बाबूराव

नेटवरचं माझं लिखाण हे प्रामुख्याने स्वान्तसुखाय या कॅटेगरीत मोडतं. पुस्तक छापण्याची किंवा प्रसिद्ध होण्याची कुठलीही अपेक्षा नसल्याने प्रयोग करावेसे वाटतात. मुद्रीत माद्यमातून नेटसारख्या माध्यमात येताना बरेच फरक आहेत. काही सुविधाही आहेत. त्यांच्या नैतिक अनैतिकतेच्या चर्चेत न पडता काही गोष्टी क्लिअर कराव्याशा वाटतात. लिखाण करताना थोडंसं वेगळ्या शैलीचं लिखाण एका वेगळ्या अवतारात करावं असं वाटलं. याच कारणासाठी काही काळ बाबूराव या नावाने लिखाण केलं. सुरुवातीला अशुद्ध भाषेत लिहीणा-या बाबूरावाने काही लघुरहस्यकथा लिहीताना सुशि, वाळिंबे, ब्लॅकस्टार यांची टिंगल केली. बाबूराव या पात्रामुळे ओळखीच्या लोकांनाही त्यात गंमत वाटली. थोडी मौजमजा हा हेतू होताच. प्रवी़ण टोकेकरांनी ब्रिटीश नंदी या नावाने लिखाण केलं तसंच काहीसं. त्यानंतर मात्र बाबूरावांनी कथा लिहील्या. त्याही लोकांना आवडल्या. आता ओळख दिल्यावरही लोकांनी बाबूरावांचं अस्तित्व ठेवावं असं कळवलंय. जर कुणाचं आहे त्याच आयडीने लिखाण करणं का अशक्य आहे या प्रश्नाला माझ्याकडे उत्तर नाही. बाबूराव या ब्रॅण्डचं लिखाण आवडलं तर कळवा.

इथे हडळीचा मुका ही बाबूरावांची कथा लवकरच देणार आहे. वाचून कळवावे ही विनंती.

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (1 vote)

प्रतिक्रिया

जर तुम्हाला काही कथा बाबूराव या आयडीने द्यायच्या असतील तर तसा आयडी बनवलात तरी चालेल.
टोपणनाव म्हणून असा आयडी घेता येईल असे वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

धन्यवाद ऋषिकेष. असं करावं कि नाही हा विचार चालूच होता. पक्का झाला. थँक्स.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

....

शनिवारवाड्याखाली अडीच हजार टन कांदा असल्याचं स्वप्न बाबूरावांना पडलंय...;)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

....