चशिक्षण देऊन तिच्या भविष्यातील उत्पन्नाला प्राधान्य देऊन स्वतः घरी बसण्याचे प्लानिंग करणारे पुरुष माझ्या ओळखीत आहेत. (हे प्लानिंग नुसतेच नावाला नाही हे मी पाहतोच आहे.)

पण दुर्दैवाने नफा म्हणजेच सर्व काही असे समजणार्‍या मार्केट इकॉनॉमीने ही गोष्ट फार लवकर हेरली आणि स्त्रीच्या स्वातंत्र्याला काही लाक्षणिक गोष्टींमध्ये अडकवून टाकले.
पुरुष जे करेल ते स्त्रीने करून दाखवले म्हणजे स्त्री स्वतंत्र वा कर्तबगार झाली असा नकळत एक समज वाढीला लावण्याचे काम प्रसारमाध्यमांच्या प्रचारयंत्रणेतून पद्धतशीरपणे पसरवला गेला आणि जातोय. स्त्री आणि पुरुष हे एकमेकांमध्ये फिट्ट बसून पूर्णगोल होणारे अर्धगोल उरले नसून एकमेकांवर आपटणारे गोटे केले जात आहेत.त्यामुळे गरज नसली तरी, स्त्रीने नोकरी/व्यवसाय केलाच पाहिजे नाहीतर ती मागास असा काही लोकांचातरी नक्कीच समज झालेला दिसतो.

या ओळींमधून सूचित झालेल्या अर्थाशी मात्र असहमती नोंदवतो. स्त्री-पुरुष समानता म्हणजेच स्त्रीला कोणतीही गोष्ट करता येण्याचे स्वातंत्र्य. हा किंवा अशाप्रकारचा 'समज' पसरवला जातोय असे म्हणणे ही मोठी चूक आहे. जुन्या आणि प्रस्थापित अशा समाजव्यवस्थेतून बदलताना काही पद्धती बदलणं स्वाभाविकच आहे. संगोपनात होणारा बदल या त्याप्रमाणेच एक. पण हे मान्य करताना हे ही लक्षात घेतले पाहिजे की तुलना करताना आपण पुर्वीच्या पद्धतीत संगोपन व्यवस्थित होत होते असे गृहित धरतो आहोत.(म्हणजे, नुसतेच संगोपनाला कोणीतरी होते म्हणजे संगोपन व्यवस्थित होत आहे असे नाही.)

बॅटमॅन Sun, 17/11/2013 - 02:15

In reply to by Nile

पण

स्त्री-पुरुष समानता म्हणजेच स्त्रीला कोणतीही गोष्ट करता येण्याचे स्वातंत्र्य.

ही व्याख्या एकांगी आहे. पुरुषप्रधान समाजव्यवस्थेत स्त्रीला ऑप्शन्स कमी होते म्हणून तिच्याच नावाने व्याख्या केली असली तरी त्या व्यवस्थेत पुरुषावरही अन्याय होतच होता स्टिरिओटाईपमध्ये बसवल्यामुळे. तस्मात समानता म्हणजे स्त्री-पुरुष दोघांनाही कोणतीही गोष्ट करण्याचे स्वातंत्र्य होय. जुन्या व्यवस्थेत स्त्री नोकरी करते, घराबाहेर पडते म्हटले तर तिला शिव्या घालणारे लोक जसे होते तसेच पुरुष घरी बसतो म्हटला तर त्यालाही शिव्याच बसत.

आणि अर्थातच निव्वळ नोकरी करत नाही म्हणून स्त्रीला जज करणेही चूकच आहे. असे केले जाते हे पाहिले आहे. वर्क्स बोथ वेज़.

Nile Sun, 17/11/2013 - 04:18

In reply to by बॅटमॅन

जुन्या व्यवस्थेत स्त्री नोकरी करते, घराबाहेर पडते म्हटले तर तिला शिव्या घालणारे लोक जसे होते तसेच पुरुष घरी बसतो म्हटला तर त्यालाही शिव्याच बसत.

Is this the best you have got? शिव्या बसणे कुठे आणि प्राथमिक स्वातंत्र्यावर बंधणे असणे कुठे.

बॅटमॅन Sun, 17/11/2013 - 12:16

In reply to by Nile

अनावश्यक व्हिट्रिऑलशिवाय एखादी प्रतिक्रिया आली तर बरे झाले असते, पण ते एक असो. तुम्हाला असं म्हणायचंय की पुरुषप्रधान समाजव्यवस्थेत एखाद्या विवाहित पुरुषाने घरी बसलेलं चालतं???? तसं वाटत असेल तर वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आत्ताच. मुद्द्याचा विपर्यास करावा तर तुम्हीच.

नितिन थत्ते Sun, 17/11/2013 - 12:39

In reply to by बॅटमॅन

>>एखाद्या विवाहित पुरुषाने घरी बसलेलं चालतं?

काही न करता घरी बसणार्‍या पुरुषांची कैक उदाहरणं समोर दिसतात की. त्यांच्या बायका कमावतात आणि हे त्या बायकांकडून दारूला पैसेही घेतात. [आणि घरी बसून घरकाम मुळीच करत नाहीत].

पुरुष घरी बसल्यावर नावं ठेवणे आणि स्त्रीला नोकरी करण्यापासून विविध मार्गांनी रोखणे यात गुणात्मक फरक आहे.

बॅटमॅन Sun, 17/11/2013 - 12:43

In reply to by नितिन थत्ते

राईट. पण मग या केसमध्ये स्त्रीला बाहेर पडण्यापासून कोणी रोखतही नाही. स्त्रीला त्रास होतो, पण तो बाहेर पडू न देणे अशा प्रकारचा नाही.

मुद्दा स्त्रीला घराबाहेर पडू न देण्याचा आहे म्हणून समाजातल्या स्त्रीला बाहेर पडू न देणार्‍या सेगमेंटबद्दल बोललो इतकेच. सगळा वाद त्याच सेगमेंटशी केंद्रित आहे.

नितिन थत्ते Sun, 17/11/2013 - 13:04

In reply to by बॅटमॅन

>>पण मग या केसमध्ये स्त्रीला बाहेर पडण्यापासून कोणी रोखतही नाही

लग्न ठरवतानाच "नोकरी करणारी नको" असे स्पष्टपणे सांगितले जाते. नंतरही सांगितले जाते.

टीप: मी निळोबांच्याच उदाहरणाविषयी म्हणालो होतो.

बॅटमॅन Sun, 17/11/2013 - 13:07

In reply to by नितिन थत्ते

कुठल्या सेगमेंटमध्ये??? इथे सेगमेंट महत्त्वाचा आहे. बायकांना घराबाहेर पडू द्या ही ओरड उच्चजातीय सेगमेंटमधूनच जास्त सुरू झाली होती. अन्य जातींतल्या स्त्रिया आधीही बाहेर जायच्या आणि आताही जातात. त्यांचे प्रश्न अंमळ वेगळे आहेत. सगळं करूनही न मिळणारी प्रतिष्ठा आणि छळ हे त्यांचे प्रश्न. तुम्ही म्हणता त्या सेगमेंटबद्दल बोलायचं तर त्या सेगमेंटमध्ये पुरुषाने घरी बसलेलं साधारणपणे चालतं असं दिसत नाही.

मन Sun, 17/11/2013 - 12:45

In reply to by नितिन थत्ते

तुम्ही दिलेलं उदाहरण चालत नाही. पब्लिक चालवून घेतं. किम्वा जे होतय ते तसं होउ नये; अशीच त्यांची त्या केस बद्दल भावना असते.
बॅट्या आणि नाइल हे वेगळ्या संदर्भानं बोलताहेत. त्याबद्दल मी काहिच म्हणत नाही. पण तुमचं उदाहरण त्याच्याशी विसंगत वाटतं.
(राजेश घासकडवी ह्यांच्या प्रतिसादात दिलेलं उदाहरण अत्य्म्त चपखल आहे; अधिक तपशील तेच देउ शकतील.)

Nile Mon, 18/11/2013 - 03:39

In reply to by बॅटमॅन

खरंतर "Bitch, please!" असं लिहणार होतो. पण उगाच २१व्या शतकातल्या पिढीच्या तोंडी रुळलेल्या शब्दांना विट्रिऑल-विट्रीऑल म्हणून ओरडाल म्हणून आवरले. ते असो.

तुम्हाला असं म्हणायचंय की पुरुषप्रधान समाजव्यवस्थेत एखाद्या विवाहित पुरुषाने घरी बसलेलं चालतं???? तसं वाटत असेल तर वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आत्ताच. मुद्द्याचा विपर्यास करावा तर तुम्हीच.

हो. अगदी माझ्या कुटुंबातली उदाहरणं आहेत. स्वतः काहीही न करणारे पुरुष आणि शिवाय त्यांच्या बायकांनी नोकरी करायची नाही अशी अट असलेले पुरुष मी पाहिलेले आहेत. त्यामुळे, वाढदिवसाच्या शुभेच्छा तुम्हालाच. केक खायला येतो.

बॅटमॅन Mon, 18/11/2013 - 16:16

In reply to by Nile

शब्दांचे सोयर नै, इल्लॉजिकल एखादी गोष्ट दडपायचा काळ नको सोकावायला.

बाकी तुम्ही जी उदाहरणे पाहिली त्यांचे सार्वत्रिकीकरण कितपत करता येईल ते कळाले तर बरे होईल. काये, निव्वळ वैयक्तिक अनुभवाने एखादा जण्रल मुद्दा मोडीत निघत नाही. सर्व प्रकारची वैयक्तिक उदाहरणे सापडतात. साधारण चित्र त्यापासून दूरच असते. प्लसमायनस थ्री सिग्माच्या बाहेरची उदाहरणे दिसली आणि त्यालाच आमचं डिस्ट्रिब्यूशन म्हटलं तर पॉप्युलेशनशी बेइमानी होते, बाकी काही नाही. हां आता अपवादांच्या डिस्ट्रिब्यूशनबद्दलच बोलायचं असेल तर खुशाल बोला. माँगिनीचा केक आणतो. कुठला फ्लेवर आणू? व्हिट्रिऑल?

Nile Mon, 18/11/2013 - 19:34

In reply to by बॅटमॅन

शब्दांचे सोयर नै, इल्लॉजिकल एखादी गोष्ट दडपायचा काळ नको सोकावायला.

लूक हू इज टॉकिंग! ;-)

विदा सद्ध्यातरी नाही, सापडेल का ते सांगता येत नाही. पुरुष प्रधान संस्कृतीत अशा प्रकारचे विदे पुरुष ठेवत असत का ते माहित नाही. (शेवटी, ब्रोज बिफोर होज, मॅन! http://www.quora.com/Bro-Code/What-are-some-of-the-stories-where-the-br… )

थत्ते आणि मी दोघांनीही सारखेच निरीक्षण मांडले आहे. तुमचा मुद्दा विद्यानिशी सिद्ध करून दाखवणार असाल तर आमचे निरीक्षण सार्वत्रिक नाही असे मानायला आमची तयारी आहे.

बॅटमॅन Mon, 18/11/2013 - 20:09

In reply to by Nile

हा हा हा. ब्वॉर्र.

बाकी आमचा विदा तरी म्हणतो की असे उदाहरण कधी पाहण्यात आले नाही. विरोधासाठी विरोध म्हणून नव्हे, खरेच पाहिले नाही. नाही म्हणजे मध्यमवर्गीय उच्चजातीय इ.इ. सेगमेंटमध्ये. बाकी घरी काम करायला येणार्‍या मोलकरणीचा नवरा घरी बसलेले पाहिले आहे.

अरविंद कोल्हटकर Sun, 17/11/2013 - 22:22

In reply to by Nile

Are you ******* kiding (sic) me?

भारतीय/मराठी सुविद्य समाजात काही शब्द - विशेषतः अर्थाचा संदर्भ नसलेले - बोलण्यालिहिण्यातून पूर्णपणे वगळण्याचे शिक्षण दिले जाते अशी माझी समजूत आहे. ती आता सोडावी काय?

Nile Mon, 18/11/2013 - 03:35

In reply to by अरविंद कोल्हटकर

भारतीय/मराठी सुविद्य समाजात काही शब्द - विशेषतः अर्थाचा संदर्भ नसलेले - बोलण्यालिहिण्यातून पूर्णपणे वगळण्याचे शिक्षण दिले जाते अशी माझी समजूत आहे. ती आता सोडावी काय?

च्यायला सारखे शब्द जेव्हा सर्रास बोलण्यात येऊ लागले तेव्हाही तुमच्यासारखीच प्रतिक्रिया अनेकांची असणार. वरील शब्द बोलीभाषेत केव्हाच आले आहेत ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही.

अर्थात, कोणता शब्द कोणाबरोबर वाद घालताना वापरायचा याविषयी माझे काही संकेत आहेत. त्याबद्दल तुमचे-(आणि इथल्या अनेकांचे) माझे एकमत होणार नाही या विषयी मला शंका नाही.

पुरुष Sun, 17/11/2013 - 05:14

In reply to by Nile

तुलना करताना आपण पुर्वीच्या पद्धतीत संगोपन व्यवस्थित होत होते असे गृहित धरतो आहोत.(म्हणजे, नुसतेच संगोपनाला कोणीतरी होते म्हणजे संगोपन व्यवस्थित होत आहे असे नाही.)

मुले सांभाळायला भारतात तरी बहुदा अप्रशिक्षित (बर्‍याचदा अशिक्षित) व्यक्ती कामावर ठेवली जाते.
अशा व्यक्तीच्या सहवासापेक्षा जन्मदात्यांच्या सहवासात किमान भावनिकदृष्ट्या मुलांना जास्त लाभ होत असावा असे मला वाटते.
उत्तम संगोपन म्हणजे काय याची जगन्मान्य व्याख्या नसल्याने शेवटी ज्याची-त्याची निवड हे आहेच.

Nile Mon, 18/11/2013 - 03:48

In reply to by पुरुष

अशा व्यक्तीच्या सहवासापेक्षा जन्मदात्यांच्या सहवासात किमान भावनिकदृष्ट्या मुलांना जास्त लाभ होत असावा असे मला वाटते.
उत्तम संगोपन म्हणजे काय याची जगन्मान्य व्याख्या नसल्याने शेवटी ज्याची-त्याची निवड हे आहेच.

मी दिलेला प्रतिसादात "पुर्वीच्या व्यवस्थेशी (म्हणजे स्त्रीवर आजपेक्षा असलेल्या अनेक बंधनाच्या वेळच्या) तुलना करता" असा अर्थ होता. आज एकाने घरी बसणे वि. दोघांनी नोकरी करूणे (इ.) यातील पर्याय निवडताना तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. त्याबाबतीत माझे मत (घासकडवींच्या प्रतिसादात आलेल्या) 'इकॉनॉमिक्स'च्या मुद्द्याशी जुळते.

३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 17/11/2013 - 04:03

Alice Schwarzer: Some members of the women's movement and indeed some people in the political parties - are calling for wages for housework ...

Simone de Beauvoir: I'm completely and utterly opposed to that! Of course! In the short term, maybe housewives who have no alternative would be glad of a wage. That is understandable. But in the long term, it would encourage women to believe that being a housewife was a job and an acceptable way of life. But being banished to the ghetto of domesteicity and the division of labour along male/female, private/public lines is precisely what women should be rejecting if they want to realise their full value as human beings. So I am against wages for housework.

--- from "After the second sex: Conversations with Simone de Beauvoir" by Alice Schwarzer

पुरुष जे करेल ते स्त्रीने करून दाखवले म्हणजे स्त्री स्वतंत्र वा कर्तबगार झाली असा नकळत एक समज वाढीला लावण्याचे काम प्रसारमाध्यमांच्या प्रचारयंत्रणेतून पद्धतशीरपणे पसरवला गेला आणि जातोय.

स्त्रियांनी बलात्कार, युद्धखोरी, वसाहतवाद, सरसकट विधानं (उदा - अमक्या लोकांना विनोदबुद्धीच नसते, अमके लोक खराब ड्रायव्हर असतात, इ.) हे गुण अजिबात उचलू नयेत. इथपर्यंत सहमती. स्त्रियांनी घराबाहेर शिक्षण, कर्तबगारी दाखवण्यात जरूर पुरुषांशी बरोबरी करावी. उलट पुरुषांनी थोडा बायकांचा आदर्श ठेवून घर आणि करियर दोन्हींकडे लक्ष दिलं तर लेखात दिलेली उदाहरणं कमी होऊ शकतील.

I've yet to be on a campus where most women weren't worrying about some aspect of combining marriage, children, and a career. I've yet to find one where many men were worrying about the same thing.
-- Gloria Steinem

पुरुष Sun, 17/11/2013 - 05:38

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

स्त्रियांनी बलात्कार, युद्धखोरी, वसाहतवाद, सरसकट विधानं (उदा - अमक्या लोकांना विनोदबुद्धीच नसते, अमके लोक खराब ड्रायव्हर असतात, इ.) हे गुण अजिबात उचलू नयेत. इथपर्यंत सहमती. स्त्रियांनी घराबाहेर शिक्षण, कर्तबगारी दाखवण्यात जरूर पुरुषांशी बरोबरी करावी. उलट पुरुषांनी थोडा बायकांचा आदर्श ठेवून घर आणि करियर दोन्हींकडे लक्ष दिलं तर लेखात दिलेली उदाहरणं कमी होऊ शकतील.

स्त्रियांनी सरसकट विधान करण्याचा गुण उचलू नये असे म्हणून हे गुण स्त्रियांमध्ये नसतातच आणि पुरुष घरात लक्ष घालत नाहीत अशा अर्थाची दोन सरसकट विधाने आपण ़केली असे आपल्याला वाटत नाही का?
साधारणतः पुरुषांना एखाद्या गोष्टीची काळजी असेल तर ते बोलून दाखवण्यापेक्षा थेट उपाय शोधायला लागतात. स्त्रियांना जशी व्यक्त होण्याची आणि कोणीतरी त्यांचं ऐकून घेण्याची गरज असते तशी पुरुषांना असेलच असे नाही; पण याचा अर्थ त्यांना घराची काळजी नसते असा होत नाही.

उलट पुरुषांनी थोडा बायकांचा आदर्श ठेवून घर आणि करियर दोन्हींकडे लक्ष दिलं तर लेखात दिलेली उदाहरणं कमी होऊ शकतील.

दिलेल्या उदाहरणांमध्ये पुरुष घरात लक्ष देत नाहीत असे का वाटले ते कळले नाही. उदा. पहिल्या उदाहरणातील पती ऑफिसमध्ये काम नसूनही सातच्या आत घरी येत नाही असे म्हटलेले नाही. स्त्री-पुरुषांनी दोघांनीही करियर करायचे, दोघांच्याही करियरला सारखेच महत्त्व या नियमातून उद्भवलेला तो पेच आहे त्यात स्त्रीचे किंवा पुरुषाचे घराकडे लक्ष नाही असे म्हणणे गैरलागू आहे.

३_१४ विक्षिप्त अदिती Sun, 17/11/2013 - 20:05

In reply to by पुरुष

स्त्रियांनी सरसकट विधान करण्याचा गुण उचलू नये असे म्हणून हे गुण स्त्रियांमध्ये नसतातच

उदाहरण म्हणून दिलेली विधानं स्त्री-पुरुषांकडून स्त्रियांबाबत केली जातात. त्यात पुरुषांना अमकी गोष्ट जमते आणि स्त्रियांची नैसर्गिक कुवत नसल्यामुळे त्यांना तीच गोष्ट जमत नाही किंवा पुरुषांएवढी चांगली जमत नाही, असा छुपा अर्थ आहे. अशा अर्थाची पुरुषद्वेष्टी वाक्यं, पारंपारिक संस्कृति, इतिहास इ. गोष्टी पहाता स्त्री-पुरुषांना करता येत असतील तर त्यांना निदान विनोदबुद्धी आहे, हे तरी मान्य करावं लागेल.

आणि पुरुष घरात लक्ष घालत नाहीत अशा अर्थाची दोन सरसकट विधाने आपण ़केली असे आपल्याला वाटत नाही का?
दिलेल्या उदाहरणांमध्ये पुरुष घरात लक्ष देत नाहीत असे का वाटले ते कळले नाही. उदा. पहिल्या उदाहरणातील पती ऑफिसमध्ये काम नसूनही सातच्या आत घरी येत नाही असे म्हटलेले नाही. स्त्री-पुरुषांनी दोघांनीही करियर करायचे, दोघांच्याही करियरला सारखेच महत्त्व या नियमातून उद्भवलेला तो पेच आहे त्यात स्त्रीचे किंवा पुरुषाचे घराकडे लक्ष नाही असे म्हणणे गैरलागू आहे.

सोयीची उदाहरणं देऊन पुरुष घरात लक्ष घालतात असं जरूर दाखवता येईल. पण कोणत्या आर्थिक, सामाजिक वर्गात अशी उदाहरणं प्रातिनिधिक म्हणावीत? माझ्या माहितीमधे असा कोणताही वर्ग नाही.

त्यातून ते पहिलंच उदाहरण. त्यात आई-वडील जसे मुलाचे आहेत तसे मुलीचेही असायला हवेत. त्यांना मूल सांभाळायला का सांगितलं नाही, अशा प्रकारचा काही उल्लेखही नाही. शिवाय लग्नानंतर मुलाच्या आई-वडलांबरोबर रहायचं अशी परंपरा असल्यामुळे, लेखातलं पहिलंच उदाहरण समानतेच्या तत्त्वविरोधातलं वाटतं. दुसरी त्याच उदाहरणातली खोट: "एकमेकींचा अपमान करणे, घरातल्या कामावरून टोमणे मारणे असे नेहमीचेच प्रकार सुरु झाले." या वाक्यावरूनही, सासरा आणि नवरा घरात काम करत नाहीत हेच दिसतंय. कामाची काळजी, जबाबदारी ज्यांच्यावर असेल तेच लोक त्यावरून संवेदनशील असणार.

दुसऱ्या उदाहरणारत बाईने नोकरी केली, लगेच मुलांचा प्रश्न आला. कामवाल्या बाईला काढलं तर घरच्या बाईने सुट्टी घेतली. जणू काही मुलं सांभाळणं ही फक्त बायकांचीच जबाबदारी. तुम्हीच लिहिताय तुमच्या उदाहरणांमधून कि पुरुष घरात लक्ष घालत नाहीत.

खरंतर ती उदाहरणं एवढी तोकडी दिलेली आहेत की आपल्याला हवा तो मुद्दा ठसवण्यासाठी सोयीची बाजू तेवढी सांगितली, असंच वाटत राहिलं. पण त्यातही सबटेक्स्ट हे बाईवर घर-मुलाची जबाबदारी असंच दिसतंय.

---

शिवाय एका म्यानात दोन तलवारी एकवेळ राहतील पण एका घरात दोन स्त्रिया राहू शकत नाहीत. याच्या कारणात कोणी शहाण्याने जाऊ नये.

च्यायला, परवाच कोणीतरी एकत्र कुटुंबव्यवस्था काय असते हे सांगत होती. त्यात बायका कशा एकत्र रहायच्या, त्यात कशी सत्तास्पर्धा चालायची त्याचं स्पष्टीकरण, मातृसत्ताक पद्धत कशी फायदेशीर वगैरे बोलणं झालं. पण ती एकत्र कुटुंबव्यवस्था कशी टिकली हो एवढी शतकं?

अवांतर - भावाचं आणि माझं (लौकिक) शिक्षण पूर्ण होण्याआधी, आम्ही निदान स्वतःपुरते पैसे कमावण्याच्या अनेक वर्ष आधी, माझे वडील आणि भाऊ यांचं भांडण झालं. तेव्हा वडलांनी माझ्यासमोर "एका म्यानात दोन तलवारी राहू शकत नाहीत" असं विधान केलं होतं. यात लग्न, सून/जावई असा काही संबंधच नव्हता. सोत्ताच्या लेकाबद्दल काढलेले उद्गार.

पुरुष Mon, 18/11/2013 - 09:38

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

पुरुषांनी घरातली कामे करावीत हे मान्य करणाराच हा लेख आहे.
पण स्त्री आणि पुरुष दोघांनीही बाहेर आणि घरातही काम केलेच पाहिजे हा अट्टाहास कशाला? स्त्रियांना करियर करायचे असल्यास पुरुषांनी घरात काम करावे असे म्हणण्यात वाद घालण्यासारखे काय आहे?

बाकी एकत्र कुटुंबपद्धती जवळजवळ नामशेष होत आली असल्याने पास. ज्या पुरुषांना आपले आई-वडील आपल्याबरोबर राहावे असे वाटतात त्यांनी बायकोचे आई-वडीलही तिच्याबरोबर राहिल्यास आक्षेप घेऊ नये हे बरोबरा आहे.

बॅटमॅन Mon, 18/11/2013 - 16:30

In reply to by पुरुष

बाकी एकत्र कुटुंबपद्धती जवळजवळ नामशेष होत आली असल्याने पास. ज्या पुरुषांना आपले आई-वडील आपल्याबरोबर राहावे असे वाटतात त्यांनी बायकोचे आई-वडीलही तिच्याबरोबर राहिल्यास आक्षेप घेऊ नये हे बरोबरा आहे.

हरकत काहीच नाही. लग्नानंतर बायकोच्या घरी पुरुष राहू लागले तर हे लॉजिकलच आहे. नपेक्षा पटणे अवघड आहे. हे म्हणजे स्वतः (च) घर घ्या, (आम्ही म्हणत नाही हो, उत्क्रांती म्हणते म्हणे) त्यात बायकोला आणा अन परत तिची फ्यामिलीपण आणा असला परोपकार पुरुषांकडून अपेक्षिणे अनरिअलिस्टिक आहे. अर्थात जवळच पण स्वतंत्र राहिल्यास गोडी राहते अशीही उदाहरणे पाहिली आहेत. पण स्वतंत्र राहण्याचा मुद्दा महत्त्वाचा आहे.

पुरुष Mon, 18/11/2013 - 19:47

In reply to by बॅटमॅन

अगदी बरोबर. स्वतंत्र राहणे अनिवार्य, दोघांनी नोकरी/धंदा केलाच पाहिजे, मुले न होण्याचा पर्यायच नाही आणि विवाहसंस्था तर टिकली पाहिजेच. मग करा धावपळ. सुपरवुमन आणि सुपरमॅनचा संसार. पैसा वाढत जातो पण आनंद? आनंदाची पर्वा कोणाला आहे? इकाॅनाॅमिक्समधे सांगितलंय ना की माॅनेटरी प्राॅफिट मॅक्सिमाईझ झाला पाहिजे, मग झालाच पाहिजे. डिमिनिशिंग युटिलिटी असली तरी चालेल.
सात-सात मुलं व्हायचा काळ गेला, लग्नानंतर पाच वर्षात दोन मुले झाली की आता कटकट संपते.
स्वयंपाकघराचं यांत्रिकीकरण झालंय, दिमतीला अनेक यांत्रिक मदतनीस आहेत बायकांचा वेळ वाचायला लागला. तो मजेत कलाकाव्यशास्त्र विनोदात घालवता येईल, अनेक समाजोपयोगी कामे करता येतील. पण काय करणार? इकाॅनाॅमिक्समधे तसे सांगितलेले नाहीय ना!
आता दोघांनी नोकरी करणे इकाॅनाॅमिकली अनप्राॅफिटेबल होईपर्यंत थांबावे लागणार. नाईलाज आहे.

बॅटमॅन Mon, 18/11/2013 - 20:15

In reply to by पुरुष

हे सगळे प्रॉब्लेम्स मध्यमवर्गीयांनाच लागू होतात. नपेक्षा अनादिकाळापासून दोघे नोकरी करणे चालत आलेय तथाकथित नीचजातीय लोकांमध्ये.

ॲमी Sun, 17/11/2013 - 10:36

बाकी ठीक. पण एक कदाचीत अवांतर मुद्दा.
आयटी किँवा इतर जास्त पगाराच्या नोकर्या, ज्यात एकाच माणसाकडुन बराच वेळ आणि श्रम अपेक्षीत असतात, या नोकर्या दोन माणसात पार्टटाइम निम्मा पगार अशा करण्याने काय गैरसोयी होउ शकतात?
आयटी सर्विस कंपनीत लोक्स साधारण ९ ते १० तास घालवतात. खाणे, सुट्टा वगैरे सोडल्यास ८ खरोखर कामाचे तास अपेक्षीत असतात. तेच कामाचे ५तास आणि निम्मा पगार असे का करत नाहीत?

ऋता Sun, 17/11/2013 - 15:13

या पेचामुळे चांगली पाळणाघरे विकसित व्हावीत. कामाच्या ठिकाणी मुले असण्याबद्द्ल एक सहनशीलता विकसित व्हावी- सहनशीलता म्हणजे मला मुले असणारी स्त्री किंवा पुरूष (सतत मुलांना कुठे ठेवायचे कसे सांभाळायचे ह्या पेचात असणारे) म्हणजे एक ब्याद असे परसेप्शन नको असे म्हणायचे आहे. कचेर्‍यांमध्ये, कॉन्फरन्स सारख्या ठिकाणी पाळणाघरांची सोय हवी. भारतात तर धड टॉयलेट देखील बर्‍याच ठिकाणी नसतं.
मॉल्समध्ये वगैरे लहान मुलांचे डायपर बदलणे वगैरेसाठी बायकांच्या टॉयलेटमध्ये मुलांना ठेवण्यासाठी सोय पाहिली आहे. पुरूषांच्या टॉयलेट्समध्येही ती असायला हवी.

अरविंद कोल्हटकर Sun, 17/11/2013 - 22:28

In reply to by ऋता

मॉल्समध्ये वगैरे लहान मुलांचे डायपर बदलणे वगैरेसाठी बायकांच्या टॉयलेटमध्ये मुलांना ठेवण्यासाठी सोय पाहिली आहे. पुरूषांच्या टॉयलेट्समध्येही ती असायला हवी.>

उत्तर अमेरिकेमध्ये बहुतेक ठिकाणी पुरुषांच्या टॉयलेटमध्येहि अशी सोय असते आणि तिचा उपयोग करणारे पुरुषहि दिसतात. बर्‍याच जाहिरातींमधून आता आवर्जून मुलांना संभाळणारा एकटा बाप - तसेच कृष्णवर्णीय इ.unvonventional लोकहि दिसतात हे ध्यानात येते.

मन Mon, 18/11/2013 - 11:53

In reply to by अरविंद कोल्हटकर

आंत्रराष्ट्रिय आस्थापनांतील कॉर्पोरेट व्हिडिओ ट्रेनिंग, जाहिराती ह्यातही समजातील विविध घटकांना प्रतिनिधित्व द्यायचा प्रयत्न दिसतो.

मी Mon, 18/11/2013 - 12:07

शिवाय एका म्यानात दोन तलवारी एकवेळ राहतील पण एका घरात दोन स्त्रिया राहू शकत नाहीत. याच्या कारणात कोणी शहाण्याने जाऊ नये.

बाकीचं जाउद्या पण हे फारच होतय!

ऋषिकेश Mon, 18/11/2013 - 13:12

प्रथम ऐसीवर लिहिते झाल्याबद्दल आभार व स्वागत!

लेखन पटले नाही.
उच्चमध्यमवर्गाच्या काही रँडम समस्यांना समोर ठेऊन त्यांना अख्ख्या समाजाच्या 'प्रातिनिधीक' समस्या वगैरे समजून घेत केलेला शब्दबंबाळ उहापोह वाटला. अर्थात त्यासाठी सुचवलेले उत्तर हे रोगापेक्षा इलाज भयंकर असेच वाटले.

पुरुष Mon, 18/11/2013 - 19:53

In reply to by ऋषिकेश

धन्यवाद!
लेख सुमार झाला आहेच पण दुसरी बाजू न मांडल्याने एकांगीही झाला आहे.
पुरुषांनी घरी राहून घर सांभाळण्याचे काय तोटे होऊ शकतील याची कल्पना करू शकलो नाही, पण हा मुद्दा रोचक आहे.
कृपया शक्य झाल्यास तुम्हाला काय तोटे होऊ शकतील असे वाटते ते लिहू शकाल का?

ऋषिकेश Tue, 19/11/2013 - 09:40

In reply to by पुरुष

त्याआधी या निर्णयाला येण्यामागच्या गणिताचा विचार केला तर तुम्ही बरेच पॅरॅमिटर्स कॉन्स्टन्ट ठेवल्याचा संशय होता. वर बॅटमॅनला दिलेल्या प्रतिसादात तो संशय खात्रीत बदलला. तिथे तुम्ही म्हणता

स्वतंत्र राहणे अनिवार्य, दोघांनी नोकरी/धंदा केलाच पाहिजे, मुले न होण्याचा पर्यायच नाही आणि विवाहसंस्था तर टिकली पाहिजेच

मात्र, यातील एकही गोष्ट अनिवार्य या सदरात का यावी हे समजत नाही. विशेषतः शेवटच्या दोन गोष्टी.
यातील आपली प्रायॉरिटी काय, आपल्या आवडी काय, धेय्य काय, इच्छा काय वगैरेंचा एकत्रित विचार करून यातील कुठली गोष्ट अनिवार्य आहे हे त्या-त्या जोडप्याने ठरवायचे असते - आणि बहुतांश ठिकाणी तसे ठरवलेले दिसतेही.

स्वतंत्र रहाणे अनिवार्यः हे ज्यांना वाटते त्यांची स्वातंत्र्याची कल्पना काय आहे यावर बरेच काही अवलंबून आहे. केवळ 'वेगळे' रहाणे म्हणजे स्वातंत्र्य अशी समजूत असेल तर ती लवकरच मोडित निघते हे अनेकदा दिसून येते. स्वातंत्र्याबरोबर येणार्‍या 'स्वयंपूर्णतेच्या आवश्यकतेचा' विचार जोडप्याने केला नसेल तर चिडचिड वाढत जातेच. त्यात स्वतंत्र राहण्याची इच्छा जबाबदार नसून जोडप्याचे स्वयंपूर्ण नसणे जबाबदार असते. (दुसरीकडे एकत्र (मुलाच्या/मुलीच्या पालकांसोबत) राहुनही स्वतंत्र राहता येते हे स्वानुभवातून सांगतो)

मुलं होणे / न होणे: हा तर अत्यंत वैयक्तीक प्रश्न आहे. आपल्याला मुलांचे पालन करण्याइतका वेळ आहे का? यावर या निर्णय घेणे महत्त्वाचे असते (हल्ली मुलांचे प्लॅनिंग केवळ पैशाची उपलब्धता पाहून केले जाताना दिसते, जे हास्यास्पद आहे ;) ) आणि ज्यांची इच्छा नसते ते तसेही स्वेच्छेने विनाअपत्य राहु लागले आहेत हे वाढत्या DINKच्या संख्या दाखवून देत आहेत.

विवाह करणे / न करणे: विवाहसंस्था म्हणजे काही बंधन नाही. तो समाजाने आपणहून घालून घेतलेला नियम आहे - करार आहे. जर समाजाला ती नकोशी वाटली तर हळुहळू मोडून पडेल. विवाहसंस्था बनल्याचे फायदे होते- आहेत तोपर्यंत समाज ते फायदे मिळवत राहिल - ती संस्था टिकेल. ती संस्था मोडून पडल्याने काही धार्मिक विधी सांगणारे (आणि काही वकील) सोडल्यास कोणावर मोठा परिणाम होईल असे का वाटावे?

आता प्रश्न उरला दोघांनी नोकरी/धंदा करण्याचा: जर नोकरी/धंदा करण्यामुळे काही प्रश्न आहेत असे वाटत असेल तर तो मोठा गैरसमज आहे. प्रश्न असतील तर ते ठराविक वेळी नोकरीला कमी प्राधान्य न देण्यामुळे. (जर मूल हवेच आहे तर) मुलाच्या जन्मानंतर किमान पहिली ३ वर्षे आई व वडील दोघांनीही नोकरीला पगार मिळावण्याची सोय या पलिकडे लक्ष व महत्त्व द्यायची गरज वाटत नाही. एकदा का मूल सुटवांगे होऊ लागले की करीयर आहेच की!

बाकी पुरूष घरी बसायला गृहस्थ व्हायला हरकत नाहीच. किंबहुना माझ्या माहितीत किमान ४ कुटुंबे अशी आहेत (पैकी दोन जण नोकरी सोडून पत्नीसोबत ऑनसाईट गेले आहेत, तर दोघांनी सबॅटिकल घेतली आहे व घर सांभाळताहेत). फक्त त्या परिस्थितीत त्या पुरूषाने "संपूर्ण घरकाम" सांभाळणे अपेक्षित आहे.

[एकदा मी ही हा विचार केला होता तेव्हा बायकोने सांगितले त्याआधी आपली भांडीवाली बदलायची गरज आहे ती बदलून दाखव मग विचार करू. अजून तरी (भांडिवाल्यांचे राजकारण + एखादीला काढल्यास इतर जणींचा बहिष्कार + आमचे बजेट + गरज हे गणित सोडवून) नवी भांडिवाली नेमणे मला जमलेले नाही ;) ]

राजन बापट Mon, 18/11/2013 - 21:44

लेख व चर्चा वाचली. आवडली.

पुरुषांनी गृहस्थधर्म स्वीकारावा व स्त्रियांनी नोकर्‍या कराव्यात अशा स्वरूपाच्या एकेरी विधानांमधून काही साध्य होईल असं वाटत नाही. स्त्रिया नोकर्‍या करायला लागल्या आणि मुलांचं/कुटुंबव्यवस्थेचं नुकसान झालं या असल्या विधानांमागे सरळसरळ कावेबाजपणा दिसतो.

वाढत्या शहरीकरणामुळे, आधुनिकीकरणामुळे एकंदर मध्यमवर्गीय जीवनशैली वेगाने बदलते आहे. आर्थिक प्रगती आणि अत्याधुनिक सोयीसुविधा हव्यात, मात्र जुनीच मूल्ये ठेवू अशा भूमिकेमुळे बराच गोंधळ होतो.

नव्या राहाणीमानानुसार आपण जसे पाळणाघरे, डबा देणार्‍या व्यवस्था इत्यादि गोष्टी स्वीकारल्या आहेत तसंच समाजातल्या काही पुरुषांनी घरी थांबण्याचा ट्रेंड देखील स्वीकारू असं मला सामान्यपणे वाटतं.

पुरुष Wed, 04/12/2013 - 22:01

In reply to by राजन बापट

स्त्री व पुरुष दोघेही नोकरी करु लागल्याने (अमेरिकेत तरी) कुटुंबाचे नुकसान झाले हा कावेबाजपणा नसून पुराव्यानिशी शाबित झालेली गोष्ट आहे.
त्याबद्दल लवकरच सविस्तर लिहीन.

............सा… Wed, 04/12/2013 - 22:06

"घरकामाला प्रतिष्ठा" -
या विषयावर अजून वाचायला आवडेल. इन जनरल मी हे पाहिले आहे की घरकामाला प्रतिष्ठा नसते कारण (१) त्या कामामध्ये जागरुक अन सातत्याने सुधारणा करण्याचा दृष्टीकोन नसतो. (२) तसेच "पैसा" हा घटक वगळलेला असतो.