Skip to main content

शिवशाही ते लोकशाही

शिवशाहीतील आजच्या तरूण पिढीतील प्रेरणादायक ठरेल व आजच्या लोकशाहीतील राजकिय पुढार्यांच्या डोळ्यात अंजन घालू शकेल अशी एक कथा आहे.ती आपल्या समोर येणे गरजेचे आहे.शिवशाही कडून लोकशाही कडे येताना मध्ये मानवतेला कलंक असणारी पेशवाई पण आली होती.पण ती दुर्लक्षित करून आपण फ़क्त शिवशाही ते लोकशाही पाहुया.
शिवाजी महाराज जेंव्हा कर्ज मागण्यासाठी एका सावकाराकडे गेले होते.तेंव्हा सावकाराने तारणाची मागणी केली.शिवाजी महाराज तेंव्हा सावकाराला म्हणाले अरे तारण ठेवण्यासारखे माझ्याकडे आहे काय ? उभे स्वराज्य तर रयतेच्या मालकीचे आहे.तरीही सावकाराने आपला तगादा सोडला नाही.तेंव्हा महाराजांनी तिथेच पडलेली एक गवताची काडी उचलून सावकाराकडे देत तीच तारण ठेवण्याची विनंती केली.महाराजांची ती त्यागमय व्रुत्ती व द्रुढनिश्चयपणा पाहुन सावकारही नरमला व महाराजांना दोन लाख होनांचे कर्ज त्याने दिले.मोहिम फ़त्ते झाल्यानंतर महाराज कर्जाची व व्याजाची रक्कम घेऊन सावकाराकडे गेले व आपल्या तारण ठेवलेल्या गवताच्या काडीची मागणी केली.शेजारी उभा असलेला कोंडाजी महाराजांना म्हणाला महाराज, अहो साधी गवताची काडी ती! माघारी घेतली काय अन न घेतली काय ? त्यावर हा जाणता राजा कडाडला "माझ्या स्वराज्यातील साधी गवताची काडी देखील कोणाकडे गहान पडता कामा नये, तेच खरे माझे स्वराज्य !" मला माझ्या या क्रुतीतून तेच दाखवून द्यायचे आहे.याच शिवरायांनी जिथं जिथं सैन्याच्या छावण्या पडतील तिथे आपल्या सैन्याला सक्त ताकिद दिली होती की शेतकर्याच्या भाजीच्या देठालाही हात लावायचा नाही.
कुठे ते शिवराय आणि कुठे हे आजचे राजकीय नेते.कुठे ती शिवशाही आणि कुठे ही लोकशाही.शिवाजी महाराजांसारखा राजा आपल्या राज्यातील गवताच्या काडीचीही काळजी घेत होता आणि आजचे आमचे भ्रष्टाचाराने बरबटलेले राजकीय नेते करतायत काय ? आजचे नेते संपुर्ण राज्यच गहान ठेवून आपल्यास मस्तीत आणि ऐषोआरामात मशगुल आहेत.का आज आमच्यावर अशी वेळ आली ? अशी दयणीय परिस्थिती का उद्भवली ? आत्मपरिक्षण होणे गरजेचे आहे.ज्या वैभवशाली शिवशाहीचे इतिहास दाखले देतो ती शिवशाही पुन्हा येवू शकत नाही का ?निश्चितपणे येऊ शकते पण त्यासाठी सर्वात प्रथम विषमतेच्या व असमानतेच्या पायावर उभारलेल्या व्यवस्थेचे समुळ उच्चाटन करणे गरजेचे आहे.
शिवाजी महाराजांच्या काळात मावळ्य़ांची चिरेबंद फ़ौज तयार झालेली होती.मावळ्यांमध्ये शिवाजी महाराजांवर स्वत:चा जीव ओवाळून टाकण्याची जणू स्पर्धाच लागलेली होती.मग आजच्याच काळात का कोणी असा एखादा राजकीय नेता पैदा होत नाही का की,ज्यावरून एखादा कार्यकर्त्याने जीव ओवाळून टाकण्याची तयारी ठेवावी.याला कारण आजची सडलेली व किडलेली व्यवस्था आहे.शिवरायांच्या काळातील मावळे हे निर्मळ व स्वच्छ मनाचे होते.
महाराज आपल्यासाठी मरायलाही तयार आहेत मग आपणही राजांसाठी मेले पाहिजे हि निष्पाप व त्यागमय भावना मावळ्यांमध्ये रुजलेली होती.आज जगावे कसे हे शिकवण्यासाठी गीता वाचा आणि मरावे कसे हे शिकवण्यासाठी भागवत वाचा असे निरर्थक सल्ले तथाकथित काही महाराज देत असतात.अरे हट ,जगावं कसं हे आमच्या शिवरायांनी शिकवले आणि मरावं कसं हे संभाजी राजेंनी दाखवले.असे गीता आणि भागवत जर वाचुन जगण्या-मरण्याचे तत्वज्ञान उमगलं असतं तर बघायलाच नको!
माझ्या राज्यातला शेतकरी जगला पाहिजे,सर्वसामान्यातल्या,सर्वसामान्याच्या चेहर्यावर सुद्धा सदैव हसू झळकले पाहिजे असा घोर सदैव महाराजांच्या जीवाला लागलेला असायचा.महाराजांनी शेतकर्यांना आत्महत्या करायला सांगितलं नव्हतं.पण ती ही वेळ या व्यवस्थेने शेतकर्यांवर आणली,शेतकरी जगला तरच राष्ट्र जगणार आहे मग ही व्यवस्था शेतकर्यांसाठी काय करते ?शेतकर्यांच्या आत्महत्या,भुकबळी,लुटमार,महिलांवर होणारे शारीरिक अत्याचार,धार्मिक आतंकवाद,देवळांपासून गोळा केली जाणारी अवैध मालमत्ता,कर्मकांड,बोगस सनवार,उत्सवांमध्ये देशाची होणारी वित्तहानी,हिंदू - मुस्लिम दंगली,भ्रष्टाचार ही सर्व याच व्यवस्थेची देण आहे.
आज माधुरी दिक्षीत नावाची नायिका काय म्हणे तर आपल्या मुलांना घेऊन पुन्हा भारतात परतनार आहे तोपर्यंत यांची मिडीया आनंदोत्सव साजरा करत आहे.आदिवासी भागात गेला तर तेथील आदिवासी महिलांना स्वत:चे शरीर झाकण्यासाठीही चिंध्याचापड्या शोधाव्या लागतात.याविषयी कोणी विचार करणार नाही.
आज लोकशाहीला ब्राह्मणशाही नावाची किड लागत आहे हेही नमुद करावे लागेल.बहुजनांच्या गुलामीचे स्वरूप अधिक बळकट करण्यासाठी आणि स्वत:च्या जातीचे अस्तित्व धोक्यात असल्यामुळे संघटित होऊन बहुजनांच्या विरोधात मोठी षडयंत्रकारी अशी राष्ट्रव्यापी योजना आखण्यासाठी सध्या ब्राह्मणवर्ग कार्यरत आहे.कर्मकांड प्रसार आज मोठ्या प्रमाणात सुरु आहे.अजुन हे किती दिवस सहन करायचे ? अजुन किती दिवस देशातल्या बहुजनांना पिळणार आहात.लवकरच तुमचे कर्मकांडाचे वास्तुपुराण गुंडाळून युरेशियाकडे फ़टके मारून फ़ाटक्या धोतरानिशी पळून लावण्याची वेळ आम्ही तुमच्यावर आणणार आहे हे लक्षात घ्या!
आज समाजामध्ये ब्राह्मणांनी वेगवेगळ्या देवी-देवतांचे व सण उत्सवांचे मार्केटीकरण करून टाकलेले आहे.आज कुठल्याही देवी-देवतेचा सण उत्सव असो ब्राह्मणांनी तिथे घुसखोरी केलेली आहेच.या मार्केटीकरणामुळे १ -२ रुपये कमवणारा बहुजन वर्ग आहे तर पण लाखॊ करोडोची उलाढाल करून गब्बर होणारा ब्राह्मण वर्ग आहे.दिवाळीला दिवाळ काढणारी दिवाळी असे म्हणतात ते काय उगीच नाही.महागाईने सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडलेले आहे.तरीही बहुजन समाज सण-उत्सवामध्ये दंग आहे.आज विचारधारेपेक्षा पैशाला आधिक महत्व आलेले आहे.पण पैसा क्षणभंगुर आहे आणि विचारधारा विरंतर टिकणारी असते.याच आपल्या विचारधारेविरोधात ब्राह्मणी व्यवस्था मोठ्या जोमाने कामास लागलेली आहे.त्यासाठीच शत्रुंची कारस्थाने ओळखून ती उलथवून टाकण्यासाठी बहुजन समाजाने जागरूक राहणे हे आजच्या काळाची गरज आहे.
जय महाराष्ट्र

राजेश घासकडवी Tue, 10/09/2013 - 23:09

महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांची परिस्थिती सतराव्या शतकात आजच्यापेक्षा चांगली होती यावर विश्वास बसत नाही. उदाहरणच द्यायचं झालं तर १६२९ साली आलेल्या दुष्काळात गुजरातेत ३० लाख आणि महाराष्ट्रात १० लाख लोक मेले. गावंच्या गावं उध्वस्त झाली. त्यानंतर १६५५, १६८२ सालीदेखील दुष्काळ आले, आणि त्यांतही लाखो शेतकरी व सामान्य लोक मेले. १७०२-१७०४ साली झालेल्या दुष्काळात २० लाख लोक मेले. त्यावेळी महाराष्ट्राची लोकसंख्या सुमारे १ कोटी होती हे लक्षात घ्या, म्हणजे किती प्रचंड हानि झाली त्याचा अंदाज येईल.

शिवाजीमहाराज थोर होते यात शंकाच नाही. मात्र सामान्य माणसासाठी त्या काळापेक्षा आजचा काळ शतपटीने चांगला आहे हे लक्षात असू द्यावं. आज राज्याची लोकसंख्या दोन वर्षांत १० टक्क्यांनी घटत नाही.

बॅटमॅन Wed, 11/09/2013 - 00:22

ब्रिगेडी शुद्धलेखनचिकित्सकातून काही शब्द शुद्ध करून घेतले पाहिजेत.

बाकी बामणी काव्याबद्दल लिहावे तितके थोडेच.

जय बीग्रेड.

आमाला खौचट शिरेनि देनारे समदे बामन तरी हैत नै तं भटी काव्यानं पछाडल्यालं तरी हैत.

(खर्रा भौजणवादी) ब्याटम्याण.

जयदीप चिपलकट्टी Wed, 11/09/2013 - 01:19

In reply to by बॅटमॅन

> बाकी बामणी काव्याबद्दल लिहावे तितके थोडेच.

हा नेहमीचा प्रॉब्लेम होतो बघा. तुम्ही ज्ञानेश्वर, मोरोपंत वगैरे थोर बामण कवींच्या रचनांबद्दल लिहिणार असं आम्हाला वाटलं, पण लगेच दुसऱ्या सेकंदाला आमची चूक आमच्या लक्षात आली.

मराठी शुद्धलेखनात हे दोन शब्द वेगळे दाखवायची सोय नसेल, पण वेगवेगळे रंग वापरायला काय हरकत आहे? म्हणजे असं पाहा:

बहुजनसमाजाची मुस्कटदाबी करू पाहणाऱ्या बामणी काव्याचा निषेध असो.

शार्दूलविक्रीडिताचे देव्हारे माजवणाऱ्या बामणी काव्याचा निषेध असो.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 11/09/2013 - 01:33

In reply to by जयदीप चिपलकट्टी

तुमचे हे रंग आवडले नाहीत. हे कसे वाटतात?

बहुजनसमाजाची मुस्कटदाबी करू पाहणाऱ्या बामणी काव्याचा निषेध असो. (या रंगाचा संदर्भ)

शार्दूलविक्रीडिताचे देव्हारे माजवणाऱ्या बामणी काव्याचा निषेध असो.

अरविंद कोल्हटकर Wed, 11/09/2013 - 02:23

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

हे असले Wired, Atlantic Monthly सारख्या नियतकालिकांतील संदर्भ देऊ नयेत अशी कळकळीची विनंति. बहुजन समाजाला ते उपलब्ध नाहीत.

'न'वी बाजू Wed, 11/09/2013 - 02:27

In reply to by अरविंद कोल्हटकर

बहुजन समाजाला ते उपलब्ध नाहीत.

उपलब्ध नाहीत? की डोक्यावरून जातात?

- (प्रस्तुत संदर्भ उपलब्ध असलेला परंतु डोक्यावरून गेलेला) 'न'वी बाजू.

बॅटमॅन Wed, 11/09/2013 - 01:37

In reply to by जयदीप चिपलकट्टी

रङ्गीत सोल्यूशनबद्दल आभारी आहे. पण त्या वाक्यातच कावा दडलेला असून त्यातच त्याचे काव्य सामावलेले आहे. ;)

बाकी,

बहुजनसमाजाची मुस्कटदाबी करू पाहणाऱ्या बामणी काव्याचा निषेध असो.
शार्दूलविक्रीडिताचे देव्हारे माजवणाऱ्या बामणी काव्याचा निषेध असो.

यात दोन्ही उच्चार दोन्हीकडे फिट्ट बसतात हे आत्ताच लक्षात आले.

तदुपरि वरील दोन वाक्यांत ण-न ची अदलाबदल केल्या जावी असे आतिशै णम्रपने सुचिवतो.

चित्रगुप्त Thu, 12/09/2013 - 01:56

In reply to by बॅटमॅन

काव्याचा निषेध ??????? आम्हाला तर काव्यामधे निषेध करण्यासारखे काही दिसत नाही बुवा.
बघा की या काव्या:


काव्या माधवन आणि काव्या शिंग
संपादकः width="" व height="" टाळावे

बॅटमॅन Thu, 12/09/2013 - 02:56

In reply to by चित्रगुप्त

हायला चित्रगुप्तजी.

"ही आमची काव्या. आमचा हिच्यावर फार जीव." यापलीकडे वाक्य सुचेना बघा हे बघून ;)

(काव्याप्रेमी) बॅटमॅन.

बॅटमॅन Fri, 13/09/2013 - 14:13

In reply to by बॅटमॅन

या प्रतिसादाला माहितीपूर्ण श्रेणी नक्की कुणी व का दिली? याबद्दल माहिती मिळाल्यास मी त्या त्या आयडीचा आजन्म उपकृत होईन.

(छप्पन्न गटण्यांची उत्सुकता बाळगणारा) बॅटमॅन.

मी Fri, 13/09/2013 - 14:32

In reply to by बॅटमॅन

आता झालचं आहे अवांतर तर फार जर-तर न करता -

एक काव्य पाडून टाका तिच्यावर संस्कृतात, मग बघा काव-काव..आपलं कुहू-कुहू ऐकू येईल.

काळा मठ्ठ बैल … Fri, 13/09/2013 - 14:44

In reply to by बॅटमॅन

या काव्याला बळी पडायला उत्सुक आहोत

जगावं कसं हे आमच्या शिवरायांनी शिकवले आणि मरावं कसं हे संभाजी राजेंनी दाखवले.
तुम्ही संभाजी राजेंचा कित्ता गिरवताय का?

फारएण्ड Wed, 11/09/2013 - 00:17

माधुरी दिक्षित भारतात परतून सुमारे दहा वर्षे झाली, मध्यंतरी तिचे चित्रपट येउन पडूनही गेले, पुलं या २००४ च्या व्याख्येप्रमाणे(***) कावेबाज बामणाच्या एका पुस्तकातील उल्लेखाप्रमाणे "तिने सोनी वर जमवलेली लग्ने पार पडून त्यांस मुले देखील झाली असतील". एवढे होऊनही बामण लोक अजून "ती अमेरिकेहून परतणार" आहे असेच म्हणत असतील तर तोही केवढा बामणी कावा आहे!

(***) पुलं हा बामण नाही हे नंतर सिद्ध झाले. तो कावेबाज नाही हे सिद्ध झाले की मग आदरार्थी उल्लेख करायचे बघू.

३_१४ विक्षिप्त अदिती Wed, 11/09/2013 - 00:58

त्यासाठीच शत्रुंची कारस्थाने ओळखून ती उलथवून टाकण्यासाठी बहुजन समाजाने जागरूक राहणे हे आजच्या काळाची गरज आहे.

+१

बाबा बर्वे Wed, 11/09/2013 - 11:25

" शिवशाही कडून लोकशाही कडे येताना मध्ये मानवतेला कलंक असणारी पेशवाई पण आली होती. "
- स्वराज्यावर चालून आलेल्या अफझलखानाला साथ देणारे भोसले कुळीचे वशंज, मोहिते आणि मोरे, संभाजी राजांना पकडून देणारे शिर्के .. यापेक्षा मोठा कलंक असणारी पेशवाई विचारात न घेतलेलीच बरी ..

" शिवाजी महाराज जेंव्हा कर्ज मागण्यासाठी एका सावकाराकडे गेले होते.तेंव्हा ... "
- स्वराज्य संस्थापनेमागे शहाजीराजांची प्रेरणा होती हे तर सर्वज्ञात आहे .. शहाजीराजांसारखा समर्थ पिता मागे उभा असताना छ्त्रपतींना एका यःकश्चित सावकाराकडे दोन लाख होनांचे कर्ज मागावे लागले ??? त्यामुळे अशा भाकडकथांवर विश्वास ठेवून शिवाजीराजे आणि शहाजीराजे दोघांच्याही कार्याला छोटे आणि खुजे करायला आमचा काही धीर होत नाही बुवा ..

" आज समाजामध्ये ब्राह्मणांनी वेगवेगळ्या देवी-देवतांचे व सण उत्सवांचे मार्केटीकरण करून टाकलेले आहे."
- सध्याच्या सर्वात जास्त मार्केटीकरण झालेल्यापैकी दहीहंडी उत्सवात दिसणारी आव्हाड, सरनाइक इ. बामणी घुसखोरी ताबडतोब बंद व्हायलाच हवी. बहुजन समाजाला सण-उत्सवामध्ये दंग करून गब्बर होणारा ब्राह्मण वर्ग कुठे सापडेल तेवढे सांगा फक्त .. महागाईने सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडलेले असताना, शेतकर्यांना आत्महत्या करायची वेळ आलेली असताना क्रुषीमंत्री म्हणून वावरणारा "पवार" नामक ब्राह्मण आणि धरणात स्वतःच्या पाण्याची भर घालणारा त्यांचा पुतण्या यांच्या बाबतीत तर ब्रा।मण बहुजन जागा करण्याची हीच वेळ आहे ..

वरील दोन तीन मुद्द्यांवर जरा जास्त विचार करा ... बाकी बहुजन जागराचे काम करणारा लेख फक्कड जमलाय .. याकामी आमचीही काही बामणी मदत होउ शकेल तर बघा ..
अधिक काय लिहावे ...???

मैत्र Wed, 11/09/2013 - 22:49

कुठल्याच मुद्द्यांचा एकमेकांशी संबंध नाही..
आणि असेच अंदाजपंचे तारे तोडलेला लेख..
सुशिक्षित, आधुनिक शि़क्षण घेतलेल्या व्यक्ती असलं काही तरी लिहितात हेच धक्कादायक आहे. इतिहासाकडे बघण्याचे आपापले चष्मे म्हणून तेही नजरेआड केले तरी
वैयक्तिक मतस्वातंत्र्याच्या नावाखाली ऐसी वर --

बहुजनांच्या विरोधात मोठी षडयंत्रकारी अशी राष्ट्रव्यापी योजना आखण्यासाठी सध्या ब्राह्मणवर्ग कार्यरत आहे

लवकरच तुमचे कर्मकांडाचे वास्तुपुराण गुंडाळून युरेशियाकडे फ़टके मारून फ़ाटक्या धोतरानिशी पळून लावण्याची वेळ आम्ही तुमच्यावर आणणार आहे हे लक्षात घ्या!

असली द्वेषपूर्ण आणि मूर्ख भाषा ऐसीच्या आणि म्हटलं तर सामाजिक नियमांतही बसणार नाही.

अरविंद कोल्हटकर Thu, 12/09/2013 - 03:11

ब्राह्मण वर्गाने एका विचाराच्या प्रभावाखाली राहून समाजावर अन्याय होईल असे बरेच काही केले ह्यावर कोणाचेच दुमत नाही. बहुसंख्येने ब्राह्मणांना हे आता मान्य आहे. पण त्या वर्गाने केवळ वाईटच केले आणि बाकी उरलेल्यांनी केवळ व्यापक हितच डोळ्यासमोर ठेवेले होते हाहि सोयीस्कर विसराळूपणा आहे. उदाहरणार्थ शिवनिर्मित मराठी राज्य बुडीस जावे आणि इंग्रज जो तुकडा तोंडावर फेकतील तो उपभोगत आपण आपले जुने क्रियाशून्य आणि कर्तृत्वशून्य आयुष्य चालू ठेवावे ह्या विचाराने शिवाजीचे वंशज असलेल्या सातार्‍याच्या छत्रपतींनी गोपाळ अष्टीच्या लढाईत इंग्रजांशी गुप्त संधान ठेवून ऐन लढाईत गयारामगिरी दाखविली ती आपण का विसरतो? त्या लढाईत आमरणान्त लढा दिला तो बापू गोखले ह्यांनी. (अर्थात छत्रपतींना चाणाक्ष इंग्रजांनी केव्हाच जोखले होते. गरज होती तोपर्यंत त्यांनी छत्रपतींना आपले आश्रित म्हणून ठेवून त्यांची भाकरी चालू ठेवली. गरज सरताच एका टिचकीने त्यांना उडवून लावले आणि म्हातार्‍या बाईसारखे शिव्याशाप मोजत छत्रपती कायमच्या वनवासासाठी काशीकडे रवाना झाले. ह्या सर्वात छत्रपतींची काय शोभा राहिली? तरीपण त्यांचे वंशज आजहि आपल्या 'रॉयल ब्लड'च्या फुशारक्या मारत आणि पोकळ पदव्या आपल्या नावामागे जोडत फिरतच आहेत. नावाचेच बेगडी छत्रपति, काही इनामी खेडयांचे पाटील हेच खरे!)

ही जुनी मढी आता उकरण्यात काहीच लाभ नाही. आजचे प्रश्न आणि उत्तरे ही वेगळीच आहेत. तेव्हाचे सूड आत्ता उगविण्याची भाषा इतकेच दर्शविते की आपण आपल्या पूर्वीच्या दुहीच्या इतिहासापासून काही शिकलेलो नाही.

हिटलरमध्ये असाच आंधळा ज्यू-द्वेष होता. त्यातून उत्पन्न काय झाले?

तेव्हा असले भडकाऊ लिखाण थांबवा आणि काही अभ्यासू, सर्जनशील लिहा अशी विनंति.

फारएण्ड Wed, 11/09/2013 - 23:47

ब्राह्मण वर्गाने??? एवढे घाऊक? ज्यांच्या हाती धर्मसत्ता, राजसत्ता व इतर कारणांनी दुसर्‍यांना त्रास देण्याची क्षमता होती अशा सर्वच "वर्गांनी" तो दिलेला आहे. त्यातले बरेच तर अजूनही देत आहेत. त्यातून ही एकच जात वेगळी का काढायची? "ज्यांनी त्रास दिला त्यात काही ब्राहमणही होते, इतरही होते" असे म्हणणे वेगळे, आणि त्यात दुमत नाही.

'ब्राह्मणांनी/ब्राह्मण वर्गाने' ने सुरू कोणतेही विधान - ते तारीफ करणारे असो वा टीका- त्यातील घाउकपणामुळे सपशेल चूक आहे.

असल्या अजेंडाधारी लेखांतील मूळच्या क्रूकेड उद्देशाकडे दुर्लक्ष करून निवडक मुद्दे "मान्य" वगैरे करण्याने अशा लेखकांना पुन्हा तीच वाक्ये संदर्भाशिवाय "पुरावे" म्हणून वापरायला मिळतात.

अरविंद कोल्हटकर Thu, 12/09/2013 - 00:29

In reply to by फारएण्ड

मला 'ब्राह्मण वर्गाने' असेच म्हणायचे आहे आणि मी ते शब्द समाजशास्त्रातील 'Social Class' अशा अर्थाने वापरला आहे. 'मध्यम वर्ग स्वभावाने सोशिक असतो' असे आपण जेव्हा म्हणतो तेव्हा मध्यम वर्गात एकहि तापट डोक्याचा माणूस नसतो असा टोकाचा अर्थ काढायचा नसतो.

हे मान्य होण्यास अडचण नसावी की जातिव्यवस्थेचे प्रमुख निर्माते, तिचे रक्षक आणि तिच्यामुळे लाभ होणारे हे मुख्यतः अल्पसंख्य ब्राह्मण होते. (आणि तसेच काही अन्य अल्पसंख्य गटहि होते ह्या चर्चेचा संदर्भ तो नाही.) माझ्या समजुतीनुसार १९व्या शतकापासून जे काही सामाजिक उत्थान प्रारंभ झाले तत्पूर्वी कोणाहि तर्कचूडामणीला वा वेदान्तवागीशाला मनुप्रणीत समाजव्यवस्थेत काही बदल करायला हवा, त्या विचारामुळे भारतीय समाजपुरुषाचे स्वास्थ्य बिघडत आहे असे मानवतेच्या भूमिकेतून सुचले नव्हते कारण असे सांगणारा एकहि ग्रंथ उपलब्ध नाही. (एकच उदाहरण देतो. 'मराठीतील रूढ संस्कृत शब्द आणि वचने' अशी ६ भागात एक बहुचर्चित मालिका मी 'उपक्रम'मध्ये लिहिली होती. तिच्यासाठी अभ्यास करतांना मला असे जाणवले होते की 'बहुजनहिताय बहुजनसुखाय' हे प्रसिद्ध वाक्य मुळात २००० वर्षांपूर्वी बौद्ध ग्रंथात वापरले गेले होते. कोणाहि ब्राह्मण पंडिताला हा विचार सुचलाच नव्हता.)

फारएण्ड Thu, 12/09/2013 - 04:28

In reply to by अरविंद कोल्हटकर

पण हेच जनरलायझेशन मला मान्य नाही - ब्राह्मण वर्गाने त्रास दिला म्हणजे नक्की काय - तेव्हा जे लोक ब्राह्मण होते त्यातील किती टक्के लोकांनी दिला? बाकी जे लोक होते ते देत नव्हते का? आणि तो मुद्दा येथे संदर्भ सोडून का समजावा? ब्राह्मण समाजात इतर जातींप्रमाणे अनेक लोक भिक्षुक, गरीब शिक्षका पासून ते अगदी शेतकर्‍यांपर्यंत व्यवसायात होते. त्यांनी समाजाला काय त्रास दिला. (त्यांना जातिभेदाचा अप्रत्यक्ष फायदा झाला. पण तो इतर अनेक जातींनाही झाला. अजूनही होत आहे).

हे मान्य होण्यास अडचण नसावी की जातिव्यवस्थेचे प्रमुख निर्माते, तिचे रक्षक आणि तिच्यामुळे लाभ होणारे हे मुख्यतः अल्पसंख्य ब्राह्मण होते. >> हे ही मला मान्य नाही. समाजातील एका मोठ्या प्रभावशाली गटाला (ज्यात अनेक जातींचे लोक होते) त्यामुळे स्वतःची सत्ता राबवता येत होती, नाहीतर इतकी वर्षे ती व्यवस्था टिकलीच नसती. समाजातील ९७% लोकांना २००० वर्षांनंतर अचानक यात गडबड जाणवली, आणि जे लोक मुळातच फारसे लढाऊ वृत्तीचे नव्हते (प्रचलित गृहीतकानुसार) त्यांनी उर्वरित समाजाला इतकी वर्षे त्रास दिला यावर विश्वास ठेवणे कठीण आहे.

दलित समाजाला अनेक वर्षे त्रास झाला याबद्दल दुमत नाहीच. तो ब्राह्मणांनी दिला असे घाउकरीत्या म्हणणे याबद्दल आहे.

ज्या लेखाचा मूळ उद्देशच मुद्दे उपस्थित करणे नसून भडकाऊ लिहीणे, एका जातीला टारगेट करणे हा आहे त्यातील एखाददुसरा मुद्दा घेऊन त्याला अनावश्यक महत्त्व देणे अनाठायी आहे असे मला वाटते. एवढेच मला म्हणायचे आहे. तुमची माहिती, मत व येथे लिहायचे स्वातंत्र्य याचा आदर आहेच. त्यामुळे मी आणखी हे ताणत नाही.

नितिन थत्ते Thu, 12/09/2013 - 10:52

लोकांची स्मरणशक्ती आखूड (शॉर्ट) असते. त्यामुळे महाराष्ट्रातील बहुजनसमाजाला (यात शहाण्णव कुळी वगैरे धरायचे नाहीत). आपल्याला त्रास देणारे मोस्ट रिसेंट लोक म्हणून ब्राह्मण दिसतात. महाराष्ट्रातील ब्रिटिशपूर्व सत्ताधारी म्हणून फुले आदींना ब्राह्मणच दिसले/आठवले म्हणून त्यांनी ब्राह्मणांना धरले/झोडपले. तोच वारसा अजून चालू आहे. पुढे शाहू महाराजांना (वेदोक्त)* राज्याभिषेक नाकारणे वगैरे प्रकरणात समाजातील प्रतिष्ठित आणि लोकमान्य ब्राह्मणांनी जी भूमिका घेतली तिचाही हा द्वेष वृद्धिंगत होण्यात वाटा असावा.

जातीव्यवस्था "निर्माण करण्यात" ब्राह्मणांचा काही सहभाग नाही. असलेल्या जातिव्यवस्थेला तत्त्वज्ञानाची जोड देऊन त्याचे समर्थन करण्याचे पातक मात्र ब्राह्मणांच्या माथी जाते. असलेल्या व्यवस्थेत आपले हितसंबंध जपले जात आहेत त्यामुळे त्या व्यवस्थेचे समर्थन करणे हे त्यांच्या फायद्याचे होते म्हणून त्यांनी ते केले.

*वेदोक्त किंवा कसलाही राज्याभिषेक केल्याने किंवा न केल्याने शाहूमहाराजांच्या संस्थानिक असण्यावर काही परिणाम होणार नव्हता कारण ते सर्वस्वी ब्रिटिशांच्या हाती होते. पण त्या निमित्ताने ब्राह्मण कनिष्ठ जातींबाबत कशाप्रकारे विचार करतात हे दिसून आले. राज्याभिषेकाला विरोध करताना "हे राज्य काही पराक्रमाने मिळालेले नाही ब्रिटिशांच्या कृपेने मिळाले आहे" असा मुद्दा काढून विरोध झालेला नव्हता तर शूद्रांना वेदोक्त राज्याभिषेकाचा अधिकार नाही म्हणून तो झाला होता.

बाकी लेख फालतू आहे याबद्दल वाद नाही.

तिरशिंगराव Fri, 13/09/2013 - 18:15

घाऊक द्वेष करणारी मने प्रगल्भ व्हायला अजून किती पिढ्या लागतील ?
युरेशिया कुठेशिक आहे हो?

अजो१२३ Fri, 13/09/2013 - 18:55

In reply to by बॅटमॅन

लवकरच तुमचे कर्मकांडाचे वास्तुपुराण गुंडाळून युरेशियाकडे फ़टके मारून फ़ाटक्या धोतरानिशी पळून लावण्याची वेळ आम्ही तुमच्यावर आणणार आहे हे लक्षात घ्या!

असे ते म्हणाले आहेत. यात आपल्याला घाऊक द्वेष दिसतो हे अत्यंत दुर्भाग्यपूर्ण!
http://en.wikipedia.org/wiki/Caucasus_Mountains इथे दिलेल्या भागाला युरेशिया म्हणायची लोकपरंपरा आपल्याला (बॅटमॅनला) ठाऊक नाही हे ही दुर्दैवाचे.

गरीब ब्राह्मणांना केंद्रीय आशियात स्थान मिळवून देण्याचा, भारतीय धोतरे (रशियाच्या आयातविषयक मानकांना फाटा मारून, अदरवाइज कस्टममधे रिजेक्ट होणारी क्वालिटी असताना)रशियाला निर्यात करण्याचा, ब्राह्मणांचे ग्रंथ नीट पॅकेज करण्याचा, हे सगळे लवकर करण्याचा, स्वशक्तीने करण्याचा, स्वखर्चाने करण्याचा सात्विक मानस लेखकाने व्यक्त केला आहे.

लेखकाच्या शब्दाशब्दातून ब्रह्मप्रेम झळकत असताना, सर्वानी त्यांच्यावर अशी टिका करावी हे निंदनीय आहे.

अजो१२३ Sat, 14/09/2013 - 12:51

In reply to by अजो१२३

माझा भाषेचे दौर्बल्य हा धागा बहुतांश ऐशीकरांच्या डोक्यावरून गेला. वर जे मी ब्रह्मप्रेम वैगेरे लिहिले आहे ते 'फटके मारून' असा शब्द आला असल्याने ओढून ताणून लिहिले आहे, बळेच लिहिले आहे असा गैरसमज व्हायची शक्यता आहे. तर ज्यांची भाषेतील गती कमी असेल त्यांच्यासाठी - पाटील साहेबांनी 'ब्राह्मणांना फटके मारून' असे लिहिले नाही, लक्षात घ्या, त्यांनी 'युरेशियाकडे फटके मारून' असे लिहिले आहे. म्हणजे रशिया, अर्मेनिया, अझरबैजान, इ देशांची ते कशी खरडपट्टी काढणार आहेत हे कळते.

अक्षय पूर्णपात्रे Fri, 13/09/2013 - 20:56

चकाकणार्‍या कागदाच्या, वीसेक पानांच्या, मोठ्ठ्या फाँटातल्या पुस्तिकांतून तुम्हीही बाहेर पडा आणि शिवाजीलाही पडू द्या.

प्रकाश घाटपांडे Mon, 16/09/2013 - 16:21

घाउक द्वेष या स्वरुपातील आक्रमकता ही असुरक्षितता व भयापोटी निर्माण झाली आहे.आक्रमकता व भीती या गोष्टीच केंद्र मेंदूच्या अ‍ॅमिग्डाला या भागात असते. दुसर्‍या वंशाच्या माणसाकडे माणुस कायम संशयाने पहातो. कारण प्रायमेट म्हणून माणसाच्या मनात उपजतच दुसर्‍या वंशाबद्दल भीतीची भावना असते असे म्हटले जाते ते काही प्रमाणात खरे आहे.
एखाद्या गोर्‍या माणसाला दुसर्‍या अनोळखी गोर्‍या माणसाची छायचित्रे दाखवण्यात आली त्यावेळी त्याचे मेंदूचे स्कॅनिंग केले असता त्यावेळी त्याच्या मेंदुतला अ‍ॅमिग्डाला हा भाग उत्तेजित झालेला दिसून आला नाही. पण एका निग्रो माणसाचे छायचित्र दाखवण्यात आले तेव्हा मात्र तो उत्तेजित झाला असे दिसून आले... हेच उलट निग्रो माणसाच्या बाबतीत दिसून आले. ...... [संदर्भ 'मेंदूतला माणुस':- डॉ आनंद जोशी- सुबोध जावडेकर]
थोडक्यात हा घाउक द्वेष असुरक्षिततेतुन आला असावा.