Skip to main content

"रोल्स रॉयस

ज्या प्रमाणे एखादी लोकप्रिय व्यक्ती "लिजंड" बनते व तिच्या भोवती आख्यायिका चे वलय उभे राहते
तिच गोष्ट "रोल्स रॉयस" कार संबंधी आहे..अतिशय उच्च दर्ज्याचे तंत्रज्ञान वापरुन अमीर लोका साठी ह्या विलासी गाड्या बनवल्या जातात..
७२-७३ च्या सुमारास मी इंग्लडला थॉमस मर्सर कंपनीत एयर गेजेस चे तंत्रज्ञान शिकण्या साठी गेलो होतो.
ज्या परिवारात माझी राहण्याची सोय केली होती त्या मालकीनं बाईंचे (कै) यजमान ह्या कंपनीत काम करत असत.
गप्पा मारताना त्या म्हणाल्या ..प्रत्येक ब्रिटिश माणसाच्या २ सुप्त इच्छा / स्वप्न असतात १..दारासमोर रोल्स उभी असावी.२राणीचा महाल आतुन बघावा..
"रोल्स रॉयस" अशीच एक "लिजंड" कार आहे..

* एक माणसाने एकदा जुनी रोल्स विकत घेतली अन प्रवासात त्याची गाडी हाय वे वर बंद पडली.. त्याने लोकल डीलर ला फोन करून ते सांगितले काही वेळातच त्यांचा मेकॅनिक आला व त्याने आपली गाडी वापरायला दिली जेणे करुन त्या व्यक्तिचा खोळंबा होऊ नये व त्याने त्या बंद पडलेल्या रोल्स चा ताबा घेतला.
काही दिवसानंतर त्या व्यक्तीस रोल्स रिपेअर करून तिची डिलिव्हरी दिली..आठवड्या नंतर त्याच्या लक्षात आले की रिपेअरिंग चे बिल त्याला मिळाले नाही.व त्याने विचारले की आपण माझी रोल्स रिपेअर केली पण बिल पाठवले नाही..
त्या वर तो मॅनेजर हसून फोन वर म्हणाला “Sir, you must be mistaken,” “Everyone knows that Rolls Royce cars simply don’t break down.”

* रोल्स बद्दलचा एक किस्सा आहे की रोल्स च्या बॉनेट वर ५० पेन्स चे नाणे उभे ठेवले जाते व गाडी चालू झाली तरी नाणे पडत नाही..कारण शून्य व्हायब्रेशन असलेली ति कार आहे

* माझा एक कार्स मधे रस असलेला अभ्यासक मित्र आहे त्याने सांगितले की रोल्स चे असे एक मॉडेल बाजारात आहे ज्याचे हुड/बॉनेट बंद आहे..बाजूला २ जागा केल्या आहेत ज्यातुन कुलंट व एकातून ऑइल भरता यावे या साठी..कारच्या इंजिन ला लाईफ टाइम गॅरंटी आहे..व इंजिन उघडायचा प्रश्नच येत नाही....

* परवाच असे वाचनात आले की रोल्स आता खास भारत व भारतीय लोकासाठी एक मॉडेल आणत आहे..

कुठलेही असे "इंजिनीअरिंग मार्व्हेल्स" उच्च तंत्रज्ञान कुशल व तन मन ओतून काम करणारे कामगारा च्या टीम शिवाय शक्य नसते.

शहराजाद Thu, 19/09/2013 - 20:36

पतियाला संस्थानिक भूपिन्दर सिंह च्या विलासीपणाच्या अनेक कथा सांगितल्या जात. त्यांपैकी एक अशी- एकदा रो. रॉ. कंपनीने नव्या गाडीची ऑर्डर घ्यायला नकार दिला. ह्या अपमानाने खवळून राजेसाहेबांनी आपल्याकडच्या जुन्या रोल्सपैकी दोन गाड्या शहराचा कचरा वाहण्याच्या कामी लावल्या. रोल्स रॉयस कंपनीने तातडीने तिथल्या इंग्रज उच्चाधिकार्‍याला मधे घालून हा प्रकार थांबवला आणि नव्या गाडीची मागणी नोंदवून घेतली.
इतरही काही संस्थानिकांबद्द्ल अशा आख्यायिका आहेत.

दुर्गाबाई खोट्यां वडील अ‍ॅड. लाड ह्यांच्याकडे रोल्स होती आणि त्या तिच्यात बसून, त्या काळात अप्रूप असलेले उंच टाचांचे बूट घालून महाविद्यालयात जात असत.

मन Thu, 17/10/2013 - 12:37

ह्या निमित्ताने बजाजच्या काही आख्क्यायिका आठवल्या.(त्याच त्या बजाज चे रॉकेट बनवले तरी उडण्यापूर्वी ते.....)
.
असो. ह्या निमित्तानं सध्या भारतात अधिक वापरात दिसणार्‍या गाड्यांची चर्चा झाली तर बरं होइल.

पूर्ण विजार Thu, 17/10/2013 - 17:17

In reply to by मन

रोल्सरॉईसचं अप्रूप सर्वांना. पण रोल्सरॉईसच्या मालकाला कुठली गाडी वापराविशी वाटत असेल ?
टाटा नॅनो म्हणू नका प्लीज

बॅटमॅन Thu, 17/10/2013 - 17:46

In reply to by 'न'वी बाजू

किंवा गेलाबाजार अँबॅसिडर वगैरे.

उर्वरित भारतातून जवळजवळ हद्दपार झालेली ही गाडी वङ्गदेशी अजून तग धरून आहे. कलकत्ता शहरीच्या रस्त्यांना झेलण्यास तीच एक समर्थ आहे असे कळते.

'न'वी बाजू Thu, 17/10/2013 - 20:21

In reply to by बॅटमॅन

(पीएमपीएमएलमागे 'तक्रं शक्रस्य दुर्लभम्'चा न्याय वापरला. अँबॅसिडर त्या मानाने उच्चभ्रू - किंवा, लेफ्टिष्ट परिभाषेत बोलायचे तर, बूर्ज्वा वगैरे - वाटते.)

====================================================================

चूभूद्याघ्या.

बॅटमॅन Fri, 18/10/2013 - 01:25

In reply to by 'न'वी बाजू

डुक्कर ऐवजी पम्पमल वापरले तर पम्पमल वापरणार्‍या ऑप्रेसिव्ह सेण्ट्रल व्यवस्थेत सहभागी व्हावे लागेल. त्यापेक्षा डुक्कर वापरून डीसेण्ट्रलाईझ्ड झाले तर अत्याचारी व्यवस्थेची गरज नक्कीच अजून कमी होईल.