शरद जोशीँचा सिध्दांत

लहान भाऊ म्हटला जोशीँच्या घरचा मयताचा निरोप द्यायला तू जा. साधारण वन डे रिटर्न अंतरावरच सर्व नातेवाईक राहतात त्यांचे. आज माझ्याकडे सहा बैल आणि चार गाई आल्या असल्याने आणि नुकतीच गटारी पाळल्याने श्रावण साजरा करण्याचा खूब मनसुबा रचलेल्या एका अत्यंत बड्या आसामीस ते मटेरिअल बोनलेस स्वरुपात द्यायचं असल्याने , मला आज जातीने इथे हजर राहून , बैल फाडायचे उच्च शिक्षण देणार्या महाविद्यालयात मी कमावलेले प्रगत ज्ञान आज सिध्दण्याची बिकट वेळ निकट आलेली आहे. तेव्हा हे बंधो 'ट्रेनिँग काँलेज आँफ कटीँग बफेलो काऊ अँन्ड बुल्स ' येथून आलेल्या ट्रेनी विद्यार्थ्यांवर हे काम मला सोपवता येणार नाही.तू कर्वेरोड कडे तात्काळ मार्गस्थ हो. आणि हो जाता जाता अजून एक छोटं काम पार पाड गडे ! चौकाचौकात पाच क्षत्रीय होय केवळ क्षत्रीयच ! शहीद झाल्याची दंवडी द्यायला विसरु नकोस ! बंधो सैन्यात केवळ क्षत्रीयच असावेत हे मी तुला सांगायला हवे काय ? शरद स्मृतीचा अभ्यासक ना रे तु ? मागील वर्षीच तर तू महाविद्यालयातली दंवडी विभाग प्रमुख म्हणुन असलेली नोकरी सोडून घरच्या बिझनेस मधे आलास. ही प्रेमळ आळवणी संपताच मी गुगल मँप वरुन पत्ता शोधला आणि माझ्या पांढर्या रंगाच्या होँडा अकाँर्ड मधे बसलो. कर्वे रोड कडे रवाना झालो. वाटेत चौकाचौकात भोँग्यातनं आरोळ्या देत जोशीँच्या घरी पोचलो स्टायलीश जोहार घातला , त्यांनी तो स्टायलीश दुर्लक्षिला. त्यांनी मयताची माहिती दिली. पेमेँट आँनलाईनच होईल तुमचे आजच. हा दिलासा देखिल दिला. कृतकृत्य फिलिँगने मी एस पी काँलेजमधे पोचलो. जोशीँचे एक नातेवाईक तेथे होते. सांगावा देण्याचं माझं उत्तम प्रशिक्षण झालेलं असल्याने मी आवश्यक संवादपूरक दुःखद भाव चेहर्यावर प्रगटित सांगावा सांगितला. आणि महाविद्यालयातील शैक्षणिक भ्रष्टाचारमुक्त वातावरण निरखू लागलो. भुदेव शिकणारे आणि भुदेवच शिकविणारे ! सर्व मंगलमय शैक्षणिक भ्रष्टाचारमुक्त वातावरण पावून संतोष पावलो ! आणि प्रथम सांगावा टप्पा असणार्या वाईकडे रवाना झालो. वाटेत चिँतन करत ! शरद जोशी नामक भुदेवानं डाँ. आंबेडकरांना गतकाळात दृष्टांत देऊन किती मंगलमय , भ्रष्टाचारमुक्त, जातीयता विरहीत भारताची उभारणी केली आहे. २१ व्या शतकात देखील पारंपारिक शिक्षणाने आम्ही किती सशक्त टिकून आहोत. कितीही प्रगत काळात आमच्यासाठी पारंपारिक शिक्षणावर आधारलेल्या रोजगाराच्या संधीची उपलब्धता या व्यवस्थेत टिकून आहे. वाह ! वाह ! वाह ! आरे फिलिंग कृतकृत्य रे..वाह वा वा वा.

गदा गदा हालवून आईने उठवले . व्वाव व्वाव काय म्हणायलास ? काय व्हयलय ? बरं नसलं वाटंत तर नकु जावू क्वालीजला. आँ ? काँलेज ? आर तिच्या बायली ! होँडा अकाँर्ड म्हणं ! आवरुन सावरुन झपझप पायी चालत बोगस लाँट्रीतल्या नोकरीचं प्राध्यापकी कर्तव्य बजावायला बाहेर पडलो. काय तरी सपान पडतं तेच्या आयला कशात आसंल हेच बिज ? आणि झपकन शरद जोशी सायबांचं च्यूतिया चिँतन आठवलं !

तर मित्रहो..या देशातील ढाँय ढाँय ढाँय..
राखेखालचे निखारे
डाँ.आंबेडकरांनी 'शिका , संघटीत व्हा आणि लढा करा' असा कार्यक्रम आपल्या अनुयायांना दिला. शिक्षणक्षेत्रातील आजचा भ्रष्टाचार हा मोठ्या प्रमाणावर डाँ. आंबेडकर यांच्या लढ्याच्या आदेशातील त्रुटीमुळे झाला नसेल ना , ही शक्यता तपासून पाहवी लागेल. त्यामुळे शिकले म्हणजे नोकरी आणि नोकरी म्हणजे पैसा ही सर्व समिकरणे समाजवादा बरोबरच उध्दवस्त झाली. डाँ. आंबेडकरांनी पुस्तकी शिक्षणापेक्षा बलुतेदारांच्या व्यावसायिक शिक्षणावर भर दिला असता तर जाती नष्ट करण्याचे त्यांचे उद्दिष्टही साधले गेले असते आणि देशाचेही भले झाले असते.
शरद जोशी .

Taxonomy upgrade extras: 
field_vote: 
4.2
Your rating: None Average: 4.2 (5 votes)

अकॉर्ड बिकॉर्ड म्हणू नका हो, जोशी काका कॅपिटॅलिस्ट बूर्झ्वा ठरवतिल तुम्हाला...
लेख आवडला !

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

हान तिच्या...!! जबराट!!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

किंबहुना सर्वसुखी| आंतरजाली फेसबूकी||
संस्थळी कीपॅड ठोकी| अखंडित||

पूर्वीच्या काळी शिक्षण म्हणजे तंत्रशिक्षणच असायचं. म्हणजे बाप जे वर्षानुवर्षं करतो तेच काम तस्संच पोरगं करत रहाण्याचं शिक्षण. अशी यंत्रणा ठेवल्याने आख्खा समाज वर्णांमध्ये गोठवून ठेवणं सहज शक्य होतं. आदर्श शिक्षण हे खरं तर कुठचंही तंत्र आत्मसात करण्यासाठी लागणाऱ्या मूलभूत गोष्टींचं शिक्षण हवं. त्या दिशेने प्रवास करण्याऐवजी असा उरफाटा प्रवास करणं निरर्थकच. (सतीशजी वाघमारेदादांनी हेच सूचित केलं असलं तरी ज्या भन्नाट ष्टाइलीत सांगितलं आहे ते केवळ त्या ष्टाइलीसाठी वाचलं तरी पैसा वसूल होतो.)

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

पैसा वसूल लेखन!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

उपरोध जमलाय.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars