चला, २०१४ च्या निवडणुकांचं अनुमान बांधू!

लोकसभेच्या निवडणुकांचा खेळ रंगात यायच्या अनेक महिने आधी निवडणुकांचे निकाल काय येतील याबाबत तर्ककुतर्क लढवण्याचा खेळ रंगात येतो. तर म्हटलं आपणही एक गमतीदार खेळ खेळून या रंगात रंग भरूया.

मला या खेळाची कल्पना सुचली ती स्टॉक मार्केटवरून. निवडणुका आणि स्टॉक मार्केट यात प्रचंड साधर्म्य आहे. दोन्हींमध्ये प्रचंड पैसा गुंतलेला असतो. निवडणुकांमध्ये देशातल्या सगळ्यांचं लक्ष काही काळ का होईना, पण गुंतलेलं असतं. तर स्टॉक मार्केटमध्ये थोड्या लोकांचं लक्ष कायम गुंतलेलं असतं. दोन्हींचं नक्की काय होईल हे सांगता येत नाही. त्यामुळे या जुगारात अनेक जण मालामाल होतात, तर अनेक नागवले जातात. कोणालाच काय होणार हे सांगता येत नसल्यामुळे भाकितं वर्तवणारे पंडित ठामपणे हवं ते सांगू शकतात आणि सांगतातही.

स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणुक कशी करावी हे सांगण्यासाठी अनेक म्युच्युअल फंड मॅनेजर भरपूर पैसे घेऊन तुमचे पैसे गुंतवतात. पण त्यांच्यापैकी सुमारे पंच्याहत्तर टक्के मॅनेजर साध्या इंडेक्स फंडइतका फायदाही मिळवू शकत नाहीत. म्हणजे सेनसेक्स, डाउ जोन्स किंवा एस ऍंड पी ५०० हे इंडेक्स ज्या कंपन्यांवर आधारित असतात त्यांमध्ये पैसे गुंतवले तर पंच्याहत्तर टक्के वेळा म्युच्युअल फंडापेक्षा तुम्हाला अधिक फायदा होईल. नुकत्याच वाचलेल्या लेखात तर तुम्ही आंधळेपणाने अनेक कंपन्या निवडल्या तरीही तुम्हाला म्युच्युअल फंड मॅनेजर्सपेक्षा जास्त परतावा मिळतो असं दिसून आलेलं आहे.

तेव्हा म्हटलं की आपल्यालाही हा खेळ खेळून बघता येईल. आपल्याला तीन पक्षांचे स्कोअर काय होतील याचं भाकित करायचं आहे. हे पक्ष आहेत १ - सद्य युपीए, २ - सद्य एनडीए, ३ - इतर. आपण तीन पद्धतींनी हे निष्कर्ष काढणार आहोत. या तीनही पद्धतींमध्ये नशीब आणि तुमचा अंदाज यांना वेगवेगळ्या प्रमाणात महत्त्व आहे. ज्या पद्धतींत नशीबाचाच खेळ आहे त्यात जरी तुमच्या अंदाजापेक्षा वेगळे आकडे आले तरी ते तसेच्या तसे लिहावे ही विनंती. या खेळात तुमचं कौशल्य किती हे मोजून पहाण्यापेक्षा फारसे कष्ट न करता अगदी साध्या मॉडेलनुसार आकडे कसे येतात हे तपासून पहाण्याचा प्रयत्न आहे.

पद्धत १. (वेळ साधारण १० मिनिटं)
१. एका कागदावर ही तीन नावं याच क्रमाने लिहा. हे तुमचे खेळाडू.
२. या तिघांनाही स्टार्टिंग स्कोअर द्या. हे स्टार्टिंग स्कोअर १२५ ते १७५ च्या दरम्यान असले पाहिजेत. सर्वांची बेरीज ४५० झाली पाहिजे. हे आकडे कोणाला किती द्यायचे, ते कसे ठरवायचे हे सर्वस्वी तुमच्यावर आहे. मात्र यासाठी दोन मिनिटांहून अधिक वेळ घालवता कामा नये असं बंधन आहे. (१२५,१५०, १७५ किंवा १३५, १४०, १७५, किंवा १४०, १५०, १६० अशी काही वाटपं होऊ शकतील)
३. यापुढचे स्कोअर बुक क्रिकेट पद्धतीने द्यायचे. म्हणजे
- एखादं जाडंजुडं पुस्तक घ्यायचं. नेमाड्यांचं हिंदू एक समृद्ध अडगळ वगैरे मिळालं तर उत्तम.
- कुठचंही पान उघडा. सम पृष्ठक्रमांक पहा. त्यातला एकमस्थानचा आकडा (०, २, ४, ६ किंवा ८) हा पहिल्या खेळाडूला द्यायचा. पुस्तक बंद.
- पुन्हा कुठचंही पान उघडायचं, आणि सम पृष्ठसंख्येचा एकमस्थानचा आकडा दुसऱ्या खेळाडूला द्यायचा.
- असं करत रहायचं. प्रत्येक खेळाडूला आठ स्कोअर्स मिळतील.
- आता सगळ्यांच्या स्कोअर्सची बेरीज (स्टार्टिंग स्कोअरसकट) करून पहा.
- ही बेरीज ५५४ च्या जवळ असेल. कमी जास्त असेल तर सर्वांच्या स्कोअर्समध्ये शक्य तितक्या समान प्रमाणात कमी जास्त करा.
- तुमचे प्रत्येकाचे स्कोअर्स म्हणजे त्या त्या पक्षांना मिळणाऱ्या जागा.

पद्धत २. (वेळ साधारण २ मिनिटं)
१. बुकमार्क पद्धतीने दोन आकडे काढा. समजा ६ आणि ४ या क्रमाने आले तर ते एकत्र करून ६४ हा आकडा तयार करा.
२. या आकड्याचेे साधारण एक तृतियांश आणि दोन तृतियांश असे दोन पूर्णांकाचे भाग करा.
३. तुमचा मूळ आकडा २६२ मधून वजा करा. हा यूपीएचा स्कोअर. (युपीएला गेल्या वेळी २६२ जागा मिळाल्या होत्या. यावेळी त्यातल्या काही कमी होतील असं गृहितक आहे.)
४. तुम्ही केलेले दोन भागांपैकी एक एनडीएच्या स्कोअरमध्ये (१५९ मध्ये) मिळवा आणि एक इतरच्या स्कोअरमध्ये (१३३ मध्ये) मिळवा. मोठा आकडा कुठे टाकायचा आणि लहान कुठे हे तुम्ही ठरवायचं.

पद्धत ३. (वेळ साधारण १ मिनिट)
१. युपीए २१२, एनडीए २०३, इतर १३९. ही गेल्या तीन वर्षांची सरासरी. यातल्या कुठल्याही स्कोअरमधून १० वजा करून दुसऱ्या कुठल्याही स्कोअर्समध्ये कसेही विभागून मिळवा. बेरीज ५५४ कायम राहिली पाहिजे.

या तीनही पद्धतीने मिळणारे स्कोअर खालील फॉर्मॅटमध्ये प्रतिसादात चिकटवा, अथवा मला व्यनिने पाठवा.
पक्ष पद्धत१ पद्धत२ पद्धत३
यूपीए
एनडीए
इतर

मी काही दिवसांनी या सर्व आकडेवारीचं विश्लेषण करून तीनही पद्धतींनी येणारे निष्कर्ष सादर करेन. निवडणुका झाल्या की हे निकाल कितपत बरोबर आले आणि इतर मोठ्या वृत्तसंस्थांनी घेतलेल्या निकालांपेक्षा अधिक चांगले आहेत का हे तपासून बघायला आणखीनच मजा येईल.

field_vote: 
2
Your rating: None Average: 2 (2 votes)

प्रतिक्रिया

मजा आली Smile मोबाइलमुळे थोड्या वेगळ्या फॉर्मेटमधे निकाल लिहीलाय.
पक्ष - पद्धत१ - पद्धत२ - पद्धत३
यूपीए - २०८ - १८२ - २२२
एनडीए - १८८ - १८६ - १९३
इतर - १५८ - १८६ - १३९

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझे आकडे अस्मिच्या जवळचे आले. कदाचित पहिल्या पद्धतीत घेतलेलं वितरण सारखं असावं. तिसऱ्या पद्धतीत अर्थातच फार वेगळे आकडे येण्याचा संभव कमी आहे. किंबहुना फारसा फरक येणार नाही अशाच दृष्टीने तिसरी पद्धत तयार केलेली आहे.

पक्ष पद्धत१ पद्धत२ पद्धत३
युपीए 210 198 212
एनडीए 175 180 193
इतर 169 176 149

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

<<स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणुक कशी करावी हे सांगण्यासाठी अनेक म्युच्युअल फंड मॅनेजर भरपूर पैसे घेऊन तुमचे पैसे गुंतवतात. पण त्यांच्यापैकी सुमारे पंच्याहत्तर टक्के मॅनेजर साध्या इंडेक्स फंडइतका फायदाही मिळवू शकत नाहीत. म्हणजे सेनसेक्स, डाउ जोन्स किंवा एस ऍंड पी ५०० हे इंडेक्स ज्या कंपन्यांवर आधारित असतात त्यांमध्ये पैसे गुंतवले तर पंच्याहत्तर टक्के वेळा म्युच्युअल फंडापेक्षा तुम्हाला अधिक फायदा होईल. नुकत्याच वाचलेल्या लेखात तर तुम्ही आंधळेपणाने अनेक कंपन्या निवडल्या तरीही तुम्हाला म्युच्युअल फंड मॅनेजर्सपेक्षा जास्त परतावा मिळतो असं दिसून आलेलं आहे<<>>

मालक अशी विधाने टाकताना त्याची व्याप्ती निश्चित करण्याची काळजी घ्यावी ही विनंती. सदर अभ्यास हा अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांच्या किंवा इतर प्रगत देशांच्या भांडवली बाजाराबाबत आहे याचा उल्लेख अतिशय महत्त्वाचा. भारतासारख्या प्रगतीशील देशात 'अ‍ॅक्टिवली मॅनेज्ड' फंड्स हे अनपानधपक्याने केलेल्या गुंतवणुकीपेक्षा किंवा इन्डेक्स पेक्षा बरेचदा अधिक परतावा देत असतात. भारताहून अधिक उदयोन्मुख देशातून हा फरक आणखी मोठा असेल. संपृक्त भांडवली बाजार नि उदयोन्मुख देशातील बाजार यांच्या डायनॅमिक्स मधे फारच फरक असणार नि त्यामुळे सदर अभ्यासाचे निष्कर्ष सर्वत्र लागू ठरतीलच असे नाही.

आंधळेपणानेच काय चांगले ब्रोकरकडूनच टिप्स वगैरे घेऊन किंवा गुंतवणूक करायची त्या कंपनीच्या भूत-भविष्याचा साधकबाधक अभ्यास करून गेलेली गुंतवणूकही गाळात गेल्याने एका फटक्यात आर्थिक स्थिती कोसळलेले लोक भारतात नगण्य नक्कीच नाहीत. कदाचित यशस्वी गुंतवणूकदारांपेक्षा अशा फटका खाऊन झोपलेल्यांची संख्याच अधिक असावी. तेव्हा अशी सरधोपट विधाने धोकादायक आहेत असे नमूद करतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

I think therefore you are wrong!
-Ramata De-scare-de

धागा मौजमजा सदरात आहे हे कारण सांगून सगळ्यातून सुटका करून घेऊ शकतो, पण इच्छित नाही. कारण किंचित मौजमजा, आणि किंचित गंभीर तुलना ही दोन्ही उद्दिष्टं डोळ्यासमोर आहेत.

विधान करतानाच दुवा दिला होता म्हणून, किंवा 'स्टॉक मार्केटबाबतचं विधान खरं तर दुय्यम आहे, खरा हेतू निवडणुकांबाबत तथाकथित पंडितांच्या पद्धतींमधल्या उणीवा तपासून पहाणं आहे' असं म्हणूनही जबाबदारी झटकता येईल. पण तेही करायचं नाहीये.

दोन ओळींमध्ये ही मांडणी झाली त्यामुळे 'आंधळेपणा'मागच्या अटी सांगणं राहून गेलं. अशा बहुतेक अभ्यासांमध्ये
१. अनेक व वेगवेगळ्या प्रकारच्या कंपन्यांच्या स्टॉक्समध्ये गुंतवणुक
२. दीर्घकालीन गुंतवणुक
या गोष्टी अध्याहृत असतात. इंडेक्स फंडांमधली दीर्घकालीन गुंतवणुक ही अशाच कारणांमुळे एका विशिष्ट पातळीचा परतावा (मार्केट रिटर्न्स) देणारी ठरते. मॅनेज्ड फंडांमधला परतावा हा खरेदीविक्रीचा खर्च, त्यांमध्ये येणारे टॅक्सेस, आणि मॅनेजरांची फी यामध्ये जातो. म्हणून प्रत्यक्ष हातात येणारा परतावा इंडेक्स फंडपेक्षा कमी असू शकतो. हे (अमेरिकेतल्या) बहुतांश फंडांबाबत होतं याबाबत अभ्यास उपलब्ध आहे. मी उद्धृत केलेल्या अभ्यासाचा सकृद्दर्शनी निष्कर्ष हा की इंडेक्स फंडांपेक्षाही रॅंडम गुंतवणुक (अनेक कंपन्या, दीर्घकाळ) सरासरी फायदेशीर ठरताना दिसली.

संपृक्त भांडवली बाजार नि उदयोन्मुख देशातील बाजार यांच्या डायनॅमिक्स मधे फारच फरक असणार नि त्यामुळे सदर अभ्यासाचे निष्कर्ष सर्वत्र लागू ठरतीलच असे नाही.

संपृक्त भांडवली देशांमधलं स्टॉक मार्केट उदयोन्मुख देशांमधल्या स्टॉक मार्केटांपेक्षा वेगळं काम करतं असं माझ्या तरी वाचनात नाही. त्यामुळे निष्कर्ष लागू ठरणार नाहीत याचीही खात्री नाही.

भारतासारख्या प्रगतीशील देशात 'अ‍ॅक्टिवली मॅनेज्ड' फंड्स हे अनपानधपक्याने केलेल्या गुंतवणुकीपेक्षा किंवा इन्डेक्स पेक्षा बरेचदा अधिक परतावा देत असतात.

याबद्दलचा विदा पहायला आवडेल. तोपर्यंत स्टॉक मार्केट, मॅनेज्ड फंड्स, इंडेक्स फंड्स यांत धोक्याच्या बाबतीत डावंउजवं काहीच सांगता येत नाही.

असो. धोक्याबाबतच्या संदेशामागची भावना पटली. मी दिलेल्या पद्धतींनी निवडणुकांचं अनुमान बांधण्यात मात्र कुठचाही धोका नाही हे सांगू शकतो. Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

भारतासारख्या प्रगतीशील देशात 'अ‍ॅक्टिवली मॅनेज्ड' फंड्स हे अनपानधपक्याने केलेल्या गुंतवणुकीपेक्षा किंवा इन्डेक्स पेक्षा बरेचदा अधिक परतावा देत असतात.

हे अ‍ॅनेक्डोटल निरीक्षणांवर आधारीत विधान आहे काय? कुठल्याही काळात बाजारापेक्षा अधिक परतावा देणारे फंड्स नेहमीच अस्तित्त्वात असतील. परंतु सततच हे फंड्स बाजारापेक्षा जास्त परतावा मिळवून देऊ शकतात हे दाखवणे गरजेचे आहे. याचा अर्थ असे फंड मॅनेजर्स नसतीलच असे नाही, हे कृपया ध्यानात घ्यावे.

विकसनशील देशांतील फंड्स आणि एकूण बाजार यांची तुलना करणारे भरपूर संशोधन उपलब्ध आहे. उदा. हा निबंध. या निबंधात विकसीत देशांतील फंड्सबरोबर भारत, इंडोनेशिया अशा विकसनशील देशांच्या फंड्सच्या कामगिरीचा विचार केलेला आहे पण दोन्ही गटांत सामान्यपणे बाजारापेक्षा म्युच्युअल फंड्सचा परतावा कमी आहे असेच चित्र दिसते. याच निबंधात संपृक्त आणि इतर बाजारांतील परताव्याविषयी भाष्य आहे. आर्थक विकास आणि परतावा यांचा काही संबंध न आढळने तसेच संपृक्त बाजाराची लक्षणे असलेल्या अर्थव्यवस्थांमध्ये कमी विकसीत व्यवस्थांपेक्षा फंड परफॉर्मन्स तुलनेने चांगला आढळतो. निबंधातून (ठळक ठसा माझा):

We find no evidence that a country's level of economic development as measured by GDP per capita is positively linked to fund performance.

Country characteristics are able to explain mutual fund performance beyond fund characteristics. There is a positive relation between mutual fund performance and a country's level of financial development, especially stock market liquidity. Furthermore, domestic funds located in countries with stronger legal institutions, better investor protection, and more rigorous law enforcement tend to perform better.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मस्त खेळ आहे .. मज्जा आली Smile

माझा निकाल असा येतोय -
युपीए - १८५, २०८, २०४
एनडीए - २२२, १९५, २१०
इतर - १४७, १५१, १४०

अवांतर - प्रत्यक्ष निकालच्या जवळपास आलेल्या निष्कर्षांना काही बक्षिस वगैरे आहे का Wink

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

बाबा बर्वे
" समर्थाचिया सेवका वक्र पाहे
असा सर्व भूमंडळी कोण आहे ? "

अवांतर - प्रत्यक्ष निकालच्या जवळपास आलेल्या निष्कर्षांना काही बक्षिस वगैरे आहे का

हम्म विचार करायला हवा.
त्यावरून एक अतिअवांतर आठवलं. आयायटीत असताना मराठी मंडळातर्फे तंत्र नावाचं मराठी मासिक निघायचं. त्यात एके वर्षी शब्द कोडं होतं. आणि खाली लिहिलेलं होतं 'कोडं पूर्ण सोडवणारांनी ह़ॉस्टेल आठ रूम नंबर २१३ मधून बक्षीस घेऊन जावे.' लोकांनी जेव्हा आपली पूर्ण झालेली शब्दकोडी फडफडवत २१३ नंबरच्या खोलीवर टकटक केलं तेव्हा 'हे काय चाललंय' याचा काही थांग न लागलेला एक गडी बाहेर आला. त्याचं नाव आठवत नाही, पण आडनाव होतं बक्षी.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

५४३ खासदारांच्या लोकसभेत ५५४ आकड्याचे महत्त्व काय?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

कुठेतरी गल्लत झाली खरी. सध्या तरी हा खेळ असाच खेळू, आणि नंतर मी सर्व आकडे योग्य प्रकारे ऍडजस्ट करेन. चूक दाखवून दिल्याबद्दल धन्यवाद.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पक्ष पद्धत१ पद्धत२ पद्धत३
युपीए १९२ १९० २०२
एनडीए १८६ २०७ २१०
इतर १७६ १५७ १४२
आमी पद्धत १ साठी ऑक्सफर्ड डिक्सनरी वापरली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

आत्तापर्यंत आलेल्या निकालात ५ पैकी चार लोकांनी यूपीएला एनडीए पेक्षा जास्त जागा मिळण्याचं भाकीत काढलं आहे.

मॉडेल/मेथडॉलॉजीमध्ये काही चूक/बायस तर नाही ना?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

मॉडेल/मेथडॉलॉजीमध्ये काही चूक/बायस तर नाही ना?

पद्धत १ मध्ये बायस नाही. त्यात येणारा फॉर्म्युला काहीसा असा आहे.

पक्षाच्या जागा = १२५ + (० ते ५० [एकूण ३ पक्षांत मिळून ७५] हे अंदाज करणाराने ठरवलेले) + ३५ +/- (सुमारे ५ नशीबाने)

त्यातला १२५, ३५ हे आकडे काहीसे आर्बिट्ररी आहेत. तसंच ३ पक्षांत फक्त ७५ वाटून द्यायचे असल्यामुळे व्हेरिएबिलिटीही कमी आहे. मात्र कुठचा पक्ष वरचढ होईल हे अंदाज करणारी व्यक्तीच ठरवते. त्या अर्थाने पहिल्या पद्धतीत बायस नाही.

पद्धत २ मध्ये थोडा बायस आहे, कारण ही पद्धत फक्त गेल्या वेळच्या निकालांवर अवलंबून आहे. तो बायस कमी करण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण पुस्तकाच्या पानांमधून जास्तीत जास्त ८८ हा आकडा तयार होतो. त्यामुळे युपीएसाठी या मॉडेलमध्ये किमान १७८ जागा आहेत. मात्र मॉडेल वापरणारीला युपीएच्या जागा काढून कोणाला द्यायच्या याचं किंचित स्वातंत्र्य आहे.

पद्धत ३ मध्ये बराच बायस आहे. या पद्धतीतून येणारी उत्तरं फारशी बदलणार नाहीत. कदाचित १० ऐवजी २० जागा इकडेतिकडे करण्याची सोय असती तर मॉडेल वापरणारांच्या मताला अधिक वजन प्राप्त झालं असतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पद्धत २ व ३ मधील मुळातील आकड्यांमध्येच चुक असल्याने त्यावर आधारीत डोलारा चुकीच्या बेसवर उभा राहतो.

सध्याची एन्डीए व युपीए २००४/२००९पेक्षा बर्‍याच वेगळ्या आहेत. सध्या युपीएचे लोकसभेत केवळ २२६ तर एन्डीएचे १५६ खासदार आहेत.
पद्धत दोन व तीन वापरताना सध्याच्या युपीएशी संलग्न आकडे वापरावेत असे सुचवतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

पद्धत २ व ३ मधील मुळातील आकड्यांमध्येच चुक असल्याने त्यावर आधारीत डोलारा चुकीच्या बेसवर उभा राहतो.

पद्धत २ आणि ३ चा फायदा असा आहे की त्या अत्यंत सोप्या आहेत. किंबहुना हीच गणितं करून २००९ च्या निवडणुकांनंतर लगेच या मॉडेलप्रमाणे २०१४ चं अनुमान बांधता आलं असतं. या सोपेपणासाठी दोन्हीत यूपीए आणि एनडीए ही दोन सर्वसाधारण व्यासपीठं मानलेली आहेत. त्यांच्या जागा कमी-जास्त होण्याची कारणं अनेक असू शकतात. त्या कारणांचा विचार न करता निव्वळ पास्ट परफॉर्मन्सवरून फ्यूचर पर्फॉर्मन्सविषयी बांधलेले अंदाज कितपत बरोबर येतात हे तपासून बघायचं आहे. या सोपेपणासाठी इतर सर्व व्हेरिएबल दडपून टाकलेले आहेत.

उदाहरणार्थ - उद्याचं तापमान काय असेल? हे शोधायचं असेल तर आज, काल आणि परवा तापमान किती होतं याची सरासरी काढली तर त्यातून खूपच अचूक उत्तर मिळतं. त्यात सामान्य निरीक्षकाला आज चिह्नं काय आहेत यावरून किंचित बदल करण्याचं स्वातंत्र्य दिलं तर उत्तर कदाचित अधिक अचूक होईल (कदाचित नाहीही). अशा पद्धती स्टॉक्सच्या किमतींच्या चढ-उतरीसाठी टेक्निकल ऍनालिसिस म्हणून सर्रास वापरल्या जातात.

मग प्रश्न असा येतो की हवामानाचा अंदाज बांधण्यासाठी उपग्रह वगैरे पाठवून इतकी खार्चिक यंत्रणा का केली जाते? त्याचं उत्तर असं आहे की त्या यंत्रणेतून येणारे अंदाज हे या सरासरीपेक्षा अधिक चांगले येतात, आणि पुढच्या अनेक दिवसांचा अंदाज अधिक अचूकपणे बांधता येतो.

एनडीटीव्ही, इंडिया टुडे आणि नील्सन यांच्या पोलमध्ये २००४ साली 'NDA will bag 287-300 seats' असं भयानक चुकीचं उत्तर आलं होतं. गेल्या तीन वर्षांची सरासरी वापरली असती तरी त्यांचं उत्तर २३८ आलं असतं. आणि हे केवळ त्यांच्याच नाही, तर अनेक पोलांच्या बाबतीत झालेलं आहे. २००९ साली युपीए पुढे आहे, पण सुमारे ४० जागांनी असं उत्तर आलं होतं. २६२ - १५९ इतका प्रचंड फरक असेल असं कोणालाच सांगता आलं नव्हतं. जर इतकी क्लिष्ट, महाग यंत्रणा वापरून जर उत्तरं तीन वर्षांच्या सरासरीपेक्षा चांगली येत नसतील तर मग ही यंत्रणा का वापरावी?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

माझी सुचवणी पद्धत बदला अशी नसून या पद्धतीत जे बेस आकडे घेतले आहेत फक्त ते बदला अशी आहे.

तुमच्या या प्रयोगामागची भुमिका धाग्यातच पुरेशी स्पष्ट आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

आपली विचार करण्याची पद्धत नेहमीच वेगळी असते. (शास्त्रज्ञ आहात काय?)

आपण सुचवलेला खेळ खेळून पाहिला नाही पण सर्व खेळाडूंना शुभेच्छा.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

- ही बेरीज ५५४ च्या जवळ असेल. कमी जास्त असेल तर सर्वांच्या स्कोअर्समध्ये शक्य तितक्या समान प्रमाणात कमी जास्त करा

५५४ पैकी ४५० जागा तीन पक्षांना दिल्यानंतर १०४ जागा उरतात. मग मी आपण म्हणता तसे ८*३=२४ सम अंक काढले. त्यांची बेरीज शून्य आली. माझ्या संसदेत ४५० च जागा राहिल्या. (थकून) मी प्रयोग पून्हा केला. बेरीज १९२ आली. ८८ जागा जास्त. मी प्रत्येकी समान , म्हणजे २९, जागा कमी केल्या. युपीए चे सरकार एक मताने आले पण विरोधी पक्ष कोण म्हणून भांडण जुंपले.

पद्धत २. (वेळ साधारण २ मिनिटं)

माझे दोन आकडे ७ आणि ८ आले. त्याचा ७८ आकडा बनला. त्याचे सांगीतल्याप्रमाणे २६ आणि ५२ असे दोन तुकडे केले. युपीए चे विरोधी पक्ष पद सुनिश्चित झाले. पण एन डी ए ने सरकार बनवावे कि थर्ड फ्रंट ने असा घोळ सुरु झाला.

१. युपीए २१२, एनडीए २०३, इतर १३९. ही गेल्या तीन वर्षांची सरासरी. यातल्या कुठल्याही स्कोअरमधून १० वजा करून दुसऱ्या कुठल्याही स्कोअर्समध्ये कसेही विभागून मिळवा. बेरीज ५५४ कायम राहिली पाहिजे.

युपीए तून ९ वजा केले आणि सगळे तिसर्‍या आघाडीला दिले. पुन्हा सरकार कुणाचे हा प्रश्न राहिलाच.

शेवटी प्रश्न असा पडला कि नेटवर वेगवेगळ्या माणसांनी असे आकडे काढण्यात आणि एकाच माणसाने दहा-वीसदा असा प्रयोग करून उत्तर काढण्यात फरक तो काय आहे?

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

तुमच्या प्रयोगात सगळी उत्तरं नक्की काय आली हे कळलं नाही. तुम्ही खालच्या टेबलातल्या जागा भरून द्याल का?

पक्ष पद्धत१ पद्धत२ पद्धत३
युपीए ? 178 202
एनडीए ? ? 203
इतर ? ? 149

मी आपण म्हणता तसे ८*३=२४ सम अंक काढले. त्यांची बेरीज शून्य आली. हे कसं झालं ते मला कळलं नाही. २४ सम संख्यांची बेरीज शून्य होण्यासाठी तुम्हाला लागोपाठ चोवीस वेळा शून्य हाच आकडा आला पाहिजे. तसंच पुढच्या चोवीस वेळात बेरीज १९२ म्हणजे प्रत्येक वेळी तुम्हाला ८ आले. काहीतरी गडबड वाटते. तुमच्या शाळेत तुम्हाला बुक क्रिकेट शिकवलं नव्हतं बहुतेक. समजा युपीए बॅटिंग करायला आली आहे. आणि युपीएला आठ बॉल खेळायला मिळणार. आता प्रत्येक बॉलला किती रन्स होतील हे पुस्तकाच्या पानावरून ठरवायचं. त्या रन्स ०,२,४,६,८ पैकी काहीही असू शकतात. मग एनडीएला ८ बॉल खेळायला मिळणार. आणि त्यानंतर

शेवटी प्रश्न असा पडला कि नेटवर वेगवेगळ्या माणसांनी असे आकडे काढण्यात आणि एकाच माणसाने दहा-वीसदा असा प्रयोग करून उत्तर काढण्यात फरक तो काय आहे?

थत्तेंना दिलेलं उत्तर पहा. थोडक्यात - पहिल्या पद्धतीत प्रत्येकाच्या उत्तरात व्हेरिएबिलिटी अधिक आहे. दुसऱ्या पद्धतीत ती कमी आहे तर तिसऱ्या पद्धतीत ती फार नाही.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पक्ष पद्धत१ पद्धत२ पद्धत३
युपीए १८५ १८४ २०३
एनडीए १८४ १८५ २०३
इतर १८४ १८५ १४८

थत्तेंना दिलेलं उत्तर पहा. थोडक्यात - पहिल्या पद्धतीत प्रत्येकाच्या उत्तरात व्हेरिएबिलिटी अधिक आहे. दुसऱ्या पद्धतीत ती कमी आहे तर तिसऱ्या पद्धतीत ती फार नाही.

यात मौजमजा काय आहे ते कळले नाही. म्हणजे काँग्रसचे सरकार मला बनवायचे असेल तर पद्धत १ ते ३ पर्यंत आपण ते कसकसे अधिक अवघड केले आहे हे पाहायचे का?

बुक क्रिकेट मी आज पहिल्यांदाच विकिवर काय ते पाहिले. खूप छान गेम वाटतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

यात मौजमजा काय आहे ते कळले नाही. म्हणजे काँग्रसचे सरकार मला बनवायचे असेल तर पद्धत १ ते ३ पर्यंत आपण ते कसकसे अधिक अवघड केले आहे हे पाहायचे का?

या पद्धती अशा प्रकारे तयार केलेल्या आहेत की शेकडो लोकांनी उत्तरं काढली तर त्यांना मिळणारी उत्तरं पद्धत १ मध्ये अधिक वेगवेगळी असतील. म्हणजे त्या डिस्ट्रिब्यूशनचं स्टॅंडर्ड डीव्हिएशन अधिक असेल. याउलट पद्धत ३ ही कोणीही उत्तर काढलं तरी फार फरक पडणार नाही अशा रीतीने जाणूनबुजून तयार केलेली आहे. म्हणजे स्टॅंडर्ड डीव्हिएशन कमी असेल. दुसरी पद्धत या बाबतीत या दोनच्या मध्ये कुठेतरी आहे.

या व्हेरिएबिलिटीचा प्रत्यक्ष सरासरी उत्तराच्या अचूकतेशी तितकासा संबंध नाही. मी एक थोडं वेगळं उदाहरण देतो. एखाद्या माणसाचं वजन किती आहे हे शोधून काढायचं असेल तर आपण शंभर लोकांना दोन पद्धती देऊ शकतो.
पद्धत १. नजरेने अंदाज बांधून वजन ठरवा. यात बहुतेक जण आपल्यापेक्षा हा माणूस मोठा दिसतो आहे का, आणि असल्यास आपल्या वजनापेक्षा कितीने अधिक असेल याचा अंदाज बांधतील.
पद्धत २. मी दिलेल्या वजनाच्या काट्यावर उभा करून किती वजन येतं ते मोजा. हा काटा कदाचित चुकीचा असेल, तेव्हा त्यात दोन किलोपर्यंत वजन वाढवा किंवा कमी करा.

पद्धत क्रमांक २ मध्ये +/- २ किलोपेक्षा व्हेरिएबिलिटी असणं शक्य नाही, कारण त्या काट्यावर वजन दरवेळी तेच येतं (असं या उदाहरणापुरतं गृहित धरू). याउलट पद्धत १ मध्ये प्रत्येकाचा अंदाज खूपच वेगवेगळा असू शकेल. याचा अर्थ असा होत नाही की पद्धत २ मधून येणारं उत्तर अधिक बरोबर असेल. मुळात तो काटा दहा किलोने चुकला असेल तर सगळ्यांची सरासरी किमान आठ किलोने तरी चुकणारच. याउलट पहिल्या पद्धतीत सरासरी अधिक बरोबर येऊ शकेल. दुसरी पद्धत अधिक रिप्रोड्युसिबल आहे. ऍक्युरसी आणि प्रिसिजन या संकल्पना इथे उपयुक्त आहेत. डावीकडच्या चित्रानुसार रिप्रोड्युसिबल उत्तरं देणारी पद्धत ही १ किंवा ३ पैकी काहीही असू शकेल. व्हेरिएबिलिटी अधिक असलेली पद्धत २ किंवा ४ पैकी काही असू शकेल. बहुतेक वेळा तुम्ही अधिक महागाचं, अधिक सोफिस्टिकेटेड उपकरण (किंवा पद्धत) वापरलं तर तुम्हाला अधिक प्रिसाइज आणि ऍक्युरेट उत्तरं मिळायला हवीत. ती मिळत नसतील तर ते उपकरण (किंवा पद्धत) इतका अतिरिक्त खर्च करण्याच्या लायकीचं नाही

माझ्या या मौजमजेचा गंभीर भाग असा आहे - आत्तापर्यंत अत्यंत महागड्या पद्धती वापरून अनेक वृत्तसंस्थांनी जी भाकितं केली होती (विशेषतः २००४ आणि २००९ मध्ये) ती क्रमांक ४ किंवा क्रमांक ३ प्रमाणे दिसली आहेत. जर त्यापेक्षा स्वस्त पद्धतींनी तुम्हाला क्रमांक १, २ किंवा ३ सदृश उत्तरं मिळत असतील तर मग या वृत्तसंस्थांच्या पोल्सना का महत्त्व द्यायचं? विशेषतः पद्धत ३ (गेल्या तीन वेळची सरासरी) किंवा पद्धत ४ (गेल्या वेळी मिळाल्या तितक्याच जागा) या पद्धती वापरून जर येणारी उत्तरं अधिक बरोबर येत असतील तर ही भाकितं म्हणजे एखाद्या कुडमुड्या ज्योतिषाने सांगितलेल्या भविष्याप्रमाणेच ठरतील.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सध्या पोल आणि सर्व्हेज यांची मांदियाळी चालू झाली आहे. मला वाटत जर एखाद्या वाहिनीने आपल्या निवडणुक विश्लेषणाबरोबर राजेशचा हा प्रयोग समांतर म्हणून अथवा मौज मजा म्हणुन घेतला तर तो मनोरंजक तर होईच पण वाहिनीचा टीआरपी देखील वाढेल. आयबीएन लोकमत ला सांगितल पाहिजे.
सध्या अंनिस ने ज्योतिषांना निवडणूकीचे अचूक भाकीत वर्तवा असे २१ लाख रुपयांचे जाहीर आव्हान दिले आहे. त्यासाठी २५ गुणांची प्रश्नावली आहे.
http://antisuperstition.org/docs/jyotish_entry_form_marathi.pdf
ज्योतिषी नंदकिशोर जकातदार यांनी मोदी पंतप्रधान होणार नाहीत असे भाकीत वर्तवले आहे. http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune/narendra-modi/ar...

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

अशी आव्हाने देण्या इतके तरी फलज्योतिष महत्त्वाचे का मानावे....असो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

जनसामान्यांवर फलज्योतिषाचा फार मोठा प्रभाव आहे. ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. इथे जनसामान्य हा शब्द मी लोकसंख्येचा एक मोठा गट या अर्थाने घेत आहे.सामान्यजन या अर्थाने मी तो घेत नाही. आव्हानामुळे लोकांचे लक्ष वेधले जाते व ती एक प्रबोधनाची संधी असते. निवडणूकीच्या काळात अनिश्चितता हा एक घटक राष्ट्राचे भवितव्य ठरवण्यात महत्वाचा मुद्दा ठरतो. त्यामुळे लोकांमधे ज्योतिषांनी वर्तवलेल्या भाकितांबाबत एक उत्सुकता असते. अशा वेळी आव्हानाची बाजू जर त्यांच्यापर्यंत पोचली तर ते किमान विचार तर करायला लागतात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

प्रकाश घाटपांडे
http://faljyotishachikitsa.blogspot.in/

विचार करायला लागतात आणि जन्मभर करीतच राहतात.
शिवाय फायनल निष्कर्षाला पोचले नसल्याने ऊठसूट सत्यनारायण घालित राहतात.
तुम्हा लोकांच्या चिकाटीचे त्यामुळेच कौतुक वाटते.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars

आत्तापर्यंत आलेल्या (मी धरून) एकंदरीत पाच जणांच्या उत्तरांवर आधारित निकाल जाहीर करतो.

सर्वांची सरासरी
पक्ष पद्धत१ पद्धत२ पद्धत३ सरासरी
युपीए 192 192.4 208.6 197.66
एनडीए 187 190.6 201.8 193.13
इतर 164 160 132.6 152.2

एक दिसून येतं की पहिल्या दोन पद्धतींनी अतिशय जवळची उत्तरं आलेली आहेत. त्या मानानाने तिसऱ्या पद्धतीत युपीए आणि एनडीए यांना जागा अधिक मिळालेल्या आहेत. तीनही पद्धतीत युपीए व एनडीए यांना जवळपास समान जागा मिळतील असा अंदाज आहे. युपीएला किंचित जास्त.

स्टॅंडर्ड डीव्हिएशन
पक्ष पद्धत१ पद्धत२ पद्धत३ सरासरी
युपीए 12.2 10.7 8.4 10.47
एनडीए 18.0 10.6 8.5 12.4
इतर 14.6 16.1 4.61 11.79

आधी म्हटल्याप्रमाणे पद्धत १ साठी सर्वाधिक स्टॅंडर्ड डीव्हिएशन, पद्धत २ साठी त्याहून कमी आणि पद्धत ३ साठी सर्वात कमी स्टॅंडर्ड डीव्हिएशन आहे.

मी आत्तापर्यत पाहिलेल्या ८ पोल्समध्ये चित्र खालीलप्रमाणे आहे

पोल1 पोल2 पोल3 पोल4 पोल5 पोल6 पोल7 पोल8 सरासरी
युपीए 128 155 136 184 153 134 136 117 143
एन्डीए 184 220 206 197 176 156 154 186 185
इतर 231 168 201 162 214 253 253 240 215

आपल्या पद्धतींची सरासरी १९८, १९३, १५२
आठही पोल्सची सरासरी १४३, १८५, २१५

ऋषिकेशने म्हटल्याप्रमाणे 'यूपीए' या गटातच बदल झाल्यामुळे काही जागा यूपीएमधून इतर मध्ये गेल्या असाव्यात.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ऐसी अक्षरे रे पार अजो का राज
अक्की बार मोदी सरकार

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

The frequency of Rejection is measured in Hurtz.

आपले मत आपल्या पार्श्वभागात (गांडीत) घालावे स्पेशली जर व्याकरण विषयी असेल तर!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

Alice: Would you tell me, please, which way I ought to go from here?
The Cheshire Cat: That depends a good deal on where you want to get to.
Alice: I don't much care where.
The Cheshire Cat: Then it doesn't much matter which way you go.
Alice: ...So long as I get somewhere.
The Cheshire Cat: Oh, you're sure to do that, if only you walk long enough.”

वरच्या व्हीडियोत दिलेल्या उदाहरणातच त्यातून निघणाऱ्या गोंधळाचं चित्र दडलेलं आहे. तीन मतदार, तीऩ पर्याय... आणि प्रत्येकासाठी वेगवेगळी क्रमवारी. याचाच अर्थ या तिघांमध्ये कुठच्याच निर्णयप्रक्रियेतून काही निष्कर्ष निघणं शक्य नाही. मग असं उदाहरण एका निर्णयप्रक्रियेत घालून 'पहा, काही निष्कर्ष निघत नाही' हे म्हणणं व्हॅक्युअस ट्रुथ या जातकुळीत मोडतं.

किंबहुना तीनही पर्याय विजयी ठरू शकतात यातूनच 'कोणालाच बहुमत नाही' हे सिद्ध होतं. मग त्यातून निर्णयप्रक्रिया बरोबरच असल्याचं सिद्ध होतं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अजून एक म्हणजे इथे दरवेळी दोन पर्यायातच बहुमत आजमावलेले आहे. भारतात हे लागु पडु नये. इथे सगळे ऑप्शन्स मतदानाला असताता, आता तर NOTAही असणार आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

अजुन एक म्हंजे हिरॉइन सुद्धा काही खास नाहिये. एकांदी माधुरी, शिरिदेवी, .... निदान दिपिका ... असती तर बरं झालं अस्तं. नैका ???

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

J) नोटाच्या जागी दीपिका हे बटन टाकले तर जास्त मजा. कदाचित दीपिका प्रधान मंत्री ही होईल. Sad Sad

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0