पाच महासती : सतीत्वाचा निकष तरी काय?

भारतीय धर्म परंपरेत सात चिरंजीव आणि पाच महासती सांगितल्या जातात. महासतींना पंचकन्या असे म्हटले जाते.
या ५ महासती पुढील प्रमाणे आहेत :

१.अहिल्या
२.द्रोपदी
३.कुंती
४.तारा
५.मंदोदरी

या पौराणिक महिलांविषयी एक संस्कृत श्लोक प्रसिद्ध आहे.

अहल्या द्रौपदी कुंती तारा मंदोदरी तथा ।
पंचकन्यादस्मरेन्नित्यं महदपातक नाशनम् ।।

अर्थ : अहिल्या, द्रौपदी, कुंती, तारा आणि मंदोदरी या पंचकन्यांचे नित्य स्मरण केल्याने महापापांचा नाश होतो.

सती या शब्दाचा पारंपरिक अर्थ आहे पवित्र स्त्री. अशी स्त्री जी आपल्या पतीशी एकनिष्ठ आहे.कन्या म्हणजे कौमार्यभंग न झालेली मुलगी अर्थात कुमारिका. महासती किंवा कन्या या दोन्ही नामांच्या अर्थाच्या दृष्टीने वरील पाचही पौराणिक महिलांचे चरित्र पूर्ण विरुद्ध आहे. या पाचांपैकी कोणीही कुमारिका नाही. त्या सर्व जणी विवाहित महिला आहेत. पाचही जणींचे एकापेक्षा जास्त पुरूषांशी शारिरिक संबंध आले आहेत. व्यभिचार करायलाही त्या कचरत नाहीत. कुंती ही तर कुमारी माता आहे. तरीही त्यांना महासती आणि पंचकन्या या उपाध्या कोणत्या निकषांच्या आधारे दिल्या गेल्या, हा येथे मुख्य प्रश्न आहे.

पाच जणींच्या चरित्रात काही समान गोष्टी आहेत.

  • या पाचही जणी धाडसी आणि बंडखोर आहेत. धोपट मार्गावरून चालण्याचे त्या नाकारतात. त्यांच्या काळात रूढ असलेल्या परंपरा मोडून त्या कणखरपणे उभ्या राहतात.
  • परंपरांचा संबंध पाप-पुण्याशी जोडलेला आहे. त्या दृष्टीने पाहता, या महिला प्रसंगी पापाचरण करायलाही मागेपुढे पाहत नाहीत.
  • परंपरांच्या छातीवर पाय दिल्यामुळे या महिलांना खडतर आयुष्याचा सामना करावा लागतो. पण, त्या संकटांसमोर रडत बसत नाहीत. कणखरपणे सामना करतात.
  • धोपट मार्ग सोडून वेगळी वाट निवडल्याची मोठी किंमत त्यांना मोजावी लागते. मात्र, त्याबाबत त्या खंत करीत नाहीत.

या पाचही जणींमध्ये नायिकांचे गुण आहेत. म्हणून त्यांना पंचकन्या आणि महासती असे संबोधले गेले असावे, असे मला वाटते.

जीवनभर पतीशी एकनिष्ठ राहून दु:ख सोसणार्‍या सीतेचा समावेश पंचकन्यांत नाही. वास्तविक पाहता एकनिष्ठतेच्या बाबतीत तिच्या एवढी व्रतस्थ पौराणिक स्त्री दुसरी कोणतीही नाही. तथापि, ती रडत बसते. परिस्थितीला आकळण्याची हिंमत तिच्यात नाही. म्हणून ती या यादीत नसावी.

असो. येथे थोडक्यात टिपण दिले आहे.
सविस्तर लेख आपण येथे वाचू शकाल.

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
1
Your rating: None Average: 1 (4 votes)

"अहल्या द्रौपदी सीता" असं मी ऐकलं होतं. कुंती ही व्हर्शन निराळी दिसतेय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हेच म्हणतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

आँ? कुंती कुठून आली? आम्ही सीता ऐकली होती.

अवांतर स्वगतः

"भारतीय कुस्तीत भीमसेनी, हनुमंती, जरासंधी असे तीन प्रकार सांगितले आहेत.

यात भीमसेनाने कोणतीही कुस्ती (मारामारी नव्हे हां!) स्वबळावर जिंकल्याची माहिती नाही. तसे लहानपणी त्याने अनेक कौरवांना एकदम काखेत दाबुन गंगेत मुटके मारले होते म्हणा पण त्याला का कुस्ती म्हणावे? मोठेपणी जी एक कुस्ती (पक्षी: द्वंद्वयुद्ध) त्याने जिंकली, जरासंधाबरोबर, ती खरे तर कृष्णाच्या बुद्धीचातुर्यामुळेच.

जरासंधाच्या कुस्ती-कौशल्याबाबत महाभारतात फार त्रोटक उल्लेख आहेत. तेवढ्या एखाद-दुसर्‍या श्लोकावरून त्याला ज्येष्ठीमल्लाग्रणी घोषित करावयाचे प्रयोजन समजले नाही. तसाही त्याचा अंत एका दुय्यम दर्जाच्या हुमदांडग्याकडून झालाच ना? मृत्युंजयकारांनीही त्याला कर्णाच्या हातुन माती खायला लावली होतीच की! कोणता बरे तो डाव? आठवले: बाहुकंटक!

राहता राहिला हनुमान. याच्या बल-बुद्धीबाबत अनेक श्लोक आहेत, रुद्रावतार म्हणुन त्याचे नाव आहेच! पण मुळात त्याने कोणाशी कुस्ती केली होती हो? काही विदा आहे का? लक्षात घ्या कुस्ती म्हणजे गदायुद्ध नव्हेच, आणि मारामारी, दुसर्‍याचा कपाळमोक्ष करणेही नव्हेच!

या तिघांपेक्षाही उच्च असा एक अतुलनीय मल्ल असावा असा माझा कयास आहे. तो म्हणजे रामायणातला दुर्लक्षित धोबी! उगीच का कुस्तीतल्या डावांची नावे या व्यवसायाशी आणि कापडाशी संबंधित आहेत? पहा: 'धोबीपछाड', 'एकलांगी', 'दोनलांगी'. 'नूरा' कुस्ती सुद्धा 'एक नूर आदमी और दस नूर कपडा' यावरून आलेली असणार. अधिक संशोधन व्हायला हवे."

हुश्श.. दमलो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

खूप छान माहिती. लेख आवडला.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

मंदोदरी जरा बोरच करते.
आणि अहिल्या पण.
एकुण काय, रामायण बोर आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी एक काळा मठ्ठ बैल. मला अंधार आवडतो. तेव्हा फार उजेड पाडू नका.

पुरुषांनी शेण खाल्लं तर खपतं आणि अहल्येने इंद्राला वापरून घेतलं तर ती बोअर काय? हा पुरुषी कावा आहे. याचा साफ निषेध.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

बैलांत शेण खाण्याची प्रथा असण्याबद्दल निदान ऐकलेले तरी नाही. (चूभूद्याघ्या.)

(अवांतर: मात्र, 'काउडंग' तेवढे पवित्र, आणि 'बुलशिट' तेवढे त्याज्य, या (ज्यांचे कोणाचे असेल त्यांच्या) लिंगभेदी दुटप्पी धोरणाचा निषेध!)
====================================================================================================================
अरारारारारा!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

काउडंग' तेवढे पवित्र, आणि 'बुलशिट' तेवढे त्याज्य

या बायकी काव्याचा निषेध झालाच पाहिजे!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माहिष्मती साम्राज्यं अस्माकं अजेयं

रामायणात बोरांचा संबंध केवळ शबरीशी आल्याबद्दल ऐकलेले आहे. मंदोदरी/अहल्यासुद्धा बोरे उष्टावत असण्याबद्दल ऐकलेले तरी नाही.

एकट्या शबरीवरून संपूर्ण रामायणाचा बोरांशी (बादरायण) संबंध जोडून देणे अंमळ धाडसी नव्हे काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

आम्हाला याच तारा त्यातल्यात्यात रोचक म्हणून माहित्येत हो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

---

सांगोवांगीच्या गोष्टी म्हणजे विदा नव्हे.

अहल्या द्रौपदी कुंती तारा मंदोदरी तथा ।
पंचकन्यादस्मरेन्नित्यं महदपातक नाशनम् ।।

हा श्लोक मुळात पुढीलप्रमाणे आहे अशी माझी समजूत आहे:

अहल्या द्रौपदी सीता तारा मन्दोदरी तथा|
पञ्चकं ना स्मरेन्नित्यं महापातकनाशनम्||

'पञ्चकन्या: स्मरेन्नित्यं' असा जो पाठ पुष्कळांच्या मुखात असतो तो चुकीचा वाटतो कारण तसे असल्यास 'महापातकनाशनम्' ह्या विशेषणाचे विशेष्य काय आहे असा प्रश्न उभा राहतो. ह्याचे उत्तर 'पञ्चकन्या:' असे निश्चितच नाही कारण 'पञ्चकन्या:' येथे द्वितीयेचे बहुवचन आहे आणि 'महापातकनाशनम्' हे स्पष्टपणे एकवचन आहे. ह्याउलट 'महापातकनाशनं पञ्चकं ना नित्यं स्मरेत्' ह्या पाठात 'मनुष्याने महापातकनाशन अशा पंचकाचे नित्य स्मरण करावे' असा सुसूत्र अर्थ निघतो. 'ना' हे 'नृ' ह्याचे प्रथमेचे एकवचन आहे असे शाळेत वाचल्याचे आठवते.

आता ह्यांनाच स्मरणीय का मानले असावे ह्याचे तर्कशुद्ध उत्तर देता येत नाही, कारण त्यांमधील कमीतकमी पहिल्या दोघींचे वर्तन तरी असे नाही की कोणी बाप आपल्या मुलीला ते चांगल्या वागण्याचे उदाहरण म्हणून सांगेल आणि तिने तसे वागावे अशी अपेक्षा करेल. 'चांगल्या' मानल्या गेलेल्या बाजूचे सगळेच चांगले ह्या निकषानेच त्यांना हे वंद्य स्थान मिळाल्याचे दिसते. द्रौपदी ही विजेत्या पांडवांची पत्नी आणि अहल्या ही रामाकडून उद्धार मिळवलेली आणि पांडव/राम हे वंद्य आहेत ही तर भारतीय संस्कृतीची आधारभूत भूमिका. तेथे चर्चेस आणि वादास वाव नाही. परंपरेने हे आहे हे असे आहे. हवे असेल तर घ्या नाहीतर सोडून द्या, नाहीतरी अहल्येला वंद्य मानले काय, न मानले काय, रोजच्या व्यवहारात काहीच फरक पडत नाही असे मी म्हणेन.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मी आजवर सीता, गांधारी, मंदोदरी, सावित्री यांच्याबद्दल ऐकून होतो. असो. पाच पत्नीव्रतांबद्दल काही लिहून ठेवले असेल तर वाचायला आवडेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

http://naukarshahi.in/archives/10577
------------------------------------------
देवयानी प्रकरण वाचा ब्लॉगवर.
http://bahishkrutbharat.blogspot.in/

सतीत्वाचे निकष कि पतीव्रता असण्याचे निकष ? (सतीत्वाचे यावरून पतीव्रात्याचे असा शब्द वापरण्याचा मोह झाला होता.)

त्या त्या काळातल्या मान्यंतानुसार (खरं तर आजच्या काळातल्या मान्यतेनुसार असं म्हणणंच जास्त योग्य होईल) मंदोदरी पतीव्रताच वाटते. तिच्याबद्दल आक्षेप पाहून आश्चर्य वाटले. कुंती आणि अहल्या यांच्याबाबतीतले म्हणणे पटले. एक पती असताना दुस-या पुरुषाचा विचार न करणे हे पतीव्रता असण्याचं मुख्य लक्षण मानलं तर रावण जिवंत असेपर्यंत मंदोदरीने त्याच्याशी प्रतारणा केली नाही. त्या काळी विधवाविवाह होत असावेत. विधवेचं जिणं अगदीच दयनीय नसावं. तसंच स्त्रियांवर बंधनं नसावीत. ज्या अर्थी पातिव्रत्याचे गोडवे गाणारे श्लोक रचले गेले आहेत त्या अर्थी स्त्रियांनी असे वागावे असं सूचित केलं गेलं असावं.

पराक्रमी पुरूषाशी रत होणा-या विवाहीत होणा-या विवाहिता हा जगभरच्या साहीत्यात दिसणारा घटक आहे. रोमन स्त्रियांना सीझरपासून आपल्याला पुत्र व्हावा असे वाटत असल्याचे वाचनात आले आहे. सीझरचे स्वतःचे अनेक स्त्रियांशी संबंध होते. पण त्याच्या धाकट्या बायकोने दुस-या पुरुषाशी संग केल्याने त्याने तिला काडीमोड दिला. अनेक स्त्रियांशी संबंध हा पौरुषाचा अंहं वाटत असल्याने स्वतःच्या बायकोने दुस-या पुरुषाशी संबंध ठेवावेत हे त्याच्या अंहंला दुखावणारे ठरले असावे.

सीझरच्या काळाच्या ब-याच आधी इजिप्तमध्ये स्त्रिया राजकारणात मोलाची भूमिका बजावताना दिसून येतात. स्त्रियांचं मत विचारात न घेताच तुतुनहामेनला राजपुत्र घोषित केल्याने त्याचा त्याच्या सावत्र आईकडून घात करण्यात आला असं संशोधन सांगतं. त्याचा घोडयावरून पडून झालेला मृत्यू हा अपघाट नसून खून होता हे पुढे आलेले आहे. सांगायचा मुद्दा हा कि स्त्रियांना मानाचे स्थान असण्याचा एक जमाना होता. त्याहीआधी मातृसत्ताक पद्धत असताना स्त्रीच्या नावे कुटुंब ओळखल जाई आणि ती हव्या त्या पुरुषापासून वंश पुढे नेई. त्या काळी अनेक पुरुषांशी संबंध हा वादाचा मुद्दा नव्हता.

दुर्गा भागवतांनी व्यासपर्वामधे स्त्री चा वेगळा विचार केला आहे. एकापेक्षा अनेक पुरुषांशी संबंध ही स्त्री ची सुप्त इच्छा असते, त्यात गैर काही नाही. पुरुष आणि स्त्री यात वेगवेगळ्या कामवासना असण्याचं कारण नाही. आज पुरुषाच्या कामवासनांना मान्यता आहे तर स्त्रीची कामवासना ही भिवया उंचावणारी बाब आहे. मात्र जेव्हां केव्हां स्त्री ची सत्ता होती तेव्हां ते अत्यंत नैसर्गिक समजले गेले असावे. महाभारताचा काळ हा मिश्र काळ असावा. कारण या काळात नियोग संततीलाही मान्यता दिसते तर कुमारी मातेचा शिक्का बसू नये म्हणून बाळाला नदीत सोडणे ही दिसते. या कालखंडाबद्दल मत बनवणे कठीणच आहे, कारण अनेक विरोधाभास, प्रक्षेप यामुळं गोंधळ उडतो. महामुनी व्यास यांच्यापासून झालेली संतती ही ग्राह्य धरली जाते तशीच दशरथाच्या राण्यांना कुलगुरुंनी दिलेल्या फळामुळे संतती प्राप्त होते. हे समाजमान्य दिसते. किंवा बड्यांचं सगळंच निराळं असा दृष्टीकोण जो आज आहे तो तेव्हांही असावा. गादी चालवण्यासाठी राणीला पुत्र असावा आणि तो होण्यासाठीच्या तडजोडीला नियोग संतती असं गोंडस नाव दिलं गेलं असावं, जेणेकरून राजाचाही आब राखला जावा. कारण रामायणात एका धोब्याच्या रिमार्कवरून सीतेचा राजाने त्याग केला याचं कारण लोकनिंदा असं दिलं गेलंय. म्हणजेच समाजाची मान्यता काय असावी याचा अंदाज येतो.

योनिशुचेतेची कल्पना रामायणाच्या काळात मान्यता पावलेली असावी हे अग्निप्रवेश आणि सीतेचा त्याग या घटनांमधून दिसतं. योनिशुचितेची कल्पना रूढ होण्याच्या आधी स्त्री ने पुरुषाच्या घरात वास्तव्यास असावं हे बंधन महत्वाचं मानलं गेलं असावं. तिने दासी बनून राहणे हे कदाचित पुरुषाला सुखावणारे असावे. सुरुवातीला कामाच्या विभागणीने स्विकारलेला तोडगा हा स्त्रीला घरदासी बनण्यास कारणीभूत ठरला असावा. याच काळात अतिथी देवो भव संस्कृतीमध्ये अतिथीला स्त्री देण्याचाही प्रघात होता. म्हणजेच स्त्री ही भोगवस्तू समजली गेली असावी. तिबेटमधे आजही काही भागात अतिथीला स्त्री दिली जाते. डिस्कव्हरी वर ही फिल्म दाख्वली गेली आहे. म्हणजेच स्त्री वर शारीरीक सत्ता हा बदल आधी अस्तित्वात आला असावा. तिच्यावर मानसिक सत्ता स्थापित करताना कुठेतरी योनीशुचितेला मह्त्त्व येऊन परपुरूषाशी संबंध त्याज्य ठरले असावेत. सामाजिक बदल घडताना पुरुषाकडे आकर्षित होणा-या स्त्रिया हा अंहं कुरवाळणारा मुद्दा महत्वाचा असावा हे सीझर, कृष्ण, मदन, कर्ण, भीष्म अशा अनेक पुरुषांवरून दिसतं. आदर्श पुरुषासाठी राम आणि भीष्म ही अगदीच दुर्मिळ उदाहरणं दिसतात. पुरुषाच्या या अहं ला सीझरप्रमाणे जेव्हां तडा गेला तेव्हां स्त्रियांवरची बंधनं अत्यंत कडक होत गेली असावीत. धर्मग्रंथांमधे तसतशी भर पडली असावी. पवित्र ग्रंथांमधे, आदर्श कथांमधे प्रक्षेप घुसवले गेले असावेत. म्हणूनच त्या काळातल्या समाजाबद्दल आडाखे बांधणं अवघड आहे असं सुरुवातीला म्हटलंय.

सर्वसाधारण समाजाची संस्कृती वेगळी आणि राजघराणी आणि आर्यवंश यांची संस्कृती वेगळी असावी. विवाहसंस्था कशी होती आणि बदलत गेली यावर इतिहासाचार्यांचं भारतीय विवाह संस्थेचा इतिहास हे पुस्तकही थोडाबहुत प्रकाश टाकतं. आजही बाहुबलींना जे हवं तेच ते करतात. समाजाला धरून असणारे सर्वसामान्यच असतात. विवाहसंस्थेनेच समाज बनतो. हा समाज विवाहसंस्थेला मान्यता देतो. विवाहसंस्थेने दुर्बल पुरुषाला आपल्या स्त्री ला आपल्यासोबत राहणे भाग पाडता येते, त्यासाठी समाज मदत करतो. हा समाज अर्थातच पुरूषप्रधान आहे. त्याचे कायदेही त्यांनीच बनवले आहेत. नाहीतर सुंदर स्त्री दुर्बलाची पत्नी असल्यास तिचं अपहरण होत असे. अगदी ब्रिटीशांच्या राज्यातही बलशाली लोकांकडून सुंदर स्त्री ला उचलून घेउन जाण्याची उदाहरणं आधीच्या पिढीतल्या लोकांकडून ऐकली आहेत. जमीनदार किंवा इतर बाहुबली ज्यांच्या इशा-यावर समाज चालत असे त्यांची नजर एखाद्याच्या पत्नीवर पडली तर मात्र तिचे संरक्षण करण्यास हा समाज असमर्थ असे. हा समाज आपल्यासारख्याच लोकांवर दबाव टाकण्यात यशस्वी होत असावा. आजही तेच होतं. गावाकडच्या समाजव्यवस्थेत काडीचाही बदल झालेला नाही. शहरात ही व्यवस्था इतकी ठळक दिसून येत नसली तरी मनातून नक्कीच आहे.

मुद्दा हा कि जसजसे बदल होत गेले तसतशा सामाजिक मान्यता बदलत गेल्या. स्त्री ला जेव्हां सत्ता मिळते तेव्हां तिच्या वागण्याचे समर्थन तेव्हांचा समाज करतो कारण ती शक्तीकेंद्र आहे. तर पुरुषाकडे सत्ता असताना पुरुषाला हवा तसा स्त्रियांचा इतिहास लिहीला जातो. या घटनांकडे कसं पहायचं याचा वेगवेगळा दृष्टीकोण असू शकेल.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

....

पुराणकाळातील सतीत्वाचे, पातिव्रत्याचे निकष, हे आजकालच्या शुचितेच्या, पावित्र्याच्या .. कल्पनांपेक्षा भिन्न, अधिक प्रगत असावेत असे दिसते.

अहिल्या, द्रौपदी सारख्या स्त्रीया पंचकन्या मध्ये कशा समाविष्टं होऊ शकतात अशी शंका घेणार्‍यांना कृष्ण, अर्जुन इत्यादी नावे पूजनीय म्हणुन स्मरताना काहीच चुकीचे वाटत नाही हे आश्चर्य आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

*********
केतकीच्या बनी तिथे - नाचला गं मोर |
गहिवरला मेघ नभी - सोडला गं धीर ||

अहिल्या, द्रौपदी सारख्या स्त्रीया पंचकन्या मध्ये कशा समाविष्टं होऊ शकतात अशी शंका घेणार्‍यांना कृष्ण, अर्जुन इत्यादी नावे पूजनीय म्हणुन स्मरताना काहीच चुकीचे वाटत नाही हे आश्चर्य आहे.

अगदी बरोबर. कृष्ण आणि अर्जुन यांनी मिळून खांडववन जाळलं. आणि नुसतं जंगल जाळलं नाही तर त्यातले पशु व नाग जमातीतले लोक आगीपासून बचाव करून बाहेर पडताना दिसले तर त्यांना बाणांनी टिपून मारलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0