कुठला साबण लावुन झाडे चकचकती...

कुठला साबण लावुन झाडे चकचकती
क्रीम कोणते लावुन पाने तुकतुकती

फुले कोणते अत्तर लावुन दरवळती
फूलपाखरे टॅटू कोठुन गोंदवती

कुठला शॅम्पू भालूच्या केसांसाठी
पेस्ट कोणती हत्तीच्या दातांसाठी

चहा पिउन कुठला वारे ताजे होती
कुठले असते व्हिटॅमीन सूर्यासाठी

प्रश्न मला दररोज किती हे पडपडती
आई, बाबा, ताई डोके खाजवती

field_vote: 
5
Your rating: None Average: 5 (5 votes)

प्रतिक्रिया

हाहाहा मस्त!! निसर्गातील उदाहरणे व त्यांच्या विशेषत्वाच्या जोड्या आवडल्या.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

ही कविता लहानांसाठीच नाही तर मोठ्यांसाठीही!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

Biggrin आवडली. छान आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मुलांना पटकन समजतील असे त्यांच्या नेहमीच्या वापरातले शब्द. प्रयोग आवडला. मराठी माध्यमात जे मराठी शब्द अगदी सोपे समजले जातात, उदा. नक्षी, कोमल, नाजुक,मखमल, वेग इ. ते इंग्लिशमधून शिक्षणाची सुरुवात करणार्‍या मुलांना कठिण वाटतात. त्यामुले सुंदर सुंदर जुन्या कविता/गाण्यांमध्ये त्यांना रस वाटत नाही. 'ढगांची भिजली इरली रे' मधला 'इरली' शब्द त्यांना कळणेच शक्य नाही. असे सरमिसळ भाषेचे प्रयोग आशय कळण्यासाठी स्वागतार्ह आहेत.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

मराठी माध्यमात जे मराठी शब्द अगदी सोपे समजले जातात, उदा. नक्षी, कोमल, नाजुक,मखमल, वेग इ. ते इंग्लिशमधून शिक्षणाची सुरुवात करणार्‍या मुलांना कठिण वाटतात.

माझ्या शिक्षणाची सुरुवात इंग्रजी माध्यमातून झाली. परंतु मला हे शब्द कठिण वाटत नाहीत. (माझ्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेतील तत्कालीन वर्गमित्रांनाही वाटत नसावेत.)

याला कारण, आमच्या शिक्षणाची सुरुवात जरी इंग्रजी माध्यमातून झाली, तरी आमच्या आईवडिलांच्या रोजच्या बोलीत वरीलपैकी बरेच शब्द सर्रास असत. आणि जे नसत, ते साध्यासुध्या छापील वाङ्मयातून कोठे ना कोठे वारंवार भेटत.

इंग्रजी माध्यमातून शिक्षणाची सुरुवात करणार्‍या आजच्या पिढीतील मुलांना जर का हे शब्द अवघड वाटत असतीलच, तर त्याचे कारण हे बहुधा या शब्दांचे सर्वसामान्य रोजच्या बोलीतून उच्चाटन झाले असावे, हे असावे.

'ढगांची भिजली इरली रे' मधला 'इरली' शब्द त्यांना कळणेच शक्य नाही.

'इरली'चा अर्थ १९६०च्या दशकाच्या उत्तरार्धात जन्मलेल्या मलादेखील कळत नाही.

मात्र, ज्या काळात ते गाणे लिहिले गेले, त्या काळात हा शब्द बहुधा अर्थासहित सर्वपरिचित असावा, इतकेच नव्हे, तर बहुधा (निदान ग्रामीण नि निमशहरी भागांत तरी) सामान्य वापरात असावा, आणि म्हणून त्या काळाकरिता बालगीतात वापरण्यासाठी तो ठीकच असावा, असा अंदाज वर्तवण्याचे धाडस करू इच्छितो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

>>'इरली'चा अर्थ १९६०च्या दशकाच्या उत्तरार्धात जन्मलेल्या मलादेखील कळत नाही.

हे पावसाळ्यात शेतात काम करताना उपयोगी ठरते. शेतात लावणी करताना वाकून काम करावे लागते तेव्हा कमरेच्या खालपर्यंत पावसापासून रक्षण होते. वरील चित्रातील इरले तितकेसे बरोबर नाही. ते गुडघ्यापर्यंत पोचले पाहिजे.

अवांतर : ढगांची भिजली इरली याचा अर्थ मात्र कळला नाही.
अतिअवांतर: इरले/इर्ले हे मुंबईतील एक गाव सुद्धा आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

--------------------------------------------
ऐसीव‌रील‌ ग‌म‌भ‌न‌ इत‌रांपेक्षा वेग‌ळे आहे.
प्रमाणित करण्यात येते की हा आयडी एमसीपी आहे.

लै दा वापरलीय. पण जरा आखूड आहे.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

आजकालच्या जमान्यात प्लास्टीकची खोळ इरली म्हणून वापरतात पण ते अंगाला चिकटून असल्याने त्यातून पावसाचा सडकून मार बसू शकतो.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0


मधुमेहा विरुद्ध लढा
माझी जालवही

'इरली'चा अर्थ १९६०च्या दशकाच्या उत्तरार्धात जन्मलेल्या मलादेखील कळत नाही.

अभ्यास कमी पडला, दुसरं काय! Wink

आम्हाला भुगोलाच्या पुस्तकात सचित्र माहिती होती.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

-Nile

मस्त कविता. आमच्या हिंदी भाषिक मुलाला भाषांतर करुन ऐकवली.

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

सही: पुरोगाम्यांना लॉजिक माफ असतं.

सर्वांचे खूप आभार..!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

"प्रश्न पडपडती" हे आवडलं.. Smile

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

अतिशय रंजक!
आवडली!

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0

- ऋ
-------
लव्ह अ‍ॅड लेट लव्ह!

ग्लोरी यांच्या कवितांत नवीन शब्द येतात, हे छानच. पण भाषेचे पुराणप्रयोग ("चकचकतात" ऐवजी "चकचकती") खूप असतात. हे त्यांचे वैशिष्ट्य आहे. Smile

----
चकाचक स्वच्छ झाडं, कुठला साबण लावतात?
टवटवलेली तुकतुक पाने, फेसक्रीम कुठलं चोपतात?

फुलं लावतात दरवळणारे अत्तर, सेंट का कोलोन?
फुलपाखरांचे रंगीत टॅटू, कुठून आणतात गोंदवून?

भालू आणतो केसांसाठी किती शांपू बाटल्या?
हत्ती दातांवरती लावतो टूथपेस्ट उठल्या-उठल्या?

इतके ताजे व्हायला वारे कोणता चहा पितात?
सूर्यासाठी व्हिटामिनं कोणती-कोणती आणतात?

रोज रोज किती मला प्रश्न पडपड पडतात,
आई बाबा आणि ताई डोकी खाजवत बसतात.
---

  • ‌मार्मिक0
  • माहितीपूर्ण0
  • विनोदी0
  • रोचक0
  • खवचट0
  • अवांतर0
  • निरर्थक0
  • पकाऊ0