Skip to main content

हायकू -


१) लहरी वारा
पानांची सळसळ
सशाचा छळ

२) ढगांची हूल
पावसाची चाहूल
भुई निष्प्राण

३) वाऱ्याची गती
निसर्गाची संगती
मन बेभान

४) पाऊस गाणी
धरतीची कहाणी
ऐकते बीज

५) कावळा पाही
चिमणीचं सदन
खुनशी मन

.

उसंत सखू Sat, 20/07/2013 - 12:10

कायकू :) ;)

१ ) हसरा वारा

फ्रॉकची सळसळ

चड्डीचा छळ

२ ) झोपेची हूल

दुलईची झूल

निद्रा निष्प्राण

३ ) कासवाची प्रगती

सशाची अधोगती

वेग बेभान

४ ) माऊस हलवणे

कीबोर्डचे बडवणे

प्रसवते काहूर

५ ) आवळू पाही

स्त्रीचे तन मन

खुनशी प्रेमचंद

चिंतातुर जंतू Sat, 20/07/2013 - 12:59

In reply to by उसंत सखू

मिळता उसंत
होता बाळंत?
पाच हायकू!

उसंत सखू Sun, 21/07/2013 - 14:14

कविता वाचना नंतर गप्प बसेल तो केश्या कसला... त्यांनी पण ५ कायकू पाडल्या...

१) लहरी वारा
पदराची सळसळ
बघ्यांचा छळ

२) तारखेची हूल
धोक्याची चाहूल
बाई निष्प्राण

३) श्रीखंडाची वाटी
पुऱ्याच्या संगती
तन दे ताण

४) पाऊस गाणी
कवड्याची कहाणी
ऐकते कोण

५) केश्या हे पाही
कवड्याचं रुदन
खुनशी मन

केशवसुमार