गुडगाँव ट्रॅफिक पोलिस

दिल्ली परिसरात म्हणे लंडनपेक्षाही रुंद रस्ते आहेत. पण रहदारीच्या बेशिस्तीमुळे त्यांचा फार काय फायदा होत नाही. रात्री सात-आठची वेळ होती, दिल्ली गुडगाव रोडवर गुडगावकडे चाललो होतो. आता सिग्नलवर राइट टर्न घ्यायचा होता. मी एकटाच राईट टर्न घेत होतो. त्या उजवीकडच्या रस्त्यावर मी जाणार होतो, तिकडे अफाट गाड्या एका बाजूला एक थांबलेल्या, माझी गाडी आत तिकडे घ्यायला जागाच नव्हती. वाटलं हा वन वे असावा. अर्धवट राईट टर्नचा मग यु टर्न केला, लगेच जाणवलं कि आपल्याला वास्तविक या पुढच्या सिग्नलवर , दिल्लीच्या भाषेत रेड लाईटवर, यु टर्न घेतला असता तर सोयीचं पडलं असतं. तितक्यात दिसलं अरे हे तर गुरगावचं ट्रॅफिक! विरुद्ध बाजूंनी लोकांनी सिग्नलपाशी रस्ताच बंद केलेला, वास्तविक वन वे वैगेरे काहीही नाही. थोडा वेळ तसाच अर्ध्यात थांबलो असतो तर घुसता आलं असतं. असो. मग त्या उजवीकडच्या रस्त्याची मुख्य रस्त्याला मिळणारी साईड लेन आली.

काय बुद्धी सुचली देव जाणो मी तो वेगळा रस्ता आहे समजून तिच्यात गाडी नेली. तेवढ्यात मामा पळत आला. "साईड, साईड में लो।"
लगेच गाडी तो म्हणतो तिथे साईड्ला घेतली.
"फ्री लेफ्ट लेन में उलटे जा रहे हो? गाडी लगाओ और इधर आओ।" पोलिस म्हणाला.
तिथे १-२ वाहतुक पोलिस आणि ५-६ साधे पोलिस बसले होते.
"ये देखो, ये महाराज उलटे हाथ जा रहे थे।" मला थांबवणारा पोलिस आपल्या मित्रांना म्हणाला.
गुन्हेगाराचा गुन्हा काय आहे यात शिरण्यापूर्वी सबब इसम गुन्हा करण्यास पात्र आहे का हे तपासायची रहदारी पोलिसांत रीत आहे. तिला जागून त्यांचा म्होरक्या मला म्हणाला, "लायसेंस दिखाव।"
मी गुपचुप खिशातून पर्स काढली आणि माझ्या लर्निंग लायसेंसचा कागद त्याला दिला. पहिल्यांदा लायसेंस बाळगून आहे आणि माणूस शिकावू आहे तेव्हा त्याला फार काही दमाटता येणार नाही म्हणून त्याचा चेहरा किंचित पडला. पण कागद परत देत असताना अचानक त्याने तो परत घेतला आणि म्हणाला, " क्यों जनाब, ये तो यक्सपायर हो गया है? वो भी दो महिने पहिले!"
त्यांचा एक दुसरा साथीदार पुढे सरसावला, "आर सी दिखाओ। और पीयुसी भी निकालो।"
मी माझे लक्ष पहिले उत्तर देण्यापेक्षा दुसर्‍या माणसाचे ऐकण्याकडे दिले. त्याच्या बोलण्यानंतरही मी शांत. शिवाय स्वतःहून मी काहीच बोलत नाही आणि बोलण्यापूर्वी वाजपेयींना लाजवेल असा पॉज घेतो हे पाहून म्होरक्या म्हणाला,"अरे ये लंबी केस है । आओ जनाब फुरसत से बैठो और फिर बात करो। अरे, जरा सबके लिये चाय मंगाना। इनके लिए भी।"
माझ्याकडून जे पैसे मिळतील त्यात सर्वांच्या चहाची किंमत काहीच नसेल असे त्याला वाटले असावे. त्या रस्त्यांच्या नद्यांत जी बेटं बनतात त्यापैकी एकावर त्यांनी मस्त खुर्च्या आणि टेबलं टाकली होती. एक केबिनही होती. मी बसलो आणि शांतपणे म्हणालो, "यु पी सरकार का पर्मॅनंट लायसेंस बनाने का कागज का स्टॉक खतम हो गया है, इसलिए फिलहाल लर्निंग के साथ ही काम चलाना पड रहा है।"
मी अगोदर नोयड्यात राहायचो, ते युपीत पडते. तिथेच लर्निंग लायसेंस काढलेले. त्यांना अशा प्रसंगी मिळालेल्या उत्तरांपेक्षा हे उत्तर अफलातून होते म्हणून त्यांचा पुढचा डायलॉग यायला थोडा वेळ लागला. "लगता है तो आप मेरे एजंट को फोन करके देखो," मी मोबाईल काढत म्हणालो.
फोन घ्यायचे नाकारून बर्‍याच शांततेनंतर त्यांच्यापैकी एकजण म्हणाला, "अरे वो मायावती सरकार है ही बडी नलायक।"
त्याला गप्प राहायचा इशारा करत म्होरक्या म्हणाला,"आर सी? पी यु सी?"
"गाडी अभी अभी ली है। डिलर ने आर सी बनायी है और मुझे ले जाने के लिए कहा भी था, लेकिन जिस गली में डिलर का शोरुम है वो बहुत पतली और भिडभाडवाली है, और मैंने गाडी नयी नयी चलानी सिखी है तो जा नहीं सका। और दोस्तों ने मुझे बताया कि गाडी अगर नई है तो पहले दो साल पोल्यूशन नही करती इसलिए पीयुसी भी नही लगता।"
'बंदो से पर्दा करना क्या' हे ऐकताना अकबराची कानशीलं जशी तापली होती तसा काही प्रकार म्होरक्याच्या बाबतीत झाला. ज्या थंडपणे आणि ज्या पातळीची मी ही स्पष्टीकरणे देत होतो ते पाहून हे लेकरू कोण्या का धेंडांच असेना, सोडायचं नाही असा पक्का निर्धार त्याने केला आणि त्याच्या ज्यूनिअरला म्हणाला, "थाने में ले जाओ गाडी।"
मी हस्तक्षेप करेल असे त्या सर्वांना वाटले पण जणू काय 'थाने' माझे घरच आहे कि काय इतका मी शांत होतो ते पाहून त्यांच्यापैकी एक माझ्याकडे पाहून जोरात आणि सुचकपणे म्हणाला, "क्यों, कैसे?"
"जैसी आपकी मर्जी।" मी उत्तरलो.
एक वाहतुक पोलिस माझ्याकडे आला, गाडीकडे बोट दाखवून म्हणाला, "चलो बैठो।"
तितक्यात म्होरक्या एका साध्या पोलिसाकडे बोट दाखवून म्हणाला, "तुम नही, तुम जाओ।"

ठाणे १०० मिटरवर होते तेव्हा माझ्यासोबत गाडीत बसलेल्या पोलिसाला फोन आला. तो म्हणत होता,"अभी भी चिपचाप है।"
त्यांचं अजून थोडं बोलणं झालं. पोलिसाने गाडी मला बाहेरच थांबवायला सांगीतली. शांत, रम्य जागी, झाडाखाली बाजूला गाडी लावल्यावर तो म्हणाला, "तुम वाकई में गाडी अंदर ले जाना चाहते हो?"
"मै कुछ नहीं चाहता। जो भी चाह रहे हो आप चाह रहे हो।" मी म्हणालो.
तो वैतागला. म्हणाला, "आप क्या चाहते हो?"
मी म्हणालो, "मैं कुछ नहीं चाहता। आपको जो चाहना है सो आप चाहो।"
"देखो, गाडी अंदर जायेगी तो केस होगी। ७००० रु लगेंगे।" तो.
"जानकारी के लिए शुक्रिया।" मी.
त्याने काय करावे ते कळेना म्हणून दोन मिनिटे विचार केला. शेवटी परत म्होरक्याला फोन केला आणि दोघांत दोन-तीन मिनिट संवाद झाला.
शेवटी तो म्हणाला, "वापस चलो उधरही।"
मला पुन्हा म्होरक्यासमोर सादर करण्यात आले.
"जोशीसाब, आप चाहते क्या हो?" पुन्हा तोच प्रश्न.
"देश में आपकी हुकुमत है। आप सरकार चलाते हो और मुझे पुछते हो कि क्या होना चाहिये। आप जो चाहते हो सो होगा।" आता त्यांना मी कोणी व्हिजिलन्सचा माणूस तर नाही ना अशी शंका यायला लागली. त्यांनी मग comfort level येण्यासाठी माझी अर्धा तास मुलाखत घेतली. केस अगदी सांगतेय तशीच आहे अशी त्यांची खात्री पटली. मी एकही विधान खोटे बोलत नाहिय याची मी त्यांना जाणिव करून द्यायचा प्रयत्न करत होतो.
"देखो जी आप बडे सज्जन दिखते हो। इतना कुछ (अकबरीय अवमानसुद्धा असे त्याला म्हणायचे होते वाटतं) कोई और करता तो उससे हम बहुत ज्यादा लेते. आपका केस हम २००० में सेटल कर देंगे।" म्होरक्या.
"ठीक है। लेकिन अभी मेरे जेब में ज्यादा से ज्यादा १० रु होंगे। एटीएम २ किमी पर है, मैं आपको लाके देता हूं।"
"ये नहीं चलेगा। अभी आप इसमें भी नौटंकी मत करो।" तो.
"लगता है तो आप मेरी जेब चेक कर लो।" मी.
"ये ना होगा हमसे।" तो.
"आप ना जेब चेक कर रहे हो , ना भरोसा कर रहे हो।"
माझ्या तोंडून 'भरोश्या' इतका मोठा शब्द आल्याने तो दुखावला गेला असावा. लगेच तो मघाचा तो साधा पोलिस माझ्यासोबत एटीएमकडे आला.

एटीएमच्या दारात, मी कमी पैसे देईन कि काय वाटून, तो मला पून्हा म्हणाला,"२००० रुपये ।"
" मेरे सेविंग अकाउंट में अब लगभग ८०,००० रु है। आप अभी फायनल कर लो आप को यक्झॅक्टली कितने चाहिये।" मी म्हणालो.
" नहीं दो हजार ही चाहिये।" तो बराच ओशाळला होता.
त्याने पैसे घेऊन खिशात ठेवले नाही तोपर्यंत त्याला फोन आला. दोन मिनिटे तो बोलला. मग मला म्हणाला,"साब ने आपको वापस बुलाया है।"

परत आलो, परत त्याच खूर्चीवर स्थानापन्न झालो.
"अरे जरा दो वो स्पेशलवाली चाय मंगाना।" मग माझ्याकडे वळून म्हणाला, "बैठो जोशीसाब। इस बार चाय मेरी जेब से।"
पुढे वडिलधार्‍या माणसाचा आव आणत म्हणाला," क्यूं जी, आपको किसी ने २००० रुपये मांगे तो दो रुपयें भी कम करने कि बात नही करोगे? ऐसे कैसे जी पाओगे?"
"जाखरसाब, ये दो रुपयों का मामला नहीं है। आप किसी भी आदमी को करप्शन का एक्झांपल पुछो, वो सबसे पहले ट्रॅफिक पोलिस का नाम लेगा, जबकी कितनी सारे करोडों कि मलाई रोज कहाँ कहाँ पचाई जाती हैं। मुझे तो दिखता है कि ये बेचारा ट्रॅफिक पोलिस दिनभर धूप में, बारिश में, धूल्-मिट्टी-धूए में खपता है। मेरे बहुत सारे पैसे बहुत सारे चोर बहुत सारे तरीकोंसे जिंदगीभर लूटते हैं ये मुझे पता है। ये हर किसी को पता है। उसमे दो पैसे रोज दिखने वाले यातायात पुलिस को गये तो क्या ऐसा फर्क पडा? ... ... ... ब्ला ब्ला ब्ला" मी २-३ मिनिट बोलत होतो.
"आप वाकई में हम लोगों के बारे में ऐसा सोचते हो?" या वाक्यानंतरच्या शांततेत त्याच्या शंकेचे खात्रीत रुपांतरण व्हायला चांगली २ मिनिटं लागली असावी.
आमच्यात एक तासाभराचा लांबलचक संवाद झाला ज्याच्या शेवटी त्याने ताडकन ते २००० रु काढले आणि माझ्या शर्टच्या खिशात, त्याला थांबवायला आलेला माझा हात दुसर्‍या हाताने रोखून, कोंबले.
"आप जाव। ये मेरा नंबर ले लो। पोलिस कि कभी कोई जरुरत पडे तो बेझिझक कहना।" तो म्हणाला.

मी निघालोच होतो. मागे वळत म्हणालो,"जाखरसाब, एक बात अधुरी रह गयी।"
"क्या?" जाखरसाब.
"अगर मैं जाऊंगा तो आपके मन में , हो सकता है कि, ये खयाल आएं कि कोई आपको उल्लू बनाके गया।"
"नहीं जी, नहीं होगा ऐसे। देखिये, मुझे लगता है कि आपका और हमारा एक रिश्ता बना है। उसमें ए सब बातें नहीं आतीं।" तो.
"देखिये, हो सकता है आपको ऐसे कभी ना लगे़ं," मी बोलू लागलो... माझं पिशाच्च त्याचा अजूनही पिच्छा सोडत नाहीय हे पाहून पुढे काय वाढून ठेवलंय याची त्याला नीट कल्पना येईना.
"लेकिन मैं आपके जितना अच्छा नहीं हूं। मुझे हमेशा एक घुटन रहेगी कि कहीं मैंने आपको उल्लू तो नहीं बनाया। बात ऐसी है कि दो जुलै को मेरे बाप बनने तारीख डॉक्टरने निकाली है। आप ये ५०० रु रख लो और मैं आपको फोन करुंगा तब अपने स्टाफ में मिठाई बाँटना।" मी पुढे म्हणालो.
"आपने बात ही ऐसी कही कि मुझे मजबूरी में ये पैसा लेना पड रहा है। लेकिन प्लिज कभी इसे घूस मत समझना।" तो भावूकपणे म्हणाला.
"ये भी कोई कहनेवाली बात है? बिलकूल नहीं। आप निश्चिंत रहें।" मी त्या सर्वांचा निरोप घेत म्हणालो.

(आशयाच्या वादग्रस्त स्वरुपामुळे ही कथा असत्यकथा मानण्यात यावी.)

field_vote: 
4.833335
Your rating: None Average: 4.8 (6 votes)

प्रतिक्रिया

पुरा लुटायला आलेल्या जाटाला चौथाई देऊन बोळवण केलीत तर.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जालीय कथालेखनाचं सौंदर्य पहा. मी तुम्हाला सांगू शकतो की हे कथेचं चुकिचं रसग्रहण आहे. मी त्याला मनःपूर्वक ५०० रु दिले होते. नो ड्रामा.

आणि त्या 'जाटाला' शब्दाबद्दल-
बाळंतपणाला बायको माहेरी होती आणि मी निवांत त्या लोकांसोबत २-३ तास होतो. कथा लघुतम ठेवण्यासाठी ते सारे संवाद गाळले आहेत. उदा.
मी, "बलराम जाखड लोकसभा के सभापती थे। आपके कोई लगते है क्या?"
तो,"यहाँ ढेरों जाखर पडें हैं, उनसे पहचान होती तो यहाँ थोडे ही बैठे होते? पर आपकी जानकारी बहुत अच्छी है। आप पुना के हो और तेल और सडकों के बिझनेस में काम करते हो, फिर भी हमारे जाखरसाब को जानते हो।"
मी,"सभापती तो देश के थे।"
थोड्या सेकंदांनी-
मी, "आपको पता है, हिंदुस्तान के इतिहास में आज तक सबसे बडा जाट कौन पैदा हुआ है?"
चांगला मिनिटभर विचार करुन-
तो, "शायद झोरावर सिंग"
मी, "अजी, वो अगर सबसे बडे जाट होते तो गुडगाव कि पतली गली का नाम उनके लिए नही चुना जाता। चलो मैं आपको हिंट देता हूं। हर हिंदुस्तानी इस जाट को साल में कमस कम दो बार सलाम ठोकता है।"
पलिकडे शांतता.
"चलो और एक हिंट देता हूं। इंडिया गेट में जितनी दिग्गज सडकें हैं उन में से केवल एक ही नाम हिंदू राजा का है और वो जाट है। अब बताव।"
"सम्राट अशोक?"
"जी, हाँ।"

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

तुम्हाला रसग्रहण वाटले का बरं वाटलं असेल बॉ? कथा वाचल्यावर आमच्या लिमिटेड RAM मध्ये दिल्ली, पैसे उकळणे, मराठी माणुस इतकेच विचार चिकटुन राहिले, बाकीचे सावकाश रवंथ करायला Heap वर सोडुन दिले.

त्यात दिल्लीचे आणि मराठ्यांचे ('महाराष्ट्रातले' या अर्थी) जुने देवाण-घेवाणीचे नाते आठवले म्हणुन एक 'जाट-चौथाई'ची पिंक टाकली. जाटांनी मराठ्यांना द्यायचं राहिलं का मराठ्यांनी जाटांना हा जुना प्रश्न शिल्लक आहेच. बाकी सम्राट अशोक 'सबसे बडा जाट' होता हे सुरजमल जाटाच्या कानावर पडलं तर त्याला काय वाटलं असतं? कदाचितः होगा सम्राट अपने घर का, यहां कुम्हेरी में तो बस हमारीही चलती है!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मला वाटतं आपल्याकडे खूप रोचक ज्ञान आहे. मला पुढच्या वेळी कामी येईल. त्याची थोडी समरी इथे टाकता का? मला 'मराठे-जाट' संबंध बद्दल फक्त पानिपतच्या लढाईच्या 'स्त्रीयांच्या आश्रयाच्या ऑफर'पलिकडे ज्ञान नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

तुम्ही स्थितप्रज्ञतेचे क्लासेस काढावे अशी नम्र विनंती आहे . शिवाय दहशवादी आणि विविध आंदोलकांशी
वाटाघाटी करण्यासाठी तुमची नेमणूक झाली तर जगात एकूणच भयंकर शांतता प्रस्थापित होईल . आमेन !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

डिस्क्लेमरमुळे ललित कथा दुर्लक्षित करावी की आपल्या बाब्याचा अनुभव लेख चान चान करावा ह्या दुविधेत.... Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

क्या बात है! असत्यकथा आवडली. उसंत सखुशी सहमत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रतिक्रीया नक्की काय द्यावी यावर त्या ट्रॅफिक पोलिसाहून अधिक द्वीधेत आहे Wink
शैली, प्रसंग सारेच अनोखे.. आवडले

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आयला जबरीच. स्थितप्रज्ञतेचे क्लासेस काढावेत अशी मागणी उसंत सखूंप्रमाणेच मीही करीत आहे.

बाकी, हा संवाद महाराष्ट्र देशीच्या "दढमह सामलंगे कलहरे अहिमाणसालेय, दिण्हले गहिल्ले उल्लविरे तत्थ महरट्ठे" लोकांसमवेत कसा झाला असता याची कल्पना करून अंमळ हळवा झालो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

अहो, तुम्ही काय लिहिले आहे ते मराठीत भाषांतर करून लिहा ना.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

उद्योतनसूरी नामक जैन मुनीचा प्राकृत भाषेत लिहिलेला कुवलयमाला नामक ग्रंथ आहे-साधारण इ.स. ७००-८०० च्या दरम्यान कधीतरी लिहिलेला. त्यात तो भारतभर इकडे तिकडे फिरला, तिथले लोक कसे भाषा कशा इ. बद्दल लिहितो. त्यातला महाराष्ट्राचा अनुभव लिहिला आहे. त्याने "दणकट बांध्याच्या, काळ्यासावळ्या वर्णाच्या, भांडखोर आणि दिण्हले-गहिल्ले अशी भाषा बोलणार्‍या" एका महरट्ट्यास/मरगठ्ठ्यास पाहिले असे तो उपरोल्लेखित कवितेत लिहितो.

असा उल्लेख बाबासाहेब पुरंदर्‍यांच्या राजा शिवछत्रपतीत अगदी पहिल्याच च्याप्टरमध्ये आहे. वरिजिनल कविता अन अर्थ इ. सर्व काही तिथून दिलेले आहे तेच उचललेले आहे.

मराठी लोकांबद्दलचे अन्य भारतीयांचे इंप्रेशन हे अनादिकाळापासून असेच आहे असे ही कविता वाचून कितीक लोकांचे मत झाले आणि ते बिनदिक्कतपणे वापरल्या जाते. कुवलयमाला ही नक्की काय भानगड आहे हे त्यापलीकडे कोणीच जाऊन पाहत नाही. जसे त्या क्रिस्तदासु तोमास स्टीफन्सने आपल्या क्रिस्तपुराणात वर्णिलेल्या "भासांमाजि मानू थोरू | मराठीया|", "जैसी पुस्पामाजी मोगरी | की परिमळामाजी कस्तुरी |" इ.इ. मराठीच्या थोरवीदर्शक ओव्या क्र. १२१-१२५ सोडल्या तर बाकी पुराणाची एकही ओवी कोणी वाचत नाही२ अ त्यापैकीच हा प्रकार झाला.यद्यपि युरोपात दाबून दारू का प्यायली जाते अन भारतात फारसे कोणी का पीत नाही इ. बद्दलचा त्याने वर्णिलेला अध्याय रोचक आहे.

२ असंपूर्ण क्रिस्तपुराण तोमास स्टीफन्सनंतर अ.का. प्रियोळकर यांनीच वाचले आहे.२ ब

२ ब हा उल्लेख पुलंच्या गाळीव इतिहासातील आहे.

हा अध्याय नवनीताच्या नवीन आवृत्तीतला आहे. नेटवरच्या आवृत्तीत हे सापडणार नाही. ती जुनी १९०९ ची आवृत्ती आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

चमत्कारिक प्रसंग.
विचित्र वागणूक व पर्याय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars