Skip to main content

सॅनिटरी नॅपकिन्सची विल्हेवाट : एक भेडसावणारी समस्या

गोड चेहर्‍याची 14-15 वर्षाची मुलगी आईच्या गळ्यात पडून लाडे लाडे "मम्मीSSS .... " असे म्हणत सॅनिटरी नॅपकिन्सचे वाहव्वा करत असलेले ऐकताना टीव्हीच्या पडद्यासमोर खिळून बसलेल्या 15-54 वयोगटातील स्त्रियांना जाहिरातीतील नॅपकिन्स हवीहवीशी वाटणे स्वाभाविक आहे. परंतु वापरून झाल्यानंतर त्याचे काय करायचे हा प्रश्न संवेदनशील महिलांना नक्कीच भेडसावत राहणार. परंतु हे घाणीतले कपडे जेव्हा कचऱा कुंडीत जातात तेव्हा ती घाण उपसणे ही एक मोठी समस्या होते.

गेली दोन वर्षे पुणे म.न.पा. (महानगरपालिका) तर्फे पुण्यातील सुका व ओला कचरा उचलण्याचे काम करणार्‍या कष्टकर्‍यांची 'स्वच्छ' (Solid Waste Collection and Handling) ही सहकारी संस्था सॅनिटरी नॅपकिनचे उत्पादन व विक्री करणार्‍या कार्पोरेट उत्पादकांना वारंवार पत्र लिहून लक्ष वेधत आहे. परंतु त्यांचे हे प्रयत्न भिंतीवर डोके आपटल्यासारखे होत आहेत. स्त्रियांच्या मासिक पाळीत लागणार्‍या सॅनिटरी नॅपकिनचे उत्पादन व विक्री करणार्‍यात मुख्यत्वेकरून प्रॉक्टर अँड गॅम्बल, हिंदुस्तान युनिलिव्हर, जॉन्सन अँड जॉन्सन आणि किंबर्ले क्लार्क लिव्हर या कंपन्या आहेत. "स्वच्छ च्या कामगारांना कुठल्या परिस्थितीत काम करावे लागते याची पूर्ण कल्पना आम्हाला आल्यामुळे यासंबंधात काही ठोस पावलं उचलण्याची वेळ आली आहे" असे याविषयी मनीषा देसाई हे सदस्य आपल्या भावना व्यक्त करत आहेत. 'स्वच्छ' कडून अनेक वेळा पत्र लिहून व ई मेल करूनही कंपन्यांच्या मानसिकतेत थोडासाही फरक जाणवत नाही. वापरलेल्या सॅनिटरी नॅपकिन्सचे योग्य प्रकारे विल्हेवाट करण्यासाठी काही उपाय शोधता येतील का याची चर्चा करण्यासाठी एखादी बैठक घ्यावी एवढीच 'स्वच्छ'ची माफक इच्छा होती. परंतु त्यांच्या या विनंतीला कचर्‍याची टोपली दाखविण्यात आली.

The Plastic Waste (Management and Handling) Rules 2011 या नियमात Extended Producer's Responsibility (ERP) संबंधी काही मार्गदर्शक कलमं आहेत. त्या कलमानुसार पर्यावरणाला हानी न पोहोचता उत्पादनांच्या वापरातून होणाऱ्या कचर्‍याची योग्य प्रकारे विल्हेवाट करण्याची जबाबदारी उत्पादकावर सोपवली आहे. (हे कलम बाटलीबंद पाण्याच्या उत्पादकांनाही लागू करायला हवे. कारण आसेतू हिमालयापर्यंत रिकाम्या बाटल्या अस्ताव्यस्तपणे फेकून दिल्या जात आहेत.) मुंबईच्या स्त्री मुक्ती संघटनेनेसुद्धा टॉवेल्सवरील प्लॅस्टिक आवरणाऐवजी सुलभपणे विल्हेवाट करता येणारी बायोडिग्रेडेबल पिशवी कंपन्यांकडून देता येईल का याचा विचार करावा अशी विनंती करत होती. या संदर्भात संघटनेचे अध्यक्ष, ज्योती म्हापसेकर यांनी केलेल्या पत्रोत्तरांना कंपन्यांकडून प्रतिसाद मिळाला नाही.

वापरलेल्या सॅनिटरी नॅपकिन्सची हाताळणी स्त्री सफाई कामगार करत असतात. हे करत असताना त्यातील e coli, Salmonella, Staphylococcus आणि कावीळ व टिटॅनसच्या पॅथोजिन्समुळे कामगारांच्या आरोग्यास हानी पोहचू शकते. त्यांच्या आरोग्याला धोका पोहचू शकतो. 'स्वच्छ' च्या पत्रात प्रामुख्याने या गोष्टींचा उल्लेख होता. दिल्लीच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरॉलाजी येथील तज्ञ, ए. सी. बॅनर्जीसुद्धा याबद्दल धोक्याचा इशारा देत आहेत.

सफाई करणार्‍या कामगारांनासुद्धा या धोक्याची पूर्ण कल्पना आहे. "परंतु लोकांची घाण उपसणे हा आमचा व्यवसाय आहे. तसे न केल्यास आम्ही उपाशी मरू. पहिल्या पहिल्यांदा आम्हालाही शिळ्या अन्न पदार्थातील किड्या-मुंग्यांना बघितल्यावर शिसारी येत होती. मळमळल्यासारखे वाटत होते. आता त्याची सवय झाली आहे. आम्ही त्याची काळजी करत बसत नाही. मात्र रक्तानी मळलेला कापूस, सॅनिटरी नॅपकिन्स वा फेकून दिलेले बँडेजची फार भीती वाटते. आजारपण वा दवाखाना आम्हाला परवडत नाही. कचऱ्यातील कचरा उचलताना काचेच्या तुकड्यामुळे आमचे हात कापतात. तरीसुद्धा आम्ही घाबरत नाही. परंतु सॅनिटरी टॉवेल्समुळे आजारी पडल्यास आमच्या लेकरांकडे कोण बघणार?" एक बाई पोटतिडिकेने सांगत होती.

वापरून फेकून देत असलेल्या नॅपकिन्सच्या संख्यांचा विचार केल्यास दररोज प्रदूषणात किती भर पडत आहे याची नक्कीच कल्पना येईल. 2011 साली केलेल्या निरीक्षणाच्या आकडेवारीनुसार भारतात केवळ 12 टक्के स्त्रिया ब्रँडेड नॅपकिन्सचा वापर करतात. त्या तुलनेने हे आकडे, जपान - सिंगापूरमध्ये 100 टक्के, इंडोनेशियात 88 टक्के व चीनमध्ये 64 टक्के आहे. 15 ते 54 वयोगटातील 30 कोटी भारतीय स्त्रियांपैकी 12 टक्के म्हटले तरी ही संख्या 3.6 कोटी स्त्रिया नॅपकिन्स वापरत असावेत. दर महिन्याला 12 नॅपकिन्स या हिशोबाने वापरलेल्या 43.2 कोटी नॅपकिन्सचे वजनच 5000 टन होईल. हे सर्व नॅपकिन्स जमिनीवर पसरल्यास 50 एकर जागासुद्धा पुरणार नाही.

नॅपकिन्सच्या एकूण उत्पादनापैकी 90 टक्केपेक्षा जास्त उत्पादनात जैविकरित्या डिग्रेड होवू न शकणार्‍या क्रूड ऑइल प्लॅस्टिकचा वापर होतो. व बाकी 10 टक्क्यामध्ये क्लोरिनची प्रक्रिया केलेल्या लाकडाचा लगदा, कापूस यांचा वापर होतो. Municipal Solid Waste (Management and Handling) Rules 2000 या नियमाप्रमाणे वापरलेल्या नॅपकिन्सची पुन:प्रक्रिया होत नसल्यामुळे वैद्यक जैविक कचर्‍याप्रमाणे या नॅपकिन्सचीसुद्धा बंदिस्त जागेतील कचराभट्टीत (incinerate) जाळून विल्हेवाट करावी असे नमूद केले आहे. उघड्यावर नॅपकिन्स जाळल्यास डायोक्सिन व फ्युरान हे विषारी वायू बाहेर पडू शकतात. परंतु बहुतांश नॅपकिन्स कचराकुंडीतच जमा होत असल्यामुळे सफाई कामगारानाच हाताळाव्या लागतात. सातत्याच्या अभावामुळे यातील एकही पद्धत सुरक्षित नाही. या प्रकारच्या उत्पादनात पॉलिमर्सचा भरमसाट वापर केल्यामुळे त्या जैवापघटनीय (बायोडिग्रेडेबल) नाहीत. व त्यांची पुन:प्रक्रियाही होऊ शकत नाही. त्यामुळे पर्यावरणाला यापासून धोका आहे.

पुणे म.न.पा. चे महापौर, वैशाली बनकर व आयुक्त महेश पाठक यांनीसुद्धा या कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठक बोलावली होती. त्यांनासुद्धा कंपन्यांकडून योग्य प्रतिसाद मिळाला नाही.

त्यामुळे 'स्वच्छ' संघटना, पुणेस्थित परिसर व जनवाणी या संघटनांनी पुढाकार घेऊन 8 मार्च रोजी प्रतिक म्हणून आंदोलन छेडले. वापरलेल्या नॅपकिन्सचे मोठे गाठोडे बांधून या कार्पोरेट कंपन्यांना कुरियरद्वारे पाठवून दिले व जाहीर संभेत त्यांचा निषेध केला. 'स्वच्छ' च्या 8 मार्चच्या या आगळ्या वेगळ्या आंदोलनाला प्रसिद्धी मिळाल्यामुळे Feminine and Infant Hygiene Association (FIHA) या संस्थेनी 3 एप्रिल रोजी संबंधितांची बैठक बोलावली. पुणे परिसरातील स्त्रिया व बालकांना लागणार्‍या आरोग्यविषयक उत्पादन करणार्‍या लहान मोठ्या उत्पादकांची ही संस्था आहे. वर उल्लेख केलेल्या कार्पोरेट कंपन्यासुद्धा या संस्थेचे सदस्य आहेत. राजेश शहा हे गृहस्थ त्याचे अध्यक्ष आहेत.

या बैठकीत पुणे म.न.पा.चे सहआयुक्त सुरेश जगताप यानी वापरलेल्या टॉवेल्समुळे मनपाच्या कामगारांचा आरोग्याला धोका आहे हे स्पष्ट केले. FIHAच्या सदस्यांनी यावर विचार करून मार्ग शोधण्याची विनंती केली. सॅनिटरी टॉवेल्सच्या उत्पादकांनी काही ठोस प्रस्ताव द्यावीत अशी अपेक्षा व्यक्त केली. कारण यानंतरची बैठक आरोग्य खात्याच्या सेक्रेटरीबरोबर होणार होती. सकारात्मक पावलं उचलली जात आहेत, असे विधान करण्याचा त्यांचा मानस होता.

परंतु FIHAच्या अध्यक्षांना उत्पादनात काही उणिवा आहेत हेच मान्य नव्हते. जे काही करण्यासारखे होते ते सर्व यापूर्वीच केलेले असल्यामुळे त्यांनी प्रतिसाद देण्यास नकार दिला. या संबंधात हिंदुस्तान लिव्हर वगळता कुणीही काहीही सांगण्यास वा आश्वासन देण्यास तयार नव्हते. हिंदुस्तान लिव्हरने किंबर्ले क्लार्क लिव्हर कंपनीच काय ते करतील असे सांगत स्वत:वरील जबाबदारी झटकून मोकळी झाली. स्त्री मुक्ती संघटना वा इतर कुठलीही संघटना आपल्याशी संपर्क साधला नाही हेही त्यानी नमूद केले. कोटेक्स कंपनी टॉवेल्सच्या योग्य प्रकारच्या विल्हेवाटीच्या सूचना टॉवेल्सच्या पॅकवर ठळकपणे देत असल्यामुळे याविषयी करण्यासारखे काहीही राहिले नाही म्हणून आपल्यावरील जबाबदारी झटकून टाकली.

सुरक्षित विल्हेवाटीचे दुसरे कुठलेही उपाय माहित नसल्यामुळे स्त्रिया रद्दी कागदात वा प्लॅस्टिकच्या पिशवीत वापरलेले नॅपकिन्स बाथरूम वा असेच कुठेतरी लपवून ठेवतात व नंतर केव्हातरी कचराकुंडीत फेकून देतात. दिल्लीतील एका कुटुंबातील 5 वर्षाच्या मुलाने बाथरूममधील लपवून ठेवलेले पॅक उघडून त्यातील घाण टॉवेल्स घरभर पसरून ठेवत होता. त्याच्या आईने हे बघितल्यावर घाबरली. मुलाला अनेक वेळा आंघोळ घालून स्वच्छ केले तरी तिच्या मनातील भीती काही गेली नाही. तेव्हापासून ती टॉवेल्स गटारात फेकू लागली. मनपाचे आयुक्त, जगताप यांच्या मते गटारात फेकलेल्या टॉवेल्समुळे ड्रेनेजचे पाइप लाइन्स चोक अप् होण्याची शक्यता वाढते. व घाण पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होतो.

एका सर्वेक्षणानुसार पुण्यात रोज 250000 सॅनिटरी नॅपकिन्स वापरून फेकल्या जात असावेत असा अंदाज आहे. अशा प्रकारे नॅपकिन्स गटारात वा नाल्यात फेकल्यामुळे गटारं तुंबतात. किंवा फुटपाथवर पसरतात. रस्त्यावरील बेवारशी कुत्रं पॅक कुरतडत पसरवतात. पुण्यातच नव्हे तर भारतातील बहुतेक शहरात हे दृश्य बघायला मिळते. कचराकुंडीत टाकलेल्या कचर्‍याची सुका व ओला यात विभागणी सफाई कामगार करतात. अशा वेळी गुंडाळलेले पॅक्स हाताळताना या कामगारांना ते किळसवाणे वाटत असेल. त्यांनाही काही स्वाभिमान असेल. श्रम प्रतिष्ठा असेल. परंतु याचा विचार न करता कचराकुंडीत बिनधास्तपणे टॉवेल्स फेकणार्‍या स्त्रियांची संख्या कमी नाही.
याच सर्वेक्षणात लक्षणीय प्रमाणात महिला असलेल्या कार्यालय/कंपन्यापैकी 63 टक्के कार्यालयात नॅपकिन्सच्या विल्हेवाटीची कुठलीही सोय नाही. त्यामुळे संडासातच (बळे बळे!) पॅक ढकलून देत असतात. कारण त्यांना वापरलेले नॅपकिन्स कागदात गुंडाळून जवळ बाळगण्यास लाज वाटते.

पुणे मनपा. प्रत्येक वार्डमध्ये incinerator बसवण्याचा विचार करत आहे. दिल्ली येथील एका कंपनीने पुढाकार घेऊन incineratorचे उत्पादन करत आहे. यात प्रथम टॉवेल्य स्वच्छ धुऊन भट्टीत टाकण्याची सोय केली आहे. शाळा, कॉलेज, फॅक्टरी इत्यादी ठिकाणच्या वॉशरूममध्ये incinerator बसवल्यास अनेक महिलांना हायसे वाटेल.

याहीपेक्षा सॅनिटरी टॉवेल्सच्या उत्पादकांनी बायोडिग्रेडेबल व रिसायकलेबल होऊ शकणार्‍या टॉवेल्सचे उत्पादन करण्याचा प्रयत्न करायला हवे. दिल्ली येथील श्रीराम रिसर्च इन्स्टिट्यूटने बांबूच्या लगद्यापासून टॉवेल्स बनवणे शक्य आहे हे दाखवून दिले. शिवाय बाजारातील ब्रँडेड टॉवेल्सपेक्षा 3 पट जास्त शोषक, सुरक्षित व परवडणार्‍या किंमतीत देता येतील, असा त्यांचा दावा आहे. IIT मद्रास येथेसुद्धा प्लॅस्टिक आवरणविरहित टॉवेल्सवर संशोधन होत आहे. आझादी नावाची कंपनी 100 टक्के बायोडिग्रेडेबल टॉवेल्सचे उत्पादन करत आहे.

ग्राहकामध्ये जसजशी जागृती होईल त्याच अनुषंगाने पर्यावरणपूरक व सुलभरित्या विल्हेवाट होऊ शकणार्‍या टॉवेल्सचे उत्पादन नजीकच्या काळात होईल एवढीच अपेक्षा!

संदर्भः Down To Earth Mid Day

धाग्याचा प्रकार निवडा:

गवि Mon, 01/07/2013 - 11:57

महत्वाचा विषय अगदी नीट मांडल्याबद्दल आभार आणि अभिनंदन.

या विषयात मुळात फारशी माहिती नसल्याने हा धागा नव्या प्रतिक्रियांसाठी पाहात राहीन. हॉस्पिटल्समधला "बायोहॅझार्ड" कॅटेगरीतला कचरा (वापरुन झालेल्या सुया, रक्ताळलेली बँडेजे, सर्जिकल कॉटन, ग्लोव्ह्ज, सिरिंजेस, सर्जरीत काढलेले अवयव, जैव टिश्यू, गर्भ इ इ) यांच्यासाठी वेगळ्या प्रकारची व्हॅन (धोक्यांच्या इशार्‍यांसहित) पाहिली आहे. पण घरोघरी अशा एका प्रकारची बायोहॅझार्ड कॅटेगरीतली वेस्ट तयार होते आणि कोणत्याही स्पेशल ट्रीटमेंटशिवाय थेट नेहमीच्या केरात जाऊ शकते हे लक्षात येत नाही- हे जाणवलं.

(मागे एका समारंभाला मित्र आणि नातेवाईकांना उतरण्यासाठी एक मॅरेज हॉल भाड्याने घेतला. तिथे असलेल्या पाहुण्यांची विचारपूस, खाणंपिणं वगैरे करण्यासाठी फेर्‍या मारल्या, पूर्णवेळ हवं नको बघायला दिवसभर भाऊबंदातल्या कोणाकोणाला तिथे अपॉईंट केलं. दुसर्‍या दिवशी हॉल रिकामा करुन द्यायला गेलो तेव्हा तिथल्या व्यवस्थापकाने मला बोलावून झापलं त्यामधे मुख्य तक्रार अशी होती की सॅनिटरी नॅपकिन्स तिथल्या कचर्‍याच्या डब्यात आणि टॉयलेट्समधे टाकली होती. मी ते सर्व ऐकून घेतलं. सफाईचा एक्स्ट्रा चार्जही बहुधा भरला असं वाटतं. पण प्रश्न पडलाच होता की हे घडू नये म्हणून यजमान काय करणार? आणि आलेल्या स्त्रियांपैकी अज्ञात स्त्रियांनी अशावेळी काय करायला हवं होतं? त्यांना दुसरा काय पर्याय होता? त्यांचीही कुचंबणाच नव्हती का?.. त्यामुळे हा एक उपेक्षित प्रश्न आहे हे नक्की..

डिस्पोजेबल नॅपकिन्समुळे हा प्रॉब्लेम वाढला आहे असं म्हटलं आहे.. पण नोकरी, व्यवसाय, करियर करताना री-यूजेबल कापडाचे घरगुती पॅड बनवून वापरणं अशक्यप्राय आहे असं वाटतं.)

प्रकाश घाटपांडे Mon, 01/07/2013 - 12:00

उत्पादकांच्या रिसर्च इन्स्टिट्युट ने यात लक्ष घालायला पाहिजे. बायोडिग्रेडेबल बनवणे आझादी कंपनी ला शक्य आहे तर इतर कंपन्यांना का ते शक्य नाही

अपरिमेय Mon, 01/07/2013 - 12:28

नॅपकिन्स ऐवजी मूनकप हा पर्याय ठरू शकतो का? इथे त्यांचा FAQ आहे.
.
एक दुसरा मुद्दा असा की या लेखात लिहिलेले पर्यावरणावर होणारे परिणाम वगैरे मान्य आहेत पण एकूण तयार होणार्‍या घातक कचर्‍यात याचे प्रमाण किती आहे? या दुव्यावर काही आकडेवारी मिळेल. त्यातील आकृती क्र. १ बघितली तर भारतात तयार होणारा कचरा काहीशे दशलक्ष टन आहे. फक्त toxic chemical waste ४.५ दशलक्ष टन आहे, बाकीचा घातक कचरा वेगळा. या तुलनेत महिन्याचे ५००० टन फारच किरकोळ वाटतात. हा विषय इतर घातक कचर्‍यापासून वेगळा काढणे खरचं गरजेचे आहे का?

मेघना भुस्कुटे Mon, 01/07/2013 - 12:46

In reply to by अपरिमेय

हा विषय इतर घातक कचर्‍यापासून वेगळा काढणे खरचं गरजेचे आहे का?

सहमत. सफाई कामगारांना कचर्‍याच्या हाताळणीपासून संभवणारे धोके हा अगदी भीषण आणि खरोखरचाच प्रश्न आहे, याबद्दल दुमत नाही. पण त्यावर ताबडतोबीचं उत्तर म्हणजे सफाई कामगारांना अद्यावत आयुधं पुरवणं हे असेल.

सॅनिटरी टॉवेल्स बनवणार्‍या कंपन्यांना ते बायोडिग्रेडेबल बनवण्याची विनंती केली, तरी लोकमताचा पुरेसा सबळ रेटा तयार झाल्याखेरीज कंपन्या त्यांच्या पद्धती बदलणं कठीण आहे. तो रस्ता नि:संशय लांबचा आहे. शिवाय एक सॅनिटरी टॉवेल्स बायोडिग्रेडेबल असायला लागले, म्हणून सफाई कामगारांपुढचे प्रश्न संपतात थोडेच? बायोडिग्रेडेबल नॅपकिन्स नष्ट व्हायलाही काहीएक वेळ लागेलच की. तोवर ते हानिकारक नसणार आहे का? बरं, ते हानिकारक उरत नाहीत, असं गृहित धरलं, तरी हॉस्पिटल्सच्या आणि त्यासारख्या इतर (बाळांसाठी वापरतात ते 'हगीज'सारखे नॅपकिन्स, वापरून फेकून दिलेले कॉण्डोम्स, इत्यादी) कचर्‍याचा प्रश्न उरेलच ना?

असं असेलच असं नाही हे आधीच मान्य करते, पण मूळ प्रश्नावर उत्तर शोधायचं सोडून भलतीकडेच लक्ष केंद्रित केलं जातं आहे आणि बायकांना प्रचंड प्रमाणात दिलासा देणार्‍या सॅनिटरी टॉवेल्सना प्रमाणाबाहेर जास्त दिला दोष जातो आहे, अशी काहीशी भावना प्रथमवाचनात तरी झाली खरी. पुन्हा एकदा नोंदते - सफाई कामगारांना सामोरं जावं लागतं, त्या भीषण परिस्थितीचं यत्किंचितही समर्थन करण्याचा माझा उद्देश नाही.

प्रकाश घाटपांडे Mon, 01/07/2013 - 13:47

In reply to by मेघना भुस्कुटे

पण मूळ प्रश्नावर उत्तर शोधायचं सोडून भलतीकडेच लक्ष केंद्रित केलं जातं आहे आणि बायकांना प्रचंड प्रमाणात दिलासा देणार्‍या सॅनिटरी टॉवेल्सना प्रमाणाबाहेर जास्त दिला दोष जातो आहे,

नाही तस नाहीये! मूळ प्रश्नाचे गांभीर्य ठसवण्यासाठी धागाकर्त्याने समस्येवर अधिक फोकस केला आहे. उपाययोजनांविषयी विषय चर्चेला सोडला आहे असे मला वाटते. याच विषयावर वेगळ्या बाजूने लेखन उपक्रमावर लेखकाने केले आहे.निम्न आर्थिक स्तरावरील स्त्रियांना सुद्धा परवडेल अशा स्वरुपाच्या सॅनिटरी नॅपकिन्स ची निर्मिती कशी करता येईल याविषयीचा उहापोह त्यात केला आहे. सध्या उपक्रम गंडल्यामुळे त्याची लिंक देता येत नाही. बाकी तुमचे मुद्दे तर्कशुद्ध, पटणारे आहेत.

शिल्पा बडवे Mon, 01/07/2013 - 13:14

सफाई कामगारांना योग्य ते ग्लव्ह्ज, मास्क्स वगैरे देणं गरजेचं आहे. पण त्यांना काही नीट वागवलं जात नाही. कोणालाही अशी कचर्‍यात काम करायची इच्छा नसते पण नाईलाजाने ते ही स्वच्छतेची कामे करतात. त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली गेली पाहीजे. पण ते कधी शक्य आहे?

राहता राहीला विषय सॅनिटरी नॅपकीन्सचा - कपड्यापेक्षा नॅपकीन्स नक्कीच उत्तम आहेत. बायोडीग्रेडेबल बनवणं शक्य असावं म्हणजे त्यांची विल्हेवाट लावणं सोपं होईल. आपल्याकडे कॉम्पोस्टींग, ट्रॅश अन रीसायक्लेबल्स ची वेगवेगळी सोय नसते मग बायकांनी कचरा कुठे टाकायचा?

अपरिमेय Mon, 01/07/2013 - 13:50

सफाई कामगारांच्या प्रश्नाविषयी कचराकोंडी नावाचा एक माहितीपट पुर्वी बघितला होता. त्याचा दुवा शोधत होतो तो मिळाला. या प्रश्न फारच भीषण आहे आणी त्याची व्याप्ती सॅनिटरी नॅपकिन्स पेक्षा कितीतरी जास्त आहे. सफाई कामगारांना त्यांचे काम करताना कमीतकमी त्रास व्हावा यासाठी जे काही करता येणे शक्य आहे ते महानगरपालिकांच्याच हातात आहे आणी ते कितपत होते आहे याबद्दल शंका आहे. हा महितीपट थोडा जुना आहे, परिस्थिती कितपत बदलली आहे याची मला माहिती नाही, कोणी पुणेकर असतील तर त्यांनी अद्ययावत माहिती द्यावी ही विनंती. पण हा माहितीपट बघितल्यावर "पुणे म.न.पा. चे महापौर, वैशाली बनकर व आयुक्त महेश पाठक यांनीसुद्धा या कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठक बोलावली होती. त्यांनासुद्धा कंपन्यांकडून योग्य प्रतिसाद मिळाला नाही." या स्वरूपाची वक्तव्ये केवळ स्वतःची जबाबदारी झटकून टाकण्यासाठी केलेली वाटतात.

>>The Plastic Waste (Management and Handling) Rules 2011 या नियमात Extended Producer's Responsibility (ERP) संबंधी काही मार्गदर्शक कलमं आहेत. त्या कलमानुसार पर्यावरणाला हानी न पोहोचता उत्पादनांच्या वापरातून होणाऱ्या कचर्‍याची योग्य प्रकारे विल्हेवाट करण्याची जबाबदारी उत्पादकावर सोपवली आहे.

हे जर खरे असेल तर बैठका कसल्या बोलावताय, करा की कायदेशीर कारवाई.

(हा माहितीपट किळसवाणा वाटू शकतो, स्वतःच्या जबाबदारीवर बघावा)

ऋषिकेश Mon, 01/07/2013 - 14:00

लेख वाचायला सुरवात झाल्यावर आता हे नॅपकिन्सवर बंदीची मागणी करतात काय असे वाटले होते. ;) पण तशी त्या संघटनांची माअणी नसून केवळ चर्चेद्वारे उपाय शोधणे ही मागणी असल्याचे पाहुन हे प्रयत्न संरचनात्मक वाटले. मात्र एखाद्या मिटिंगमध्ये यश आले नाही ही यात नवीन काहीच वाटले नाही. हे चालायचेच. एखादी सिस्टीम बदलायची तर ते लगेच होणार आहे अशी या संस्थांची आशा असेल तर त्यांनी वस्तुस्थितीची जाणीव लवकर करून घेऊन प्रयत्न सतत चालु ठेवायला हवेत. कंपन्यांचीही काहि भुमिका असेल, काही कायद्यांमध्ये तृटी असेल, काही लोकांच्या सवयींमध्ये. हे सगळे बदलायचे म्हणजे समाजसुधारणा हा पर्याय आहे, आंदोलनाने हे कितपत साध्य होईल सांगता येणार नाही (म्हणजे आंदोलने करू नयेत असे नाही, मात्र त्याच्याकडून किती अपेक्षा ठेवाव्यात ही वस्तुस्थिती ध्यानात घ्यावी)

बाकी, या लेखात नॅपकिन्स कचर्‍यात टाकून देण्याविरूद्ध बरीच तक्रार आहे पण वाचकांच्या हाती फारसे उपयोगी काही लागत नाही. त्यापेक्षा, सध्या जे नॅपकिन्स आहेत त्याची विल्हेवाट कशी लावावी? याची माहितीदेखील आली असती तर विरोध करायचे कारण कळले असते. (जर सध्याच्या नॅपकिन्सना नष्ट करायची पद्धत तितकीशी कठीण नसेल तर ती वापणार्‍यांमध्ये शिक्षण हवे)

@गवि. अतिशय विचारकरण्यालायक प्रतिसाद आहे.

ॲमी Mon, 01/07/2013 - 14:34

लेख, प्रतिसाद आवडले. एका आयटी कंपनी च्या वॉशरुममधे एक वेगळीच डस्टबीन होती. स्टीलची, आयताकृती, पुर्ण बंद, सुगंधीत. पेडल दाबुन एक छोटी स्लिट ओपन व्हायची त्यातून फक्त नॅपकिन टाकायचा, कागद/केरीबेगमधे न गुंडाळता तसाच रोल करुन. नंतर विल्हेवाट कशी लावायचे माहीत नाही पण बहुतेक जाळायचे. त्या कंपनीच स्टिकर होतं डस्टबीनवर पण आता नाव लक्षात नाही माझ्या. प्रत्येक सोसायटी, शाळा, कॉलेज, ऑफिस, हॉटेल, लॉज, थिएटर इ. मधे अशा वेगळ्या डस्टबीन बसवु शकतात. चार्जेस घ्यायचे वापरणार्याँकडुन स्वच्छ टॉयलेट मिळायला माणशी २ ४ रु घेतात तसे. किँवा नॅपकिन बनवणार्या कंपन्यांनाच ही सिस्टीम इंप्लिमेँट करायला लावावी. ते ग्राहकाकडुन किँमत वसुल करतीलच.

नितिन थत्ते Mon, 01/07/2013 - 14:32

चांगला लेख आणि प्रतिसाद. ५००० टन वगैरे आकड्यांनी नीटसा बोध होत नाही हे खरं पण समस्या गंभीर असण्याची शक्यता आहे. तरी इस्पितळातील कापूस आदि कचरा ८० टक्के रोगग्रस्त असण्याची शक्यता आहे, हा तसा असण्याची शक्यता कमी वाटते. १० एक टक्के स्त्रियांचेच नॅपकीन रोगजंतूंनी दूषित असण्याची शक्यता वाटते.

@गवि.
>>पण प्रश्न पडलाच होता की हे घडू नये म्हणून यजमान काय करणार? आणि आलेल्या स्त्रियांपैकी अज्ञात स्त्रियांनी अशावेळी काय करायला हवं होतं? त्यांना दुसरा काय पर्याय होता? त्यांचीही कुचंबणाच नव्हती का?..

घ्या !! आमच्या पूर्वजांना हा प्रश्न वेदकाळातच कळला असल्याने त्यांनी अशा स्थितीतल्या स्त्रियांनी अशा समारंभाला जाऊ नये असे नियम केले होते. आमचे पूर्वज थोर म्हणजे थो...र...च. ;)

तिरशिंगराव Tue, 02/07/2013 - 10:34

एका महत्वाच्या प्रश्नाला हात घातल्याबद्दल धन्यवाद. अशा प्रकारचा व हॉस्पिटल्समधे तयार होणारा कचरा, इनसिनरेटर मध्येच जाळायला हवा आणि त्यासाठी तशी सक्षम यंत्रणा हवी.

विसुनाना Sat, 13/07/2013 - 14:31

हे प्रकरण आता न्यायप्रविष्ट होणार आहे असे दिसते-

"सॅनिटरी नॅपकिन्सच्या वापरामुळे शहरात दिवसाला दोन हजार किलो कचरा होत असतानाही, उत्पादन कंपन्यांनी मात्र या समस्याकडे सोयीस्कररित्या दुर्लक्ष केले आहे. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी जानेवारीपासून वारंवार पत्रव्यवहार करूनही कोणत्याही कंपन्यांनी याची दखल घेतलेली नाही. या कंपन्यांना धडा शिकविण्यासाठी 'स्वच्छ' संस्था आता कोर्टाची पायरी चढण्याच्या विचारात आहे."

http://maharashtratimes.indiatimes.com/maharashtra/pune/sanitary-napkin…

गब्बर सिंग Fri, 25/07/2014 - 05:07

धागा व प्रतिसाद पुन्हा पुन्हा वाचले. विषय व त्याचे गांभिर्य समजले.

प्रश्न - या समस्येच्या निर्मीतीसाठी सर्वात जास्त कोणास नेमके जबाबदार धरले जावे? - नॅपकिन उत्पादक, पालिका सफाई विभाग अधिकारी, सफाई कर्मचारी, आरोग्य मंत्रालय ? जिथून हे नॅपकिन खरेदी केले जातात ते दुकान ? www.wasteventures.com ? की "आणखी कोणी" ???

------

अशा वेळी गुंडाळलेले पॅक्स हाताळताना या कामगारांना ते किळसवाणे वाटत असेल. त्यांनाही काही स्वाभिमान असेल. श्रम प्रतिष्ठा असेल. परंतु याचा विचार न करता कचराकुंडीत बिनधास्तपणे टॉवेल्स फेकणार्‍या स्त्रियांची संख्या कमी नाही.

या स्त्रियांच्या या कृतीचे मी थेट समर्थन करतो. त्या जे करतात त्यात काहीही अयोग्य नाही. त्यांनी असेच रोज करावे व आवर्जून करावे.

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 25/07/2014 - 05:09

In reply to by गब्बर सिंग

"त्यांनी असेच रोज करावे"

भारतीय स्त्रिया अॅनिमिक असतात ते कमी आहे काय, म्हणून हे?

गब्बर सिंग Fri, 25/07/2014 - 06:09

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

नाही.

समस्या ही आहे की - सफाई कामगारांना नोकरी स्वीकारण्यापूर्वी हे माहीती होते की त्यांना सर्व प्रकारचा कचरा उचलावा लागणार आहे. त्यात कोमेजलेली फुले ही येतात व मल सुद्धा येतो. व नॅपकिन्स सुद्धा येतात. त्यामुळे स्त्रियांनी नॅपकिन्स टाकलेत ते उचलताना "श्रम प्रतिष्ठेचा मुद्दा" लावणे हे बरोबर असले तरी the premium that should be paid (whether explicitly or implicitly) to the sanitation workers gets factored in the (total compensation package) that they receive from the municipal corp. आता हे प्याकेज तुटपुंजे आहे असा तक्रार+युक्तीवाद केला जाऊ शकतो. पण तो तुटपुंजा का आहे याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. Competition in the labor market dissipates the premium.

त्यामुळे कचरापेटीत कचरा टाकणे हे मेकॅनिझम असेल तर स्त्रियांनी त्यात नॅपकिन्स टाकले तर ते योग्यच आहे.

............सा… Fri, 25/07/2014 - 06:23

In reply to by गब्बर सिंग

पैसे देतो म्हणून वाट्टेल तसं राबवायला नको. पण तो कॉमन सेन्स चा मुद्दा आहेच. की आपल्याकडून व्यवस्थितपणा/टापटीप शक्यतो स्त्रियांनी सांभाळावी. बाकी तुझा मुद्दा पटतो आहे. वेगळाच अँगल (दृष्टीकोन) आहे.

प्रभाकर नानावटी Fri, 25/07/2014 - 11:44

In reply to by गब्बर सिंग

उदर निर्वाहासाठी अगतिक माणसं कुठल्याही थराला जात असतात; कुणी सफाई कामगार होतात, कुणी खाण कामगार होतात, कुणी वेठबिगारी पत्करतात, कुणी (छुपी) गुलामगिरी पत्करतात, कुणी वेश्या व्यवसायात घुसतात, कुणी सायबर कूली होतात, तर कुणी जिवाची पर्वा न करता धोकादायक काम करतात. ही जी निवड असते ती त्यांना आवडते म्हणून केलेली नसते तर ती त्यांच्यावर लादलेली असते.

सफाई कामगारांचेच उदाहरण घेतल्यास आपल्या देशातील सफाई कामगार हे एका विशिष्ट जातीचे (-जी जन्माधिष्ठित असते-) असतात व ते काम पिढ्यान पिढ्या करत असतात. इतर प्रकारच्या नोकरीप्रमाणे या नोकरीसाठी हजारो अर्ज आलेले नसतात. ऑन लाइन फॉर्म भरावे लागत नाही किंवा त्यासाठी प्रवेश परीक्षाही नसते. त्यामुळे कामाचे स्वरूप किंवा कामाचा मोबदला यांचा कुठेही ताळमेळ नसतो. खरे पाहता विकसित देशात मानवी प्रतिष्ठेला धक्का पोचवणार्‍या अशा प्रकारच्या निकृष्ट दर्जाच्या कामासाठी तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. व त्यासाठी किंमत मोजण्यास तो समाज मागेपुढे पाहत नाही. त्याचप्रमाणे तंत्रज्ञानाच्या योग्य वापरासाठी तेथील नागरिकांना शिस्तीचे धडे दिले जातात. व बेशिस्त वागणुकीला वा मनमानीला जबर शिक्षा व दंड ठोठावले जातात.

आपल्या देशात अशा प्रकारचे तंत्रज्ञान राबवण्यासाठी पैसे नसतात. शिवाय प्रचंड लोकसंख्या, आवाक्याबाहेरचे कार्यक्षेत्र, (व बोकाळलेला भ्रष्टाचार) इत्यादीमुळे मानवी प्रतिष्ठा व स्वाभिमान बाजूला सारून माणसं य प्रकारचे निकृष्ट दर्जाचे कामं पत्करतात. जोपर्यंत यासाठी कामगार मिळत राहतील तोपर्यंत ही व्यवस्था अशीच राहणार आहे. त्यामुळे हे सफाई कामगार याच कामासाठी पगार घेतात म्हणून कचरा कुंडीत काहीही टाकले तरी चालेल ही वृत्ती समर्थनीय वाटत नाही. एके काळी अमेरिकेच्या बाजारात खरेदी करणारे, आफ्रिकन गुलामांना चाबूक मारून त्यांची 'गुलामी'च्या लायकीची परीक्षा घेत होते. जबरदस्तीने तोंड उघडून 32 दात आहेत की नाही याची खात्री घेत होते व त्यानंतरच बोली करत होते. परंतु गुलामगिरी मानव जातीलाच कलंक आहे हे लक्षात आल्यानंतर गुलामगिरी नष्ट करणारे कायदे झाले व गुलामगिरी हद्दपार झाली. त्यावेळीसुद्धा काही महाभाग पैसे देतो माल चांगला हवा असे आपल्या वर्तनाचे समर्थन करत असतीलही.

या स्पर्धात्मक युगात आपण पैसे फेकून सेवा विकत घेतो याचा अर्थ मानवी प्रतिष्ठा वा मानवी स्वाभिमानाचा विचारच करायचा नाही असे नाही. त्यामुळे सेवेकरींच्या बाबतीत सहानुभूती बाळगणे हे गरजेचे ठरते. याच सहानुभूतीचा भाग म्हणून सॅनिटरी नॅपकिनच्या विल्हेवाटीसाठी अफोर्डेबल तंत्रज्ञान विकसित करणे किंवा आरोग्यदृष्ट्या अत्यंत गरजेचे परंतु वापरल्यानंतर किळसवाणे वाटणार्‍या या वस्तूसाठी काही पर्याय शोधणे गरजेचे आहे, असे मला वाटते.

गब्बर सिंग Fri, 25/07/2014 - 12:33

In reply to by ऋषिकेश

अर्थात हे पालथ्या गब्बरवर पाणी ठरण्याचीच शक्यता अधिक (डोळा मारत) (ह घे रे गब्बरा)

हलकेच घ्यायला माझ्या तीर्थरूपांचे काही जात नाही रे. पण ह्या अशा अति प्रोग्रेसिव्ह पॉलिसि चे unintended consequences असतात. व ते त्या बिचार्‍यांना भोगावे लागतात जे या दुष्टचक्रातून बाहेर पडू इच्छितात.

पण - The policies, which you endorse, do disservice to exactly those who are intended beneficiaries of these policies.

गब्बर सिंग Fri, 25/07/2014 - 21:18

In reply to by ऋषिकेश

उदाहरण: हे उदाहरण आहे व याचा उद्देश फक्त हा आहे की काही कायदे हे कितीही उदात्त हेतूंनी केलेले असले तरी त्यांचे परिणाम त्या हेतूंप्रमाणे होतीलच असे नाही.

This implies, of course, that simply proscribing the use of child labor
is unlikely to eliminate it; it will only drive poor parents to send
their children to work by stealth and often into even worse “occupations”
such as prostitution. This happened in Bangladesh, with some
young girls falling into prostitution when garment employers who feared
the passage of the U.S. Child Labor Deterrence Act (1993)—known as
the Harkin Bill because of its sponsor, the well-known liberal senator
Tom Harkin—which would have banned imports of textiles using child
labor, dismissed an estimated fifty thousand children from factories.

_______ From Page 71 of In Defense of Globalization _____ by Jagdish Bhagwati

---

आता तू म्हणशील की की त्या मुलांना मुळातच तिथे आधी नोकरी करायला लावणे चूक होते.

--

संभाव्य आक्षेप - चाईल्ड लेबर चा धाग्याच्या मूळ विषयाशी काय संबंध ?
उत्तर - काहीही संबंध नाही. हे उदाहरणमात्र आहे. व उदाहरण देण्याचा उद्देश फक्त एकच आहे. की बालकामगार विरोधी कायदा हा सदहेतू ने केलेला आहे हे सत्य आहे. पण त्याचा परिणाम गरिबांच्या विकल्पांत घटौती होण्यात होतो. व हे दाखवून देणे की हेतूंची विशुद्धता व त्यानुसार कायदे करणे हे समस्याजनक असू शकते.

'न'वी बाजू Fri, 25/07/2014 - 21:18

In reply to by ऋषिकेश

अर्थात हे पालथ्या गब्बरवर पाणी ठरण्याचीच शक्यता अधिक

(गब्बरला पालथा पाडून वॉटरबोर्डिंग करण्याची कल्पना रोचक आणि आकर्षक आहे, परंतु तरीही...) डीसेन्सी ऑफ डिबेट, प्लीज!

गब्बर सिंग Fri, 25/07/2014 - 21:40

In reply to by 'न'वी बाजू

नाय नाय.

मी स्वतः डिसेन्सी ऑफ डिबेट चे अनेकदा उल्लंघन केलेले आहे. त्यामुळे माझ्या वर टीका करताना तुम्ही जर दिव्यास्त्रे वापरलीत तरी ठीक आहे.

ऋषिकेश Wed, 30/07/2014 - 10:01

In reply to by 'न'वी बाजू

ती माझ्यादृष्टीने खेळकर टिपणी - शब्दच्छल होता. डिसेन्सी सोडल्यासारखे वाटले असल्यास क्षमस्व!
(इथे लिहिताना फेशियल एक्सप्रेशन्स दिसत नसल्याने निव्वळ इमोटिकोजीराव कामाचे नैत ;) )

गब्बर सिंग Fri, 25/07/2014 - 12:55

In reply to by प्रभाकर नानावटी

प्रभाकरपंत तुमचे युक्तीवाद - हेतूंची विशुद्धता - एवढा एकच निकष बाळगून केलेले आहेत.

माझे म्हणणे तुम्हासच काय पण ५००% लोकांना पटणारे नाहिये. पण तरीही युक्तीवाद करण्याची बतावणी करतो.

----

उदर निर्वाहासाठी अगतिक माणसं कुठल्याही थराला जात असतात; कुणी सफाई कामगार होतात, कुणी खाण कामगार होतात, कुणी वेठबिगारी पत्करतात, कुणी (छुपी) गुलामगिरी पत्करतात, कुणी वेश्या व्यवसायात घुसतात, कुणी सायबर कूली होतात, तर कुणी जिवाची पर्वा न करता धोकादायक काम करतात. ही जी निवड असते ती त्यांना आवडते म्हणून केलेली नसते तर ती त्यांच्यावर लादलेली असते.

हे ५००००% असत्य आहे. त्यांना ती नोकरी करण्यास कोणीही बलप्रयोग्/धमकी दिलेली नसेल तर हे विधान फक्त असत्य आहे.

काम हे नेहमी - what is my next available alternative ? - हा प्रश्न विचारून (अध्याहृतपणे) केले जाते.

----

जोपर्यंत यासाठी कामगार मिळत राहतील तोपर्यंत ही व्यवस्था अशीच राहणार आहे. त्यामुळे हे सफाई कामगार याच कामासाठी पगार घेतात म्हणून कचरा कुंडीत काहीही टाकले तरी चालेल ही वृत्ती समर्थनीय वाटत नाही.

पहिले - हा मुद्दा मी आधीच अँटिसिपेट करून अ‍ॅड्रेस केलेला आहे.

हे समर्थनीय तुमच्या दृष्टीने नाही. त्यांच्या दृष्टीने असेलही. Why would you like to impose your value preferences onto them ????

----

त्यामुळे कामाचे स्वरूप किंवा कामाचा मोबदला यांचा कुठेही ताळमेळ नसतो.

काम, उद्योग, मागणी, पुरवठा - यांचा अजिबात विचार न करता केलेले विधान. (खरंतर - मी विचारच करणार नाही असा निर्धार करून केलेले विधान.).

मी स्वतः MBA करताना एका कंपनी साठी अक्षरशः मोफत काम केलेले होते. कारण .... opportunity to obtain valuable experience and skills. (आता तुम्ही लगेच, गब्बर तुम्हास परवडते ... पण त्यांचे काय ? हा प्रश्न उपस्थित करणार आहात ... हे माहीती आहे. )

---

या स्पर्धात्मक युगात आपण पैसे फेकून सेवा विकत घेतो याचा अर्थ मानवी प्रतिष्ठा वा मानवी स्वाभिमानाचा विचारच करायचा नाही असे नाही.

अहो पण स्वाभिमान, प्रतिष्ठा यांची किंमत मोजावी लागते .... व ती सुद्धा त्यांना. तुम्हास नव्हे.

Supply and demand for dignity ...

क्षमस्व. पण तुम्ही "हेतूंची विशुद्धता" याशिवाय दुसरा क्रायटेरिया विचारात घेणारच नाही असा निर्धार केलेला दिसतो. (याला उत्तर म्हणून तुम्ही - गब्बर, तुम्ही अर्थशास्त्राशिवाय दुसरा विचार करूच शकत नाही का ? असा प्रतिप्रश्न करणार आहात हे देखील माहीती आहे.)

उपाशी बोका Fri, 25/07/2014 - 21:14

In reply to by गब्बर सिंग

नानावटी आणि गब्बर सिंग या दोघांचे मत वाचले.

ही जी निवड असते ती त्यांना आवडते म्हणून केलेली नसते तर ती त्यांच्यावर लादलेली असते.

हे ५००००% असत्य आहे. त्यांना ती नोकरी करण्यास कोणीही बलप्रयोग्/धमकी दिलेली नसेल तर हे विधान फक्त असत्य आहे.

उदर निर्वाहासाठी अगतिक माणसं कुठल्याही थराला जात असतात, हे मी स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले आहे. त्यामुळे सहमत आहे. गब्बर यांना १ प्रश्न विचारावासा वाटतो, अमेरिकेसारख्या श्रीमंत देशात पण किती लोक देशप्रेमासाठी सैन्यात जातात आणि किती लोक स्वतःच्या मर्जीने पण आर्थिक कारणांसाठी जातात? (आणि मग स्वतःच्या मर्जीने सैन्यात गेले आहेत, तर सैन्यातून बाहेर आले की सरकारने त्यांची काळजी घ्यावी अशी अपेक्षा करतात?)

MBA करताना एका कंपनी साठी अक्षरशः मोफत काम केलेले होते.

दॅट इज बिकॉज यू हॅड अ चॉइस. What about others who do not have luxury of a choice?
आणि म्हणून आपण सामान्य लोकांचे राहाणीमान सुधारण्यासाठी प्रयत्नच करू नयेत किंवा त्याचा काहीच/पुरेसा उपयोग नाही, हे मत काही पटत नाही.
गब्बर यांच्या म्हणण्याप्रमाणे केवळ अर्थशास्त्राचाच विचार केला तर कचराकुंडीचे हे काम करवून घ्यायला मग प्रिमियम किंमत मोजायची तयारी का असू नये?

गब्बर सिंग Fri, 25/07/2014 - 21:25

In reply to by उपाशी बोका

तुमचा पहिला प्रश्न उत्तम आहे. रोख समजला. व नेमका तोच माझा मुद्दा आहे.

(अमेरिकेतले कायदे भारतात राबवावेत असा अर्थ काढू नका.)

--

तुमचा दुसरा प्रश्न मी आधीच अँटिसिपेट करून उत्तर दिलेले आहे. कंसात.

प्रभाकर नानावटी Sat, 26/07/2014 - 13:24

In reply to by गब्बर सिंग

- what is my next available alternative ? -
कचरा गोळा करणे, संडास – गटार स्वच्छ ठेवणे, भंगार गोळा करणे, हमाली करणे, उस तोडण्यासाठी मजूरी करणे इत्यादी प्रकारच्या निकृष्ट दर्जाच्या कामासाठी बलप्रयोग/धमकी दिली जात नसते. उदर निर्वाहाचे दुसरे कुठलेही साधन /उपाय नसतात म्हणून त्या पत्करल्या जातात. आणि घरातली व भोवतालची माणसं असलीच काम करत असल्यामुळे त्यात त्यांना वेगळे काही वाटत नाही. अठरा विश्वे दारिद्र्य, शिक्षणाचा अभाव, व आकलन क्षमतेतील उणीवा यामुळे स्वाभिमान गुंडाळून ठेऊन अशा कामाला ते जुंपवून घेतात. वरच्या वर्गात असल्याप्रमाणे संधी नसतात. व संधीचे सोने करून देणारे नातलगही ठिकठिकाणी पेरलेले नसतात. What is my next available alternative? हा प्रश्न कधीच विचारला जात नाही. कदाचित विचारल्यास उपासमारीची जबरदस्त किंमत द्यावी लागते. व त्यासाठीची तयारी त्यांच्यात नसते.

Why would you like to impose your value preferences onto them ????
गुलामांना आपण गुलाम आहोत व गुलामगिरी अमानवी असते याची कल्पना नसते. ज्यांना मनवीयतेविषयी आस्था असते तेच त्याची जाणीव करून देत असतात. इंग्रजांच्या काळात आबादी आबाद होते म्हणून अश्रू ढाळणारे अजूनही सापडतील. परंतु स्वातंत्र्याची जाणीव काही विचारवंतानी करून दिल्यानंतरच पारतंत्र्य हे काही बरोबर नाही याची जाणीव होऊ लागली व त्यासाठी लढा दिला. अगतिकावस्थेत हे सफाई कामगार ही कामे करत असली तरी त्यांच्यावर आणखी काही अपमानास्पद गोष्टी लादणे निंदनीय ठरेल.

काम, उद्योग, मागणी, पुरवठा - यांचा अजिबात विचार न करता केलेले विधान. (खरंतर - मी विचारच करणार नाही असा निर्धार करून केलेले विधान.).
मागणी, पुरवठा .... हा खाजगीकरण, जागतिकीकरण, व उदारीकरण (खाजाऊ) संस्कृतीचा नेहमी उच्चारला जाणारा मंत्र आहे. हा मंत्र सतत जपणाऱ्या आपल्या देशातील Crony capitalism सामाजिक न्याय वा सामाजिक सुरक्षा यांचा विचारच करणार नाही. भांडवलशाहीचा झेंडा उंचावत असताना वाटेत कितीही मेले तरी चालतील त्यांना तुडवत जाणे हे एकमेव ध्येय त्यांच्यासमोर असते. त्यामुळे कदाचित कामाचे स्वरूप किंवा कामाचा मोबदला यांचा कुठेही ताळमेळ नसतो हे विधान अविचारी वाटले असेल. प्रगत भांडवलीव्यवस्थेतसुद्धा थोड्या फार प्रमाणात social security निष्ठेने पाळली जाते व त्याचा चांगला अनुभव संबंधितांना येत असतो.

Supply and demand for dignity ...
Dignity व self respect यासाठी किंमत मोजण्यची ताकत त्यांच्यात नसते म्हणूनच आपण त्यांना त्यांच्या ताकतीच्या भरवश्यावर न सोडता संयमाने वागून आपल्याबरोबर नेण्याचा प्रयत्न करावा एवढीच अपेक्षा!

गब्बर सिंग Sun, 27/07/2014 - 01:57

In reply to by प्रभाकर नानावटी

आपल्या देशातील Crony capitalism सामाजिक न्याय वा सामाजिक सुरक्षा यांचा विचारच करणार नाही.

क्रोनि कॅपिटलिझम बद्दल बोलणे अत्यंत सोयोस्कर आहे.

क्रोनि युनियनिझम बद्दल बोलणे सोयिस्कर नाही. क्रोनी अ‍ॅग्रिकल्चरिझम बद्दल तर नाहीच नाही. तुम्ही लगेच असे म्हणणार की - "ह्या कुठल्या नवीन टर्म्स काढल्या गब्बर ने ???? या मी कधी ऐकलेल्याच नैयेत"

---

Crony capitalism बद्दल चे एवढे एकच वाक्य प्रतिवाद करण्यासारखे आहे. म्हणून केला. बाकीचा सर्व प्रतिसाद हा "तुमच्या हेतूंची विशुद्धता" व तिचा जयघोष या स्वरूपाचा आहे. स्वतंत्र झाल्यापासून हेच गरिबांचे तारणहार सत्तेत होते. कॅपिटलिझम चा अ‍ॅक्च्युअली गळा आवळून टाकला गेला होता. (नेमका कसा ते ही सांगू शकतो.). १९९२ नंतर उदारीकरण आले. (ते ही क्रायसिस निर्माण झाला म्हणून व सोव्हियत युनियन चे राडे कसे झाले तसे आपले होऊ नये म्हणून घाबरून जाऊन.) पण १९४७ - १९९२ पर्यंत या उदात्त हेतूंनी प्रेरित झालेल्या पॉलिसीज नी काय दिवे लावले ते माहीती आहेच.

----

प्रगत भांडवलीव्यवस्थेतसुद्धा थोड्या फार प्रमाणात social security निष्ठेने पाळली जाते व त्याचा चांगला अनुभव संबंधितांना येत असतो.

हे विधान सोयिस्कर, चलाख तर आहेच पण क्रोनि पणाचे उत्तम उदाहरण आहे. याचा प्रतिवाद करणे गरजेचे नाही कारण हा चलाखपणा आहे. मुद्दा नाही. व हा चलाखपणा पर्दाफार्श करणे गरजेचे आहे म्हणून खालील प्रतिसाद -

सोशल सिक्युरिटी (अगदी प्रगत भांडवली व्यवस्थेतील) च्या कायद्यात फक्त खालील एक क्लॉज घाला. व मग बघा की ती चालते का ?

क्लॉज - सोशल सिक्युरिटी योजने मधे सहभागी होण्याची कोणासही, कसल्याही परिस्थितीत जबरदस्ती केली जाणार नाही.

वेगळ्या शब्दात - Individuals will not be forced in any way, shape or form to participate in the social security scheme.

हा क्लॉज घालून पहा .... किती दिवस ती स्कीम टिकते ते.

नितिन थत्ते Sun, 27/07/2014 - 10:56

In reply to by गब्बर सिंग

>> पण १९४७ - १९९२ पर्यंत या उदात्त हेतूंनी प्रेरित झालेल्या पॉलिसीज नी काय दिवे लावले ते माहीती आहेच.

दुरुस्ती १९६७ (की १९६९) ते १९९१ अशी सुधारणा करू इच्छितो. ६७ पूर्वीच्या पॉलिसीज टोटली समाजवादी नव्हत्या. ग्रॅज्युअली कम्युनिस्टांचा (आणि समाजवाद्यांचा-लोहियावाद्यांचा)राजकारणातील प्रभाव वाढत गेला तशा पॉलिसीज अधिकाधिक समाजवादाकडे झुकत गेल्या. काँग्रेसमधील सिंडिकेटचा पराभव* हा भारतातल्या मिश्र अर्थव्यवस्थे** च्या शवपेटीवरचा पहिला खिळा होता.

*सिंडिकेटच्या पराभवासाठी समाजवाद्यांना आणि कम्युनिस्टांना वापरले गेले. काव्यगत न्याय हा की समाजवाद्यांच्या आणि कम्युनिस्टांच्याच मदतीने सिंडिकेटने इंदिरा गांधींचा पराभव केला. त्यामुळे (सिंडिकेटमधले) मोरारजी पंतप्रधान झाले तरी समाजवादाची साथ सोडता आली नाही.***

** हो १९६७ पूर्वी मिश्र अर्थव्यवस्था होती. सरकारी उद्योग मुख्यत्वे पायाभूत क्षेत्रात होते. पुढे सरकारने मोटारी, स्कूटरी, साबण बनवायला सुरुवात केली. तेल कंपन्यांचे, बँकांचे राष्ट्रीयीकरण झाले. (आणि खाजगी क्षेत्रातल्या आजारी कंपन्या सरकारने आपल्या गळ्यात बांधून घेतल्या).

***पॉइंट इज- (इन अ डेमॉक्रसी) पॉलिसीज आर डिसायडेड बाय पॉलिटिकल कम्पल्शन्स. नॉट बाय रूलर्स ओन व्ह्यूज.

मी Fri, 25/07/2014 - 12:26

In reply to by प्रभाकर नानावटी

मानवतेच्या दृष्टिकोनातून मार्मिक असा प्रतिसाद.

पण व्यवहारदृष्ट्या एक परिप्रेक्ष्य - नॅपकिन्सची विल्हेवाट लावणार्‍यांना ठराविक रोग झाला असण्याबद्दल काही माहिती उपलब्ध आहे काय? किळसवाणे वाटण्यावर 'ठराविक' मार्किंग असलेल्या थैलित नॅपकिन्स टाकून ते कचर्‍यात टाकणे असा सोपा उपाय असु शकतो का? त्याचबरोबर 'थुंकलेल्या/मल-मुत्र-विसर्जन केलेल्या रस्त्यावर झाडू मारणेही' किळसवाणे काम ठरू शकते पण त्यासाठी स्वयंचलित यंत्र निर्माण करुन बेरोजगारी वाढवणे हा उपाय मानवतावादी असु शकतो काय?

३_१४ विक्षिप्त अदिती Fri, 25/07/2014 - 20:32

In reply to by मी

किळसवाणे वाटण्यावर 'ठराविक' मार्किंग असलेल्या थैलित नॅपकिन्स टाकून ते कचर्‍यात टाकणे असा सोपा उपाय असु शकतो का?

उपाय असायला लाख शोधता येतील, पण ते अंमलात कोण आणणार? विशेषतः भारतात.
त्यापेक्षा पर्यावरणाचा मुद्दा सांगावा - हे नॅपकिन्स जिथे बनतात तिथून आपल्या घरी आणणार, मग वापरलेले पुन्हा कुठेतरी वाहून नेले जाणार, त्यासाठी डीझेल खर्च होणार. तिथे ते नीट सडणार नाहीत, शे-पाचशे वर्षं तसेच पडून राहणार. पर्यावरण वाचवा याला तसेही 'कूल पॉईंट्स' आहेत, वापरून घ्या.
शिवाय किंमतीचा मुद्दा सांगावा - किंचित कष्ट करा आणि बरेच पैसे वाचवा.

सरकार, मल्टीनॅशनल्स आणि 'भुक्कड लोक गेले खड्ड्यात' म्हणणाऱ्यांनी काहीही करावं, आम्हाला हेच करायचंय असं म्हणणं सोपं असतं. असं करावं. शिवाय असं वर्तन जास्तीत जास्त फॅशनेबल करण्यासाठीही प्रयत्न करावेत. सध्या हे प्रयत्न कमी पडतात असं वाटतं.

मी Fri, 25/07/2014 - 20:52

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

त्यापेक्षा पर्यावरणाचा मुद्दा सांगावा - हे नॅपकिन्स जिथे बनतात तिथून आपल्या घरी आणणार, मग वापरलेले पुन्हा कुठेतरी वाहून नेले जाणार, त्यासाठी डीझेल खर्च होणार. तिथे ते नीट सडणार नाहीत, शे-पाचशे वर्षं तसेच पडून राहणार. पर्यावरण वाचवा याला तसेही 'कूल पॉईंट्स' आहेत, वापरून घ्या.

खरय, मी तर म्हणतो, त्यापेक्षा कापड वापरावे, धुवुन/वाळवून परत तेच वापरायला रेडी, आणि म्हातार्‍यांना हा प्रॉब्लेम नसल्याने दुसर्‍याचे कापड धुण्याचा प्रश्न येणार नाही.

अजो१२३ Mon, 28/07/2014 - 17:34

In reply to by गब्बर सिंग

Competition in the labor market

काय संबंध?
१. पहिल्यांनी, म्यूनिसिपल कॉर्पोरेशन जेव्हा नोकरी देते तेव्हा ती मार्केट दराने देते का? हे मार्केट आहे कुठे? त्याच्या एक्सचेंजचा वा सदस्यांचे पंजीकरणाची कागदपत्रे आहेत का? त्याचे दरपत्रक वैगेरे आहेत काय?
२. याच हिशेबाने सीमेवरचे सैनिक मार्केटमधे उभे असतात?
३. या मार्केटमधे काय विकले जाते? किती? केव्हा? कोण विकत घेतो? किती रुपयाला?
४. If this transaction is governed by a contract under an Applicable Laws, does such contract or suct Applicable Law deny the labor's right to refute to work under certain pretext?
5. या मार्केटमधे 'व्हॉल्यूम ऑफ लेबरला' किंमत तीच असावी कि 'ज्येष्ठतेला'? म्हणजे एक किलो कचरा एका नवख्या सफाई कर्मचार्‍याने उचलला (त्याची पगार ६००० रु प्रतिमाह मानू) नि तोच (तसाच) कचरा दुसर्‍या (१२००० रु पगार असणार्‍या) कामगाराने उचलला तर त्याची किंमत दुप्पट? हे विचित्र नियम कोणी बनवले? मार्केट असल्या विचित्र नियमांनी चालत असेल तर रॅशनल वा मार्केटच म्हणावे का?
६. सरकारने लेबरचा पगार कायदा आणून महिन्याला ५ लाख रुपये का करू नये? ५००० रुपये का करावा? या दोन आकड्यांत फरक काय? अधिकार्‍यांपेक्षा लेबरचा पगार कमी हे सांगणारे सरकार कोण? सुरुवातीपासूनच जगातल्या सगळ्या सरकारांनी अधिकार्‍यांना कामगारांपेक्षा फार कमी पगार दिली असता तर परिस्थिती उलटी राहिली असती. The people who make laws and regulations make again the intelligent, educated lot. Can the market claim that it is free of agency effect?
७. भारतात सफाई कामगार खूप रोगांना व्हनरेबल आहेत. त्यांना आवश्यक त्या सुविधा, वैद्यकीय सेवा, विमा, compensation for work acquired diseases, इ इ मिळायला नको का? मार्केट हे अनैतिक प्रकारे चालवणे योग्य आहे का? सरकारी व खासगी क्षेत्रात याची एन्फोर्समेंट व्हायला नको का?
८. बाजारातील स्पर्धा म्हणतात तेव्हा चालू बाजारभावात सध्याची अधिकची मागणी पूर्ण करणे अभिप्रेत असते. पण जेव्हा लाँग टर्म करार होतो तेव्हा बाजारभावाचा नि प्रत्यक्षात ज्या किमतीत सेवा वा उत्पादने मिळत आहेत त्यांचा संबंध उरत नाही. इथे हीच केस आहे. मग...
८.१ कराराच्या वेळी कचरा म्हणजे काय याची व्याख्या केली होती का? तो दाखवून, वा फोटो दाखवून कामगाराची सही घेतली होती का?
८.२ जर आता तुमच्या कचर्‍याचे स्वरुप कामगाराला अभिप्रेत करर्‍यापासून वेगळे झाले असेल तर त्याला 'right to terminate the contract for material breach' असायला हवा.
८.३ यामधे कराराचा ब्रिच झाल्यामुळे उचित तो termination payment द्यायला हवा.
९. नोकरी देताना वा सेवा खरीदताना सेवांचे संपूर्ण स्वरुप विषद करता येत नाही नि म्हणून रिजनॅबिलिटी असायला हवी असे मत आहे काय? साधारणतः प्रत्येक appointment letter वर तसे कलम असते. अशा कलमाचा आधार घेत जर उद्या तुम्हालाच फक्त एक दिवस कंपनीची गरज आहे म्हणून रेडिओअ‍ॅक्टिव वेस्ट (म्हणजे तुमचा ती अगोदरपासून नोकरी नाही असे मानून) उचलायला सांगीतले तर? What I mean to say is - in what way the assessment of reasonability by the employer is more valid than that of the employee?
१०. आपल्या सेवाकराराचा चूक वापर होतो आहे हे सांगायचा अधिकार कामगारांना नको का?
थोडक्यात मार्केटचे फ्रिडम जास्त महत्त्वाचे कि माणसाचे?
-------------------------------------------------
स्त्रीयांनी असेच करावे नि रोजच असे करावे असे आपण मार्केटच्या नियमांचा दाखला देऊन म्हणत असाल तर कामगारांनी ती पॅडस उचलू नयेत नि कधीच उचलू नयेत अशी भूमिका त्याच नियमांधारे मी घेईन.
-------------------------------------------------
जेव्हा कोणतेही नविन उत्पादन बाजारात येते, किंवा नविन सेवा बाजारात येते वा एक नवा सामाजिक बदल होऊ लागतो तेव्हा प्रारंभी थोडा गोंधळ उडतो. नंतर थोड्या वेळाने त्यात ज्यांचे ज्यांचे हितसंबंध गुंतले आहेत त्यांच्यात गट नि उपगट बनतात. ते संघर्ष करू लागतात. तेव्हा व्यवस्थेतील सर्वच बाबतीत योग्य ते योग्य त्या प्रमाणात बदल करणे इष्ट. धाग्यात उल्लेखलेल्या प्रश्नाविषयी सर्वांना समाधानकारक वाटेल असे उत्तर हळूहळू येईल. तेव्हा अशी टोकाची भूमिका घेणे श्रेयस्कर नसावे.

प्रभाकर नानावटी Sat, 26/07/2014 - 13:13

In reply to by गब्बर सिंग

या स्त्रियांच्या या कृतीचे मी थेट समर्थन करतो. त्या जे करतात त्यात काहीही अयोग्य नाही. त्यांनी असेच रोज करावे व आवर्जून करावे.

सॅनिटरी नॅपकिनप्रमाणे दवाखान्यातील वैद्यकीय कचरासुद्धा सफाई कामगारांच्याच हवाली करावा. हा समाज अगदी उदार मनाने या कामगारांना वार्षिक सहा आकडी पगार (?) देत असल्यामुळे त्याच्या विल्हेवाटीची जबाबदारी त्यांचीच राहील. व चुकून काही जण रोगाणूंच्या संसर्गाने दगावल्यास one less in a billionमुळे काही फरक पडत नाही. That should be treated as occupational hazard.
डोक्यावरून मैला नेण्यासही परवानगी द्यावी. नेणे न नेणे हा व्यक्तिनिष्ठ प्रश्न असतो. यात समाज, प्रशासन वा न्यायालय मध्ये पडू नयेत. बालसंगोपन ही फक्त पालकांची जबाबदारी आहे. आपल्या पाल्यांचे काय करायचे हे त्यानांच ठरवू दे. मुलांना शाळेत न घालता कुठे तरी कामाला लावून पालकांच्या (तुटपुंज्या) उत्पन्नात भर घालत असल्यास बिघडले कुठे? पुढे मागे त्यांच्यावर काही अत्याचार होत असल्यास व यासंबंधीच्या कायदे - नियमांची अंमलबजावणी नीट होत नसल्यास त्यांनाच त्यांच्या स्वप्रयत्नातून बाहेर पडू दे. समाजाचे त्यांच्याशी देणे घेणे काही नाही. भंगार गोळा करणार्‍याबद्दलही कणव असता कामा नये. ते काम त्यांच्यावर कुणीही लादलेले नाही. ते काम आपणहून स्वखुशीने ते करत असतात. फार फार तर आपण त्यांच्यासाठी घरातील भंगार सामान रस्त्यावर फेकत रहावे.
नगरपालिका पाणीपट्टी गोळा करते. व त्या पाणीपट्टीच्या हिशोबात वाया जाणार्‍या पाण्याचाही खर्च गृहित धरल्यामुळे आपण 24 तास नळ सोडले तरी काही फरक पडणार नाही. प्लॅस्टिकच्या वापरावरील निर्बंधनं पाळू नयेत. नदी नाल्यापासून माउंट एव्हरेस्टच्या टोकापर्यंत प्लॅस्टिकच्या पिशव्या इतस्ततः पडून पर्यावरणाची हानी होत असली तरी आपण काळजी करू नये. कारण प्लॅस्टिक गोळा करण्याचे काम शासनाचे आहे. व आपण त्यासाठी कर भरतो.

ही यादी आणखी वाढविता येईल. तुर्तास एवढे पुरे!

गब्बर सिंग Sun, 27/07/2014 - 02:04

In reply to by प्रभाकर नानावटी

That should be treated as occupational hazard.

ऑक्युपेशनल हजार्ड आहेच. प्रश्नच नाही. पण मी हा मुद्दा आधीच अँटिसिपेट करून अ‍ॅड्रेस केलेला आहे. ऑक्युपेशनल हजार्ड ही एक रिस्क असते व ती कामगारास असते. हे हे सत्य अमान्य करायचा प्रश्नच नाही. एखादा नेत्रहीनही हे सत्य अमान्य करणार नाही. पण हे सत्य मान्य करणे वेगळे आणि त्या रिस्क चा प्रिमियम स्पर्धाप्रक्रियेत डिस्सिपेट होतो ही insight नाकारणे वेगळे. लक्षणीय गोष्ट समोर आणून दिलेली असताना सुद्धा "ती अस्तित्वातच नाही" असा आविर्भाव का ?

मन Sun, 10/08/2014 - 17:10

In reply to by गब्बर सिंग

अशी अनभ्यस्त भूमिका आक्रमकपणे घेणे शक्य आहे; पण वस्तुनिष्ठ नाही.
समस्येच्या मुळाशी जायचे तर गरिब, कष्टकरी ह्यांनी संपत्ती निर्माणात (wealth generation) मध्ये केलेले कार्य लक्षात घ्या.
आधी मार्क्सचे "दास क्यापिटल" वाचून या आणि मग बोला.
त्यातील एकोणीसाव्या पानातील तिसर्‍या परिच्छेदात गब्बर नावाचे आय डी कसा बुद्धीभेद करतात ह्याचा अलगद उलगडा केलाय.
वा वा वा.
वाचाच एकदा -- दास क्यापिटल!
वा वा. काय तो मार्क्स.
त्याच्या बाहेर जग नाहिच.
कै अडलं नडलं, की डोकं वापरायच्या ऐवजी त्यानं ग्रंथात काय लिहिलय हे जाउन तपासलं पाहिजे.
आपल्याला डोकं त्यानंच पसरवलेलं ज्ञान शिक्ण्यासाठी दिलं गेलेलं आहे. आपले डोळे हे त्याचे ग्रंथ वाचण्यासाठीच बनले आहेत.
मार्क्स वाचा. अन मग बोला.
फसव्या स्वातंत्र्याचा उद्घोष करणारे साले हल्कट बांडगुळं म्हणजे भांडवलशा.
ह्यांना जिवंत जाळून ह्यांची संपत्ती ताब्यात घेतली पाहिजे सरकारनं.

............सा… Sun, 10/08/2014 - 18:56

In reply to by मन

ह्यांना जिवंत जाळून ह्यांची संपत्ती ताब्यात घेतली पाहिजे सरकारनं.

=)) =))

च्यायला नकळत, गब्बर सगळ्यांना हिंसेच्या मार्गाकडे प्रवृत्त करतोय ;)
मनोबा सारख्या संतुलित माणूसाचही टकुरं सटकतय =))

प्रकाश घाटपांडे Fri, 25/07/2014 - 13:34

याच विषयावर धागाकर्त्याचा चिंधी ते सॅनिटरी नॅपकिन या लेख ही जरुर वाचावा.
गब्बर भाउ हेतूची विशुद्धता हा देखील महत्वाच मुद्दा आहे. तुमच्यासारखे लोक अन्य बाजू मांडतातच की! गुन्ह्यात सुद्धा शिक्षा देताना गुन्ह्याचा हेतु विचारात घेतला जातो.सफाई कामगारच काय पण कुठल्याही सेवेची श्रमप्रतिष्ठा विचारात घ्यावी. हा मानवतेचा दृष्टीकोन हा फार निसरडा शब्द आहे बुवा!

गब्बर सिंग Fri, 25/07/2014 - 20:14

उदर निर्वाहासाठी अगतिक माणसं कुठल्याही थराला जात असतात; कुणी सफाई कामगार होतात, कुणी खाण कामगार होतात, कुणी वेठबिगारी पत्करतात, कुणी (छुपी) गुलामगिरी पत्करतात, कुणी वेश्या व्यवसायात घुसतात, कुणी सायबर कूली होतात, तर कुणी जिवाची पर्वा न करता धोकादायक काम करतात. ही जी निवड असते ती त्यांना आवडते म्हणून केलेली नसते तर ती त्यांच्यावर लादलेली असते.

हा मुद्दा मी वर खोडून काढायचा यत्न केलेला आहे. पण हे नेमके कोणी लादलेले असते ते सुद्धा सांगा.

----

व माझ्या पहिल्या प्रश्नाचे सुद्धा उत्तर द्या.

............सा… Fri, 25/07/2014 - 20:51

In reply to by गब्बर सिंग

"कोणी व्यक्ती" नाही पण गरीबीने अन अगतिकतेने हे प्रोफेशन कदाचित लादलेले असते. हां आता त्या लोकांनी अन्य प्रोफेशन मिळवण्यासाठी किती यत्न केले वगैरे विदा नाही माझ्याकडे पण .... इन्ट्युइटिव्हली वाटलं ते सांगीतलं.

http://aisiakshare.com/node/210

ही चटका लावणारी कविता काल परत वाचली. परत दारीद्र्य, कुपोषणातून आलेली अगतिकता, हतबलता चटका लावून गेली.
___________
तुझा अतिशय वस्तुनिष्ठ द्रुष्टीकोन मला आवडतो, खूप कौतुक वाटतं पण ....
हा "पण"
.
.

शेवटी समस्यांना "भावनिक" पैलूही असतो असे वाटते.

गब्बर सिंग Fri, 25/07/2014 - 21:11

In reply to by ............सा…

अतिशय वस्तुनिष्ठ द्रुष्टीकोन मला आवडतो, खूप कौतुक वाटतं पण ....

वस्तुनिष्ठ कडे दुर्लक्ष करा. व फक्त व्यक्तीनिष्ठ विचार करा. त्या सफाई कामगाराची हतबलता ही मुख्यत्वे विकल्पांच्या अभावातून निर्माण होते (असे तुम्हीच म्हंटलेले आहे. मी फक्त वेगळ्या शब्दात मांडत आहे). त्या कामगारास दुसरा विकल्प नसेल तर त्याने उदरनिर्वाहासाठी नेमके काय करावे? त्याच्या भावनांचा च फक्त विचार मी करत आहे. Why don't we let him work on that task (however dirty and undignified) and then earn a living and then save some money and attempt to generate the options which he previously lacked ???? (हे विकल्प निर्माण करण्याची जबाबदारी प्रामुख्याने व्यक्तीची (कामगाराचीच) असते. )

............सा… Fri, 25/07/2014 - 21:17

In reply to by गब्बर सिंग

dirty and undignified - हे प्रिरेक्विझिट आहे का?
त्याचे/तिचे हेच काम सुसह्य करण्यासाठी सर्वांनी (त्याच्या/तिच्या सेवेचे उपभोक्ते) काही काळजी घेतली तर काय फरक पडेल?
नक्की काय फरक पडेल? - हे आता तू सांग.

त्या हार्किन्च्या निर्णयामुळे अनेक बालकामगार बेकार होऊन, कुंटणखान्यात पोचले. तसे जर नॅपकीन्स व्यवस्थित डिस्पोझ ऑफ केले तर काय दूरगामी पण अनिष्ट परीणाम होईल बरं? असं का म्हणतोस की "करा रोज नॅपकीन असेच निष्काळजीपणे टाका"

३_१४ विक्षिप्त अदिती Sat, 26/07/2014 - 02:50

In reply to by गब्बर सिंग

हे नेमके कोणी लादलेले असते ते सुद्धा सांगा.

First order approximation केलं तर या बाबतीत, हे काम एकेकाळी कायदेशीर, नैतिक समजल्या जाणाऱ्या जातीव्यवस्थेनेसुद्धा लादलेलं आहे असं म्हणता येईल. माझा कोणताही नातेवाईक सफाई कामगार, वेठबिगार, वेश्या व्यवसायात असल्याचं मला माहित नाही. माझे बहुतेकसे नातेवाईक पांढरपेशा व्यवसायात (आणि कोणी काहीच करत नाहीत) आहेत. फार बुद्धीमान नसणारे नातेवाईक लोकही पांढरपेशा समजली जाणारीच कामं करतात.

अवांतर - घृणा वाटल्यामुळे मी ज्या गोष्टींना हात लावायला सहज तयार होत नाही त्या गोष्टींना इतर कोणी हात लावावा यात माझा काही वाटा आहे या गोष्टीचा मला त्रास होतो. आणि ही गोष्ट फक्त वापरलेल्या नॅपकीन्सची नाही, जेवण संपून खरकटं उरलेल्या ताटाबद्दलही तेवढीच खरी आहे.

अजो१२३ Mon, 28/07/2014 - 17:42

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

अवांतर - घृणा वाटल्यामुळे मी ज्या गोष्टींना हात लावायला सहज तयार होत नाही त्या गोष्टींना इतर कोणी हात लावावा यात माझा काही वाटा आहे या गोष्टीचा मला त्रास होतो. आणि ही गोष्ट फक्त वापरलेल्या नॅपकीन्सची नाही, जेवण संपून खरकटं उरलेल्या ताटाबद्दलही तेवढीच खरी आहे.

मोलकरणीचा वाढलाय तोरा या धाग्यात याच मनोवृत्तीवर निरीक्षण केले आहे.

अनुप ढेरे Tue, 19/08/2014 - 18:35

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

जेवण संपून खरकटं उरलेल्या ताटाबद्दलही तेवढीच खरी आहे.

भारतात हाटीलात गेलात तर तुमची खरकटी एखादा पोर्‍या काढतो. ते काम त्यानं करावं की नाही. किंवा असं काम करायला माणूस ठेवणं योग्य की अयोग्य?

............सा… Tue, 19/08/2014 - 18:39

In reply to by अनुप ढेरे

ताट जरुर वेटर्/वेट्रेस नेतात पण माझ्या परीने मी टेबल लख्ख ठेवते. अगदी १००% टेबलवरचं उचलून ताटात टाकते. ते वेटरवर सोपवत नाही.

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 19/08/2014 - 18:50

In reply to by अनुप ढेरे

असं काम करायला माणूस ठेवणं योग्य का अयोग्य याचं सरसकट उत्तर कसं देणार? माणूस ठेवला असेल तर निदान त्या व्यक्तीला माणूसकी दाखवून वागवावं एवढीच अपेक्षा आहे. सॅनिटरी नॅपकीन उचलणारे असोत किंवा खरकटं काढणारे लोक, त्यांच्या आरोग्याचे प्रश्न येणार नाहीत आणि त्यांना किळस वाटणार नाही अशी उपकरणं वापरायला देणं आवश्यक आहे.

माणसाने असं काम करावं का? उपाशी राहण्यापेक्षा हा पर्याय बहुतेक वेळी बरा असेल; लोकं ही कामं करतात ती 'करियर चॉईस' म्हणून नाही.

Nile Mon, 28/07/2014 - 23:28

या स्त्रियांच्या या कृतीचे मी थेट समर्थन करतो. त्या जे करतात त्यात काहीही अयोग्य नाही. त्यांनी असेच रोज करावे व आवर्जून करावे.

गब्बर सिंग यांचे प्रतिसाद वाचून त्यांना फक्त पैशांचीच भाषा येत असावी असं वाटतं.

हॉटेलमध्ये गेल्यावर मी पूर्ण पैसे देतो, शिवाय टीपही व्यवस्थित देतो. तरी सुद्धा शक्यतो टेबलावरती माझं खाणं सांडणार नाही याची काळजी घेतो. पाणी वगैरे टेबलावर सांडलं गेलं तर दिलगीरी व्यक्त करतो. दारावर येणार्‍या सेल्समनला शिव्या देऊन हाकलण्याऐवजी नम्रतेने नकार देतो. कधी 'टेक सर्व्हिस'ची गरज लागली तर सेवेत आलेल्या दिरंगाईमुळे त्या सर्व्हिस एजंटला शिव्या देत नाही. घरात प्लबंर, इलेक्ट्रीशीयन वगैरे आला तर त्याला चहा-पाणी वगैरे हवं का विचारतो, त्याच्या कामात जमेल तितकी मदत करण्याचा प्रयत्न करतो. टॅक्सीवगैरे केल्यावर चालकाच्या शेजारी बसतो. ऑफिसमधील नविन सहकार्‍याशी ज्या प्रकारे 'हवा-पाण्याच्या' गप्पा मारतो, त्याच प्रमाणे टॅक्सीचालकाशीही मारतो. थोडक्यात, गब्बर सिंग आणि आमची भाषाच वेगळी असल्याने यावर त्यांच्याशी चर्चा करण्याने काही साधेल असे वाटत नाही.

अतिशहाणा Tue, 29/07/2014 - 01:59

In reply to by गब्बर सिंग

एखादी व्यक्ती गरीब आहे म्हणून तिच्यासाठी नियम वाकवणे हा क्रोनी पणा का व कसा नाही ?

एखादी व्यक्ती गरीब का आहे? त्या व्यक्तीला श्रीमंत होण्यासाठी समान संधी उपलब्ध आहेत का? मग अशा समान संधी उपलब्ध का झाल्या नाहीत? समान संधी उपलब्ध करु न शकल्याने काही उपाययोजना करता येतात का? वगैरे..

गब्बर सिंग Tue, 29/07/2014 - 02:26

In reply to by अतिशहाणा

एखादी व्यक्ती गरीब का आहे? त्या व्यक्तीला श्रीमंत होण्यासाठी समान संधी उपलब्ध आहेत का? मग अशा समान संधी उपलब्ध का झाल्या नाहीत? समान संधी उपलब्ध करु न शकल्याने काही उपाययोजना करता येतात का? वगैरे..

1) Equality of opportunity
2) Equality of results

चिरंतन वाद.

त्या व्यक्तीला श्रीमंत होण्यासाठी समान संधी उपलब्ध करून देण्यासाठी जी मशिनरी/यंत्रणा उपलब्ध उभी केली जाते तिच्या बांधणीचा खर्च कोणी करायचा ? ती व्यक्ती गरीब आहे म्हणून तिला "समान संधी" (बेनिफिट्स) मिळाव्यात म्हणून कॉस्ट्स इतरांवर (पक्षी : श्रीमंतांवर) लादायच्या ???? व समान संधी उपलब्ध करून दिलेल्या असताना ही जर काम झाले नाही तर संधी चा लाभ घेऊनही गरीबीतून जे वर येत नाहीत त्यांच्यावर केलेल्या खर्चाचे काय ????

३_१४ विक्षिप्त अदिती Tue, 29/07/2014 - 05:59

In reply to by गब्बर सिंग

०. लाभाच्या आशेने का होईना पण दुसऱ्यांना मदत करणे, उपकार करणं म्हणा हवं तर, हा मानवी स्वभाव आहे. त्यामागे उत्क्रांतिजन्य कारण आहे. तो कोणाला वायफळ खर्च वाटतो म्हणून मानवजात असं वर्तन सोडणार नाही. लाखो वर्षांच्या उत्क्रांतीमधून आलेला स्वभाव काही दशकांपूर्वी अस्तित्वात आलेल्या भांडवलशाहीमुळे बदलणार नाहीये. (याचं स्पष्टीकरण बऱ्याच उत्क्रांती मानसशास्त्र संशोधकांनी दिलेलं आहे. उदा. डेव्हीड बस, जेफ्री मिलर इ.)
१. संधीचा अभाव असलेल्या व्यक्तींना संधी दिल्यानंतर त्यांच्या बुद्धी-शक्तीचा पुन्हा समाजालाच उपयोग होतो. बहुतांश व्यक्ती गरीबीतून वर येऊनही, करदाते बनण्याइतपत बुद्धीमान-शक्तीमान असतात. एकदा करदाते बनले की डार्विन काकांशी संबंध सांगणारं मूलभूत विज्ञानही समजून घेण्याची आवश्यकता नाही. जे लोक करदाते बनत नाहीत त्यांच्यावर खर्च करण्यासाठी पुन्हा मुद्दा क्र ० आहेच.

(शून्य क्रमांकाचा मुद्दा म्हणजे किंमत नसलेला नाही, तर अगदी पहिल्या क्रमांकापेक्षाही मूलभूत मुद्दा. Zeroeth law of thermodynamics आहे तसंच.)

नितिन थत्ते Tue, 29/07/2014 - 09:39

In reply to by गब्बर सिंग

>>त्या व्यक्तीला श्रीमंत होण्यासाठी समान संधी उपलब्ध करून देण्यासाठी जी मशिनरी/यंत्रणा उपलब्ध उभी केली जाते तिच्या बांधणीचा खर्च कोणी करायचा ? ती व्यक्ती गरीब आहे म्हणून तिला "समान संधी" (बेनिफिट्स) मिळाव्यात म्हणून कॉस्ट्स इतरांवर (पक्षी : श्रीमंतांवर) लादायच्या ???? व समान संधी उपलब्ध करून दिलेल्या असताना ही जर काम झाले नाही तर संधी चा लाभ घेऊनही गरीबीतून जे वर येत नाहीत त्यांच्यावर केलेल्या खर्चाचे काय ????

त्याला असलेल्या पर्यायाची कॉष्ट श्रीमंतांना परवडणार आहे काय?

पर्याय हा आहे की शतकानुशतकांमधून जी व्यवस्था उत्क्रांत झाली आहे ती संपूर्ण अनडू करून परत पहिल्यापासून सुरुवात करायची. म्हणजे सध्याच्या श्रीमंताकडे असलेले पैसे संपत्ती त्याच्याच कडे ठेवण्याची मुभा न देता. तरीसुद्धा काही प्रमाणात नैसर्गिक आणि कृत्रिम असमानता राहीलच. उदा २९ जिलै २०१४ रोजी कुपोषित असलेले कष्ट करण्यास इमिजिएटली लायक असणार नाहीत आणि इमिजिएट स्पर्धेत मागे पडतील (कृत्रिम असमान संधी). किंवा काही अपंगत्व असलेले स्पर्धेत मागे पडतील (नैसर्गिक असमान संधी).

बाय द वे डंबानी या उद्योजकाने त्याच्या फडतूस (कसलीच केपेनिलिटी नसलेल्या) मुलाला स्वतः कमावलेल्या पैशातून पोसावे की घरातून हाकलून द्यावे?

अनुप ढेरे Tue, 29/07/2014 - 09:44

In reply to by नितिन थत्ते

ऐच्छिक असावं. डंबानीला ठरवू दे.

अवांतरः श्रीमंतांची पोरं बायडिफॉल्ट निकम्मी असतात असं का वाटतं असावं?

नितिन थत्ते Tue, 29/07/2014 - 11:22

In reply to by अनुप ढेरे

बाय डिफॉल्ट निकम्मी असतात असा दावा नाही.

पण दोन मुलांपैकी एक फडतूस असेल तर त्याला पोसणे हे दुसर्‍या मुलाचा वाटा (त्याच्या पुढच्या पिढ्यांसह) कमी करून केले जाईल ना?

समजा त्याच्याकडे ५० हजार कोटी रुपये असतील तर फडतूसाला घरातून घालवून दिल्यास ५० हजार कोटी रुपये चांगल्या मुलाच्या वाट्याला येतील ते कदाचित ४९ हजार नऊशे पन्नास कोटीच येतील. पक्षी फडतूस मुलामुळे त्याच्या भावाचे पन्नास कोटी रुपयांचे नुकसान होईल. होईल की नाही?

अनुप ढेरे Tue, 29/07/2014 - 15:14

In reply to by नितिन थत्ते

कोणाला किती पैसे द्यायचे हे डंबानीला ठरवू दे. त्याचे पैसे आहेत. सरकारने नाही करू हे.

गब्बर सिंग Tue, 29/07/2014 - 09:50

In reply to by नितिन थत्ते

बाय द वे डंबानी या उद्योजकाने त्याच्या फडतूस (कसलीच केपेनिलिटी नसलेल्या) मुलाला स्वतः कमावलेल्या पैशातून पोसावे की घरातून हाकलून द्यावे?

दुसर्‍याकडून जबरदस्तीने पैसे घेऊन नाही पोसला जातोय तो. कसलीच कॅपेबिलिटी नसलेला ??? रियली ???

फडतूस वर्थलेस गरीब (ज्यांची दोन वेळचे अन्न कमवायची लायकी नाही....) ... सरकारकरवी दुसर्‍याकडून जबरदस्तीने घेतलेल्या पैश्यातून पोसले जातात. अन्न सुरक्षा, कर्जमाफी/कर्जमुक्ती, स्वस्त दरात कर्ज, रोहयो, लाडली लक्ष्मी, अखिलेश कंप्युटर, लालबहाद्दूर पंप, संजय गांधी निराधार योजना, नितिश सायकल ..... लिस्ट लांबलचक आहे....इतके असूनही "आमाला खायला द्या" म्हणून बोंबलतात..... व खायला ३० हजार कोटी प्रतिवर्षी "फक्त" अन्न सुरक्षा योजनेवर देणार्‍या काँग्रेस शी सुद्धा एकनिष्ठ नाहीत.....मतलबी लेकाचे.

............सा… Tue, 29/07/2014 - 02:23

In reply to by गब्बर सिंग

आहे गब्बर प्रतिवादास जागा आहे. कर तू प्रतिवाद. तुझी बाजू मांड. ती पटेल अथवा नाही पण काही गैरसमज दूर तर होतील. :(

अतिशहाणा Tue, 29/07/2014 - 01:56

In reply to by Nile

उत्तम प्रतिसाद. सहमत. पैसे म्हणजे काहीही करायचे लायसन हा गैरसमज जितक्या लवकर दूर होईल तितके चांगले.

गब्बर सिंग Tue, 29/07/2014 - 12:17

In reply to by अतिशहाणा

पैसे म्हणजे काहीही करायचे लायसन हा गैरसमज जितक्या लवकर दूर होईल तितके चांगले.

मुद्दा ठीक आहे. माझा मुद्दा थोडा क्लिष्ट आहे. अजून पुरता मांडलेला नाही. पण उद्या मांडेन.

पण तुमचे वाक्य फ्लिप करा म्हंजे टेस्ट करता येईल.

पैसे नसणे म्हणजे तिसर्‍या कडून (म्हंजे सरकारकरवी) दुसर्‍याचे (श्रीमंत्/मध्यम्/उच्च्मध्यमवर्गीय( ओरबाडायचे लायसन हा गैरसमज जितक्या लवकर दूर होईल तितके जास्त चांगले.

३_१४ विक्षिप्त अदिती Mon, 28/07/2014 - 23:59

सॅनिटरी नॅपकीन्सशी संबंधित नाही, पण माणसांना दिल्या जाणाऱ्या वागणूकीचा विचार करता ही बातमी इथे मुद्दाम दाखवावीशी वाटली.
रोबो करणार नालेसफाई

ठाणे मनपाचे अभिनंदन.

वाचाळ्वीर Mon, 18/08/2014 - 13:19

मध्यंतरी भारतीय स्त्री शक्ति या बाबत काही करणार आहे असे ऐकिवात होते. पण तसे झालेले दिसत नाही.

जसे स्त्रीयांसाठी शउचालये उपलब्ध करण्याची गरज आहे तसेच प्रत्येक शौचालयात एक इन्सिनरेटर लावायची सुद्धा गरज आहे. आणी हे न्यापकिन्स बनवणार्या कम्पन्यांना कम्पल्सरी करायला हवं. माझी सूचना आहे की राष्ट्रपतींनी अध्यादेश काढावा .

............सा… Tue, 19/08/2014 - 18:02

In reply to by वाचाळ्वीर

प्रत्येक शौचालयात एक इन्सिनरेटर लावायची सुद्धा गरज आहे. आणी हे न्यापकिन्स बनवणार्या कम्पन्यांना कम्पल्सरी करायला हवं

आधी शौचालये बनवा तर - ती मूलभूत व्यवस्था तर पुरवा. :( आम्ही आमच्या नॅपकीन्स ची सोय करु. पण .... मुख्य काम तरी मार्गी लावा म्हणावं.