शेंबूड

शेंबूड हा सर्वत्र आहे, चराचर मॅमलांत तो भरुन राहिलेला आहे. तो नासिकेत आहे, गळी स्थळी आहे. त्याची एखाद्यावर कृपा झाली तर तो कित्येक दिवस तो तिथेच कृपेचा वर्षाव करितो. तो कुठून येतो, कसा येतो हे मानवास पूर्वी ज्ञात नव्हते. तो संपत कसा नाही ह्याचे त्यास कुतूहल होते. तो नको तेव्हाच कसा येतो ह्या प्रश्नाने भल्याभल्यांचे नक चोंदले गेले गेले होते. तो वहायला लागला की पळता भुई गुळगुळित होते. पण तोच घट्ट झाला की अधिकच वैताग होतो.
थोरथोरांच्या लहानपणीच्या आठवणी शेंबडानेच भरलेल्या, माखलेल्या आढळतील. तुम्ही कितीही नाही म्हणालात, नको म्हणालात, दूर सारलेत तरी तो दयाळू आहे. तो तुमचा पिच्छा सोडत नाही.
शेंबूड वाहता असणे आणि शेंबूड घट्ट असणे ह्यावरून मानवांच्या प्रमुख प्रजातींची उत्क्रांती कशीकशी होत गेली ह्याचा मिळतो. आइसएजमधील काही मानवी वास्तवांच्या पुराव्यातून सोबत सापडलेला चिकट द्राव हा शेंबूडच आहे हे आता निर्विवाद सिद्ध झाले आहे. अर्थात शेंबूड हा वस्तुतः पृथ्वीतलावरील लोकल/स्थानिक द्राव नसून पृथ्वीबाहेरून आलेल्या अतिप्रगत मानवांनी त्यांच्या अस्तित्वाचा पुरावा म्हणून मानवी जनुकांत तो अल्प किरणोत्सारी द्राव तसाच इण्जेक्ट केला अशी कॉन्पिरसी थिअरीही समोर येत आहे.
पूर्वीच्या काळी शेंबडास महत्व होते.भटका मानव नव्यानेच नागर संस्कृतीत येत होता. ज्याचा शेंबूड अधिक त्याची भक्ती अधिक असे मानण्याचा असा तो नव-नागर संस्कृतीचा तो काळ होता. लहान पोरांना अधिक शेंबूड येत असल्यानेच तेव्हापासूनच ती देवाघरची फुले ठरली असावीत असे ज्येश्ठ विचारवंत श्री मुर्गा दाखवत ह्यांनी सोदाहरण स्पष्ट केले आहे. पण त्याचे भरावती धर्व्यांनी साक्षेप खंडन केले आहे. दोघांच्याही म्हणण्यात काही तथ्य असले तरी शेवटी संस्कृतीच्या उगमाशी एक शेंबडा अध्वर्यूच होता हे ह्यावर विद्वानांचे एकमत आहे. कुणा सतत शेंबूड वाहणार्‍यास सतत नाक पुसत शिकार करण्याचा कंटाळा आला असावा आणि योगायोगाने त्याला त्यामागील काही वर्षात उगवलेल्या धान्य वनस्पती नजरेस पडल्या असाव्यात. शिकारीसाठी मग नाक पुसत मरमर करण्यापेक्षा सध्या उगवलेले धान्य आयते खाउ अशा विचाराने तो तेव्हापुरता स्थायिक झाला असावा असाही एक तर्कप्रवाह आहे. मग साहजिकच इतर अशा नाक वाहणार्‍यांनी त्याच्या ह्या सवयीस दुजोरा देत एकत्रित शेती करणे सुरु केले असावे. आपल्या शेंबडाने त्याने त्याच्या कल्पनेतील धान्य देवतेची आराधना केली असावी. साहजिकच जो जितका अधिक शेंबडा तो तितका अधिक नागर अशी व्याख्या बनली असावी. ह्यांची संख्या वाढत गेली असावी. अशा प्रकारे मानवी संस्कृतीवर शेंबडाच्या कृपेचा चिकट वर्षाव झालेला दिसून येतो. म्हणूनच कित्येक आदिम संस्कृतीत आजही नद्यांचे पूजन केले जाते. नदी हा निसर्गाला आलेला शेंबूडच होय अशी त्यामागची श्रद्धा.
हा भाग फक्त श्रद्धेपुरता नाही. अग्नीचा शोध एखाद्याला शेंबड्यालाच सर्वप्रथम लागला असावा. मानवाने प्रगती करावी म्हणून त्याच्यातील शेंबूड नामक जनुक्/जीन्स धडपडत असावे. त्या प्रगतीसाठी त्याने तात्पुरते माणसास हैराणही केले असावे. मग थोडाकाळ स्वस्थता मिळावी म्हणून उष्णतेच्या शोधात शेंबड्या माणसाला अग्नीचा शोध लागला असावा. त्या अग्नीमुळे पुढे कित्येक मानवी पिढ्यांची प्रगती होउ शकली. त्यास कारण एकच शेंबुडाचाचे जनुक.
.
शिवाय शेंबड्या माणसास अति नाक वाहण्याच्या काळात इतर काहिच करता येत नसल्याने नुस्ते बसून राहण्यास त्याचा नाइलाज होता. असाच नुसता बसून राहिला असता आपल्या शेंबडाशी चाळा करत तो बसला असावा. चाळा करता करता केलेल्या गोल रिंगणातून त्यास चाकाची कल्पना सुचली असे आता स्पष्ट झाले आहे. धिअँडरथल मानवाच्या अस्तित्वातील काही प्रदेशातील भित्तीचित्रात सदर कल्पनेशी मिळतेजुळते चित्र सापडले आहे. तो माणूस एका हाताने शेंबूड पुसत असून दुसर्‍या हाताने गोल रिंगण करीत आहे.
तस्मात, कृषी, चाक आणि अग्नी ह्या तीनही महत्वाच्या क्राम्तीकारी स्थित्यंतराचे मूळ शेंबूडच आहे. म्हणूनच त्यास मान आहे. एका संस्कृतीत देवाला आलेला शेंबूड धो धो पृथ्वीवर कोसळल्याने अधिक हानी होउ नये म्हणून पुन्हा देवाने तो आपल्या जाडजूद मिशातून फिल्टर करत मग पृथ्वीवर अलवारपणे सोडल्याची कथा आहे. देवास हे करण्यास प्रवृत्त करणार्‍या मगीरथाचे त्या संस्कृतीत लै उपकार मानले आहेत.
इंद्राने वृत्राचे शंभर किल्ले फोडण्याचे काम केले, तो "पुरंधर" म्हणविला जाउ लागला इतकिच आपली माहिती होती. पण खरे तर त्याने हे कसे केले हे आता उलगड्त आहे. देवांच्याही देवांना त्याने पवित्र तुपाची य्ज्ञात आहुती दिली. हे तूप म्हणजे सात्विक प्रकारचा देवांचा शेंबूडच . त्याने प्रसन्न होउन देवांच्या देवाने इंद्रावर कृपा केली. तो वृत्राच्या नाकात जाउन वाहू लागला. वाहत्य नाकाने त्यास लढता येइना आणि त्याचा पराभव झाला, अशी खरी आख्यायिका आता समोर येत आहे.

मागे म्हटल्याप्रमाणे शेंबूड हा संस्कृतीचा कारक आहे. तो वाहतो म्हणून त्यास "वाहता" असे म्हणता येत नाही, कारण तो कधीही घट्ट होउ शकतो. तो घट्ट आहे, म्हणून त्यास मेकूड म्हणाल तर धो धो अधिक भर येउन तो कधी पुनश्च वाहता होइल ह्याचा नेम नाही. म्हणूनच तो घट्टही नाही, तो वाहताही नाही असे चारही सेद म्हणतात. त्यास आकार आहेही आणि आकार नाहीही. त्यास लिंग आहेही आणी नाहीही. तो जाती-पाती धर्म, लिंग, वंश ह्यांत विभागला गेलाय तो केवळ मानवी कल्पनेत. प्रत्यक्षात तो सर्वत्र आहे. हवी ती व्यक्ती त्याची आराधना करुन त्याला आवाहन किंवा आ"वाहित" करु शकते. वेगवेगळ्या काळातील थोरांनी मागच्या सातशे वर्षांत हेच सांगितले आहे. हवे त्याला शेंबूड प्राप्त करून घेण्याचा अधिकार आहे.पावसाळा व हिवाळा त्यातल्या त्यात इष्ट ऋतू आहेत. त्यासाठी साधनाही सोपी आहे. अधिकाधिक भिजावे( स्वतःस जल अभिषेक करुन घ्यावा) व तसेच त्यात जमेल तितके थांबावे. मनोभावे शेंबडाची याद करावी. तो प्रसन्न होउन हजर होतोच.
वाहत्या अवस्थेत त्यास आकार नाही म्हणून त्यास निराकार मानणारी एक आक्रमक जमात तयार झाली. तर इकडिल प्रदेशातील लोकांच्या शेंबडाचा मेकूड लवकर होत असल्याने त्यास साकार मानणारे, मनोभावे पुजणारे इथले स्थानिकही त्याच्याच वेगळ्या रुपाचे भाविक होते. पहिला गट त्यास निराकार, निरुप मानी तर दुसरा गट त्यास आकार देउ पाही. सगुण साकार मानी. जो तो आपल्या परिने योग्यच होता. हत्ती आणी सात आम्धळ्यांसारखी ह्या गटांची अवस्था झाली होती.
"तू निव्वळ पाणी नाहीस, तू निव्वळ घट्ट मेकूडही नाहीस, तू नाकातही आहेस आणि गळ्यातही आहेस. तू दिसत नसलास तरी सर्व मानवांत निवास करुन आहेस. तू पावसाळाभर पुरतोस तरीही हिवाळ्यातही उरतोस. तू संपतही नाहिस आणि थकतही नाहिस. म्हटले तर एका माणसाचा शेंबूड आणि दुसर्‍याचा शेंबूड ह्यात काहीही अंतर नाही. म्हटले तर तो वेगळा आहे. एकच एक शेंबूड तत्वाची ती स्पष्ट,दर्शित रुपे आहेत. म्हणूनच शेंबडास इतर कशाचीही उपमा देणे शक्य नाही. तो हा नाही, तो हा सुद्धा नाही . असे हरेक वस्तूकडे पहात नाक गाळत आपण म्हणू शकतो. नेति नेति हेच त्याचे सार आहे." असे सेदान्तात म्हटले आहे.

.
इति शेंबूड महात्म्य असंपूर्णम्

field_vote: 
3.25
Your rating: None Average: 3.3 (4 votes)

प्रतिक्रिया

माझ्या एका कामगार मित्राने, त्याचे एका स्वस्त वेश्यागृहाचे, बीभत्स रसात न्हाऊन निघालेले अनुभव, वर्णन करुन सांगितले होते. ते ऐकल्यावर मी शहारलो होतो. या लेखाच्या शेवटच्या वाक्याने धास्तावलो पण आहे.
कारण नसताना आमच्या आदरस्थानांचे(दुर्गाबाई,इरावती कर्वे) यांचे या चिकट्यात विडंबन केल्याचा निषेध.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

इतक्या गहन विषयावर इतकं प्रवाही लेखन! अहाहा. वाचून नाक मोकळं झाल्यासारखं वाटलं.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

वाचून नाकात पाणी आले
किंवा
नाक पाणावले!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

सर्वांना मनापासून आणि नाकापासून थांकू

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--मनोबा
.
संगति जयाच्या खेळलो मी सदाहि | हाकेस तो आता ओ देत नाही
.
memories....often the marks people leave are scars