प्रतिज्ञा, दाभोळकरांचा मारुती आणि सान्ताक्लॉज
भारत माझा देश आहे।
सर्व भारतीय माझे बांधव आहेत।
माझ्या देशावर माझे प्रेम आहे।
माझ्या देशातल्या समृद्ध आणि
विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे।
त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता
माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन।
मी माझ्या पालकांचा, गुरुजनांचा
आणि वडीलधार्या माणसांचा मान ठेवीन
आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन।
माझा देश आणि माझे देशबांधव
यांच्याशी निष्ठा राखण्याची
मी प्रतिज्ञा करीत आहे।
त्यांचे कल्याण आणि
त्यांची समृद्धी ह्यांतच माझे
सौख्य सामावले आहे।
आपण लहानपणी शाळेत असताना हि प्रतिज्ञा रोज म्हणत असू ..
आमच्या शाळेत तर मराठी हिंदी इंग्रजी आणि संस्कृत अशा ४ भाषा मधून प्रतिज्ञा म्हटली जात असे ..
त्यामुळे शालेतील सर्वाना ४ भाषांमध्ये प्रतिज्ञा पाठ आहे ....
पण... आज कोण प्रतिज्ञा पाळते का ? कि संविधानातील आदर्शांप्रमाणे विसरून जायचा विषय झालाय प्रतिज्ञा म्हणजे ....असेच वाटते ...
आता पहा प्रतिज्ञेतील ४थे वाक्य
माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे।
म्हणजे काय ?
परंपरा कशास म्हणाव्यात ...
प्रतिज्ञा म्हणताना आपणास त्याचा अर्थही समजावून सांगीताला पाहिजे...
अशातच काही बातम्या येत आहेत २४ कोस परिक्रमेवर बंदी... हैद्राबाद मध्ये भाग्यलक्ष्मी मंदिरात आरती करण्यावर बंदी ... आता ह्या परंपरा नव्हेत काय ? कि हे सगळे कायदा सुरक्षेचे प्रश्न आहेत ...
आणखीन एक बातमी ... लोकसत्ता मध्ये वाचली दाभोळकारांचा मारुती ...
ह्यांनी पोतराजांना मुख्य प्रवाहात आणण्याचे महत्वाचे काम केले .... पोताराजांचे सद्य आयुष्य भले बिकट असेल पण ती एक परंपरा नव्हे काय .. ती टिकवण्यासाठी आपण काय करतो ?
जाता जाता मला पोतराज हे मराठी सान्ताक्लोज वाटतात ? तो मान दिला तर परंपरा पण टिकेल आणि त्यांचे जीवन पण सुसह्य होईल...
काय म्हणता बरोबर का ?
कोणकोण तयार आहे करिअर इन पोतराज करायला ?
खाजवून खरूज?
हा वाद मला पूर्णतः निष्फळ आणि खाजवून खरूज काढण्यासारखा वाटतो. प्रार्थनेमध्ये शब्द आहेत ते असे "माझ्या देशातल्या समृद्ध आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे।" अभिमान केवळ समृद्ध परंपरांचा बाळगायचा आहे, सगळ्याच परंपरांचा नाही. अन्यथा अस्पृश्यता, सती, बालविवाहापासून सगळ्याच परंपरा 'संगोपनीय' ठरतील! पोतराजाची जी परंपरा वर्णनात आहे ती निश्चितच 'समृद्ध' गटात पडत नाही आणि ती सांभाळून पुढच्या पिढीच्या ताब्यात सोपवण्याची काही आवश्यकता नाही.
पोतराज अन्य काय करतात मला ठाऊक नाही पण ते 'मराठी सान्ताक्लोज' आहेत म्हणजे नक्की काय करतात? हे वर्णन मिळाल्यास तेवढा भाग वाचविण्यासाठी काहीतरी सुचविता येईल.
'पोतराज' ह्याविषयी अधिक माहिती येथे पहा.
अभ्यास कमी अन प्रतिज्ञा जास्त?
आपण लहानपणी शाळेत असताना हि प्रतिज्ञा रोज म्हणत असू ..
आमच्या शाळेत तर मराठी हिंदी इंग्रजी आणि संस्कृत अशा ४ भाषा मधून प्रतिज्ञा म्हटली जात असे ..त्यामुळे शालेतील सर्वाना ४ भाषांमध्ये प्रतिज्ञा पाठ आहे
तुमच्या शाळेत अभ्यासापेक्षा प्रतिज्ञेतच जास्त वेळ जात होता की काय? तरीच कोणत्या परंपरा हव्या नको यात तुमचा गोंधळ झालेला दिसतो!
-प्रतिज्ञेच्यावेळी झोपा काढणारा
गेली ३००-४०० वर्षे मराठा
गेली ३००-४०० वर्षे मराठा साम्राज्याचे जगावर राज्य असते तर* पोतराजाची जी प्रतिष्ठा असती त्याची कल्पना करावी. वर कोल्हटकरांनी दिलेल्या दुव्यातील काही माहिती तरी बर्यापैकी चूक आहे. मागास जातीतील दक्षिणेतील ख्रिश्चनांच्या धर्मांतराच्या लाटेला मागे लोटण्यासाठी येशू आणि मेरी यांच्याबदल्यात यसूबा आणि मरीआई हे नवे देव अलिकडच्या काळात पुरोगामी(?) हिंदुंनी बनवले हा इतिहास आहे. विशेषतः गोव्यात. (मागच्या काळात धर्मात प्रवेश बंद होता म्हणून अलिकडे आपलाही धर्म वाढवावा ही जी कळकळ निर्माण झाली आहे म्हणून पुरोगामी.) बाकी खरा पोतराज केवळ चाबकाचा आवाज करतो ज्यात त्याला लागत नाही. ना तो रक्त काढतो. मी हजार** पोतराज पाहिले आहेत, पण पाठीवर वळ पाहिले नाहीत. पण अलिकडे नाना पाटेकरला पोतराजाच्या भूमिकेत पाहताना त्याचे रक्त काढणे पाहून प्रत्येकामधे एक कोलोसियमचा प्रेक्षक वसलेला असतो कि काय असे वाटायला लागले. टॅटू देखिल आत्मक्लेषाचे उदाहरण आहे, पण इतके बाजारू आणि तीव्र नाही आणि अप्रत्यक्ष आहे.
पुष्करसाहेब, भारतात इतकी वाईट प्रकारची आत्मग्लानी आहे आपण जर 'चला आपण ट्रॅफिक पोलिस बनूया' म्हणायला जाल तरीही त्याची परिस्थितीही इतकी वाईट आहे आहे कि लोकांना मागास बनवल्याचे पाप आपणास लागेल. मग पोतराज हा तर समाजातला खरोखरीचा दलित, गरीब आणि अंधश्रद्धांना बळी पडलेला आहे. ही प्रथा सवर्णांनी चालू केली आहे आणि विषमतेचे प्रचंड मोठे द्योतक ही आहे. आणि खरे तर ही परंपराच नव्हे, हा एका टॅक्टीकचा साईड इफेक्ट आहे.
आपण योग्य प्रार्थना वाचली आहे, आपला मानसही योग्य आहे. परंतु एखाद्या परंपरेचे समर्थन करायचे कि नाही आणि किती करायचे हे ठरवताना बरेच प्रश्न स्वतःस विचारावे, समाजाच्या बाजूने आणि परंपराकारांच्या बाजूनेही, जसे, ही परंपरा समाजाची कोणती गरज भागवते? कोणता संस्कार करते? नक्की काय करते? परंपराकारांनी दुसरे काय करावे? त्यांचे जीवन मग कसे असेल? इ. इ.
समाजाने काही परंपरा ऐरणीवर काढल्या आणि त्याने आपल्या भावना क्षत झाल्या तर ते साहजिक आहे पण या बदलाला विरोध करू जाताना सर्वांचा सर्वांगीण विचार एक सामान्य माणूस म्हणून आपण केलेला नसतो, तेव्हा समर्थनाची/विरोधाची भूमिका सांभाळून घ्यावी.
*हा 'र' वाचून होईपर्यंत दहा जणांना ओकारी आली असणार आणि अजून दहा जणांना गाढवाने सिंहाच्या गुहेसमोर जाऊन आव्हानात्मक ओरडले असण्याचा आवाज आला असणार.
** अतिशयोक्ति
वेगळे मत
१) गोव्यात मरीआई या देवतेच्या पूजेची परंपरा नाही.
२)यसूबाविषयी माहिती नाही पण पटकीची (कॉलरा) साथ आली आणि माणसे पटापट मरू लागली की 'आला मरीआईचा फेरा' असे म्हणून मरीआईला शांत करण्याचे पूजाविधी सुरू व्हायचे हे पाहिलेले आहे. देवी हा देखील एके काळी जीवघेणा रोग होता आणि देवीची लागण झालेल्या घरातही भजन-कीर्तन-जागरण आणि शितळादेवीची पूजा होत असे. देवी या रोगाला आपण 'देवी' म्हणतो आणि हिंदीत 'माताजी' म्हणतात आणि या देवीमातेचा कोप निवारण्यासाठी पूजा करतात. आज देवीरोगनिर्मूलन झाले असले तरी कांजिण्या,गोवर आदि तत्सम रोग झाले असता देवीची पूजाअर्चा करण्याची प्रथा खेडोपाडी अतिदलित वर्गात आढळते.
याबाबत माझ्याकडे ग्रंथाधार नाही पण पाहिलेले आणि ऐकलेले आहे.
३)आपल्या एका देवतेचे नाव 'यमाई' असे आहे.
आणखी थोडे वेगळे मत
मागास जातीतील दक्षिणेतील ख्रिश्चनांच्या धर्मांतराच्या लाटेला मागे लोटण्यासाठी येशू आणि मेरी यांच्याबदल्यात यसूबा आणि मरीआई हे नवे देव अलिकडच्या काळात पुरोगामी(?) हिंदुंनी बनवले हा इतिहास आहे. विशेषतः गोव्यात
अरेच्चा. इथे थोडे उलटेच वाचायला मिळाले!
थोडी अजूनही रोचक माहिती आहे त्या लेखात!
१) गोव्यात मरीआई या देवतेच्या पूजेची परंपरा नाही.
लेखात म्हटल्याप्रमाणे हळूहळू सगळ्याच मरी-आया मेरी-मातेत संक्रमीत झाल्या असाव्यात ;)
आपली मते बरोबरही
आपली मते बरोबरही असतील.
http://en.wikipedia.org/wiki/Mariamman वर ही देवता वेदकालपूर्व आहे असे लिहिले आहे.
आमच्या सो कॉल्ड समृद्ध परंपरा
आमच्या सो कॉल्ड समृद्ध परंपरा जपण्यासाठी कोणीतरी खालच्या आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक स्तरावर असावं असं मला अजिबात वाटत नाही. ज्या परंपरा असं काही लादतात त्या सगळ्या गरीब परंपरा लवकरात लवकर मोडीत निघालेल्याच बर्या.
तसंही ही प्रतिज्ञा शाळकरी वयातपुरती ठीक आहे. लहान वयात या प्रतिज्ञेतलं पेट्रनायझेशन लक्षात येत नाही.
माझ्या कडून चूक झाली... मी
माझ्या कडून चूक झाली... मी वासुदेव पहिला आहे पण पोतराज नाही... मला पोतराज आणि वासुदेव एकाच वाटत होते... औरंगाबाद मध्ये... तमिळ भाषिक काही गायक/भिक्षुकी दरवर्षी येतात... आणि इतक्या सुंदर आवाजात मराठीत अभंग, भजन, कीर्तन म्हणतात कि बस कानाला मनाला खूप छान वाटते... जसे गायक हे करिअर होऊ शकते तसे अभाग कीर्तन गाणारे असे का करिअर होऊ शकत नाही... मी हे सगळे प्रातिनिधिक घेतले होते ... जाता जाता आईने व बाबांनी अशातच य.च.मुक्त.वि. चा योग डिप्लोमा केला... त्यातील एक पुस्तक हातात लागले... पहिल्याच पानावर...
मला म्हणायचे आहे अशा परंपराना आपण मान देतो का ? सरकार नावाची अजस्त्र यंत्रणा काही करते का ? प्रथम आपणास ह्या माहित आहेत का ? त्या आपले ध्येय असू शकतात का (जसे डॉ., engg) असते तसे.. ?
योग आणि योग्यांचे दावे
पुष्कर ह्यांनी आपली वासुदेव आणि पोतराज ह्यांच्यामध्ये गल्लत झाली असे मोकळेपणे सांगितले आहे.
वासुदेवाची माहिती येथे पहा.
पोतराजाइतके शोषण वासुदेव होण्यामध्ये दिसत नाही आणि पोतराजाच्या तुलनेत वासुदेव बराच अधिक सात्त्विक आहे हे मान्य करूनहि असे म्हणावेसे वाटते की अन्ततोगत्वा वासुदेव हाहि एक भिक्षेकरीच. ती परंपरा अखंड राहून संस्कृति समृद्ध राहावी म्हणून कोणी हा भिक्षेकर्याचा व्यवसाय स्वीकारावा असे आपण कसे आणि कोणास सुचविणार? कालबाह्य गोष्ट म्हणून ती नैसर्गिक मार्गाने मृतप्राय होणार असली तर ती जिवंत राहावी म्हणून समाजाने काही करण्याची आवश्यकता मला तरी दिसत नाही.
नंतर प्रश्न येतो वर उल्लेखिलेल्या 'परमहंसां'चा. योगविद्येला भारतात प्राचीन परंपरा आहे आणि इतकेच नव्हे तर ती विद्या अन्य नावांनी अन्य संस्कृतींमध्येहि पोहोचली आहे. (चीनमधील 'फालुन गाँग' संप्रदायात मला पुष्कळशी योगविद्याच दिसते.) योगाचे पुरस्कर्ते योगाच्या नावाने अध्यात्मापासून शारीरिक आरोग्याच्या लाभांपर्यंत अनेक दावे करतात. त्यांपैकी योगासनांपासून होणार्या शारीरिक आरोग्याच्या लाभाचे दावे बहुतांशी खरे असावेत हे मानण्यास प्रत्यवाय दिसत नाही.
योगामुळे समाधि अवस्था प्राप्त होणे, अन्नपाण्याशिवाय दीर्घकाळ जगता येणे, अष्टसिद्धि (अणिमा, लघिमा, महिमा, गरिमा इ.) प्राप्त होणे असे दावे शास्त्रीय कसोट्यांना उतरल्याचे मी तरी कोठे वाचलेले नाही. त्यावर कितपत विश्वास ठेवायचा हा प्रत्येकाने आपल्यापुरता करावयाचा विचार आहे. (मी ठेवत नाही. ज्ञानेश्वरांची समाधि ही खरी घडलेली गोष्ट नसून केवळ परंपरेने आपल्यापर्यंत पोहोचलेली श्रद्धा आहे असे मला वाटते.) योग हा विषय 'regulated' नसल्यामुळे त्यात कोणी कोणास 'परमहंस' वा अन्य काही उपाधि देणे आणि त्यावर विश्वास ठेवणे हा सर्वस्वी वैयक्तिक मानण्याचा भाग आहे. विचार करणारी व्यक्ति जितकी चिकित्सक तितकी त्या व्यक्तीची 'परमहंसा'कडे पाहण्याची दृष्टि संशयखोर. कोणी तथाकथित 'परमहंस' खराच विरक्त आहे का कोणी भोंदू केवळ आपले दुकान चालवतो आहे हे ठरविण्याचा कोठलाहि थर्मॉमीटर उपलब्ध नाही. आपापली विचारशक्ति वापरा आणि ठरवा!
योग आणि आयुर्वेद
>>त्यांपैकी योगासनांपासून होणार्या शारीरिक आरोग्याच्या लाभाचे दावे बहुतांशी खरे असावेत हे मानण्यास प्रत्यवाय दिसत नाही.
याच "उच्चवर्गीय" अंधश्रद्धांच्या बाबत दाभोळकरप्रणित कायदा मौन बाळगून आहे / सौम्य आहे असा काही लोकांचा आक्षेप आहे आणि तो योग्य असावा असे दिसते.
अँटी एजिंगचं माहित नाही, पण
अँटी एजिंगचं माहित नाही, पण फेअरनेस क्रीमं खरोखर काळे डाग, त्वचेचा काळपटपणा कमी करतात. त्यामुळे या क्रीमांना अंधश्रद्धा म्हणणं कठीण आहे. आता या क्रीमांचं मार्केट एवढं मोठं का हा मात्र चर्चेचा विषय आहे. अधूनमधून जे लेखन येत असतं, त्यात गेल्या आठवड्यात गार्डीयनमधे नंदीता दासच्या संदर्भात मोनिषा राजेश हिने लिहीलं होतं.
India's unfair obsession with lighter skin
बिफोर आणि आफ्टर असे फोटो
बिफोर आणि आफ्टर असे फोटो काढायला हवे होते, असं परिणाम दिसायला लागल्यानंतर वाटलं. टू लेट. प्रत्यक्ष परिणाम, त्वचेवरचे काळे डाग वेगाने कमी होणं पाहिलेलं आहे.
बाकी त्यात नक्की काय रसायनं असतात ज्यामुळे त्वचेखाली मेलॅनिनची पुनर्रचना किंवा अन्य काही होतं हे शोधलेलं नाही; शोधते, सापडल्यास लिंक देते.
माझा अनुभव क जीवनसत्त्व असणार्या क्रीमचा आहे. विविध अॅलर्ज्या आणि किडे चावण्यामुळे पडलेले डाग या क्रीममुळे लवकर जातात असा अनुभव आहे. क जीवनसत्त्व आणि त्वचेचा पोत सुधारणे याचा कार्यकारणभाव इथे मिळाला:
... vitamin C, also known as ascorbic acid, is key to the production of collagen, a protein that aids in the growth of cells and blood vessels and gives skin its firmness and strength. Vitamin C also helps create scar tissue and ligaments, and it helps your skin repair itself
... Research suggests that vitamin C may also reduce sunburn caused by exposure to ultraviolet B radiation and prevent the consequences of long-term sun exposure, which can lead to skin cancer ...
विकीपीडीयावरही किंचित माहिती आहे. दुवा
फेअरनेस क्रीम
लाल/ तपकिरी डाग आणि काळवंडलेपणा कमी करण्यासाठीच्या क्रीम मधे सी जीवनसत्व ,कॉजिक अॅसिड, हायड्रोक्विनोन, नायसिनामाइड, लिकरिश अर्क, अल्फा हायड्रोक्सी अॅसिड, सनस्क्रन इ चा उपयोग केला जातो. मुरुम इ ने झालेली त्वचेची हानि भरून काढून त्याचे डाग घालवणे, अतिरिक्त मेलॅनिन कमी करणे, त्वचेचा वरचा थर काधून टाकणे इ वेगवेगळ्या कार्यपद्धतींने ही द्रव्ये डाग / करपटपणा कमी करतात. ह्या गोष्टी वैज्ञानिक जर्नलांमधून खूपदा प्रकाशित झालेल्या आहेत. ( मी स्वतः मुरुमाचे डाग घालवण्यासाठी सी जीवनसत्व, नायसिनामाइड आणि अल्फा हायड्रॉक्सी अॅसिड वापरले आहे)
अॅन्टी एजिंग्चेही तसेच. विविध अॅन्टी ओक्सीडंट, रेटीनॉइड इ चा कोलीजीन निर्मोती वाढवण्यासाठी काही प्रमाणात जातात. गूगल सर्च केल्यास वरील घटकांची माहिती मिळू शकेल.
़आही गोष्टी प्रसाधनांतून तर काही वैद्यकीय शिफारशीनेच मिळू शकतात. वरील घटकांमुळे मूळचा रंग कधीच बदलत नाही. डाग, जळकट्पणा इ जातात. (काही प्रमाणात).
ह्यात बूवाबाजी काहीच नाही.
भारतात गौरवर्णाचे जे अतिरेकी कौतुक आहे त्याचा फायदा घेऊन अवास्तव क्लेम करणार्या जाहिराती केल्या जातात. (खरोखर तसे असते तर फेअर अँड हँड्सम खान गोरापान नसता का झाला?) अशा अवास्तव जाहिराती म्हणजे उच्चवर्णीय अंधश्रद्धा नाहीत. ही सर्ववर्णीय अज्ञानाचा फायदा चेऊन केलेली धंदेवाइक लबाडी आहे.
अशा जाहिराती बुवाबाजीविरोधी कायद्याच्या कचाट्यात येऊ शकतील का?
तांत्रिक माहितीसाठी धन्यवाद.
तांत्रिक माहितीसाठी धन्यवाद. योगासनांच्या फायद्याची तांत्रिक माहिती उपलब्ध आहेच.
भारतात गौरवर्णाचे जे अतिरेकी कौतुक आहे त्याचा फायदा घेऊन अवास्तव क्लेम करणार्या जाहिराती केल्या जातात. (खरोखर तसे असते तर फेअर अँड हँड्सम खान गोरापान नसता का झाला?) अशा अवास्तव जाहिराती म्हणजे उच्चवर्णीय अंधश्रद्धा नाहीत. ही सर्ववर्णीय अज्ञानाचा फायदा चेऊन केलेली धंदेवाइक लबाडी आहे.
बुवाबाजी अधोरेखितीपेक्षा वेगळी आहे असं आपलं म्हणणं आहे काय?
अशा जाहिराती बुवाबाजीविरोधी कायद्याच्या कचाट्यात येऊ शकतील का?
बुवाबाजी नाही तर अंधश्रद्धाबाजीविरोधी कायदा.
अशा जाहिराती बुवाबाजीविरोधी
अशा जाहिराती बुवाबाजीविरोधी कायद्याच्या कचाट्यात येऊ शकतील का?
फेअर अँड लव्हलीच्या जाहिरातींबद्दल वाद आहे आणि काही जाहिरातींवर भारतात बंदी आहे असं विकीपीडीया म्हणतो आहे. दुवा पण त्यामागचं कारण निराळं आहे.
जाहिरातींमधेही बहुतेकदा अतिशयोक्ती असते. जॉकीच्या चड्ड्या घातल्या म्हणून किंवा अॅक्स डीओ वापरल्यामुळे मुली पुरुषांवर खरोखरच तुटून पडत नाहीत. बुलेट वापरली म्हणून रस्त्यातली बाकीची वहानं रस्ता सोडून जात नाहीत. कोणतीतरी टूथपेस्ट वापरली म्हणून आणि म्हणूनच दातांवरचा सगळा प्लाक निघून जात नाही.
कोल्हटकरांशी सहमत
लिखाणातली चूक आपण इतक्या सरळपणे मान्य करणे आवडले.
अकोंशी सहमत. वरील दोन परमहंस सन्याशांच्या बायो- डेट्यात विशेण मान देऊन जतन करण्यासारखे मला तरी काही दिसले नाही. (निदान पुस्तकाचा आतला भाग दिला असतात तर जतन करण्याजोगे काही तत्वज्ञान आहे असे तरी म्हणता आले असते.)
परंपरा असेलही, पण
दशनाम सन्यास परंपरा काय आहे हे मला माहित नाही.
पण कुठलाही सन्यास घेताना तो जाणत्या वयात, आपण ज्याचा परित्याग करणार ते आहे तरी काय ह्याची कल्पना असेल, अशा वयात घेणेच योग्य.
दहा वर्षाच्या बालकाला सन्यासाची दीक्षा देणे ही जतन करण्याजोगी प्रथा नक्कीच नाही.
अवांतर : संन्यास
संन्यास घेणे ह्या प्रकाराचे भारतात भलतेच अप्रूप आहे.
अहिंसेचे प्रचंड कवतिक असलेल्या एका पंथात असेच दहा-बारा वर्षाची मुले संन्यास घेतात.(त्यांच्यासमोर संन्यास घेण्याचे उदात्तीकरण केले जाते. ते इतके प्रचंड असते की तो प्रकार दूरच्या किंवा नजीकच्या भविष्यात तरी आपल्याला सोसवेल की नाही ह्याचा पुरेसा विचार होत नाही.)
कधी भावनेच्या लाटेवर स्वार होत तर कधी घरच्यांच्या भल्यासाठी (घराने "देवाला वाहिलेला" मुलगा म्हणून ) असा संन्यास घेतला जातो.
ह्यातील कित्येकांना लवकरच त्या बंधनातील घुसमट सहन होइनाशी होते.
हल्ली अर्वाचीन काळात त्यांना बरीचशी बोलणी खाउन का असेना संसारी आयुष्यात परतता येते, पूर्वी अहिंसक मंडळी ते ही विविध मार्गाने भलतेच अवघड करुन ठेवीत.
ह्या संन्याशांना परत यावेसे का वाटे? अनेकानेक कारणे आहेत. त्यापैकी काही:-
१.संन्यासासाठी टक्कल करताना वस्तरा वापरु नये म्हणे. हाताने ओढून केस काढावेत. त्यातील ताण कित्येकांना झेपेनासा होतो.
२.चांगली चप्पल उन्हातान्हात वापरायची चोरी. थंडीत पुरेसे कपडे नि पांघरुण वापरायची चोरी.
३.इतर सहजेच्छा मारुन टाकव्या लागतात्.स्व-नियंत्रण नावाखाली.(चांगले चुंगले चविष्ट अन्न पोटभर खायची चोरी.)
४.सज्ञान झाल्यावर होणार्या इच्छा. आणि ते सातत्याने दाबून टाकावे लागल्याने येणारे फ्रस्ट्रेशन.
.
काही काळ ह्या पंथातील काही संसारी लोकांसोबत रहायला मिळाल्याने त्यांच्यातील संन्यासातून "मागे फिरलेल्या" लोकांबद्दल समजले ; ते असे होते.
अजूनही होते, पण तो फार वेगळा विषय ठरेल. संन्यास मार्गातील स्त्रियांविषयी तर न बोललेलेच बरे.
मुळ मुद्दा असा आहे कि १.
मुळ मुद्दा असा आहे कि
१. आपणास सर्व भारतीय परंपरा माहित आहेत काय ?
२. त्यातील समृद्ध, चांगल्या, टाकाऊ कशा ठरवायच्या ? कोणते परिमाण लावायचे .. का फक्त विज्ञान आणि तर्क ?
३. त्या टिकवण्यासाठी काय करता येईल ?
काही सापडले.. http://www.stephen-knapp.com/
वाटलेच!
Stephen Knapp ! हे तर पु.ना. ओकांचे परदेशी अवतार! गंमत म्हणजे हे महाशय आपल्या लिखाणात पु.ना. ओकांचे संदर्भ सढळ हाताने देतात. म्हणजे ओरिजिनल काही वाचायला मिळेल म्हणून जावे तर पुना ओक! मात्र हा गृहस्थ एनाराय भारतीय तरुणांमध्ये लोकप्रिय आहे. ज्यांना भारतीय संस्कृतीविषयीचे मूळ संदर्भ भारतीय भाषांतून वाचायला मिळालेले नाहीत किंवा वाचणे शक्य नाही त्यांना असली पुस्तके भुरळ पाडतात खरी.
"भारतीय इतिहास संशोधनातील
"भारतीय इतिहास संशोधनातील घोडचुका" अशा नावाच्या पुस्तकात पाश्चात्य संशोधकांच्या दृष्टीने इतिहास शिकण्याबद्दल ते टीका करतात. आणि नंतर अकबर महान नसून कसा वैट्ट होता हे दाखवण्यासाठी लिहिलेल्या लेखात ८० टक्क्यांहून अधिक संदर्भ व्हिन्सेण्ट स्मिथ या "शुद्ध भारतीय" इतिहासज्ञाचे देतात.
ओकांची आणखी विचारमौक्तिके नंतर देईन,
भर.....
वरील यादीत काही भर.(http://www.misalpav.com/comment/480473#comment-480473 इथून जशास तशी)
अजून काही:
ज्याला आपण रशिया म्हणतो ना ! त्याचे मूळ नाव आहे ’ऋषिय’ म्हणजे ऋषिंच्या राहण्याचे ठिकाण.
ज्याला आपण सौदी अरेबिया/अरबस्तान म्हणतो ना ! त्याचे मूळ नाव आहे ’अर्वस्थान’ म्हणजे चांगले घोडे ज्या ठिकाणी निपजतात ते ठिकाण.
ज्याला आपण व्हॅटिकन सिटी म्हणतो ना ! त्याचे मूळ नाव आहे ’वेदवटी’.
ज्याला आपण कॅन्टरबरी (इंग्लंडमधील शहर) म्हणतो ना ! त्याचे मूळ नाव आहे ’कृष्णकुटी’.
ज्याला आपण मदिना म्हणतो ना ! त्याचे मूळ नाव आहे ’मेदिनी’. मेदिनी भविष्य मुळचे तिथले.
ज्याला आपण सिरीया म्हणतो ना ! त्याचे मूळ नाव आहे ’सुरिय’. सूर मुळचे तिथले.
ज्याला आपण असिरीया (मेसापोटेमियन संस्कृतीतील ठिकाण) म्हणतो ना ! त्याचे मूळ नाव आहे ’असुरिय’. असूर मुळचे तिथले.
इंग्रजी भाषा तर संस्कृतोद्भव आहे.ज्याला इंग्रजीत ’That' म्हणतात त्यातला 'h' काढा. म्हणजे तुम्हाला मिळेल संस्कृतमधील तत अर्थात इंग्रजीमधले That.
अहो हे तर सोडाच.क्रिश्चिऍनिटी म्हणजे मुळची कृष्णनीती हो.
.
.
.
.
त्या धाग्यातील कंटेंटः-
.
.
तर एक युग म्हणजे ५००० वर्षे २८ युगे म्हणजे १४० हजार वर्षे हा चंद्रभागेच्या काठी उभा आहे म्हणजे भक्तांची परंपरा जर १,४०,००० वर्षांची असेल त्या देवाची आरती करण्याची तर तो देव हा समाज हे राष्ट्र १,४०,००० वर्षाचे आहे असे समजायला हरकत नाही म्हणून तुकाराम महाराज म्हणतात तू दिठीचीये आधी म्हणजे दृष्टीच्याहि आधी.
तुर्कस्थान यात आपण 'क' वरती रफार मारतो पण 'तूरग' म्हणजे घोडा तो संस्कृत शब्द आहे त्याचा अपभ्रंश करून आत्ता आपण म्हणतो
.
.
.
अहो ! खालती ब्राझील आहे ना त्या ब्राझील देशात काय दक्षिण अमेरिकेत काय आजही हिंदू संस्कृतीचे उदंड पुरावे आहेत जाऊन बघा मी वाचले आहे ते बोलतोय
हा चीन बघा ! या चीनच्या तिथले सगळे राजे लोक मांडलिक म्हणून धुताराष्ट्राला जेव्हा सप्त सिंधू सप्त गंगांच्या जलाने राज्याभिषेक हस्तिनापूरला केला त्यावेळी मांडलिकत्व मान्य करून आहेर घेऊन आलेले होते त्यासाठी महाभारत वाचा मराठवाडा पब्लिशिंग कंपनीने १० खंड काढले आहेत महाभारताचे त्याच्यात मी बोलतोय ते लिहिलेले आहे
.
.
.
.
माहितीपूर्ण, पण...
...वरील प्रतिसाद हा 'अंधश्रद्धेचा प्रचार/प्रसार' या सदरात का मोडू नये, नि त्याबद्दल कायद्याने कडक शिक्षा करण्याची तरतूद का असू नये, याबद्दल तूर्तास विचार करीत आहे.
(प्रस्तुत प्रतिसादकाचा उद्देश तसा नाही, याची मला व्यक्तिशः पूर्ण कल्पना आहे. परंतु मी म्हणजे कायदा नव्हे. मी गाढव असेनही अथवा नसेनही, परंतु ती बाब अलाहिदा.)
जागर
सध्या नरहर कुरूंदकरांचे "जागर" वाचत आहे. परंपरांचा विषय निघालाच आहे तर त्यांच्या या पुस्तकातील 'बुद्धीजीवी वर्गातील वैफल्य' या लेखातील पुढील वेचा ग्राह्य ठरावा:
"समजसुधारणेची सगळी चळवळ तडजोडी करीतच निर्माण होत होती" असे म्हणत त्या परिच्छेदात ते पुढे म्हणतात
"प्रत्येक समाजसुधारणेला पूज्य धर्मग्रंथांची मान्यता आहे, निदान त्यांचा सुधारणेला विरोध नाही, हे दाखवण्याची धडपड या सुधारकांना करावीशी वाटते. यासाठी विधवाविवाहाला धर्मशास्त्रात आधार हुडकून काधण्यात आले. पुढच्या काळात हरिजनांच्या मंदिरप्रवेशाला शास्त्राधार शोधण्याचा प्रयोग झाला. सुधारकांची ही प्रवृत्ती म्हणजे एक प्रकारचा समन्वयवादच होता. ते रूढींचा धिक्कार करण्यास तयार होते, पण परंपरेचा धिक्कार करण्यास तयार नव्हते. बालविवाहाचा निषेध करण्यास तयार होते पण मनुस्मृतीचा धिक्कार करण्यास तयार नव्हते. मूलतः समाजसुधारक नसणार्यांचीही मनोवृत्ती यापेक्षा वेगळी नव्हती. इंग्रजी राजवटीला विरोध करण्यासाठी त्यांना इतिहासातून प्राचीन विजेते हुडकून काधणे भाग होते. भूतकालाच्या पराजयाच्या सर्व ठिकाणी एकमेव कारणमीमांसा आणि विजयाच्या सर्व ठिकाणी सांस्कृतिक मोठेपणा ही मीमांसा. असे हे सगळे इतिहास विवेचन चालू असते. जगात एके काळी आम्ही सांस्कृतिक शिखरावर होतो, ज्ञान-विज्ञानाच्या सर्व जागतिक परंपरा आमच्यापासून प्रारंभ पावतात, अश्या नवनव्या अहंता या परंपरेतून निर्माण झाल्या आहेत."
खरंतर त्यांचा ह अख्खा निबंधच अतिशय वाचनीय व मननीया आहे. शक्य होताच नक्की वाचा.
>>जाता जाता मला पोतराज हे
>>जाता जाता मला पोतराज हे मराठी सान्ताक्लोज वाटतात ?
सान्ताक्लॉजविषयी (तसेच पोतराजांविषयीसुद्धा) मला फारशी माहिती नाही. पण लोकसत्ताच्या लेखात जी काही रूढी परंपरा दाखवली आहे ती काही 'टिकवायला हवी' अशी परंपरा वाटली नाही. सांताक्लॉजची परंपरासुद्धा टिकवायलाच हवी असे नाही.
८४ कोस परिक्रमा ही परंपरा असू शकेल हे मान्य. (टिकवायला हवी का नको याविषयी माझे काही मत नाही). त्यावरची बंदी ही जेव्हा कुणी आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने उघडपणे चिथावणीखोर कृत्ये करण्यासाठी करतात तेव्हा (कदाचित) समर्थनीय ठरू शकते. (सदर परिक्रमा चैत्र महिन्यात केली जाते अशी माहिती इथे मिळते. विश्वहिंदू परिषद ऑगस्टमध्ये ही परिक्रमा का करू पहात आहे हे कळत नाही.